Monthly Archives: January 2015

माझी वाहिनी – लेख २

मागील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
(हा लेख पहिल्यांदा ‘माझी वाहिनी’ या मराठी मासिकात प्रकाशित झाला होता)
“madam! madam! मी तुमच्याशी २ मिनिट बोलू का?” कुठून तरी आवाज आला
माझ्या मनात विचार आला “इथे कोण आहे बाबा ! या लग्नाच्या HALLमध्ये madamवाला ?“ मी कानोसा घेवू लागले. तेव्हा ते गृहस्थ मला दिसले.मी त्याना ओळखले. मी म्हणाले “ कुलकर्णी तुम्ही होय ! मी घाबरलेच थोडीशी“
ते म्हणाले “अहो तुम्ही एकट्याच इथे काय करताय? तिकडे तुमच्या मैत्रिणी तुमची वाट पहातायत  आहेत. तुमची खुर्ची पकडून ठेवलीये”
माझ्या मनात विचार आला “ अरे बापरे ! आज माझी एवढी चौकशी ! काहीतरी गौडबंगाल असणार.” तरी म्हटलं बघू काय आहे ते. गेले आणि माझ्यासाठी ‘पकडून’ ठेवलेल्या खुर्चीवर स्थानापन्न झाले. सगळ्या मैत्रिणी जमल्या होत्या आणि एकदम सगळ्यांनी बोलायला चालू केलं
सुधा : काय ग हल्ली पैसे छापते आहेस की काय? आम्हाला भेटायला वेळही  नाही. आमच्यासाठी थोडे पैसे ठेव.
माया: काय ग ! माझ्या मुलाला नोकरी मिळत नाही तर नोकरी मिळेपर्यंत काही काळ तो शेअरमार्केट व्यवहार करून पैसे मिळवू शकेल का ?
मीना: तू शेअरमार्केट करतेस मला माहितच नव्हते. मला कधी बोलली नाहीस ती! मला मदत करशील का ? माझ्या यजमानांकडे काही शेअर्स आहेत . त्या शेअर्समधून काही पैसे उगवतील का ? मला माझ्या मुलाच्या शाळेचे डोनेशन भरायला उपयोग होईल.
मी जरा गोंधळूनच गेले. बायका काय कमी होत्या कि तितक्यात संध्याचे यजमान आले. ते पण सुरु !!
“किती दिवसापासून तुम्हाला भेटायचे होते. आज योग जुळून आला आहे. तुमचा चांगलाच जम बसला आहे हे ऐकून आहे. मी आता स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. पैसे मिळाले आहेत. तुम्ही काही शेअर्सची नावे मला सांगाल का ? ते विकत घेवून तुम्ही सांगाल तेव्हा विकीन. माझ्या रिकाम्या वेळेचा चांगला उपयोग होईल. माझा वरखर्च बाहेरच्या बाहेर निघेल.”
मी म्हणाले  “तुमचे सगळयांचे प्रश्न संपले का?” एका मिनिटासाठी शांतता झाली
“ऐकूण तुम्हाला मार्केटबद्दल खूप कुतूहल आहे तर..पण शेअरमार्केट म्हणजे काही जादूचा दिवा किंवा द्रौपदीची थाळी नाही. कोणत्याही मार्केटमध्ये कोणताही व्यवहार करायचा असेल तर त्यासाठी एक प्रोसीजर असते. तुमच्यापैकी कोणालाही ही प्रोसीजर माहीत आहे का?”
परत एकदा शांतता पसरली आणि डोकी ‘नाही’ सांगण्यासाठी हलली !!
“ नाही ना मग थांबा थोडं ! अधीर होऊ नका! लग्नाला आलोय न आपण सगळे?.मग आधी अक्षता लग्नाच्या अक्षता टाकू मग शेअर मार्केटचं लग्न लावू “
लग्न लागल्यानंतर आम्ही सर्वजण HALLमध्येच बाजूला बसलो.
बसल्यानंतर किशोरी म्हणाली “मीही तुमच्यासारखीच एक गृहिणी आहे. मुलांची लग्न होऊन ते आपापल्या घरी सुखी आहेत. मला आता संसारातून डोके वर काढायला उसंत मिळालीये. मला या वेळेचा चांगला उपयोग करून शेअरमार्केटमध्ये व्यवहार करता येईल असं वाटतंय पण शेअरमार्केट बद्दल कोणालाही विचारलं की प्रथम DEMATअकौंट बद्दलच बोलणं होतं. हे म्हणजे नोकरीचं नाव काढलं की BIODATA च्या विषय निघतो तसं काही आहे का? तुम्ही आम्हाला DEMATहे काय लफड आहे ते स्पष्ट करून सांगाल तर बरं होईल!
प्रश्न मला अपेक्षितच होता. सगळ्यांची गाडी सुरवातीला तिथेच अडकते. मग काय तर मैत्रीधर्म पार पाडण्यासाठी मी बोलायला सुरु केलं.
“हे पहा DEMATअकौंट म्हणजे तुमच्या गळ्यातला ताईत समजा. DEMAT अकौंट शिवाय शेअरमार्केटमधील एकही पान हलत नाही. एकवेळ ब्रोकरकडे न जाता तुम्ही इंटरनेटवरून व्यवहार करू शकता. पण DEMATअकौंट काढावाच लागतो. तुम्ही घाबरून जाण्याचे कारण नाही. तुम्ही जसे पैश्याचे व्यवहार बचतखात्यावर करता तसे शेअरचे व्यवहार DEMAT अकौंटवरून करता येतात. पैसे जमा करता किंवा काढता.त्याची नोंद ज्या पद्धतीने तुम्हाला पासबुकावर दिसते त्याप्रमाणे शेअर खरेदी केले किंवा विकले तर त्याची नोंद तुम्हाला DEMATअकौंटच्या स्टेटमेंटवरून तपासता येते.”
त्यापुढे मी त्यांना जे काही संगीतलं ते आता तुम्हाला पण सांगते. हि माहिती अत्यावश्यक आहे त्यामुळे लक्ष देवून वाचा :

  • ‘DEMAT’ अकौंट कुठल्याही ब्रोकरकडे किंवा ही सुविधा उपलब्ध असलेल्या बँकेच्या शाखेत उघडता येतो. लॉकरच्या चार्जेसप्रमाणेच याचे पैसे वर्षाला एकदा भरावे लागतात. मात्र शेअर्सच्या प्रत्येक खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी रुपये २५ ते ४० पर्यंत चार्जे आकारला जातो.
  • ‘DEMAT’ अकौंट उघडण्यासाठी असलेला फार्म भरून द्यावा लागतो.DEMAT अकौंट उघडण्यासाठी ‘PAN’कार्ड असणे जरुरीचे आहे.
  • इतर ठिकाणी आपण देतो त्या पद्धतीने वय, पत्ता यासाठी पुरावा द्यावा लागतो (Address Proof, Age proof, Photo id). तसेच फोटोआयडी आणी फोटो द्यावे लागतात . कागदपत्रांच्या प्रतींवर स्वतः सही करून प्रमाणित करावे लागतात.
  • तुमच्या बचत खात्याचा तपशील देणे गरजेचे असते. ‘MICR’ व’IFSC ‘कोड देणे आवश्यक असते. हे कोडनंबर पासबुकावर व चेकबूकावर असतात.जर आपण बचत खातं उघडलं असेल तर उत्तमच अन्यथा नवीन बचत खातं उघडाव लागतं.
  • एकदा का दमात अकौंट चालू झाला कि मग ब्रोकरकडे ट्रेडिंग अकौंट उघडावा लागतो . हा अकौंट उघडण्याची सर्व प्रोसीजरDEMAT अकौंट प्रमाणेच असते. तशीच कागदपत्र लागतात. फोटो लागतात. ब्रोकरबरोबर एक करारपत्र करावे लागते. तुम्ही फार्म पूर्णपणे वाचा. सर्व शंकाचे निरसन करून घ्या . हल्ली ट्रेडिंग अकौंट उघडावयास वेळ लागत नाही. DEMAT अकौंट ACTIVATEहोण्यास मात्र थोडे दिवस लागतात .घराजवळच ब्रोकर किंवा बँक शोधा म्हणजे नंतर सोप पडतं. ट्रेडिंग अकौंटसाठी एकदाच पैसे भरावे लागतात. तुम्ही कितीही ट्रेडिंग अकौंट आणी तीही DEMAT अकौंट उघडू शकता. परंतु एवढ्या अकौंटस वर लक्ष ठेवण सोप नाही हे काय मी तुम्हाला सागायची गरज नाही त्यामुळे एकच ट्रेडिंग अकौंट आणी एकच DEMATअकौंट उघडा हा माझा सल्ला.  ट्रेडिंग अकौंट आणी ‘DEMAT” अकौंटसाठी नामाकानाची सुविधां असते. टाळाटाळ न करता नामांकन आठवणीने करा
  • ‘DEMAT’अकौंट किंवा ट्रेडिंग अकौंट एका व्यक्तीच्या नावावर किंवा २-३ व्यक्तींच्या संयुक्त नावाने उघडता येतो. यामध्ये ‘MINOR’ व्यक्तीच्या नावानेही ही खाती उघडता येतात. परंतु अश्यावेळी प्रत्येक व्यक्तीच्या संदर्भात आवश्यक ती कागदपत्रे द्यावी लागतात. पहिला खाते धारक १८ वर्षाखालील वयाचा असल्यास पहिल्या पालकाचा फोटो द्यावा लागतो.

हे सगळं मी माझ्या http://marketaanime.com/ (मार्केट आणि मी) या ब्लोगवर सविस्तर दिलेलं आहे. त्याचाही तुम्ही उपयोग करून घेऊ शकता.
आता जर तुम्हाला शेअर मार्केटकडे वाटचाल सुरु करायची असेल तर, मी मीनाला जे करायला सांगितलं ते तुम्ही पण करू शकता
“ मीना तू तुझ्या यजमानाना DEMAT अकौंट उघडून त्यांचाकडे जे शेअर्स आहेत  ते DEMAT करायला सांग. आधी म्हणाले तसं ट्रेडिंग अकौंट पण उघडायला सांग.शेअर certificateवर ज्याच नाव जसे असेल तसाच DEMAT अकौंट व ट्रेडिंग अकौंट उघडावा लागतो. जर एकापेक्षा जास्त लोकांच्या नावावर शेअर्स असतील तर त्याच नावावर व त्याच क्रमाने नावं असलेले ट्रेडिंग आणी DEMAT अकौंट उघडावे लागतात.  त्याशिवाय शेअर्स विकता येणार नाहीत. शेअरDEMAT व्हावयास वेळ लागतो. त्यामुळे हे काम पटापट केलस तर शेअर्स विकून पैसा वेळेवर उभा करता येईल’
मी पुढील लेखामध्ये जुनी शेअर CERTIFICATES DEMAT  कशी करायची याची प्रक्रिया सांगेन. कारण बरयाच लोकांकडे  असलेली ही CERTIFICATESची रद्दी लाखो रुपयांची ठरू शकते. ते कसं वाचूया पुढच्या भागात..  भेटूच तर मग लवकर “माझी वहिनी”च्या पुढील अंकात…
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

माझी वाहिनी – लेख १

(हा लेख पहिल्यांदा ‘माझी वाहिनी’ या मराठी मासिकात प्रकाशित झाला होता)
छोटी छोटी पाऊले टाकत २०१४ साल दाराजवळ येवून ठेपले आहे नुकत्याच संपलेल्या दीपोत्सवाच्या प्रकाशात न्हाऊन निघाल्याने नवीन विचार, नव्या दिशा , नव्या वाटा दिसू लागल्या असतील. आपण सर्वानी गुंतवणुकीच्या सर्व संधींचा विचार केला असेल व नव्या वर्षाला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाला असाल. बचतीचा व खर्चाचा एक आराखडा तयार केला असेल..
आपण २०१४ मध्ये गुंतवणुकीसाठी जुन्या विचारांची कात टाकून नवा विचार करूया का ?बदललेल्या काळाचा, व तंत्रज्ञानाचा विचार करून काही गुंतवणुकीच्या नव्या संधींचा विचार करूया का !आपली गरज, मिळणारा वेळ,आपले वय, जवळ असलेला पैसा व गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न, या सर्वांचा विचार करून अनुरूप गुंतवणूक केली तर!
आपण सर्वजण इतके दिवस पोस्ट, बॅंका, मुचुअल फंड ,सोने, घर, शेतजमीन, विमा, कर्जरोखे करमुक्त उत्पन्न असलेले सरकारी वा बिन सरकारी Bonds,यामध्ये गुंतवणूक करत असाल. केली असेल, करणार असाल . त्यामध्ये असणारे फायदे तोटे आपल्याला माहिती असतील पण या साऱ्या गुंतवणुकीमध्ये शेअर बाजारातील गुंतवणुकीला स्थान आहे का ?
दचकलात! घाबरलात! गोंधळलात! की बाचकलात! की बिथरलात! अहो,पण तुमची तरी काय चूक आहे म्हणा! तुमचेही बरोबर आहे .कारण आजपर्यंत तुम्ही शेअरबाजारात व्यवहार करून फसलेल्या लोकांच्या कथाच ऐकलेल्या आहेत . शेअर्स खरेदी केल्यानंतर मिळालेली शेअरसरटीर्फिकेट खोटी होती. शेअर्स विकल्यानंतर रक्कम मिळायला खूप उशीर लागला. आपले शेअर्स कोणत्या भावाला विकले गेले किंवा खरेदी केले याला कोणतेही प्रमाण नव्हते. ब्रोकर जी किमत सांगेल त्यावर विश्वास ठेवावा लागे.असे शेअरबाजाराबद्दल अनेक गैरसमज आहेत. शेअरबाजार हा एक बागुलबुवाच निर्माण केला गेला .राख फासून जाण्याची बुद्धी झाली का ? शेअरबाजाराच्या नादी लागून अमका देशोधडीला लागला हे व असे सर्वत्र बोललेले ऐकू येते. परंतु सध्या अशी परीस्थिती नाही . तंत्रज्ञानात होत असलेली सुधारणा व व्यवहारात आलेली पारदर्शकता व कायद्याचे संरक्षण या कारणामुळे तुम्ही शेअर बाजारातील गुंतवणुकीचा विचार करू शकता  वाचकहो ! तुम्ही म्हणाल “तुम्ही कोण ? आम्हाला हे सर्व का सांगत आहात ?
अहो!मी सुद्धा तुमच्यातीलच एक आहे मी जेव्हा शेअरबाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तेव्हा मी एक गृहिणीच होते घर मुले नवरा हेच माझे विश्व होते. आमच्या घरात सासरी किंवा माहेरी कुणीही शेअरमार्केटमध्ये व्यवहार करत नव्हते.बरयाच लोकांनी मला तुमच्यासारखेच शेअरबाजारातले किस्से ऐकवले, धोके सांगितले. परंतु मी सर्व माहिती करून घेवून शेअरमार्केटचे शिवधनुष्य पेलायचे ठरवले. प्रयत्न, चिकाटी, जिद्द, सावधगिरी व परमेश्वरी कृपा या जोरावर गेली दहाबारा वर्षे शेअरमार्केटमध्ये यशस्वी वाटचाल करीत आहे .   शेअरबाजारातील खाचखळगे धोके मला समजले आहेत . त्यामुळे तुम्हाला गुंतवणूक करताना ठेच लागू नये किंवा तुम्ही दूर फेकले जाऊ नयेत असे मला वाटते.त्याचबरोबर तुम्हाला चांगले उत्पन्न मिळावे असे मला वाटते मी जेव्हा समाजात वावरते लोकांबरोबर शेअरमार्केटबद्दल बोलते तेव्हा मला त्यांच्या मनात असणारे शेअरबाजाराबद्दलचे आकर्षण,कुतूहल जाणवते. लोक मला विचारतात शेअरबाजारात व्यवहार कसा चालतो, शेअरबाजारातील गुंतवणूक अनेक पटीने वाढते हे खरे आहे का? हे सर्व समजण्यासाठी तुम्हाला शेअरमार्केट नीट समजावून घ्यावे लागेल.परावलंबी जिणे व पुस्तकी विद्या शेअरमार्केटमध्ये व्यर्थ ठरते. पाऊस पडेल तशी छत्री धरावी या नियमाप्रमाणे प्रसंगावधान व समयसूचकता यांचा वापर करून वेळोवेळी निर्णय घ्यावा लागतो  अनुभवातून शहाणपण हेच शेअरबाजारातील सूत्र आहे तुम्ही सुरुवातीला माझे बोट धरून शेअरबाजारातील वाटचाल करू शकता आणि नंतर स्वावलंबी होऊन स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकता. तुम्हाला काही अडचण आल्यास मला विचारू शकता. हे सर्व काम आपल्याला “ माझी वहिनी “ या अंकातून प्रकाशित होणार्या लेखाद्वारे करायचे आहे.
अहो आता काळ बदलला आहे व्यवहारात पारदर्शकता आली आहे. भाजी  बाजाराप्रमाणेच प्रत्येक व्यवहार तुम्ही प्रत्यक्ष पारखून निरखून करू शकता. ब्रोकरमार्फत व्यवहार करायचा नसेल तर घरात बसून इंटरनेटचा उपयोग करून Online शेअर्सची खरेदी विक्री करू शकता ग्राहकहितासाठी बरेच कायदे केले गेले आहेत . आजकाल “Investor forum “ मार्फत तुमची गुंतवणूक सुरक्षित व्हावी म्हणून काळजी घेतली जाते.गुंतवणूकदारांचे हितरक्षण करण्यासाठी SEBI(Securities & exchange Board of India) सज्ज आहे जर आपण आपला मोबाईल नंबर व मेलअड्रेस दिला तर दरदिवशी झालेल्या व्यवहारांची माहिती आपल्याला थेट STOCK EXCHANGEकडून कळवली जाते. त्यामुळे फसवणुकीची शक्यता कमी होते. सगळीकडे माहितीचा पूर लोटला आहे. भाषेचा अडसर येत नाही. शेअरबाजारातील व्यवहार इंग्लिशमध्ये तसेच हिंदीमध्ये सांगणारे बरेच channelउपलब्ध आहेत वर्तमानपत्रातूनही माहिती मिळवता येते. डोळे व कान उघडे ठेवून आपण माहिती मिळवली व त्याचा योग्य उपयोग केला तर शेअरबाजारातील उलाढालीत यश मिळवणे सहज शक्य आहे .
त्याहूनही फसवणूक झाली तर “Grievances Cell” याची दखल  घेते आहे.  प्रत्येक व्यवहाराचे बील मिळते. सर्व व्यवहार चेकने होतात. शेअर्स विकल्यानंतर चौव्थ्या दिवशी त्या रकमेचा चेक मिळतो. आजपर्यंत मला मिळालेला कोणताही चेक परत आलेला नाही.यावरून तुम्हाला शेअरमार्केटवर विश्वास ठेवण्यास हरकत नाही हे पटेल.  कोणालाही, कुठेही कसल्याही प्रकारची लाच द्यावी लागत नाही जो भाव समोर दिसतो आहे त्या भावाला विकण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी कुणीही तुम्हाला अडवत नाही. बाकीच्या गुंतवणूक प्रकारात जसे व्याज मिळ्ते तसा येथे लाभांश (Dividend) मिळतो. लाभांशाच्या रकमेवर आयकर लागत नाही. शेअर खरेदी करून १ वर्षानंतर विकल्यास आयकर लागत नाही.
घरातून, घराबाहेरून, परदेशातून कुठूनही फोनचा, मोबाईलचा वापर करून व्यवहार करता येणे शक्य आहे. गुंतवणुकीला कमाल रकमेची मर्यादा नाही तसेच गुंतवणुकीला किमान रकमेचीही मर्यादा नाही. ही मी मस्करी करीत नाही ! हे पूर्णपणे सत्य आहे . वयाची अट नाही. कळत्यासवरत्या वयाच्या माणसापासून अगदी जेष्ठ नागरिकापर्यंत कुणीही व्यवहार करू शकतो. व्यवसायातले  सर्व फायदे आहेत परंतु कोणत्याही प्रकारचा परवाना लागत नाही.कसलेही दडपण नाही चोरी होईल किंवा अतिक्रमण होईल याचीही भीती नाही. शेतजमिनीत किंवा घरात गुंतवणूक केली तर जसे वार्षिक उत्पन्न किंवा घरभाडे मिळ्ते आणी शेतजमिनीच्या घराच्या किमती वाढतात त्याचाही फायदा होतो तसेच शेअर्सवर लाभांश मिळतो व शेअर्सचा भाव वाढतो त्याचाही फायदा घेता येतो.परंतु शेअरबाजाराच्या बाबतीत चोहीकडून अनेक शिफारशींचा (ज्याला बोली भाषेत “टीपा” म्हणतात )वर्षाव होत असतो. या टीपा स्वीकारायच्या किंवा नाही हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असते. जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला हे कायम लक्षात ठेवावे !  लोकांकडून टीपा घेवून व्यवहार करण्यात लोक स्वतःला धन्य समजतात .त्यामुळे खरे शेअरमार्केट व त्यातील गुंतागुंत यापासून ते कोसो दूर असतात. डोळे असून आंधळेपणाने व्यवहार करत असतात असेच म्हणावे लागते ..शेअरबाजारात घाम न गाळता व कष्ट न करता पैसा मिळतो हा लोकांचा समज पूर्णपणे चुकीचा आहे. कुणाकडून तरी गुंतवणुकीच्या “टिपा “ घेवून शेअरबाजारात खरेदी विक्री केल्यास धोका संभवतो. त्यामुळे व्यवस्थित माहिती करून घेणे हितावह आहे. आपण फक्त दर महिन्याला येणारा “आमची वहिनी” हा अंक वाचायचा , आपल्याला जे काही योग्य वाटेल ते टिपून ठेवायचे जी काही माहिती हवी असेल  तर संपर्क साधून विचारावी.
तुम्ही सांगा हो मला धोके कुठे नाहीत? प्रवासात धोके आहेत म्हणून कुणी प्रवास करणे सोडले आहे का ?अपघात होण्याचा धोका आहे म्हणून कुणी वाहन चालवणे बंद केले की शॉक लागेल म्हणून विजेचा वापर करणे बंद केले ! नाही नाही त्याऐवजी आपण वाहतुकीचे नियम पाळतो. क्लच गिअर ब्रेक याची माहिती करून घेतो. पण हीच गोष्ठ शेअरबाजाराच्या बाबतीत आढळत नाही. पूर्णपणे माहिती करून न घेता जर गुंतवणूक केली तर हात पोळणारच ! तुम्ही एक विचार करा. बाकीचे जे गुंतवणुकीचे प्रकार आहेत त्यात धोके नाहीत का ? पण तरीही तुम्ही गुंतवणूक करत असता! कधी सही बरोबर नाही म्हणून पैसे मिळायला त्रास, तर कधी बँकाचे घोटाळे, कधी घराचे पझेशन मिळत नाही, तर कधी कागदपत्र चुकीची असतात , जेव्हा दागिने मोडायला जातो तेव्हाच समजते तुम्ही फसला आहात. असे धोके आहेतच ना ! मुचुअल फंडातून तर गेल्या ५ वर्षात फायदा होत नाही आहे. मग एखादी नवी वाट चोखाळायला काय हरकत आहे!
गेल्या १०-१२ वर्षांच्या काळात मी तेजीचा व मंदीचा दोन्ही काळ अनुभवला आहे.माझी ही सर्व “क्रियेवीण वाचाळता नाही””आधी केले मग सांगितले” या उक्तीप्रमाणे मी प्रथेम अनुभव घेऊनच आता तुमचे गैरसमज दूर करावेत हा विचार आहे. शेअरबाजारातून कमीतकमी वेळात जास्तीतजास्त उत्पन्न मिळवता येणे शक्य आहे. ही काही जादू नव्हे मेहेनत, कष्ट माहिती,प्रयत्न व शेवटी परमेश्वरी कृपा यामुळे साध्य झाले आहे.तुमचा निर्णय योग्य असेल तर तुम्हाला बक्षीस , तुमचा निर्णय चुकीचा असेल तर शिक्षाही तुम्हालाच हा जगाचा न्याय आहे. सत्कारही तुमचाच आणी धिक्कारही तुमचाच आणी त्याला कारणही तुम्हीच ! दुसर्याला दोषारोप मात्र करता येत नाही आणी करूही नये. एवढे लक्षात असू द्या
मी तुम्हाला सर्व प्रकारे मदत करेन. ब्रोकर कसा शोधावा, ट्रेडिंग अकौंट कसा उघडावा, Demat अकौंट कसा उघडावा ,कुठे आणी कितपत विश्वास ठेवावा.सर्व माहिती कशी मिळवावी काय काय तयारी करावी हे सर्व मी तुम्हाला सांगेन. सर्व माहिती झाल्यावर स्वतःचा निर्णय तुम्ही स्वतः घ्यावा व स्वावलंबी बनावे एव्हढीच माझी आणी “आमची वहिनी “  यांची इच्छा.
नवीन आर्थिक वर्ष सुरु होण्यास अवधी आहे तिथपर्यंत तयारी करून नवीन वाटेवरचा प्रवास सुरु करू या का ?
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Dec २०१४

तुमचे  स्वत:चे काही प्रश्न किंवा शंका असतील तर पानावर जावून त्या मला कळवा 
नाव: pradnyakar muley
तुमचा प्रश्न : please give me more information about future and option trading in marathi .
तुमच्या प्रश्नाबद्दल धन्यवाद , फ्युचर  आणी  OPTIONS हा विषय एका ब्लोगमधे संपणारा नाही. जसे जसे मी ब्लोग लिहित जाईन तसे तुम्ही वाचत चला, त्यातून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर हळू हळू मिळेल.
नाव: nitin
तुमचा प्रश्न : madam tumche sagle blog chhan ahe, maza prashn asa ahe ki technical & fundamental analysis mhanje kay n tyachi mahiti kuthe milel tasech updated latest chart kuthe miltat te vachayla shikayche ahe tyache shikshan kuthe milte ?
TECHNICAL ANALYSIS म्हणजे शेअर्सच्या किमतीमध्ये होणारे बदल ग्राफच्या आधारे समजावून घेणे होय. FUNDAMENTAL ANALYSIS म्हणजे ज्या मुलभूत गोष्टींमुले शेअरच्या किमतीमध्ये बदल होतो उदा: कच्चा माल, विनिमय दर, करप्रणाली वगैरे. बाकी सर्व तुम्हाला इंटरनेटवरून माहिती मिळू शकेल.
नाव: vishal
तुमचा प्रश्न : stock kase nivadave ?
तुमच्या जवळ गुंतवणुकीसाठी असलेली रकम, गुंतवणूक किती काळासाठी करू शकता, गुंतवणुकीची सुरक्षितता , रिस्क-रिवार्ड  रेशीओ, गुंतवणुकीचा उद्देश या सर्वांची सांगड घालून शेअर्सची निवड करा.
नाव: pradip prakash jangam
तुमचा प्रश्न : what is shair markt & how to profit in this field in the people
कंपनीच्या भांडवलाचा  छोटासा भाग म्हणजे शेअर. या शेअरच्या खरेदी-विक्रीला शेअर मार्केट म्हणतात. तुम्ही माझे ब्लोग सातत्याने वाचा, वर्तमानपत्रे वाचा , शेअरमार्केटवर चालणारे CHANNELS ऐका आणि थोड्या प्रमाणांत सुरुवात करा. थोड्यांत गोडी असते हे लक्षांत ठेवा.
नाव: Vishwanath Patil.
तुमचा प्रश्न : madam me share marcket madhe navin ahe. maje khalil calculation barobar ahe ka te bagha.
Per share = 0.22 (BSE)
Buy Share = 20000/0.22
Total share = 90,909. Share
(In Intraday I sell this share in 0.24 per share )
   = 90909*0.24 = 21818 Rs
Dalali = 5 paise in 100rs
           Total = 20 + other charges 30Rs
                        =50Rs
Profit = 21818 – 20000 – 50
Profit = 1768 RS.
Madam maje he calculation barobar ahe ka te sanga tasech he sodun share chi price khup kami aslymule other charges  lagtat ka sanga ? Mala tumcha blog khup avadla mala ajun khup shanka ahet. Tumhi new member sathi tranning classes gheta ka ?
कमीतकमी दलाली तुम्हाला द्यावीच लागते. हि  शेअर्सच्या किमती वर अवलंबून नसते. त्यामुळे तुमचं CALCULATION  तुम्हाला परत करावं लागेल . सरकार आकारत असलेले सर्व TAX ही आकारले जातील.  आपल्या ब्रोकरकडे याबाबतीत चौकशी करा.सध्या तरी मी CLASS घेत नाही पण भावी काळांत आपल्या सूचनेचा विचार नक्की करेन
नाव: Arun Balkrishna Kamble
तुमचा प्रश्न : i am interested to open demat account, but how much time to take for that procures.
पूर्वी  ‘DEMAT’ अकौंट ओपन  करायला वेळ लागत होता पण आतां चार दिवसातही ‘DEMAT’ अकौंट ओपन होतो. सगळी कागदपत्र , फोटो घेवून गेल्यास वेळ लागत नाही. त्यासाठी ब्लोग नंबर ३१ वाचा
नाव: sandeep untwale
तुमचा प्रश्न : campani    che    balance   shit     kase    vachavi    exzimpal
आपण घरगुती जमाखर्च मांडतो त्याचप्रमाणे कंपनीची BALANSHEET असते. आपण आपले उत्पन्न पाहतो त्यातून खर्च, घेतलेले कर्ज व त्याचा हप्ता,  औषधपाण्याचे  पैसे हे सर्व वजा जाता काही शिल्लक उरते कां ते पाहत असतो.याच पद्धतीने कंपनीची जमेची बाजू  व कंपनीची खर्चाची बाजू, कंपनीवर असणारे कर्ज, कंपनीला होणारा फायदा या सर्व बाजू कंपनीच्या BALANCE SHEET मधून बघाव्यात.
नाव: santosh
तुमचा प्रश्न : इन्ट्रा डे करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवावायत ? शेअरचा सकर्टि ब्रेकर म्हणजे काय आणि तो कधी लागू होतो.
इंट्राडे वर लिहिलेले माझे ‘ब्लोग’ वाचा.ज्या वेळेला SEBI (SECURITIES AND  EXCHANGE BOARD OF INDIA) ला जेव्हा वाटते की जेव्हा शेअर्सच्या किमतीमध्ये कुत्रिम मागणी पुरवठा निर्माण करून शेअर्सच्या किमतीमध्ये हवे तसे बदल घडवून आणले जात आहेत त्यामुळे गुंतवणूकदारांची फसवणूक होण्याची शक्यता जेथे जेथे असेल त्या ठिकाणी किमतीच्या २०%पासून ५% पर्यंत कितीही  CIRCUIT  निश्चित केलेजाते. त्या दिवशी त्या किमतीच्या  पुढे भाव पडत नाही किंवा वाढू  शकत नाही. यालाच CIRCUIT  FILTER असे म्हणतात. या विषयावर नंतर खुलासेवार ब्लोग  लिहू तो आपण वाचा.
 अजून काही प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर इथे क्लिक करा 
तुमचे  स्वत:चे काही प्रश्न किंवा शंका असतील तर पानावर जावून त्या मला कळवा 

बोनस ते पण डिबेंचर्स ??

47 साव्या भागापासून तुम्ही ‘IPO’ कहाणी वाचीत आहात ; समजावून घेत आहांत परंतु ‘IPO’ मार्केटने म्हणावा तसा जोर पकडलेला नाही. क्रूडच्या बाबतीत चाललेलं राजकारण किंवा अर्थकारण सगळ्यांना सतावतय . सध्या जागतिक मार्केटमध्ये अनिश्चितता आहे परंतु घरेलू मार्केटमध्ये  मात्र तेजीचे वातावरण आहे. भारतीय अर्थव्यवस्था बऱ्याच अंशी क्रूडच्या आयातीवर अवलंबून असते आणि नेमका याच  वेळेला ब्रेंट क्रूडचा भाव सर्वांत खालच्या पातळीला पोहोचला आहे. विनिमय दर स्थिर आहे. हे सगळं वातावरण भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी अनुकूल आहे. या वातावरणाचा फायदा ‘NTPC (NATIONAL THERMAL POWER CORPORATION ) सारख्या बचावात्मक पवित्रा घेणाऱ्या कंपन्या उठवीत आहेत. NTPCने नुकतेच भागधारकांना बोनस कर्जरोखे (डिबेंचर्स) द्यायचं ठरवलय. बोनस कर्जरोखे ही काय भानगड आहे हे बऱ्याच जणांना माहिती नाही म्हणून ‘IPO’ कहाणीला ब्रेक लावून मध्येच बोनस डिबेंचर्सची कहाणी उलगडून सांगण्याचा प्रयत्न मी करीत आहे.
गेल्या रविवारी ४ तारखेला मला भेटायला आलेली माणसं बोनस डिबेंचर्सबद्दल विचारीत होती. काहीजणांकडे ‘NTPC’चे  शेअर्स होते.तर काहीजण ‘NTPC’ मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत होते. – “MADAM आम्ही ‘NTPC’चे शेअर्स बोनस साठी घ्यावे कां? ही गुंतवणूक फायदेशीर होईल कां? पण MADAM बोनस जाहीर झाला तरी ‘NTPC’ चा भाव कां वाढत नाही?”
“अहो ते बोनस शेअर्स नव्हेत, ते बोनस डिबेंचर्स आहेत. तुम्ही नीट वाचा. तुम्ही फक्त ‘बोनस’ शब्द वाचून गुंतवणूक करायला निघाला आहांत, अशामुळेच तुमची फसगत होते. कावळा आणि कोकिळा दिसायला सारखे असले तरी दोघांमध्ये खूप फरक आहे. हा फरक समजावून घ्या. नंतर जर तुम्हाला फायदेशीर वाटलं तरच गुंतवणूक करा.”
त्या माणसांना समजावून सांगितले तेव्हां माझ्या मनांत विचार आला की ‘ब्लोग’च्या वाचकांनाही आपण ही माहिती द्यावी कारण ‘NTPC’ने  अजून रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही. मी फक्त माहिती देत आहे, गुंतवणूक करायची की नाही हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे.
“ NTPCला सध्या कोळशाच्या खाणी, नुतनीकरण , आधुनिकीकरण आणि सध्या चालू असलेल्या प्रोजेक्टचे रीफायनान्स यासाठी बोनस डिबेंचर्सचे पैसे वापरायचे आहेत म्हणून कंपनीने १:१ या प्रमाणांत बोनस डिबेंचर्स द्यायचे योजले आहे Rs १० दर्शनी किमतीच्या एका शेअरमागे Rs १२.५० दर्शनी किमतीचा एक डिबेंचर्स द्यायचा ठरवले आहे@
“म्हणजे काय MADAM ! १२.५० रुपयाच्या फायद्यासाठी बराच काळ आम्हाला गुंतवणूक करावी लागेल. हा काय आमच्या दृष्टीने फायदेशीर सौदा दिसत नाही. म्हणूनच शेअरचा भाव फारसा उसळी घेत नाही असं दिसतय”
“तुम्ही प्रथम बोनस शेअर्स आणि बोनस डिबेंचर्स यातील फरक समजावून घ्या आणि डिबेंचर्स मिळण्यासाठी वाटल्यास तुम्ही गुंतवणूक करा. तुमच्यावर कोणी सक्ती केलेली नाही. बोनस डिबेंचर्सवर व्याज मिळतं. ह्या व्याजाला coupon रेट असं म्हणतात. या व्याजाचा दर सरकारी रोख्याच्या दरानुसार ठरतो.या डिबेंचर्सवरील व्याजाचा दर १० वर्षे मुदतीच्या सरकारी रोख्यांचा दर + ५०BPS (BASE POINTS) एवढा निश्चित केला आहे.तुम्हाला या कर्जरोख्याचे मुद्दल ८ व्या वर्षी २० % आणि ९ व्या व 10 व्या वर्षी प्रत्येकी ४०% असं परत देण्यात येणार आहे. हे डिबेंचर्स STOCK EXCHANGE वर लीस्ट केले जातील. तुमच्या ‘DEMAT’ अकौंटवर याची नोंद तुम्हाला मिळेल. तुम्ही तुमच्या मर्जीनुसार हे डिबेंचर्स शेअर्ससारखे विकू शकाल. हे डिबेंचर्स सुरक्षित(SECURED) , NON-CUMULATIVE, अपरिवर्तनीय, TAXABLE आणि FULLY PAID UP आहेत.
या सगळ्या शब्दांचा अर्थ सांगते आता. अपरिवर्तनीय –  या डिबेंचर्सच्या बदल्यांत तुम्हाला शेअर्स मिळणार नाहीत आणि TAXABLE – कंपनी या डिबेंचर्स च्या दर्शनी किमतीवर DIVIDEND DISTRIBUTION TAX  भरते कारण हे बोनस डिबेंचर्स फ्री रिझर्वमधून dividend म्हणून दिले आहेत असे समजले जाते. म्हणजे ज्या भागधारकाला हे डिबेंचर्स मिळतील त्याला डिबेंचर्स मिळाल्यावर कोणताही TAX भरावा लागत नाही ,परंतु डिबेंचर्सवर मिळणाऱ्या वर्षभरातील व्याजावर आयकर लागतो
या बोनस डिबेंचर्सवर व्याज दर वर्षी दिले जाईल. बोनस शेअर्समुळे कंपनीच्या DEBT-EQUITY RATIO मध्ये फरक पडत नाही .या बोनस डिबेंचर्समुळे कंपनीकडे असणारे ‘FREE RESERVES’ कर्जामध्ये रुपांतरीत होतात त्यामुळे DEBT-EQUITY RATIO वाढतो. बोनस डिबेंचर्स देताना कंपनी कोणतीही रोख रकम देत नाही त्यामुळे कंपनीच्या उपलब्ध असलेल्या भांडवलाच्या स्त्रोतांमध्ये फरक पडत नाही. त्यामुळे कंपनीच्या विविध प्रगतीशील आणि विस्तार योजनांसाठी भांडवल उपलब्ध होते.जेव्हा तुम्ही डिबेंचर्स विकता तेव्हां मुद्दलभावापेक्षा जास्त किमतीला विकले गेल्यास या जास्त मिळालेल्या रकमेला भांडवली लाभ (कॅपिटल गेन) असे समजले जाते. Rs १२.५०चा डिबेंचर्स तुम्ही Rs १३ला विकलांत तर ५० पैसे हे उत्पन्न न धरता ‘capital gains’ समजले जातील. बोनस डिबेंचर्समुळे शेअर्सची संख्या वाढत नाही. त्यामुळे अर्थातच प्रत्येक शेअर्सच्या वाट्याला येणारे उत्पन्न किंवा नफा (EPS) बदलत नाही.
बोनस डिबेंचर्सवर द्यावे लागणारे व्याज व डिबेंचर्सच्या मुद्दलाची परतफेडीची रकम कंपनीच्या PROFIT AND LOSS अकौंटमध्ये खर्च म्हणून दाखविली जाते. त्यामुळे वरील रकमेवरील कंपनीचा TAX वाचतो. COMPANY ACT खाली बोनस डिबेंचर्स देण्याची तरतुद नाही त्यामुळे कंपनीला हे ‘SCHEME OF ARRANGEMENT’ या योजनेखाली द्यावे लागतात. त्यासाठी भागधारक , उच्च न्यायालय, रिझर्वबँक इत्यादींची परवानगी लागते. या साठी खूप वेळ जातो.त्यामुळे बोनस डिबेंचर्स फारसे लोकप्रिय होऊ शकले नाहीत. पूर्वीच्या काळांतही असे बोनस डिबेंचर्स दिले गेले आहेत उदा. हिंदुस्थान लिवरने २००१ साली सर्वप्रथम असे बोनस डिबेंचर्स इशू केले होते. ब्लू DART EXPRESS ने बोनस डिबेंचर्सची ALLOTMENT करून लिस्टिंग केले.
तितक्यात कुठून तरी आवाज आला “अहो तृम्ही एवढे खुलासेवार बोनस डिबेंचर्सचे रामायण वाचले परंतु रामाची सीता कोण हे कळलेच नाही. आम्हाला समजेल उमजेल  अशा रीतीने पण थोडक्यांत सांगा”.
ऐका तर ! १ शेअरला १ बोनस डिबेंचर्स ‘NTPC ‘ देत असल्यामुळे Rs१२.५० तुम्हाला मिळाल्यासारखेच होतात. फक्त हे पैसे तुम्ही डिबेंचर्स विकल्यानंतर तुमच्या हातांत पडतात.तुम्ही जर बोनस डिबेंचर्स विकले नाहीत तर तुम्हाला साधारण ९% दराने दर वर्षी व्याज मिळते.हे व्याज मुदत ठेवीच्या दरापेक्षाही जास्त आहे. ‘NTPC’ च्या शेअर्सचा सध्याचा भाव Rs. १४० ते १४५ च्या दरम्यान आहे. त्या हिशोबानेसुद्धा ९ % ने पैसे  मिळतात.बोनस शेअर्स मिळणार म्हणून जशी शेअर्सच्या भावांत वाढ होते तशीच बोनस डिबेंचर्समुळे शेअर्सचा भाव वाढल्यास बोनस डिबेंचर्स न घेताही वाढत्या भावाचा फायदा मिळण्यासाठी तुम्ही शेअर्स विकून टाकू शकता.
आतां इतकं सांगितल्यावर ही योजना फायदेशीर आहे की नाही हे तुमचं तुम्ही ठरवा. त्यामुळे आतां निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. बोनस डिबेंचर्स मिळण्यासाठी ‘NTPC’ च्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची की नाही हे तुम्ही ठरवा. पुढ्च्या भागापासून ‘IPO’ ची कहाणी पुढे पुढे नेत राहू. भेटू पुढल्या भागात !