भाग ४६ : Stop loss – विनाशकाले समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडितः

दुसरे दिवशी आमच्या ऑफिसमध्ये गेले. मनातल्या मनांत माझी हरिनामाची कथा सुरु झाली. आज स्टोप लॉस काय असतो तो शिकून जाईन असं ठरवून आले होते.
अविनाशला विचारले ‘काल माझ्या बाजूला  बसलेले गृहस्थ आले नाहीत कां अजून? ते रोज येतात ना?
अविनाश :”अहो madam , ही काय शाळा आहे कां ?. अहो घरी काही काम निघाले तर लोक येत नाहीत.
शेअरमार्केट चालू झालं.. व्यवहार सुरु झाले. माझी नजर दरवाजाकडेच होती.११ वाजतां ते आले. मला त्यांनी खुणेनेच सांगितले नंतर बोलू कारण मार्केट सुरु असताना आपल्या शेअरकडे लक्ष दिले नाही तर नुकसान होते. स्क्रीन कडे बघून त्यांच्या चेहेऱ्यावर थोडं हसू आलं, त्याच कारण कदाचित मला माहित होतं. त्यांचा कालचा निर्णय योग्य ठरला असं स्क्रीननी त्यांना सांगितलेलं दिसत होतं. त्यांनी नुकसान सोसून जो शेअर काल ८३ला विकून टाकला त्याची किंमत आज रु. ७५ झाली होती. त्यांची खरेदी किंमत रु. ८५ होती. त्यावेळी त्यांना रु.२०० नुकसान झाले खरे परंतु मोठे नुकसान होणे टाळता आले होते. त्यांनी मला विचारले “madam पाहिलंत ना ?
मी म्हटलं ‘होय बघितलं! बघितलं!’
ते म्हणाले – “ तुम्हाला ‘STOPLOSS’ म्हणजे काय सांगण्याची गरज आहे कां? तुम्हाला आज मार्केटनेच ‘STOPLOSS’ समजावला कि.
“कळला पण वळला नाही किंवा वळला पण कळला नाही अशी माझी अवस्था आहे.मला एक सांगा कि  नुकसान सोसल्याशिवाय पर्यायच नाही कां? थोडासा भले पण तुम्हाला २०० रुपये घाटा झालाच नं!” मी लगेच म्हटलं
गृहस्थ म्हणाले : “ सांगतो, बसा जरा.. अहो शेअर मार्केटमध्ये काही शेअर उत्कृष्ट, काही चांगले काही मध्यम, काही नित्कृष्ट  दर्जाचे असतात. मी जे शेअर्स घेतले होते ते फारसे चांगले नव्हते. न्यूज-बेस्ड होते. त्या कंपनीला ऑर्डर मिळणार होती.पण काय झालं ते मला माहित नाही. तो शेअर वाढायला हवा होता पण वाढला नाही. पण त्या कंपनीला जी ऑर्डर मिळणार होती ती रद्द झाली असेल किंवा नाही पण शेअर पडायला लागला. आता जर मला हे शेअर्स घेवून काही महिन्यांसाठी ठेवायचे असते तर मी कमीत कमी भावाला खरेदी करण्याचा प्रयत्न केला असता. पण माझ्या डोक्यांत तसं काही नव्हत, मला फक्त चांगल्या बातमीचा फायदा उठवायचा होता. मी शेअर घेतानाच ठरवलं होतं कि जर भाव पडायला लागला तर त्यामुळे काय झाले असेल जास्तीतजास्त रु. २ नुकसान सहन करायचे आणि ते शेअर विकून मोकळ व्हायचं. उगाच शेअर का पडला आणि नंतर वाढेल का हि चर्चा करत बसायची नाही. कारण कधी कधी टोटल मार्केटचा मूड मंदीचा असेल तर आपला शेअर प्रथम काही वेळ पडतो, व नंतर सुधारतो. कारण volatility हा मार्केटचा गुणधर्म आहे. पुढच्या मिनिटाला काय होणार हे आपल्याला रोजच्या आयुष्यांत कळत नाही म्हणून आपण सुरक्षिततेचे उपाय करीत असतो. भविष्यकाळासाठी अनेक योजना आखत असतो. तसीच हि शेअर्मार्केट मधली योजना.
आतां शेअर पडला आहे थोड्यावेळाने वाढू लागेल अशी आशा वाटते आपण आपले आशाळभूत नजरेने वाट पहात बसतो. वाट पहाण्याशिवाय काही उपायहि नसतो. अशा वेळी काय करणार ? तोटा सहन करण्याशिवाय काही इलाज नसतो. ‘विनाशकाले समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडितः’  हाच शहाणपणाचा सल्ला असतो. अशावेळी ‘STOPLOSS’ लावावा म्हणजे नुकसान कमी होतं किंवा मग अशा शेअर्सच्या भानगडीतच पडू नये असे मी सुचवीन.”
आता त्यावेळी मला जो प्रश्न पडला तो कदाचित तुम्हाला हि पडला असेल
‘ अहो मग अश्या शेअर मध्ये किंवा अश्या परिस्थितीत लोक गुंतवणूक का करतात ?’
ते म्हणाले
‘काही लोकांजवळ गुंतवण्यासाठी भांडवल नसते त्यामुळे असा ट्रेड लोक करतात. काही लोक संधीचा फायदा उठविण्यासाठी असा ट्रेड करतात. माणसाचा स्वभाव आहे!
कधी कधी नशीबाचा खेळ असा असतो की कितीही योजना केली तरी नुकसान व्हायचं तितकं होतेच. तुम्ही तुमच्या STOPLOSS च्या किमतीला शेअर विकायला लावले तर शेअरची PRICE ‘JUMP’ मारते. त्यामुळे तुम्ही टाकलेल्या किमतीला ट्रेड होत नाही. त्यामुळे ‘STOPLOSS’  फिक्स न ठेवता एका range मध्ये ठेवावा म्हणजे तुम्ही लावलेल्या किंमतीच्या जवळपास ट्रेड होऊ शकतो.
मार्केटमध्ये काही पथ्ये पाळावी लागतात. वेळेवर ‘PROFIT’ बुक करावे नाहीतर ‘तेलही गेले तूपही गेले’ अशी अवस्था होते. आता एखादा शेअर रोजच वाढतअसेल तर मग नक्की कधी विकायचा ते कळत नाही. शेवटी ’अजून हवे , अजून पाहिजे’ ही सुद्धा एक मानवी प्रवृत्ती आहे. या वृत्तीला सुद्धा ‘STOPLOSS’ मुळे लगाम लागतो. अशावेळी जो ‘STOPLOSS’ लावतो त्याला ‘TRAILING STOPLOSS’ असे म्हणतात. असं समजा कि हा STOPLOSS तुमच्या भविष्यातल्या profit च्या सुरक्षेसाठी. हा  ‘STOPLOSS’ शेअरच्या वाढत असलेल्या किंमतीचा माग काढत जातो. शेअर किती वाढतो आहे तेव्हढा वाढू दे आपण त्याच्या मागावर रहायचे.समजा शेअरची किंमत रु. १०० आहे ही तुमची खरेदी किंमत आहे. शेअर रु. ११० झाला , तुम्हाला १०% फायदा होत आहे पण तुम्हाला वाटते की ‘PROFIT’ बुक न करतां थांबावे तर मग तुम्ही रु. १०८ वर ‘STOPLOSS’ लावा, शेअरची किंमत रु. १२० झाली तर ‘STOPLOSS’रु.११८ करा. शेअरची किंमत रु. १३० झाली तर ‘STOPLOSS’बदलून रु. १२८ करा. परंतु  आतां शेअरची किमत कमी होऊ लागली तर तुम्ही शेअर्स रु. १२८ला विकून PROFIT-LOCK करा. म्हणजे तुमचा फायदा वाढू शकतो.
तुम्हाला ‘STOPLOSS’ मुळे जो थोडासा तोटा होतो तो नको असेल तर लार्ज-कॅप किंवा ब्लूचिप किंवा ‘A’ ग्रुपच्या शेअर्समध्येच पैसे गुंतवा म्हणजे शेअर पडू लागला तर इंट्राडे ट्रेडचे रुपांतर ‘DELIVERY TRADE’ मध्ये करा. पैसे गुंतवण्याची ऐपत असेल तर पैसे गुंतवा १५ दिवसांनी शक्य झाल्यास फायद्यात विका.’
मग ते एक मिनिट थांबले आणि म्हणाले
‘madam, मला जेव्हढे माहीत होतं तेवढ मी तुम्हाला ‘STOPLOSS’ चे पुराण ऐकवलं. तुम्ही फार्म भरताय नं?’
मला कळेना : ‘कसला फार्म?’
गृहस्थ : ‘IPO’चा फार्म हो! उद्या इशू क्लोज होत आहे. हा फार्म तुम्हालाच भरता येईल. कसा भरायचा ते मलाहि समजावून सांगा’
त्या गृहस्थांना फार्म कसा भरायचा ते समजावून सांगितले ते तुम्हालाही सांगेन पण त्यासाठी पुढील ‘BLOG’ वाचा.

7 thoughts on “भाग ४६ : Stop loss – विनाशकाले समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडितः

  1. Digital Solutions Post author

    तुमचा ब्लॉग वाचनीय आहे पण जुन्या पोस्ट्स वाचण्याकरता काही सोप्पा मार्ग नाहिये. About वर जाऊन पहिली पोस्ट उघडून एक एक पोस्ट उघडत त्यातून पुढचे भाग वाचायला लागतात. मोबाईल डिव्हाईसवरून तर खूपच कंटाळवाणे वाटते हे सगळे. निदान एक अनुक्रमणिका तरी तयार करा मुख्य पेज वर.

    Reply
  2. rupali mukund yeole Post author

    Madam thanx
    Baryach divsanpasun mi dmat a/c open karnyacha vichar karat hote pan share marketchi bhiti watat hoti, tumche blog vachun mi daring kel ani dmat a/c open karun pahil paul uchlal ahe,
    Punha ekda thnx,

    Reply
    1. surendraphatak Post author

      माझे ब्लोग वाचून शेअरमार्केटबद्दलची भीती नाहीशी होते आहे हे समजले. खूप खूप आनंद झाला. माझ्या प्रयत्नाला थोडे फार यश मिळते आहे असे वाटले.आपल्या पुढील वाटचाली करतां शुभेच्छा. या वाटचालीत काही अडचण आल्यास निःसंकोच खालील  फोन नंबरवर संपर्क करू शकता. mobile 9699615507 land line 02225335897 

      Reply
  3. Pingback: भाग ४७ – शेअरचं बाळंतपण अर्थात IPO | Stock Market आणि मी

  4. KETAN M Post author

    Mam Maza Q. Ahe Demat account open kelyavr share market madhe maza sahabhag hoto ka? ani mala product kothun milel.. plzzz sanga

    Reply
  5. Pingback: तुमचे प्रश्न – माझी उत्तरं : Jan – Feb 2017 | Stock Market आणि मी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.