वाचक हो ! तुमचे अभिप्राय वाचून हे समजलं की तुम्ही माझा ‘मार्केट आणी मी ‘ हा ब्लोग लक्षपूर्वक वाचत आहात. त्यातूनच हे जाणवलं की तुम्हाला काही शंका आहेत. त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न मी या ब्लोग्मधून करत आहे. खरं पाहता मी 31VYAAव्या भागात DMAT अकौंट बद्दल चर्चा केली आहे. पण तरीही तुमच्या समाधानासाठी पुन्हा एकदा या भागात DEMAT अकौंट बद्दल माहिती देत आहे.
जसा आयुर्विम्याला पर्याय नाही तसाच आपल्याला शेअरमार्केटच्या व्यवहार करायचा असेल तर DMAT अकौंटला पर्याय नाही. ज्याप्रमाणे पैसे सुरक्षित रहावेत म्हणून आपण बँकेत खाते उघडतो त्याच पद्धतीने शेअर्समध्ये सुरक्षितपणे उलाढाल करता यावी म्हणून DMAT अकौंट उघडावा लागतो. पूर्वीच्या काळात कदाचित बँकेत खाते उघडायला लोक असेच घाबरत असतील; म्हणून बायका फडक्यात पैसे बांधून पुरचुंडी करून धान्याच्या डब्यात ठेवत किंवा जमिनीमध्ये धनाचे हंडे पुरत पण हल्ली बँकेत अकौंट उघडणे हे नाविन्य नाही किंवा कुणाला त्याची भीतीही वाटत नाही. तीच गोष्ट DMATची.
DMAT अकौंट म्हणजेच DEMATEREALIZATION अकौंट. आता प्रश्न असा उद्भवतो की या अकौंटची गरज काय? हा अकौंट उघडला नाही तर चालत नाही कां ?
तुम्हाला शेअर सर्टिफिकेट घेवून देवासारखे पुजायचे असेल तर हा अकौंट नसेल तरी चालते. IPO (IPO SIZE १० कोटींपेक्षा कमी असल्यास ) , RIGHTS ISSUE वा BONUS ISSUE च्या फार्ममध्ये एक रकाना असतो त्यात तुम्ही ‘PHYSICAL FORM ‘ हा पर्याय देवू शकता. पण जेव्हा शेअर्स विकायचा प्रश्न येईल तेव्हा मात्र तुम्हाला ते शेअर्स DMAT अकौंट उघडूनच ते विकावे लागतील. ज्या व्यक्तीजवळ फिझीकॅल फार्ममध्ये शेअर्स असतील त्यांना RIGHTS ISSUE , BONUS ISSUEचे शेअर्स ‘PHYSICAL FORM’ मध्येच येतात . पण त्यातील व्यवहार मात्र शेअर्स ‘DEMATERIALISED’ FORM ‘मध्येच होऊ शकतात .
शेअर सर्टिफिकेट म्हणजे शेवटी एक कागदच , पाहिजे तर महत्वाचा कागद म्हणा हवे तर . त्यामुळे फाटणे वाळवी लागणे भिजणे हरवणे चोरीला जाणे इत्यादी सर्व गोष्टी शेअर सर्टिफिकेटच्या बाबतीत होऊ शकतात. हे सर्व धोके टाळण्यासाठी आपण DMAT अकौंट उघडतो. त्यामुळे शेअर सर्टिफिकेटच्या स्वरूपात असलेल्या शेअर्सची नोंद एका इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील खात्यावर म्हणजेच DMAT अकौंट मध्ये होते .
DMAT अकौंट चे फायदे तसे बरेच फायदे आहेत त्यातले महत्वाचे आज या पोस्तमध्ये सांगतीये .
- शेअर सर्टिफिकेट जपून ठेवण्याची गरज उरत नाही
- शेअर ट्रान्स्फर फार्मवरील स्टंप ड्युटी भरावी लागत नाही
- शेअर सर्टिफिकेटच्या वेगवेगळ्या ऑफिसातून होणार्या हालचालींमध्ये जाणारा वेळ वाचतो.
- ‘FORGERY’’चा धोका रहात नाही.
- शेअर्स आपल्याजवळ ठेवण्याचा सोपा व सुरक्षित पर्याय
- आपण विकत घेतलेले किंवा विकलेले शेअर्सची नोंद त्वरीत DMAT अकौंट मध्ये होते. “ODD LOT “ ची समस्या राहात नाही तसेच प्रर्येक शेअर्सला वेगळा नंबर नसल्यामुळे फक्त शेअर्स संख्येवर विकले जातात
- DMAT अकौंट मध्ये तुम्ही कर्जरोखे वेगवेगळ्या प्रकारचे ‘BONDS’, मुच्युअल फंडाची युनिट्स इत्यादी जमा करू शकता आणी विकूही शकता.
- तुमचा पत्ता बदलला, नाव बदलले, तुम्हाला नॉमिनेशन नवीन करायचे असो किंवा नॉमिनी बदलावयाचा असो तुमचा DMATअकौंट असेल त्तेथे कळवले की पुरेसे होते. प्रत्येक कंपनीला ते कळवण्याची गरज उरत नाही.
- तुम्हाला बोनस शेअर्स किंवा RIGHTS शेअर्स (तुमच्या अर्जाप्रमाणे) किंवा शेअर्स SPLIT झाले किंवा एका कंपनीचे दोन भाग झाल्याने तुम्हाला दुसर्या कंपनीचे शेअर्स फ्री मिळाले तर ते डायरेक्ट तुमच्या DMAT अकौंटवर जमा होतात. तुम्हाला पत्राने कळवले जाते की तुमच्या खात्याला एवढे शेअर्स जमा केले आहेत.त्यामुळे पोस्टात शेअर्स गहाळ झाले ही शक्यता उरत नाही.
- तुम्ही विकत घेतलेले शेअर्स वेळेवर (टी+२) च्या नियमाप्रमाणे ४थ्या वर्किंग दिवशी जमा होतात.
- विकलेल्या शेअर्सचे पैसे (टी+२) च्या नियमाप्रमाणे ४थ्या वर्किंग दिवशी मिळतात.
- तुम्ही शेअर्स विकत घेतलेत आणी तुम्हाला शेअर्स मिळाले नाहीत किंवा शेअर्स विकल्यावर पैसे मिळाले नाहीत अशी फसवणूक होत नाही.
- DMAT अकौंट वरचे व्यवहार तुम्ही जगाच्या कुठल्याही ठिकाणी असलात तरी करू शकता.
- DMAT अकौंट चे विवरण तुम्हाला पाहिजे त्या वेळापत्रकाप्रमाणे किंवा इ-बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही आपल्या DMAT अकौंटची छाननी करू शकता.
- DMAT अकौंट चालवण्यासाठी तुम्ही कोणालाही ‘’POWAR OF ATTORNEY’देवू शकता.’POWER OF ATTORNEY’ला किती ‘POWER’ द्याची ते तुम्ही ठरवू शकता. परंतु ‘POWER OF ATTORNEY HOLDER’ नॉमिनेशन मात्र करू शकत नाही. ते तुम्हाला स्वतःलाच करावे लागेल. पोवेर ऑफ आटोर्नी दिली असल्यास आपण आपला DEMAT अकौंट रोजच्यारोज चेक करणे जरुरीचे आहे. आपल्याला दिवसभरात केलेल्या व्यवहारांची माहिती इमेल द्वारा आपल्या इमेल पत्त्यावर कळवली जाते. त्यावरून आपण आपल्या ‘DMAT’ अकौंटमधील उलाढालींवर लक्ष ठेवू शकता आपल्या मोबीईलवरही ‘SMS’ करून ही माहिती कळवली जाते .
- तुम्ही एका ठिकाणी कितीही DMAT अकौंट उघडू शकता किंवा वेगवेगळ्या DP (DEPOSITORY PARTICIPANT) कडे कितीही DMAT अकौंट उघडू शकता . पण आपले लक्ष राहण्यासाठी एक किंवा दोन DMAT अकौंट असणे सोयीस्कर होते .
- खातेधारकाच्या निधनानंतर त्याच्या DMAT खात्यावर असलेले शेअर्स ‘TRANSMISSION ‘च्या प्रक्रियेनुसार नामिनीच्या किंवा कायदेशीर वारसाच्या नावे होऊ शकतात.
- ‘ DMAT’ अकौंट बंद करायचा असल्यास त्यातील सर्व शेअर्स विकून वा दुसर्या DMAT अकौंटमध्ये हस्तांतरीत करून त्यातील BALANCE NIL करावा लागतो.
DMAT अकौंटमध्ये आपण खालीलप्रमाणे बदल करू शकतो .
नाव : नाव बदलावयाचे असल्यास आपल्याला खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करावी लागतात.
- Marriage registration certificate किंवा
- विवाहाची निमंत्रणपत्रिका किंवा
- पासपोर्ट ची कॉपी ज्यात पतीचे नाव आहे किंवा
- Govt. gazette ची कोपी ज्यात नाव बदलले असल्याची नोंद आहे
- दुसर्या कोणत्याही कारणासाठी नाव बदलावयाचे असल्यास govt. gazzetची कॉपी ज्यात बदललेल्या नावाची नोंद आहे.
पत्ता – आपला पत्ता बद्फ़लवयाचा असल्यास नवीन पत्ता ज्यात असेल त्या कागदपत्रांची स्वतः सही केलेली कॉपी
सही – आपली सही बदलावयाची असल्यास आपल्या बँकेतून आत्ताची सही तसेच नवीन सही प्रमाणित करून आणावी लागते.
अकौंट होल्डर टाकणे किंवा काढणे –
- DMAT अकौंटमध्ये नव्या माणसाचे नाव घालायचे असल्यास नवीन DMAT अकौंट उघडायच्या वेळेप्रमाणे त्या माणसाशी संबंधीत कागदपत्रे द्यावी लागतात.
- DMAT अकौंटमधून एखाद्या अकौंटहोल्डरचे नाव काढून टाकावयाचे असल्यास सर्व संयुक्त खातेधारकांच्या सह्या लागतात.
- हे सर्व बदल करण्यासाठी ‘ADDITION /DELETION/MODIFICATION हा फार्म भरावा लागतो. तसेच सर्व कागदपत्रे स्वतःप्रमाणीत केलेली असावी लागतात
नामांकन –
- एका व्यक्तीच्या नावावर DMAT अकौंट असेल आणी त्याचे निधन झाले तर त्या अकौंटमधील शेअर्स कायदेशीर वारसाच्या नावे होण्यासाठी
- नामांकन केले असल्यास :नोटरीने प्रमाणित केलेला मृत्यूचा दाखला आणी नोमिनीच्या ‘PAN’ कार्डाची स्वतः प्रमाणित केलेली कोपि
- मृत्युपत्र केले असल्यास : नोटरीने प्रमाणित केलेला मृत्यूचा दाखला, मृत्युपत्राची प्रमाणित प्रत /प्रोबेट, १ लाख रुपयापेक्षा जास्त किमतीचे शेअर्स असल्यास ‘LETTER OF ADMINISTRATION’ Sसदर करावे लागते.
- नामांकन वा मृत्युपत्र केले नसल्यास : ‘SUCCESSION CERTIFICATE’
- संयुक्त नावावर खाते असल्यास व एका किंवा अधिक खातेदारांचा मृत्यू झाल्यास (१) नोटरीने प्रमाणित केलेला मृत्यूचा दाखला सादर केल्यास उर्वरीत खातेधारकांच्या नावाने हे शेअर्स बदली होऊ शकतात. यासाठी आता नवीन DMAT अकौंट उघडण्याची जरुरी नाही.
अशा प्रकारे तुमच्या ‘DMAT ‘ अकौंटबद्दलच्या सर्व शंकाचे निरसन झाले असेल असे मला वाटते. तुम्ही घाबरून जावू नका किंवा ‘DMAT’ अकौंटचा मोठा बागुलबुवाही करू नका. मी रेल्वेने जाणार नाही, मी गाडी चालवणार नाही, मी रस्त्यावर जाणार नाही, असे म्हणू लागलो तर एकाच जागी बसून रहाव लागेल. ‘DMAT’ अकौंट हा शेअरमार्केटच्या सुरक्षित व्यवहाराचाच एक भाग आहे. त्यामुळे यापासून दूर पळता येणार नाही. धोका कधी कधी होतो पण हा अपवाद आहे नियम नव्हे. त्यामुळे फक्त जागरूक रहा.
आपल्या शंका दूर झाल्या असतील अशी आशा आहे. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. भेटूच लवकर…
blog changla aahe. parantu kami paisyat jasta fayda denare share konte yachi mahiti milali tar bare.
Thanks sir..chhan mahiti…
but where submit in documents ?
blog changla aahe. parantu kami paisyat jasta fayda denare share konte yachi mahiti milali tar bare.
Madam….tumhi dileli stock market information khupach chan aahe…aani malahi hya tumchya information vachun stock market madhe Entry karnyachi ichha aahe…
pan madam jar kampani loss madhye geli ani aple shears astil tar kay dhoka hoto kiva kampani band padali tr
ky.karayche
thanks madam me tumchi mahiti khup manapasun vaschto atishay soppy shabdat tumhi sangta ahat thanks ani ya pudhe hi tumhi asech margdarshn chalu theva…yumcha asha soppy shabda mule anadi suddha hero hoiennn hi mazi 100 % gurantee ahe
Pingback: तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Oct 2015 – Feb 2016 | Stock Market आणि मी
Madam tumchi mahiti vachun barach kahi samajla market babat pan mala ek vicharaychay ki ya babat mala for example ( Wahivarti ) try karayche aslyas tyabat ky karav lagel jase tumi try kela hota aani tumi tax babat kahitari chukla hota vatat …………….
शेअर मार्केट मध्ये आपल्याला शेअर्सच्या खरेदीविषयी आणी विक्रीविषयी निर्णय घ्यायचे असतात. आपण जे निर्णय विशिष्ट परीस्थित घेतो त्यापैकी आपले किती निर्णय बरोबर येतात हे एखाद्या वहीत लिहून आपण ट्रायल घेतली तर आपल्या लक्षांत आपल्या चुका येउ शकतात.आणी त्या चुका आपण प्रत्यक्ष मार्केट मध्ये व्यवहार करताना सुधारू शकतो. ही एक प्रकारची रंगीत तालीम म्हणून मी सांगितली आहे या प्रकारे वहीतल्या वहीत सराव केल्याने आर्थिक फायदा किंवा नुकसान होत नाही. त्यामुळे याबाबतीत कर भरण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तुम्हाला आपल्या निर्णयांविषयी आत्मविश्वास आली की आपण प्रत्यक्ष शेअर मार्केट मध्ये व्यवहार करू शकतो.एकदम शेअरमार्केटमध्ये व्यवहार केल्यास आपले बहुतांशी निर्णय चुकीचे असतील तर आपल्याला तोटा होऊन आपले भांडवल जाण्याची शक्यता असते.
आपल्या कर सल्लागाराचा करविषय सल्ला घेणे हे नेहेमी हितावह असते. . कारण करविषयक नियम सतत बदलत असतात
Pingback: तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – July, August 2016 | Stock Market आणि मी
dhanyavad madam .. chan mahiti dilit.
Pingback: तुमचे प्रश्न – माझी उत्तरं : Jan – Feb 2017 | Stock Market आणि मी
Pingback: तुमचे प्रश्न – माझी उत्तरं : July – September 2017 | Stock Market आणि मी