Monthly Archives: September 2012

भाग ७ – नमनाला घडाभर तेल !!!

नमनाला घडा भर तेल …. असं काहीतरी मी सांगणार होते नाही का ?.. तसं एक घडा भर तेल तर चौकशी करण्यातच गेलं.. चांगला भाग असा कि सगळी माहिती मिळाली तरी होती. मग काय, धाडलं ह्यांना आणि आणायला सांगितले ७ forms .. म्हणले ना तुम्हाला कि ७ accounts उघडायला लागणार होते, म्हणून ७ forms..
मला वाटलं कि हे आपलं ‘सांग काम्या ओ नाम्या’ सारखं फ़क़्त forms घेवून येणार पण सूर्य पशिच्मे ला उगवला होता… ह्या forms बरोबर काय काय documents (माझ्या भाषेत ‘कागद’) लागणार ते पण हे लिहून घेवून आले होते. मग काय तर, उठली बायको आणि लागली कामाला. Age proof रे , आणि address proof रे… अजून काय तर photo id proof रे…किती आणि काय … आधी हे सगळं जमा करा मग त्याचे xerox काढा मग ते attest करून आणा. आणि हे सगळं ७ forms साठी.. म्हटलं ना , कि ७ जन्मांची पापं….
तुम्ही म्हणाल कि ‘हे सगळं सांगायचा मुद्दा काय? आधी तुम्ही म्हणालात कि share market कठीण नाहीये .. आणि आता स्वतः च सांगताय कि नुसता account उघडायला इतका त्रास आहे..’ सोपं असं काहीच नसतं.. मला सांगायच आहे  कि एकदा कि हे सगळं करून झालं कि खरी मजा पुढे आहे.. बरेच लोक यालाच कंटाळतात, किंवा हे सगळं ‘सांग काम्या ओ नाम्या’ सारख करतात. मी हे सगळं केलं ते माझं माझं केलं.. उगाच brokers नि सांगितलं तिथे सह्या केल्या नाहीत.. सगळं स्वतः वाचलं, forms माझे माझे भरले. यामुळे २ गोष्टी झाल्या , मला कुणी फसवू शकलं नाही आणि मला मार्केट बद्दल बरच काही कळलं जे नुसत्या सह्या करून कळत नाही.
घरी येवून जेव्हा ब्रोकर किंवा बँक वाले सह्या घेवून जातात तेंव्हा आपल्याला खूप छान सर्विस मिळाली असं वाटतं. खर तर त्यांना आपण काही वाचायला नको असतं आणि प्रश्न तर बिलकुल विचारायला नको असतात. आपण चार कडे चौकश्या पण करायला नको असतात, कारण आपण त्या केल्या तर त्यांच काम वाढणार असतं किवा त्यांना मिळणारे पैसे कमी होणार असतात. पण जर आपल्या ला खरच काही शिकायचं असेल , तर वाचलं पाहिजे आणि खूप सारे प्रश्न विचारलेच पाहिजेत. आणि ते प्रश्न कितीही मूर्ख पणाचे वाटले तरीही…
तर मी काय सांगत होते ? forms भरायची सगळी तयारी झाली..तर हे म्हणतात कि ‘ अग आज हे forms जाणार नाहीत, आणि त्या साठी तुला मला शिव्या सुद्धा देता येणार नाहीत.’ मी म्हटलं ‘आता कुठे माशी शिंकली??’ .. माशी शिंकली होती ती signature verification साठी. हे अजून काही तरी नवीन गौडबंगाल होतं. साध्या शब्दात सांगायचं झालं, तर forms वर केलेली सही हि माझीच आहे असं कुठूनतरी सिध्द करून आणायचं होतं. त्या साठी परत बँकेत जा, तिथे ते forms दाखवा आणि मग बँक वाले (जिथे तुमचा saving accounts असेल ती बँक) ठप्पा मारून देणार – ‘हि तुमचीच सही आहे’. आता या साठी ते आपल्या कडून पैसे घेणार हे आलंच.
बरं तर बरं कि माझे सगळे accounts एकाच बँकेत होते , त्यामुळे ४ कडे धावावं लागलं नाही. देवाला पण कदाचित मी share market मध्ये घुसायला हवं होतं कि काय , म्हणून बँकेने माझ्या कडून verification चे पैसे पण घेतले नाहीत. काय तर म्हणे, तुम्ही loyal customers, म्हणून तुम्हाला पैसे माफ. मी म्हटलं चांग भलं…
तर नवरी नटली होती आणि भटजी पण तयार होते.. मुहूर्त अगदी जवळ येत चालला होता.. आता लग्न पुढच्या भागात.. भेटूच लवकर….
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा