३ जुलै २०१२ हा दिवस आणि वर्ष लक्षवेधी ठरणार असं दिसतंय. गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर गुरुचे आणि परमेश्वराचे स्मरण करून, या blog च्या माध्यमातून माझ्या आयुष्याचा २००२ ते २०१२ हा प्रेरणादायी काळ तुमच्या पुढे मांडावा असं मी ठरवलंय. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे.
आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकां कडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे.
ज्या क्षेत्रात स्त्रियांचा वावर फार कमी प्रमाणात असे, तिथे मी आज पाय घट्ट रोवून उभी राहिले आहे. गेल्या दहा वर्षात अनेक वादळे आली , तरीही मी अजून खंबीर उभी आहे. ईश्वरी कृपा, अफाट प्रयत्न आणि नशीब यामुळे हे सगळं शक्य झालेल आहे.
खरं पाहता हि माझ्या आयुष्याची दुसरी खेळी म्हणावी लागेल. ज्या वयात सर्व जण ऐछिक निवृत्ती घेत होते, त्याच वेळी मी हा नव्याचा शोध घेत होते. घरात कोणतीही आबाळ होवू न देता माझी हि महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली. तुम्हाला हि हा सगळं अनुभव घेता यावा, यातली मजा चाखता यावी हा माझा प्रयत्न आहे.
एक अजून गोष्ट साधायची आहे मला या ब्लोग मधून. गेल्या 10 वर्षात मला कळलंय कि share market हे इतकं भीतीदायक नाहीये. share market हे खरं तर खूप मजेशीर आहे, ते एका क्रिकेट च्या match प्रमाणे रोमांचक आहे. फ़क़्त त्यातली मजा कळायची देर आहे. तीच मजा, तोच अनुभव, तीच रोमांचकता तुमच्या पर्यंत आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
माझे लेख हे २ गोष्टींवर आधरलेले असतील. १ माझा share market चा प्रवास आणि २ प्रत्येक आठवड्यात share market मध्ये घडणाऱ्या जमती गमती. उद्देश सोपा आहे, माझा गृहिणी ते stock market investor हा प्रवास कादाचीत तुम्हालाहि share market च्या वाटे वर मदत करू शकेल , आणि share market मधली मजा वाचून तुमची मार्केट बद्दल ची भीती कमी होईल.
बघूया काय जमतंय ते.
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
good one.
Interesting. Path-darshi. All the best.
Pingback: आली माझ्या घरी हि दिवाळी (शेअर मार्केट ची !!) « Stock Market आणि मी
good article
Pingback: भाग ३० – एक वर्ष झालं आणि मार्केट जवळ आलं !! | Stock Market आणि मी
Pingback: भाग १३ – आली माझ्या घरी हि दिवाळी (शेअर मार्केट ची !!) | Stock Market आणि मी
Pingback: भाग ३० – एक वर्ष झालं आणि मार्केट जवळ आलं !! | Stock Market आणि मी
Pingback: HAPPY BIRTHDAY TO YOU – ‘मार्केट आणी मी ‘ | Stock Market आणि मी
ताई
तुम्ही खुप छान प्रेरणा देता
धन्यवाद
मला आपल्याशी बोलायचे आहे. मला आपला कॉन्टॅक्ट नंवर हवा आहे
माझा नंबर 9699615507
Bhari hain khup pan kallal nahi kay
How can get this book in Pune, from where. Is it available in ebook form or PDF form?
Namaskar tumhi pustak bharatbhar kuthe hi deliver karun ghevu shakta. Ya website varun order kara – https://store.whitefalconpublishing.com/products/market-aani-me