नमस्कार.. माफ करा पण एक आठवडा काही भेट होवू शकली नाहि. तसं लिहून तयार होतं पण काय करणार, अडली आई मुलाचे पाय धरी. सांगायचा अर्थ असा कि माझा मुलगा बाहेरगावी गेला होता, त्यामुळे गेल्या आठवड्यात त्याला type करायला वेळ मिळाला नाही. आता थोडं फार कळतं कॉम्पुटर मधलं, पण इतकं नाही कि स्वतः ब्लोग upload करू शकेन. शेअर मार्केट च मात्र आता तसं नाही. कोणा शिवाय आपलं काही अडत नाही 🙂
तर, गेल्या वेळी मला इतक कळलं होतं कि शेअर मार्केट म्हणावं तितकं सोपं नाही.. खुप काही समजून घ्यावं लागेल आणि मगच पुढे जाता येयील. आता पुढची वाटचाल. पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे Demat Account.. हा शब्द नीट लक्ष्यात ठेवा, याचा आणि आपला आयुष्य भराचा संबंध असणार आहे, म्हणजे जर तुम्हाला शेअर मार्केट मध्ये interest असेल तर.
माझा या शब्दाशी पहिला संबंध तेव्हा आला, जेव्हा मला कळलं कि शेअर मार्केट मध्ये काही हि करायचं तर तुमच्या कडे Demat Account हवाच हवा. पहिल्यांदा ऐकला तेव्हा काही तरी अजब वाटलं. पण नंतर कळलं कि फारसं वेगळं असं काही नव्हतं. असं समजा कि जर तुम्हाला बँकेतून पैसे काढायचे किंवा ठेवायचे असतील तर Saving Account हवा कि नाही? तसं जर शेअर मार्केट मधून शेअर खरेदी करायचे किंवा विकायचे असतील तर Demat Account हवा. शेअर विकत घेतलेत तर ते तुमच्या Demat Account मध्ये येणार आणि विकलेत तर ते आधी तुमच्या Demat Account मध्ये असले पाहिजेत आणि असले तर ते तिथून जाणार.
त्या जमान्यात हे जरा कळायला वेळ लागला. त्याला कारण पण तसचं होतं. माझ्या कडे होती Share Certificates , मला हे कळायला मार्ग नाही कि आता हे शेअर Demat Account मध्ये जाणार कसे? आता पैसे असते तर आपण बँकेत जातो, स्लीप भरतो आणि नंतर पासबुक update केलं कि पैसे account मध्ये दिसतात. Demat Account च्या बाबतीत account कसा उघडायचा इथ पासून सुरवात करायला लागणार होती. एकदा ते समजलं कि मग त्यानंतर paper certificates ते electronic shares असा प्रवास चालू होणार होता. माझा नव्हे shares चा 🙂
कुठलीही गोष्ट करायची म्हटली कि आधी थोडा वेळ लागतो आणि थोडा जास्त प्रयत्न पण करावा लागतो. पण म्हणतात ना, असाध्य ते साध्य करता सायास, तसच काहीतरी माझं झालं. कसं आणि काय ते सांगणारच आहे, पण पुढच्या आठवड्यात….
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Pingback: भाग ३० – एक वर्ष झालं आणि मार्केट जवळ आलं !! | Stock Market आणि मी
Pingback: भाग ४ – सदैव सैनीका पुढेच जायचे , न मागुती तुवा कधी फिरायचे !!! | Stock Market आणि मी
Pingback: भाग ५१ – एक ‘IPO’ , बारा भानगडी ! | Stock Market आणि मी
Mala share bajar madhe 500rs. invest kele tr kiti bhetel..
khup upyukt mahiti detay madam tumhi…