भाग २० – वळलं नाही तरी बेहत्तर पण कळलं तरी पाहिजे !!

मी भारावलेल्या अवस्थेत घरी आले. एका वेगळ्याच विश्वात माझा प्रवेश झाला होता. ते एक ऑफिस होतं. पण ओफिससारख वातावरण नव्हतं. स्त्रियांनी मार्केटला की मार्केटनी स्त्रियांना वाळीत टाकलय हे कळत नव्हतं. तिथे मी एकटीच स्त्री होते पण त्यामुळे काही बिघडत नव्हत. मार्केट अगदी मला पाहिजे तसा अर्थार्जनाचा मार्ग होता. मार्केट माझ्याकडे degree मागत नव्हत कि अनुभव विचारत नव्हत. कॉम्पुटर चालवता येतो कि नाही यामुळे काही फरक पडत नव्हता. अर्थार्जन हा ज्याचा धर्म होता त्याला मार्केटमध्ये मुक्तद्वार होतं. तिथे पात्रतेचे कसलेच निकष नव्हते. माझ्यासारख्या ४२ वर्षाच्या गृहिणीला त्यावेळी अशाच संधीची गरज होती..
चला तर मग, आता परत आपल्या गोष्टीकडे वळूया. संद्याकाळ झाली यजमान आले पाठोपाठ मुलं आली. चहा-पाणी झाले, स्वयंपाक झाला, जेवणे झाली. झोपले तरी पण मार्केटचे विचार पाठ सोडेनात . जळी स्थळी काष्ठी पाषाणी ध्यानी मनी स्वप्नी सगळीकडेच शेअरचे विचार. सकाळ मात्र एका निश्चयानेच झाली. मार्केट आपल्याला अजून वळलं नाही तरी चालेल पण कळलं नक्की पाहिजे.
लवकर उठून घरातील कामं उरकून घेतली, डब्याची पोळीभाजी करून ठेवली. आठ साडेआठच्या दरम्यान सगळे घराबाहेर पडले. मी TV ऑन केला. CNBC channel लावला. काल ओफ्फिचे मध्ये कळल कि या channelवर दिवसभर शेअरमार्केटच्या सम्बंधातच सर्व कार्यक्रम असतात. काल ऑफिसमध्ये CNBC channelच चालू होता.
बरयाच शब्दांचे अर्थ मला ऑफिसमध्ये समजले नव्हते तेव्हा  मी थोडी गोंधळूनच गेले होते. मीच माझी समजूत काढली. समजा कुणी स्वयंपाकघरात फिरकले नाही. कधी स्वयंपाक केलेला नसेल तर आधण, मोहन, फोडणी. अळणी,भाजणी या शब्दांचे अर्थ कसे कळणार. साधा स्टोव्ह, शेगडी चूल पेटविता येणार नाही. काकडा बुडव,  पिन कर हि काय भानगड आहे हे कसं कळणार ? मग मला लाज वाटण्याचे काय कारण . समजावून घेवू . विचारू, ऎकु, शोधू म्हणजे कळेल. मुख्य म्हणजे लाज सोडून प्रयत्न करायला लागू . मला इंग्रजी येत असल्याने channel वर जे काही बोलत होते ते समजायला त्रास झाला नाही. पण इंग्लिश समजत नसत तर जरा कठीण झालं असत !! तसा आता तो पण प्रोब्लेम नाही कारण शेअर मार्केट वर आधारित बरेच हिंदी channel सुरु झालेत. तसे अजून मराठी channel सुरु व्ह्याचेत पण कोणाश ठावूक पुढे कदाचित ते पण होतील!!
CNBC वर  “ओपनिंग बेल” हा कार्यक्रम सुरु झाला.

  • ANCHORनि गुड मोर्निंग केलं.
  • पेपर मधल्या ज्या बातम्या ECONOMYशी संबंधीत होत्या त्यांचा आढावा घेतला
  • DOLLAR  RUPEE विनिमय दर दाखवला
  • ASIAN , AMERICAN  EUROPEAN मार्केट्स तेजीत का मंदीत बंद झाली हे दाखवलं
  • SENSEX आणी NIFTY चे निर्देशांकही दाखवलं.

आणि त्यामधलं मला काहीहि कळल नाही!! लग्नात भटजी म्हणत असतात ना बरचं काही जे आपल्याला कळत नाही, तसच काहीतरी झालं होतं. लग्न करायची घाई होती असं म्हणा पण मी सगळं ऐकून, समजून घ्यायचा प्रयत्न केला. त्या दिवशी खास काही कळलं नाही पण माझ्याकडच्या एका शेअरच नाव तेवढ दिसलं!!
मी जे ऐकलं ते डोक्यात ठेवलं. एक टाचण वही केली आणि त्यात लिहित गेले. त्याचा अर्थ मला जसा आणी जेव्हा समजला तसाच मी तुम्हालाही समजावून देईन. तूर्तास तरी तुम्हीसुद्धा माझ्यासारखाच करा, जे काही कळणार नाही ते शब्द लक्षात ठेवा आणि लिहून ठेवा. लहान मुलं किवा इयत्ता पहिलीतला विद्यार्थी जसा अर्थ लक्षात न येत फक्त शब्द लिहितो किंवा वाचतो अगदी तसं – कान, मण, पण खण !
अर्धा तास CNBC बघितला आणि मग ऑफिसमध्ये जायचं ठरवलं. कारण एकतर माझ्या शेअर्सचा आजचा भाव ऑफिसमध्येच कळणार होता आणि मार्केट उघडतं म्हणजे काय हे बघण्याची उत्सुकता होती. म्हणजे बाबा एखाद shutter उघडतात ? कि कुठलं button on करतात?
तुम्हाला पण उत्सुकता असेलच पण ती जरा अजून थोडी ताणली गेली तर काही हरकत नाही:) … पुढचं सांगतेच पण पण ते पुढच्या भागात !!
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

2 thoughts on “भाग २० – वळलं नाही तरी बेहत्तर पण कळलं तरी पाहिजे !!

  1. Pingback: भाग ३० – एक वर्ष झालं आणि मार्केट जवळ आलं !! | Stock Market आणि मी

  2. Pingback: भाग १९ – गोंधळ मांडीला ग मार्केटचा गोंधळ मांडीला !!! | Stock Market आणि मी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.