गुढी पाडवा 2014 – आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे

Gudi Padwa Share Market

Image – Redtigerxyz at English Wikipedia


आज गुढी पाडवा. नववर्षाचा पहिला दिवस. अशा शुभ दिवशी तुमच्याशी थोडेसे हितगुज करू असे मनात आले म्हणून हा blog post.
शेअरमार्केटने गुढी पाडव्याचे व नववर्षाचे दणदणीत स्वागत करून शेअरमार्केट्ची गुढी खूप उंच उंच नेली आहे. गेल्या गुढीपाडव्याला BSE SENSEX 21832.61 व NSE NIFTY 6516.55 होता. २९ मार्च २०१४ रोजी BSE SENSEX 22339.00 व NSE NIFTY 6695.90 आहेत . म्हणजेच आतापर्यंतच्या जास्तीतजास्त स्तरावर आहेत. अशा मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला काही टिप्स देते आज –
(१)   आनंदाचे तोरण लागले आहे. हीच वेळ खरी खबरदारी घेण्याची असते . त्यामुळे तुम्ही अचूक वेळ साधून जास्तीतजास्त नफा मिळवा. बेसावध राहिलात तर बस चुकेल आणी पुढली बस केव्हा येईल याचा कोणी भरवसा द्यावा. परंतु त्याचबरोबर रेंगाळू नका, मोहात पडू नका किंवा अमुक एक भाव मिळाला तरच विकीन असे ठरवून बसू नका.सारासार विचार करून मिळणारे दान लवकरात लवकर पदरात पडून घ्या नाहीतर मिडास राजाच्या गोष्टीप्रमाणे होईल
(२)   मार्केटच्या प्रवाहाविरुद्ध जाण्याचे धाडस करू नका.
(३)   इतक्या वाढलेल्या मार्केटमध्ये स्वस्त काय महाग काय हे शोधणे कठीण असते. त्यामुळे खरेदीच्या भानगडीत पडू नका
(४)   कमीतकमी किमतीचे व जास्तीतजास्त पैसा मिळवून देणारे असे काही विशिष्ट शेअर्स मार्केटमध्ये नसतात .आखूडशिंगी व बहुगुणी शेअर्स मिळणे नेहेमीच कठीण असते. शेअर एकतर चांगला म्हणजे फायदा करून देणारा असतो किंवा वाईट म्हणजे तोटा होणारा असतो .
(५)  काही काही लोकांसाठी ही सुवर्णसंधी चालून आली आहे. जे लोक आमचे पैसे बुडाले म्हणून हाताची घडी घालून बसले असतील त्यांनी आपले ‘DMAT’ अकौंटचे स्टेटमेंट काढून त्यापैकी कोणते शेअर्स फायद्यात आहेत कां हे बघून झटपट निर्णय घेवून विकून टाका. जर कोणाजवळ फिझीकल फोर्ममधे शेअर्स असतील तर ते झटपट ‘DMAT’ करून विकून टाका.
(६)   ही शेअर विक्रीची वेळ आहे खरेदीची नव्हे संधी हुकली असेल तर पुढच्या संधीची वाट पहा.गर्दीमध्ये घुसून चेंगराचेंगरीत सापडू नका.
(७)  ही ‘ ELECTION RALLY’ आहे १६मेला निवडणुकीचे निकाल आहेत.10 मे पर्यंत आपापला फायदा वसूल करा. पुढे मार्केटचा रागरंग निवडणुकीच्या निकालाप्रमाणे बदलू शकतो.
या टिप्स लक्षात ठेवा म्हणजे हा गुढीपाडवा आपल्या सर्वांच्या चिरंतन स्मरणात राहील व भरघोस दान आपल्या पदरात टाकेल.

5 thoughts on “गुढी पाडवा 2014 – आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे

 1. kiran558 Post author

  तुमची व माझी ‘स्टोरी’ बरीचशी सारखी आहे. लेख वाचल्यावर म्हटलं ‘सापडलं बुवा एकदाचं’ मला ही आणि अशीच माहीती हवी होती, माहीतीबद्दल लाख लाख धन्यवाद. खुप छान शैली आहे लिहीण्याची, मी ह्या विषयावरचा हा पहीला ब्लॉग तत्काळ रजीस्टर करुन फॉलो करायला सुरूवात केली आहे ( फॉलो काय कुत्र्यासारखा ह्या ब्लॉगच्या मागे लागणार आहे कारण तुमचे मार्गदर्शन मला मोलाचे वाटते. )
  लेखांबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद, अशाच लिहीत रहा म्हणजे आमच्या सारख्या नविन लोकांना छान मार्गदर्शन होईल.

  Reply
  1. jyoti keni Post author

   mala tumache blogs far avadtat
   mala share marketchi poorna mahiti havi hoti ti mala kontay lekhakachya marathi poostakatun milel te sangave kiva ankhin kontya margane milel yachi mahiti dyavi hi vinanti. ….

   Reply
   1. surendraphatak Post author

    माझी वहिनी या मासिकातून जानेवारी २०१३ पासून मी शेअरमार्केटसंबंधी लेख मराठीतून देत आहे.  तुम्ही फोनवर किंवा व्यक्तीशः भेटून या विषयावर माझ्याशी बोलू शकता.
             माझा फोन नंबर : ९६९९६१५५०७  ०२२२५३३५८९७ 

    Reply
 2. Sandhya Post author

  Mam,
  मी तुमचा मार्च 14 चा ब्लॉ आजच वाचला.खुपच छान माहिती मिळाली।मला share market बद्दल कगुप कुतूहल आहे.
  पन तुम्हाला जसे मागदर्शक मिळाले तसे सर्वनाच मिळतात असे नाही.
  तुम्ही देताहेत त्या माहिती बद्दल धन्यवाद
  Wish me all the best.
  Thanks again.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.