आता चला माझ्याबरोबर . तुम्ही हवी असल्यास १ शेअर खरेदी करण्याची ओर्डेर टाकू शकता . मला मात्र शेअर्स विकून भांडवल गोळा करायचे आहे त्यामुळे मी आधी विकणार आहे . तुम्हाला आता पाठ झाले असेल . सांगा बरं मी कोणते शेअर्स विकणार? GINI SILKS आणी HDFC बँक.
मी ठरवूनच ऑफिसमध्ये गेले . आज सौदा करायचाच. नमनाला घडाभर तेल घालून झालं होतं आणि आता तेल वाहून जावयाची पाळी आली होती. HDFC बँकेचा भाव ३५० रुपये चालला होता. माझे शेअर्स IPO मधील होते . हे शेअर्स मला ‘AT PAR’ मिळाले होते ( IPO आणी AT PAR याचे अर्थ पुढील भागातून येतील.)
‘AT PAR’ म्हणजे १० रुपये दर्शनी किमतीचा शेअर IPO मध्ये १० रुपयाला मिळतो . ‘AT PREMIUM म्हणजे शेअरच्या दर्शनी किमतीत premiumची रक्कम वाढवून येणाऱ्या रकमेला शेअर IPOमध्ये विक्रीला आणण्यात येतो . म्हणजेच आता AT १० रुपये premium शेअर असला तर १० रुपये दर्शनी किमतीचा शहरे २० रुपयाला दिला जातो . ‘AT DISCOUNT’ म्हणजे शेअरच्या दर्शनी किमतीतून “DISCOUNT ” वजा केला जातो . AT रुपये २ DISCOUNT म्हणजे १० रुपये दर्शनी किमतीचा शेअर विक्रीसाठी IPO मध्ये ८ रुपयाला मिळतो . थोडक्यात PREMIUMची रक्कम शेअरच्या दर्शनी किमतीत वाढविली जाते आणी discountची रक्कम शेअरच्या दर्शनी लीमातीतून वजा केली जाते . हल्ली नजीकच्या काळांत “AT DISCOUNT ” IPO अभावानेच आढळतात .
मला “HDFC बॅंकेच्या शेअर्ससाठी फारच चांगला भाव मिळत होता . यापेक्षा जास्त भाव मिळेल की भाव कमी होईल याबद्दल ना कल्पना होती ना अक्कल !! मी रुपये ३५५ भावाने १०० शेअर्स विकण्यासाठी ओर्डेर लावली. ३५५ रुपयाचा भाव दिसत होता पण माझे शेअर्स विकले जाईनात तेव्हा माझा पुन्हा गोंधळ उडाला.
मी विचारल – “अविनाश माझे शेअर्स का विकले जात नाहीत बाबा?’
तो म्हणाला – “स्क्रीनच्या डाव्या बाजूला रुपये ३५२ चा भाव आहे . व उलट्या बाजूला ३५५रुपयाचा भाव आहे. हा हिशेब ध्यानात घ्या. म्हणजे दुसरया बाजूस असलेला माणूस ३५२ रुपयाला खरेदी करायला तयार आहे आणि ३५५ रुपयाला विकायला तयार आहे. Madam तुम्हाला विकायचे असले तर त्या भावाला दुसरा माणूस खरेदी करायला तयार हवा. त्यामुळे ३५२ रुपयाच्या भाव ३५५ रुपये होईल तेव्हा तुमचा नंबर लागला तर विकले जातील .
अविनाश म्हणाला ” आणि हो मार्केट बंद होण्याआधी तो भाव आला पहिजे. मध्येच मार्केट पडायला लागले तर भाव खाली सुद्धा जातो.
मी म्हणाले “शुभ बोल नार्या तर बोडक्या झाल्या सारया !! मार्केट पडेल असं का म्हणतोस बाबा?. तर म्हणतो कसा – ‘ अहो मार्केटच ते, भाव कमी जास्त होणारच. तुमच्या तालावर तुमचा नवरा नाचेल मार्केट नव्हे’.
ऐकूण काय माझी आजची बोहोनी उद्यावर गेली एवढ मात्र नक्की !
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Pingback: भाग ३० – एक वर्ष झालं आणि मार्केट जवळ आलं !! | Stock Market आणि मी
Pingback: भाग २६ – ORDER , ORDER !! – भाग २ | Stock Market आणि मी
share kharedi aani vikri madhil service charges baddal example deun sangu shakal
आपण ब्लोग नंबर ३६ वाचा त्यामध्ये २ बिल्स दाखवली आहेत त्याव्यतिरिक्त आता GST लागतो. माझ्या ‘मार्केट आणी मी’ पुस्तकातील पान नंबर १४९ ,१५० पाहा. बिलामधील चार्जेस पैकी स्वच्छ भारत सेस आणी सेवा कर यांच्या ऐवजी सेन्ट्रल GST ९% आणी स्टेट GST ९% लागतो