माझी वाहिनी – लेख २

मागील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
(हा लेख पहिल्यांदा ‘माझी वाहिनी’ या मराठी मासिकात प्रकाशित झाला होता)
“madam! madam! मी तुमच्याशी २ मिनिट बोलू का?” कुठून तरी आवाज आला
माझ्या मनात विचार आला “इथे कोण आहे बाबा ! या लग्नाच्या HALLमध्ये madamवाला ?“ मी कानोसा घेवू लागले. तेव्हा ते गृहस्थ मला दिसले.मी त्याना ओळखले. मी म्हणाले “ कुलकर्णी तुम्ही होय ! मी घाबरलेच थोडीशी“
ते म्हणाले “अहो तुम्ही एकट्याच इथे काय करताय? तिकडे तुमच्या मैत्रिणी तुमची वाट पहातायत  आहेत. तुमची खुर्ची पकडून ठेवलीये”
माझ्या मनात विचार आला “ अरे बापरे ! आज माझी एवढी चौकशी ! काहीतरी गौडबंगाल असणार.” तरी म्हटलं बघू काय आहे ते. गेले आणि माझ्यासाठी ‘पकडून’ ठेवलेल्या खुर्चीवर स्थानापन्न झाले. सगळ्या मैत्रिणी जमल्या होत्या आणि एकदम सगळ्यांनी बोलायला चालू केलं
सुधा : काय ग हल्ली पैसे छापते आहेस की काय? आम्हाला भेटायला वेळही  नाही. आमच्यासाठी थोडे पैसे ठेव.
माया: काय ग ! माझ्या मुलाला नोकरी मिळत नाही तर नोकरी मिळेपर्यंत काही काळ तो शेअरमार्केट व्यवहार करून पैसे मिळवू शकेल का ?
मीना: तू शेअरमार्केट करतेस मला माहितच नव्हते. मला कधी बोलली नाहीस ती! मला मदत करशील का ? माझ्या यजमानांकडे काही शेअर्स आहेत . त्या शेअर्समधून काही पैसे उगवतील का ? मला माझ्या मुलाच्या शाळेचे डोनेशन भरायला उपयोग होईल.
मी जरा गोंधळूनच गेले. बायका काय कमी होत्या कि तितक्यात संध्याचे यजमान आले. ते पण सुरु !!
“किती दिवसापासून तुम्हाला भेटायचे होते. आज योग जुळून आला आहे. तुमचा चांगलाच जम बसला आहे हे ऐकून आहे. मी आता स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. पैसे मिळाले आहेत. तुम्ही काही शेअर्सची नावे मला सांगाल का ? ते विकत घेवून तुम्ही सांगाल तेव्हा विकीन. माझ्या रिकाम्या वेळेचा चांगला उपयोग होईल. माझा वरखर्च बाहेरच्या बाहेर निघेल.”
मी म्हणाले  “तुमचे सगळयांचे प्रश्न संपले का?” एका मिनिटासाठी शांतता झाली
“ऐकूण तुम्हाला मार्केटबद्दल खूप कुतूहल आहे तर..पण शेअरमार्केट म्हणजे काही जादूचा दिवा किंवा द्रौपदीची थाळी नाही. कोणत्याही मार्केटमध्ये कोणताही व्यवहार करायचा असेल तर त्यासाठी एक प्रोसीजर असते. तुमच्यापैकी कोणालाही ही प्रोसीजर माहीत आहे का?”
परत एकदा शांतता पसरली आणि डोकी ‘नाही’ सांगण्यासाठी हलली !!
“ नाही ना मग थांबा थोडं ! अधीर होऊ नका! लग्नाला आलोय न आपण सगळे?.मग आधी अक्षता लग्नाच्या अक्षता टाकू मग शेअर मार्केटचं लग्न लावू “
लग्न लागल्यानंतर आम्ही सर्वजण HALLमध्येच बाजूला बसलो.
बसल्यानंतर किशोरी म्हणाली “मीही तुमच्यासारखीच एक गृहिणी आहे. मुलांची लग्न होऊन ते आपापल्या घरी सुखी आहेत. मला आता संसारातून डोके वर काढायला उसंत मिळालीये. मला या वेळेचा चांगला उपयोग करून शेअरमार्केटमध्ये व्यवहार करता येईल असं वाटतंय पण शेअरमार्केट बद्दल कोणालाही विचारलं की प्रथम DEMATअकौंट बद्दलच बोलणं होतं. हे म्हणजे नोकरीचं नाव काढलं की BIODATA च्या विषय निघतो तसं काही आहे का? तुम्ही आम्हाला DEMATहे काय लफड आहे ते स्पष्ट करून सांगाल तर बरं होईल!
प्रश्न मला अपेक्षितच होता. सगळ्यांची गाडी सुरवातीला तिथेच अडकते. मग काय तर मैत्रीधर्म पार पाडण्यासाठी मी बोलायला सुरु केलं.
“हे पहा DEMATअकौंट म्हणजे तुमच्या गळ्यातला ताईत समजा. DEMAT अकौंट शिवाय शेअरमार्केटमधील एकही पान हलत नाही. एकवेळ ब्रोकरकडे न जाता तुम्ही इंटरनेटवरून व्यवहार करू शकता. पण DEMATअकौंट काढावाच लागतो. तुम्ही घाबरून जाण्याचे कारण नाही. तुम्ही जसे पैश्याचे व्यवहार बचतखात्यावर करता तसे शेअरचे व्यवहार DEMAT अकौंटवरून करता येतात. पैसे जमा करता किंवा काढता.त्याची नोंद ज्या पद्धतीने तुम्हाला पासबुकावर दिसते त्याप्रमाणे शेअर खरेदी केले किंवा विकले तर त्याची नोंद तुम्हाला DEMATअकौंटच्या स्टेटमेंटवरून तपासता येते.”
त्यापुढे मी त्यांना जे काही संगीतलं ते आता तुम्हाला पण सांगते. हि माहिती अत्यावश्यक आहे त्यामुळे लक्ष देवून वाचा :

  • ‘DEMAT’ अकौंट कुठल्याही ब्रोकरकडे किंवा ही सुविधा उपलब्ध असलेल्या बँकेच्या शाखेत उघडता येतो. लॉकरच्या चार्जेसप्रमाणेच याचे पैसे वर्षाला एकदा भरावे लागतात. मात्र शेअर्सच्या प्रत्येक खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी रुपये २५ ते ४० पर्यंत चार्जे आकारला जातो.
  • ‘DEMAT’ अकौंट उघडण्यासाठी असलेला फार्म भरून द्यावा लागतो.DEMAT अकौंट उघडण्यासाठी ‘PAN’कार्ड असणे जरुरीचे आहे.
  • इतर ठिकाणी आपण देतो त्या पद्धतीने वय, पत्ता यासाठी पुरावा द्यावा लागतो (Address Proof, Age proof, Photo id). तसेच फोटोआयडी आणी फोटो द्यावे लागतात . कागदपत्रांच्या प्रतींवर स्वतः सही करून प्रमाणित करावे लागतात.
  • तुमच्या बचत खात्याचा तपशील देणे गरजेचे असते. ‘MICR’ व’IFSC ‘कोड देणे आवश्यक असते. हे कोडनंबर पासबुकावर व चेकबूकावर असतात.जर आपण बचत खातं उघडलं असेल तर उत्तमच अन्यथा नवीन बचत खातं उघडाव लागतं.
  • एकदा का दमात अकौंट चालू झाला कि मग ब्रोकरकडे ट्रेडिंग अकौंट उघडावा लागतो . हा अकौंट उघडण्याची सर्व प्रोसीजरDEMAT अकौंट प्रमाणेच असते. तशीच कागदपत्र लागतात. फोटो लागतात. ब्रोकरबरोबर एक करारपत्र करावे लागते. तुम्ही फार्म पूर्णपणे वाचा. सर्व शंकाचे निरसन करून घ्या . हल्ली ट्रेडिंग अकौंट उघडावयास वेळ लागत नाही. DEMAT अकौंट ACTIVATEहोण्यास मात्र थोडे दिवस लागतात .घराजवळच ब्रोकर किंवा बँक शोधा म्हणजे नंतर सोप पडतं. ट्रेडिंग अकौंटसाठी एकदाच पैसे भरावे लागतात. तुम्ही कितीही ट्रेडिंग अकौंट आणी तीही DEMAT अकौंट उघडू शकता. परंतु एवढ्या अकौंटस वर लक्ष ठेवण सोप नाही हे काय मी तुम्हाला सागायची गरज नाही त्यामुळे एकच ट्रेडिंग अकौंट आणी एकच DEMATअकौंट उघडा हा माझा सल्ला.  ट्रेडिंग अकौंट आणी ‘DEMAT” अकौंटसाठी नामाकानाची सुविधां असते. टाळाटाळ न करता नामांकन आठवणीने करा
  • ‘DEMAT’अकौंट किंवा ट्रेडिंग अकौंट एका व्यक्तीच्या नावावर किंवा २-३ व्यक्तींच्या संयुक्त नावाने उघडता येतो. यामध्ये ‘MINOR’ व्यक्तीच्या नावानेही ही खाती उघडता येतात. परंतु अश्यावेळी प्रत्येक व्यक्तीच्या संदर्भात आवश्यक ती कागदपत्रे द्यावी लागतात. पहिला खाते धारक १८ वर्षाखालील वयाचा असल्यास पहिल्या पालकाचा फोटो द्यावा लागतो.

हे सगळं मी माझ्या http://marketaanime.com/ (मार्केट आणि मी) या ब्लोगवर सविस्तर दिलेलं आहे. त्याचाही तुम्ही उपयोग करून घेऊ शकता.
आता जर तुम्हाला शेअर मार्केटकडे वाटचाल सुरु करायची असेल तर, मी मीनाला जे करायला सांगितलं ते तुम्ही पण करू शकता
“ मीना तू तुझ्या यजमानाना DEMAT अकौंट उघडून त्यांचाकडे जे शेअर्स आहेत  ते DEMAT करायला सांग. आधी म्हणाले तसं ट्रेडिंग अकौंट पण उघडायला सांग.शेअर certificateवर ज्याच नाव जसे असेल तसाच DEMAT अकौंट व ट्रेडिंग अकौंट उघडावा लागतो. जर एकापेक्षा जास्त लोकांच्या नावावर शेअर्स असतील तर त्याच नावावर व त्याच क्रमाने नावं असलेले ट्रेडिंग आणी DEMAT अकौंट उघडावे लागतात.  त्याशिवाय शेअर्स विकता येणार नाहीत. शेअरDEMAT व्हावयास वेळ लागतो. त्यामुळे हे काम पटापट केलस तर शेअर्स विकून पैसा वेळेवर उभा करता येईल’
मी पुढील लेखामध्ये जुनी शेअर CERTIFICATES DEMAT  कशी करायची याची प्रक्रिया सांगेन. कारण बरयाच लोकांकडे  असलेली ही CERTIFICATESची रद्दी लाखो रुपयांची ठरू शकते. ते कसं वाचूया पुढच्या भागात..  भेटूच तर मग लवकर “माझी वहिनी”च्या पुढील अंकात…
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

6 thoughts on “माझी वाहिनी – लेख २

  1. Pingback: माझी वाहिनी – लेख १ | Stock Market आणि मी

  2. Pingback: माझी वाहिनी – लेख ३ – महिला दिन विशेष | Stock Market आणि मी

  3. Pingback: तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – July – Aug २०१५ | Stock Market आणि मी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.