भाग ३ – प्रयत्ने वाळू चे कण रगडीता !!! Stock Market हि कळे

कुठे होते मी गेल्या आठवड्यात ? hmmm आठवलं.. ४० वर्षाची मी , २० एक वर्षांनी नोकरी शोधायला निघालेली.. बरोबर … तिथेच होते मी..  आपल्या ला जे येतंय त्याचा उपयोग, कष्ट ला साजेसं उत्पन्न आणि वयाची अट नाही  असं काही तरी करावं हा विचार..
आता तुम्हाला मी असंही सांगू शकते कि मी फार विचार केला आणि मग मला कळलं कि share मार्केट हाच माझ्या मुक्तीचा मार्ग 🙂 . पण असं नाहीये.. असतं तर फार छान पण नाहीये .. काही वेळा तुम्हाला कळत नकळत तुमच्या ध्येया कडे देव तुम्हाला घेवून जात असतो. तसच काही तरी माझं झालं.
माझे यजमान ( त्या कळत नवऱ्याला असच म्हणायचो आम्ही ) बँकेत काम करायचे, म्हणजे अजूनही करतात 🙂 . त्या कळत त्यांचं office BSC च्या जवळ होतं. office मध्ये stock मार्केट ची चर्चा होत असते. रस्त्या वर share चे forms ठेवलेले असायचे आणि आपण पण थोडी फार गुंतवणूक करावी अशा विचारानी त्यांनी काही forms भरले. भरले म्हणजे अगदी भरून पावले 🙂 .
सांगायचा अर्थ असा, कि Share तर हातात आले पण त्यांचं करायचं काय याची फारशी कल्पना नव्हती. आणि अश्या रिती ने आमच्या घरी share certificates ची  रद्दी जमा झाली. म्हणजे त्या काळी तरी मी त्याला रद्दीच म्हणायची. त्याला एक कारण होतं, मला कळायचा नाही कि याचा उपयोग काय आणि कधी, घरातल्या इतक्या गोष्टीं बरोबर अजून एक सांभाळा !!! पण तेव्हा मला कल्पना नव्हती कि हीच रद्दी मला माझ्या नशिबाची किल्ली देणार आहे.
चला आता परत २००२ सालात जावूया. असा विचार करा, कि नोकरी शोधून कंटाळलेली मी आणि माझ्या समोर पडलेली हि रद्दी. नोकरी मिळणं कठीण होतं आणि व्यवसाय करायचा म्हणजे भांडवल हवं. त्या वेळी आमच्या गृहिणींची एक सवय उपयोगायला आली. काहीही नवीन जेवण करण्या आधी आम्ही आधी घरात काय काय आहे ते बघतो आणि मगच बाहेरून काय लागेल ते आणायला जातो. मी पण तेच केलं.
ठरवलं कि ह्या रद्दी चा उपयोग करायचा आणि भांडवल उभं करायचं. पैसे तसे हि अडकलेलेच होते आणि certificates घरी पडूनच होती. Share विकले नाहीत तर हातात फ़क़्त रद्दी राहणार होती आणि ब्रोकर तर्फे विकले तर तो २०% घेणार असं सगळ्यांनी सांगितलं. झाला तर फायदा आणि नाही तर नाही. गुंतवणूक होती ती फ़क़्त माझ्या मेहेनती ची. गेल्या १० वर्षात जे काही केलं ते सगळं इथे सुरु झालं.
पुढचं सगळं सांगणारच आहे पण ते पुढच्या आठवड्यात .. येते आता , नंतर भेटूच ..
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

13 thoughts on “भाग ३ – प्रयत्ने वाळू चे कण रगडीता !!! Stock Market हि कळे

 1. Nitin Post author

  Marathi n share market hey concept quavchit tach Jamte… I will def like read the climax of the story…

  Reply
 2. Pingback: निजरूप दाखवा हो.. हरी दर्शनास या हो !!! « Stock Market आणि मी

 3. Pingback: भाव तिथे देव… पण कुठला भाव आणि कुठला देव « Stock Market आणि मी

 4. Pingback: भाग ३० – एक वर्ष झालं आणि मार्केट जवळ आलं !! | Stock Market आणि मी

 5. Pingback: भाग १५ – भाव तिथे देव… पण कुठला भाव आणि कुठला देव | Stock Market आणि मी

 6. Pingback: भाग २ – केल्याने होत आहे रे.. आधी केलेची पाहिजे.. | Stock Market आणि मी

 7. siddharth Post author

  madam mi pan thakla..bhglela ..marathi mulga…family chi responsbility purn karnyat career thambal…ani aata job chya mage…pan 2 varshacha gap aslyane…package khup kami ..tyamulhe…internet var shares baddal mahiti ghetoy..ani kharach ithun pudhe jas me vachat hayin tas…majh knowledge vadhnar ahe ani mala ek navin sanjeevani milhel as valayala lagal ahe…

  Reply
  1. surendraphatak Post author

   वाचन करून तुम्ही शेअरमार्केट्ची माहिती मिळवत आहांत, इंटरनेट वरून शेअर मार्केट्ची माहिती मिळवत आहांत हे समजल्यामुळे आनंद झाला. परंतु कधी ना कधी तुम्हाला धैर्य करून हळूहळू मार्केटमध्ये व्यवहार करावा लागेल. अर्थात सावधगिरी कायमच बाळगावी लागते. मैदानाबाहेर उभे राहून नियम समजावून घेवून खेळ समजतो करमणूक होते, पण स्वतःला खेळता येत नाही. सातत्याने माहिती तर मिळवायची आणी मिळालेल्या माहितीचा उपयोग करून जास्तीतजास्त उत्पन्न मिळवायचे असे केल्यास तुमच्या उत्पनांत वाढ होईल व तूमची अडचण थोड्या फार प्रमाणांत कमी होईल. तुमच्या शेअरमार्केटमधील भावी करिअरसाठी शुभेच्छा

   Reply
 8. Ranjit Masane Post author

  Madam Mala tumhala bhetayach ahe yabaddal Jara savistar bolayach ahe plz mala tumcha contact number milel ka mi maza contact whatsapp sear karto ahe plz mala response dya.
  Name;- Ranjit Kumar Masane
  whatsapp and contact Numbar :-8600915734
  ranjitmasane29@gmail.com

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.