Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.
आजचं मार्केट – ५ मार्च २०२१
आज क्रूड US $ ६७.२७ प्रती बॅरल ते US $ ६७.९३ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $ १=Rs ७२.७७ ते US $१= Rs ७२.९६ या दरम्यान US $ निर्देशांक ९१.६९ VIX २६.२७ PCR १.३९ होते.
USA मधील फेड बॉण्ड यिल्ड कमी होण्यासाठी उपाय करेल असे सांगितले होते. पण तसे झाले नाही. बॉण्ड यिल्ड पुन्हा १.५८ झाले. फेडचे अध्यक्ष पॉवेल यांनी सांगितले की महागाई वाढू शकते. व्हॅक्सिनेशन ड्राइव्ह सुरु झाल्यामुळे
अर्थव्यवस्थेच्या रिकव्हरीचा मार्ग सोपा झाला त्यामुळे US $ मजबूत होत आहे. त्यामुळे इमर्जिंग मार्केट्समधून गुंन्तवणूक पुन्हा USA मध्ये जाण्याची शक्यता आहे.
ओपेक+ ने क्रूडच्या उत्पादनातील कपात आणखी एक महिना चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. कझाकिस्थान आणि रशिया उत्पादनात अगदी थोडी वाढ करतील.
चीनमध्ये प्रदूषण वाढत आहे त्यामुळे चीनमध्ये स्टीलचे उत्पादन कमी होऊ शकते. तसेच केमिकल उत्पादनावर काही निर्बंध लावले जाऊ शकतात. याचा परिणाम SH केळकर आणि केमलिन फाईन यांच्यावर चांगला परिणाम होईल.
हडसन ऍग्रो ही कंपनी ‘स्विलेक्ट एनर्जी सिस्टीम’ या कंपनीत स्टेक घेण्याचा प्रयत्न करत आहे.
विप्रो ही कंपनी CAPCO या कंपनीचे US $ १.४५ बिलियन किमतीला अधिग्रहण करणार आहे. CAPCO या कंपनीचा गेल्या वर्षीचा रेव्हेन्यू US $ ७२० मिलियन आहे, गेल्या तीन वर्षात कंपनीची अजिबात ग्रोथ नाही. त्यामुळे हे अधिग्रहण महाग वाटते. पण या कंपनीच्या खरेदीमुळे विप्रोचा BFSI बिझिनेस वाढेल. तसेच CAPCO या कंपनीचा रेव्हेन्यू प्रती कर्मचारी चांगला आहे त्यामुळेही विप्रोला फायदा होईल. पण मार्केटला ही खरेदी फारशी पसंत पडली नाही या कंपनीचे विप्रोमध्ये इंट्रीगेशन कसे होते याकडे मार्केटचे लक्ष असेल. त्यामुळे विप्रोचा शेअर मंदीत गेला.
१० मार्च २०२१ रोजी RBI Rs २०००० कोटींच्या गिल्टसची खरेदी करेल.
सरकार टाटा कम्युनिकेशन मधील त्यांचा १०% किंवा पूर्ण २६% स्टेक विकणार आहे.
QUICK HEAL ही कंपनी १० मार्च २०२१ रोजी शेअर बायबॅकवर विचार करेल.
EIL ११ मार्च २०२१ रोजी अंतरीम लाभांशावर विचार करेल.
ICICI लोम्बार्ड या कंपनीने Rs ४ प्रती शेअर तर कोल इंडियाने Rs ५ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.
आज हेरंबा केमिकल्स या कंपनीच्या शेअरचे NSE वर ४४% प्रीमियमने Rs ९०० वर लिस्टिंग झाले.
MTAR टेक या कंपनीचा IPO २०० वेळेला भरला.
सरकार फरटिलायझर उत्पादक कंपन्यांच्या डायव्हेस्टमेन्टच्या पहिल्या टप्प्यात NFL आणि RCF यातील स्टेक विकेल.
FACT आणी मद्रास फर्टिलायझर या कंपन्या वेगवेगळ्या विकाव्यात किंवा विकण्याआधी त्यांचे मर्जर करून विकावे यावर सरकार विचार करत आहे.
PNB हौसिंग फायनान्सने YES बँकेबरोबर COLENDING साठी स्ट्रॅटेजिक करार केला.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने सेबी कडे IPO साठी अर्ज दिला.
जेव्हा चीनचे औद्योगिकरण सुरु झाले तेव्हा म्हणजे सन २००० च्या जवळ पास कमोडिटी सायकल तेजीत होती. रबर ४ वर्षाच्या हायवर तर निकेल ६ वर्षांच्या कॉपर टिन १० वर्षांच्या हायवर आहे. त्यामुळे कमोडिटी मार्केटमध्ये तेजी दिसत आहे. कमोडिटी सायकल मोठी असते.
टाटा मोटर्सने टिआगोचे उत्पादन नॅनोच्या प्लांटमध्ये सुरु केले. टाटा मोटर्सने सांगितले की टेस्ला बरोबर पार्टनर्शीप किंवा JV करण्याचा आमचा विचार नाही.
एक्सिस बँकेच्या व्यवस्थापनाने सांगितले की आम्ही म्युच्युअल फंड आणि ब्रोकिंग कंपन्या विकत घेण्याचा विचार करत आहोत. सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणात योग्य वाटली तर एखादी राष्ट्रीयीकृत बँक घेण्याचा विचारही आम्ही करू शकतो.
BPCL च्या नॉनकोअर ऍसेट डीमर्जर साठी Deloitte ला अडवायझर नियुक्त केले.
आज मी तुम्हाला इंडस टॉवर या कंपनीचा चार्ट देत आहे. या कंपनीच्या पुट ऑप्शनमध्ये खरेदी होत आहे. २० DMA , ५० DMA तोडले. आठवड्याचा लो तोडला. निगेटिव्ह डायव्हर्जन OCCILATER मध्ये दिसत आहे.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ५०४०५ NSE निर्देशांक निफ्टी १४९३८ आणि बँक निफ्टी ३५२२८ वर बंद झाले.
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!