हा आठवडा म्हणजे ‘TRUNCATED ’आठवडा होता.अहो ‘TRUNCATED’ म्हणजे काय ? तर माझ्या भाषेंत ज्या ट्रेडिंग आठवड्यांत मार्केटला सुट्टी असते.
ह्या आठवड्यांत बजेटचचं वातावरण होतं. मुळातच फुगा फुगल्यासारखे फुगलेले मार्केट काहीतरी छोट्याश्या कारणांनी पट्कन १५० ते २०० पाईंट पडत होते. आणी पुन्हा तेव्हढ्याच वेगाने बजेटसंबंधीची बातमी आल्यामुळे वाढतही होते. असा उनपावसाचा खेळ म्हणजेच गेला आठवडा.
सोमवारी इमारतीचा FSI वाढवून देणार अशी बातमी आली. ताबडतोब विश्लेषकांनी रिअलीटी सेक्टरमधील अमुक अमुक शेअर खरेदी करा असे सांगायला सुरुवात केली. थोडा वेळ गेल्यानंतर वाहिनीवाल्यांनी खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी कंपनीच्या लोकांच्या मुलाखती घेतल्या तेव्हां त्यांनी सांगितले की – “आम्हाला ही बातमी मिडीयामार्फतच समजली आहे. सकाळी वर्तमानपत्रातूनही वाचले. परंतु अधिकृत फाईनप्रिंट आमच्याजवळ नाही. त्यामुळे कुणाला फायदा होणार व किती फायदा होणार हे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. अशा सवलती ठराविक इमारतींना, ठराविक एरियातील इमारतींना लागू असतात. सरसकट सर्व इमारतींना लागू होत नाही.” हे ऐकताक्षणी शेअर्सचे भाव कमी व्हायला सुरुवात झाली. सगळ्यांचाच गोंधळ उडाला. हे काही पहिल्यांदा घडलं नाही. अशावेळी फक्त घाई केल्यामुळे घात होतो. बातमीची पूर्णपणे शहानिशा करायला हवी आणि मगच काय ते करायला हवं.
मंगळवारी शिवरात्रीची सुट्टी होती.
हिरोहोंडाचे प्रमोटर ७०लाख शेअर्स ब्लॉकडीलमार्फत विकणार आहेत अशी मार्केटला खबर होती. त्यामुळे हिरोहोंडाचा शेअर तसा थंडच होता. Rs २६६४ ते Rs २७२३ या दरम्यान ७० लाख शेअर्सचा सौदा झाला. प्रमोटरनी शेअर्स विकले म्हणून घाबरून जाऊन लोकांनी पण शेअर्स विकले असावेत. शेअरचा भाव जवळजवळ Rs१५०नी पडला. तासाभरानंतर कंपनीने खुलासा केला की त्यांना ‘पिपावाव’ मध्ये गुंतवणूक कण्यासाठी पैशाची तरतूद करायची होती म्हणून त्यांनी त्यांच्या मालकीचे शेअर्स विकले. प्रमोटर जेव्हा स्टेक विकतो तेव्हा ते फारसे चांगले समजले जात नाही. कारण प्रमोटरना अंदरकी बात माहित असते. पण नेहेमीच असा अर्थ लावू नये. चांगल्या कंपनीचे शेअर्स कमी भावांत विकत घेण्याची ही एक संधीही असते. मध्यंतरी ‘INFOSYS’ प्रमोटरनी शेअर्स विकले तेव्हा ‘INFOSYS’ चा भाव Rs १९०० झाला होता. लोकांना कमी किमतीत शेअर्स घेण्याची संधी मिळाली होती.नंतर या शेअर्सचा भाव Rs३०० णे वाढला. म्हणजेच आलेली बातमी शेअर्सचा भाव आणी होणाऱ्या परिणामांचा अंदाज याचे गणित जर बांधता आले आणी ते अचूक ठरले तर चांगले यश मिळते.
सध्या मार्केटमध्ये बजेट आणी बजेट आणी त्या संदर्भांत येणाऱ्या बातम्या यांचेच पीक आले आहे. लेदर इंडस्ट्रीला ‘EXCISE’ मध्ये सूट मिळणार अशी बातमी येताक्षणी सर्वजण लेदर इंडस्ट्रीच्या संगीत खुर्चीमध्ये बसण्यासाठी धावले. ‘BATA’ ‘LIBERTY SHOES, MIRZA INTERNATIONAL या शेअर्सचे भाव चमकू लागले. त्याचवेळी बातमी आली की शैक्षणीक क्षेत्राला सवलत मिळेल. त्यामुळे ‘NIIT’ ‘ZEE LEARN’ ‘CAREER POINT’’NAVNEET’ या शेअर्सचे भले झाले. डिफेन्स सेक्टरकडे सरकारचे लक्ष वेधले आहे हे जाणून ‘BHARAT FORGE’ या कंपनीने ‘RAFAEL’ या कंपनीशी करारहि केला. त्यासरशी ‘BHARAT FORGE’ ‘B. F UTILITIES’ ह्या शेअर्सची किमत वाढली. डिफेन्सच्या भजनाचा लाभ ‘BEL’ ‘BEML’ या शेअर्सना होत आहेच. रेल्वेशी संबंधीत शेअर्सच्या किमती रोजच वाढत आहेत. ‘TITAGARH WAGON’ च्या शेअर्सच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.
बजेटच्या संदर्भातील बातम्या लीक झाल्या आणी त्याचा फायदा ‘OIL&GAS INDUSTRY’ ला व्हावा अश्या इराद्याने बातम्या फुटल्या. त्यामध्ये ‘RELIANCE INDUSTRY’ नाव गुरफटले. ‘RELIANCE’ चा शेअर आणी त्याबरोबर मार्केट पडणार हा अंदाज होताच. घडलेही तसेच. मार्केट २५० पाईंट पडले.
कोळसाखाणींचा लिलाव झाला ‘JSPL’ या कंपनीला Rs१०८ या दराने खाण मिळाली. संकटांत असलेला ‘JSPL’ चा शेअर वधारला. काल उरल्यासुरल्या सरकारी बँकसुद्धा वाढल्या.त्याचबरोबर अजयसिंगच्या ‘SPICEJET’ पुनरुज्जीवित करण्याच्या योजनेला सरकारने हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे तोही शेअर वाढला. ‘SUZLON’ मध्ये संघवी गुंतवणूक करणार आहे ही बातमी आल्यावर त्या शेअरचा भाव वाढला. नेहेमी बजेटच्या वेळेला पडणारा ‘ITC’चा शेअर वाढतो आहे याचे आश्चर्य वाटले.
हे सर्व वातावरण डेट्रेड करणाऱ्यांना सोयीचे, शेअर्सच्या किमतीतील वाढ, वाढीचा वेग, आणी शेअरमधले ‘VOLUME’ अगदी हवे तसे. पण तुम्ही योग्यवेळी योग्य ठिकाणी राहून ट्रेड केला तरच. झाली तर दिवाळी नाहीतर शिमगा! पटकन गाडीत चढून पटकन उतरता आले पाहिजे. राजापुरची गंगा आली की जसे लोक धावतात तश्यातलाच हा प्रकार. कारण ही गंगा फार थोड्या काळ असते नंतर लुप्त होते.बऱ्याच जणांना त्यांचे अडकलेले शेअर्स चांगल्या भावाला विकायची संधी मिळाली. असा हा आठवडा उत्साहवर्धक होता. म्हणले तर फारसं काही घडलं नाही , मार्केट ठराविक रेंजमध्ये फिरत राहिले पण विशिष्ट शेअर्सच्या बाबतीत मात्र मार्केटने चांगला हात दिला.बहुतेक पुढचा आठवडा असेच वातावरण असेल.बजेटच्या दिवशी म्हणजे २८ तारखेला म्हणजे शनिवारी मार्केट चालु आहे. आणी त्यातच ‘FNO EXPIRY’ चा ही गोंधळ आहे. बघू या काय होते ते.
Monthly Archives: February 2015
तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Jan २०१५
तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Jan २०१५
तुषार प्रकाश हिरे : Madam mala stock markt madhe creer karaych ahe tari changla course konta ahe ani kuthe chaltat course plz sangave madam
मी स्वतः दूरदर्शनच्या वाहिन्यांचा उपयोग करून, वर्तमानपत्रातल्या माहितीचा वापर करून शेअरमार्केट शिकले. आलेला प्रत्येक अनुभव हा एखाद्या धड्यासारखा लक्षांत ठेवला. हल्ली STOCK EXCHANGE मध्ये काही कोर्स चालतात असं ऐकलय. त्यांची माहिती BSE (BOMBAY STOCK EXCHANGE ) आणी NSE (NATIONAL STOCK EXCHANGE) च्या साईटवर मिळू शकेल.
किशोर : commodity market विषयी माहिती द्याल का ?
मी फक्त शेअरमार्केटमध्ये व्यवहार करते. त्यामुळे COMMODITY मार्केट बद्दल मला तितकी माहिती नाही.
सुखदेव जाधव, विलास : शासकीय नोकरांना ट्रेडिंग करता येते का? असल्यास त्यासाठी कार्यालयास काही डिक्लरेशन द्यावे लागते का ?
शासकीय नियम वेळोवेळी बदलत असतात. वेगवेगळ्या खात्यांना वेगवेगळे नियम लागू होतात. त्यामुळे आपल्या ऑफिसमध्ये योग्य ती चौकशी करूनच निर्णय घ्यावा. जर तुमचे कार्यालय तुम्हाला परवानगी देत असेल तरच तुम्ही शेअरमार्केटमध्ये ट्रेडिंग करा परंतु माझ्या माहितीनुसार तरी गुंतवणूक करण्यासाठी फार कोणी आक्षेप घेत नाही. जर तुम्ही स्वत: शेअर मार्केट मध्ये काम करत असाल किंवा एखाद्या AUDIT FIRM मध्ये काम करत असाल तर तुमच्या गुंतवणुकीवर बंधनं असतात हे मी ऐकलय.
विश्वनाथ पाटील : Madam Namaskar ! Madam share market baddal mahiti sangnary Hindi, Marathi ani English channel chi mahiti sanga. Madam me job karto mala per month 10000 salary ahe. Mala office madhe trading sathi time milat nahi. Tari me job sodun share market kade carrier mhanun pahile tar chalel kai.? Margdarshan kara.
मराठीतून कोणत्याही वाहिनीवरून शेअरमार्केट लाइव्ह प्रक्षेपण अजूनतरी केले जात नाही. CNBC AWAJ , ZEE BUSINESS , NDTV PROFIT, या वाहिन्यांवरून हिंदीतून व CNBC , BLOOMBERG , ETNOW या वाहिन्यांवरून इंग्लिशमधून लाइव्ह प्रक्षेपण केले जाते.नोकरी सोडून शेअरमार्केट करावे कां ? ह्याविषयी मी काहीही सांगणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखे होईल. नोकरी सांभाळून थोड्याफार प्रमाणांत मार्केटमध्ये गुंतवणूक करून कितपत फायदा होतो याचा अंदाज घ्या. आणी नंतरच नोकरीच्या बाबत निर्णय घ्या.. हल्ली मोबाईलवर इंटरनेट उपलब्ध असल्यामुळे तुमच्या शेअर्सचा भाव तुम्हाला कळू शकतो. व नोकरी सांभाळून व्यवहार करता येतो.
Sachin Thorat : Demat account kote asave NSDL ki CDSL ?
THE NATIONAL SECURITIES DEPOSITORY LIMITED (NSDL) आणी CENTRAL DEPOSITORIES SERVICES LIMITED (CDSL) या दोन DEPOSITORIES त्यांना संलग्न असलेल्या ‘DEPOSITORY PARTICIPANT’ मार्फत अनुक्रमे NATION AL STOCK EXCHANGE(NSE) आणी BOMBAY STOCK EXCHANGE (BSE ) साठी काम करतात. त्यामुळे तुम्ही DEMAT अकौंट ज्या DEPOSITORY PARTICIPANT(DP) (ब्रोकर, बँक)कडे उघडता त्यांच्याकडे ही चौकशी करू शकता. पण व्यवसायाच्या दृष्टीने DP कोणत्या DEPOSITORY शी संलग्न आहे यामुळे काही फरक पडत नाही.
या आधीची प्रशोन्त्तरे वाचायला इथे क्लिक करा