तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Jan २०१५

तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Jan २०१५
तुषार प्रकाश हिरे : Madam mala stock markt madhe creer karaych ahe tari changla course konta ahe ani kuthe chaltat course plz sangave madam
मी स्वतः दूरदर्शनच्या  वाहिन्यांचा  उपयोग करून, वर्तमानपत्रातल्या माहितीचा वापर करून शेअरमार्केट शिकले. आलेला प्रत्येक अनुभव हा एखाद्या धड्यासारखा लक्षांत ठेवला. हल्ली STOCK EXCHANGE मध्ये काही कोर्स  चालतात असं  ऐकलय. त्यांची माहिती BSE (BOMBAY STOCK EXCHANGE ) आणी NSE (NATIONAL STOCK EXCHANGE) च्या साईटवर मिळू शकेल.
किशोर : commodity market विषयी माहिती द्याल का ?
मी फक्त शेअरमार्केटमध्ये व्यवहार करते. त्यामुळे COMMODITY मार्केट बद्दल मला तितकी माहिती नाही.
सुखदेव जाधव, विलास : शासकीय नोकरांना ट्रेडिंग करता येते का? असल्यास त्यासाठी कार्यालयास काही डिक्लरेशन द्यावे लागते का ?
शासकीय नियम वेळोवेळी बदलत असतात. वेगवेगळ्या खात्यांना वेगवेगळे नियम लागू होतात. त्यामुळे आपल्या ऑफिसमध्ये योग्य ती चौकशी करूनच निर्णय घ्यावा. जर तुमचे कार्यालय तुम्हाला परवानगी देत असेल तरच तुम्ही शेअरमार्केटमध्ये ट्रेडिंग करा परंतु माझ्या माहितीनुसार तरी गुंतवणूक करण्यासाठी फार कोणी आक्षेप घेत नाही. जर तुम्ही स्वत: शेअर मार्केट मध्ये काम करत असाल किंवा एखाद्या AUDIT FIRM मध्ये काम करत असाल तर तुमच्या गुंतवणुकीवर बंधनं असतात हे मी ऐकलय.
विश्वनाथ पाटील : Madam Namaskar ! Madam share market baddal mahiti sangnary Hindi, Marathi ani English channel chi mahiti sanga. Madam me job karto mala per month 10000 salary ahe. Mala office madhe trading sathi time milat nahi. Tari me job sodun share market kade carrier mhanun pahile tar chalel kai.? Margdarshan kara.
मराठीतून कोणत्याही वाहिनीवरून शेअरमार्केट लाइव्ह प्रक्षेपण अजूनतरी केले जात नाही. CNBC AWAJ , ZEE BUSINESS , NDTV PROFIT, या वाहिन्यांवरून हिंदीतून व CNBC , BLOOMBERG , ETNOW  या वाहिन्यांवरून इंग्लिशमधून लाइव्ह प्रक्षेपण केले जाते.नोकरी सोडून शेअरमार्केट करावे कां ? ह्याविषयी मी काहीही सांगणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखे होईल. नोकरी सांभाळून थोड्याफार प्रमाणांत मार्केटमध्ये  गुंतवणूक करून कितपत फायदा होतो याचा अंदाज घ्या. आणी नंतरच नोकरीच्या बाबत निर्णय घ्या.. हल्ली मोबाईलवर इंटरनेट उपलब्ध असल्यामुळे तुमच्या शेअर्सचा भाव तुम्हाला कळू शकतो. व नोकरी सांभाळून व्यवहार करता येतो.
Sachin Thorat :  Demat account kote asave NSDL ki CDSL ?
THE NATIONAL SECURITIES DEPOSITORY LIMITED (NSDL) आणी CENTRAL DEPOSITORIES SERVICES LIMITED (CDSL) या दोन DEPOSITORIES त्यांना संलग्न असलेल्या ‘DEPOSITORY  PARTICIPANT’ मार्फत अनुक्रमे NATION AL STOCK  EXCHANGE(NSE)  आणी BOMBAY STOCK EXCHANGE (BSE )  साठी  काम करतात. त्यामुळे तुम्ही DEMAT अकौंट ज्या  DEPOSITORY PARTICIPANT(DP) (ब्रोकर, बँक)कडे उघडता त्यांच्याकडे ही चौकशी करू शकता. पण व्यवसायाच्या दृष्टीने DP  कोणत्या DEPOSITORY शी  संलग्न आहे यामुळे काही फरक पडत नाही.
या आधीची प्रशोन्त्तरे वाचायला इथे क्लिक करा 

2 thoughts on “तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Jan २०१५

  1. Pingback: तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Feb २०१५ | Stock Market आणि मी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.