Monthly Archives: January 2015

भाग ५३ – No pain, no (listing) gain !!

मागील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा 
४७साव्या भागापासून आपण ‘IPOची कहाणी वाचत आहांत, समजून घेत आहांत. सध्या ‘IPO’ फारसे येत नाहीत. परंतु ‘IPO’ आणावा अशी परिस्थिती मात्र मार्केटमध्ये आहे.सरकार बऱ्याच सुधारणा करणार आहे असे ऐकिवांत आहे. सरकार ‘DIVESTMENT’ करण्याच्या तयारीत आहे त्यामुळे शेअरमार्केटमधील गुंतवणूक जास्तीतजास्त फायद्याची ठरेल. या विचारानेच हा सर्व खटाटोप चालू आहे.
आपण ‘IPO’चा फॉर्म भरायला शिकला असाल अशी आपली माझी समजूत. आपल्या भाषेत म्हणायचं तर लग्न ठरलं, साखरपुडा झाला, पत्रिका वाटून झाल्या आणि लग्नाची तारीख जवळ येऊ लागली!!’
IPO’ चे फॉर्म भरल्यानंतर लिस्टिंगपर्यंत शेअर मार्केट मध्ये लोकांची स्थिती म्हणजे परीक्षा झाल्यावर रिझल्टची वाट बघणाऱ्या मुलांसारखी होते. किती शेअर्स मिळतील, शेअर्सचा भाव फुटेल तेव्हां फायदा होईल कां ? आणि शेअर्सला मागणी कितपत ? अशा चर्चेला उधाण येते. जो तो आपापले अनुभव दुसऱ्याला सांगू लागतो.  हा ब्लोग लिहायला बसले आणि माझं मन त्याच सगळ्या आठवणीत हरवून गेलं आणि त्या काळातील घटनांचा चित्रपट माझ्या डोळ्यांसमोर साकार झाला. मला जणू प्रत्येक गोष्ट आताच घड्तीये असं वाटायला लागलं.
“काय MADAM तुम्ही ‘IPO’ भरलांत कां? किती फॉर्म भरलेत?… “भरला असेल तर एवढा कां ? भरला नसेल तर कां नाही भरलात?”… असा प्रश्नांचा भडीमार होत असे. नंतर कोणीतरी म्हणे “MADAM, रागाऊ नका हं! तुम्ही अभ्यास करून, टी व्ही वरची चर्चा ऐकून, वर्तमानपत्रातील लेख वाचून मिळालेली माहिती आणि ‘IPO ‘ ची किमत याचा संबंध लावून फायदा होणार असेल तरच फॉर्म भरतां. आमचं तसं नाही हो ! तुम्ही फॉर्म भरलात तर आम्ही भरतो. आम्हाला काही इतकं कळत नाही. MADAM नी फॉर्म  भरला नाही म्हणजे काहीतरी भानगड आहे, कंपनी चांगली नाही किंवा शेअर महाग आहे असा आपला आमचा विश्वास!!.” करणारे लोकं करतात पण तुम्ही करू नका. नाही तर ब्लोगचं सगळं पाणी पालथ्या घड्यावर पडलं असं वाटेल मला !!
मला आजही आठवतोय रेणुका शुगरचा फॉर्म भरलेला दिवस. कारण पण तसचं होतं , ऑफिसमधल्या फारच थोड्याजणांनी या ‘IPO’ मध्ये इंटरेस्ट दाखवला होता. कंपनीच्या फॉर्मवरील माहिती वाचून मला वाटलं की या शेअरमध्ये चांगले पैसे मिळतील. अर्थातच लिस्टिंग गेन्सच्या उद्देश्याने मी हा फॉर्म भरला नव्हता. आता जसं तुम्हाला ‘लिस्टिंग गेन म्हणजे काय’ असा प्रश्न पडला असेल तसा मलाही पडला होता. प्रश्नाला उत्तर असत फ़क़्त ते जरा समजून घ्यावं लागत
ऐका तर –
लिस्टिंग गेन्स म्हणजे शेअर्सच्या लिस्टिंगच्या वेळी होणारा फायदा हा शब्दशः अर्थ होय. समजा ‘IPO’ची किमत Rs१०० आहे तुम्हाला १०० शेअर्स मिळाले. शेअर्सचा भाव Rs.१२० फुटला तर Rs २००० चा फायदा शेअर्स विकल्यास होईल. हाच लिस्टिंग गेन. हे Rs२००० तुम्हाला १५ ते २० दिवसांत मिळतात. २०% फायदा साधारण महिन्याभरांत जरी झाला तरी वर्षाचा हिशोब घातल्यास तो २४०% होतो.म्हणजे दिवाळी बंपर लॉटरी नव्हे काय? पण लॉटरी नेहेमी लागत नाही.
रेणुका शुगरचे लिस्टिंग मात्र चांगलं झालं नाही. ऑफिसमधले सर्वजण चिडवू लागले कळत-नकळत टोमणे मारू लागले.
“madam तुम्ही म्हणत होतात शेअर्स चांगला आहे मग असे कसे झाले ! काही जणांनी allot झालेले शेअर्स घाबरून विकून टाकले. माझ्या घरी मला कोणीच काही बोलल नाही. त्यावेळी मुलांना  फारसे समजत नव्हतेच कारण मुलांचं शिक्षणच चालू होतं. आईचा चेहेरा पडलाय म्हणजे आईचे काहीतरी बिनसले आहे एवढेच त्यांना कळे. परंतु यजमानांनी मात्र माझी समजूत काढली.
ते म्हणाले “ अगं होतं असं कधीतरी! वाचताना, माहिती मिळवताना काही राहून गेले असेल, बघू या काय होते ते! प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी झाली पाहिजे असा अट्टाहास कां? एका ‘IPO’ने जग इकडचे तिकडे होत नाही.”
असेच दोन तीन महिने गेले ‘IPO ‘ मध्ये शेअर्स लागलेल्यांची विक्री मंदावली शेअर्सचा भाव स्थिरावला. हळू हळू थोड्या प्रमाणांत कां होईना वाढतही गेला. ज्यांनी शेअर्स विकून टाकले होते ते पुन्हा शेअर्स खरेदी करू लागले. आणि त्याच शेअरचा भाव काही काळानंतर Rs१६०० पर्यंत पोहोचला ज्या लोकांनी शालजोडीतले हाणून मला मूर्ख ठरवले होते तेच लोक म्हणू लागले “ मानलं बुवा तुम्हाला MADAM”
अशाच काही आठवणी काही चर्चा फॉर्म भरल्यापासून ALLOTMENT होईपर्यंत ब्रोकरच्या ऑफीसमध्ये सुरु असतात.मध्येच कोणीतरी वर्तमानपत्र घेवून ऑफिसमध्ये येतो व म्हणतो “आजच्या पेपरमध्ये मधल्या पानावर खालच्या बाजूला शेअर्सच्या ALLOTMENTचे टेबल आले आहे. Rs १ लाखाचा फॉर्म भरला असेल तर ३६ शेअर्स मिळणार आहेत. आणि कमीतकमी एक लॉट म्हणजे ६ शेअर्स मिळतील.” बघू बघू कुठे छापून आले आहे ते ! कोणता पेपर!  कोणता पेपर! शिळी बातमी सांगतोय तो! कालच टी व्ही वर ‘IPO’ कॉर्नर या कार्यक्रमांत ही बातमी सांगितली. तेव्हढ्यात अविनाश म्हणे “ सगळे जण थोडेच तुमच्यासारखे टी व्ही बघायला मोकळे असतात कां?
नंतर पेपरमधल्या बातमीचे कात्रण काढणे व हिशोब चालू झालाच समजा . “अमुक अमुक किमतीला लिस्टिंग झाले तर किती पैसे मिळतील. माणूस नेहेमी आशेवर किंवा स्वप्नांत जगात असतो हे खरे. कोणी ग्रे मार्केटचा भाव काय चालू आहे याचा अंदाज घेत. त्याचवेळी कोणी application फॉर्मची पावती दाखवत व त्याचा नंबर सांगत “ मला किती शेअर्स लागले हे सांगा ना असे विचारीत. शेअर्स लागले नसल्यास १५दिवसांचे व्याज फुकट गेले अशी बडबड करत बाहेर पडत. काहीजण ‘DEMAT’ अकौंटवर शेअर्स आले आहेत कां याची चौकशी करत.आणि उरलेल्या रकमेचा चेक कधी येणार किंवा थेट खात्यांत कधी जमा होणार याची वाट पहात.
मध्यंतरी मार्केटमध्ये कोणाला उत्साहच नव्हता. मार्केट कंटाळवाणे, निरस होते . ‘ IPO’ येत नव्हते आले तरी लिस्टिंग चांगले होत नसे. त्यामुळे ‘IPO’ ला प्रतिसाद नगण्य असे. परंतु आतां भारताच्या दृष्टीने काही चांगले बदल घडत आहेत. सरकार बदलले क्रूडचे भाव कमी झाले, चलनाचा विनिमय दर स्थिरावला. आणि जगातल्या इतर मार्केटमध्ये मंदीची चिन्हे दिसू लागल्यामुळे भारतीय बाजारपेठेकडे लोकांचे लक्ष जाऊ लागले. शेअरमार्केटचा फायदा किरकोळ गुंतवणूकदारांना व्हावा यासाठी ‘SEBI’ने ALLOTMENTच्या नियमांत बदल केले. पुढच्या भागात हे बदल आणि अजून बरंच काही बोलूया.. भेटूच लवकर

माझी वाहिनी – लेख ११ – दिवाळी विशेष

मागील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा  
(हा लेख पहिल्यांदा ‘माझी वाहिनी’ या मराठी मासिकात प्रकाशित झाला होता)
वाचकहो तुम्हाला नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळी तुम्हाला आनंदाची आणि सुखसमृद्धीची जावो.
गेले वर्षभर तुम्ही छोटी छोटी पावलं टाकत शेअरमार्केटमध्ये प्रवेश करीत आहात. शेअर मार्केटच्या नव्या विचाराला तुम्ही तुमच्या गुंतवणुकीमध्ये स्थान दिले असेल. शेअरमार्केटच्या विषयीचे गैरसमज दूर झाले असतील, फायदे तोटे समजले असतील. शेअरमार्केट हा शब्द ऐकताच घाबरणे, गोंधळणे, बीचकणे, बिथरणे थांबले असेल. काळ बदलला आहे हे पटले असेल.बऱ्याच गोष्टींची माहिती आपल्याला मिळाली असेल.
मी तुम्हाला फेब्रुवारीच्या अंकातून ‘demat’ अकौंट कसा उघडावा हे सांगितले.एप्रिलच्या अंकातील माझा लेख वाचून तुम्ही तुमचे जुने शेअर्स ‘demat’ करून विकले असतील. मे महिन्याच्या अंकातील लेखामुळे तुमची ‘power of attorney’ बद्दलची भीती नाहीशी झाली असेल. जुन महिन्यातील लेख वाचून शेअरमार्केट हा एक ‘career option’ होऊ शकतो असे तुम्हाला जाणवले असेल. श्रद्धा,अंधश्रद्धेच्या महाभारतांत गुंतून गुंतवणूक करू नये हे तुम्हाला जुलैच्या अंकातील लेखामुळे पटले असेल. चवीचवीने शेअरमार्केटचा आस्वाद तुम्ही ऑगस्टचा लेख वाचून घेतला असेल. Septemberच्या अंकातून तुम्ही शेअरमार्केटचा प्रवास केला असेल. आशा आहे कि जेष्ठ नागरिकसुद्धा शेअरमार्केटमध्ये यशस्वीपणे गुंतवणूक करू शकतांत हे ऑक्टोबरच्या लेखातून तुम्हाला जाणवलं असेल.
राहून राहून मला असं वाटतय कि अख्ख रामायण वाचलं तरी रामाची सीता कोण हा प्रश्न अनुत्तरीत राहिलाय. याबद्दलचा किस्सा तुम्हाला सांगायलाच हवा. तुम्हालाही पटेल. ऐका तर!
दोन महिन्यापूर्वी माझ्याकडे हार्मोनियम शिकायला एक मुलगी क्लासला येऊ लागली होती. ती बर्याचदा  क्लासची वेळ मागत असे. माझं उत्तर ठरलेलं – अगं! मी नोकरीसारखाच शेअरमार्केटचा व्यवहार करते. त्यामुळे सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मी क्लास घेवू शकत नाही. कुणी चौकशी करायला आले तरी मी हेच सांगत असे.सात आठ दिवसांपूर्वी तिने मला विचारले
‘MADAM तुम्ही शेअर मार्केट म्हणता पण ते काय ते मला समजत नाही. शेअर म्हणजे काय? तो कुठे मिळतो ? हे मार्केट कुठे भरते ? हे मार्केट मला दाखवायला घेवून जाल कां?’
त्या दिवशी मला जाणवलं कि अख्ख रामायण वाचलं तरी रामाची सीता कोण हा प्रश्न अनुत्तरीत राहिलाय.. मी लेख लिहायला सुरुवात केली तेव्हा माझी समजूत होती की ह्या गोष्टी सगळ्यांना माहित असतील. परंतु हा माझा गैरसमज होता किंवा आहे हे मला आतां पुरत कळून चुकलय .
शेअर हा शब्द इंग्रजी असला तरी सर्वांच्या परिचयाचा आहे शेअर म्हणजेच वाटा, हिस्सा, भाग किंवा समभाग. आपण हल्ली शेअररिक्षा करतो, शेअर TAXI करतो. FLAT घेतल्यानंतर सोसायटी स्थापन होते तेव्हा सोसायटीच्या सभासदांना शेअर CERTIFICATE मिळते. आपण आपल्या रोजच्या आयुष्यांतसुद्धा आपली सुख दुःखे इतर माणसांबरोबर शेअर करतो. याच पद्धतीने जर एखादा व्यवसाय उभा करायचा असेल तर त्यासाठी भरपूर भांडवल लागते. हे भांडवल कोणी एक व्यक्ती, संस्था, बँक, पुरवू शकत नाही. त्यावेळेला कंपनी आपल्या भांडवलाचे छोटे छोटे भाग करते. यालाच शेअर असे म्हणतात. हेच शेअर ती कंपनी ‘IPO’ (INITIAL PUBLIC OFFER) आणून लोकांना विकते.या शेअरची दर्शनी किंमत, रु१,रु२ रु५ रु१० रु१०० असते. या “IPO’ ची जाहिरात वर्तमानपत्रांत आकाशवाणी तसेच दूरदर्शनवर केली जाते. हे फॉर्म सार्वजनिक ठिकाणी ठेवलेले असतात. हे फॉर्म मोफत मिळतात. फार्म भरून देण्यासाठी २-३ दिवस मुदत असते. या मुदतीच्या आधी PRICE-BAND  जाहीर होतो. (उदा. ४० ते ४५ रुपये ). मुदत संपल्यानंतर ‘IPO’ ला मिळालेल्या प्रतिसादानुसार कंपनी शेअर्सची किमत ठरवते. परंतु ही किमत त्या ‘PRICE-BAND’ वरचं  आधारितच असते. काही वेळा‘PRICE-BAND’ नसतो शेअरची किंमत निश्चित असते तेव्हा त्याला ‘FIXED-PRICE ISSUE’ असे म्हणतात. कुठल्याही गोष्टीसाठी भरावा लागतो तसा IPO साठी सुद्धा एक फॉर्म भरावा लागतो
शेअर्स अर्जामध्ये नमूद केलेल्या लॉटप्रमाणेच शेअर्ससाठी अर्ज करावा लागतो. रिटेल गुंतवणूकदार जास्तीतजास्त रु.२००००० पर्यंत शेअर्ससाठी अर्ज करू शकतात. कंपनीने कोणतीही PRICE जाहीर केली तरी आपल्याला शेअर्स मिळण्याची संधी जाऊ नये म्हणून फॉर्मच्या PRICEच्या रकान्यामध्ये ‘CUTOFF’ असे लिहावे. फार्मवर कोठेही खाडाखोड झाली असल्यास तेथे आपली सही करावी.फार्मवर केलेली सही ‘demat’ मधील सहीप्रमाणेच असली पाहिजे.
असा पूर्ण भरलेला फॉर्म, चेक किंवा DD  ‘PAN’ कार्डची कॉपी ठराविक मुदतीत व अर्जांत नमूद केलेल्या ठिकाणी देवून त्याची पावती घ्यावी. भरलेल्या फॉर्मची ‘‍ZEROX’प्रत तुमच्याजवळ ठेवावी.
अर्जांत नमूद केलेली फॉर्म भरण्याची मुदत संपल्यानंतर इशु कितीपटीने विकला गेला यावर कंपनी शेअरची किंमत व कोणाला किती शेअर द्यायचे हे प्रमाण ठरविते. (उदा. ५०० शेअर्ससाठीच्या अर्जाला ४० शेअर्स किंवा ५०० शेअर्ससाठीच्या  ४० पैकी एक अर्जदाराला ४० शेअर्स याप्रमाणे). या दरम्यान तुम्ही दिलेला चेक पास झाला आहे की नाही ते पहा. शेअर-वाटपाचे काम पूर्ण झाल्यावर कंपनी शेअरवाटपाची पद्धत व प्रमाण वर्तमानपत्रातून जाहीर करते. आपल्याला शेअर्स मिळाले असल्यास आपल्या  ‘demat’ अकौंट मध्ये जमा होतात. तुम्ही ‘demat’ अकौंटमध्ये बघून उरलेली रकम तुमच्या बचत खात्यांत जमा केली आहे की नाही ते पहा. याप्रमाणे तुम्हाला शेअर्स किंवा उरलेली रक्कम जमा झाली नसेल तर तुम्ही अर्जांत दिलेल्या व्यक्तीशी/संस्थेशी संपर्क साधा.
हे सगळं झालं कि मग शेअर्सच्या लिस्टिंगची तारीख जाहीर केली जाते.मोठ्या थाटामाटात गाजावाजा करत त्या कंपनीच्या शेअरचे आगमन ठरलेल्या STOCKEXCHANGEवर होते आणि त्या दिवसापासून तुम्हाला ते शेअर्स ट्रेडिंग अकौंट नंबर सांगून शेअरब्रोकरतर्फे विकता किंवा खरेदी करता येतात. शेअरचे लिस्टिंग झाल्यानंतर मात्र मागणी व पुरवठा या तत्वानुसार शेअरची किमत बदलत राहते. ही शेअरची मार्केट ‘PRICE’ !!. एक असते ती दर्शनी किमत, दुसरी असते ती ऑफर PRICE व तिसरी असते ती मार्केट PRICE होय. शेअर्ससाठी IPO किंवा FPO मध्ये अर्ज करून जेव्हा शेअर्स मिळतात हा व्यवहार ‘PRIMARY MARKET’ मध्ये होतो. शेअर्सचे लिस्टिंग झाल्यानंतर होणाऱ्या शेअर्समधील व्यवहाराला ‘SECONDARY’ मार्केट असे म्हणतात. हेच आपल्या बोलीभाषेतील शेअरमार्केट होय.
IPO चा फार्म भरताना कंपनीचे संस्थापक/ चालक, त्यांचा त्या क्षेत्रातील अनुभव, कंपनी ज्या उद्योगांत पाउल टाकत आहे त्यांत असणाऱ्या भविष्यातील संधी व धोके, स्पर्धक, ‘IPO’ शिवाय लागणाऱ्या भांडवलाची तरतूद, कंपनी उत्पादन करणार असलेली वस्तू किंवा ‘सेवा’ , कंपनीच्या कार्यक्षेत्राची जागा इत्यादी बाबीचा विचार करा. ही सगळी माहिती अर्जांत किंवा ‘PROSPECTUS’ मध्ये आलेली असते. दूरदर्शन वाहिन्यांवर तसेच वर्तमानपत्रातून येणारया माहितीकडेही लक्ष द्या पण शेवटी ‘ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे’ हेच लक्षांत ठेवा.
आपल्या देशाच्या ढासळत चाललेल्या अर्थव्यवस्थेमुळे गेल्या दोन वर्षांत ‘ PRIMARY MARKET’ जवळ जवळ बंद असल्यासारखे होते. परंतु आता देशाची अर्थव्यवस्था सुधारू लागल्यामुळे नव्या तसेच जुन्या कंपन्या ‘ IPO’ किंवा ‘FPO’ आणण्याची शक्यता आहे. कारण कंपनीसाठी शेअर्स हा सगळ्यांत स्वस्त आणि सोयीस्कर असा भांडवलाचा स्त्रोत आहे.
हे शेअरमार्केट म्हणजे एक महासागर आहे. काळाबरोबर सतत बदलत असते .ते प्रवाही आहे. समुद्राच्या लाटांप्रमाणे जोरांत उसळी मारून वर येते. तर कधी रुसून ओहोटी प्रमाणे खाली जाते. त्यामुळे उत्सुकता टिकून रहाते. शेवटच्या मिनिटापर्यंत मार्केटमध्ये काय घडेल याचा अंदाज कोणीही वर्तवू शकत नाही. त्यामुळे नेहेमीच मजा येते.
मार्केट्ची स्वतःची अशी एक बोलीभाषा आहे. त्या भाषेचा, त्या शब्दांचा परिचय झाला पाहिजे. मी मार्केटमध्ये जेव्हा व्यवहार सुरु केले तेव्हा मला अनेक शब्द कळत नसत. दूरदर्शन वाहिन्यांवरून जे सांगितले जात असे ते सर्व माझ्या डोक्यावरून जाई. कधी कधी मला खूप कंटाळा येत असे.कधी कधी डोक्याला खूप त्रास होत असे. कधी कधी वाटे नको हा शेअरमार्केटचा व्यवहार! माझ्यासारखी आपली अवस्था होऊ नये म्हणून शेअरमार्केट मध्ये जे जे शब्द वापरले जातात त्या शब्दांची ओळख व त्यांचा अर्थ, त्यातील बारकावे व व्यवसाय करताना नफा वाढविण्याच्या दृष्टीने त्याचा कसा उपयोग करून घेता येईल हे मी तुम्हाला सांगणार आहे.
तुम्ही सुद्धा न कंटाळता , न चिडता न रागावता हे सर्व समजावून घ्या. आपण कोणताही खेळ खेळू लागलो किंवा खेळ पाहू लागलो तरी खेळाचे नियम समजावून घेतोच ना?अगदी क्रिकेटचा सामना बघणारी माणसे सुद्धा एखाद्या खेळाडूला खोटे बाद दिले की तो खरच बाद होता याची चर्चा तिखटमीठ लावून करताना आढळतात. आपण तर क्रिकेटचा सामना करमणूक म्हणून पाहतो, करमणूक करताना स्वतःला वाहून घेवून त्यांत गुंतून जावून चर्चा करण्यांत मग्न होतो. तर मग ज्या व्यवसायातून पैसा मिळवायचा त्यातील खाचाखोचा समजावून घेणे शहाणपणाचे नव्हे काय? असा विचार करून मी प्रत्येक गोष्ट समजावून घ्यायला सुरुवात केली तुम्ही तशीच सुरुवात करावी असं मला वाटतं आहे.
प्रथम जगातील सर्व देशांच्या मार्केट्ची नावे जाणून घ्या. (उदा. जर्मनीचे मार्केट ‘DAXS’, युनायटेड किंग्डमचे ‘FTSE’, फ्रान्सचे मार्केट ‘CACS’, हान्कोंगचे ‘HANGSENG’, दक्षिण कोरियाचे ‘KOSPI’ ,सिंगापूरचे ‘SGX’ आणि युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिकाचे ‘NASDAQ’ व ‘DOWJONES’ इत्यादी.) हल्ली जग जवळ आल्यामुळे या मार्केटमधील हालचालींचा परिणाम भारतातील शेअरमार्केटवरही होत असतो विनिमयदराकडेही लक्ष द्यावे लागते. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची किंमत वधारली की ढासळली हे पाहावे लागते, कारण बऱ्याच उद्योगधंद्यांना त्यांच्या मालाची आयात निर्यात करावी लागते. त्यानुसार त्यांच्या फायद्यातोट्यावर परिणाम होतो. अर्थातच शेअरच्या किंमतीवरही परिणाम होतो.
काही वस्तूंचे निर्देशांकही पहावे लागतात. या निर्देशांकानुसार मालाच्या किंमती ठरतात. ‘LME’ ( LONDON METAL EXCHANGE) वरून धातूंच्या भावांत होणारे बदल समजतात. ‘COMEX’ वरून सोने व चांदीच्या भावातील बदल समजतात. ‘BALTIC DRY INDEX’ वरून शिपिंगच्या फ्रेटरेटच्या दरांत होणारे बदल समजतात. ‘BRENT CRUDE’ व ‘NIMAX CRUDE’ यावरून क्रूडच्या दरामध्ये झालेले बदल समजतात. भारतात क्रुडचे दर ब्रेंट क्रुडच्या दराप्रमाणे ठरतात. भारताची अर्थव्यवस्थाच क्रुडच्या दरानुसार ढासळते किंवा सुधारते. यासर्व माहितीवरून त्या ठरावीक दिवशी शेअर्सचे दर कसे बदलतील याचा अंदाज येतो. त्यानुसार तुम्हाला धोरण ठरविता येते.
वरील सर्व गोष्टी मला निरीक्षणातून समजल्या. परंतु माझ्याजवळ अनुभव नव्हता. म्हणून मी ऑफिसमध्ये जावून बसायला सुरुवात केली. शब्दांचे अर्थ शब्दकोशांतून पाहिले तरी ते मार्केटशी जुळणारे नव्हते. त्यावरून काहीच अर्थबोध होत नव्हता. मी ऑफिसमधील काकांना विचारले “मी हा शेअर घेवू कां?’ तेव्हा ते म्हणाले “ अहो , या शेअरमध्ये ‘VOLUME’ नसते. त्यामुळे लिक्विडीटीही नसते. तुम्ही हे शेअर घेवून अडकाल. हा शेअर लवकर विकला जाणार नाही.” त्यांनी समजावले पण माझ्या डोक्यांत काही शिरले नाही. माझी ट्यूब पेटली नाही. अहो मेडीकलच्या दुकानांत गेलो की दुकानदार विचारतो की नाही “ तुम्हाला या गोळ्या हव्यात की लिक्विड हवे म्हणजेच द्रवस्वरुपांत हवे ? असा लिक्विड या शब्दाचा अर्थ शेअरमार्केटमध्ये लागू होत नव्हता. जो शेअर चटकन खरेदी किंवा विकता येतो त्या शेअरलाच लिक्विडीटी आहे असे समजले जाते. लीक्विडीटी  नसेल तर खरेदी-विक्रीच्या भावांतही खूप फरक असतो. त्यामुळे ऑर्डर किती किंमतीला लावायची याचा अंदाज येत नाही.  तुम्ही शेअर विकायला उभे असाल तरी शेअर खरेदी करणारा कोणी असला पाहिजे नं? मार्केट बंद होण्याची वेळ येते तरी सौदा होत नाही. शेअर विकले जात नाहीत. म्हणजेच समजायचे की त्या शेअर्सला लिक्विडीटी नाही.
आतां माझ्या समोर प्रश्न उभा राहिला ‘VOLUME ‘चा. अहो कधी कधी भरपूर पावसामुळे, संपामुळे धंदाच होत नाही गिऱ्हाईकच येत नाही. माल तसाच राहतो. असे भाजीवालीने सांगितलेले तुम्ही ऐकले असेल. हॉटेलांत जर गिऱ्हाईक दिसले नाही तर या हॉटेलातील पदार्थ चांगले नसतील किंवा या हॉटेलातील सर्विस चांगली नसेल अशी शंका येते. त्याचप्रमाणे शेअर्स मध्ये फारसे सौदे होत नसतील तर शेअरच्या किंमतीत बदल होत नाही. त्यामुळे खरेदी-विक्री करणे कठीण जाते. प्रत्येक शेअरमध्ये किती सौदे होतात म्हणजेच किती ‘VOLUME‘ असते यावरून त्या शेअरमध्ये लोकांचा असणारा इंटरेस्ट समजतो.   ‘VOLUME’ ची दहा दिवसांची सरासरी काढतात अचानक एखादे दिवशी या सरा/सरीपेक्षा खूपच जास्त किंवा कमी ‘VOLUME’ झाल्यास त्या शेअरच्या संदर्भांत एखादी चांगली किंवा वाईट घटना नजीकच्या काळांत घडणार आहे हे समजते.
माझ्या ऑफिसमधल्या अजून एका गुरूने मला एक कानमंत्र दिला –
‘OVERSOLD ZONE’मध्ये असणारा शेअर खरेदी करावा व ‘OVER BOUGHT ZONE’ मध्ये असलेला शेअर तुमच्या जवळ असेल तर तो  विकून टाकावा पण खरेदी मात्र करू नये.’
मी तत्परतेने त्यांना विचारले
‘शेअर  ‘OVER SOLD’ आणि ‘OVER BOUGHT’ झोनमध्ये आहे हे कसे ओळखावे?’
तेव्हां ते म्हणाले “हे टेक्निकल्सवरून समजते. अहो पण मला टेक्निकल्स येत नाहीत. पण मलाही तुम्हाला काही सांगता येत नाही हो ! SORRY’ असे म्हणून ते निघून गेले.
तेव्हां मी या शब्दांचा अर्थ माझ्या पद्धतीने लावला. अहो एखादा शेअर चांगला आहे म्हणून लोक खरेदी करतात त्यामुळे त्या शेअरमध्ये ‘VOLUME’ वाढते. शेअरचा भाव वाढत राहतो. आपण जर हा शेअर विकून टाकला तर पुन्हा कमी भावाला आपल्याला हा शेअर मिळणार नाही असे त्यांना वाटते. त्यामुळे मागणी आणि पुरवठा यांत तफावत निर्माण होते.सर्वांना या शेअरमधील गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर वाटू लागते.पण एक वेळ अशी येते की तो शेअर अव्वा की सव्वा महाग होतो . याभावाला आपण शेअर विकत घेतला तर याच्यापुढे भाव वाढून आपल्याला फायदा होईल कां ? अशी शंका येऊ लागते. अशा वेळी त्या शेअरमधील खरेदी कमी होते. त्यामुळे त्या शेअरचा भाव वाढण्याचे प्रमाण घटते. काही काळ तो शेअर त्याच भावावर राहतो. आणि त्यानंतर मात्र त्या शेअरचा भाव कमी होत जातो . यालाच ‘OVER BOUGHT ZONE’ असे म्हणतात.
कोणत्याही घटनेची अतिशयोक्ती करणे हा लोकांचा स्थायीभाव असतो. स्वभाव असतो. एखाद्या कंपनीच्या बाबतीत काही वाईट बातमी आली की कोणताही  सारासार विचार न करतां घाबरून जाऊन लोक त्या कंपनीचे शेअर्स विकायला सुरुवात करतात. त्या वाईट बातमीचा कंपनीवर, कंपनीच्या फायद्यावर किती प्रमाणांत परिणाम होईल व त्यानुसार शेअरच्या किंमतीवर किती परिणाम झाला पाहिजे हे सर्वांना समजत नाही. त्यामुळे हा शेअर विकणाऱ्यांची संख्या जास्त व खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी अशी स्थिती होते. काही काळानंतर शेअर कचरयाच्या किंमतीत उपलब्ध होतो.तरीही घबराटीमूळे कोणीही शेअर खरेदी करण्यास तयार होत नाही.व तोटा सोसून त्या किमतीला कोणी शेअर विकायला तयार होत नाही. अशा वेळी बरेच दिवस तो शेअर त्या भावावर स्थिर राहतो. नंतर हळू हळू थोड्या थोड्या प्रमाणांत खरेदी चालू होते. काही दिवसांनी शेअरची किमत ढासळण्याचे प्रमाण कमी होते. त्याविरुद्ध शेअरची किमत धीम्या गतीने वाढू लागते. यालाच ‘ OVERSOLD ZONE’असे म्हणतात.अशावेळी थोडेसे शेअर्स विकत घेतल्यास फार थोड्या कालावधीत चांगला फायदा मिळू शकतो.
मी दुसर्या दिवशी पुन्हा ऑफिसमध्ये गेले. माझ्या बाजूला बसलेला एक माणूस ‘इंट्राडे’ ट्रेडिंग करीत होता. त्या दिवशी मार्केट अचानक पडू लागले. त्या माणसाने विकत घेतलेल्या चारी शेअर्सच्या किंमती कमी झाल्या. जास्त तोटा नको म्हणून त्याने शेअर्स विकले.तरी त्याला फटका बसलाच.तेव्हा माझ्या मनांत विचार आला अशाप्रकारचे नुकसान टाळण्यासाठी किंवा नुकसानीचे प्रमाण कमी करण्यासाठी काहीतरी उपाय असेलच की ? तेव्हां मला त्याच व्यक्तीने ‘STOPLOSS’ चा पर्याय सुचविला. ती व्यक्ती कळत-न-कळत माझा गुरु बनली.
त्यांनी मला जे सांगितलं ते मी आता तुमाला सांगते. सातच्या आत घरात हा जसा संस्कार आहे त्याच पद्धतीने शेअरमार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्या सगळ्यांनी ‘STOPLOSS’ ठेवण्याची सवय करून घेतली पाहिजे.शेअरमार्केटवर एकाचवेळी अनेक गोष्टिंचा  परिणाम होत असतो. त्यामुळे शेअर्सची किंमत सतत बदलत असते. तुम्ही ‘STOPLOSS’ लावला असेल तर आपोआप त्या भावाला त्या शेअरची विक्री किंवा खरेदी होते. तुम्ही किती नुकसान सहन करू शकता त्याप्रमाणे तुमचा ‘STOPLOSS’ ठरवा. काहीजण म्हणतात किंमतीच्या १%किंवा २% ‘STOPLOSS’ असावा. म्हणजेच रु.100चा शेअर खरेदी केला असेल तर रु.९८किंवा रु,९९ वर ‘STOPLOSS’ ठेवावा. शेअर ‘SHORT’ केले असतील म्हणजेच स्वतःजवळ शेअर्स नसताना विकले असतील तर रु.101 किंवा रु. १०२ एवढा ‘STOPLOSS’ लावावा.(इंट्राडे ट्रेडिंग मध्ये खरेदी आणि विक्री एकाच दिवशी करावी लागते). किती ‘STOPLOSS’ ठेवावा हे तुमच्या धोका पत्करण्याच्या कुवतीनुसार ठरते तसेच हे शेअरच्या किंमतीतील चढ-उतारावर अवलंबून असते. तुम्ही ‘STOPLOSS’ संगणकावर नमूद केला नसेल तर तुमच्या मनांत तसा निश्चय करा आणि ताबडतोब निर्णय घेवून पोझिशन क्लोज करा.  शेअरमार्केटमध्ये नवीनच व्यवहार करीत असाल तर ‘SHORT’ करण्याच्या भानगडीत पडू नका. इंट्राडेट्रेड सुद्धा BLUECHIP कंपन्यांच्या शेअरमध्ये किंवा,लार्जकॅप शेअरमध्ये करा. म्हणजे त्या शेअरचे पैसे देवून डिलिव्हरी घेवून काही दिवसानंतर योग्य भाव आल्यास विकता येतो.व तोट्याचे रुपांतर फायद्यांत करतां येते.
काही लोकांना शेअर्स वेळेवर विकण्याची सवय नसते. अजून भाव वाढेल अजून भाव वाढेल करत बसून राहतात.मार्केट अचानक पडू लागते होत असलेला  फायदा नाहीसा होतो. त्यामुळे ‘TRAILING STOPLOSS’ ठेवणे हिताचे असते. समजा तुम्ही रु. १००ला शेअर विकत घेतला. दोन महिन्यानंतर त्याचा भाव रु. ११० झाला. तुम्हाला वाटले अजून या शेअरचा भाव वाढू शकेल. १०% फायदा मिळत असूनही तुम्ही हा शेअर विकला नाही तर मग रु. १०८ वर ‘STOPLOSS’ लावा.शेअरचा भाव रु १२० झाला तर रु११८वर, रु १३० झाला तर रु १२८ वर अशा पद्धतीने STOPLOSSही वाढवत न्या. शेअर मार्केट पडू लागले तर कोणताही विचार न करता शेअर्स ताबडतोब विकून टाका व PROFIT  लॉक करा . हा STOPLOSS मात्र तुम्ही तुमच्या मनातच निश्चित करावा. तुम्हाला वेळ नसेल किंवा तुम्ही बाहेरगावी गेला असाल शेअरच्या हालचालींकडे लक्ष देवू शकत नसाल तर STOPLOSSचा उपयोग होऊ शकतो. कोणावर अवलंबून राहावे लागत नाही (अशा ‘TRAILING STOPLOSS चा उपयोग मार्केट खूप वाढत असेल किंवा मोठ्या प्रमाणावर पडत असेल तर इंट्राडे  ट्रेडसाठीही उपयोगांत आणू शकता.)
अहो! शेअर्सलाही अनेक टोपणनावं पण असतात . शेअर्सचा उल्लेख ‘EQUITY’, किंवा ‘STOCK ‘ असाही करतात. त्यामुळे शेअरमार्केटला ‘EQUITY MARKET ‘किंवा ‘STOCKMARKET’ असेही म्हटल्यास बुचकळून जाण्याचे कारण नाही. दूरदर्शनच्या वाहिन्यांवरून शेअरमार्केट (live) ऐकत असताना ‘लार्जकॅप, मिडकॅप, SMALL कॅप’ हे शब्द वारंवार कानावर पडतात. या शब्दांचा अर्थ फारच वेगळा आहे. कॅप म्हणजे टोपी नव्हे किंवा कुणाला टोपी घालणे किंवा टोपी बदलणे असा अर्थ होत नाही. कॅप म्हणजे कॅपिटल. मार्केट कॅप म्हणजे शेअरचा बाजारभाव गुणिले शेअरची संख्या होय. यावरून तीन प्रकार पडतात.
ज्या कंपनीची मार्केट कॅप २००BILLION ते ३५०० BILLION एवढी असेल त्या कंपनीचे शेअर्स लार्जकॅप गटांत मोडतात. या कंपन्या मोठ्या व प्रस्थापित असतात. या कंपन्यांत होणाऱ्या व्यवहारांची माहिती सहजगत्या वर्तमानपत्रातून दूरदर्शन, तसेच इंटरनेटवरून मिळू शकते. त्यामुळे या कंपन्यात केलेली गुंतवणूक सुरक्षित व फायदेशीर असते. (उदा. TCS, ITC )
५०BILLION ते २००BILLION  मार्केट कॅप असेल तर या कंपन्यांचे शेअर्स मिडकॅप गटांत मोडतात. या कंपन्या मध्यम प्रतीच्या कंपन्या गणल्या जातात. या कंपन्यांच्या फायद्याचे प्रमाण नियमित व वर्षभर सारख्या प्रमाणांत नसते. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वेळेवर गुंतवणूक करून वेळेवर विकल्यासच चांगला फायदा मिळू शकतो. यातील काही कंपन्या मात्र त्याच्या चांगल्या व्यवहारांमुळे काही कालावधीत लार्जकॅप कंपन्या बनतात. अभ्यास करून अशा कंपन्या शोधून ३-५ वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होतो.(उदा. ग्लेनमार्क फार्मा, कोलगेट)
५०BILLION पेक्षा कमी मार्केटकॅप असणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स SMALLकॅप गटांत मोडतात.या कंपन्यांच्या शेअर्सची किमत कमी असल्यामुळे गुंतवणूक कमी करावी लागते. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास खूप काळजी घ्यावी लागते. अशा कंपन्या कठीण काळांत टिकाव धरू शकत नाहीत. गैरव्यवस्थापनाला बळी पडतात. या कंपन्या नुकत्याच चालू झालेल्या किंवा नविन प्रकारच्या उद्योगांत कार्यरत असतात.कमीत कमी भांडवल गुंतवून फार थोड्या  वेळांत जास्तीतजास्त फायदा या शेअर्समध्ये मिळू शकतो. या कंपन्यांच्या आहारी गेल्यास नुकसान होण्याची शक्यता असते.मार्केट तेजीत असताना पावसाळ्यातील भुईछत्र्याप्रमाणे या शेअर्सचे भाव वाढत असतात. त्यामुळे लोक या शेअर्सला बळी पडतात. या प्रकारच्या शेअर्समध्येही चांगले शेअर्स आहेत. परंतु तुम्ही अभ्यास करून त्यांचे TRACKरेकॉर्ड बघून गुंतवणूक केली पाहिजे.
या तीन प्रकारच्या शेअर्सचे निर्देशांक अनुक्रमे लार्जकॅप निर्देशांक, मिडकॅप निर्देशांक, तसेच SMALLकॅप निर्देशांक दूरदर्शनवर दाखविले जातात.
शेअरमार्केटमध्ये अनेक प्रकारच्या कंपन्या कार्यरत आहेत. त्यांचे सोयीनुसार वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वर्गीकरण केले आहे. काही सेक्टरच्या नावावरून आपल्याला अर्थबोध होतो. परंतु काही सेक्टरच्या नावावरून त्या कंपन्या कोणत्या उद्योगांत आहेत याचा अर्थबोध होत नाही.
उदा. FMCG सेक्टर म्हणजेच ‘FAST MOVING CONSUMER GOODS ’ म्हणजेच माणसांना रोजच्या आयुष्यामध्ये ज्या वस्तू लागतात त्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स. म्हणजेच साबण तेल इत्यादी. (ITC, GILLETE, गोदरेज कन्झुमर, टीटीके प्रेस्टीज, एशिअन पेंट्स, KRBL).
कॅपिटल गुड्स सेक्टर म्हणजेच कारखाना उभारण्यासाठी जी मशीनरी लागते ती उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स या सेक्टरमध्ये येतात.( भेल, लार्सन & टुब्रो, BEML, सिमेन्स)
IT सेक्टर म्हणजेच इंफार्मेशन टेक्नोलॉजीच्या क्षेत्रांत काम करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स या सेक्टरमध्ये येतात (उदा. TCS, HCLTECH, TECHMAHINDRA, CMC). शेअर्सचे वर्गीकरण केलेल्या प्रत्येक सेक्टरचा निर्देशांक दूरदर्शनवर दाखवला जातो.यावरून कोणत्या सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअर्सची किंमत वाढत आहे याचा अंदाज येतो
गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन व्हावे म्हणून शेअर्सचे वर्गीकरण वेगवेगळ्या गुपमध्ये केले आहे. हे वर्गीकरण मार्केटकॅप, volume, लिक्विडीटी, track रेकॉर्ड, कंपनीला होणारा फायदा, दिला जाणाराdividend, शेअरहोल्डिंग pattern व कंपनीची गुणवत्ता यानुसार केले जाते. ग्रूप ‘A ‘ मध्ये ‘लार्ज मार्केट कॅप असलेल्या, जास्तीतजास्त track केल्या जाणाऱ्या कंपन्यांचा समावेश असतो. ज्या कंपन्या लिस्टिंग अग्रीमेंटचे पालन करत नाहीत, गुंतवणूकदारांच्या तक्रारींचे निवारण करीत नाहीत ,आणि ज्यांनी स्वतःच्या शेअर्सची DEMATERILIAZATIONची व्यवस्था केलेली नसते अशा कंपन्या ‘Z’ग्रुपमध्ये टाकलेल्या आहेत. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे धोकादायक असते. या कंपन्यांवर ‘SEBI’ (SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA)ची कडी नजर असते. ‘T’ग्रुपमधील कंपन्यांचे शेअर्स म्हणजेच ‘SEBI’ दिलेला सावधानतेचा इशारा असतो. या शेअर्समध्ये ट्रेड-टू–ट्रेड व्यवहार होतो. या शेअर्समध्ये इंट्राडेव्यवहार करतां येत नाही.चांगले trackरेकॉर्ड परंतु लिक्विडीटी कमी असलेल्या कंपन्या बी-1 ग्रूपमध्ये येतात. त्यापेक्षाही लिक्विडीटी कमी असलेल्या कंपन्या B -२ ग्रूपमध्ये येतात. REGIONAL STOCK EXCHANGE वर लिस्ट झालेल्या कंपन्या ‘S ‘ ग्रूपमध्ये येतात.
DIVIDEND हा लोकांच्या आवडीचा आणि कळीचा विषय. कंपनीचा सर्व खर्च भागल्यानंतर उरलेल्या रकमेतील काही भाग शेअरहोल्डरला देते त्यालाच DIVIDENDकिंवा लाभांश असे म्हणतात. ज्या कंपन्या चांगला व नियमितपणे DIVIDEND देतात त्या कंपन्या ‘INVESTOR फ्रेंडली’ म्हणून ओळखल्या  जातात. कंपनी जर DIVIDEND देत असेल तर ती कंपनी फायद्यात चालू आहे प्रगतीपथावर आहे असे ओळखले जाते.DIVIDEND हा प्रती शेअर दिला जातो. TCS कंपनीच्या शेअरची किंमत रु. २४०० आहे परंतु तिची दर्शनी किंमत रु १ आहे. जर TCSकंपनीने प्रती शेअर रु ५ DIVIDENDदिला तर तो ५००%DIVIDEND  दिला असे म्हणले जाते.
काही कंपन्या खूपच प्रगतीपथावर असतील भरभराट होत असेल, भरपूर कॅश असेल तर अशा कंपन्या शेअरहोल्डरला बोनस शेअर्स देतात. या बोनसचे प्रमाण ठरवतात. त्याप्रमाणे १शेअर ज्याच्या जवळ असेल त्याला १ शेअर बोनस मिळतो. हेच प्रमाण जर २:१ असेल तर ज्याच्याजवळ २ शेअर असतील त्याला १ शेअर बोनस म्हणून मिळतो. परंतु बोनस झाल्यानंतर त्या शेअरची किंमत सुद्धा त्याच प्रमाणांत बदलते. समजा १:१ बोनस असेल व त्या शेअर्सची किंमत आतां रु ८०० आहे तर बोनस झाल्यावर ती किंमत रु ४०० होते. त्यामुळे तुमच्या जवळ असलेल्या शेअर्सची संख्या वाढते. लोकांना वाटते आपल्याजवळ १००शेअर्स आहेत त्याचे २०० शेअर्स होतील व ते आपण रु ८०० भावाने बोनस झाल्यावर विकू , खूप फायदा मिळवू. असे मात्र घडत नाही.  जर बोनस मिळाल्यामुळे तुम्हाला १.५ किंवा २.७५ असे अपूर्णांकात शेअर्स मिळाले तर अपुर्णांकांत असलेल्या शेअर एवढी(.५ किंवा .७५ ) रकम तुमच्या खात्यांत जमा होते.
कधी कधी कंपनी नवीन प्रोजेक्ट सुरु करते किंवा अस्तित्वात असलेल्या प्रोजेक्टची विस्तार-योजना हाती घेते. अशा वेळेला कंपनी आपल्या शेअर होल्डरना शेअर्स ऑफर करते त्याला ‘rightsissue’असे म्हणतात. या ‘rights’ ची किंमत शेअरच्या मार्केटमधील किंमतीपेक्षा खूप कमी असते. जर शेअरची किंमत रु. २७० असेल तर RIGHTS रु १६० ला दिला. तुम्हाला किती rights मिळतील याचे प्रमाण कंपनी ठरवते. rights तुम्हाला घ्यायचे असल्यास RIGHTS चा फार्म आणि त्यासाठी लागणाऱ्या रकमेचा चेक निर्देशित केलेल्या पत्त्यावर पाठवावा लागतो. तुम्ही जास्ती RIGHTS साठी अर्ज करू शकता परंतु ते RIGHTS मिळण्याची शास्वती नसते. RENUNCIATION असलेला फार्म भरून तुम्ही हे rights दुसऱ्या व्यक्तीच्या नावे करू शकता.
कधी कधी कंपनी शेअर्स स्प्लिट करते. शेअरचा भाव खूप वाढलेला असल्यामुळे ‘VOLUME’कमी होते. म्हणून रु १० दर्शनी किंमतीचा शेअर असेल तर त्याचे १:५ असे शेअर स्प्लिट करते. अशा प्रकारे शेअर्स स्प्लिट केल्यास शेअरची दर्शनी किंमत रु २ होते आणि मार्केटमध्ये किंमत रु १००० असेल तर स्प्लीट झाल्यानंतर त्याची मार्केटमधील किंमत रु २०० होते. १ शेअर असणाऱ्याला ५ शेअर मिळतात. शेअरची मार्केटमधील किंमत कमी झाल्यामुळे तो किरकोळ गुंतवणूकदारांच्या आटोक्यांत येतो. व किरकोळ गुंतवणूकदारही त्यांत गुंतवणूक करू शकतो. उदा . सध्या HAVELLS वAXIS बँक यांच्या शेअरचे स्प्लिट झाले आहेत.
कंपनी कधी कधी अनेक प्रकारच्या व्यवसायांत कार्यरत असते. तिचा मुख्य उद्योग (core business) आणि उर्वरीत उद्योग एकमेकांना पूरक नसतात. अशा वेळेला विश्लेषकांना त्या कंपनीचे मुल्यांकन कसे करावे ते समजत नाही. कंपनीला वाटते की आपल्या शेअर्सना योग्य भाव मिळत नाही. अशा वेळी कंपनी स्वतःच्या उद्योगाचे वेगवेगळ्या कंपन्यानमध्ये विभाजन करते. बहुतेक वेळा शेअरहोल्डरना त्या कंपन्यांचे शेअर मोफत दिले जातात. याचे प्रमाण कसे असावे हे कंपनी ठरवते. मुदतीनंतर त्या कंपन्यानचे शेअर्स तुमच्या ‘demat’ अकौंटमध्ये जमा होतात.त्या शेअर्सचे लिस्टिंग होते. त्या दिवशीपासून त्या नव्या शेअर्समध्ये खरेदी-विक्री चालू होते.आतां ही गोष्ट कंपनीच्या फायद्याची किंवा तोट्याची ही चर्चा दूरदर्शनच्या वाहिन्यांवरून तसेच वर्तमानपत्रातून होत असते.जर हे शेअर्स घेतल्यामुळे फायदा होईल असे वाटत असेल तर तुम्ही अशा शेअर्स मध्ये गुंतवणूक करा.
कधी कधी एकाच उद्योगसमुहाचे तीन-चार वेगवेगळे व्यवसाय वेगवेगळ्य कंपन्या करत असतात. कर-नियोजन, cost–cutting साठी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दोन किंवा अधिक कंपन्यांचे एकत्रीकरण केले जाते. प्रत्येक कंपनीच्या शेअरहोल्डरना नवीन कंपनीचे किंवा ज्या कंपनीत दुसर्या कंपन्या विलीन होणार असतील त्याचे किती शेअर मिळतील याचे प्रमाण ठरविले जाते ही योजना कोणत्या कंपनीला फायदेशीर आहे हे समजावून घेवून त्याप्रमाणे त्या त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा.
काही वेळेला एखादी कंपनी दुसर्या कंपनीला खरेदी करते. यालाच ‘ACQUISITION ’असे म्हणतात. यालाच ‘INORGANIC GROWTH’ असे म्हणतात.
कंपनीची विक्री व उत्पन्न वाढलं कि त्याला ‘TOP LINE GROWTH ‘असे म्हणतात.  शक्य असेल तर कंपनी आपली उत्पादन क्षमता वाढवते. उत्पादनासाठी येणारा खर्च कमी करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे होणारा नफा वाढतो यालाच ‘BOTTOM LINE GROWTH’ असे म्हणतात. अशा सतत प्रगतीपथावर असणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स काही वर्षांनी ‘MULTI-BAGGER’ होतात.उदा. TCS ,मारुती हे शेअर्स MULTI –BAGGER झाले.असे शेअर्स ‘CORE-PORTFOLIO’ मध्ये ठेवावेत आणि अशा शेअर्स मध्ये ट्रेडिंग न करतां गुंतवणूकच करीत जावी. या कंपन्या बोनस, राईट्स ,लाभांश,देण्याची शक्यता असते.
अजून एक शब्द म्हणजे ‘ATTRITION’. हल्ली आहे ती नोकरी सोडून अधिक चांगली नोकरी पत्करण्यास तरूण पिढी सदैव तयार असते. नवीन व चागल्या नोकरीच्या शोधांत असते. वरिष्ठ हुद्द्यावरचे लोकसुद्धा एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत जातात. यालाच ‘ATTRITION’ असे म्हणतात. हा मुद्दा IT कंपन्यांच्या संदर्भांत चर्चेस येतो उदा. INFOSYS या कंपनीला सध्या ‘ATTRITION’ चे ग्रहण लागले आहे. याचा परिणाम शेअर च्या किमतीवर होवू तुमचा फायदा-तोटा बघून त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घ्या.
हल्ली ‘LOAN–RESTRUCTURING’ हा शब्द वारंवार येतो ही गोष्ट मला फारच बुचकळ्यांत टाकते. कर्ज घेणारी व्यक्ती किंवा कंपनी कर्ज भरू शकत नसेल, थकबाकी खूपच वाढली असेल, जर कंपनीचे खाते ‘NPA’(NON PERFORMING ASSET)म्हणून वर्गीकृत करावे लागत असेल तर ती कंपनी कर्जाच्या मुदतीत, हप्त्याच्या रकमेत किंवा व्याजाच्या दरांत सवलत मिळावी अशी मागणी करते आणि अशी सवलत बँक मंजूर करते. त्यालाच ‘LOAN RESTRUCTURING’ असे म्हणतात.थोडक्यांत आजचे मरण उद्यावर ढकलले जाते. परंतु ‘LOAN RESTRUCTURING’ची योजना जाहीर झाल्यानंतर शेअरचा भाव कां वाढतो हे मला न उलगडलेले कोडे आहे. अशा शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास फसण्याची शक्यता असते.
आतां आपण ‘DELISTING’ चा विचार करु या. ऐच्छिक ‘DELISTING’ करताना कंपनी शेअरहोल्डरना मार्केटमधील किंमतीपेक्षा अधिक किंमत देवून त्यांच्याकडील शेअर्स खरेदी करते. त्यामुळे‘DELISTING’ जाहीर झाल्यावर कंपनीच्या शेअर्सचा भाव वाढू लागतो. भाव वाढल्यामुळे कंपनीला त्यापेक्षा जास्त भाव  शेअरहोल्डरना देऊ करावा लागतो. अशारीतीने DELIST होणाऱ्या कंपनीचे शेअर्स वेळेवर खरेदी केले आणि प्रत्यक्षांत ‘DELISTING’ होईपर्यंत शेअर विकले नाहीत तर आपला फायदा होऊ शकतो. ‘DELISTING’ जाहीर झाल्यानंतर कंपनी तुम्हाला एक ‘OFFER DOCUMENT’पाठविते, ते मुदतीत भरून तुम्ही दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे असते. ‘DELISTING’ ची कुणकुण लागल्यापासून प्रत्यक्षांत ‘DELISTING’ होण्यासाठी बराच कालावधी लागतो.’DELISTING’ मध्ये तुम्ही शेअर देण्याची तुमच्यावर सक्ती नसते. तुम्ही तुमच्याजवळ असलेले शेअर्स मार्केटमध्ये केव्हाही परंतु ‘DELISTING’ होण्याच्या आधी विकू शकता.
मी बऱ्याच शब्दांचा शेअरमार्केटमध्ये ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करण्याच्या दृष्टीकोनातून अर्थ समजावून सांगितला. आतां तुम्हाला नक्कीच पटले असेल की टीपा घेण्यापेक्षां थोडेसे शेअरमार्केट समजावून घेतले तर फायद्याचे प्रमाण वाढू शकते. तुम्ही शेअर का विकला किंवा तुम्ही शेअर खरेदी का केला हे तुम्हाला माहीत असले पाहिजे.
शॉपिंग हा गृहिणींचा आवडता विषय. पण शेअरचे शॉपिंग हे सुख, समाधान किंवा आनंद मिळवण्यासाठी करायचे नसून खरेदी केलेले शेअर्स चढ्या भावाला विकून फायदा मिळविण्याच्या दृष्टीने करा.
वहिनींनो आतां आपला निरोप घेण्याची वेळ आली आहे. माझी वहिनीच्या दर महिन्याच्या अंकातून आपण भेटत होतो. आतां ही आपली या अंकातून शेवटची भेट आहे. प्रत्येक गोष्टीचा शेवट ही नव्या गोष्टीची सुरुवात असते. त्यामुळे तुम्ही सुद्धा आता शेअरमार्केटचा व्यवसाय करायला सुरुवात करा. तुमच्याजवळ माझ्या ब्लोग ची लिंक – www.marketaanime.com आहेच आणि तुमच्या शंका जर ब्लोग वर फितल्या नाहीत तर माझा फोन नंबर आहेच. काही अडचण आल्यास फोन करा. पण तुम्ही जर शेअर मार्केटच्या व्यवसायांत यशस्वी झालांत तर मला तुमचा अनुभव कळवा. तुमच्या आनंदात सहभागी व्हायला मला नक्कीच आवडेल. शेअरमार्केटमध्ये तुम्हाला भरघोष यश मिळावे हीच माझी मनापासून शुभेच्छा
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

माझी वाहिनी – लेख १०

मागील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा  
(हा लेख पहिल्यांदा ‘माझी वाहिनी’ या मराठी मासिकात प्रकाशित झाला होता)
आज मला सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यासाठी जाण्याचा योग आला. त्या गृहस्थांना पणतू झाल्यामुळे सुवर्णफुले उधळण्याचाही कार्यक्रम होता.ते गृहस्थ ८० वर्षांचे, त्यांचा मुलगा ६० वर्षांचा, नातू ३२ वर्षांचा आणी पणतू ३ महिन्यांचा असे ते गोकुळ होते. दोन्ही कार्यक्रम खूप सुंदर चालू होते. आजोबा , पणजोबा दोघेही जेष्ठ नागरिक असल्याने पुष्कळ जेष्ठ नागरिक असणारी मित्रमंडळी समारंभाला हजार होती. माझा त्यातील बऱ्याचजणांशी परिचय होता. हल्ली मी आणी शेअरमार्केट हे एक समीकरणच बनले आहे. मला पाहिले आणी शेअरमार्केटचा विषय निघाला नाही असे क़्वचीतच घडते.
“ काय madam शेअर मार्केट तेजीत चालले आहे. आम्ही रोज पेपरमध्ये वाचतो. आम्हालाही शेअरमार्केटविषयी उत्सुकता आहे. वेळही आहे, पैसेही आहेत,परंतु शेअरमार्केटमधील ओ की ठो समजत नसल्यामुळे काही उपयोग नाही.
पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती असल्यामुळे बरेचशे खर्च वाटले जात असत. जबाबदारी कमी होत असे. परंतु हल्ली विभक्त कुटुंबपद्धतीमुळे खर्च वाढले आहेत. वाढत्या वयाबरोबर येणारे आजारपण व त्यासाठी लागणारे औषधपाणी यासाठी पैशाची तरतूद करावी लागते.दिवसेंदिवस कुटुंबातील मनुष्यबळही कमी होत आहे.
पूर्वी मुदतठेवींवर १०%पेक्षा जास्त परतावा मिळत असे. परंतु हल्ली महागाईचे प्रमाण वाढल्यामुळे प्रत्यक्षांत काही फायदा होत नाही.जर आपण १०००० रुपये ५ वर्षांसाठी गुंतविले आणी १०%व्याज दर गृहीत धरला तर ५ वर्षांनंतर १०००० रुपयांत व्याज मिळवूनसुद्धा आजच्याएवढी खरेदी करता येत नाही. म्हणजेच रिअल इन्कम नेगेटिव येते. तुम्हीच आम्हाला असा उपाय सुचवा ज्यायोगे आम्ही आमच्या वेळेचा , जवळ असलेल्या पैशाचा चांगला उपयोग करून उत्पन्नांत भर घालू शकू.”
मी सुद्धा जेष्ठ नागरिक असल्यामुळे मला त्यांचा दृष्टीकोनही समजला, समस्याही कळली अडचणही समजली. खरे पाहतां निवृतीनंतर काय करायचे याचा विचार ५०वर्षापासुनच करायला हवा. एकदम कोणत्याही गोष्टीची आवड निर्माण होत नाही किंवा कोणतीही गोष्ट एकदम जमत नाही.काही कालावधी लागतोच. माझ्या कुवतीप्रमाणे मी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करते. जेष्ठ नागरीकांना निर्माण होणारी मुख्य अडचण म्हणजे त्यांना कुठूनही कर्ज मिळत नाही.त्यामुळे अडीअडचणीसाठी काही पुंजी राखून ठेवणे जरुरीचे असते. पूर्वी जेष्ठ नागरीकांना कर भरावा लागत नसे. परंतु हल्ली जेष्ठांची करापासून सुटका होत नाही. वयोमानानुसार धक्के पचविण्याची किंवा धोका पत्करण्याची ताकत उरलेली नसते. त्यामुळे जेष्ठ नागरीकांनी शेअरमार्केटमध्ये जपूनच गुंतवणूक करावी. सगळ्या गरजा भागवून जर रक्कम उरत असेल तर तेवढीच रक्कम गुंतवावी.हल्ली सोन्यामधली गुंतवणूक सुरक्षित आहे असे छातीठोकपणे सांगता येत नाही. आपण खूप मोठे संकट आल्यानंतर दागिना मोडावयाला जातो त्याचवेळी कळते की ते सोने चांगले आहे की नाही. आपल्या गरजेप्रमाणे तुकड्याने तुकड्याने दागिना विकता येत नाही. त्याचप्रमाणे घराचा सौदाही तुकड्यातुकड्याने करता येत नाही. ताबडतोब सौदा होत नाही व ताबडतोब पैसे मिळत नाहीत. या सर्व गोष्टींचा विचार करतां शेअरमार्केटमध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर आहे खरी पण काही पत्थ्ये पाळावीच लागतात. जसे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण शिळेपाके खात नाही, उघडे पदार्थ/ instant फूड याचे सेवन टाळतो, वेळींअवेळी खात नाही, पचेल तेवढेच खातो, त्याच पद्धतीने कोणत्याही गुंतवणुकीचे आरोग्य सांभाळले पाहिजे तरच ती गुंतवणूक फायदेशीर ठरते. हे सर्व पुढील गोष्टींवर अवलंबून आहे.
(१)   तुमच्या आवश्यक गरजा भागून जर काही रकम उरत असेल तर तेव्हढीच रकम गुंतवा. कर्ज काढून किंवा उधार-उसनवार पैसे घेवून गुंतवणूक करू नका.
(२)कोणत्याही गुंतवणुकीच्या बाबतींत विश्वासार्हता, लवचिकता, आणी रोखता (रोख रकमेमध्ये परिवर्तन होण्याची शक्यता) आहे कां  हे पडताळून पहा.
(३)जेव्हां मार्केट खूप पडत असेल तेव्हां शेअर्स खरेदी करा. मार्केटचे पडणे थांबले कां हे आपल्याला कळत नाही, मार्केट जेव्हां ‘oversold zone ‘ मध्ये असते तेव्हां लोक खरेदी करतात पण पुन्हा मार्केट पडू लागते. त्यामुळे मार्केटचा अंदाज घेत घेत टप्प्या टप्प्याने गुंतवणूक करा
(४)‘largely held’ , ‘professionally managed ‘ आणी ‘corporate governance’ उत्कृष्ट असलेल्या कंपनीतच गुंतवणूक करावी.
(५) ठरवलेल्या रकमेची विभागणी वेगवेगळ्या सेक्टरमध्ये करा. उदा. auto, metal, finance, pharma , oil&gas, capital goods, I. T. FMCG
(६) प्रत्येक सेक्टरमधल्या प्रस्थापित कंपनीतच गुंतवणूक करा. म्हणजेच अनुक्रमे मारुती, महिंद्र &महिंद्र बजाज auto, टाटा स्टील, सेसा गोवा, IDFC, स्टेट बँक, GLENMARKpharma, LUPIN, ONGC RELIANCE, लार्सेन &टुब्रो, भेल, TCS आणी INFOSYS, ITC &COLGATE
(७) मार्केटमध्ये खरेदी किंवा विक्री करीत असताना धीराने काम करा. त्यामुळे शेअर कमी किमतीला विकत घेवून जास्तीत जास्त किमतीला विकता येतो. यासाठी मी तुम्हाला ‘TCS ‘चे उदाहरण देते. ‘TCS’ कंपनीचा ‘IPO ‘ २००४ मध्ये आला. त्याची किमत ८५० रुपये होती. किरकोळ गुंतवणूकदारांना ५%सूट मिळाली. २००६ व २००९ मध्ये १:१ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले. त्यामुळे ज्यांच्याजवळ एक शेअर होता त्यांच्याजवळ ४ शेअर्स झाले. सध्या या शेअरचा भाव २६०० रुपये आहे.या कंपनीने गुंतवणूकदारांना चांगला लाभांशही दिला. या कंपनीमध्ये केलेली गुंतवणूक १०पट झाली.म्हणजेच जे लोक धीराने थांबले चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली, गुंतवणूक योग्य वेळी केली आणि धरसोड वृत्ती ठेवली नाही त्यांनाकोणतीही मेहेनत न करता, डोक्याला त्रास न होता १०पट पैसा मिळाला.
(८) मार्केटमध्ये मोहाचे क्षण अनेक येतात. अशा मोहाच्या क्षणांना बळी पडू नये.अशा क्षणांना बळी पडल्यामुळे बऱ्याच ऋषी-मुनींचा तपोभंग झाला.याचे बरेच दाखले पुराणांत व इतिहासांत मिळतात. शेअरमार्केटमध्ये चुकीच्या निर्णयासाठी क्षमा नाही.
(९) लाभांशाचा विचार करून केलेली गुंतवणूक सुद्धा काही प्रमाणांत फलदायी ठरते. जर सरकारी कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक केलीत तर सुरक्षितता व लाभांश असे दोन्ही फायदे होतात. पण मिळणारा लाभांश हा प्रतीशेअर मिळतो. शेअरची खरेदी किंमत व त्याच्यावर मिळणारा लाभांश याचा तुलनात्मक अभ्यास करून शेअर्स खरेदी केल्यास मुदत ठेवीप्रमाणेच उत्पन्न मिळते.
(१०)आपण शेअर कधी खरेदी करतोय त्याकडे ध्यान द्या. कोणतीही घटना घडल्यानंतर शेअर खरेदी केल्यास निराशा पदरी येते. कारण बऱ्याच लोकांना ती बातमी आधीपासूनच माहिती असते त्यामुळे शेअरचा भाव आधीच वाढलेला असतो. उलट बातमी जाहीर झाल्यानंतर लोक शेअर्स विकायला सुरुवात करतात व शेअरचा भाव खाली येतो.
(११)जसे जेष्ठ नागरीकांनी संध्याकाळी म्हणजेच अंधारांत फिरायला जाणे टाळावे, सावधपणे रस्ता ओलांडावा,अनोळखी गल्लींत शिरु नये त्याचप्रमाणे शेअरमार्केटमध्येही धोका पत्करणेसुद्धा टाळा.
(१२)दूरदर्शनच्या अनेक वाहिन्यांवरून, वर्तमानपत्रातून अनेक सल्लागार वेगवेगळे सल्ले देत असतात. ते सल्ले आचरणांत आणताना दहा वेळां विचार करा. ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे पण नीट अभ्यास करून’ हा शिरस्ता ठेवा.
अशा प्रकारची सर्व काळजी घेतल्यास तुमच्या रिकाम्या वेळेतून व शिलकी पैशातून चांगले उत्पन्न मिळविता येयील आणि सुखी समृद्ध जीवन लक्ष्मीच्या कृपेने जगतां येयील.
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

माझी वाहिनी – लेख ९

(हा लेख पहिल्यांदा ‘माझी वाहिनी’ या मराठी मासिकात प्रकाशित झाला होता)
पर्यटन म्हणजेच प्रवास. या प्रवासाचे उद्देश मात्र वेगवेगळे असतात. कोणी व्यापारासाठी, कोणी शिक्षणासाठी, कोणी संशोधनासाठी, कोणी खेळाचे सामने बघण्यासाठी, आपली कला सादर करण्यासाठी, किंवा लोकजागृती करण्यासाठी, तीर्थक्षेत्रे पाहण्यासाठी, दुसऱ्या देशांची संस्कृती जाणून घेण्यासाठी, किंवा निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी, हवापालट व औषधोपचारासाठी पर्यटन करतात.
पूर्वी प्रवासाची साधने नव्हती. तेव्हां लोक पायी, घोड्यावरून, बोटीतून प्रवास करीत. त्यामुळे प्रवासाला खूप वेळ लागत असे. प्रवास तितकासा सुरक्षित नव्हता.प्रवासाला निघालेला माणूस सुरक्षित परतेल याची खात्री नव्हती. घरातील बाईमाणूस प्रवासाला निघाल्यास त्यांना कुणीतरी पोहोचविण्याची व घेवून येण्याची पद्धत होती.
पण हल्ली अशी स्थिती नाही. प्रवासाची साधने अनेक आहेत. माहितीचे भांडार खुले आहे. पर्यटन हा व्यवसाय म्हणून करणारे लोक जेवणखाण, औषधपाणी, मार्गदर्शक, आरक्षण अशा सर्व सुविधा  पुरवतात. अनेक प्रवासी सोबतीला असतात. त्यामुळे भीती वाटत नाही.आजकाल बारावी झालेली मुले परदेशातील कॉलेजमध्ये प्रवेश घेवून घरापासून दूर शिक्षणासाठी जातात. नोकरीला असलेल्या मुली कंपनीने परदेशांत काम करण्यासाठी पाठविले म्हणून एकट्याच परदेशी जाण्यास तयार होतात.आजकाल जेष्ठ नागरिकही सुखरूप प्रवास करू शकतात. वैवाहिक आयुष्याची सुरुवात सुद्धा हनीमूनला विदेशातल्या एखाद्या सुंदर ठिकाणी जाऊन करतात. परदेशातील कायदेकानू, तेथील धोके, शिष्टाचार, खाणेपिणे, वेगळे हवामान, त्या देशातल्या चलनाचे व्यवहार, त्या देशाची भाषा या सगळ्याशी तडजोड करीत प्रवासाचा आनंद घेतात.प्रवासांत काही अडचणी आल्या तरी त्याचा बाऊ न करतां त्यावर उपाय काढून पुन्हा प्रवास करतात.
म्हणजेच समाजाने प्रवासांत सुधारणा झाल्याबरोबर अडचणी दूर झाल्याबरोबर आतां प्रवास सुखकर होईल असे मानून प्रवास करण्यास सुरुवात केली. परंतु हीच गोष्ट शेअरमार्केटच्या बाबतीत घडत नाही असे दिसते. शेअरमार्केटमध्येही अनेक बदल झाले. पूर्वी शेअरमार्केटमधील व्यवहार पूर्ण होण्यासाठी तीन आठवडे लागत असत. शेअर सरटीफिकेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी फार मोठा प्रवास लागे. कारण ते कंपनीकडे पाठवावे लागत असे. हल्ली ही प्रक्रिया सोपी झाली आहे. चार दिवसांत व्यवहार पूर्ण होतो. पूर्वी दलालांकडून फसवणूक होत असे. या तक्रारीवर सरकारने उपाय योजले आहेत.व्यवहारांत पारदर्शकता, आली. व्यवहार सोपे झाले. घरांत बसून ऑनलाईन व्यवहार करता येवू लागले. उन्हातान्हांत जाण्याची जरुरी नाही त्यामुळे जेष्ठ नागरिकांच्या दृष्टीने हे वरदान ठरले. अगदी मरेपर्यंत कुणाचीही चाकरी न करतां पैसा मिळवता येवू लागला. मार्केटचे व्यवहार हिंदीमध्ये सांगणाऱ्या वाहिन्या दूरदर्शनवर चालू झाल्या.पण तरीही शेअरमार्केटकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलला नाही.
शेअरमार्केट स्वताहून तुम्हाला कधी खड्ड्यांत घालत नाही. तुम्ही डोळे उघडे ठेवून चालत नाही म्हणून खड्ड्यांत जातां. फायदा आणी तोटा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.तोटा होऊ लागला तर दुकान बंद न करता लोक धंदा बदली करतात. परंतु शेअरमार्केट पडू लागले की घाबरून जाऊन अकौंट बंद करतात.प्रवासासाठी इंटरनेटवरून माहिती घेणारे लोक, प्रवासाचे आरक्षण इंटरनेटवरूनच करणारे लोक कंपनीची किंवा शेअरमार्केटविषयीची माहिती मात्र इंटरनेटवरून घेवू शकत नाहीत हे मला कळत नाही आणि पटत तर त्याहून नाही. भारतांत प्रत्येक प्रांताची भाषा वेगळी आहे , परदेशांत तर वेगळीच भाषा असते, तरीही भाषेचा अडथळा दूर सारून लोक प्रवास करतात.पण हेच लोक शेअरमार्केट्ची भाषा समजत नाही अशी तक्रार करतात.
प्रवासातही अडचणी येतातच की !कधी विमान रनवे वर घसरतं, कधी बस दरीत कोसळते,कधी रेल्वेस्टेशनवर बॉम्बस्फोट होतो, कधी ट्रेनला आग लागते, कधी लुटालूट होते, कधी गाडी बंद पडते, पण म्हणून लोकांचा प्रवास थांबला आहे कां? गाड्या, विमाने, बस भरभरून जात आहेत. टूरिझम हा व्यवसाय वाढीला लागला आहे.गेल्या वर्षी उत्तराखंडमध्ये आलेल्या पुरांत अनेक लोकांचा बळी गेला, अनेकांचे हाल झाले तरीही यावर्षी मार्ग बदलून चारधाम यात्रा तेव्हढ्याच उत्साहांत सुरु आहे. त्याचप्रमाणे लोकांनी शेअरमार्केटचाही  विचार करावा. आजोबांना शेअरमार्केटमध्ये नुकसान झाले म्हणून नातवांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. परिस्थिती बदलत असते. सुधारणा होत असतात, नव्या संधी उपलब्ध होत असतात. आपण आपला दूषित दृष्टीकोन बदलायला हवा.शेअरमार्केट म्हणजे घरात बसून पैसे मिळवण्याचे फार सुंदर साधन उपलब्ध झाले आहे हे तुम्हाला समजून घेतलं पाहिजे.
आज तुम्ही माझ्याबरोबर कोणतीही तयारी न करता शेअरमार्केटमध्ये पर्यटनासाठी चला. नाही म्हणू नका. हा माझा आग्रह किंवा विनंती समजा. तुमच्या मैत्रीणींनाही घेवून या. चला निघूया तर मग .
शेअर मार्केटचे मंदीर म्हणजेच बी.एस.इ(Bombay stock exchange ) व एन.एस.इ. (national stock exchange ) च्या इमारती व तेथे होणारे आर्थिक व्यवहार. अगदी मंदिरांत वाजते तशीच घंटा वाजल्यानंतर शेअर मार्केट मधील व्यवहार सुरु होतात. मंदिरांत जसे पुजारी/ बडवे असतात, तसे येथे दलाल असतात. दलालांकडून फसगत होऊ नये म्हणून सरकारने बरेच उपाय योजले आहेत.
जसे आपण पर्यटनामध्ये वेगवेगळी स्थळे पाहतो, वेगवेगळ्या राज्यांत, देशांत जातो, तसेच शेअर मार्केटमध्ये अनेक सेक्टर आहेत. प्रत्येक सेक्टरमध्ये अनेक कंपन्या आहेत. काही सरकारी आहेत काही खाजगी आहेत, काही लहान आहेत काही मोठ्या आहेत. या कंपन्या म्हणजेच शेअरमार्केटमधील प्रेक्षणीय स्थळे होत.प्रत्येक सेक्टरमधल्या ठराविक शेअरकडे आपले लक्ष आपोआपच जाते. काही कंपन्या आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवहार करतात त्यावेळी परदेशात पर्यटन केल्यासारखे वाटते.ह्या कंपन्यातील गुंतवणूक फायदेशीर व सुरक्षित असते.
आता आपण प्रत्येक सेक्टरची सफर करून त्यातील कंपन्यांची म्हणजेच पर्यटनस्थळांची तोंडओळख करून घेवू.
गृहिणीना आणी अर्थव्यवस्थेला महत्वाचा सेक्टर म्हणजे OIL आणी GAS. यामध्ये सरकारी म्हणजेच O.N.G.C(OIL AND NATURAL GAS COMPANY), GAIL(GAS AUTHORITY OF INDIA ), OIL INDIA, आणी खाजगी कंपन्यांमध्ये RELIANCE INDIA LTD. आणी CAIRN INDIA  यांचा समावेश आहे.या कंपन्यांवर क्रूडतेलाचे दर, चलनविनिमयाचे दर बदलल्यास परिणाम होतो.या कंपन्यातील गुंतवणूक सुरक्षित समजली जाते व लाभांशही चांगला मिळतो.
अर्थव्यवस्थेचा कणा समजला जाणारा सेक्टर म्हणजेच BANKING आणी NON-BANKING FINANCIAL COMPANIES. काही बँका सार्वजनिक क्षेत्रातील तर काही खाजगी क्षेत्रातील आहेत. उदा. STATE BANK OF INDIA , BANK OF BARODA, या सार्वजनिक तर AXIS BANK, ICICI BANK, व HDFC या खाजगी क्षेत्रातील बँका आहेत.IDFC , LIC HOUSING, GIC HOUSING ही काही NBFCची उदाहरणे.रिझर्वबँकेच्या निर्णयांचा, उद्योगातील प्रगतीचा या सेक्टरवर परिणाम होतो.या सेक्टरमधील कंपन्यातील गुंतवणूकहि सुरक्षित आहे व लाभांशही चांगला मिळतो.
तिसरा सेक्टर म्हणजे I.T. ( INFORMATION TECHNOLOGY) . या सेक्टरमध्ये बहुतांश कंपन्या खाजगी क्षेत्रातील आहेत.उदा. इन्फोसिस, विप्रो, टी. सी.एस. या आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करीत असल्याने जगांत होणारया घडामोडींचा तसेच विनिमयदरातील बदलाचा परिणाम यांच्या कारभारावर होतो.
चौथा सेक्टर म्हणजे AUTO & AUTO ANCILLARY यातील उदा. बजाज ऑटो, महिंद्र &महिंद्र, टाटा मोटर्स, हिरो मोटो कॉर्प, EICHER मोटर, मारुती. तसेच ANCILLARYमध्ये अम्टेक ऑटो,  भारत फोर्ज, क्लच ऑटो, MRF, अपोलो TYRES, CEAT या TYRE कंपन्या. देशात होणाऱ्या प्रगतीवर या कंपन्यांची प्रगती अवलंबून असते.
अजून एक महत्वाचा म्हणजे टेलिकॉम सेक्टर : IDEA, BHARATI  AIRTEL , RELIANCE C COMMUNICATION, MTNL  या  कंपन्यांची प्रगती SUBSCRIBERS च्या संख्येवर अवलंबून असते
एक अजून सांगायचा तर फार्मा सेक्टर : ग्लेनमार्क फार्मा, लुपिन, रेड्डी’s , ऑरोबिंदो, सन फार्मा, अजंता फार्मा, सिपला, बायोकान रेमेडीस. यामधील काही कंपन्या परदेशांत बर्याच अंशी निर्यातीवर अवलंबून असतात. प्रत्येक देशातील कायदेकानूनचा या कंपन्यांच्या कारभारावर परिणाम होतो.
तसे अजून बरेच सेक्टर आहे, त्यापैकी काही मी पुढे दिलेत

 • टेक्सटाईल्स सेक्टर : रेमंड, अरविंद, वर्धमान, बॉम्बे डाईंग, आलोक इंडस्ट्री, केवळ कीरण क्लोदिंग, पेज इंडस्ट्री.
 • Healthcare सेक्टर :अपोलो हॉस्पिटल, wockhardt, इंद्रप्रस्थ मेडीकल, FORTIS HEALTHCARE, Cadila healthcare
 • सिमेंट : ACC , श्री सिमेंट , ULTRATECH सिमेंट , गुजरात अंबुजा, JK लक्ष्मी सिमेंट
 • हॉटेलस : हॉटेल लीला, इंडिअन हॉटेल , एशिअन हॉटेल्स, महिंद्र होलीडेज, ITDC
 • पेंट व वार्निशेस : एशिअन पेंट्स, बर्जर पेंट्स, शालीमार, कन्साई नेरोलक, AKZO नोबल
 • प्लांटेशन : बॉम्बे बर्मा, MCLEOD RUSSEL, टाटा कॉफी, INDAG RUBBER, टाटा ग्लोबल बिव्हरेजेस
 • शिपिंग आणी पोर्ट : अडाणी पोर्ट, ABG शिपयार्ड, GOL ऑफशोअर, कॉनकॉर, मरकेटर लाईन,
 • खते आणी रसायने : RCF, FACT, टाटा केमिकल्स, GNFC, GSFC, झुआरी अग्रो
 • मीडिया : EROS, INOX, झी, PVR जागरण प्रकाशन, HT मेडिया, ENIL
 • CONSTRCTION आणि HEAVY इंजिनिरिंग : लार्सेन अंड टुब्रो, DLF, गोदरेज, प्रतिभा
 • इलेक्ट्रिकल साधनसामुग्री : ABB, ALSTOM इंडिया, HAVELLS इंडिया , सिमेन्स, BHEL
 • नोन–इलेक्ट्रिकल: BEML, ESAB, BEL, GRINDWELL नॉर्टन
 • FMCG सेक्टर:  ब्रिटानिया,कोलगेट , इमामी , बजाज कॉर्प, ITC
 • मेटल्स आणि मिनरल्स : कोल इंडिया, मोईल, सेसा स्टरलाइट एसडी अल्युमिनियम,हिंदुस्थान झिंक, हिंद कॉपर
 • अल्कोहोलिक बेवरेजेस, सिगारेट्स : युनायटेड स्पिरीटस, IFB एग्रो, ग्लोबस स्पिरीटस

जवळजवळ ६००० कंपन्या शेअरमार्केटमध्ये कार्यरत आहेत. शेअरमार्केटचा प्रवास अतिशय रोमांचक, उत्साहवर्धक, नवे नवे ज्ञान देणारा, नवीन अनुभव देणारा आहे.जसं आपण वेळ आणी पैसा मर्यादित असेल तर सर्व स्थळे पाहू शकत नाही तसेच शेअरमार्केटच्या बाबतीतही आहे. शेअरमार्केटच्या प्रवासांत अनेक घटनांची आणी त्याच्यावर मार्केटमध्ये होणाऱ्या प्रतिक्रियांची रेलचेल असते. मार्केट जुन्या गोष्टी दळत बसत नाही. प्रत्येक नवीन गोष्ट, नवा कायदा,नवीन निर्णय चटकन स्वीकारते . नव्या शेअरचे लिस्टिंग झाले तर त्याला सामावून घेते. समानतेची वागणूक देते. स्वागत करते. त्यामुळे शेअरमार्केटमध्ये प्रवास करताना माणूस रमतो. भूतकाळाच्या त्रासदायक आठवणी विसरतो. भविष्याचा विचार करताना वर्तमानकाळामध्ये त्या दिशेने पावले टाकावयास शिकतो. त्यामुळेच ‘केल्याने देशाटन पंडीत मैत्री सभेत संचार शास्त्रग्रंथ विलोकन मनुजा चातुर्य येतसे फार’ यातील प्रत्येक विचार शेअरमार्केटच्या बाबतीत सार्थ ठरतो !!

माझी वाहिनी – लेख ८ – आस्वाद मार्केटचा

मागील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा  
(हा लेख पहिल्यांदा ‘माझी वाहिनी’ या मराठी मासिकात प्रकाशित झाला होता)
“वहिनी, आहेत कां?“ अशी हाक आपल्याला ऐकू येते.म्हणजेच प्रत्येक घरातील गृहिणीला आपण वहिनी या नावाने संबोधतो.तिचा आदर करतो. ही वहिनी घरातील सर्वांच्या रसना तृप्त करण्याचे काम करते.
‘माझी वहिनी’  ही तशी एक अन्नपूर्णाच आहे. अनेक वेगवेगळ्या विषयांचा आस्वाद ती आपल्या वाचकांना देते. जानेवारीपासून शेअरमार्केटचा आस्वाद आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे काम मी ‘माझी वहिनी ’च्या माध्यमातून करीत आहे.
घरातली वहिनी पैपाहुण्यांकडे लक्ष देते. सर्वांचे आरोग्य राखते .वडीलधारया माणसांना काय हवे नको ते पाहते. सर्वांच्या आवडी निवडीकडे लक्ष देते. जेव्हा गृहिणी एखादा पदार्थ बनवायचा विचार करते. तेव्हा निर्माण होणाऱ्या प्रश्नांचा गुंता ती स्वतःच मोठ्या खुबीदारपणे सोडविते.
(१)   पदार्थ कोणासाठी करावयाचा आहे. लहान मुलांसाठी, तरुणांसाठी की वृद्ध माणसांसाठी.
(२)   घरात कोणकोणते जिन्नस आहेत
(३)   पोट भरण्यासाठी, मधल्या वेळच्या खाण्यासाठी, चरण्यासाठी कां डब्यासाठी
(४)   किती श्रम पडतील, किती दमणूक होईल
(५)   किती वेळ लागेल
(६)   मला कोणते पदार्थ चांगले बनवता येतात.
(७)   दिवस कोणते आहेत उन्हाळ्याचे थंडीचे की पावसाळ्याचे.
(८)   सगळ्यांच्या तब्येतीला मानवेल कां?
म्हणजेच श्रम पैसा आरोग्य आवडनिवड हवामान आणी वय या सर्वं गोष्टींचा सुरेख मेळ घालून कुटुंबातील सर्वांना हि वहिनी खुश ठेवू शकते. तर मग हीच वहिनी असाच विचार करून शेअरमार्केटचा आस्वाद का नाही घेवू शकत?
वहिनी जेव्हा जेवणाचे ताट वाढते तेव्हा काही पदार्थ डावीकडचे असतात तर काही पदार्थ उजवीकडचे असतात. डावीकडच्या पदार्थांत लोणचे चटणी कोशिंबीर यांचा समावेश असतो.तर उजवीकडे भाजी खीर हे पदार्थ असतात आणी मधोमध स्थान असते ते मिठाचे. मिठाच्या बाजूला असते लिंबाची फोड.ताटाच्या मधोमध वरणभात  बाजूला पोळी, पक्वान्न वाढतात. म्हणजेच काही पदार्थ पोट भरण्यासाठी, काही चवीसाठी, काही अन्न पचण्यास पूरक, असतात. मिठाचे स्थान सर्वात महत्वाचे.
याच दृष्टीकोनातून जर शेअरमार्केटचा विचार केला तर भात भाकरी पोळी पराठे हे जसे प्रमुख पोटभरीचे पदार्थ त्याचप्रमाणे काही महत्वाचे शेअर्स हे सगळ्यांच्या पोर्टफ़ोलिओमध्ये आढळतात. . शेअरमार्केट हा भांडवली बाजार असल्यामुळे कम्पनीची जशी प्रगती होत जाते त्याप्रमाणे त्या कम्पनीच्या शेअर्सची किमतही वाढते व तुम्हाला लाभांशही मिळत राहतो.म्हणजेच हे शेअर्स ‘multibagger’ होतात. तुम्ही  २०० रुपयाला घेतलेल्या  शेअरची किमत रुपये १००० होते. अशा वेळी तुम्ही तुमच्याजवळचे २५%ते ३०% शेअर्स विकून फायदा व भांडवल बाहेर काढून उरलेले शेअर्स इस्टेट म्हणून ठेवू शकता. ज्याप्रमाणे वहिनी धान्य  स्वस्त असताना घेवून तेच धान्य वर्षभर वापरत असते. हीच पद्धत शेअर्सच्या बाबतीत अवलंबा. मार्केट जेव्हा रपारप पडत असते तेव्हा चांगले शेअर्स खरेदी करा. धान्याला किडामुंगी लागू नये म्हणून वहिनी जशी काळजी घेते त्याचप्रमाणे आपल्या शेअर्सचा भाव काय चालू आहे, कंपनी प्रगतीपथावर आहे ना ? हे मात्र पाहण्यास विसरू नका.
जेवणामधल्या प्रमुख पदार्थांबरोबरच काही पदार्थे चवीसाठी असतात. त्यामध्ये लोणची, पापड चटणी कोशिंबीर भाजी वडे असे अनेक पदार्थे असतात काही वेळेला मोसमाप्रमाणे वेगवेगळे पदार्थे दिसतात.उन्हाळ्यांत कैरी, आंबा, कोकम भाद्रपदांत भोपळ्याचे पदार्थ, गाजर, कोथिंबीर स्वस्त मिळू लागली की त्यापासून बनणारे पदार्थ, श्रावण महिन्यात अळूच्या वड्या, असे पदार्थ वहिनी करते. याच पद्धतीने शेअरमार्केटकडे लक्ष द्या. काही कंपन्यांची प्रगती सिजनल असते. एखाद्या तिमाहीमध्ये त्यांच्या मालाची विक्री वाढते त्याबरोबरच त्या कंपन्यांचा फायदाही वाढतो, त्यामुळे या कंपनीच्या शेअर्सचा भावही वाढतो.इतरवेळी या कंपन्यांचे शेअर्स स्वस्त मिळू शकतात. अशा शेअर्समध्ये ठराविक फायदा घेवून वेळीच बाहेर पडा. उदा. शिक्षणाशी संबधित  शेअर्स, रेल्वेशी.संबधित कंपन्यांचे शेअर्स.
वेफर्स कुरकुरे पाणी पुरी शेवपुरी हे पदार्थ खावून पोट भरत नसले तरी मजा मात्र येते हे नक्की. आयुष्याला थोडीशी चव येते. अशाच पद्धतीने काही शेअर्स शेअरमार्केटमध्ये आहेत. जे थोडीशी मजा आणतात तुम्हाला आनंद देवून जातात. सध्या अनेकजणांना या अनुभवाची चव चाखता आली आहे. निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून नरेंद्र मोदी निवडून येतील अशी चाहूल लागल्यापासून शेअरमार्केट अचानक वाढू लागले. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा या उक्तीप्रमाणे अनेक कमी किमतीचे शेअर्सही वाढले. रुपये ३किमतीचा शेअर रुपये ७ किमतीला  तर ७० पैशाचा शेअर रुपये २ ला विकता आला. म्हणजेच कमी भांडवलामध्ये जास्त फायदा झाला. अशा वेळी ही  कंपनी चांगली आहे की वाईट आहे ही चर्चा करीत बसण्यापेक्षा योग्य वेळी खरेदी व विक्री केली तर भरपूर फायदा होऊ शकतो. ज्यांना जमत असेल त्यांनीच ही वाट धरावी. सोसत नसल्यास त्या वाटेला न गेलेले चांगले. म्हणजेच शेअरची निवड महत्वाची.
कितीही म्हटलं तरी शेअरमार्केट हा व्यवसाय.. त्यामुळे फायदा झाल्याशिवाय शेअरमार्केटचा चव तुम्हाला कळणार नाही व शेअरमार्केटचा स्वाद घेण्यासाठी तुम्ही आतुर होणार नाही. एकदा कां तुम्ही शेअरमार्केटचा आस्वाद घेण्यास शिकलात की शेअरमार्केटपासून दूर जावे असे कधीही वाटणार नाही. शेअरमार्केट्ची चव तुमच्या जिभेवर रेंगाळतच राहील.
गृहिणीचा आनंद कशांत असतो तर आपण केलेला पदार्थ सर्वांनी आवडीने खाल्ला पुन्हा पुन्हा मागितला, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद समाधान झळकले यातच! त्याचप्रमाणे माझ्या दृष्टीने विचाराल तर शेअर लहान असो, मोठा असो ज्या शेअरमध्ये फायदा होतो तो चांगला. तत्व,शास्त्र, अभ्यास हे त्या त्या जागी राहते शेवटी होणारा फायदा मिळणारे उत्पन्न हाच व्यवसायाचा प्रमुख भाग असतो .
तुम्ही ज्या पदार्थांचा आस्वाद घेता त्या संबंधातले अनेक कंपन्यांचे शेअर्स शेअरमार्केटमध्ये आहेत. त्यातील काही कंपन्यांच्या शेअर्सची तोंडओळख मी तुम्हाला करून देत आहे.
आता आपण सकाळपासून सुरुवात करू या ! सकाळी चहा कॉफी दुध कॉम्प्लान , कोको अशा पेयांचा तुम्ही आस्वाद घेता. आता चहा करावयाचा म्हणले तर चहाचीpowder  साखर दुध, दुधाची powder हे पदार्थ लागतात. याशी संबंधीत शेअर्स पुढीलप्रमाणे
(१)   चहा powder : Macleod  RUSSEL, HARRISON MALYALAALAM , JAYASHREE TEA , TATA GLOBAL BEVERAGES , ASSAM COMPANY, BOMBAY BURMAH TRADING COMPAN, GODREJ , HINDUSTHAN UNILEVER
(२)   दुध : KWALITY LTD. UMANG DAIRY, VADILAL INDUSTRIES , AMUL
(३)   साखर :श्री रेणुका शुगर, बजाज हिंदुस्थान, बलरामपुर चीनी, बन्नारीअम्मान शुगर  त्रिवेणीसुगर , EID PARRY
(४)   कॉफी : TATA COFFEE, NESTLEY, GlaxoSmithKline consumer healthcare, Mondelez India foods ltd( CADBURY).
(५)   बिस्कीट : BRITANNIA, PARLE PRODUCTS LTD. ITC LTD ,GlaxoSmithKline consumer healthcare
(६)   Pizza : jubilant foods
(७)   तांदूळ : KRBL, LT FOODS, KOHINOOR फूड, RT EXPORTS , LAKSHMEE ENERGY AND FOODS
(८)   गव्हाचे पीठ: ITC
(९)   MINERAL WATER: MOUNT EVEREST, PARLEAGRO
(१०)PACKED FOODS : ADF FOODS, FLEX FOODS , HERITAGE FOODS , AMUL, VADILAL, ITC., HATSUN AGRO
(११) अंडी/ चिकन : VENKY’S, ADF FOODS, AVANTI FEEDS
(१२) SOFT DRINKS AND ICECREAMS: DABUR INDIA LTD , PARLE AGRO , HATSUN AGRO, AMUL, KWALITY INDIA LTD. VADILAL,
(१३) मसाले  : ADF FOODS , ITC, BOMBINO AGRO
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये फक्त ट्रेडिंग करा. खरेदी-विक्रीची वेळ बरोबर साधता आली तर चांगला नफा मिळू शकतो.
NESTLE, BRITTANIA, GlaxoSmithKline consumer healthcare, mondelez india foods ltd., ITC या कंपन्यांचे शेअर्स दीर्ध मुदतीच्या गुंतवणुकीसाठी योग्य आहेत. परंतु हे झाले माझे मत. शेवटी पैसा तुमचा, विचारही तुमचा, आणी फायदाही तुमचाच हे लक्षात घेवून काळजीपूर्वक गुंतवणूक करा.
जशी जेवण झाल्यानंतर तृप्तीची ढेकर आलीच पाहिजे आणि ‘अन्नपूर्णा सुखी भव’ हा आशीर्वाद मिळालाच पाहिजे शेअर मार्केटचं पण तसच काहीतरी आहे. पण शेअर मार्केटचा आस्वाद व खाद्यपदार्थांचा आस्वाद यामध्ये एक फरक आहे. तो म्हणजे देवाने आपल्याला दिलेले जिभेचे वरदान होय. जीभेमुळे चव समजते एकदा कां चव आवडली की आपण पुरेपूर त्या पदार्थाचा आस्वाद घेतो.शेअरमार्केटच्या बाबतीत मात्र तसे नाही. तुमची बुध्दी शेअर्सची निवड व खरेदी-विक्रीची वेळ योग्य असेल तरच शेअरमार्केट्ची चव पूर्णपणे चाखता येते, भरपूर फायदा मिळतो आणि मगच काय ती समाधानाची ढेकर येते.
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

माझी वाहिनी – लेख ७

मागील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा  
(हा लेख पहिल्यांदा ‘माझी वाहिनी’ या मराठी मासिकात प्रकाशित झाला होता)
मी ‘माझी वाहिनी ‘ मासिकात लेख लिहायला सुरवात केल्यापासून अनेकांचे फोन आले.
प्रश्न एकच… – “MADAM,तुम्ही कन्सल्टिंग करता म्हणजे काय करता? आम्ही कोणते शेअर्स घ्यावे हे सांगणार कां!”
मी हे काम करीत नाही म्हणल्यावर बरं बरं म्हणून फोन ठेवतात. शेअरमार्केटचा अभ्यास करून गुंतवणूक करावी हे कोणालाही पटत नाही किंवा रुचत नाही किंवा शेअरमार्केटचा अभ्यास करण्याची गरज नाही हीच लोकांची श्रद्धा आहे त्यामुळेच की काय कोणाकडून तरी शेअर्सची नावे मिळवायची व त्यात गुंतवणूक करायची असा प्रकार प्रचलीत आहे. हा प्रकार अगदीच चुकीचा आहे असं नाही म्हणणार मी पण कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवला कि फसवणूक व्हायची शक्यता वाढते हे नक्की.
ज्या ठिकाणी तर्क,अभ्यास, शास्त्र, गणित यांच्या सहाय्याने प्रश्नांची उत्तरे सापडत नाहीत तेव्हा श्रद्धा-अंधश्रद्धेचा आधार समाज घेतो. शेअर मार्केट काही फार वेगळ नाही. शेअरमार्केटचे नीटसे आकलन झाले नाही किंवा आकलन करून घेण्याचा प्रयत्न गुंतवणूकदार करीत नाही म्हणून तिथेही श्रद्धा-अंधश्रद्धेला जोर येतो. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण काही लोक मार्केट मध्ये पैसे टाकताना ज्योतिषाचा आधार घेतात (काही वेळा हे मार्केटचे ज्योतिषी असतात, शेअर मार्केटमध्ये जराजरी अनुभव असेल तरी बर्याच लोकांना शेअर्सचं भविष्य दिसायला लागतं). आता समजा कि जोतीष्यानी पत्रिका बघितली आणि सांगितलं “तुम्हाला धातूच्या शेअर्स मध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल”. तुम्ही मला सांगा कि धातू म्हणजे अल्युमिनीयम कि तांबे कि स्टील कि चांदी कि सोने कि जस्त? आणि घ्यायचा तरी शेअर कोणत्या भावाला घ्यायाचा? ते ज्योतिषी सांगत नाहीत.
आता पहा मध्यंतरी ‘कोल इंडिया ‘ ने रु.२९ लाभांश दिला. त्यावेळी ‘कोल इंडिया ‘ घ्या हा सल्ला किंवा टीप बऱ्याच जणांनी दिली. अहो पण त्या शेअरची किमत वाढल्यावर खरेदी करून काय उपयोग ! त्यानंतरच तो शेअर पडायला सुरुवात झाली. व जवळजवळ रु.३०६ पासून तो रु.२३८ पर्यंत पडला. त्यानंतर मला बऱ्याच जणांचे फोन आले “ अहो MADAM’कोल इंडिया’चा शेअर कां पडला? मी म्हणले “ज्यांनी तुम्हाला खरेदीचा सल्ला दिला असेल त्यांना माहिती असावयास हवी. अहो “कोल इंडिया ‘ ही कॅश रीच कंपनी पण जास्त लाभांश दिल्याने त्याची ‘BALANCESHEET’ WEAK झाली.
कौरव-पांडवांमधील महाभारत संपले. कौरवांचा पराभव झाला. पांडव विजयी झाले. परंतु धर्म-अधर्म ,श्रद्धा-अंधश्रद्धा यांच्यातील महाभारत संपेल असे वाटत नाही व शेअरमार्केच्या कुरुक्षेत्रावर हे असं महाभारत घडतं.
आता तुम्ही म्हणाल “मग MADAM हे महाभारत थांबवायचं कसं आणि शेअरमार्केटचा अभ्यास करायचा तरी कसा?”
सांगून काही उपयोग होणार नाही कदाचित पण प्रयत्न करून पाहूया . शेअरमार्केटचा अभ्यास दोन प्रकाराने करता येतो. (१) मुलभूत बाबींनुसार (२) तांत्रिक बाबींनुसार (चार्टप्रमाणे )
आता समजा तुम्हाला एका रस्त्यावरून जायचय आणि रस्त्यावर खड्डे आहेत तर चार्ट तयार करून व वळणे घेतजा असं तुम्हाला कोणी सांगू शकतं. परंतु दरम्यान निवडणुका आल्या म्हणून रात्रीतल्या रात्री रस्ते दुरुस्ती झाली तर वळणे घेत जायची गरज उरत नाही. सांगायचा मुद्दा असा कि जर मुलभूत परिस्थिती बदलली तर चार्ट- विश्लेषनाचे निष्कर्ष दिशाभूल करणारे ठरू शकतात.
सध्या निवडणुकीच्या काळात ‘ADANI GROUP” चे शेअर्स नरेंद्र मोडी निवडून येतील या आशेवर वाढले ही अंधश्रद्धाच नव्हे काय?  याचा कंपनीच्या प्रगतिशी किंवा कामकाजाशी काय संबंध आहे? मार्केटमध्ये जे शेअर्सचे भाव वाढतात त्याचा कंपनीच्या कामकाजाशी संबंध असलाच पाहिजे  असे नाही. मार्केट मागणी-पुरवठा तत्वावर चालते. एखादी कंपनी तोट्यात असेल पण त्या कंपनीच्या शेअर्सची मागणी वाढली की त्या कंपनीच्या शेअर्सचा भाव वाढतो .
आता समजा एखाद्या मुलाने खूप अभ्यास केला व एखाद्याने अगदी थोडा निवडक प्रश्नांचा अभ्यास केला परंतु त्याने ज्या प्रश्नांची उत्तरे अभ्यासली तेच प्रश्न पेपरमध्ये आले तर त्यामुळे त्याला जास्त मार्क मिळतील परंतु नेहेमीच असे घडत नाही. म्हणून तुम्ही अल्पमुदतीसाठी (३महिन्यांपेक्षा कमी ) तांत्रिक (TECHNICAL ANALYSIS ) चा म्हणजेच चार्ट–विश्लेषणाचा आधार/उपयोग करा. व मध्यम मुदतीसाठी (३ महिने ते १ वर्ष )व दीर्घंमुदतीसाठी मुलभूत विश्लेषणाचा आधार/उपयोग करावा हा माझा सल्ला . कारण मध्यम किंवा दीर्घ मुदतीमध्ये मुलभूत परिस्थितीमध्ये फरक पडण्याचा संभव जास्त असतो .
भूतकाळात शेअरच्या किमतीत झालेल्या चढउतारांमुळे जे आलेख तयार होतात त्याला चार्ट असे म्हणतात  चार्टवरून भविष्यातील किमतीविषयीचे अंदाज वर्तविले जातात .हे चार्ट संख्याशास्त्रावर आधारीत असतात. तांत्रिक विश्लेषण या चार्टच्याच आधारे केले जाते. ही शार्टकट मेथड आहे. ओपनिंग भाव, क्लोजिंग भाव कमाल भाव आणी किमान भाव (प्रत्येक दिवशीचा) माहीत असेल तर चार्ट तयार करता येतो. या चार्टवरून किमतीत होणार्या बदलांचा अंदाज करता येत . यासाठी मूव्हिंग एव्हरेजचाही उपयोग होतो. हल्ली चार्ट्स स्वतःला तयार करावे लागत नाहीत. ज्या कालावधीचा चार्ट हवा असेल तो संगणकावर उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे चार्टस समजून घेवून वाचता येणे महत्वाचे आहे. चार्टमध्ये किमतीतील बदलामुळे वेगवेगळे आकार तयार होतात. या आकारांना तांत्रिक विश्लेषणात खूप महत्व असते काही वेळा उंचवटे तयार होतात काहीवेळा ‘gap’ तयार होतात. या प्रकारच्या अभ्यासामध्ये पुढील ‘pattern’चा उल्लेख वारंवार होतो.
(१)HEAD AND SHOULDER PATTERN  (TOP)
(2) HEAD AND SHOULDER PATTERN (BOTTOM)
(3) DOUBLE TOP DOUBLE BOTTOM
(4) FLAG PATTERN
(5) PENNANT PATTERN
(6) FALLING WEDGE PATTERN
(7) RISING WEDGE PATTERN
(8) CUP AND HANDLE PATTERN
चार्टच्या अभ्यासावरून कंपनी चांगली किंवा वाईट, कंपनीचा शेअर स्वस्त किंवा महाग याची उत्तरे मिळत नाहीत.
मुलभूत विश्लेषणाचा अभ्यास पुढील गोष्टीवरून करता येतो.
(१) कंपनीला लागणारा कच्चा  माल
(२ ) बाजारपेठ
(३) विदेशी चलनाच्या किमतीतील चढ-उतार
(४) तंत्रज्ञान
(५) आवश्यक त्या मनुष्यबळाची उपलब्धता
(६)भांडवल
(७) प्रत्येक देशातील कायदे व त्याचा आयात निर्यात व्यापारावर होणारा परिणाम
(८) कंपनीची आर्थिक परिस्थिती
(९) उद्योगाची विकासाभिमुखता
तांत्रिक आणी मुलभूत विश्लेषणांचा आधार घेवून आणी त्यांचा समन्वय साधून शेअर्सच्या खरेदी-विक्रीची वेळ आणी किमत या बाबतीत निर्णय घ्या कारण शेवटी प्रश्न पैशाचा आहे कारण ज्याला आगत असेल त्याने स्वागत करावयास शिकले पाहिजे.
आज या भागात आपण बँकिंग इंडस्ट्रीचा अभ्यास कसा करावा हे पाहू या ! यामध्ये ३ भाग पडतात.
(१) राष्ट्रीयीकरण झालेल्या सरकारी बँका
(२) खाजगीक्षत्रातील बँका
(३) NON-BANKING FINANCE COMPANY
बँकिंग कंपनीच्या शेअर विकत घेताना खालील बाबींकडे लक्ष द्यावे.
(१)   इंटरेस्ट इन्कम:
(२)   NON-PERFORMOING ASSETS  किती यात GROSS N.P.A. किती तसेच NET N.P. A. .किती तसेच बँकेने या N .P. A.. च्यासाठी किती PROVISION केली आहे हे बघणे आवश्यक आहे
(३)   DEBT/EQUITY RATIO : एकूण कर्ज /मालमत्ता हा रेशियो जेवढा कमी तेवढी कंपनी किंवा बँक चांगली. २:१ म्हणजेच मालमत्तेच्या दुप्पट कर्ज असेल तर कंपनीचे स्वास्थ वाईट.
(४)   PROFITABILITY  RATIO : नक्त नफा /विक्री यात इतर इन्कम किती आहे ते पहा.    .
(५)   EARNING PER SHARE : PROFIT AFTER TAX /NUMBER OF SHARES
(६)   PRICE EARNING RATIO: शेअरची किमत /EARNING PER SHARE
(७)   लाभांशाचे प्रमाण ; यावरून कंपनी ‘investor-friendly ‘ आहे कां हे कळून येते.
(८)   Book-value: net assets /number of shares
(९)   CASA RATIO : CURRENTDEPOSITES+SAVINGS DEPOSITES / TOTAL DEPOSITES
(१०)  NET INTEREST MARGIN : INTEREST EARNED –INTEREST PAID
(११)  DEPOSIT ADVANCES RATIO
(१२) बँकेचा विस्तार ( बँक शाखांची संख्या आणी त्यांचे भोगोलिक विकेंद्रीकरण)
(१३) CAPITAL ADEQUACY RATIO
ह्या सर्व बाबी पहिल्यात की तुम्हाला कोणत्या बँकेचे शेअर्स घ्यावेत हे समजेल. शेअर चांगला किंवा वाईट असणे हे शेअरच्या किमतीवर ठरत नाही. त्यामुळे तुम्ही मुलभूत गोष्टींकडे लक्ष द्या त्याचबरोबर तुम्ही किती अवधीकरता शेअर्स घेत आहात त्यानुसार तांत्रिक (TECHNICAL) विश्लेषणाचा आधार घ्या. मगच शेअर्सचे SHOPPING करा. त्याचबरोबर ती कंपनी /बँक दर तिमाहीला प्रगतीपथावर आहे हे बघा. त्यामुळे शेअरचा भाव वाढता राहील व तुमची गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
श्रद्धा किंवा अंधश्रद्धेच्या महाभारतात न गुंतता कृष्णासारख्या माणसाने सांगितलेल्या युक्तीच्या चार गोष्टी ऐका आणी पडताळून पहा. नंतरच गुंतवणूक करा.
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

माझी वाहिनी – लेख ६

मागील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा  
(हा लेख पहिल्यांदा ‘माझी वाहिनी’ या मराठी मासिकात प्रकाशित झाला होता)
वाचकहो आपल्या मनांत शेअरमार्केटबद्दल उत्सुकता निर्माण झाली असावी व मनातील भीतीसुद्धा थोडी कमी झाली असेल. त्या दृष्टीकोनातून जानेवारीपासून तुम्ही तयारी करीत आहात असे मी समजते. तुमची उत्सुकता जास्त न ताणता तुम्हा सर्वांना बरोबर घेवून शेअरमार्केटमध्ये फेरफटका मारावा असे मनाशी ठरवले खरे पण——
वाचकहो मी तुम्हाला एक कोडे घालणार आहे. त्याचे तुम्ही उत्तर दिले तर आपण जाऊ या शेअरमार्केटमध्ये फेरफटका मारायला आहे कबुल !
सांगा सांगा लवकर सांगा
असे आहे कां कोणते करीअर
नको पदवी नको व्यक्तिमत्व
नको मुलाखत नको परीक्षा
नाही आरक्षण नको शिक्षण
नको वशिला इथला तिथला
करा विचार सांगा लवकर
आहे कां असे कोणते करीअर
अहो विचार कसला करत बसलात ? तुम्ही व मी आता समोरासमोर नाही म्हणून, नाहीतर तुम्ही लगेच उत्तर दिले असते ‘शेअरमार्केट ‘. कारण फाटक MADAM, विचारणार म्हणजे उत्तर ‘शेअरमार्केट्च’असणार
मी तुम्हाला कोडे घालून कोड्यात टाकण्याच्या विचारात नाही. तुम्हाला काही मदत करता येत असेल तर करावी असे वाटते.
परंतु आता चालू आहे जून महिना. आता अनेक युवकांनी १०वी, १२वी ची परीक्षा दिली असेल. कोणकोणत्या क्षेत्रात करीअर करता येईल याचा विचार करत असतील, माहिती घेत असतील. व आपल्याला काय झेपेल याचाही विचार करत असतील, खर्चाचा आढावा घेत असतील. त्यांना काही मार्गदर्शन हा उद्देश आहे.
समजा काही युवकांनी काही क्षेत्र निवडले असेल पण जर काही आर्थिक अडचणींमुळे ते क्षेत्र झेपेल कां? अशी शंका असेल तर ‘COLLEGE’ सांभाळून किंवा सुट्टीच्या दिवसांत शेअरमार्केटमध्ये व्यवहार करून पैसे मिळवून त्याचा शेंक्षणिक खर्चासाठी उपयोग करू शकतील. त्यामुळे पालकांवरचा ताण कमी होईल व युवकांना त्यांच्या मनात जे करीअर करायचे असेल ते निवडता येईल. अशा प्रकारे शेअरमार्केट पुरकही बनू शकेल. माझ्यासारखे पूर्ण वेळ शेअरमार्केट करून पगारासारखे पैसेसुद्धा मिळवू शकता. मार्केटमध्ये व्यवहार करण्यासाठी वयाची, शिक्षणाची, गुणांची,  कसलीच अट नाही. घरात बसूनही व्यवहार करता येतो.
शारीरिक दृष्टीने दुर्बल असलेली मुले हा व्यवहार करू शकतात. मूक-बधीर असणारेही ‘SMS’ द्वारे शेअरमार्केटमधून पैसा मिळवू शकतात. स्त्री –पुरुष हा भेद तर नाहीच हे तुम्हाला माझ्या उदाहरणावरून कळले असेलच. शेअरमार्केट म्हणजे म्हणाल तर व्यवसाय व म्हणाल तर नोकरी आहे. जेवढी बुद्धी अधिक चालवाल, जेवढा अधिक वेळ द्याल, जेवढी जास्त गुंतवणूक कराल, जेवढी जास्त माहिती मिळवाल तेवढे तुमच्या उत्पन्नाचे प्रमाण वाढेल.
शेअरमार्केटमध्ये ‘बॉस ‘गिरी नाही, नोकर-मालक हा फरक नाही. सेवानिवृती सक्तीची नाही. जातीभेद नाही. समजा ‘टाटा स्टील ‘ या शेअरचा भाव ४००रुपये चालू आहे. अ आणी ब दोघांनी शेअर्स विकले जर त्यांचे शेअर्स ४००रुपये भावाने विकले गेले असतील दोघांनाही ४०० रुपये भावाच्या हिशेबाने त्यांनी जेवढे शेअर्स विकले असतील त्याचे पैसे मिळतील.
काही मुले खूप हुशार असतात. पण त्यांना संभाषणकला अवगत नसते. त्यामुळे लेखी परीक्षा उत्तीर्ण होतात. परंतु ‘इंटरव्यू’ मध्ये नापास होतात.देव सगळ्यांना चांगले व्यक्तीमत्व देवून जन्माला घालत नाही. त्यात त्या मुलांचा काय दोष. काही करीअरसाठी व्यक्तीमत्व आवश्यक असते. परंतु शेअरमार्केट व्यक्तीमत्व नसलेल्या व्यक्तीलाही सामावून घेते.
शेअर मार्केट ON THE JOB TRAINING मधूनच शिकता येत किंवा शिकावं असं म्हणा ना. ‘अनुभवातून शिक्षण, निरीक्षणातून शिक्षण’ हा मूलमंत्र लक्षात ठेवला की झाले!
शेअरमार्केट शिकल्यानंतर तुम्हाला पुढील संधी उपलब्ध होऊ शकतात. तुम्ही शेअरमार्केटमध्ये ‘FULL TIME ‘ PART TIME ‘ TRADER SWING TRADER, POSITIONAL TRADER, DAY TRADER , INVESTOR(ACTIVE  व PASSIVE), Broker, Sub-broker  बनू शकता. हे करण्यासाठी कुठल्याही सरटीफिकेशनची जरुरी नाही. पण जॉबसाठी आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता केली पाहिजे.
(१)    ‘BOLT OPERATOR’
(२)   ‘Investment Advisor’
(३)   ‘WEALTH MANAGER’
(४)   ‘FUNDAMENTAL  ANALYST ’
(५)  ‘TECHNICAL  ANALYST’
(६)   ‘FINANCIAL  PLANNER’
(७)  ‘ARBITRATOR’
(९)   ‘PORTFOLIO  ADVISOR’
या संधी उपलब्ध होण्यासाठी काही ‘CERTIFICATION COURSE’ आवश्यक आहेत . हे कोर्स BSE व NSE चालवतात. या कोर्सेसची माहिती ‘BSE’ व ‘NSE’ च्या SITES वर उपलब्ध आहे.. परीक्षा ओन लाईन होतात. माझा शेअर मार्केटशी संबंध हा INVESTOR म्हणून पण मला या जॉब्सबद्दल जितकी माहिती आहे तितकी देते. अजून माहिती हवी असल्यास इंटरनेट वरून मिळेलच
शेअर मार्केट व त्याच्याशी संबंधीत क्षेत्रांमध्ये सतत बदल होत असतात, नवीन विचार , नवीन संकल्पना उदयास येत असतात. त्याप्रमाणे तुमच्यात सकारात्मक बदल करण्याची तयारी ठेवा. आणी त्यांचा उपयोग आपला फायदा वाढवण्यासाठी करता येईल याची काळजी घ्या .
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या करीअरसाठी कशाचीच गरज नाही असे कसे ? ‘MADAM’  खोटे तर बोलत नसतील? नाही अजिबात नाही, मी खोटे सांगत नाही. हा व्यवसाय टी व्ही वरचे‘BUSINESS CHANNEL’ पाहून फोन करून करता येतो.
फोन ,मोबाईल ,टी व्ही बहुतेकांच्या घरी असतोच. आणी नसेल तर खेडोपाडी ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी दूरदर्शनची सोय असते.आता उरलासुरला प्रश्न खेळत्या भांडवलाचा. हा प्रश्न ‘POCKET MONEY’मधून, पालकांकडून थोडे पैसे उसने घेवून सोडवता येतो . शेअर विकल्यानंतर उसने पैसे परत करा व मिळालेला फायदा भांडवल म्हणून वापरा.
मला एवदेच सुचवायचे आहे की ज्या युवकांनी शेअरमार्केटचा विचार एक करीअर ऑप्शन म्हणून केला नसेल तर त्यांनी तो जरूर करावा.
चला तर मग आता आपल्या शेअर मार्केट च्या कथे कडे परत येवूया. तुम्हीपण म्हणत असाल कि – ‘MADAM’ फसवू नका आम्हाला ! कबूल केल्याप्रमाणे  शेअरमार्केटचे दर्शन घडवणार की नुसतचतुमचे प्रवचनच ऐकायचे !
हो हो ‘PROMISE’  म्हणजे  ‘PROMISE ‘ चला आताच्या आता शेअरमार्केटमधून फेरफटका मारून येऊ.
पण मला कळत नाही आहे की मी तुम्हाला दाखवू काय ? कारण ‘NSE’ (NATIONAL STOCK EXCHANGE ) व BSE ( BOMBAY STOCK EXCHANGE) मध्ये सुरक्षेच्या कारणामुळे प्रवेश करण्यास मनाई आहे. या इमारती बाहेरूनच बघून समाधान मानले पाहिजे. सर्व व्यवहार संगणकावरच होत असल्यामुळे कोठेही कसलाही माल दिसत नाही. बाजार फुललेला दिसत नाही. मालाला हात लावून पाहता येत नाही. अंगावर घालून बघता येत नाही. चव घेता येत नाही. घासाघीस करता येत नाही. कोठेही सेल नसतो, बाय १ गेट १असा फलक नसतो. या बाजारातला माल म्हणजेच कंपन्यान्चे शेअर्स पण या शेअर्सची जाहिरात करावी लागत नाही. खरेदी करणारे ग्राहक व विक्री करणारे व्यापारी दिसत नाहीत.त्यांची संख्या मात्र संगणकावर दिसते. शेअरमार्केट म्हणल तर आपल्या हातात असते. आपल्याबरोबर असते. घरातही असते दारातही असते .कारण हल्ली मोबाईलवर इंटरनेटची सुविधा असते . जो माल आपण कोठेही पहात नाही असे शेअर्स मात्र शेअर मार्केटमध्ये असतात. करोडो रुपयांची उलाढाल होत असते.उदाहरणार्थ सोन्याच्या खाणी,खनिज तेल,वायू, वीज पंखे मोटारी कपडा बिस्कीट यांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यान्चे शेअर्स.
जो भाव हवा असेल त्या भावाची ऑर्डर टाकावी. ऑर्डर पूर्ण होण्याच्याआधी रद्द करता येते, बदलता येते परंतु एकदा ऑर्डर पूर्ण झाली की शेअर्स परत करण्याची सोय नाही. पण तुम्ही ते पुन्हा विकू शकता.
मी तुम्हाला माझ्या ब्रोकरच्या ऑफिसमध्ये घेवून जाते. चला या माझ्याबरोबर
(१)    हे जे गृहस्थ बसले आहेत विचारपूस करून माहिती देत आहेत. फार्म भरून घेत आहेत. हे आहेत ‘MANAGER’
(२)   ज्या मुलांच्या कानाजवळ फोन चिकटले आहेत आणि जे ‘बोल्ट’समोर बसले आहेत, खरेदी विक्रीच्या ऑर्डर्स स्वीकारीत आहेत त्यांना म्हणतात ‘BOLT OPERATOR ‘
(३)   डाव्या बाजूला त्या छोट्याश्या केबिनमध्ये जो माणूस बसला आहे तो ‘ARBITRATOR’. हा माणूस ‘NSE’ व ‘BSE’ मध्ये असलेल्या शेअर्सच्या किमतीतील फरकाचा फायदा घेवून व्यवहार करतो.
(४)  हे चोघेजण आताच आले ‘बोल्ट’ समोर बसले, पटकन काहीतरी घ्या, काहीतरी विका म्हणाले व हसत हसत निघाले हे आहेत डेट्रेडर्स.
(५)  आत ज्या तीन खोल्या दिसत आहेत ना तेथे ‘COMMODITY’ ‘CURRENCY’ व STOCK DERIAVATIVE ‘ मध्ये व्यवहार होतात.
(६) कोपऱ्यात जो माणूस बसला आहे तो ‘INVESTMENT  CONSULTANT ‘ आहे
(७) या सभागृहात शेअरमार्केटच्या परीक्षांचे वर्ग चालतात. वरच्या मजल्यावर ‘डीलिंग रूम’’ आहे पण तेथे प्रवेश ‘RESTRICTED’ आहे.
तूर्तास तरी आपण मार्केटमधून घरी जाऊ या. सुट्टीच्या दिवशी असाच पुन्हा कधीतरी फेर फटका मारू!
आजचा भाग संपवण्य आधी एक अजून गोष्ट सांगायचीये – एकाद्या ज्योतिषाने तुमच्या कुंडलीवरून तुम्हाला या शेअरमधील गुंतवणूक लाभदायक ठरेल असे सांगितले म्हणून गुंतवणूक करू नका. अशा प्रकारे एखाद्यावर असलेल्या श्रद्धेमुळे किंवा अंधाश्रध्येमुळे बरेच लोक शेअर व्यवहारात फसतात. ही चर्चा आपण जुले महिन्याच्या अंकात करू.
या भागपासून मी तुम्हाला एक प्रश्न घालणार आहे. त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला पुढील अंकात वाचावयास मिळेल. तर या भागातला प्रश्न आहे – ‘सिमेंट कंपन्यान्चे कोणते शेअर्स मार्केटमध्ये आहेत व त्याची किंमत काय?’
उत्तर शोधून ठेवा. बोलूच लवकर
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

माझी वाहिनी – लेख ५ – चक्रव्यूह 'Power of Attorney' चा 

मागील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा  
(हा लेख पहिल्यांदा ‘माझी वाहिनी’ या मराठी मासिकात प्रकाशित झाला होता)
आमच्या ‘सुखसमाधान ‘ सोसायटीचे गेट-टू-गेदर मस्त झाले.  मी सोसायातीतल्या सभासदांना शेअरमार्केट्ची ओळख करून दिली. सभासदांच्या शेअरमार्केटविषयींच्या शंकाचे निरसनही केले . परंतु कुलकर्णीच्या मनातील ‘POWER OF ATTORNEY’(POA)’ ची भीती वेळेच्या अभावी त्या दिवशी दूर करू शकले नाही.
महाशिवरात्रीच्या सुट्टीची संधी साधून भास्करराव व कुलकर्णी सकाळी सकाळीच आमच्या घरी दत्त म्हणून हजर झाले
‘काय madam येऊ का ?’  दारावर  टकटक करीत कुलकर्णीनी विचारले. ‘आज मार्केटला सुट्टी असेल आज मलाही सुट्टी आहे त्यामुळे विचार केला तुमच्याकडून ‘POA’ ची माहिती करून घ्यावी’
मी म्हटल  “या ना  या, बसा. पाणी घ्या. मी तुम्हालाही सांगेत व आमच्या ‘माझी वहिनी’च्या वाचकांनाही सांगते.  ‘POWER OF ATTORNEY’(POA) हे शब्द ऐकले तरी गोंधळून जाऊ नका.  ही पाहिले तर एक सोय नाहीतर गैरसोय होय. एक दुधारी शस्त्र म्हणा ना. ‘POA’ हे काय गौडबंगाल आहे हे मी आज आपल्याला सविस्तर सांगणार आहे.
अहो, प्रत्येक गोष्ट करण्यासाठी आपल्याला वेळ मिळतोच असे नाही. कधी कधी एकाच दिवशी एकाच वेळी अनेक गोष्टी कराव्या लागतात. त्यावेळी आपण प्राधान्य कशाला द्यायचे हे ठरवतो. कोणत्या गोष्टी दुसऱ्यावर सोपवता येतील व कोणत्या गोष्टी स्वतःच केल्या पाहिजेत हे ठरवतो. ज्या गोष्टी आपण दुसऱ्यावर सोपवतो त्या गोष्टी त्या व्यक्तीला स्वतःच्या वतीने करावयास सांगतो . कधी कधी हे तोंडी सांगतो तर कधी कधी हे लेखी सांगतो. जर या लेखी सांगण्याचे कायदेशीर दस्तऐवजात रुपांतर केले तर ती ‘POA’ होते.
आता नेहेमीचे उदाहरण घ्यायचे झाल्यास आपण घरात कामाला बाई ठेवतो, माणूस ठेवतो, त्याच्याकडे घराची किल्ली देतोच ना ! पण आपण ही गोष्ट करताना काळजी घेतो. हल्ली तर कामवाल्यांकडून रेशनकार्डची कॉपीसुद्धा घेतो. त्याचप्रमाणे शेअर्सचे व्यवहार करताना तुम्ही व्यक्तीशः हजर  राहू शकत नसल्यास ‘POA’ देणे सोयीचे ठरते. आता तुम्हाला कळले असेल की ‘POA’म्हणजेच एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला दिलेले लेखी कायदेशीर अधिकारपत्र होय.
खरे पहाता ही एक सोय असते, परंतु ही सोय कधी कधी गैरसोय ठरते घातक ठरते. म्हणजेच  रोगापेक्षा उपाय जास्त त्रासाचा ठरतो. लोकांच्या मनात कायदेशीर बाबी , त्यासाठी येणारा खर्च होणारी कटकट व जाणारा वेळ याविषयी भीती नसते पण ‘POA’ चा होणारा गैरवापर कायम सतावतो.
आता शेअरमार्केटच्या बाबतीत ‘POA’चा वापर का सुरु झाला ते पाहू. एखादी व्यक्ती शेअर विकते. शेअर विकल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत त्याची ‘INSTRUCTION SLIP ‘ तुमचा‘DMAT’ अकौंट ज्या ब्रोकरकडे किंवा ‘DEPOSITORY PARTICIPANT’ (DP) कडे असेल तेथे द्यावी लागते. जर तुम्ही ही ‘INSTRUCTION SLIP’ वेळेवर दिली नाहीत तर तुमचा माल म्हणजेच शेअर्स  शेअरमार्केटमध्ये विक्रीला आले  नाहीत असा त्याचा अर्थ होतो . त्यामुळे तुम्ही विकलेल्या शेअर्सचा लिलाव होतो. तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागते. तुम्ही जर तुमच्या  ब्रोकरला‘POA ‘दिली असली तर हे काम ब्रोकर करतो व शेअर्सचा लिलाव व त्यामुळे होणारे नुकसान टळते.
आता याचीच दुसरी बाजू पहा , तुम्ही शेअर्स खरेदी केले तर त्याचे पैसे चेकने दुसरे दिवशी द्यावे लागतात. चेक चौथ्या दिवशी पास होतो व रक्कम शेअर्स विकणारयाला मिळते व शेअर्स तुमच्या‘DMAT’ अकौंटवर जमा होतात. पण समजा काही कारणाने तुम्ही चेक देऊ शकला नाहीत व ब्रोकरला फोन करून सांगितले तर ब्रोकर चांगुलपणाने व एवढ्या दिवसाच्या संबंधामुळे २-३ दिवस चेकसाठी थांबतो. परंतु कधी कधी लोक शेअर्स खरेदी करतात व दुसरे दिवशी मार्केट पडू लागले की शेअर्स महाग पडलेत. आता खरेदी केलेली शेअर्स स्वीकारुया नको आणी शेअर्ससाठी द्यावयाचा चेकही देऊया नको असा विचार करून चेक देत नाहीत. अशा वेळी जर ‘POA’  ब्रोकरला दिली असेल तर ब्रोकर त्या ‘POA’ चा उपयोग करतो व चवथ्या दिवशीपर्यंत वाट बघून ते शेअर्स विकतो. शेअर्स विकून आलेले पैसे व ग्राहकाकडून यावयाचे पैसे यात जो फरक असेल तेवढी रकम तुमच्या डीपौझीटमधून वजा करतो.किंवा तुम्हाला चेक देतो. शेअर्सची रक्कम मोठी असते त्यामुळे ब्रोकर स्वतःच्या खिशातून ती रकम भरू शकत नाही.अशा प्रकारे ‘POA’ मुळे  ब्रोकरचीही  बाजू सुरक्षित होते.
जर ‘POA’ मुळे एवढी सोय होते तर मग लोक ‘POA ‘ द्यायला एवढे का घाबरतात? उत्तर – ‘POA’चा होणारा गैरवापर.
भास्करराव म्हणाले “माझ्या मित्राला  न कळवता, न विचारता, त्याची  परवानगी न घेता त्याच्या  नावावर असलेले शेअर्स ब्रोकरनी विकून टाकले. जेव्हा त्याने त्याच्या  ‘DMAT’ अकौंटचे स्टेटमेंट पाहिले  तेव्हा त्याच्या ध्यानात आलं कि आपल्या अकौंटवर काही शेअर्स दिसतच  नाहीत. तेव्हा त्याला  धक्का बसला’
‘ अहो भास्करराव पण आता एक तर  काळ बदललेला आहे. एवढे घाबरून जाण्याचे कारण नाही. शेअर्स खरेदी वा विक्रीसाठी तुम्हाला ‘CONTRACT NOTE CUM BILL’ तसेच तुमच्या ‘DMAT’अकौंट चे स्टेटमेंटही मिळू शकते .हे तुम्ही आपल्या ब्रोकरकडून हक्काने मागू शकता .असे काही घडू नये म्हणून सरकारने आणी ‘SECURITIES EXCHANGE BOARD OF INDIA’ (SEBI)ने बरयाच उपाययोजना केल्या आहेत.
पण जर व्यवहारात गलथानपणा असेल तरच असं होतच भास्करराव! किंवा काही वेळा ब्रोकर आणी क्लायंट काही ठराविक ‘PERCENTAGE ‘ पैसे भरून व्यवहार करत असतात. अशा वेळी ब्रोकरच स्वतःच्या मताने  खरेदी-विक्री करतो . जर मार्केट कोसळू लागले तर होणारे नुकसान टाळण्यासाठी ब्रोकर शेअर्स विकून टाकतात.
भास्कररावांच अजून समाधान झालेलं नव्हत – ‘ अहो MADAM   ब्रोकर आमचे शेअर्स विकतोच कसे हो?’
‘हे बघा भास्करराव आमची फसवणूक झाली अशी चर्चा नंतर करण्यापेक्षा तुम्ही प्रत्येक कागदपत्र भरताना त्याचा अर्थ आणी त्यामुळे होणारे परिणाम काय याचा विचार करा.समजा तुम्ही कोरया चेकवर सही करून ठेवलीत व चेकबुक उघड्यावर ठेवलेत तर तुम्हाला न कळवता , न विचारता कोणीही पैसे काढून घेणारच ! मग नंतर दुसऱ्याला कां दोष द्यावयाचा. कुठेही निष्काळजीपणा दुर्लक्ष किंवा आळस करू नका.अंथरुणाबाहेर  पाय पसरू नका. दुसऱ्यांनी सरी घातली म्हणून तुम्ही दोरीचा गळफास लावून घेवू नका.
माझ्या अनुभवानुसार तरी ब्रोकर तुम्हाला २-३ वेळा सांगतो, आठवण करतो. तुम्ही जर दुर्लक्ष करीत आहात असे त्याला वाटले तर तुम्ही जेवढी रकम देणे बाकी असेल तेव्हढ्याच रकमेचे शेअर्स तो विकून टाकतो. न्यायाने सुद्धा हेच योग्य वाटते. परंतु तुमची ब्रोकरकडे कोणतीही रक्कम बाकी नसताना तसेच इतर काहीही कारण नसताना ब्रोकरने ‘POA’ चा गैरवापर करून तुमच्या खात्यावरचे शेअर्स विकून टाकले तर तुम्ही ‘SECURITY EXCHANGE BOARD OF INDIA’ (SEBI) कडे, ‘GRIEVANCES GRIEVANCES  CELL’कडे तक्रार करू शकता. अगदी कोर्टातही जाऊ शकता. अती लोभामुळे या गोष्टी घडतात. समजा तुम्ही लक्ष देऊ शकत नसाल तर काही दिवस व्यवहार करणे बंद करा. एवढा चटका हवाच कशाला?
समजा तुम्ही तुमच्या शेअरमार्केटमधील व्यवहारासाठी भांडवल उभे केले आहेत तेव्हढ्या रकमेमध्ये व्यवहार करायला तुम्ही एखाद्याला सांगितले. म्हणजेच भांडवल तुमचे व काढता आणी बुद्धी त्या व्यक्तीचे असे हे ‘BUSINESS MODEL’ आहे. हे ‘MODEL’ चालत असेल तर ठीक आहे..पण जेव्हा व्यवहार करणाऱ्याला वाटते की मी बुद्धी चालवतो म्हणून या माणसाला पैसे मिळतात. असे आहे तर आपल्याला पैशाची गरज असेल तर आपण या माणसाचे शेअर्स विकून टाकू आणी आपली पैशाची नड भागल्यावर या माणसाच्या खात्याला पुन्हा शेअर्स खरेदी करून जमा करू .परतू शेअरमार्केटच्या ‘VOLATALITY’ मुळे ते शक्य झाले नाही तर मग ही फसवणूक ठरते.
त्यामुळे अशा कोणत्याही भानगडीत पडू नये. काळजीपूर्वक व खबरदारी घेवून शेअर मार्केट मध्ये व्यवहार केलात तर लक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहील
आपण घरात गरजेपुरते नोकरचाकर ठेवतो पण त्यांच्यावर अवास्तव विश्वास टाकत नाही. कठीण परिस्थितीत माणसाच्या मनाचा तोल ढळतो. त्यावेळी परिस्थितीचे साम्यावलोकन करून आपले नुकसान न होता वर्षानुवषे असलेले संबंध टिकवावे लागतात मग ते घरातल्या नोकराबरोबर असोत वा आपल्या शेअर ब्रोकर बरोबर.
‘POWER OF ATTORNEY’ चे दोन प्रकार असतात. (१) ‘GENERAL POWER OF ATTORNEY’ (२) ‘SPECIFIC POWER OF ATTORNEY’
‘GENERAL POWER OF ATTORNEY’ तुम्ही ब्रोकरला किंवा ‘DP’ ला देऊ नका. शेअरमार्केटमधील व्यवहारासाठी ‘SPECIFIC POWER OF ATTORNEY’च द्या. ही ‘POWER OF ATTORNEY’ठराविक मुदतीसाठी आणी ठराविक कामासाठी दिलेली असते. ज्या मुदतीसाठी ‘POWER OF ATTORNEY’ दिली असेल त्या मुदतीचा ‘POWER OF ATTORNEY’ मध्ये स्पष्ट उल्लेख असावा.’ POA’ ज्या कामांसाठी दिली असेल त्या कामांचाही त्यात स्पष्ट उल्लेख असावा. ‘POA’ ही ज्या ब्रोकरचे किंवा ‘डीपी’ चे नाव ‘SEBI’ कडे रजिस्टर केलेले असेल त्याच नावाने द्यावी. त्यांचे कर्मचारी किंवा डीलर किंवा असोशीएटच्या नावाने देऊ नका. ‘POA’ पूर्वसुचना न देतां रद्द करण्याची तरतूद त्यामध्ये असावी. ‘POA’ चा वापर कसा केला जातो आहे हे पाहूनच ती रिन्यू करायचा निर्णय घ्यावा. अकौंट उघडण्याचा किंवा बंद करण्याचा अधिकार ‘POWER OF ATTORNEY’ द्वारे देऊ नका. गुंतवणुकीचा अधिकार किंवा निर्णय, शेअर्स खरेदी किंवा विक्रीसाठी ऑर्डर देण्याचा अधिकार देऊ नका. पैसे किंवा शेअर्स ट्रान्स्फर करण्याचा अधिकारही देऊ नका.हा अधिकार फक्त मार्जिन मनी किंवा पूल (POOL) AKOUNTSATHEECHअकौंटसाठी मर्यादित ठेवा. ‘OFF MARKET ‘ व्यवहारासाठी‘POA’ देऊ नका.
‘POA’ दिली असली तरी ‘DMAT’ अकौंट तसेच ‘LEDGER ACCOUNT ‘ चे व प्रत्येक व्यवहारासाठी मिळणारे ‘CONTACT COPY CUM BILL’ तुम्हाला मिळाले पाहिजे. तुम्हाला ‘POA’ची एक प्रत मिळाल्यावर ती तुमच्या फाईल मध्ये जपून ठेवा.
अकौंट जर एका व्यक्तीच्या नावावर असेल तर त्या व्यक्तीच्या सहीने ‘POA’ देता येते. जर अकौंट सयुंक्त नावावर असेल तर सर्व संयुक्त खातेधारकांच्या सह्या ‘POA’  देण्यासाठी लागतात. एखादा संयुक्त खातेधारक निधन पावला तर आधी दिलेली ‘POA ‘ आपोआप रद्द होते. उरलेल्या संयुक्त खातेधारकांना नवीन ‘POA’ द्यावी लागते .  तुम्ही ज्याला ‘POA’ दिली असेल ती व्यक्ती तुमच्या वतीने अन्य व्यक्तीला ‘POA’ देऊ शकत नाही.  तुम्ही ब्रोकरला जरी ‘POA ‘दिली असेल तरी तुमचे  अधिकार अबाधित राहतात. व तुम्ही केव्हाही ते अमलात आणू शकता.
शेअर्स खरेदी वा विक्री करण्याचा अधिकार ‘POA’ द्वारा देऊ नका. यासाठी ‘POA’ मध्ये ‘PORTFOLIO MANAGEMENT ‘चे अधिकार असणारे कलम असणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही दिलेल्या‘POA’च्या आधारे केलेल्या प्रत्येक व्यवहाराची माहिती तुम्हाला मिळावयास पाहिजे.तुम्ही दिलेल्या ‘POA’चा उपयोग ब्रोकर तुमच्या  व्यवहारासाठीच करू शकतो . ब्रोकरच्या वैयक्तिक किंवा त्याच्या  धंद्याशी संबंधीत व्यवहारासाठी किंवा अन्य ग्राहकांच्या व्यवहारासाठी त्या ‘POA’ चा उपयोग होता कामा नये. तसेच तुमचे  अन्य ब्रोकरकडे असलेले देणे तो या ‘POA’चा उपयोग करून वसूल करू शकत नाही.
‘POA’ देणे सेबीने किंवा ‘BSE’ किंवा ‘NSE’ने सक्तीचे केलेले नाही/ हे सर्वस्वी तुच्या मर्जीवर अवलंबून आहे.तुम्ही दिलेली ‘POA’ तुम्ही कधीही रद्द करू शकता.
मला वाटते आता तरी तुमची ‘POA’ ची भीती गेली असेल.
आता एक अगत्याचे सांगणे, तुम्ही ब्रोकरशी बोलताना फक्त विषयाशी संबंधीत व जेवढ्यास तेव्हढेच बोला. अनवधानाने किंवा अगदी तणावपूर्ण परिस्थितीत सुद्धा त्याच्या ज्ञानावर अवाजवी विश्वास दाखवू नका किंवा “शेठ आज तुम्ही या व्यवसायात इतके वर्ष आहात तुम्ही काय आमच्यासाठी अयोग्य करणार आहात कां? तुमच्या ज्ञानाचा आमच्या भल्यासाठी उपयोग झाला तर चांगले!” असे संवाद ब्रोकरच्या ऑफिसमध्ये गेल्यावर कधी करू नका. लक्षात ठेवा एका प्रकारे तुम्ही ब्रोकरला ही तोंडी ‘POA’ दिल्यासारखेच होते. ब्रोकर याचा गैरफायदा घेऊ शकतो. तुमच्या खात्यावरचे व्यवहार तुम्हीच स्वतः तुमच्या ज्ञानावर व निर्णय घेण्याच्या शक्तीवर अवलंबूनच करा. म्हणजे दुसऱ्याला दोष द्यायची किंवा हळहळ करायची वेळ येणार नाही..
‘MADAM,मी तुम्हाला एक प्रश्न विचारू ? तुम्हाला राग तर येणार नाही ?’  कुलकर्णी थोडे चाचरत म्हणाले.
‘ विचारा कि काय विचारायचे असेल ते ! खुशाल विचारा!
“MADAM, तुम्ही ‘POA’ दिली आहे कां?
त्यांना सांगितल आणि तुम्हाला पण सांगते नाही मी दिली नाही व देण्याचा विचारही नाही. तुम्हीसुद्धा ‘POA’ दिलीच पाहिजे असे बंधन तुमच्यावर नाही जर ‘POA’ द्यायचा निर्णय तुम्ही घेतलात तर पुढील पथ्ये जरूर पाळा
(१)    व्यवहार चोख ठेवा
(२)   ‘POA’ विशिष्ट कामासाठी किंवा कालावधीसाठीच द्या.
(३)   गैर किंवा चुकीच्या व्यक्तीला ‘POA’ देऊ नका. ‘POA’ ची एक कोपी तुमच्याजवळ ठेवा.
(४)   काम झाल्यावर ‘POA’ रद्द करा.
(५)  आपल्या ‘DMAT’ तसेच ट्रेडिंग अकौंटवर सतत लक्ष ठेवा. गाफील राहू नका.
(६)   सावधान रहा आणी लक्ष्मीला तुमच्या घरी येण्यासाठी प्रसन्न करा.
ही सर्व काळजी घेतल्यास आपण ‘POA’च्या चक्रव्युहात न अडकता सहीसलामत बाहेर पडाल.
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

माझी वाहिनी – लेख ४

मागील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा  
(हा लेख पहिल्यांदा ‘माझी वाहिनी’ या मराठी मासिकात प्रकाशित झाला होता)
‘माझी वहिनी’ मासिकाच्या जानेवारी महिन्याच्या अंकापासून आम्ही वाचकांच्या मनात शेअरमार्केटचे इवलेसे रोप लावले आहे. आता या रोपाने थोडेसे मुळ धरले असेल. २ इवली इवली छोटी पाने उगवली असावीत असे मला वाटते. एक पान ‘DMAT’ चे व एक पान ट्रेडिंग अकौंटचे. आता या रोपाला वेळेवर खत  पाणी घालून त्याचा वृक्ष कसा होईल , ते कसे बहरेल यासाठी विचारपूर्वक एकेक पाउल  पुढे टाकले पाहिजे.
फेब्रुवारीच्या अंकातच मी आपल्याला कबूल केले होते की मी तुम्हाला जुनी शेअर certificates जी पेपर  रुपात आहेत ती DMAT मध्ये म्हणेज इलेक्ट्रोनिक रुपात कशी आणायची याची प्रक्रिया सांगेन. या प्रक्रियेची जशी ‘माझी वहिनी’ च्या वाचकांना उत्सुकता आहे तशी बर्याच जणांना असते हे मला सोसायटीतल्या लोकांशी गप्पा मारताना जाणवलं. तसा त्यांना हि प्रक्रिया समजावून सांगायचा योगायोगही जुळून आला किंवा मुद्दाम सोसायटीतल्या लोकांनी जुळवून आणला असं म्हणा !!
आमच्या सोसायटीचे वार्षिक गेटटुगेदर होते. २ दिवस भरगच्च कार्यक्रम होता. सोसायटीच्या सुचना-फलकावर सर्व कार्यक्रम लिहिला होता. मी सकाळी फिरायला निघाले तेव्हा सुचना-फलकावर माझे नाव वाचले. ‘व्यवसाय-मार्गदर्शन – मार्केट आणी मी : भाग्यश्री फाटक – वेळ सकाळी १०वाजता’
मला थोडासा राग आला. मी सेक्रेटरीकडे गेले तर ते म्हणाले
‘रागावताय कशाला! तुमचा  ‘मार्केट आणी मी ‘ हा ब्लोग वाचला. अहो दुनियेला सांगता तर मग सोसायटी सभासदांनाही थोडेसे सांगा की!
‘बरं, बरं’ म्हणत त्यांची विनंती मान्य करून मी १०वाजता खाली गेले . थोडेसे मेम्बर होते. मी बरयाच शंकांना उत्तरे दिली. आमच्या सोसायटीतले एक सिनिअर मेम्बर भास्करराव मात्र त्यांची जुनी सर्तिफीकेट घेवून आले होते. ती  ‘DMAT ‘कशी करायची याबद्दल त्यांना माहिती हवी होती. त्यांना जी माहिती दिली तीच आता तुम्हाला देते. त्यांना उपयोग झाला तसा तुम्हाला हि होईल हि आशा !!
मी उठले आणी म्हणाले “ नमस्कार सर्व वहिनींचे आणी भाऊजींचे स्वागत. आहे. जे कोणी गेल्या २ भागात गेरहजर असतील त्यांनी जानेवारी व फेब्रुवारीचा ‘माझी वहिनी’ हा अंक वाचा.
भास्करराव म्हणाले –
‘MADAM’ तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ‘DMAT’ आणि TREDING अकौंट उघडले आहेत. जुनी शेअर-सर्टिफिकेट शोधली आहेत. आता काय करायचे ते सांगा.’
त्यांनी ऐकलं आणि आता सर्वजण लक्ष देवून ऐका.
(१)प्रथम एक वही करा . त्यात जुन्या शेअर सरतीफिकेतमधील सर्व माहिती लिहून काढा.
(२)त्या कंपन्या अस्तित्वात आहेत की बंद पडल्या आहेत ते बघा. कधी कधी या कंपन्या डबघाईला आल्या असतील तर उगीचच खटपट करून होते . डोंगर पोखरून उंदीर काढल्याची गत.
(३)जर चालू असतील तर ब्रोकरकडे जावून त्या कंपनीच्या शेअरचा भाव काय चालू आहे ते विचारा. किंवा टी व्ही वर शेअर मार्केटबद्दल ज्या वाहिन्या चालतात त्या वहिनींच्या टिकरवर त्या शेअरचाभाव बघा.
(३) नंतर ब्रोकरकडून ‘DRF’ फार्म घेवून या. ’DRF’  म्हणजेच ‘DEMATEREALIZATION REQUEST FORM’. (मी सर्वांना दाखवण्यासाठी या फार्मच्या कॉपी नेल्या होत्या. त्यामुळे मी सर्वांना त्या दाखवल्या.)
भास्करराव म्हणाले
‘MADAM, शेअर सर्तिफीकेट आहेत तशीच ठेवून शेअर्सचा व्यवहार होऊ शकत नाही कां?’
मी म्हणाले
‘नाही, जर शेअर्सची खरेदीविक्री करायची असेल तर शेअर्सचे ‘DEMATERIALIZATION ‘  झाल्यावरच करता येते. Physical म्हणजेच कागदी स्वरूपात असलेल्या शेअर्सचे रूपांतर ‘ELECTRONIC’रुपात करावे लागते. जशा घरात नोटा असतात त्या आपण बँकेच्या खात्यावर जमा करतो तेव्हा आपल्या अकौंटवर ते पैसे दिसतात. तसेच याही बाबतीत आहे.
‘ISIN’ नावाचा एक नंबर प्रत्येक शेअरला दिलेला असतो .हा नंबर ‘UNIQUE’ असतो. ‘इसीन’ (INTERNATIONAL SECURITIES IDENTIFICATION NAMBAR).  हा ‘IN’ व पुढे १० अंक असा १२आकडी असतो.  ‘DMAT’ केलेल्या शेअर्सना ‘DISTINCTIVE’ नंबर किंवा ‘CERTIFICATE ‘ नंबर किंवा ‘FOLIO’ नंबर नसतात.
(४) शक्यतो सर्व फार्म इंग्लिशमध्ये आणी ‘CAPITAL LETTERS ‘  मध्ये भरा.
(५) फ्री सिक्युरिटीस आणी ‘LOCKED IN SECURITIES’ साठी व वेगवेगळ्या लॉक-इन पिरीयडसाठी वेगवेगळे ‘DRF’ फार्म भरा .लॉक-इन शेअर्सची उदाहरणे म्हणजे कर्मचार्यांना दिलेले सवलतीच्या दरात किवा मोफत दिलेले शेअर्स तसेच कंपनी प्रमोटर्सनी घेतलेले शेअर्स. असे शेअर्स शेअर्सहोल्डर्स विशिष्ट कालावधीसाठी विकू शकत नाहीत. आणखी उदाहरणे द्यावयाची तर ‘VENTURE CAPITAL FUND’ ला अलोट केलेले शेअर्स.
(६)DEMATEREALISATION’ असा शिक्का मारा किंवा हाताने लिहा.या सर्व फार्म्सची आणी शेअर सर्तीफिकेटची ‘ZROX’ कॉपी मात्र तुमच्याजवळ रेकार्डसाठी ठेवण्यास विसरू नका.
(७)हे सर्व फार्म्स तुमचा ‘DMAT’ अकौंट ज्या ब्रोकर किंवा डीपी कडे असेल त्याच्याकडे द्यावा.
(८)ब्रोकर किंवा डीपी ‘DRF’ तसेच त्याला जोडलेली सर्व कागदपत्रे चेक करून ‘REGISTRAR AND TRANSFER AGENT’ म्हणजेच RTAकडे पाठवतो.
(९)RTA शेअर सर्तीफिकेट बरोबर आहेत हे तपासून त्यातील शेअर्सचे ‘DEMATEREALIZATION’  कन्फर्म करतो . या नंतर शेअर्स ‘DMAT’ अकाउन्तमध्ये जमा होतात आणी ती  शेअर सर्तीफिकेट‘DISTROY’ केली जातात.
शेअर्स ‘DEMATEREALISED’ करण्यासाठी चार्जेस आकारले जातात. हे चार्जेस वेगवेगळ्या ब्रोकर व डीपीकडे वेगवेगळे असतात आणी वेळोवेळी ते बदलले जावू शकतात म्हणून त्यांची यादी मी देत नाही.
आपल्या चुकीमुळे किंवा अन्य काही कारणांमुळे ‘DRF’  RTA  किंवा कंपनीने रिजेक्ट केल्यामुळे परत आला  तर ‘REJECTION’ चार्जेस आकारतात.
भास्करराव इतकं सगळ ऐकून म्हणाले – ‘अहो पण एवढी कटकट करण्यापेक्षा कोणा एजंटला कमीशन दिले तर हे काम होत नाही कां?’
मी हसून म्हणाले – ‘ नाही होत हो. ‘DMAT’ अकौंट उघडावाच लागतो.’
भास्कररावांच अजून समाधान झालेलं नव्हतं – ‘तुमच्या माहितीप्रमाणे कुणाचे शेअर्स काही कारणाने रिजेक्ट होऊन परत आले कां ?’
‘ हो! हो! त्यात विशेष असे काही नाही. कधी कंपनीचे नाव बदलले , कधी एका कंपनीच्या दोन कंपन्या झाल्या म्हणून, कधी एका शेअरचे दोन किंवा अधिक शेअर्समध्ये विभाजन झाले म्हणून, किंवा सही जुळत नाही म्हणून अशा अनेक कारणांमुळे ‘DRF’ रिजेक्ट होऊन परत येतो. रिजेक्शनबरोबर आलेल्या पत्रामध्ये रिजेक्शनचे कारण लिहिलेले असते . त्यासाठी तुम्हाला तुमच्याजवळ असलेली जुनी शेअर्स सर्तिफीकेत पाठवून किंवा रिजेक्शनबरोबर आलेल्या पत्रानुसार आपण कारवाई केली तर कंपनी तुम्हाला जरूर ती  शेअर सर्तिफीकेत पाठवून देते. ही नवीन सर्तिफीकेत ‘DRF’ बरोबर वर दिलेल्याप्रमाणे प्रक्रिया करून पाठवलीत  की तुमचे शेअर्स ‘DEMATEREALISE’ होवून तुमच्या ‘DMAT’ अकौंटला  जमा होतील.
तुम्ही इष्टापत्ती समजून ही सगळी प्रक्रिया केल्यास रद्दीत पडलेल्या शेअर सर्तिफीकेटचे सोने होते. यासाठी आपण थोडीशी चिकाटी व वेळ देवून पत्रव्यवहार करावा लागतो.
अहो भास्करराव ऐका – माझ्याकडे मालतीबाई संगीताच्या क्लासला येत असत त्यांच्या वडीलांनी त्यांच्या नावावर काही शेअर्स घेतले होते. संकटकाळी आपल्या मुलीला आधार होईल हीच त्यामागची भावना ! पण मालतीबाईना शेअर्समधला ‘ओ ‘ की ‘ठो ‘ समजत नव्हता. त्यामुळे ते शेअर्स तसेच पडून होते. त्यांनी कंटाळा न करता सर्व प्रोसीजर केली. मला जमलं तेवढ मी त्यांना प्रोत्साहनआणि वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यांनी त्याप्रमाणे ‘DMAT’ अकौंट उघडून शेअर्स ‘DEMATEREALISE’ करून विकले. त्यांना पुरेसे पैसे मिळाले आणि त्यांच्या वडीलांचा उद्देश साध्य झाला. कागदाला सोन्याची किमत आली असं म्हणा ना!!. आता त्यांच्याकडे जे शेअर होते त्या कंपन्या चालू होत्या आणि शेअरचा भाव पण चांगला होता हा नशिबाचा भाग. पण तुम्हीसुद्धा भास्करराव हे सगळं कराआणि बघा तुमच्या नशिबात काय आहे बघा तुमच्यापण कागदचं सोनं होतंय का?
तेव्हढ्यात अजून एक सिनिअर मेम्बर कुलकर्णी उभे राहिले आणि मला म्हणाले
‘मी ब्रोकरच्या ऑफिसमध्ये ट्रेडिंग अकौंट उघडावयास गेलो होतो तर त्यांनी मला ‘POWER OF ATTORNEY’ चा फार्म दिला आणी हा फार्म भरून द्यावा लागेल असं सांगितलं. मला थोडी शंका आली आणि समजलं नाही कि काय करू. तुम्ही मला ‘ POWER OF ATTORNEY’ बद्दल काही सांगू शकता का?
त्यांना सांगितलं आणि तुम्हालाहि सांगेन पण त्यासाठी तुम्हाला ‘माझी वहिनी ‘ चा मे महिन्याचा अंकाची वाट बघावी लागेल..
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

माझी वाहिनी – लेख ३ – महिला दिन विशेष

मागील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा  
इसवी सन – २००१
स्थळ – शेअर ब्रोकरचे ऑफिस
घाबरी घुब्री थोडीशी गोंधळून गेलेली मी म्हणजेच श्रीमती भाग्यश्री प्रकाश फाटक!
“शेअरमार्केट म्हणजे काही वरणभाताचा कुकर लावणे नव्हे किंवा कांदेपोहे करणे नव्हे . येथे भल्याभल्यांची भंबेरी उडते. तुम्ही आपल्या चुलीजवळ बऱ्या. नवर्याचे असतील नसतील तेव्हडे पैसे घालवाल“
अश्या अनाहूत सल्ल्याने माझे झालेले स्वागत !
इसवी सन – २०१३
स्थळ – तेच शेअर ब्रोकरचे ऑफिस
ऑफिसमध्ये सन्मानाने गेलेली मी म्हणजेच श्रीमती भाग्यश्री प्रकाश फाटक
“मी ओळख करून देतो. ह्या ठाणे शाखेच्या मोठ्या गुंतवणूकदार , अतिशय अभ्यासू , यशस्वी शेअर मार्केट व्यावसायिक आहेत. कोणालाही काही शंका असेल तर प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण खात्रीलायक रीत्या देणारी व्यक्ती म्हणजेच या फाटक MADAM.”
आणि माझ्याकडे बघण्याच्या दृष्टीकोनात झालेला अमुलाग्र बदल.. माझ्या एक तपाच्या अविश्रांत मेहेनतीचे फळ…
आता मला ठणकावून सांगावेसे वाटते की वरणभाताचा कुकर लावता लावता , कांदे पोहे करता करता शेअरमार्केट करता येते. जी गृहिणी संसारातील प्रत्येक अडचणीला तोंड  देवून संसार संभाळते ती  कोणतीही गोष्ट यशस्वीरीत्या करू शकते. अहो मी अशिक्षित होते , मला नोकरी मिळू शकली नाही म्हणून शेअरमार्केटमध्ये शिरले असे मात्र नाही . माझ्या आयुष्याने व आजूबाजूच्या परिस्थितीने जशी वळणे घेतली त्या वाटेने मला प्रवास करावा लागला.
गेल्या १२ वर्षात माझ्यात तसे खूप बदल झाले पण तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणीची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. आणि या पुढे मी जे सांगणार आहेत ते कदाचित तुम्हाला सर्वात जास्त जाणवेल.
आता मी सागते त्या प्रसंगात स्वताला ठेवण्याचा प्रयत्न करा. साल २००० , ४०-४२ वर्षाची, मी २० एक वर्षांनी नोकरी शोधायला निघालेली. माझं graduation १९७४ साली झालेलं. कॉम्पुटरच्याknowledge च्या नावानी शंखनाद. बऱ्याच जागी वयाच्या अटीत मी बसत न्हवते. फारसे काही interview calls येत नव्हते. जे येत होते त्यांना काही अर्थ नव्हता. या सगळ्या मध्ये एका महाभागाने मला मुक्ती चा मार्ग दाखवला आणि मला नोकरीच्या मोहमायेतून  बाहेर काढलं. तुम्ही विचार करत असाल कि त्या पठ्ठ्याने असं काय सांगितलं? ऐका तर मग –
‘तुम्ही ४० वर्षाच्या , तुम्हाला जितका पगार देणार तितक्या पगारात आम्हाला २०-२२ वर्षाची computer educated मुलं मिळतात , तर मग आम्ही तुम्हाला नोकरी का द्यावी ?’
प्रश्न अगदी बरोबर होता, उत्तर माझ्याकडे बिलकुल नव्हतं.
आता मी तुम्हाला सांगते कि मी या प्रश्नापर्यंत कशी आले?. असं नाही कि मी कधी नोकरी केलेली नव्हती. लग्न आधी मी commerce graduate होते. लग्ना नंतर वकिली चं शिक्षण घेतलं.lecturer म्हणून नोकरी लागली. नोकरी करायची म्हणजे मला माझ्या लहान मुलीला शेजारी सोडावं लागे, तिच्या कडे थोडं दुर्लक्ष होई. हे सगळं मनाला पटत नव्हत. स्वताची पोळी भाजण्या साठी इतरांकडे दुर्लक्ष करण योग्य नाही असं वाटत होतं. जीवाची ओढाताण होत होती. घरातही या गोष्टींवर चर्चा होवू लागली. आयुष्यात लहानपणाची काही वर्ष फार महत्वाची असतात. त्यावेळी आईचा सहवास मिळाला नाही , संस्कार घडले नाहीत तर पोरके पण वाटतो. त्यामुळे मुलं लहान असताना नोकरी करू नये व मुलं मोठी झाल्यावर पुन्हा नोकरी करावी, स्वत:चं career करावं असं ठरलं.
आणि आधी सांगितलं ते या नंतरचं सगळं रामायण. आता मागे वळून बघितल तर हसायला येतं पण त्या वेळी मात्र ते एकून तोंडचं पाणी पळाल होतं. एक गोष्ट मात्र साफ होती, आता जे काय करायचं तिथे वयाची अट असता कामा नये, मला जे आधी पासून येतं त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि आपल्या श्रमाला साजेसा पैसा त्यातून मिळाला पाहिजे. नोकरी मिळणं आता मुश्कील आहे हे साफ होतं, आणि मिळाली तरी ती काही मला पाहिजे तशी मिळणार नव्हती. हा सगळा विचार करत असताना एक सुंदर कल्पना त्या वेळी माझ्या मनात आली आणि त्याच कल्पनेचा हा सगळा प्रवास. २००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock market मधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे.
आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकांकडूनstock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे.
ज्या क्षेत्रात स्त्रियांचा वावर फार कमी प्रमाणात असे, तिथे मी आज पाय घट्ट रोवून उभी राहिले आहे. गेल्या दहा वर्षात अनेक वादळे आली , तरीही मी अजून खंबीर उभी आहे. ईश्वरी कृपा, अफाट प्रयत्न आणि नशीब यामुळे हे सगळं शक्य झालेल आहे.
खरं पाहता हि माझ्या आयुष्याची दुसरी खेळी म्हणावी लागेल. ज्या वयात सर्व जण ऐछिक निवृत्ती घेत होते, त्याच वेळी मी हा नव्याचा शोध घेत होते. घरात कोणतीही आबाळ होवू न देता माझी हि महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली. तुम्हाला हि हा सगळं अनुभव घेता यावा, यातली मजा चाखता यावी हा माझा प्रयत्न आहे.
एक अजून गोष्ट साधायची आहे मला. गेल्या 10 वर्षात मला कळलंय कि share market हे इतकं भीतीदायक नाहीये. share market हे खरं तर खूप मजेशीर आहे, ते एका क्रिकेट च्या matchप्रमाणे रोमांचक आहे. फ़क़्त त्यातली मजा कळायची देर आहे. तीच मजा, तोच अनुभव, तीच रोमांचकता तुमच्या पर्यंत आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
भेटूच लवकर ..
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा