आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
या आठवड्यातही शेअर मार्केट कण्हत रडतखडत कुरकुरत सुरु झालं. या आठवड्यात “DERIVATIVE EXPIRY” गुरुवारी होणार त्याचं ग्रहण मार्केटला सोमवारपासूनच लागलं
मला “DERIVATIVE MARKET” जरुरीपुरतेच समजतं. पोझिशन ‘क्लोज’कराव्या लागतात किंवा ‘रोल ओव्हर’ कराव्या लागतात. आणी नव्या सिरीजसाठी पोझिशन घेतली जाते व त्याप्रमाणे कॅश मार्केटमधील शेअर्सच्या किमतीत बदल होतो. त्यामुळे एकंदरीत लक्षांत काय घ्यायचे ? या आठवड्यांत किमतीत होणारे बदल हे ‘EXPIRY’ ला अनुसरून होत आहेत. मग आपण काय करायचं ? हा प्रश्न तुम्हाला पडत असेल. एखाद्या शेअरमध्ये ‘ओपन इंटरेस्ट’ वाढत असेल किंवा ‘SHORT- COVERING RALLY’ येण्याची शक्यता असेल तर ते शेअर्स ३-४ दिवसांसाठी विकत घ्यायचे व थोडासा फायदा घेऊन विकायचे इतकच.
मार्च महिन्याच्या शेवटी सुट्ट्या खूप आल्या आहेत. PAY-IN PAY-OUT चा प्रॉब्लेम येईल. चेक मिळायला अर्थातच कॅश मिळायला उशीर लागणार हे ओघानेच आले.ही सुट्टी फक्त भारतातच आहे. परदेशांतील शेअर मार्केट्स चालू रहाणार आहेत. त्याचा परिणाम सुट्टी संपल्यानंतर जेव्हां मार्केट उघडेल त्या दिवशीच्या व्यवहारावर होणार.
सध्या मार्केटला नजीकच्या भविष्यांत काहीच ट्रिगर नाही. उलटपक्षी जमीन अधिग्रहण विधेयक पास झाले नाही. G.S T. (GOODS AND SERVICES TAX) लागू होण्यास अजून एक वर्ष बाकी आहे. परदेशातून येणारा पैशाचा ओघ थांबेल ह्याची भीती सतावते आहे.या सर्व कारणांमुळे मार्केट मंदीत आहे.पूर्वी मार्केट ‘’BUY ON DIPS’ होते आतां ते ‘SELL ON RISE किंवा RALLIES’ मध्ये रुपांतरीत झाले आहे. त्यामुळे मार्केट मंद गतीने वाढत आहे आणी वेगाने पडत आहे असं वाटतंय.
सोमवारी COAL BLOCKच्या CANCELLATIONचे नाटक चांगलेच रंगले. JSPL(जिंदाल स्टील आणी पावर) आणी ‘उषा मार्टिन’ या शेअर्सच्या किमतीवर परिणाम झाला.JSPLने HIGH कोर्टांत धाव घेतली HIGH कोर्टाने त्यांना थोडासा दिलासा दिला. हे कळल्यानंतर ज्स्पल्च्या शेअर्सचा भाव थोडा सुधारला. सोमवारी निफ्टी ८५५० पाईंट वर बंद झाला.
मंगळवारी RANBAXY आणी SUN PHARMA यांच्या मर्जरमधील सर्व बाबी पूर्ण झाल्या असे सांगितले. SUN PHARMAAचे १० शेअर्स ज्याच्याजवळ असतील त्याना RANBAXYचे 8 शेअर्स मिळतील. किंवा SUN PHARMAAच्या १ शेअरला RANBAXYचे .०.८ शेअर मिळतील. BULLS वर BEARS नी मात केली. २५० पाईंट मार्केट वर होते परंतु डोळ्याचे पाते लवते न लवते तो हे मार्केट लाल लाल दिसू लागले. सगळ्या बँकांचे शेअर्स पडत होते. निफ्टी पाडवायला BANK NIFTY ने पुढाकार घेतला.
बुधवारी ‘टाटा मोटर्स’ या कंपनीने RIGHTS ISSUE ची घोषणा केली तुमच्याजवळ ‘टाटा मोटर्स’ चे १०९ शेअर्स रेकॉर्ड डेटला असतील तर तुम्हाला Rs ४५० प्रती शेअर या दराने सहा शेअर्स किंवा Rs २७१ प्रती DVR शेअर या दराने ६ DVR शेअर्स मिळतील असे जाहीर केले.IDEA ने दिल्लीमध्ये 900 MHZ ची ३G सेवा सुरु केली. सरकारने NTPCला ५ कोल ब्लॉक आणी SAIL या कंपनीला १ कोल ब्लॉक दिला. ‘ULTRATECH CEMENT’ आणी ‘CENTURY TEXTILE’ याचे मर्जर होणार असे समजले. ‘IPCA LABORATORIES’ या कंपनीला त्यांच्या इंदोर आणी सिल्वासा येथील प्लांटसाठी USFDAने IMPORT ALERT जाहीर केला त्यामुळे शेअर Rs१०० पडला. सरकारने GAS POOLINGची घोषणा केली. यानुसार ‘GAIL’
( GAS AUTHORITY OF INDIA LIMITED) GAS आयात करेल आणी नंतर सर्व पॉवर प्लांटना देईल.यामुळे GAS BASED पॉवर प्लांटना GAS मिळण्याची शक्यता निर्माण झाली.GAS च्या किमती WORLD-WIDE कमी होत आहेत. त्यामुळे GAS वाजवी किमतीत उपलब्ध करता येणे शक्य होईल. वर्तमानपत्रातून, टी व्ही वाहिन्यांवरून असे सांगितले की ब्रोकर्स आपल्या क्लायंटना पोझिशन हलकी करा, नंतरचे नंतर बघू असे सांगत आहेत. त्यामुळे मार्केट पडत आहे.
‘कहां पकडे और कहां निकले समझता नही ‘ अशी अवस्था झाली आहे. थोडा थोडा नफा घेत गेल्यास धंदा होतो आहे. ८-१० दिवसांसाठी पोझिशनल ट्रेड करतां येतो आहे.
गुरुवार हा ‘EXPIRY’ चा दिवस.विश्लेषकांच्या अंदाजापेक्षाही खालच्या पातळीला EXPIRY झाली. बहुतेकांनी नफावसुली केली असावी असे मला जाणवले. एप्रिलमध्ये सर्व कंपन्यांचे वार्षिक निकाल जाहीर होतील ते निकाल पाहूनच पुढील व्यवहार करावा. ‘ नवी विटी नवे राज्य’असेच सर्वानी ठरवल असाव असं मला वाटलं
रिझर्व बँकेने युनायटेड बँकेला कर्ज देण्याची परवानगी दिली.बजाज ऑटोने नवीन PULSAR RS २०० हे नवीन मॉडेल मार्केटमध्ये आणले. IDEA आणि यस बँक यांचा निफ्टीमध्ये समावेश करणार आणी DLF, JSPL यांना निफ्टीमधून वगळणार असे समजले. सरकारच्या GAS POOLING नीतीचा फायदा GSPL आणी TORRENT पॉवर यांना होईल. अशा बातम्या आल्या पण या बातम्यांचा परिणाम होऊन मार्केटचा रागरंग बदलला नाही. मार्केट पडतच राहिले. सुरुवातीला मार्केट कमी वेगाने पडले पण ८४०० पाईंट निफ्टीने पार केल्यानंतर मार्केट जोरदार आपटले. बेअर्सनी बुल्सवर मात केली. जशी ऑस्ट्रेलियाने भारतावर बाजी मारली. मार्केटमधल्या बुल्सनी व भारतीय क्रिकेटवीरांनी ‘घरवापसी’ केली कि काय असा प्रश्न पडला.
गुरुवारी मार्केट ८३४२ निफ्टी आणी २७४५७ SENSEX वर बंद झाले.. गुरुवारचे मार्केट बंद झाल्यानंतर ज्या वेळेला काय काय घडले याचा मागोवा घेतला तेव्हां असे आढळले की लोकांनी शार्ट कवर करण्याच्याऐवजी जास्त शार्ट केले, शार्ट साईडला रोलओवर जास्त झाले.
शुक्रवारी सकाळी मार्केट अंदाजाप्रमाणे तेजीतच उघडलं. त्यावेळी निफ्टी ८४११ होता. पण तेव्हढ्याच वेगाने आपटलं ८३६० पर्यंत एका मिनिटांत निफ्टी घसरला. याचाच अर्थ प्रत्येक rally विकली जात होती. अशा वेळी INDIAVIX हा VOLATALITY इंडेक्स बघावा.. मार्केटचा मुख्य प्रवाह मंदीचा असल्याने मार्केटमधील तेजी फार काळ टिकत नाही. काही वेळा मला कळत नाही की काही शेअर्स कां वाढत आहेत. SPECTRUM किंवा कोळशाची खाण लिलावांत मिळाली तरी त्याचे पैसे देण्यासाठी कर्ज काढावेच लागणार. कर्जाच्या व्याजाचा भार कंपनीला पेलावा लागणार. येव्हढा मी विचार करत असतानाच BHARATI व IDEA या दणकून पडला. म्हणजेच हे माझे विश्लेषण बरोबर होते.
सरकारच्या नवीन LNG पोलिसीमुळे ‘PETRONET LNG’ यां कंपनीवर परिणाम होईल. सरकार GAS च्या किमती $५.६१ MMBTU वरून $५.०२ MMBTU पर्यंत कमी करणार ही वार्ता समजल्यामुळे ‘RELIANCE’चा शेअरही आपटला. ACCENTURE ने त्यांचा GUIDANCE वाढवला त्यामुळे I.T. क्षेत्रातील सर्व शेअर्स तेजीत होते. THOMAS COOK त्यांच्या IKYA चा IPO आणणार आहे असं ऐकू आलं.. ‘GRASIM INDUSTRIES’ ‘LIVA’हा ब्रांड मार्केटमध्ये आणत आहे.आज सर्वांत नवल म्हणजे DOLLAR STRONG होता EQUITY WEAK होत्या तरीही रुपया फर्म होता. SENSEX २७४५३.६० आणी निफ्टी ८३४१.४० वर बंद झाला.
पुढच्या आठवड्यात काय होतंय ते बघू पुढच्या शनिवारी .. भेटूच लवकर
Monthly Archives: March 2015
तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Feb २०१५
जानेवारीची प्रशोन्त्तरे वाचण्यासाठी इथे क्लिक करा
नाव: Deepak Banait
तुमचा प्रश्न : Mala share market ch kahich knowledge nahi.pan tari mala yaat interest ahe aani investment chi iccha ahe. mala mahit aslyapramene pratham demate account open karave lagate. pan te ka karave lagate tyacha use kay aani fayde kay. te mala kalav ashi request ahe
तुम्हाला शेअरमार्केटमध्ये इंटरेस्ट आहे हे वाचून बरे वाटले. तुम्हाला DMAT अकौंटबद्दल ज्या काही शंका आहेत त्या शंका निरसन करण्यासाठी तुम्ही ब्लोग नंबर ५, ३१, ३९ वाचू शकता. जे शेअर्स खरेदी करतो त्याची नोंद चार दिवसानंतर “DEMAT’ अकौंटवर होते. तुम्ही जे शेअर्स विकता ते ‘DEMAT’ अकौंटमधून वजा होता.म्हणजेच शेअर्सचा जमा खर्च ठेवणारे सुरक्षित साधन ‘DEMAT’ अकौंट हे आहे.
नाव: deepali bhatode
तुमचा प्रश्न : Hello Madam, Tumche sagale blogs khoop prenadayi vatale.Tumche kautuk karave tevadhe thodech ahe.Atishay sopya language madhe tumhi sagale samajaun sangitale ahe.Mi software fieldmadhun lahan mulamule break ghetala ahe. Ata tumchyasarkhe trading madhe utarave vatate. Share marketvar konte book changale ahe?Mi sadya icicidirectvar online trading karat ahe.tarihi brokerchi garaj aahe ka?Tumchya blogmadhun changale knowledge milale.Navin blogchi vat pahat ahe.
तुम्हाला काही वेगळ्या ब्रोकरची गरज नाही. क्रिकेटचा सामना लाईव बघणे आणी त्या सामन्याचे वर्णन नंतर कधीतरी पुस्तकातून वाचणे या मध्ये जो फरक आहे तोच फरक शेअरमार्केटच्या बाबतीतही आहे. सभोवतालची परिस्थिती , कायदेकानू सातत्याने बदलत असतात त्यामुळे पुस्तकाचा फारसा फायदा होत नाही. तरीसुद्धा टेक्निकल ट्रेंड बघण्यासाठी पुस्तक उपयोगी पडते. शेअरमार्केटमधील बदलाचा वेग खूप असतो. त्यामुळे दूरदर्शनच्या वाहिन्यांवर दिल्या जाणाऱ्या माहितीचा उपयोग करावा.
नाव: mahesh byagari
तुमचा प्रश्न : madam me BA(political science)graduate asun mala share market madhe job milavata yeil ka? tya sathi ky qualification lagel? please help.
मी काही career counsellor नाही पण तुम्ही MBA (FINANCE) केलेत आणी तुम्ही पोर्टफोलीओ MANAGEMENT चा एखादा चांगला कोर्स केला तर चांगली संधी उपलब्ध होईल कदाचित. तुम्ही जर BSE किंवा NSE ची कॅश किंवा FUTURES ची परीक्षा दिलीत तर तुम्हाला BOLT Operator म्हणून जॉब मिळू शकतो. हि परीक्षा सोपी असते.तुम्ही स्वतः परीक्षेची तारीख घेऊ शकता.
नाव: suresh bannenawar
तुमचा प्रश्न : shere market made carrer karayache ahe mala mahiti pahije hote
तुम्ही माझे ब्लोग आणी माझी वहिनीचे लेख वाचा. तरी काही शंका राहिल्यास विचारा.
नाव: nandkishor Narkhede
तुमचा प्रश्न : On-Market (Sell Market) / Off Market (% of transaction value of each ISIN)……..please guide about ISIN charges?
तुम्ही तुमच्या वडिलांच्या नावावर किंवा कोणाच्याही नावावर शेअर ट्रान्स्फर केले तर या व्यवहाराला ऑफ मार्केट व्यवहार म्हणतात. इथे शेअर्सची खरेदी विक्री STOCK EXCHANGE THROUGH होत नाही.
STOCK EXCHANGE च्या THROUGH केलेल्या शेअर्सच्या खरेदी विक्रीला ON MARKET असे म्हणतात.
ऑफ मार्केट व्यवहारासाठी दलाली लागत नाही
नाव: swanand kulkarni
तुमचा प्रश्न : Mi share market madhe invest krnyasathi utsuk ahe,pn mala hya vyawharavishayi kahich anubhav nahi,tumchya blog hun khup mahiti milali tyabaddal tumche manapasun abhar. Mi ek engineer ahe ani punyat pvt ltd company madhe Job krto,pn ajun ek income source mhnun mala share marketbhastey,pn basic steps kay ghyawya?kuthle share gheu? ani vyawhar kru yabaddal margdashan have ahe..dhanyawad..
‘DEMAT’ अकौंट आणी ट्रेडिंग अकौंट उघडा.त्यासाठी ब्लोग नंबर ५ ३१, ३९ आणी माझी वहिनीतील लेख वाचा. शेअर्सच्या खरेदीविक्रीसाठी ब्लोग ३८ ४० ४१ वाचून पहा.
नाव: Nagesh Shinde
तुमचा प्रश्न : Namaskar Madam,
mala stock market medhe yenya chi echa ahe pan mala process mahiti nahi. tar mala tumhi please process sangal ka?
‘DEMAT’ अकौंट आणी ट्रेडिंग अकौंट उघडा.त्यासाठी ब्लोग नंबर ५ ३१, ३९ आणी माझी वहिनीतील लेख वाचा. शेअर्सच्या खरेदीविक्रीसाठी ब्लोग ३८ ४० ४१ वाचून पहा.
नाव: sujeet gore
तुमचा प्रश्न : Namsakar Madam,,,,, me bsc graduate zalo ahe.. mala shares market badal knowledge nahiye,,, pn mala shares market shikaych ahe…. me kay karav,,plz guide me
ब्लोग वाचा. सध्या मी गेल्या आठवड्यातील शेअरमार्केटमधील व त्याच्याशी संबंधीत घडामोडी याविषयी माहिती देत आहे.. चारचौघी मासिकातील जाने, फेब्रुवारी , मार्च २०१५ मधील माझे लेख वाचा.दूरदर्शनवरील वाहिन्या, वर्तमानपत्रे व इंटरनेटवरून माहिती मिळवा
नाव: Sudesh Tetgure
तुमचा प्रश्न : Saglyat agodar khup khup dhanyawad madam. Mi tumche sagle blog vachle. Tumhi khupach chan aaplepanane aani sutsutitpane samjavun sangta. Tyamule mala tumhi javalchya natevaik vatata. Kharach madam. Tumhi please please classes chalu kara. Aamhala garaj aahe tyachi. Tumchyakadun samajik bandhilkicha dhada (lesson) saglyanni ghyayla pahije. Karan halli sagle swatahachach vichar kartat. Tumchya jaagi kon asta tar fee nakki ghetli asti. So hats off madam. God bless you . . .
तुम्ही राहता कुठे? मी ठाण्याला राहते. क्लास सुरु केले तरी ठाण्याला सुरु करीन. तुमच्या सगळ्यांच्या आग्रहावरून क्लास सुरु करण्याच्या विचारांत आहे. तुम्ही जर कुठे SHEAR MARKET व्याख्यानासाठी सोय करत असाल तर तेथे येऊन शक्य झाल्यास मी मार्गदर्शन करीन
नाव: sandeep untwale
तुमचा प्रश्न : fucher aani option cha marathi tune kulasa sanga
मी DERIVATIVE मध्यें ट्रेडिंग करीत नाही. त्यामुळे FUTURE आणी OPTIONSचा खुलासा देण थोड कठीण आहे. जमलं
नाव: Shahaji
तुमचा प्रश्न : नमस्कार, मी शेअर मार्केट एका महिन्यापासून आहे आणि मी फार गोंधळून गेलो आहे कोणत्या कंपनीचे शेअर घ्यावे आणि कोणत्या किमतीत घ्यायचे तरी आपण मराठी मधून technical काही टिप्स दया आणि कोणती तरी टिप्स advisory firm घ्यावी का?
कोणतीही टिप्स advisory firm घेण्याची मला आवश्यकता वाटत नाही. ते सगळं परावलंबी जिण होतं. शेअर मार्केट सतत बदलत असल्यामुळे सुरुवातीला सगळ्यांचाच गोंधळ उडतो. चिकाटीने आणी धैर्याने सामोरं जावं लागतं. तरच यश मिळते. कुणीही तुम्हाला टिप्स दिल्या तरी त्या टिप्सच्या यशाची किंवा अपयशाची जबाबदारी त्या माणसाची किंवा फर्मची नसते. तो एक उत्तम सल्ला असतो इतकच म्हणता येईल
नाव: PRAVIN SALUNKE , AKOLA
तुमचा प्रश्न : Madam mala share market chi mahiti denare marathitil books chi mahiti sangal ka ?
शेअर मार्केटच्या पुस्तकांत असलेली माहिती दिलेली उदाहरणे जुनी झालेली असतात. झालेला क्रिकेटचा सामना पाहणे आणी सामन्याचे लाईव प्रक्षेपण बघणे यांत जेव्हडा फरक आहे तेव्हढाच फरक त्या त्या दिवशी घडणार्या घटनांचा अभ्यास करणे आणी पुस्तकातून वाचणे यांत आहे.. त्यामुळे तुम्ही दूरदर्शनच्या वाहिन्यांचा उपयोग करा.
नाव: Tushar Prakash Hire
तुमचा प्रश्न : Madam mala stock markt madhe creer karaych ahe tari changla course konta ahe ani kuthe chaltat course plz sangave madam
BSE आणी NSE द्वारे छोटे मोठे अनेक कोर्स चालवले जातात तुम्ही त्या साईटवर जाऊन माहिती घ्या.

गुढीपाडवा सण मोठा नाही आनंदा तोटा…
आपल्या सगळ्यांबरोबर या ब्लॉगच्या माध्यमातून मी हा तिसरा गुढीपाडवा साजरा करीत आहे.
या तीन वर्षांत मी माझ्या ब्लॉगमधील लिखाणामध्ये अनेक बदल केले.वेळोवेळी आपण कौतुक केलेत. माझा उत्साह वाढला. सन २०१४ साल संपल्यामुळे आपल्याला माझी वहिनीचा अंक मिळणे कठीण होईल हे ध्यानांत आल्याने या अंकांत छापून आलेले माझे लेख ब्लॉगवर टाकले. लोकांच्या शंका दूर करण्यासाठी ‘तुमचे प्रश्न‘ ‘माझी उत्तर‘ हे सदर सुरु केले. गेल्या महिन्यापासून ‘मागोवा गेल्या आठवड्याचा’ हे नवीन सदर सुरु केले.
मी खरे पाहतां अतिशय सोप्या भाषेत ब्लॉग लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु प्रश्न-उत्तरे या सदरातून आलेल्या आपल्या प्रश्नावरून असे आढळले की शेअरमार्केटमध्ये व्यवहार कसे होतात हे कोडे आपणास उलगडले नाही.
प्रत्येक बातमी आल्यावर त्याचा परिणाम कोणत्या शेअरवर व किती प्रमाणांत होईल हे समजावून घ्यावे लागते.गेल्या आठवड्यांत काय काय घडले, कोणत्या बातम्या आल्या व त्याचा परिणाम काय झाला हे मी ‘मागोवा गेल्या आठवड्याचा’ या सदरातून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.
एखादा शोध लागतो पण त्या शोधाचा उपयोग व्यवहारांत कसा होईल हा विचार अधिक महत्वाचा ठरतो. एखादी धून तयार होते. जर ती धून त्या धूनवर तयार झालेले गीत आणी त्याचे चित्रीकरण यांची सुंदर सांगड बसली तरच ते गाणे सुंदर होते. एखाद्या कथेवर आधारीत एखादा चित्रपट किंवा नाटक तयार झाले तर ते पुस्तक किंवा ती कथा प्रसिद्ध होते. त्याचप्रमाणे एखाद्या बातमीचा परिणाम काय आणी किती आणी कोणत्या शेअरवर होईल याची योग्य पद्धतीने सांगड घालून शेअर खरेदी करणे किंवा विकणे म्हणजेच शेअरमार्केटचे व्यवहार होय.. त्याचप्रमाणे वेळेवर निर्णय घेण, निर्णयाची जबाबदारी घेण, निर्णय फायदेशीर नसेल तर त्या व्यवहारातील चुका शोधून काढून पुन्हा तशी चूक न करण हे जमायला लागलं कि म्हणजेच तुमची शेअरमार्केटमध्ये प्रगती झाली असे समजा.
शेअरमार्केटचे पोस्ट-मार्टेम – १६ मार्च ते 20 मार्च
आधीच्या आठवड्याबद्दल वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कोणत्याही घटनेचे पोस्ट-मार्टेम प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या परीने करत असतो. तुम्हाला आवडो किंवा न आवडो पोस्ट-मार्टेम करण आपल्या स्वभावातच असत. तश्या त्यातून बऱ्याच गोष्टी उलगडतात. चुका समजतात.त्या चुका सुधारून प्रगतीचा मार्ग खुला होऊ शकतो.
गेल्या आठवड्यांत मार्केट पडलं म्हणजेच आपल्या भाषेमध्ये मार्केट्ची तब्येत बिघडली असं म्हणा ना .कोणत्याही गोष्टीमध्ये अती तेथे माती होतेच, मग त्याला शेअरमार्केट तरी अपवाद कसं असणार. मार्केट अव्वाच्या सव्वा वाढलं होतं . त्यामुळेचं पडायला लागलं असं आपलं माझं मत. त
या आठवड्यातही मार्केट्ची तब्येत फारशी सुधारली नाहीं.फक्त गेल्या आठवड्यांत फारच खालावलेली अवस्था होती त्यातून मार्केट थोडे सावरलं इतकच!
सोमवारी ‘HDFC LIFE चा ‘इपो’ नजीकच्या काळांत येण्याची शक्यता वर्तवली गेली. ट्रेड डेटा आला. सोन्याची आयात वाढली क्रूडमध्ये मंदी आल्यामुळे ट्रेड घाटा कमी झाला. फेबृआरी ‘WPI’ चे आकडे जाहीर झाले. WPI – २.०६% जाहीर झाले.हे जानेवारीमध्ये -.३९% होते. ADVANCE TAX चे आकडे येण्यास सुरुवात झाली. ज्यांनी ADVANCE TAX जास्त भरला त्यांना जास्त नफा होणार आहे असे गृहीत धरले जाते.उदा:स्टेट बँक ऑफ इंडिया, येस बँक. ‘PERSISTANT SYSTEMS’ या कंपनीने ते करीत असलेल्या R&D मधील गुंतवणुकीमुळे वार्षिक निकाल फारसे चांगले असणार नाहीत असे सांगितल्यामुळे शेअरच्या किमतीत पडझड सुरु झाली. मार्केटमध्ये कॅश VOLUME कमी होते. मार्केट पडत असताना किंवा मार्केट वाढत असताना VOLUME चांगले असले तर पडण्याची किंवा वाढण्याची क्रिया सुरु राहते. त्यामुळे मार्केटचा अंदाज येत नव्हता. लोकांचा कल समजत नव्हता. मंगळवारपासून ‘FOMC’ ची मीटिंग चालू होईल ती दोन दिवस चालणार आहे.FOMC’ चा काय निर्णय येतो ही काळजी मार्केटला लागली होती.
त्यामुळे मंगळवारी मार्केट एखाद्या झुल्याप्रमाणे झुलत होते. २ वेळेला ३०० पाईंट वर गेले २ वेळेला ४०-४५ पाईंटपर्यंत खाली आले. शेवटी ३०० पाईंट वरच होते.ज्यांनी शेअर्स वरच्या भावांत खरेदी केले होते त्यांना विकण्याची संधी मिळाली. सकाळी मार्केट उघडताच ‘GULF OIL’ या कंपनीच्या २.९७ कोटी शेअर्सचे ब्लॉक डील झाले.शेअर Rs१४८ वरून Rs१६४ पर्यंत पोहोचला. माझ्या मते अशी वेळ बरोबर साधून इंट्रादे ट्रेड केला तर त्यांत फायदा होऊ शकतो. ‘MMDR’ विधेयक लोकसभेत पास झाले.
बुधवारी महिंद्रा &महिंद्रा च्या व्यवस्थापनाने सांगितले की अवकाळी पाउस व त्यामुळे शेतीवर होणारा परिणाम यामुळे TRACTOR च्या विक्रीवर प्रतिकूल परिणाम होईल.त्यामुळे ह्या शेअरची किमत घटली. टाटा मोटर्सचे विक्रीचे आकडे ही कमी आले . आज मार्केट स्थिर नव्हते. दोन्ही बाजूला धावत होते. ट्रेडर्सनी प्रयत्न करून ८६७० च्या खाली NIFTY जाऊ दिला नाही. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. काही वेळच ही लिमिट क्रॉस झाली तेव्हां मार्केट १८२ पाईंट पडले. LOGISTIC शेअर वर होते. ‘INOX WIND’ चा ‘IPO’ येणार असल्यामुळे त्याच क्षेत्रातील ‘SUZLON’ कंपनीच्या शेअर्सला मूव्ह आली. ‘INOX WIND’ हा इशू ओपन झाला ह्या शेअरची दर्शनी किमत १० रुपये असून प्राईस BAND ३१५ ते ३२५ आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना १५ रुपये सूट दिली आहे.मिनिमम लॉट ४५ शेअर्स आहे. ही कंपनी आपली CAPACITY ९०० MW वरून १६०० MW एवढी वाढवणार आहे.
जेट ऐअरवेज या कंपनीने ‘TDS DUES’ तसेच आयकारावरील व्याज पूर्णपणे भरले. सेबी ( SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA) GOVERNMENT BONDS च्या बाबतीत नवीन रेग्युलेटर असेल. तसेच GOVERNMENT BONDS हे STOCK EXCHANGESवर ट्रेड होतील.असे जाहीर झाले . ‘IDBI’ ला डिसेंबर २३ २०१४ पासून आज पर्यंत ‘CARE’ या कंपनीतील १०.७२% स्टेक विकून ४४६.३ कोटी रुपये मिळाले.
‘FOMC’ मीटिंगचा परिणाम, बुधवारी मार्केट संपल्यानंतर जाहीर झाला.. FED रेट वाढवेल अशी भीती होती. पण तसे काही झाले नाही.( परंतु FEDने आपल्या नोटमधून ‘पेशंस’ हा शब्द काढून टाकल्यामुळे एप्रिल किंवा जून मध्ये ही वाढ होऊ शकते.) त्यामुळे गुरुवारी सकाळी मार्केट ३२५ पाईंट वर होते. पण मार्केट्ची ही बढत टिकली नाही. मार्केट ३२५ पाईंट वर होते ते २०० पाईंट खाली गेले. मार्केट ‘BANK NIFTY’ मुळे खाली आले. ‘JUST DIAL’ हा शेअर मात्र शेवटपर्यंत बढत टिकवून होता. आजच्या ट्रेडला रिस्क ऑफ ट्रेड असे म्हणतात. याचा अर्थे मार्केटला लागलेले ग्रहण सुटले.. ‘टेक महिंद्र’ EXबोनस आणी EX स्प्लिट झाला. HCLTECH EX बोनस झाला. ‘ORTEL COMUNICATION’ या कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग झाले. लोकांच्या अंदाजाप्रमाणे लिस्टिंगनंतरही शेअरला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
राज्यसभेत आणी नंतर लोकसभेत ‘MMDR’ हे धातूंच्या खाणीच्या संबंधांतील बिल पास झाले या विधेयकाप्रमाणे धातूंच्या खाणीचाही लिलाव होईल. यामुळे धातुन्शी संबंधीत कंपन्यांचे शेअर्स वाढतील असा अंदाज होता. परंतु सरकारला द्यावी लागणारी ROYALTY आणी DISASTER MANAGEMENT FUND’ मध्ये जमा करावी लागणारी रकम यामुळे मार्जीनवर परिणाम होईल म्हणून हेही शेअर्स पडले. फार्मा शेअर्सवरही गदा आली. सिमेंटच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सिमेंट कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत वाढ झाली. MCX-SX चे नाव बदलून METROPOLITAN STOCK EXCHANGE असे ठेवले. याला रजिस्ट्रार ऑफ कंपनीने ही मान्यता दिली. ‘INOX WIND’ चा इशू आज ३-३० वाजतां ११ वेळा SUBSCRIBE झाला. त्यांत QIB पोर्शन ३१ वेळा, HNI २९ वेळा तर RETAIL पोर्शन १.८ वेळा SUBSCRIBE झाला. एकंदरीत या इशुला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. ‘ HOLCIM- LAFARGE’ मर्जर मधील अडचणी जवळ जवळ दूर होण्याच्या मार्गावर आहेत.
मार्केट बंद झाल्यानंतर बातमी आली की राज्यसभेमध्येही ‘COAL MINES BILL’ पास झाले. OIL INDIA LTD ने Rs १० प्रती शेअर तर ‘ONGC’ने Rs.४ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.
मार्चमधे नेहेमी मार्केट पडतच असतं पण मार्केट सतत वाढत राहण्याची या वर्षी लोकांना सवय झाली आहे त्यामुळे मार्केट पडण धक्कादायक वाटतय. शेअर मार्केटमधले व्यवहार म्हणजेच गुंतवणूकदारांच्या आशा अपेक्षांचा खेळ. नुसत मैदान असताना 20 मजली इमारत उभी करून नफा तोटा याची आकडेमोड करून लोकं शेअर्स खरेदी करतात. आणी नंतर जेव्हां इमारत उभी राहण्याची शक्यता धूसर होताना दिसते तेव्हा विकावयास सुरुवात करतात. म्हणजेच शेअर्सची किमत आणी त्या कंपनीची आर्थिक स्थिती याचा ताळमेळ बसेनासा झाला की शेअर्सची किमत कमी होऊ लागते. एवढच काय लक्षात ठेवण्यासारखं !!
क्या बनेगा पैसा – आठवडा ९ मार्च ते १३ मार्च
आधीच्या आठवड्याबद्दल वाचण्यासाठी इथे क्लिक करा
मार्केट या वर्षी आत्तापर्यंत सातत्याने वाढतच होतं. मार्केट नवनवीन उच्चांक गाठतच होतं. सेन्सेक्स ३०,००० व निफ्टी ९००० वर पोहोचला. यांत एक पंचाईत होत होती. नवीन गुंतवणूकदारांना शिरायला वावच उरला नव्हता.मार्केट थोडेसे पडले की पुन्हा वाढायला सुरुवात व्हायची. त्यामुळे हाताची घडी घालून बसण्याशिवाय पर्याय नव्हता. सगळ्यांना एक भीती सुद्धा होती – या भावांला खरेदी केली आणी मार्केट पडायला लागलं तर चढ्या भावांत शेअर गळ्यांत पडेल परिणामतः आपला पैसा अडकून पडेल.परंतु या आठवड्यांत या वाढीला लगाम लागला असं म्हणाव लागेल, अगदी आठवडाभर मार्केट पडतच होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
या आठवड्यात मार्केट मस्त पडलं आणि मला तरी आनंद झाला. निफ्टीने ९००० पासून ८६७० च्याही खालची पातळी शुक्रवारी गाठली. मार्केट वाढले होतं त्यावेळी ज्यांनी शेअर्स विकून पैसे जमा केले असतील त्यांना शेअर स्वस्तात घेण्याची संधी शेअरबाजाराने दिली असेच म्हणावे लागेल. कांरणे काही कां असेनात.
गेल्या आठवड्यांत मार्केट ४ मार्च बुधवार आणी ५ मार्च गुरुवार या दिवशी आपटले होते.निफ्टी जवळ जवळ १०० पाईंट पडला. गेल्या शुक्रवारी धुलीवंदनाची सुट्टी होती. कोळश्याच्या खाणी आणी स्पेक्ट्रम यांचे लिलाव चालू होते आणी त्यांत संसदेचे अधिवेशन चालू, त्यांत महत्वाचे प्रस्ताव पास होतील की नाही हे समजत नव्हते त्यामुळे सर्वजण चाचपडत होते.
मार्केट २ दिवस सतत १००० पाईंट पडल्यामुळे कदाचित सोमवारी रिलीफ rally असेल असा सर्वांचा अंदाज होता.अहो तुम्ही म्हणाल रिलीफ RALLY म्हणजे काय? तर सतत मार्केट ढासळलेले बघून कंटाळलेल्या लोकांना थोडासा रिलीफ देणारी RALLY होय असे मला वाटते. अशा वेळेला मंदी करणारे घाबरतात आणी तेजी करणाऱ्यांना अंदाज येत नाही. सोमवारी ९ मार्चला असेच घडले. मार्केट्ची दिशा समजत नव्हती. मार्केट थोड्या वेळ पडत होते पण लगेच वाढत होते. अशी वेळ इंट्राडे करणाऱ्यांसाठी उत्तम. तुम्ही सतत मार्केट बघत असाल तर अख्खा दिवस इंट्रा करत बसा. जर ‘BUY’ पोझिशन असेल आणी इंट्रा झाला नाही तर मार्केट पडल्यानंतर तुम्ही शेअर घेतल्यामुळे स्वस्त पडतो. मार्केट पडत असताना गुंतवणूकदारांचा कल फार्मा शेअर्स खरेदी करण्याकडे असतो असे मला आढळले आहे.
यावेळी आपल्या मराठी भाषेत म्हणतात त्याप्रमाणे अवकाळी पाउस पडला. त्यामुळे शेतीशी संबंधीत शेअर्स पडले. पंजाब हरयाणा या राज्यांत या पावसाचा जास्त परिणाम झाला. बटाटा गहू आणी इतर रब्बीच्या पिकांवर विपरीत परिणाम झाला. लगेच विश्लेषकांनी स्पष्टीकरण दिले की याचा परिणाम , ‘CPI’ वर होईल असे वाटत नाही. कारण अशा वेळी सरकार बफर साठा बाजारांत आणते.परंतु काही दिवसांनी महागाईवर होणाऱ्या परिणामांमुळे लोक चिंतित आहेत. जिंदाल स्टील आणी पावर या कंपनीला पॉवर सेक्टरसाठी ठेवलेले कोल ब्लोक रिझनेबल किमतीत मिळतील अशी बातमी आली. युनायटेड स्पिरीट या कंपनीने हुगली (पश्चिम बंगाल) येथील युनिट बंद करीत आहे असे जाहीर केले. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशातील ‘JOB NUMBERS’ खूप चांगले आले त्यामुळे ‘DOLLAR’ मजबूत झाला. याचा रुपयाच्या किमतीवर परिणाम होतो. ‘IT’ कंपन्यांनी त्यांच्या उद्योगांत ‘SLUGGISHNESS’ येण्याची भीती व्यक्त केली.
मंगळवार दिनांक १० मार्च रोजी ‘ADLAB’ या कंपनीचा ‘IPO ’जाहीर झाला. प्राईस BAND २२१ ते २३० जाहीर झाला किरकोळ गुंतवणूकदारांसाठी Rs१२ची सूटही दिली आहे, ६५ शेअरचा मिनिमम लॉट हि जाहीर झाला. हा इशू मार्चमध्ये आला आहे. यावेळी लिक्विडीटीचा प्राब्लेम असतो. माझ्या अनुभवानुसार हा इशु मला जरा महाग वाटला. ‘IPO’ चा पैसा कर्ज फेडण्यासाठी वापरला जाणार आहे. प्रगतीसाठी नाही.त्यामुळे इशुला प्रतिसाद कमी राहील अशी भीती होती. हे अंदाज खरे ठरले आणी ‘ADLAB’ ला आपल्या इशुचा प्राईस BAND खाली आणावा लागला (१८० ते २१० ) तसेच इशुची मुदत १७ मार्च पर्यंत वाढवावी लागली. ही गोष्ट गुरुवारची.
गुजरात फ्लोरो ही कंपनी ‘INOX WIND’ या त्यांच्या स्टेक असलेल्या कंपनीचा ‘IPO’ आणत आहे. सध्या मार्केट FUNDAMENTALS वर चालू नसून लिक्विडीटीच्या उपलब्धतेवर चालू आहे असे म्हणावे लागेल. ग्राउंडलेव्हलवर मंदीच आहे असे म्हणावे लागेल. मार्केट ज्या प्रमाणांत आणी ज्या वेगाने सुधारत आहे त्या प्रमाणात अर्थव्यवस्था सुधारली नाही. ‘नितेश इस्टेट’ या शेअरचे सर्किट लिमिट २०% वरून १०%ची केली गेली. अशा शेअर्स पासून आपण सावध राहिलेले बरे. ‘टेक महिंद्र’ या कंपनीने गुगल टेक्नोलॉजी बरोबर पहिले ‘ EXCELLENCE’ सेंटर LAUNCH केले त्यामुळे शेअरची किमत वाढली. ९०० MHZचे बिडिंग क्लोज झाले त्यामुळे IDEA, R.COM, BHARATI AIRTEL या शेअर्समध्ये तेजी होती. ‘MONET ISPAT’ या कंपनीला कोल ब्लॉक मिळाल्यामुळे त्या शेअरचा भाव वाढला.
बुधवार दिनांक 10 MARCH रोजी रुपया कमजोर झाला. वेदांत ग्रूपच्या’ CAIRNS INDIA’ या कंपनीकडे कॅपिटल GAINS TAX ची मागणी केली गेली. ही मागणी मोठ्या रकमेची असल्याने CAIRN INDIA च्या शेअर्सची किमत कमी झाली. ‘USFDA’ या अमेरिकन AUTHORITY ने ‘शिल्पा मेडिकेअर’ या कंपनीच्या API फोर ओंकोलोजी याला APPROVAL दिले त्यामुळे या शेअर्सच्या किमतीत जबरदस्त वाढ झाली. .
कालपासून चीन आणी इतर देशांकडून येणाऱ्या स्टेनलेस स्टील वर ‘ANTI DUMPING’ ड्युटी लावण्याचा सरकारचा विचार आहे अशी खबर होती. यामुळे ‘उत्तम गालवा स्टील’ व ‘जिंदाल स्टेनलेस स्टील’ या शेअर्समध्ये वाढ झाली. स्टेट बँक ,PNB तसेच CANARA बँक याना स्वतः बाजारातून पैसे उभारण्यास परवानगी मिळाली. ‘रिलायन्स कॅपिटल’ ‘कोटक’,’ MAX INDIA’ ‘DEN NETWORKS’ या कंपन्यांनी ‘FII’ (FOREIGN INSTITUTIONAL INVESTMENT) ची लिमिट ४९% वरून ७४% पर्यंत वाढवली. सिगारेटवरील ड्युटी वाढवल्यामुळे ‘ITC’ चा शेअर खाली आला होता. परंतु देवेश्वर (ITC चे CHAIRMAN) यानी सांगितले की आम्ही TAX एवढीच सिगारेटच्या किमतीत वाढ करणार आहोत त्यामुळे त्याचा परिणाम कंपनीवर कमी होईल. यामुळे शेअरच्या किमतीत वाढ झाली. ‘कोलगेट’ कंपनीचा शेअर वाढतो आहे कारण ही कंपनी बोनस देण्याची शक्यता आहे असा अंदाज आहे. या कंपनीत पेरेंट कंपनीचा स्टेक ५१% आहे बाकीच्या कंपन्यानमध्ये हा स्टेक ७४% असतो. डाबरकंपनीचा शेअर वाढतो याचे कारण त्यांचा इन्शुरन्समध्ये स्टेक आहे हेही आहे. रशीयातील अस्थिरतेमुळे आणी त्यांच्या चलनाच्या घटत्या किमतीमुळे ‘REDDYS’ आणी ‘ग्लेनमार्क’ या कंपन्यांचे शेअर्स पडले होते. ‘ग्लेनमार्क’ या कंपनीने अस्थमा इनहेलर मेडिकेशन मार्केटमध्ये प्रवेश केला. ‘CROMPTON GREAVES’ या कंपनीला सौदी इलेक्ट्रिककडून मोठी ऑर्डर मिळाली.
आज मार्केट बंद झाल्यावर जानेवारी २०१५ ‘IIP’ चे आकडे आणी INFLATION संबंधीत आकडेवारी आली.
‘IIP’ १.७% वरून २.६% पर्यंत वाढले. ही चांगली बातमी आहे पण ‘INFLATION’ ही ५.१९% वरून ५.३७% पर्यंत वाढले. त्यामुळे महागाईने आपला वाढण्याचा कल सुरु ठेवला. ‘NATCO PHARMA’ या कंपनीच्या हेपेटाइटीस सी च्या जनरिक औषध “SOVALDI’ साठी परवानगी मिळाली त्यामुळे शेअरची किमत वाढली.आज सरकारने संसदेत “INSURANCEबिल प्रस्तुत केले. हे बिल विरोधकांनी सुचवलेल्या दुरुस्त्या मान्य केल्यामुळे आता संसदेत पास होईल अशी अशा आहे. पण मार्केट बंद होईपर्यंत याची काही खबर आली नाही. ‘NTPC’ च्या बोनस डिबेंचर्स मिळण्यासाठी रेकॉर्ड डेट २३ मार्च आहे. तसेच ‘TECH महिंद्रा’ च्या बोनस आणी स्प्लिट साठी रेकॉर्ड डेट २० मार्च आहे.
आज मार्केट बंद झाल्यानंतर ‘INSURANCE’ बिल राज्यसभेतही पास झाले.. उद्या या क्षेत्रातील शेअर वाढतील असे सगळ्यांना वाटले होते. पण ‘BUY on RUMOURS आणी SELL on NEWS हे तत्व बहुतेक वेळेला मार्केट आचरते. आधी खिचडीचा वास येतो पण जेवायला बसल्यावर पातेलं रिकामेच असते असे म्हणावे लागते..त्याप्रमाणे शुक्रवारी अनुभव आला. ‘INSURANCE’ शी संबंधीत शेअर्स सुरुवातीची बढत टिकवू शकले नाहीत..
आज शुक्रवार १३ मार्च रोजी मार्केट खूप पडले. आज निफ्टीने ८६०० चे लेवेल तोडले. आज सरकारने आयात केलेल्या रबरावर आयात ड्युटी बसवली. याचा परिणाम म्हणून टायर कंपन्यांचे मार्जीन कमी होईल म्हणून त्यांचे शेअर पडले. कर्नाटक राज्य सरकारने सिगारेटवर ‘VAT’ आकारण्याचा निर्णय घेतल्याने पुन्हा एकदा ‘ITC’ चा शेअर पडला.
असे मार्केट पडायला लागलं की किरकोळ गुंतवणूकदार मार्केटमध्ये शिरायला घाबरतात. त्यामुळे स्वस्तांत चांगले शेअर्स मिळण्याची संधी हुकते आणी नंतर मार्केट वाढल्यावर धावत पळत बस किंवा लोकल गाडी पकडावी त्या पद्धतीने पुन्हा या भावांत आपल्याला शेअर मिळेल की नाही असे वाटून चढ्या भावांत शेअर खरेदी करतात त्यामुळे त्यांना कायमच ‘क्या बनेगा पैसा’ असे विचारावे लागते.
भाग ५४ – लक्षात येयीना, मार्केट वाकडे – bonus आणि split
मागील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
या आठवड्यामध्ये वाघ मागे लागल्यासारखं काम होतं. कितीही आटपण्याचा प्रयत्न केला तरी आटपत नव्हतं. वेळ पुरत नव्हता आणि काय करावं ते ही समजत नव्हतं. नुसता चिडचिडाट… प्रत्येकजण घरी आला की त्याची अपेक्षा मी आपल्या आवडीचे खायला द्यावे विचारपूस करावी. यजमानही लोकलमधून धक्के खात खात येत असत. त्यांनाही वाटे बँकेतल्या कहाण्या बायकोने ऐकाव्यात. आल्याबरोबर कटकट लावू नये. “रिमोट कुठे आहे तो सांग किंवा दे. मला match बघायची आहे”. इति मुलगा
मी कंटाळले होते. शनिवार रविवारची आतुरतेने वाट पहात होते.मी मनाशी ठरवलेच ह्या शनिवार-रविवारी काहीही चटकमटक खायला करायचं नाही, जेवणांतही काही बदल करायचा नाही, जादा कोणतंही काम नाही, कोणाला भेटायला जायचं नाही किंवा कोणाला बोलवायचंही नाही. फक्त विश्रांती घ्यायची
ठरवल्याप्रमाणे शनिवार आरामांत घालवला. पण माझ्या आरामाला दृष्ट लागली बहुतेक ! रविवारी सकाळी नऊ वाजतां एक गृहस्थ आणी त्यांच्याबरोबर एक मध्यमवयीन माणूस असे आमच्या घरी आले. वयस्कर गृहस्थ ठाण्याचे नव्हते. पण त्यांच्याबरोबरच्या माणसाची माझी तोंड ओळख होती असे वाटले.
त्यांनी बेल वाजवली. माझ्या यजमानानी दार उघडले. मी सकाळी काम उरकत होते. तशी अवतारातच होते. यजमानांनी विचारपूस केली तेव्हा ते गृहस्थ म्हणाले “मी माझी वहिनी अंकातील शेअरमार्केटचा लेख वाचला. ब्लोग वाचला. आपल्याकडे शेअरमार्केट कोण करतं ? “
यजमान म्हणाले “ माझी बायको करते. मी बँकेत नोकरी करतो.”
गृहस्थ “मला त्यांना भेटायचे आहे.”
यजमान “तुम्ही आधी कळवलं होतं कां ?”
गृहस्थ “ नाही नाही, आज रविवार त्या भेटतील असे वाटले! म्हणून आलो.”
यजमान आंत आले. मला म्हणाले “ कुणीतरी तुला भेटायला आले आहे.”
मी म्हणाले “ त्यांना बसायला सांगा, पाणी द्या. पंखा लावा . मी ५-१० मिनिटांत माझा अवतार ठीकठाक करून बाहेर येते.”
झाला सुरु रविवार असं बडबडत केसावर फणी फिरवून साडी नीट करून मी बाहेर गेले. मी स्वतःच विषयाला हात घातला. “ आज कसं काय अचानक येणं केलं ?
गृहस्थांना आपण कधी एकदा सर्व काही माझ्या कानावर घालतो असे झाले होते – “मी ज्या लायब्ररीतून अंक आणला त्या लायब्ररीतील बाई तुमच्याकडे गाण्याच्या क्लासला येतात त्यांनी पत्ता सांगितला, त्यामुळे मी येऊ शकलो.”
मी म्हटले “ बरं ते ठीक आहे. तुमचा प्रॉब्लेम काय आहे तो तरी सांगा! आढेवेढे न घेतां मोकळेपणाने सांगा.”
“ अहो मी बोनस आणी स्प्लिट जाहीर झाले म्हणून काही शेअर्स घेतले. १:१ या प्रमाणांत बोनस आणी १:१ या प्रमाणांत असे स्प्लिट होणार होते. म्हणजे एका शेअरचे ४ शेअर्स होणार ना! मी काय म्हणतो ते बरोबर आहे ना?” दुसर्या कंपनीने फक्त बोनस दिला होता. अहो शेअरचा भाव होता Rs. २००० होतां. मला असे वाटले की एका शेअरचे ४ शेअर झाले की आपण ४ शेअर्स विकू तर आपल्याला Rs.८००० मिळतील. शेअर्स विकून पैसे आले की आपण घरातल्या सगळ्यांना काहीतरी देऊ. त्यामुळे मी नातवाला सायकल, नातीला मोबाईल, बायकोला पैठणी घ्यायचे प्रॉमिस केले.शुक्रवारी मी स्टेटमेंट पहिले तर एका शेअर्सचे ४ शेअर झाले होते. मार्केट उघडल्याबरोबर शेअर विकायची ऑर्डर लावायला फोन केला, भाव विचारला.
तो म्हणाला “ Rs.५०० भाव आहे. माझी त्याच्याबरोबर वादावादी झाली. काय गोंधळ झाला मला समजेना! “
तो म्हणाला “ मार्केट संपल्यावर विचारा. सध्या सारखे फोन चालू आहेत. “
गृहस्थांनी आपलं म्हणण चालू ठेवले “ शेअरमार्केट म्हणजे अंदाधुंदीचा कारभार, गडबड घोटाळे हे सर्व वाचलेले खरे झाले असे वाटले. फसवणूक झाली म्हणून डोके बडवून घेण तेव्हढेच बाकी राहिले होते. तेव्हा नातू म्हणाला आजोबा तुमचं बीपी वाढेल. पूर्ण चौकशी करा. उगीचच घाबरु नका. जो कोणी फसवणार नाही असं वाटेल तेथे जाऊन चौकशी करा. तुमच्या जिवापेक्षा मला काही नको. मला सायकल नको आहे आजोबा!”
मी म्हणाले “ थांबा जरा , काहीतरी गडबड आहे. १:१ बोनस आणी १:१ स्प्लिट झाले म्हणजे एकाचे ४ शेअर्स झाले. तर मग शेअर्सचा भाव १/४ (२५%) व्हायला हवा. Rs. ५०० सकाळी भाव असेल नंतर तो मार्केटप्रमाणे ४९७, ५०२, ५०४, ४९९ असा बदलला असेल ना ! की यापेक्षा काही वेगळे? “
गृहस्थ म्हणाले “ नाही madam अगदी बरोबर तुम्ही म्हणता तसेच झाले.
मी म्हणाले “ आजोबा तुमचे काही चुकले नाही. सगळ्यांचं हेच होते. बोनस किंवा स्प्लिट ज्या प्रमाणांत असेल त्या प्रमाणांत शेअर्सचा भाव कमी होतो. यामध्ये तुमची काहीही फसवणूक झालेली नाही.मी तुम्हाला थोडक्यांत सांगते जेव्हा शेअरचा भाव खूप वाढतो, लोकांना शेअर महाग वाटतो, त्या शेअरमध्ये होणारे ट्रेडिंग कमी होते आहे असे कंपनीला वाटते, त्याचबरोबर कंपनीकडे जर खूप ‘Accumulated Reserves’ असतील आणी भांडवली गुंतवणुकीच्या संधी नजीकच्या काळांत उपलब्ध नसतील तर कंपनी बोनस किंवा स्प्लिट जाहीर करते. या सर्व प्रक्रियेमध्ये तुमच्या शेअर्सची संख्या वाढते पण शेअर्सची किमत कमी झाल्यामुळे भागधारकाच्या गुंतवणुकीत फरक पडत नाही. परंतु हे सर्व लक्षांत कोण घेतो.
स्प्लिट’ मध्ये शेअर्सची दर्शनी किमतही कमी होते. बोनसचे उगीचच आकर्षण आहे हे मात्र खरे. पण होतं काय कि बोनसच्या आकर्षणाने शेअर्सची मागणी वाढते. बोनस जाहीर झाल्यापासून बोनस शेअर्स मिळेपर्यंत शेअर्सचा भाव वाढण्याची शक्यता असते.त्यामुळे बोनस घेतलाच पाहिजे असे नाही. वाढलेल्या भावाचा फायदा शेअर्स विकून घेता येतो.. अहो आजोबा तुमची फसवणूक झाली नाही किंवा काहीही गडबड घोटाळाही नाही. तुम्हाला बोनस आणी स्प्लीत्ची प्रोसीजर माहित नव्हती इतकेच.”
“ MADAM, तुमचा ब्लोग वाचताना मी मनातल्या मनांत तुम्हाला हसलो होतो. शेअरमार्केट म्हणजे साधी खरेदीविक्री… त्यांत कसला अभ्यास करायचा कसलं निरीक्षण करायचे. पण आज तुमचा शब्द न शब्द पटतो आहे. आता मी नक्की प्रत्येक गोष्टीची माहिती मिळवेन.
मी मनातल्या मनात म्हटलं – माझे ही डोळे उघडले. सध्या तीनचार कंपन्यांनी बोनस स्प्लिट जाहीर केले आहे लोकांचा गोंधळ होऊ नये म्हणून मला याच विषयावर ब्लोग लिहिला पाहिजे.
भेटू या पुढच्या भागांत…
आठवडा मार्केटचा – २ मार्च ते ५ मार्च – उच्चांकाचा झेंडा रोविला
आधीच्या आठवड्याबद्दल वाचण्यासाठी इथे क्लिक करा
शेअरमार्केटचं लग्न थाटामाटांत पार पडलं.पण त्यानंतरची आवराआवरी शिल्लक होतीच नं ! अहो लग्न उरकलं तरी पाहुणे जायचे असतात. सत्यनारायणाची पूजा व्हावयाची असते कुलदैवतेचे दर्शन घ्यावयाचे असते.अशाच पद्धतीने मार्केटमध्येसुद्धा लोकांना बजेट समजावून घ्यायचं होतं. कोणत्या कंपनीला आणी किती फायदा होईल त्याप्रमाणे शेअर्सच्या किंमतीत किती फरक पडेल आणी गुंतवणूक केली तर फायदेशीर ठरेल कां? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची होती.हे सगळं हळूहळू घडतय आणी मार्केटला हळू हळू बजेट समजतंय असं या आठवड्यात वाटलं.
सोमवारी पहिला दणका ‘ITC’ ने दिला. सिगारेटवरचा कर वाढल्यामुळे ‘ITC’ च्या शेअरवर याचा परिणाम झाला. ‘ITC’ चे ‘NIFTY’ मधील WEIGHTAGE ७% आहे त्यामुळे मार्केट पडलं.
नॉन-पेमेंट ऑफ DUES हे कारण देऊन जेट एअरवेज, स्पाईसजेट, गोएअर, आणी इंडिगो या कंपन्यांना क्रेडीट देणे बंद केले त्यामुळे यापैकी काही कंपन्यांचे शेअर्स घसरले. ‘FINANCIALTECHNOLOGY’ आणी ‘NSEL’ यांच्या मर्जरची बातमी आली. ‘FT’ च्या शेअरहोल्डरना ही गोष्ट पटली नाही. त्यांनी या विरोधांत जणू आघाडीच उघडली.’FT’ ची कॅश ‘NSEL’ चे LOSSES भरून काढण्यासाठी कां वापरणार असे शेअरहोल्डरचे म्हणणे होते. त्यामुळे गुंतवणूकदारांना आशेचा किरण दिसला आणी परिणामी शेअरचा भाव वधारला.नेहेमीप्रमाणे ऑटोविक्रीचे आकडे जाहीर झाले. ‘बजाज ऑटो’ ची विक्री आणी निर्यात,तसेच हिरोमोटोची विक्री कमी झाली त्यामुळे त्यांच्या शेअर्सचे भाव कमी झाले त्याविरुद्ध EICHER, TATA MOTORS, TVS च्या विक्रींत वाढ झाली.त्यामुळे या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वधारले.
सरकारने पेट्रोलचा दर ३.१८ पैसे वाढवला. त्यामुळे ओईल मार्केटिंग कंपन्यांचे शेअर्स वधारले.उदा : HPCL BPCL IOC. बजेटमध्ये INFRASTRUCTURE आणी हौसिंग या क्षेत्रांत गुंतवणूक वाढेल असं दिसल्यानी सिमेंटचे शेअर्स चांगलेच तेजीत होते.
मंगळवार हा ‘NIFTY’च्या दृष्टीने ऐतिहासिक दिवस ठरला. दूरदर्शनवरील वाहिन्यांनी या घटनेचे प्रसारण एखाद्या क्रिकेटच्या सामन्यासारखे केले.आता ८ धावा उरल्या आता दोन चौके पाहिजेत, आता तीन रन उरल्या सहा BALL मध्ये नक्की निघू शकतात. हे जसे सांगतात तसचं NIFTY ८९९० झाल्याबरोबर शेअर मार्केटच्या समालोचकांना उत्साह आला. ४ अंक वर ५ अंक खाली हा पाठशिवणीचा खेळ सुरु झाला. ८९९७ हा NIFTYचा आतापर्यंतचा उच्चांक होताक्षणीच फटाके वाजवले फलक झळकले व आनंद साजरा केला. जणू काही हा साऱ्या गुंतवणूकदारांचा, ट्रेडर्सचा विजय होता असे वातावरण निर्माण झाले.खूप मजा आली. एक भारावलेले वातावरण तयार झालं. पण ही घटना घडली दुपारी. ‘PSL’(PRIORITY SECTOR LENDING )चे नॉर्म्स बदलले. रोमिंग चार्जेसची कमाल मर्यादा ‘TRAI’ ने ठरवली. त्यामुळे भारती आयडीया यांच्या शेअर्सवर परिणाम झाला. ‘HOTEL LEELA’ त्यांची गोवा व चेन्नई येथील हॉटेल्स विकणार अशी बातमी येताच शेअरचा भाव वधारला. आज अचानक ‘TATA’ ग्रुपच्या शेअर्समध्ये वाढ झाली. नेहेमी किमतीत वाढ किंवा घट झाली की शोधाशोध चालू होते आणी ही वाढ किंवा घट कोणत्या कारणांने योग्य आहे किंवा कुठे खिचडी शिजते आहे हे शोधले जाते.पण आज मात्र या लोकांना या वाढीचे कारण सांगता आले नाही. वर्तमानपत्राच्या बातमीनुसार “TATA SONS’ चा ‘IPO’ येतो आहे म्हणून शेअर्स वाढले हा माझा अंदाज. मार्केटने 9000 चा आकडाही ओलांडला. ३०-१- २०१५ नंतर मार्केट पहिल्यांदा या ठिकाणी पोहोचलं
बुधवारी अजूनच मजा आली. आज ‘RBI’ने अचानक रेपो रेट .२५ ने कमी केला आहे असं जाहीर केलं . त्यामुळे आज मार्केटमध्ये तेजी असणार हे ठरलेलेच. परंतु किती याचा अंदाज प्रत्येकजण घेत होता. आज SENSEX उच्चांक गाठतो कि काय अशी बऱ्याच जणांची अटकळ होती. सव्वानउ वाजतां घंटा झाली मार्केट उघडले आणी THIRTY THIRTY असा जयघोष ऐकू आला. THIRTY म्हणजे SENSEX ३०००० बरं . ३०००० आकडा असलेले GASचे फुगे सोडले गेले. आणी हा ऐतिहासिक क्षण साजरा केला गेला.
त्याच दिवशी स्पेक्ट्रम आणी कोळसाखाणींचा लिलाव .होता. उषा मार्टिन या कंपनीला खाण मिळाली असे कळताच त्या शेअरचा भाव वाढला. ‘ SUN PHARMA’ या कंपनीला जो ’USFDAकडून ४८३ फार्म मिळाला होता त्याचे CLOSURE झाले त्यामुळे कंपनीच्या डोक्यावरची टांगती तलवार गेली. हलोल प्लांट काळजीमुक्त झाला. सन फार्माची कॉलर ताठ.त्यामुळे सन फार्मा आणी त्यांची कंपनी ‘SPARC ’ यांचाही भाव वाढला
शेअरमार्केटची लहर सांभाळणे फार कठीण. रंगाचा बेरंग व्हायला वेळ लागत नाही. पुन्हा एकदा शेअरमार्केटने आपला हिसका दाखवला. अचानक शेअरमार्केट पडायला सुरुवात झाली. मार्केट पडण्याचा वेगही वाढला. सर्वांची तारांबळ उडाली. ४०० अंक वाढलेले मार्केट नाहीसे होऊन ४०० अंक रेड दिसू लागले काय झाले हे कोणालाच कळेना. खरेदी करणाऱ्यांचा आणी विक्री करणाऱ्यांचा दोघांचाही गोंधळ उडाला. पण शेअरमार्केट एखाद्या व्यक्तीप्रमाणे बाजूला उभे राहून मजा बघते की काय असं वाटू लागलं. तुम्ही परीस्थीतीचे कितीही विश्लेषण करून निष्कर्ष काढले तरी तुमची गाठ माझ्याशी आहे हे लक्षांत ठेवा हुरळून जावू नका असं जणू मार्केट सुचवतं होतं
मी गुरुवारी सकाळी साडेसात वाजताच टीव्ही लावला तेव्हाच पहिली बातमी कानावर आली ती ‘RELIANCE INFRA’ पिपावाव डिफेन्समध्ये स्टेक घेते आहे. पण हा फारसा फायेद्शीर सौदा गुंतवणूकदारांच्या दृष्टीने नव्हता. त्यामुळे पिपावावचा भाव १०% पडला. ‘UNITED SPIRITS’ या कंपनीने व्यवस्थापनामध्ये जे बदल केले ते कंपनीची प्रगती करतील असे गुंतवणूकदारांना वाटले. त्यामुळे शेअरच्या भावांत वाढ झाली. ‘ORTEL COMMUNICATION’ चा ‘IPO’ शुक्रवारी बंद होणार असूनही लोकांनी पाठ फिरवली असे जाणवले.
असा लक्षांत राहण्यासारखा ‘उतू नका मातु नका घेतला वसा टाकू नका” असे सुचवत हा आठवडा संपलाआणी शेअरमार्केटच्या रंगांच्या उधळणीप्रमाणेच खऱ्या रंगांची उधळण करायला गुंतवणूकदार मोकळे झाले . होळी आलीरे होळी म्हणत घरी पत्नीने केलेल्या पुरणपोळ्यांचा आस्वाद घेण्यास सज्ज झाले.
आठवडा मार्केटचा – २३ फेब्रुवारी ये २८ फेब्रुवारी
आधीच्या आठवड्याबद्दल वाचण्यासाठी इथे क्लिक करा
हा आठवडा म्हणजे जणू लग्नसराईच. लग्नाच्या आधी जसे सीमांत पूजन, व्याही भोजन असते तसे रेल्वे बजेट २६ तारखेला तर लग्नाचा मुहूर्त २८ तारखेला म्हणजेच शनिवारी अर्थसंकल्पाचे सादरीकरण. त्यादिवशी नेमके मार्केट बंद असते. परंतु सर्वांनी सेबी (SECURITIES EXCHANGE BOARD OF INDIA) ला शनिवारी मार्केट चालू ठेवावे अशी विनंती केली. सर्वांच्या विनंतीला मान देऊन शनिवारी मार्केट नेहेमीप्रमाणे उघडे राहील असे जाहीर केले.
सोमवारी लुपिन कंपनीला इंदूर प्लांटसाठी ४८३ हा फॉर्म मिळाला. USFDA च्या निरीक्षणाअंती काही गैर आढळले असावे. त्यामुळे हा शेअर Rs. ६० ते Rs ६५ पडला. ही कंपनी चांगली फार्मा कंपनी, ब्लू चीप कंपनी आहे आणि हा शेअर विकत घेण्याची हि चांगली संधी ठरू शकते कारण कंपनीने लगेचच खुलासा केला की या निरीक्षणांचा आमच्या सध्याच्या बिझिनेसवर काही परिणाम होत नाही. पुढे काही परवानग्या मिळण्यासाठी त्रास होऊ शकतो. हा शेअर दोन दिवसांत सुधारला.
कोळशाच्या खाणींचा लिलाव फार सुंदररीत्या पार पडला. त्यामुळे सरकारला अपेक्षित असणारी रकम मिळेल.श्रीनिवासन हे अपात्र ठरवले गेले असूनही BCCI च्या मीटिंगचे अध्यक्ष कसे हे कोडे गुंतवणूकदारांना उलगडले नाही. त्यामुळे नाराजीने इंडिया सिमेंट या कंपनीचा शेअर पडायला सुरुवात झाली. शोभा डेवलपर्स, ओबेराय आणी गोदरेज यांनी घरांचे दर वाढवले. त्यामुळे हे शेअर्स Rs २२ ते Rs २५ ने वाढले.
बुधवारी महिंद्रा आणी महिंद्रा ही कंपनी ABG शिपयार्ड या कंपनीमध्ये काही स्टेक घेण्याच्या विचारांत आहे असे समजताच दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वाढल्या.पंधरा दिवसांपूर्वी HERO MOTO CORP, पिपावाव डिफेन्स या कंपनीतला स्टेक घेते आहे अशी बातमी होती. अचानक या कंपन्यांना शिपिंग कंपन्यामध्ये स्टेक उचलण्याची घाई का झाली याचा मात्र उलगडा झाला नाही.
रेल्वे बजेटमध्ये फ्रेट रेट वाढतील व त्यामुले COAL INDIA LTD .चा शेअर पडेल असा लोकांचा अंदाज होता पण तसे घडले नाही. COAL INDIA ने सांगितले या वाढीचा आमच्या कंपनीवर काही परिणाम होणार नाही. कारण जो कोळसा विकत घेतो तोच वाहतूक खर्च भरतो. रेल्वे बजेटच्या अपेक्षेंत टीटाघर WAGAN, सिमेन्स, CONTAINER CORPORATION OF INDIA ,CMC ह्या शेअर्सच्या किमती वाढू लागल्या .BMS (BATTLEFIELD MANAGEMENT SYSTEMS) साठी BEL आणी ROLTA यांचे एक CONSORTIUM आणी L & T आणी TATA POWER यांच्या CONSORTIUM ची निवड झाली. मेक- इन-इंडिया योजनेखाली दिले जाणारे संरक्षणासंबंधी सर्वात मोठे CONTRACT म्हणावे लागेल. हे CONTRACT Rs ५०,००० कोटी रुपयांचे असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या सर्व हाणामारीमध्ये बजेटचा आनंद कोणाला झाला आणी दुःख कोणाला झाले हे समजले नाही. लोकांना प्रत्यक्ष होणारा परिणाम समजतो. अप्रत्यक्ष होणारा परिणाम समजत नाही. सरकारकडे सुद्धा अजून चार वर्षे आहेत त्यामुळे लोकांना खुश करण्यासारखे बजेट देण्याची गरज वाटली नसावी.
अशा मार्केटला मी अनइझी मार्केट म्हणते. मार्केट वर जातंय असे दिसले तरी खरेदी करायला भीती वाटते. मार्केट मंदीत दिसले तर शेअर विकून पैशे कमावता येतील याची खात्री नाही. फक्त हाताची घडी धालून आपल्याजवळ असलेला एखादा शेअर अचानक वाढला तर विकता येतो.एक विश्लेशकाचा सल्ला असा होता “ YOU MUST TRADE LIGHT COME WHAT MAY, CLOSE YOUR POSITION BEFORE LARGE EVENT. अशा प्रकारे बजेटच्या लग्नाचे सूप वाजले. २ मार्च पासून शेअरमार्केटचा संसार पूर्ववत सुरु होईल अशी आशा करू या.
** शेअर मार्केट बद्दलची माहिती मी माझ्यापरीने सांगायचा प्रयत्न करते पण कुठला शेअर घ्यायचा आणि कुठला विकायचा हो निर्णय तुमचा आणि तो तुम्ही तुमच्या अभ्यास नंतरच घ्यावा हि विनंती. शेवटी फायदाहि तुमचा आणि नुकसान हि तुमचं…***