आधीचा भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
IPO बद्दल माझ्या मनात उत्सुकता होती. त्यामुळे घरातली कामं उरकल्यानंतर IPOचा फॉर्म बघायला सुरुवात केली. प्रत्येक गोष्टीचा मला नव्याने परिचय होत होता. फॉर्ममधल्या बाबी समजावून घ्यायच्या आणि नंतर भरायचा असला तर फॉर्म भरायचा असा माझा प्लान होता. पूर्वी फॉर्म व त्यातील माहिती नियम कायदे आजच्यापेक्षा वेगळे होते. त्या सगळ्यांचा विचार न करतां सध्या जे IPOचे फॉर्म आपण भरत आहोत ते आपण पाहू. कालानुरूप यातही बदल होऊ शकतो.बदल झाला असेल तर तो तुम्ही विचारांत घेतला पाहिजे.
फॉर्म वाचता येत होतं आणि त्यात काय लिहिलंय ते थोडंफार कळतहि होतं पण तरी थोड्या शंका होत्या. मग काय, नेहेमीसारखी गेले ऑफिसमधे आणि पकडलं एका महाभागाला. त्याने मला जशी मदत केली तशी मी आता तुम्हाला करते. जसा मी फॉर्म भरायला शिकले तसा तुम्हाला पण सांगते. मी या ब्लोग मध्ये एक sample फॉर्म अपलोड केला आहे.
आता मी जे सांगणार आहे त्यासाठी तो फॉर्म संदर्भ म्हणून वापरा.
- फॉर्मच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यांत सर्वात वरती COMMON BID-CUM APPLICATION FORM ASBA /NONASBA असे लिहिलेले असेल. तर जे तुम्हाला लागू नसेल ते खोडा.
- आता आपण ASBA म्हणजे काय ते बघू. IPOचा फॉर्म भरल्यापासून शेअर ALLOT होऊन पैसे खात्याला जमा होईपर्यंत पूर्वीच्याकाळी ३ महिन्याचा कालावधी लागत असे त्यामुळे तेव्हढे दिवस रक्कम अडकून पडत असे. ती रक्कम कशासाठीही वापरता येत नव्हती किंवा त्याच्यावर व्याजही मिळत नसे. हल्ली हा कालावधी कमी झाला आहे.तरी देखील १५ ते २० दिवस रक्कम अडकून पडतेच. यासाठी SEBI ने ( SECURITIES AND EXCHANGE BOARD of INDIA ) जी योजना केली आहे त्या योजनेचे नाव ASBA होय. ASBA म्हणजेच (APPLICATION SUPPORTED BY BLOCKED ACCOUNT). बचत खात्यावरील ठराविक रक्कम तुमच्या संमतीने बँक राखून ठेवते. तुम्हाला जेवढे शेअर्स मिळतील त्याचे पैसे त्या रकमेतून वजा होतात. उरलेली रक्कम तुम्ही त्यानंतर वापरू शकता. या योजनेमध्ये तुम्हाला त्या रकमेवरचे व्याज मिळत राहते. जेव्हढे शेअर्स ALLOT होतील तेव्हढीच रकम वजा होत असल्यामुळे उरलेले पैसे जमा होण्यासाठी वाट बघावी लागत नाही. उदा GURU LTD .कंपनीच्या IPO मध्ये Rs १०० ते १२० या price-band मध्ये १०च्या मिनिमम लॉट किंवा त्याच्या पटीत अर्ज मागवले या शेअरची दर्शनी किमत Rs.१ प्रती शेअर आहे.तुम्ही कमीतकमी १० शेअर्ससाठी Rs १२०० किंवा जास्तीतजास्त १६६० शेअर्ससाठी Rs.१९९२०० चा अर्ज करू शकता. त्याची रकम Rs१,९९,२०० होते. ही रकम चेकने किंवा demand-draftने भरावी लागते.हा चेक किंवा डिमांडड्राफ्ट अर्जासोबत जोडावा लागतो.हा चेक लगेच तुमच्या अकौंट मधून वजा होतो. तुम्ही ‘ASBA’ योजनेचा फायदा घेत असाल तर तुमच्या बचत खात्यावरील तेव्हढी रकम तुमची बँक तुमच्या संमतीने BLOCK करते. त्यामुळे व्याज चालू राहते. जर तुम्हाला शेअर्स ALLOT झाले तर तेव्हढ्या शेअर्ससाठी आवश्यक असलेली रकम वजा करून ती ISSUERच्या खात्यात जमा केली जाते.वरील उदाहरणाप्रमाणे जर तुम्हाला ५० शेअर्स ALLOT झाले तर त्याची रकम Rs.६००० तुमच्या खात्यातून वजा होईल. उरलेली रकम म्हणजे Rs१९३२०० तुम्हाला वापरता येतील. यालाच रक्कम BLOCK करणे व रकमेवरील BLOCK उठविणे असे म्हणतात. अशा वेळी NON-ASBA ही अक्षरे खोडावीत. तुम्हाला या सवलतीचा फायदा घ्यायचा असेल तर ज्या बँकेत ही सवलत उपलब्ध असेल अशाच बँकेत तुमचे बचत खाते हवे.
- अर्जात वरच्या बाजूला मधोमध शेअर्स ऑफर करणाऱ्या कंपनीचे नाव असते नावाखाली ISIN (INTERNATIONLSECURITIES IDENTIFICATION NUMBER नंबर असतो.हा नंबर प्रेत्यक SECURITIES च्या ISSUE ला दिलेला असतो व तो एकमेव असतो. उजव्याबाजूला हा फॉर्म कोणकोणत्या प्रकारच्या अर्जदारांनी भरावा हे लिहिलेले असते. त्याच्या खाली BID-CUM APPLICATION NUMBER असतो.शेअर्सची ALLOTMENT होईस्तोवर हा नंबर लक्षांत ठेवावा. कोणतीही तक्रार करायची असल्यास हा नंबर द्यावा लागतो.
- १ल्या क्रमांकाच्या रकान्यामध्ये तुमचे नाव पत्ता इमेल ADDRES टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर भरायचा असतो. ही सर्व माहिती DMATअकौंटमधील माहितीशी तंतोतंत जुळली पाहिजे.
- क्रमांक २ च्या रकान्यामध्ये PAN (PERMANENT ACCOUNT NUMBER ) भरा.
- रकाना नंबर ३ मध्ये DEPOSITORYच्या नावावर टिक करा. NSDL(NATI ONAL SECURITIES DEPOSITORY LTD.)किंवा CDSL (CENTRAL DEPOSITORY SERVICES LTD.).DEPOSITORYच्या नावाखाली तुमचा DEMAT अकौंट नंबर लिहा.
- रकाना नंबर चार मध्ये तुम्हाला बीड करण्यासाठी ३ पर्याय दिलेले असतात..त्यांत पहिल्या कॉलममध्ये आपण किती शेअर्ससाठी अर्ज करत आहांत ते लिहावे. यात लक्षांत ठेवायचे की ठरलेल्या बीड-लॉट किंवा त्याच्या पटीत शेअर्ससाठी अर्ज करावा. इशु ओपन व्हायच्या आधी हा मिनिमम बीड लॉट जाहीर केला जातो.तुम्ही PRICE-BAND च्या मर्यादेत(price band च्या upper band व LOWER band मध्ये जास्तीतजास्त २०% फरक असतो.) हे शेअर्स त्या PRICEला बीड करू शकता. जर तुम्ही INDIVIDUAL RETAIL INVESTOR असाल तर तुम्ही CUTOFF priceलाच अर्ज करावा. RETAIL INVESTOR जास्तीतजास्त Rs२००००० (अर्ज केलेल्या शेअर्सची संख्या x priceband मधील upper band.).एवढ्या रकमेसाठी अर्ज करू शकतात.
आता CUTOFF PRICE म्हणजे काय ते बघू. IPO(INITIAL PUBLIC OFFER ) दोन प्रकारे करता येतो. बुक-बिल्डिंग पद्धत आणि FIXED PRICE इशू. बुक –बिल्डिंग पद्धतीमध्ये इशू चालू असतो त्या मुदतीत शेअर्ससाठी निरनिराळ्या किमतीला बीड येतात. इशूची मुदत संपल्यावर सर्व बीड्स एकत्र करून शेअर्सची किमत शोधून काढण्याची प्रक्रिया म्हणजेच CUTOFF price शोधणे. इशूमध्ये ऑफर केलेले सर्व शेअर्स जी किमत ठरवल्यास विकले जातील ती CUTOFF PRICE होय.
समजा जर एखाद्या बुक बिल्डिंग इशुमध्ये १०००००० शेअर्स Rs.५० ते Rs ६० या price band मध्ये ऑफर केलेले आहेत. बीड्स खालीलप्रमाणे आलेल्या आहेत.
(१)Rs६०ला ५००००० शेअर्स
(२)Rs५८ला ३००००० शेअर्स
(३)Rs५६ला १००००० शेअर्स
(४)Rs५५ला 10000 शेअर्स
(५)Rs५४ला ५५००० शेअर्स
(६)Rs५३ला ३५००० शेअर्स
या उदाहरणांत cut off price Rs ५3 होईल. Rs ५3 च्या पेक्षा ज्यांनी जास्त किमतीला बीड केली होती त्यांनाही Rs ५3 या किमतीला शेअर्स मिळतील. राहिलेली रकम त्याना परत केली जाईल. Rs ५3च्या पेक्षा कमी बीड्स असतील त्यांना काहीही शेअर्स मिळणार नाहीत. फिक्स्ड price इशू मध्ये मात्र शेअर्स एका निश्चित price ला इशू केले जातात.
- रकाना ५ मध्ये आपण retail investorच्या columnमध्ये tik करावी. QIB (QUALIFIED INSTITUTIONAL BUYERS ) उदा: म्युचुअल फंड्स, बँक्स, विमा कंपन्या इत्यादी इत्यादी. NON-INSTITUTIONAL यामध्ये retail आणि QIB सोडून बाकीचे सर्व investor समाविष्ट होतात.
- रकाना नम्बर ६ मध्ये investor status द्यायचा आहे. यांत आपण ‘individual वर tik मारावी. बाकी सर्व संज्ञा समजण्यासारख्या आहेत.
- रकाना नंबर ७(A) मध्ये आपण ज्या चेकने किंवा डिमांड ड्राफ्टने पेमेंट करणार आहांत त्याची खालीलप्रमाणे माहिती विचारली आहे. रक्कम अंकामध्ये आणि अक्षरामध्ये,. चेक किंवा डिमांड ड्राफ्टचा नंबर, चेक किंवा डिमांड ड्राफ्ट ज्या बँकेवर काढला आहे त्या बँकेचे नाव व बँकेच्या शाखेचे नाव. ही माहिती तुम्ही सहजगत्या भरू शकाल.चेक किंवा डिमांड ड्राफ्ट कोणाच्या नावाने काढावयाचा ते शेअर अर्जांत लिहिलेले असते. त्याप्रमाणे आपण चेक किंवा ड्राफ्ट काढावा.
- रकाना ७(ब) मध्ये आपल्या ASBA अकौंटची माहिती विचारली आहे. आपला बँक अकौंट नंबर. आपण हा नंबर नेहेमी पूर्ण द्या. तसेच आपला अकौंट ज्या बँकेत आहे त्या बँकेचे नाव व त्या बँकेच्या शाखेचे नाव.द्यावे
- रकाना ८(A) मध्ये आपल्याला ‘DEMAT’ अकौंट मध्ये ज्याप्रकारे सही केली आहे त्याप्रमाणे सही करायची आहे.’DEMAT’ अकौंट जरी संयुक्त नावावर असला तरी फॉर्मवर ज्याचे ‘DEMAT’ अकौंटमध्ये पहिले नाव असेल त्याने सही करायची आहे.
- रकाना ८(B) मध्ये आपल्या ASBA अकौंटमध्ये असतील त्याप्रमाणे सही किंवा सह्या करायच्या आहेत. जर बँक अकौंट संयुक्त नावावर असला आणि दोन किंवा अधिक सह्या जरुरी असतील तर त्याप्रमाणे बँकेच्या रेकॉर्डप्रमाणे सह्या कराव्यात.
- यानंतर तुम्हाला tear here असे लिहिलेले दिसेल त्या रकान्यामध्ये पुन्हा एकदा वर दिलेली माहितीच लिहायची आहे. एक भाग registered ब्रोकर कडे राहतो. आणि दुसरा भाग आपल्याला पावती म्हणून मिळतो. फॉर्म पूर्णपणे भरल्यानंतर त्या फॉर्मची z’rox कॉपी काढून तुमच्याजवळ ठेवा. शेअर्सचे बारसे होऊन त्या शेअर्सची नोंद ‘demat’ अकौंटला होऊन उरलेली रक्कम परत मिळेपर्यंत काही समस्या आल्यास या कॉपीचा उपयोग होतो.
बँक रेकार्ड आणि ‘DMAT’ अकौंटमधील रेकॉर्ड व PANCARDवरची माहिती व अर्जात दिलेली माहिती या मध्ये फरक असता कामा नये. अन्यथा तुम्हाला शेअर्स ALLOT केले जात नाहीत.शक्यतो खाडाखोड करू नका यदाकदाचित जर झाली तर प्रत्येक खाडाखोडीला आपल्या पूर्ण सहीची जरुरी आहे.
अशा प्रकारे IPO चा फॉर्म कसा भरायचा हे मी शिकू शकले, स्वावलंबी होऊ शकले, आणि तुम्हालाही शिकवू शकले.
ते महाभाग (ज्यांनी मला हे इपो फॉर्म भरायचं ज्ञान दिलं ते) निघाले आणि तेवढ्यांत मार्केट संपत आलेल्याची घंटा वाजली. धावत धावत एक माणूस आला व म्हणाला २ फॉर्म द्या. ‘GREY MARKET’मध्ये या IPO बद्दल खूप चर्चा सुरु आहे. सुरुवातीलाच Rs ४० प्रीमियम चालू आहे. या GREY MARKET ची रसभरीत चर्चा आपण पुढील भागात करु.
Pingback: भाग ४९ – एक मार्केट.. समांतर | Stock Market आणि मी
Pingback: भाग ५२ – ‘IPO’ ची साठा उत्तरांची कहाणी | Stock Market आणि मी
madam aata konta navin ipo yet ahet ka ? me mid-cap companies ya sell karyala kiti time thevo.
madam.
your blog is very nice.you have written everything in a simple way.is there any class for share trading in marathi language in pune.
मी ठाण्याला शेअरमार्केटविषयी प्रशिक्षण वर्ग घेते. आपण या विषयी मोबाईल नंबर ९६९९६१५५०७ किंवा फोन नंबर ०२२२५३३५८९७ यावर चौकशी करू शकता.
नमस्कार, वरील लेखात (भाग ४८– शेअरचं बाळंतपण अर्थात IPO – forms)
असे आहे की,
समजा जर एखाद्या बुक बिल्डिंग इशुमध्ये १०००००० शेअर्स Rs.५० ते Rs ६० या price band मध्ये ऑफर केलेले आहेत. बीड्स खालीलप्रमाणे आलेल्या आहेत.
(१)Rs६०ला ५००००० शेअर्स
(२)Rs५८ला ३००००० शेअर्स
(३)Rs५६ला १००००० शेअर्स
(४)Rs५५ला 10000 शेअर्स
(५)Rs५४ला ५५००० शेअर्स
(६)Rs५३ला ३५००० शेअर्स
माझा प्रश्न:
जर ६० रू., ५८ रु. ५६ रु. ला शेअर्स घ्यायला तयार असताना ५३ रु. जी सर्वात कमी किंमत आहे त्या किमतीला शेअर्स कसे काय मिळतील?.
क्रमांक १ , २ व ३ यांनाच शेअर्स नाही का मिळणार. शेअर्स सर्वात कमी किंमत (रू. ५३.) असेल त्याला मिळतील की जास्तीत जास्त किंमत (६० रू., ५८ रु. ५६रू.) आहे त्याला?
की सर्व शेअर्स ५३ रू. ने विकले तर सर्व १० लाख शेअर्स विकले जातील म्हणून ५३ रू. किंमत योग्य आहे.
किंमत लहान धरली जाते की मोठी?
आपण या प्रश्नाच निराकरण कराव हि विनंती.
सुहास