ते असं असतं की देवाला पाहिजे तितकं तप होतं नाही तोपर्यंत देव दर्शन देत नाही. आता तसं म्हणायचं तर आमची तपश्चर्या बरेच दिवस चालू होती… पण देव दर्शन काही देत नव्हता.. देवाला आमची सत्वपरीक्षा पहायची होती असं वाटू लागलं मला.. अजून थोडी तपश्चर्या करा असं demat वाले गुरुजी म्हणाले. सांगायचं अर्थ असा की demat वाल्यांनी मला अजून एक form दिला आणि म्हणाले हा अजून एक form भरायला लागेल तरच share मार्केट रुपी देवाचं दर्शन मिळेल..
तर पुढे जाण्या आधी आत्तापर्यंत आपण काय काय केलं ते जरा बघूया…
- आधी तर मला रद्दी मिळाली ती share certificates च्या स्वरुपात
- मग केली चौकशी कि ह्या रद्दी चा उपयोग कसा करायचा
- मग गेले आणि Demat account कसा उघडायचा के समजावून घेतलं
- आणि गेल्या post मध्ये Demat account उघडून झाला एकदाचा …
आता पुढचं पाऊल टाकायचं होतं ते माझे paper shares/ share certificates Demat account मध्ये लोड करायचं !!!
तशी मला आता forms भरायची वगैरे चांगलीच सवय झाली होती. त्यामुळे जेव्हा demat वाल्यांनी अजून एक form दिला तेंव्हा तसं काही फारसं tension आलं नाही. म्हटलं चला, इतकं केलं तर अजून थोडं .. आता खरं म्हणजे एकदम सरळ आणि साधी process होती किंवा असं म्हणा कि असायला हवी होती. म्हणजे असं बघा, आपला Demat account जिथे असेल तिथून share demat करण्यासाठीचा फोर्म आणायचा, भरायचा आणि तेथेच न्हेऊन द्यायचा. नंतर आपल्या Demat account च्या statement वर ते share जमा झालेत का ते पहायचं.
बस.. इतकी साधी आणि सोपी process. पण आत्ता पर्यंत तुम्हाला सुद्धा कळलं असेल कि त्या वेळी कुठलीच गोष्ट पटकन सरळसोट होत नव्हती. पण या वेळी प्रोब्लेम system चा नव्हता .. कारणं अशी होती की कोणी काही करू शकत नव्हतं. आणि ती प्रत्येक application प्रमाणे वेगवेगळी असू शकत होती.
म्हणजे आता असं समजा
- तुमच्या कडे ज्या कंपनी चे share होते , ती कंपनी कोणी take-over केली आणि तिचं नाव बदललं
- किंवा त्या कंपनी ची विभागणी झाली आणि २ कंपन्या चालू झाल्या
- किंवा तुमचे जे share होते त्यांची विभागणी झाली, म्हणजे १ share च्या जागी आता सगळ्यांना २ share दिले
- share joint नावावर आहेत आणि त्यातला एक माणूस बाहेरगावी राहतो किंवा आता हयात नाही
- आणि मग आपलं नेहेमीचं, सही जुळत नाही, फोर्म नीट भरले नाहीत.. वगैरे वगैरे..
पहिले १-२ point आहेत त्या मध्ये कंपनी आपली जुनी certificates घेवून आपल्याला नवीन certificates देते. आणि मग ती आपल्या ला demat करावी लागतात. यातल्या काही गोष्टी माझ्या बरोबर पण झाल्याच .. त्या नंतर सांगते.
तर आता माझं form भरणे , बँकेत दाखवून आणणे.. काही चुका झाल्या तर त्या सुधारणे आणि मग form एकदाचा दिला की वाट बघणे.. असं काही तरी चालू होतं.. त्यात एक छोटी पण कामाची गोष्टं कळली. म्हणजे आता कदाचित ती तुम्हाला इतकी महत्वाची वाटणार नाही पण माझ्या सारख्या मध्यम वर्गीय कुटुंबातून वर आलेल्या बाईला ती वाटली..
मला कळलं की Demat account आणि savings account जर एकाच बँकेत असेल Demat account च्या fees मध्ये २५% सवलत मिळते. आता गृहिणी म्हणून अर्धा जन्म गेलेली मी , गेले लगेच धावत आणि सगळ्यांचे savings account त्याच बँकेत उघडून आले. म्हणजे तसं आता Demat Account ची fee कदाचित तुम्हाला जास्त वाटणार नाही , आणि ती वर्षाला एकदाच द्यायची असते पण जिथे पैसे वाचू शकतात तिथे का वाया घालवायचे ??
म्हणजे सांगायचं मुद्दा असं की हे सगळं करताना दुसरं बरच काही कळत होतं. share market चे बरेच काने कोपरे माहित पडत होते.. आणि जितकी हि माहिती वाढत होती तितका विश्वास मजबूत होतं होता. अडचणी नव्हत्या असं नाही पण आता त्या सोडवण्यात मजा येत होती …अजून बरीच मजा आहे पुढे .. आता ती पुढच्या भागात ..
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Pingback: सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है !! « Stock Market आणि मी
Pingback: भाग ३० – एक वर्ष झालं आणि मार्केट जवळ आलं !! | Stock Market आणि मी
Pingback: भाग ८ – आधी लग्न Demat चं मग माझ्या Shares चं !!! | Stock Market आणि मी