तर गेल्या वेळी मी तुम्हाला माझा ‘SPLIT’ चा episode सांगितला. आज सांगते ‘न match होणाऱ्या सह्यांचा’ episode. हे जे episodes आहेत ते सगळे म्हणजे share demat करण्याच्या मध्ये आलेल्या अडचणी. एक एक करून सांगते कारण प्रत्येक आहेच तशी special. तर आज सांगणार आहे ते न जुळणाऱ्या सह्यांबद्दल..
तर असाच एक छान दिवस होता, आणि अश्याच एका छान दिवशी माझ्या demat account ची statements आली. shares शी संबंधित काहीहि आलं तरी तशी मी खुश व्हायचे त्या काळी. पण या statement कडे बघून मला खूपच जास्त आनंद झाला. कारण तसचं होतं. माझ्या कडे असलेली थोडीशी रद्दी demat account मध्ये जमा झाली होती. २ कंपन्यांचे share तरी आता demat account ला मध्ये जमा झाले होते. आत्ता फ़क़्त खरेदी विक्री चा भाग राहिला होता.. तो होण्या आधी थोडा अजुन drama बाकी होता खरा..
एक दोन दिवस अजुन गेले आणि एक दिवस मी बाहेरून आले तर मुलगी म्हणाली की ‘टपाल आहे’.. बघते तर ‘सही जुळत नाही’ म्हणून forms परत आलेले. forms म्हणजे share demat करण्यासाठी भरलेले forms. share होते १० वर्षा पूर्वीचे आणि तेव्हा मुलगी होती लहान. आता तिच्या सही मध्ये बदल होणं स्वाभाविक होतं. ‘करायचं काय या साठी?’ असं जेंव्हा बँकेत जाऊन विचारलं, तेंव्हा त्यांनी सांगितलं की ‘affidavit’ करा!!. जरा गोंधळायला झालं!! खरं म्हटलं तर आम्ही सगळे सुशिक्षित होतो त्यामुळे तसं व्हायला नको होतं पण झालं. ते काय आहे ना, की कुठलीही गोष्टं पहिल्या वेळी करताना थोडा गोंधळ हा होतोच.
ठाण्याला कोर्टासमोर stamp paper विकायची दुकानं आहेत, तिथून stamp paper विकत घेतला, तिथूनच त्या stamp paper वर मजकूर type करून घेतला. नंतर त्याच्या वर fee चा stamp लावून नोटरी ची सही पण घेतली. सगळं व्हायला २ एक तास लागले आणि झालं एकदाचं ते affidavit. मग बँकेत जाऊन एक copy दिली. तेव्हाचं बँकवाल्यांनी मुलीकडून त्यांच्या रेकॉर्डसाठी पुन्हा एकदा सही करून घेतली. हे सगळं झाल्यावर मग demat चे forms पुन्हा भरले आणि बँके कडून सही verify करूनच मग forms परत पाठवले.
अजुन काही काही मजा झाली पण ती काही सांगत बसत नाही. काही forms franking साठी अडकले होते, ते franking झाल्या वर गेले. असं करून एक एक करून एकदाचे सगळे forms बँकेकडे पोहोचले आणि अजुन एका छानश्या दिवशी एका statement मध्ये माझी सगळी रद्दी एकदाची demat account मध्ये जमा झालीये असं कळलं.
माझ्या बरोबर जे काही झालं आणि जसं काही झालं ते मी तुम्हाला सांगितलं. तुमच्याकडेही जर काही जुनी share certificates असतील तर पहा !! ती कोणत्याही स्थितीत असु देत, कुरतडलेली असोत किंवा फाटलेली असोत.. जोपर्यंत तुमचं नाव, shares ची संख्या आणि company चं नाव दिसत असेल, प्रयत्न करून बघा.. तुमच्या रद्दी चा पण काही उपयोग होवू शकेल. पण तो उपयोग होण्याआधी ते shares तुम्हाला demat account पर्यंत पोहोचवले लागतील!! त्या साठी आधी demat account उघडावा लागेल!! मला आलेला अनुभव बघून कदाचित तुम्हाला थोडी मदत होवू शकेल. काही मदत किंवा सल्ला हवा असेल तर मला नक्की कळवा; मला मदत करायला आवडेल.
हा तसा माझ्या प्रवासातला एक महत्वाचा टप्पा पण माझा प्रवास इथे संपलेला नाही.. आता तर फ़क़्त share demat झालेत; अजुन broker शोधायचा आहे , share च्या किमती शोधायच्या आहेत.. share विकायचे आहेत … अजुन बरचं काही आहे सांगायला पण ते पुढच्या वेळी…
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Monthly Archives: October 2012
भाग १० – सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है !!
अगदीच काही सरफरोशी नव्हे पण शेअर मार्केट पर्यंत पोहोचण्यासाठी जे काही करायला लागणार होतं त्यासाठी मी तयार होते. मी गेल्या भागात सांगितलं, तसं share demat करण्याच्या process मध्ये मला थोड्या फार अडचणी आल्या खऱ्या. मी म्हटलं ना, की या वेळी प्रोब्लेम system चा नव्हता .. कारणं अशी होती की कोणी काही करू शकत नव्हतं. एक एक करून सांगते काय काय झालं आणि मी काय काय केलं ते. बघा तुम्हाला काही उपयोगाचं वाटलं तर..
तसं forms भरून तर सगळे वेळेवर दिले होते.. ८ एक दिवस झाले तरी काही पत्ता नाही पुढे काय करायचं त्याचा ! ह्यांना विचारलं तर हे म्हणतात कसे – ‘ अगं सगळीकडे काही मी नसतो की तू बोललीस की पटकन काम करून टाकायला !! प्रत्येक ठिकाणी थोडा वेळ लागायचाच .. थोडा धीर धर.. होईल सगळं’ आणि मग गेले आपले कामाला निघून.
दुपार होते तशी दरवाज्याची बेल वाजली आता या वेळी कोण असेल असा विचार करत दार उघडते तर दारात पोस्टमन उभा एक registered AD घेवून – प्रकाश फाटक यांच्या नावाचं.. तसं नेहेमी काही मी यांचं टपाल उघडायला जात नाही पण वाटलं की काही share संबंधी असेल म्हणून यांना phone केला आणि उघडलं टपाल. त्यात बघते तर नवीन share certificates.. मी म्हटलं की आहे ती रद्दी संपवता नाकी नऊ आले आणि आता हे लोक अजुन कसले कागद पाठवतात?? वाचून बघण्याशिवाय पर्याय नव्हता ..
मग काय तर घातला चष्मा आणि काढलं वाचून. वाचाल तर वाचाल हे तसं थोडं फार खरं आहे हे त्या दिवशी अजून एकदा कळलं. ते वाचलं, आणि समजलं की आमच्या कडे यांच्या नावावर जे share होते त्या share चं ‘SPLIT’ असं काही तरी झालेलं होतं. उगाच मोठे मोठे इंग्रजी शब्द वाचून आधी थोडी बावचळले मी पण नंतर कळलं की आमच्या कडे आधी १० रुपायचा एक असे १०० share होते आता त्याचे २ रुपायचा १ असे ५०० share झालेले आहेत. त्यामुळे कंपनी ने नवीन share certificates पाठवलेली आहेत. आणि त्यामुळे माझं काम वाढणार आहे. ह्या certificates साठी परत forms भरून पाठवायला लागणार होते. तेव्हा इतकच कळत होतं की आपलं काम वाढतंय आणि share market पर्यंत पोहोचण्यासाठी अजून थोडं वेळ लागणार होता.
अजून १ २ सांगण्या सारख्या गोष्टी झाल्या या सगळ्या demat च्या भानगडीत पण त्या पुढच्या भागात सांगेन..
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
भाग ९ – निजरूप दाखवा हो.. हरी दर्शनास या हो !!!
ते असं असतं की देवाला पाहिजे तितकं तप होतं नाही तोपर्यंत देव दर्शन देत नाही. आता तसं म्हणायचं तर आमची तपश्चर्या बरेच दिवस चालू होती… पण देव दर्शन काही देत नव्हता.. देवाला आमची सत्वपरीक्षा पहायची होती असं वाटू लागलं मला.. अजून थोडी तपश्चर्या करा असं demat वाले गुरुजी म्हणाले. सांगायचं अर्थ असा की demat वाल्यांनी मला अजून एक form दिला आणि म्हणाले हा अजून एक form भरायला लागेल तरच share मार्केट रुपी देवाचं दर्शन मिळेल..
तर पुढे जाण्या आधी आत्तापर्यंत आपण काय काय केलं ते जरा बघूया…
- आधी तर मला रद्दी मिळाली ती share certificates च्या स्वरुपात
- मग केली चौकशी कि ह्या रद्दी चा उपयोग कसा करायचा
- मग गेले आणि Demat account कसा उघडायचा के समजावून घेतलं
- आणि गेल्या post मध्ये Demat account उघडून झाला एकदाचा …
आता पुढचं पाऊल टाकायचं होतं ते माझे paper shares/ share certificates Demat account मध्ये लोड करायचं !!!
तशी मला आता forms भरायची वगैरे चांगलीच सवय झाली होती. त्यामुळे जेव्हा demat वाल्यांनी अजून एक form दिला तेंव्हा तसं काही फारसं tension आलं नाही. म्हटलं चला, इतकं केलं तर अजून थोडं .. आता खरं म्हणजे एकदम सरळ आणि साधी process होती किंवा असं म्हणा कि असायला हवी होती. म्हणजे असं बघा, आपला Demat account जिथे असेल तिथून share demat करण्यासाठीचा फोर्म आणायचा, भरायचा आणि तेथेच न्हेऊन द्यायचा. नंतर आपल्या Demat account च्या statement वर ते share जमा झालेत का ते पहायचं.
बस.. इतकी साधी आणि सोपी process. पण आत्ता पर्यंत तुम्हाला सुद्धा कळलं असेल कि त्या वेळी कुठलीच गोष्ट पटकन सरळसोट होत नव्हती. पण या वेळी प्रोब्लेम system चा नव्हता .. कारणं अशी होती की कोणी काही करू शकत नव्हतं. आणि ती प्रत्येक application प्रमाणे वेगवेगळी असू शकत होती.
म्हणजे आता असं समजा
- तुमच्या कडे ज्या कंपनी चे share होते , ती कंपनी कोणी take-over केली आणि तिचं नाव बदललं
- किंवा त्या कंपनी ची विभागणी झाली आणि २ कंपन्या चालू झाल्या
- किंवा तुमचे जे share होते त्यांची विभागणी झाली, म्हणजे १ share च्या जागी आता सगळ्यांना २ share दिले
- share joint नावावर आहेत आणि त्यातला एक माणूस बाहेरगावी राहतो किंवा आता हयात नाही
- आणि मग आपलं नेहेमीचं, सही जुळत नाही, फोर्म नीट भरले नाहीत.. वगैरे वगैरे..
पहिले १-२ point आहेत त्या मध्ये कंपनी आपली जुनी certificates घेवून आपल्याला नवीन certificates देते. आणि मग ती आपल्या ला demat करावी लागतात. यातल्या काही गोष्टी माझ्या बरोबर पण झाल्याच .. त्या नंतर सांगते.
तर आता माझं form भरणे , बँकेत दाखवून आणणे.. काही चुका झाल्या तर त्या सुधारणे आणि मग form एकदाचा दिला की वाट बघणे.. असं काही तरी चालू होतं.. त्यात एक छोटी पण कामाची गोष्टं कळली. म्हणजे आता कदाचित ती तुम्हाला इतकी महत्वाची वाटणार नाही पण माझ्या सारख्या मध्यम वर्गीय कुटुंबातून वर आलेल्या बाईला ती वाटली..
मला कळलं की Demat account आणि savings account जर एकाच बँकेत असेल Demat account च्या fees मध्ये २५% सवलत मिळते. आता गृहिणी म्हणून अर्धा जन्म गेलेली मी , गेले लगेच धावत आणि सगळ्यांचे savings account त्याच बँकेत उघडून आले. म्हणजे तसं आता Demat Account ची fee कदाचित तुम्हाला जास्त वाटणार नाही , आणि ती वर्षाला एकदाच द्यायची असते पण जिथे पैसे वाचू शकतात तिथे का वाया घालवायचे ??
म्हणजे सांगायचं मुद्दा असं की हे सगळं करताना दुसरं बरच काही कळत होतं. share market चे बरेच काने कोपरे माहित पडत होते.. आणि जितकी हि माहिती वाढत होती तितका विश्वास मजबूत होतं होता. अडचणी नव्हत्या असं नाही पण आता त्या सोडवण्यात मजा येत होती …अजून बरीच मजा आहे पुढे .. आता ती पुढच्या भागात ..
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
भाग ८ – आधी लग्न Demat चं मग माझ्या Shares चं !!!
तर… लग्नाचा मुहूर्त जवळ येत चालला होता.. आमचं लग्न होतं share market शी. आमचे हे प्रथे प्रमाणे फोटो, पत्रिका, सगळं घेवून गेले. सांगायचं असं कि आमची Demat account opening ची सगळी कागदपत्र जमा झाली होती आणि हे तो गठ्ठा घेवून निघाले होते मोहिमे वर. अगदी बाजीप्रभू देशपांड्यांनी सांगावं तसं यांनी मला सांगितलं – ‘ आज demat च काम झालं तरच office ला जाईन. माझा फोन आला तर काम झालं असं समजं..’ तुम्ही म्हणाल हि बाई नवर्यालाच सगळं करायला सांगते !! अहो पण मी सांगितलं नाही का तुम्हाला आधीच्या भागात कि यांची बँक आणि demat वाली बँक ५ मिनिटावर आहे ?? किंवा असं म्हणा ना कि ती तशीच शोधली आहे.
मी आपली देवा पुढे साखर ठेवली आणि यांच्या फोन ची वाट बघत बसले. १ वाजता काय तो फोन आला, ‘महाराज गडावर पोहोचले’ असं आमच्या बाजीप्रभूंनी सांगितलं. म्हणजे कागदपत्र बँकेत पोहोचली तर… हे म्हणाले कि थोडंफार काही भरायचं राहिल होतं पण इतका काही त्रास झाला नाही. काम तसं पटकन झालं. हे काम पटकन झालं खरं पण पुढचं इतक्या लवकर होणार नव्हतं.. demat वाल्यांनी सागितलं कि किमान ४ दिवस तरी लागतील account number कळायला.. म्हटलं कि ठीक आहे, इतके दिवस थांबलो तसे अजून ४ सही.. ना आपण कुठे पळून चाललोय ना बँक वाले आणि ना share market..
४ दिवसाचे ५ झाले मग १० झाले .. account number चा काही पत्ता नाही.. धाडलं परत यांना विचारायला.. तर बँक वाले म्हणाले कि अजून काही माहिती हवी आणि तुमच्या बायको ला आणि मुलीला आमच्या समोर forms वर सही करावी लागेल… गरजवंताला अक्कल नसते हो त्यामुळे आम्ही काही विचारत बसलो नाही त्यावेळी .. गेलो आणि केल्या सह्या.. घरी येवून परत वाट बघणं सुरु.. तब्बल २० दिवस गेल्या नंतर तो सुदिन उगवला ..
followup करणं हे स्वभावातच आहे, त्यामुळे दर २ दिवसांनी फोने करणं चालूच होतं माझं… अश्याच एका followup ला कंटाळून कि काय त्यांनी मला सांगितलं कि तुमचे account number आलेले आहेत. मी एकदम खुश… ‘demat आला हो demat आला’ असं ओरडत सुटणार होते.. इतक्यात ‘पण’ आला.. ‘ तुमचे number आले आहेत पण जो पर्यंत तुमच्या postal address वर रीतसर टपाल येत नाही तो पर्यंत पुढचं काही करू नका. त्या टपाला बरोबर तुम्हाला तुमची ‘instruction slips’ ची books पण मिळतील. ती cheque book सारखी समजा.. आणि ती फ़क़्त share विकण्यासाठी वापरायची असतात.. आता इतक पुरे.. अजून काही लागलं तर फोन करा’ ..
आता त्यावेळी मला काही कळत नव्हतं बघा कि हे instruction slip म्हणजे काय आणि share कसा विकायचा.. मला आपला इतकाच आनंद कि आपले demat account तरी open झाले.. for a change , बँक वाल्यांनी सांगितल्या सारख झालं आणि ८ दिवसांनी register AD ने slip books घरी आली. account number पाहून डोळ्याच पारणं फेडून घेतलं.. ह्यांनी तर अंकांची बेरीज करून वगैरे मला account लाभणार असं पण जाहीर करून टाकलं.
मी तुम्हाला आधी सांगितलं तसं आता माझ्या कडे share जमा करण्या साठी लागणारा account आता होता पण अजून माझे share त्या account ला जमा झालेले नव्हते.. आणि माझ्या कडे जे share होते ते paper certificates वाले होते.. त्यांना demat account मध्ये जमा करायचं म्हणजे पैसे जमा करण्या इतकं सोपं नव्हतं.. बँकवाल्यांनी सांगितलं कि अजून काही फोर्मस भरावे लागणार होते.. मग काय तर, एक गड सर करून काय स्वराज्य स्थापन होणार होतं??? लागले आपले पुढच्या कामाला .. ते कसं झालं ते पुढच्या भागात सांगेनच ..
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा