intra day हा शब्दप्रयोग शेअरमार्केटमध्ये वारंवार होतो . याला day- ट्रेड किंवा intra –day ट्रेड असं म्हणतात . असा ट्रेड करणाऱ्यांना पंटर म्हणतात . पंटर जलद नफा होण्यासाठी व्यवहार करतात. या ट्रेडमध्ये पैसा गुंतवावा लागत नाही . किंवा फार मोठ्या भांडवलाची आवश्यकता नसते. पण फायदा पटकन आणी कमी श्रमात मिळते . कधी कधी तर महिन्याच्या पगाराएवढा फायदा पाच मिनिटात होतो . तसा झाला तर तोटा पण तितकाच पटकन आणि जास्त होवू शकतो!!
हा ट्रेड दोन प्रकाराने करता येतो. प्रथम खरेदी करायची आणी नंतर वाढलेल्या भावाला त्यादिवशी मार्केटच्या वेळात विक्री किंवा आधी विक्री आणि नंतर त्यापेक्षा कमी भावाला त्याच दिवशी मार्केटच्या वेळात खरेदी. आधी विकण्याला ‘short’ करण असं म्हणतात . या मार्केटमध्ये हीच तर मजा आहे! शेअर विकण्यासाठी तो तुम्ही खरेदी केलेला असायची गरज नाही. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवण्यासारखीच ही कथा. आपल्या मालकीची वस्तू नसताना ती वस्तू दान करून पुण्य मिळवण होय.
day-ट्रेडसाठी दलाली कमी आकारली जातें .रुपये १००ला ५पैसे या दराने आकारली जाते . परंतु या ट्रेडमध्ये धोक्याचे प्रमाण जास्त असते . हे एक वेगळ्या प्रकारचं कौशल्यच आहे . झटपट निर्णय घेण्याची क्षमता यासाठी आवश्यक असते . मार्केट सतत बदलत असते या अनिश्चिततेमुळे खूप फायदा मिळवण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही .
जर मार्केटला क्रिकेटच्या सामन्याची उपमा द्यावयाची तर मोठ्या अवधी साठी ( तीन ते पांच वर्षे ) केलेली गुंतवणूक ही कसोटी क्रिकेट, छोट्या मुदतीसाठी केलेली गुंतवणूक म्हणजे एक दिवसाचा सामना आणी डेट्रेड म्हणजे T -२० चा सामना!!
१००रुपये प्रती शेअर किमत असलेले १००शेअर्स खरेदी करून १०१रुपये प्रती शेअर भावाने त्याच दिवशी मार्केटच्या वेळात विकले तर १०रुपये दलाली व इतर चार्जेस वजा होऊन ९०रुपये फायदा होतो. या ट्रेडसाठी तुम्हाला शेअर्सच्या खरेदीसाठी गुंतवणूक करावी लागत नाही. १००रुपये प्रती शेअर या भावाने १००शेअर विकले व त्याच दिवशी मार्केटच्या वेळेत ९९ प्रती भावाने खरेदी केले तर दलाली व इतर चार्जेस रुपये १० जाऊन ९०रुपये फायदा होतो . अशा प्रकारे दिवसातून कितीही वेळेला डेट्रेड करता येतो .
जर शेअर्सच्या किमतीत तुमच्या अंदाजाप्रमाणे वाद किंवा घट झाली नाही तर तुम्हाला तोटा सहन करावा लागतो . कारण तुम्ही खरेदी केलेले शेअर्स आजच मार्केटच्या वेळेत विकावे लागतात आणी विकलेले शेअर्स आजच मार्केटच्या वेळेत खरेदी करून तुम्हाला position square करावी लागते . म्हणजे आपण म्हणतो त्याप्रमाणे याची देही याच डोळा सर्व याच जन्मात भोगायचे आहे असा हा day-ट्रेड.
तुमच्या अपेक्षेप्रमाणे किमतीत बदल न झाल्यामुळे तोट्यात जात असाल तर तुम्ही खरेदी केलेल्या शेअर्सची किमत देवून तुम्ही तेच शेअर्स किमतीत तुम्हाला हवा तेवढा अनुकूल बदल झाल्यावर विकू शकता. थोडक्यात डेट्रेडचे रुपांतर छोट्या अवधीच्या गुंतवणुकीत होते. आता हे सगळं तुमच्याकडे किती भांडवल आहे आणि तुम्ही किती दिवस तग धरू शकता या वर अवलंबून आहे. shortingच्या बाबतीत मात्र हा पर्याय उपलब्ध नाही.
आधी सांगितलं तसं day-ट्रेड वाटत तितक सोप नाही आणि जरी भांडवलाची फार गरज नसली तरी धोकासुद्धा तितकाच जास्त आहे. तुमचा अभ्यास, वाचन आणि शेअरच्या किमतीत होणार्या बदलाचे निरीक्षण चांगले असेल तर day-ट्रेड मध्ये यश मिळू शकतं. कसं ते पुढच्या भागात बघूया
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Pingback: चक्रव्यूह डेट्रेडचा आणि अभिमन्यू आपला !!! | Stock Market आणि मी
Pingback: भाग ३६ – चक्रव्यूह डेट्रेडचा आणि अभिमन्यू आपला !!! | Stock Market आणि मी
Pingback: भाग ३२ – dayट्रेडचं वेड !! | Stock Market आणि मी
Pingback: तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – July – Aug २०१५ | Stock Market आणि मी
Gyanbachya Bhashetil ( Sant Tukaram) Share Market chi mahit mule ‘Avaghad Sope Zale Ho’
Net var Reserch Kartana “PARIS” Bhetlyacha Anand Zala. Ahmi yacha jarur fayda karun Ghevoo. Kadam RAJAN Bhagwan-Vijaya, Ghatkopar, 9969472768/ kadamrajan22@gmail.com
thans very nice information
Nice madem