‘इथे return करण्याची सोयच नाही Madam!!’ ऐकून मी जरा घाबरून गेले !!
‘मग काय करायचं रे?’ मी लगेच विचारलं
‘मग काय ? फक्त एन्ट्री REVERSE करायची !! खरेदी केली असेल तर विका. विकले असतील तर खरेदी करा. एकूण काय तर POSITION NIL करा. BROKERAGE आणी थोडाफार तोटा झाला तर अक्कलखाती टाकायचा.’
मला थोडफार समजलं पण नक्की काय करायचं ते कळत नव्हत. कदाचित तुमचं पण तसच काही झालं असेल. आता समजा कि तुम्ही ३ डझन आंबे विकत घेतले आणि नंतर तुम्हाला कळलं कि १ डझन जास्त झाले. तर तुम्ही काय करणार? आंबेवाला तर परत घेणार नाही. तुमच्या कडे एकच पर्याय कि १ डझन आंबे विकत घ्यायला परत कोणी तरी शोधा. तसचं काहीतरी आहे. एकदा विकत घेतलं तर परत देण हा पर्याय नाही. पर्याय एकच कि परत विकणे !!!
मी हा सगळा विचार करत असताना तशी माझी शिकवणी चालूच होती
‘Madam तुमच्या बायकांची घासाघीस करण्याची हौस मात्र इथे भागणार नाही. आपण आपल्या मनाप्रमाणेच ओर्डर टाकतो त्यामुळे सगळेच प्रश्न मिटतात. इथे SALE लागत नाही. एकावर एक FREE अशी सोय नाही, DISCOUNT नाही, रोजचे किंवा कायमचे ग्राहक आहात म्हणून SPECIAL TREATMENT नाही’
‘इतकच ध्यानात ठेवा कि जेवढे शेअर्स विकायचे असतील तेवढे शेअर्स तुमच्या DEMATअकौंटवर असले पाहिजेत. प्रकाश फाटकच्या ट्रेडिंग अकौंटवर तुम्ही प्रकाश फाटकच्या DEMATअकौंट वरचे शेअर्सच विकू शकता. तुम्ही जी ओर्डर लावली तिची संगणकावर नोंद होते . किती वाजता ओर्डर लावली त्या वेळेचीही नोंद असते ती तुम्ही पाहू शकता त्यामुळे घाबरायचं कारण नाही !!’
“कधी कधी तुम्ही ओर्डर टाकली तरी सगळे शेअर्स तुम्हाला त्या भावाला मिळतील किवा विकले जातील असं नाही”.
“ हो. ते माहित आहे मला. इतक्या दिवसात तेवढ तरी कळलय !!”
‘ बर… मग आता तुम्हाला माहित नसेल असं काहीतरी सांगतो’
मी म्हटल ‘ सांग बाबा’
“ समजा तुम्ही २५ शेअर्स विकण्याची ओर्डर दिली आणी २० च शेअर्स विकले गेले . तुम्हाला पैशाची गरज असेल तर उरलेले ५ शेअर्स तुम्ही ON LINE विकू शकता. ON LINE म्हणजे त्यावेळेला जो भाव चालू असेल त्या भावाला विकायचे किंवा किवा खरेदी करायचे. याचा उपयोग करायचा असेल तर आपण लावलेल्या ओर्डरप्रमाणे आपले किती शेअर्स विकले गेले किवा खरेदी झाले हे मार्केट बंद होण्याच्या आधी अर्धा तास तरी ब्रोकरच्या ऑफिसात फोन करून विचारायचं. म्हणजे मार्केट बंद होण्याआधी आपली अपुरी राहिलेली order आपण ON LINE शेअर्स विकून किवा खरेदी करून पुरी करू शकता. तसं आपले किती शेअर विकले गेले किंवा खरेदी करून झाले हे नेहेमीच फोन करून विचारात चला कारण नंतर तेवढ्या शेअरसाठी INSTRUCTION SLIP भरून द्यावी लागते. त्यामुळे तुम्हाला नक्की किती ते माहित पाहिजे’
हे सगळं ऐकून मला जितकं tension येत होतं तितकच बरंहि वाटत होतं. कारण सगळं पारदर्शक होतं. आपण जो काही व्यवहार करू त्याची नोंद होती. आपल्याला काही शंका आली तर आपण statement बघून ती शंका दूर करू शकत होतो. म्हणजे हे सगळं बँकेसारख होतं. फरक इतकाच कि खरेदी विक्री कधी आणि कसली करायची हे कळायला हवं. फसवणूक तिथे होवू शकत होती. फसवणूक म्हणण्यापेक्षा त्याला चूक म्हणू आपण. मार्केटमध्ये पैसे जातात चुकीच्या वेळी खरेदी किंवा विक्री केल्यानी. आजचं मार्केट म्हणजे काही हर्षद मेहेताच्या जमान्याचं मार्केट नव्हे. माहिती खूप उपलब्ध आहे आणि आधी म्हटल तसं सगळ पारदर्शक आहे. हे सगळे विचार माझ्या मनात आले आणि माझ्या मनातल्या सगळ्या शंकाकुशंका संपल्या. मेहेनत करायची माझी तयारी होती आणि घाबरायचं आता काही कारणच उरलं नव्हत.
तशी आता माझी सगळी तयारी झाली होती एकदाची! अगदी गहू कसे आणायचे, भाजी चांगली कुठली, नारळ कसा फोडायचा, कणिक कशी भिजवावयाची.. अगदी सगळी तयारी झाली होती. आता प्रत्यक्ष स्वयंपाक करायचा राहिला होता. स्वयंपाक चांगला होईल न होईल हि भीती होतीच. चांगला झाला की आपल्याला जेवायला उरत नाही आणि वाईट झाला तर २-२ दिवस तेच खात बसायची पाळी. पण स्वयंपाक तर करायलाच लागणार. मार्केटचं पण तसच काहीतरी होतं. फायदा झाला तर सगळे छान छान म्हणणार आणि तोटा झाला तर मला शिव्या पडणार. पण आधी म्हटल तसच आहे – ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’
तुम्ही माझा ब्लोग वाचत असाल आणि तो वाचून मार्केटकडे वाटचाल चालू केली असेल तर तर माझ्यासारखीच तुमचीहि तयारी झाली असेल . DEMAT अकौंट उघडला असेल, ट्रेडिंग अकौंट उघडला असेल, सेविंग अकौंट उघडला असेल. थोडीफार बचत करून रक्कम साठविली असेल. आज तुम्हाला Order कशी टाकायची हे थोडफार तरी कळलं असेल .पण काही अनुभव प्रत्यक्षांतच घ्यावे लागतात. पदार्थे खारट झाला, तिखट झाला हे खाऊनच समजतं. तर खायचा कार्यक्रम आता पुढच्या भागात…
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
भाग २६ – ORDER , ORDER !! – भाग २
1 Reply