तर… लग्नाचा मुहूर्त जवळ येत चालला होता.. आमचं लग्न होतं share market शी. आमचे हे प्रथे प्रमाणे फोटो, पत्रिका, सगळं घेवून गेले. सांगायचं असं कि आमची Demat account opening ची सगळी कागदपत्र जमा झाली होती आणि हे तो गठ्ठा घेवून निघाले होते मोहिमे वर. अगदी बाजीप्रभू देशपांड्यांनी सांगावं तसं यांनी मला सांगितलं – ‘ आज demat च काम झालं तरच office ला जाईन. माझा फोन आला तर काम झालं असं समजं..’ तुम्ही म्हणाल हि बाई नवर्यालाच सगळं करायला सांगते !! अहो पण मी सांगितलं नाही का तुम्हाला आधीच्या भागात कि यांची बँक आणि demat वाली बँक ५ मिनिटावर आहे ?? किंवा असं म्हणा ना कि ती तशीच शोधली आहे.
मी आपली देवा पुढे साखर ठेवली आणि यांच्या फोन ची वाट बघत बसले. १ वाजता काय तो फोन आला, ‘महाराज गडावर पोहोचले’ असं आमच्या बाजीप्रभूंनी सांगितलं. म्हणजे कागदपत्र बँकेत पोहोचली तर… हे म्हणाले कि थोडंफार काही भरायचं राहिल होतं पण इतका काही त्रास झाला नाही. काम तसं पटकन झालं. हे काम पटकन झालं खरं पण पुढचं इतक्या लवकर होणार नव्हतं.. demat वाल्यांनी सागितलं कि किमान ४ दिवस तरी लागतील account number कळायला.. म्हटलं कि ठीक आहे, इतके दिवस थांबलो तसे अजून ४ सही.. ना आपण कुठे पळून चाललोय ना बँक वाले आणि ना share market..
४ दिवसाचे ५ झाले मग १० झाले .. account number चा काही पत्ता नाही.. धाडलं परत यांना विचारायला.. तर बँक वाले म्हणाले कि अजून काही माहिती हवी आणि तुमच्या बायको ला आणि मुलीला आमच्या समोर forms वर सही करावी लागेल… गरजवंताला अक्कल नसते हो त्यामुळे आम्ही काही विचारत बसलो नाही त्यावेळी .. गेलो आणि केल्या सह्या.. घरी येवून परत वाट बघणं सुरु.. तब्बल २० दिवस गेल्या नंतर तो सुदिन उगवला ..
followup करणं हे स्वभावातच आहे, त्यामुळे दर २ दिवसांनी फोने करणं चालूच होतं माझं… अश्याच एका followup ला कंटाळून कि काय त्यांनी मला सांगितलं कि तुमचे account number आलेले आहेत. मी एकदम खुश… ‘demat आला हो demat आला’ असं ओरडत सुटणार होते.. इतक्यात ‘पण’ आला.. ‘ तुमचे number आले आहेत पण जो पर्यंत तुमच्या postal address वर रीतसर टपाल येत नाही तो पर्यंत पुढचं काही करू नका. त्या टपाला बरोबर तुम्हाला तुमची ‘instruction slips’ ची books पण मिळतील. ती cheque book सारखी समजा.. आणि ती फ़क़्त share विकण्यासाठी वापरायची असतात.. आता इतक पुरे.. अजून काही लागलं तर फोन करा’ ..
आता त्यावेळी मला काही कळत नव्हतं बघा कि हे instruction slip म्हणजे काय आणि share कसा विकायचा.. मला आपला इतकाच आनंद कि आपले demat account तरी open झाले.. for a change , बँक वाल्यांनी सांगितल्या सारख झालं आणि ८ दिवसांनी register AD ने slip books घरी आली. account number पाहून डोळ्याच पारणं फेडून घेतलं.. ह्यांनी तर अंकांची बेरीज करून वगैरे मला account लाभणार असं पण जाहीर करून टाकलं.
मी तुम्हाला आधी सांगितलं तसं आता माझ्या कडे share जमा करण्या साठी लागणारा account आता होता पण अजून माझे share त्या account ला जमा झालेले नव्हते.. आणि माझ्या कडे जे share होते ते paper certificates वाले होते.. त्यांना demat account मध्ये जमा करायचं म्हणजे पैसे जमा करण्या इतकं सोपं नव्हतं.. बँकवाल्यांनी सांगितलं कि अजून काही फोर्मस भरावे लागणार होते.. मग काय तर, एक गड सर करून काय स्वराज्य स्थापन होणार होतं??? लागले आपले पुढच्या कामाला .. ते कसं झालं ते पुढच्या भागात सांगेनच ..
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Pingback: निजरूप दाखवा हो.. हरी दर्शनास या हो !!! « Stock Market आणि मी
Pingback: एक दिवस असा यावा, सगळे share demat करून जावा!! « Stock Market आणि मी
Pingback: भाग ३० – एक वर्ष झालं आणि मार्केट जवळ आलं !! | Stock Market आणि मी
Pingback: भाग ७ – नमनाला घडाभर तेल !!! | Stock Market आणि मी
Namaskar madam me 7 te 8 varshapurvi sharekhan madhye demat account ughadale hote pan ajun paryant kontyahi prakarachi trading keli nahi sadhya mala sharekhan madhun due amount bharanyakarita SMS yetat pan mala ata dusarya broker kade demat account open karun trading chalu karayachi ahe tar me dusara demat account open karu shakto ka? Ani sharekhan Madhil maza demat account mala close karava lagel ka? Please reply I’m waiting
’DEMAT’ अकौंट मध्ये तुम्ही जर वर्षभर काहीही व्यवहार केला नाहीत तर ब्रोकर तुमचा /DEMAT अकौंट’ DORMANT’ ठरवू शकतो. तुम्ही जर त्याच ब्रोकरकडे अकौंट रीवाईव करायला गेलात तर ब्रोकर तुमच्याकडून बाकी असलेले सरव चार्जेस वसूल करतो.पण तुम्ही दुसरीकडे ‘DEMAT’ अकौंट उघडून त्याच्यांत व्यवहार करू शकता. पण बर्याच कालपर्यंत आपल्याला जर व्यवहार करायचे नसतील तर DEMAT अकौंट बंद करून तुम्ही पुन्हा उघडू शकता. हल्ली बरेच ब्रोकर फ्री DEMAT आणी ट्रेडिंग अकौंट उघडत असल्याची जाहिरात करीत आहेत पण आपण त्यांच्या टर्म्स आणी कंडिशन नीट समजावून घ्याव्यांत हे उत्तम.
Madam, some of your page links are broken. Especially the ones at the bottom of every page for ‘pudhil bhag vaachanyasathi….’ and almost all links are broken in question / answers.
Thanks for letting us know. We will review and try to fix it.