विचारा तुमचे प्रश्न

वाचकहो माझे आपल्याला एक निवेदन आहे. २०१२ सालच्या गुरुपौर्णिमेपासून ब्लॉग लिहायला सुरुवात केली. प्रथम महिन्यात दोन वेळा नंतर दर आठवड्याला असा ब्लॉगचा विस्तार झाला. सध्या हा ब्लॉग रोज टाकला जातो. लोकांना शेअर मार्केट समजावून सांगणे या एकाच उद्देशाने हे काम सुरु आहे. कोणता शेअर कधी खरेदी करावा त्याची किंमत कधी वाढेल, उद्या काय होईल हे सर्व ठरवण्याची आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची ताकत, हिंमत वाचकांना यावी आणि त्यांनी एक स्वावलंबी गुंतवणूकदार /ट्रेडर व्हावे हे माझे धोरण आहे.

सोप्या मराठीतून मार्केटची गुंतागुंत आणि कठीण विषय समजावून सांगणे हा उद्देश आहे. आता ब्लॉगचा पसारा खूप वाढला आहे. प्रश्नांची संख्याही खूप वाढली आहे. एवढ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी खूप वेळ लागतो. ताकतही लागते. प्रश्न एका वाक्याचा असतो पण त्याचे उत्तर मात्र २ पानांचे असते. मला असं वाटतंय कि आता प्रश्नोत्तरांचा format बदलायची वेळ आलेली आहे.

या पुढे मी सध्या प्रश्नांची उत्तर फेंसबूक/ ब्लॉग वर देत जाईन पण तुमचा प्रश्न जर कठीण असेल तर तुम्ही उत्तर अशाप्रकारे मिळवू शकता

(१) आपण मला गुरुवारी प्रश्न पाठवा. प्रश्न तुम्ही खाली दिलेल्या फॉर्म द्वारे पाठवू शकता.
(२) मी आपल्यासाठी १ तासाचा वेळ देईन. शनिवार किंवा रविवारचा वेळ आपल्याला मिळेल.
(३) त्या एका तासाची फी तुम्ही माझ्या अकाउंटमध्ये तुमचा ठरलेला तास सुरु होण्याआधी जमा करा
(४) एका तासात किती प्रश्नांचा समावेश करता येईल हे मात्र आपले प्रश्न किती किचकट आहेत आणि त्यांना उत्तरे द्यायला किती वेळ लागतो यावर अवलंबून राहील.

भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com