वाचकांनी काही शब्दांचे अर्थ व खरेदी विक्री करताना त्यामुळे मिळणारे संकेत याची काही सांगड घालता येते कां अशी विचारणा केली त्यानुसार या ब्लोगमधूनच हे उत्तर द्यावे असे मी ठरविले.
BETA
हा शब्द मार्केटच्या संदर्भांत नेहेमी वापरला जातो. कोणत्याही शेअरच्या किमतीमध्ये होणाऱ्या बदलाचे प्रमाण व त्याचा वेग व त्यामुळे निर्माण होणारा धोका यालाच ‘BETA’ असे म्हणावे.(हा मी माझ्यासाठी समजून घेतलेला अर्थ आणी व्याख्या आहे) म्हणजेच काही शेअर्सच्या किमतीमध्ये फार कमी वेळा व फार मोठ्या प्रमाणावर बदल होतात .अगदी होत्याचे नव्हते होते. त्या शेअरचे रूप पूर्णपणे पालटते. अशा शेअरला ‘HIGH-RISK, HIGH-RETURN’ शेअर म्हणतात. असे शेअर खरेदी करण्याची योग्य वेळ साधता आली तर तासाभरात बराच फायदा होऊ शकतो . अर्थात नाण्याची दुसरी बाजू आहेच. योग्य वेळ साधता आली नाही, ट्रेंड बदलला तर बराच तोटाही होऊ शकतो . ‘BETA’ च्या टक्केवारीचे निरीक्षण करण्यापेक्षा रोज शेअरच्या किमतीचे निरीक्षण केले तर ही गोष्ट लक्षात येते. मी अशा शेअर्सना धावणारे शेअर्स म्हणते.
शास्त्रीय भाषेत बोलावयाचे झाल्यास SENSEX किंवा NIFTY मध्ये जी हालचाल होते तिला आपण १ मानले तर १पेक्षा जास्त हालचाल असेल तर ‘HIGH BETA’ आणी १ पेक्षा कमी हालचाल असेल तर त्या शेअरला ‘LOW BETAA ‘ असे समजा. तुमची धोका पत्करण्याची कितपत तयारी आहे याचा विचार करूनच “HIGH –BETA’ शेअर्सच्या वाटेला जावे. छोट्या आणी मध्यम कालावधीसाठी “BETA’ची संकल्पना विचारात घेता येते. परतू दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांना या संकल्पनेचा फारसा उपयोग होत नाही.’BETA’ भूतकाळात किमतीत झालेल्या बदलांवर आधारीत असतो, परंतु दीर्घ मुदतीमध्ये कंपनीच्या प्रगतीप्रमाणे किंवा काही अन्य कारणांमुळे शेअरची प्रवृत्ती व गुंतवणूकदारांचा त्या शेअरकडे बघण्याचा कल बदलू शकतो .
काही शेअर्सच्या किमतीत निर्देशांकाप्रमाणे बदल होतो तर काही शेअर्सच्या किमतीत निर्देशांकाच्या विरुद्ध बदल होतो. म्हणजेच हे किमतीत होणारे बदल मार्केटच्या समप्रमाणात किंवा मार्केटच्या व्यस्त प्रमाणांत असतात.मार्केट पडत असेल तर हे शेअर्स वाढतात व मार्केट वाढत असेल तर हे शेअर पडतात.
अशा शेअर्सना ‘NEGATIVE BETA’ असलेले शेअर्स म्हणतात.
E. P. S.
E.P.S. म्हणजेच ‘EARNING PER SHARE’ म्हणजेच कंपनीच्या प्रत्येक साधारण शेअरच्या वाटेला कंपनीचा किती नफा येतो.
E. P .S. = PROFIT AFTER TAX / NUMBER OF SHARES
सर्व देणी दिल्यानंतर कंपनीचे जे उत्पन्न उरते त्याला शेअर्सच्या संख्येने भागले असता प्रत्येक शेअरच्या वाट्याला किती उत्पन्न येते हे समजते. आपण जर ‘A ‘ आणी ‘B ‘ या एकाच प्रकारच्या उद्योगांत असलेल्या दोन कंपन्या निवडल्या ज्यांचा E. P. S. समान आहे परंतु ‘B’ कंपनी कमी भांडवलात व्यवसाय करू शकत असेल तर ती कंपनी जास्त कार्यक्षम आहे असे समजावे. जर E.P.S. जास्त असेल तर जास्त लाभांश मिळण्याची शक्यता असते. पण जर कंपनीला ‘EXPANSION’ करावयाचे असेल किंवा ठराविक %लाभांश देण्याचे कंपनीचे धोरण असेल तर लाभांशात वाढ होत नाही.जर दरवर्षी कंपनीच्या E.P.S. मध्ये वाढ होत असेल तर टी कंपनी प्रगती पथावर आहे असे समजण्यास हरकत नाही..
P. E. RATIO
P. E .RATIO म्हणजेच ‘PRICE EARNING RATIO.
P. E. RATIO = शेअरची किमत /EARNINGS PER SHARE
म्हणजेच प्रत्येक शेअरच्या उत्पन्नाच्या किती पटीत शेअरचा भाव चालू आहे हे समजते. प्रत्येक उद्योगाचा सरासरी P. E. RATIO असतो. या RATIOपेक्षा जास्त किमतीला तो शेअर मार्केटमध्ये असेल तर तो महाग समजावा आणी कमी किमतीला असेल तर तो शेअर स्वस्त समजावा. परंतु एखाद्या शेअरला एवढा भाव कां दिला जातो आहे किंवा एवढ्या चढ्या किमतीला गुंतवणूकदार कां गुंतवणूक करीत आहेत ते पाहिले पाहिजे.अशा वेळी गुंतवणूकदारांना असे वाटत असते की या कंपनीचे व्यवस्थापन चांगले आहे , ही कंपनी भविष्यकाळात प्रगतीपथावर राहील व आपली गुंतवणूक फायदेशीर ठरेल.जर P. E. RATIO ० -१० मध्ये असेल तर ही कंपनी ‘UNDERVALUED’ समजावी परंतु ‘UNDERVALUED किंवा स्वस्त मिळते आहे म्हणून धावत सुटू नका.आपली गुंतवणूक सुरक्षित राहील ना हे ही पहावे लागते जर P. E. RATIO १०ते १७ मध्ये असेल तर सर्वसाधारणतः कंपनीचा शेअर योग्या किमतीला मिळतो आहे असे समजावे.जर P. E. RATIO १७ ते २५ या दरम्यान असेल तर शेअर महाग आहे असे समजावे. जर P. E. RATIO २५ पेक्षा जास्त असेल तर तेथे काही तरी शिजते आहे असे समजावे त्याचा तपास करणे जरुरीचे आहे कारण काही काही शेअर्स गुंतवणूकदारांना उगीचच आवडतात.त्याला मार्केटच्या भाषेत ‘PUBLIC FANCY’ शेअर्स असे म्हणतात.P.E.RATIO तुम्ही गुंतवलेली रकम किती काळांत वसूल होईल हे दाखवतो.‘
OPEN INTEREST
OPEN INTEREST ही DERIVATIVE मार्केटमधली संज्ञा आहे. आता सोप्या शब्दांत सांगावयाचे झाले तर प्रत्येक गोष्टीसाठी लागलेली रांग विचारात घ्या. जर एख्याद्या सिनेमाच्या तिकिटासाठी भली मोठी रांग असेल पुढील आठ दिवसांचे बुकिंग झाले असेल तर तो सिनेमा पाहण्यात लोकांना रस आहे असे आपल्या लक्षांत येते.त्याचप्रमाणे OPEN INTEREST मध्ये होणारा बदल त्या शेअरमधल्या गुंतवणुकीचा कल दर्शवितो.OPEN इंटरेस्ट वाढत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की नवीन पैसा गुंतवला जात आहे आणी किमतीत होणाऱ्या बदलाची दिशा तीच राहील किंवा वाढत जाईल हे समजते. OPEN INTEREST कमी होत असेल तर पैसा बाहेर जात आहे किंवा गुंतवणूक कमी केली जात आहे किमतीत होणाऱ्या बदलाची दिशा उलट होण्याची वेळ आली आहे असे ओळखावे. दिवसाच्या शेवटी OUTSTANDING असणार्या FUTURES आणी OPTIONSमधील CONTRACTS ची एकंदर संख्या, म्हणजेच OPEN INTEREST.
OPEN INTERESTची पातळी तीच राहिली पण शेअरची किमत मात्र वाढू लागली तर ‘BULL’ मार्केटचा शेवट जवळ आला असे समजावे. व किमत घटू लागली तर BEAR –RUN संपत आला असे समजावे.
शेअरची किमत ओपन इंटरेस्ट अर्थ
वाढते आहे वाढतो आहे मार्केट मजबूत आहे
वाढते आहे कमी होतो आहे मार्केट WEAK होत आहे
कमी होत आहे वाढतो आहे मार्केट WEAK होत आहे
कमी होते आहे कमी होत आहे मार्केट मजबूत होत आहे.
हे सर्व मी माझ्या अनुभवानुसार लावलेले अर्थ व स्पष्टीकरण आहे. अर्थ किंवा स्पष्टीकरण चुकीचे नाही पण ते माझ्या शब्दांत वर्णन केले आहे. शेअर्स खरेदी-विक्री करताना सर्व संकल्पनांचा साकल्याने विचार करूनच निर्णय घ्यावा लागतो. कारण शेअरमार्केटवर परिणाम करणारे घटक पुष्कळ आहेत. ह्या सर्व घटकांचा कमी जास्त परस्परविरोधी परिणाम शेअरच्या किंमतीवर होत असतो .
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
भाग ४२ – तुमची शंका आणि मार्केटची भाषा
1 Reply