आज चा संवाद सुरु करण्या आधी मला एक गोष्ट सांगायची आहे. किंवा अस समजा कि तुम्हाला समजावून द्यायची आहे. मी तुमच्या पेक्षा वेगळी अशी कुणी नाही. किंबहुना तुमच्यात लीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणी ची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. आणि या पुढे मी जे सांगणार आहेत ते कदाचित तुम्हाला सर्वात जास्त जाणवेल.
आता मी सागते त्या प्रसंगात स्वताला ठेवण्या चा प्रयत्न करा. साल २००० , ४०-४२ वर्षाची, मी २० एक वर्षांनी नोकरी शोधायला निघालेली. माझं graduation १९७४ साली झालेलं. कॉम्पुटर च्या knowledge च्या नावानी शंखनाद. बऱ्याच जागी वयाच्या अटीत मी बसत न्हवते. फारसे काही interview calls येत नव्हते. जे येत होते त्यांना काही अर्थ नव्हता. या सगळ्या मध्ये एका महाभागाने मला मुक्ती चा मार्ग दाखवला आणि मला नोकरी च्या मोह्मयेतून बाहेर काढलं. तुम्ही विचार करत असाल कि त्या पठ्ठ्याने असं काय सांगितलं? ऐका तर मग – ‘ तुम्ही ४० वर्षाच्या , तुम्हाला जितका पगार देणार तितक्या पगारात आम्हाला २०-२२ वर्षाची computer educated मुलं मिळतात , तर मग आम्ही तुम्हाला नोकरी का द्यावी ?’ प्रश्न अगदी बरोबर होता, उत्तर माझ्या कडे बिलकुल न्हवतं.
आता मी तुम्हाला सांगते कि मी इथपर्यंत आले कशी?. असं नाही कि मी कधी नोकरी केलेली नव्हती. लग्न आधी मी commerce graduate होते. लग्ना नंतर वकिली चं शिक्षण घेतलं. lecturer म्हणून नोकरी लागली. नोकरी करायची म्हणजे मला माझ्या लहान मुलीला शेजारी सोडावं लागे, तिच्या कडे थोडं दुर्लक्ष होई. हे सगळं मनाला पटत नव्हत. स्वताची पोळी भाजण्या साठी इतरांकडे दुर्लक्ष करण योग्य नाही असं वाटत होतं. जीवाची ओढाताण होत होती. घरातही या गोष्टींवर चर्चा होवू लागली. आयुष्यात लहानपणाची काही वर्ष फार महत्वाची असतात. त्यावेळी आईचा सहवास मिळाला नाही , संस्कार घडले नाहीत तर पोरके पण वाटतो. त्यामुळे मुलं लहान असताना नोकरी करू नये व मुलं मोठी झाल्यावर पुन्हा नोकरी करावी, स्वत:चं career करावं असं ठरलं.
आणि आधी सांगितलं ते या नंतरचं सगळं रामायण. आता मागे वळून बघितला तर हसायला येतं पण त्या वेळी मात्र ते एकून तोंडाच पाणी पळाल होतं. एक गोष्ट मात्र साफ होती, आता जे काय करायचं तिथे वयाची अट असता कामा नये, मला जे आधी पासून येतं त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि आपल्या श्रमाला साजेसा पैसा त्यातून मिळाला पाहिजे. नोकरी मिळणं आता मुश्कील आहे हे साफ होतं, आणि मिळाली तरी ती काही मला पाहिजे तशी मिळणार नव्हती.
हा सगळा विचार करत असताना एक सुंदर कल्पना त्या वेळी माझ्या मनात आली आणि त्याच कल्पने चा हा सगळा प्रवास. कसली कल्पना आणि कुठला प्रवास ते पुढे सांगीनच, पण आज इथेच थांबते. परत भेटूच आपण, पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत राम राम.
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
nice one mam……….
Pingback: निजरूप दाखवा हो.. हरी दर्शनास या हो !!! « Stock Market आणि मी
Pingback: वळलं नाही तरी बेहत्तर पण कळलं तरी पाहिजे !! | Stock Market आणि मी
Pingback: Stock Market आणि मी
khup sunder
Pingback: भाग ३० – एक वर्ष झालं आणि मार्केट जवळ आलं !! | Stock Market आणि मी
Pingback: भाग १ – याचसाठी केला हा अट्टाहास .. | Stock Market आणि मी
VERY VERY GOOD ARTICLE IN MARATHI.
U r Marathi Queen in Share market
सर्वोत्तम लेख आणि माहिती, आपले खूप खूप धन्यवाद!