रद्दी आणि ती पण लाख मोलाची 🙂 .. आणि तशी ती होती पण . कारण ती रद्दी होती share certificates ची. जर मी त्याचा काही उपयोग करू शकले तर खरच ती रद्दी मला लाखांनी पैसे मिळवून देवू शकत होती. असं काही नाही कि त्या वेळी मला हे सगळं माहित होतं पण इतकं नक्की कळत होतं कि यातून काही तरी चांगलं निष्पन्न होवू शकेल.
पहिलं काम होतं ते ती रद्दी समजून घेण्याचं. Share विकण्या आधी, आपल्या कडे कुठ कुठ ले Share आहेत हे कळायला तरी हवं. त्या नंतर मग पुढचे प्रश्न, Share विकतात कसे, कुठल्या कंपन्या अजून चालू आहेत, कुठल्या बुडल्या .. प्रश्न खूप होते, म्हटलं कि एक एक करून उत्तरं शोधूया.
मग पुढचा प्रश्न, कि share च्या किमती कुठून कळणार ? ते त्यातल्या त्यात सोपं होतं. त्या किमती रोज पेपर मध्ये येतात. मी म्हटलं चांगलं आहे, लगेच दुसऱ्या दिवशी यजमानांना कामाला लावलं. Share च्या किमती शोधा आणि घेवून जा ती certificates विकायला. गेले बिचारे, तसं न जावून सांगतायत कुणाला ? 🙂
गेले, ते इतकसं तोंड करून परत आले, मी विचारलं – ‘अहो काय झालं? Share मार्केट मध्ये लुटलं कि काय तुम्हाला कुणी ?’ तसा त्या काळी Share मार्केट हा एकूण लुटारू लोकांचा कारभार असाच एक समज होता. हे म्हणाले – ‘बाई, तुला वाटतं तितकं हे सोपं नाहीये. तो ब्रोकर म्हणाला , कि पेपर मध्ये येतात ते कालचे भाव, तो भाव तुम्हाला आज नाही मिळणार साहेब. इथे दर मिनिटाला भाव बदलत असतो. तुम्ही विकायला सांगितल्या वर जो भाव असेल, तो तुम्हाला मिळेल किवा तुम्ही सांगा तुम्हाला काय भाव पाहिजे तो आणि मग तो भाव जेंव्हा येयील तेंव्हा तुमचे Share विकले जातील.’
लग्ना नंतर पहिल्यांदा मला वाटलं कि हे बरोबर म्हणत आहेत. आधी वाटलं तेवढं काही हे सोपं नाहीये. आता आपल्याला काय माहित कि कोणती किंमत बरोबर आणि ती केंव्हा मिळणार? त्या साठी प्रमाण काय ? ते कळणार कुठून? विचार केला कि पुस्तक वाचून कळेल, पण त्या काळी तशी काही पुस्तक मिळत नव्हती, किंवा मला मिळाली नाहीत. काही क्लास चालतात का याची पण चौकशी केली पण तिथे हि नकार घंटाच. आमच्या ओळखीत पण कोणाला या बद्दल काही माहित नव्हतं
म्हणजे जर पैसा उगवायचा असेल तर मलाच या अग्निदिव्यातून जायला लागणार होतं. आपण मेल्या शिवाय स्वर्ग दिसेल असं वाटत नव्हतं. अडकलेला पैसा हा कष्टाचा, घाम गाळून कमावलेला होता. तो वसूल तर करायचाच होता. मागे वळणं हा आता पर्याय नव्हताच.. सदैव सैनीका पुढेच जायचे , न मागुती तुवा कधी फिरायचे.. असच काही तरी मनात गुणगुणत मी पुढे निघाले. पुढचा प्रवास आता पुढच्या आठवड्यात. बोलूच लवकर..
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
very good……………………………………………..
good
Pingback: Stock Market आणि मी Stock Market आणि मी
Pingback: भाग ३० – एक वर्ष झालं आणि मार्केट जवळ आलं !! | Stock Market आणि मी
Pingback: भाग ३ – प्रयत्ने वाळू चे कण रगडीता !!! Stock Market हि कळे | Stock Market आणि मी