Demat account उघडून झाले होते आणि माझे share accountमध्ये जमा पण झाले होते. पण सांगितलं ना तुम्हाला, की तसा माझ्या प्रवासातला एक महत्वाचा टप्पा पण माझा प्रवास इथे संपलेला नव्हता. अजुन broker शोधायचा होता , share च्या किमती शोधायच्या होत्या.. आणि महत्वाचं म्हणजे share विकायचे होते.. तर आज सांगते की मी ब्रोकर कसा शोधला, किंवा माझी ब्रोकर भेट कशी झाली असं म्हणा.. कारण किस्साच तसा आहे , काखेत कळसा आणि गावाला वळसा असा काहीतरी !!
किस्सा सांगण्याआधी एक गोष्टं समजून घ्यायला हवी , ती म्हणजे की share विकायचे असतील तर ते ब्रोकरतर्फेच विकता येतात आणि खरेदी करायचे असतील तरी तसचं.. त्यामुळे ब्रोकरला पर्याय नाही आणि माझ्यासारख्या नवखीला share market मध्ये घुसायचं म्हणजे ओळखीचा आणि विश्वासार्ह ब्रोकर सापडणं गरजेचं होतं. पण माझा stock ब्रोकर चा शोध चालू झाला तो शेअर खरेदी विक्री साठी नव्हे. त्या काळी divestment ची प्रक्रिया जोरात चालू होती. नवरत्न बाहेर निघत होती आणि सगळ्यांना ONGC सारख्या कंपन्यांचे share हवे होते. आमची अवस्था काही वेगळी नव्हती. मग काय तर, share चे forms कुठे मिळणार? ते भरून कुठे द्यायचे? या सगळ्यासाठी पेपर मध्ये येणाऱ्या जाहिराती वाचायला सुरु केलं.
असा विचार करा की नाटक किंवा सिनेमा आपल्या बघायचा असतो तेव्हा आपण काय करतो? आपल्या जवळच्या theatre मध्ये ते नाटक किंवा सिनेमा लागला आहे का ते बघतो. आम्ही share broker साठी पण असंच केलं.. एक दिवस आमचा शोध चालू असताना एकदम माझ्या यजमानांनी पेपर माझ्या समोर आणून आपटला 🙂 म्हणाले हे बघ आपल्या घरापासून २ मिनिटावर आहे हा ब्रोकर. त्या काळात ब्रोकर ची नावं इतकी प्रसिद्ध नव्हती, आज काल सारख्या TV वर जाहिराती येत नव्हत्या. त्यामुळे सगळेच अनोळखी होते. माझ्या साठी महत्वाचं म्हणजे की घरापासून ह्या ब्रोकर चं ऑफिस जवळ होतं.
मग म्हटलं की जावून बघूया की ब्रोकर चं ऑफिस असतं तरी कसं?? गेले तर रेशन च्या दुकानात एका काळी असायची तशी गर्दी होती. ‘शेअर चे फोर्मस इथेच मिळतात का?’ असं बऱ्याचदा विचारलं, पण काही उत्तर मिळत नव्हतं.. कदाचित त्यांच्याकडे माझ्या सारख्या कोणी जास्त येत नसणार J. पण तितक्यात ‘त्या’ व्यक्तीने मला विचारलं – ‘तुम्ही इकडे कश्या? तुम्ही फाटक ना? अहो मी ओळखतो तुम्हाला’. मी म्हटलं ‘अहो मी पण ओळखते तुम्हाला , तुम्ही कुलकर्णी ना? तुम्ही इथे कसे?’ म्हणाले की ‘ इथे कसे काय हो? माझच ऑफिस आहे असं समजा !! या branch चा मी व्यवस्थापक आहे. आता हे ऑफिस घरासारखं समजा. जे काही पाहिजे तुम्हाला ते सगळं तुम्हाला हा अविनाश देईल’
मला स्वर्ग दोन बोटं राहिला होता !! ती व्यक्ती/व्यवस्थापक/ब्रोकर म्हणजे आमचे काका उर्फ मधुसूदन कुलकर्णी.. मी १९८२ ते १९९२ LIC Agent म्हणून काम करत होते तेंव्हा पासूनची आमची ओळख..मी त्यांना लक्ष्यात राहायचा एक कारण होतं.. आता माझा जो मुलगा हा ब्लोग लिहितोय तो त्यावेळी तान्हा होता. त्याला अंघोळ घालून दुपट्यात गुंडाळून LIC ऑफिस मध्ये न्ह्यायला लागायचं. तिथे टेबल खाली त्याला झोपवायचं आणि आपलं काम करायचं असं माझं routine होतं. असो… त्या सगळ्या फार जुन्या गोष्टी !! 🙂
एकूण काय तर माझा फार मोठा प्रश्न सुटला होता आणि आता पुढचे प्रश्न सोडवायला एक विश्वासार्ह ब्रोकर ची मदत मला मिळणार होती. हा अजुन एक फार मोठा महत्वाचा टप्पा होता.. एक नवीन नातं त्या दिवशी सुरु झालं ते अजूनही शाबूत आहे. माझ्या वाटचालीत मधुसूदन कुलकर्णी आणि त्यांचं ऑफिस यांचा बराच हातभार लागलेला आहे. आजही माझं शेअर मार्केट चं सगळं काम त्यांच्याकडेच होतं.. आता माझ्याकडे पण जायला असं एक ऑफिस आहे!! जी बाई आयुष्य भर गृहिणी होती तिच्यासाठी हि पण एक छोटीशी achievementच आहे..
Demat account, share demat, ब्रोकर… एक एक करून कोडी उलगडत होती.. पुढच्या भागात अजुन एक कोडं उलगडायचं होतं , ते म्हणजे share च्या भावाचं !!
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Pingback: आली माझ्या घरी हि दिवाळी (शेअर मार्केट ची !!) « Stock Market आणि मी
Pingback: भाव तिथे देव पण माझा कुठला भाव आणि माझा कुठचा देव « Stock Market आणि मी
Pingback: भाग ३० – एक वर्ष झालं आणि मार्केट जवळ आलं !! | Stock Market आणि मी
Pingback: भाग १३ – आली माझ्या घरी हि दिवाळी (शेअर मार्केट ची !!) | Stock Market आणि मी
Pingback: भाग ११ – एक दिवस असा यावा, सगळे share demat करून जावा!! | Stock Market आणि मी
Pingback: भाग ५१ – एक ‘IPO’ , बारा भानगडी ! | Stock Market आणि मी
आता माझा जो मुलगा हा ब्लोग लिहितोय तो त्यावेळी तान्हा होता. त्याला अंघोळ घालून दुपट्यात गुंडाळून LIC ऑफिस मध्ये न्ह्यायला लागायचं. तिथे टेबल खाली त्याला झोपवायचं आणि आपलं काम करायचं असं माझं routine होतं. असो… त्या सगळ्या फार जुन्या गोष्टी !! 🙂
Its so heart touching ma’am..
U r really very bravery ladie.. Tnks to share ur memorable nd touching experience with us.
तुम्ही खूप छान माहिती दिली आहे