Monthly Archives: November 2013

भाग ३६ – चक्रव्यूह डेट्रेडचा आणि अभिमन्यू आपला !!!

आपण डेट्रेडच्या चक्रव्युहात शिरलो आहोत. गुंता सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत. तसा हा चक्रव्यूह तितकासा कठीण नाही बाहेर पडायला. हे ज्ञान फ़क़्त अर्जुनालाच माहित आहे असं काही नाही. आपल्याला पण ते कळू शकतं कारण शेअरमार्केटच्या व्यवहारात पारदर्शकता आहे. प्रत्येक व्यवहार लेखी होतो. अगदी डेट्रेड सुद्धा ! कोणत्याही व्यवहाराचं बील मिळ्तं. हे बील computerised असतं .तुमची प्रत्येक शंका त्यामुळे दूर होते. मग आता असं करूया कि मी केलेल्या डेट्रेडची बिलं बघूया आणि पडूया या चक्रव्यूहातून बाहेर !!
बिलामध्ये खालीलप्रमाणे निरनिराळ्या प्रकारची माहिती असते  :     

  1. ऑर्डर नंबर
  2. तुम्ही ऑर्डर दिलेली वेळ
  3. तुमचा ट्रेड झाला असेल तर त्याचा ट्रेड नंबर
  4. ट्रेड झालेल्याची वेळ
  5. शेअरचे किंवा सिक्यूरिटीचे नाव
  6. खरेदी किंवा विक्री झाली
  7. खरेदी केलेल्या शेअर्सची संख्या
  8. विक्री केलेल्या शेअर्सची संख्या
  9. शेअरचा भाव ( जो टिकरवर दाखवला जातो.)
  10. शेअर्सची संख्या गुणिले gross दर प्रत्येक शेअरचा = gross total
  11. दलाली (total  खरेदी किंवा विक्रीच्या किमतीवर)
  12. खरेदीचा gross  भाव अधिक दलाली किंवा विक्रीचा gross भाव वजा दलाली (प्रत्येक शेअरसाठी)
  13. खरेदीचा gross  भाव अधिक दलाली गुणीले खरेदी केलेल्या शेअर्सची संख्या किंवा विकीचा gross भाव वजा दलाली गुणिले विकलेल्या शेअर्सची संख्या
  14. सेवा कर
  15. Security Transaction Tax

याशिवाय खालीलप्रमाणे वेगवेगळे charges आकारले जातात.

  1. Security turnover tax
  2. stamp charges
  3. T. O. CHARGES

आधी सांगितल तसं, डेट्रेड दोन प्रकारे करता येतो. आधी विकत घ्या नंतर विका किंवा आधी विका आणि नंतर विकत घ्या. आपण प्रत्येक प्रकारच्या डेट्रेडचं एक एक उदाहरण बघू म्हणजे तुम्हाला मी नक्की काय सांगतीये ते कळेल.
उदाहरण १ – आधी विकत घ्या नंतर विका

Day Trade example

Click on the image to enlarge


बील  क्रमांक १ मध्ये मी ‘BHEL’ कंपनीचे १० शेअर्स प्रत्येकी रुपये २१८२ प्रमाणे खरेदी केले याची एकूण खरेदी किमत रुपये २१८२० झालेली दाखवली आहे .१० शेअर्सला एकूण रुपये ८.७० दलाली आकारली आहे (म्हणजेच प्रत्येक शेअरला ८७ पैसे दलाली ) त्यामुळे मला प्रत्येक शेअरची किमत (दलालीसकट ) रुपये २१८२.८७ एवढी पडली याप्रमाणे १० शेअर्सची दलालीसकट एकूण किमत रुपये २१८२८.७० झाली .
हे शेअर्स मी त्याच दिवशी  प्रत्येक शेअर रुपये २२०५ या दराने विकले .विक्रीची एकंदर किमत रुपये २२०५० झाली या रकमेवर रुपये ११ दलाली आकारली गेली. (प्रत्येक शेअरला रुपये १.१० या दराने ) प्रत्येक शेअरच्या किमतीमधून दलाली वजा केल्यानंतर शेअरचा भाव प्रत्येकी रुपये २२०३.९० झाला .त्यामुळे १० शेअर्सची दलाली वजा जाता विक्रीची किमत रुपये २२०३९.०० झाली.म्हणजेच रुपये २१०.३० फायदा झाला , खरेदी साठी ८९ पैसे व विक्रीच्या दलालीवर  रुपये १.१३ सेवा कर आकारला गेला . T. O. charges  रुपये  १.६५ , S.T.T. रुपये ५ Stamp charges ८८ पैसे या प्रमाणे आकारले गेले .एकंदर फायद्यातून  हे  सर्व charges म्हणजेच रुपये ९.५६ वजा जाता रुपये २००.७४ निव्वळ नफा झाला.
उदाहरण २ – आधी विका नंतर विकत घ्या
Day trade example

Click on the image to enlarge


या  बिलामध्ये प्रथम शेअर्स विकले आणी नंतर खरेदी केले आहेत . विकलेले शेअर्स आपल्याजवळ असले पाहिजेत असे बंधन नसते म्हणूनच याला ‘short’ करणे असे म्हणतात. मी १०  शेअर्स विकण्याची ऑर्डर दिली होती . पण एकदमच १०शेअर्स एकाच लॉट मध्ये जातील/ येतील असे नाही  (६-४, २-८ ५-५ अश्या वेगवेगळ्या लॉटमध्ये तुम्ही खरेदी/ विक्री करू शकता.)
यामध्ये मी titan कंपनीचे १० शेअर्स २६४ रुपये प्रती शेअर या भावाने विकले . दलाली एका शेअरला १२पैसेप्रमाणे आकारली आहे. हे १० शेअर्स (१-९) अशा लॉट मध्ये मिळाले . दलाली वज जाता २४५.८८रुपय भाव या १०शेअर्स साठी मिळाला . एकूण रकम (२४५.८८गुणिले १० ) रुपये २४५८.८० झाली .विक्री साठी १४पैसे सेवा कर  आकारला गेला Security Transaction Tax (STT) 61 पैसे आकारला गेला.
विकलेले १० शेअर्स २४५ रुपये भावाने नंतर खरेदी केले .एकंदर खरेदीची किमत रुपय्र २४५१ झाली प्रत्येक शेअर्सवर १० पैसे दलाली आकारण्यात आली .ती खरेदीच्या किमतीत मिळवून शेअर्स्चा भाव रुपय २४५.१० झाला . यासाटी १२ पैसे सेवा कर आकारला गेला . रुपये ७.८० फायदा झाला . त्यातून १ रुपया STT १०पैसे stamp charges , T. O. charges 16 पैसे व २९ पैसे सेवा कर वजा जाता निव्वळ फायदा रुपये ६.२५ झाला.
आशा अशी आहे कि तुम्हाला वरच्या २ उदाहरणावरून आणि गेल्या २-३ भागांमधून डेट्रेडबद्दल बर्यापैकी माहिती मिळाली असेल. या विषयावर आपण परत बोलूच पण पुढच्या भागात आपल्या मार्केटच्या वाटचालीकडे परत जावूया. भेटूच लवकर..
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा