भाग ३६ – चक्रव्यूह डेट्रेडचा आणि अभिमन्यू आपला !!!

आपण डेट्रेडच्या चक्रव्युहात शिरलो आहोत. गुंता सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत. तसा हा चक्रव्यूह तितकासा कठीण नाही बाहेर पडायला. हे ज्ञान फ़क़्त अर्जुनालाच माहित आहे असं काही नाही. आपल्याला पण ते कळू शकतं कारण शेअरमार्केटच्या व्यवहारात पारदर्शकता आहे. प्रत्येक व्यवहार लेखी होतो. अगदी डेट्रेड सुद्धा ! कोणत्याही व्यवहाराचं बील मिळ्तं. हे बील computerised असतं .तुमची प्रत्येक शंका त्यामुळे दूर होते. मग आता असं करूया कि मी केलेल्या डेट्रेडची बिलं बघूया आणि पडूया या चक्रव्यूहातून बाहेर !!
बिलामध्ये खालीलप्रमाणे निरनिराळ्या प्रकारची माहिती असते  :     

 1. ऑर्डर नंबर
 2. तुम्ही ऑर्डर दिलेली वेळ
 3. तुमचा ट्रेड झाला असेल तर त्याचा ट्रेड नंबर
 4. ट्रेड झालेल्याची वेळ
 5. शेअरचे किंवा सिक्यूरिटीचे नाव
 6. खरेदी किंवा विक्री झाली
 7. खरेदी केलेल्या शेअर्सची संख्या
 8. विक्री केलेल्या शेअर्सची संख्या
 9. शेअरचा भाव ( जो टिकरवर दाखवला जातो.)
 10. शेअर्सची संख्या गुणिले gross दर प्रत्येक शेअरचा = gross total
 11. दलाली (total  खरेदी किंवा विक्रीच्या किमतीवर)
 12. खरेदीचा gross  भाव अधिक दलाली किंवा विक्रीचा gross भाव वजा दलाली (प्रत्येक शेअरसाठी)
 13. खरेदीचा gross  भाव अधिक दलाली गुणीले खरेदी केलेल्या शेअर्सची संख्या किंवा विकीचा gross भाव वजा दलाली गुणिले विकलेल्या शेअर्सची संख्या
 14. सेवा कर
 15. Security Transaction Tax

याशिवाय खालीलप्रमाणे वेगवेगळे charges आकारले जातात.

 1. Security turnover tax
 2. stamp charges
 3. T. O. CHARGES

आधी सांगितल तसं, डेट्रेड दोन प्रकारे करता येतो. आधी विकत घ्या नंतर विका किंवा आधी विका आणि नंतर विकत घ्या. आपण प्रत्येक प्रकारच्या डेट्रेडचं एक एक उदाहरण बघू म्हणजे तुम्हाला मी नक्की काय सांगतीये ते कळेल.
उदाहरण १ – आधी विकत घ्या नंतर विका

Day Trade example

Click on the image to enlarge


बील  क्रमांक १ मध्ये मी ‘BHEL’ कंपनीचे १० शेअर्स प्रत्येकी रुपये २१८२ प्रमाणे खरेदी केले याची एकूण खरेदी किमत रुपये २१८२० झालेली दाखवली आहे .१० शेअर्सला एकूण रुपये ८.७० दलाली आकारली आहे (म्हणजेच प्रत्येक शेअरला ८७ पैसे दलाली ) त्यामुळे मला प्रत्येक शेअरची किमत (दलालीसकट ) रुपये २१८२.८७ एवढी पडली याप्रमाणे १० शेअर्सची दलालीसकट एकूण किमत रुपये २१८२८.७० झाली .
हे शेअर्स मी त्याच दिवशी  प्रत्येक शेअर रुपये २२०५ या दराने विकले .विक्रीची एकंदर किमत रुपये २२०५० झाली या रकमेवर रुपये ११ दलाली आकारली गेली. (प्रत्येक शेअरला रुपये १.१० या दराने ) प्रत्येक शेअरच्या किमतीमधून दलाली वजा केल्यानंतर शेअरचा भाव प्रत्येकी रुपये २२०३.९० झाला .त्यामुळे १० शेअर्सची दलाली वजा जाता विक्रीची किमत रुपये २२०३९.०० झाली.म्हणजेच रुपये २१०.३० फायदा झाला , खरेदी साठी ८९ पैसे व विक्रीच्या दलालीवर  रुपये १.१३ सेवा कर आकारला गेला . T. O. charges  रुपये  १.६५ , S.T.T. रुपये ५ Stamp charges ८८ पैसे या प्रमाणे आकारले गेले .एकंदर फायद्यातून  हे  सर्व charges म्हणजेच रुपये ९.५६ वजा जाता रुपये २००.७४ निव्वळ नफा झाला.
उदाहरण २ – आधी विका नंतर विकत घ्या
Day trade example

Click on the image to enlarge


या  बिलामध्ये प्रथम शेअर्स विकले आणी नंतर खरेदी केले आहेत . विकलेले शेअर्स आपल्याजवळ असले पाहिजेत असे बंधन नसते म्हणूनच याला ‘short’ करणे असे म्हणतात. मी १०  शेअर्स विकण्याची ऑर्डर दिली होती . पण एकदमच १०शेअर्स एकाच लॉट मध्ये जातील/ येतील असे नाही  (६-४, २-८ ५-५ अश्या वेगवेगळ्या लॉटमध्ये तुम्ही खरेदी/ विक्री करू शकता.)
यामध्ये मी titan कंपनीचे १० शेअर्स २६४ रुपये प्रती शेअर या भावाने विकले . दलाली एका शेअरला १२पैसेप्रमाणे आकारली आहे. हे १० शेअर्स (१-९) अशा लॉट मध्ये मिळाले . दलाली वज जाता २४५.८८रुपय भाव या १०शेअर्स साठी मिळाला . एकूण रकम (२४५.८८गुणिले १० ) रुपये २४५८.८० झाली .विक्री साठी १४पैसे सेवा कर  आकारला गेला Security Transaction Tax (STT) 61 पैसे आकारला गेला.
विकलेले १० शेअर्स २४५ रुपये भावाने नंतर खरेदी केले .एकंदर खरेदीची किमत रुपय्र २४५१ झाली प्रत्येक शेअर्सवर १० पैसे दलाली आकारण्यात आली .ती खरेदीच्या किमतीत मिळवून शेअर्स्चा भाव रुपय २४५.१० झाला . यासाटी १२ पैसे सेवा कर आकारला गेला . रुपये ७.८० फायदा झाला . त्यातून १ रुपया STT १०पैसे stamp charges , T. O. charges 16 पैसे व २९ पैसे सेवा कर वजा जाता निव्वळ फायदा रुपये ६.२५ झाला.
आशा अशी आहे कि तुम्हाला वरच्या २ उदाहरणावरून आणि गेल्या २-३ भागांमधून डेट्रेडबद्दल बर्यापैकी माहिती मिळाली असेल. या विषयावर आपण परत बोलूच पण पुढच्या भागात आपल्या मार्केटच्या वाटचालीकडे परत जावूया. भेटूच लवकर..
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

11 thoughts on “भाग ३६ – चक्रव्यूह डेट्रेडचा आणि अभिमन्यू आपला !!!

 1. Pingback: भाग ३५ – दोन्ही ट्रेड शेजारी पण वेगळे शेअर मार्केटच्या बाजरी | Stock Market आणि मी

 2. Avinash Post author

  Madam tumhala brokerage itke kami kase kaay lagte ?? majhe icicidirect madhe account aahe .. geli 3 mahine .. ajun tase market che kahi kalat nahi mala … ni jithe thode kalte mhanun kahi trading karayala jato .. tar to jhalela nafa sagla brokerage madhe jato… thodi help kara ,.. ni kaay karu te sanga .. icicidirect peksha kami brokerage ghenara option baghu ka?

  Reply
  1. surendraphatak Post author

   जास्तीत जास्त ब्रोकरेज किती आकारावयाचे हे बंधन ‘BSE’ व ‘NSE’ यांनी घातले आहे. परंतु या ब्रोकरेजमध्ये ‘CONCESSION’ किंवा ‘DISCOUNT ‘ किती द्यावा हे तुमच्या ट्रेडिंग अकौंटमधील टर्नओवरवर आणी ब्रोकरच्या मर्जीवर अवलंबून असते. हा नियम ‘INTRADAY’ , MEDIUM TERM INVESTMENT, या सर्वांसाठी आहे आता तुम्ही जर खरेदी भावात ब्रोकरेज, ‘TAXES’ ANEE STAMP DUTY मिळवलीत तर तो खरा खरेदीभाव होतो. तसेच तुमच्या विक्रीच्या किमतीतून ब्रोकरेज व ‘TAXES’ वजा केलेत तर तुम्हाला खरा विक्रीचा भाव मिळेल.
   याप्रमाणे खरेदीचा भाव+ब्रोकरेज+’TAXES’, याप्रमाणे ठरल्यावर त्यात आपल्याला हवे असलेले फायद्याचे प्रमाण मिळवून, आपल्याला विक्री किमत-ब्रोकरेज –‘TAXES’ एवढी किंवा त्यापेक्षा जास्त मिळत असेल तरच ट्रेड करावा. म्हणजे आपल्याला प्रत्येक ट्रेड फायद्याचा होईल.

   Reply
 3. Jitendra Fule Post author

  dear avinash, icicidirect is one of the most expensive broker (though they are one who uses very advance technology). You are required to inquire brokerage plan with other brokers like sharekhan , angel broking, motilalal oswal, india infoline etc. But remember low brokerage should not be the only criteria to select broker. Services does matter. Regards
  Jitendra

  Reply
 4. Dipali Post author

  me ata paryant che tumche sagale bolg vachale ahet up to 36. mala start karaychi ahe 0 pasun.Without broker apan trade karu shakat nahi ka

  Reply
 5. Pingback: तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – July – Aug २०१५ | Stock Market आणि मी

  1. surendraphatak Post author

   डेट्रेड आणी डिलिवरी ट्रेडसाठी वेगवेगळ्या दराने ब्रोकरेज आकारले जाते.प्रत्येक शेअर्सच्या खरेदीच्या रकमेत ब्रोकरेज मिळविले जाते आणी प्रत्येक शेअर्सच्या विक्रीच्या रकमेतून वजा केले जाते. पण शेअर्स खरेदी आणी शेअर्स विक्री करताना दोन्ही वेळेला ब्रोकरेज द्यावे लागते. तुम्ही ब्रोकरेजचा दर तुमच्या ब्रोकरला विचारा.कर मात्र बिलाच्या एकूण रकमेवर आकारले जातात पेंनी stock असेल तर तुम्हाला मिनिमम ब्रोकरेज द्यावे लागते. हे मिनिमम ब्रोकरेज किती आकारावे हे प्रत्येक ब्रोकरवर अवलंबून असते.

   Reply
 6. संपतराव कोळेकर Post author

  आपला what’sapp group जर आसेल तर मला add करा please माझ मोबाईल नं .9657743980
  मला शेर मार्केट ची माहिती मिळेल…

  Reply
 7. Pingback: तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – July, August 2016 | Stock Market आणि मी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.