आठवडा मार्केटचा – २३ फेब्रुवारी ये २८ फेब्रुवारी

आधीच्या आठवड्याबद्दल वाचण्यासाठी इथे क्लिक करा
हा आठवडा म्हणजे जणू लग्नसराईच. लग्नाच्या आधी जसे सीमांत पूजन, व्याही भोजन असते तसे रेल्वे बजेट २६ तारखेला तर लग्नाचा मुहूर्त २८ तारखेला म्हणजेच शनिवारी अर्थसंकल्पाचे सादरीकरण. त्यादिवशी नेमके मार्केट बंद असते. परंतु सर्वांनी सेबी (SECURITIES EXCHANGE BOARD OF INDIA) ला शनिवारी मार्केट चालू ठेवावे अशी विनंती केली. सर्वांच्या विनंतीला मान देऊन शनिवारी मार्केट नेहेमीप्रमाणे उघडे राहील असे जाहीर केले.
सोमवारी लुपिन कंपनीला इंदूर प्लांटसाठी ४८३ हा फॉर्म मिळाला. USFDA च्या निरीक्षणाअंती काही गैर आढळले असावे. त्यामुळे हा शेअर Rs. ६० ते Rs ६५ पडला. ही कंपनी चांगली फार्मा कंपनी, ब्लू चीप कंपनी आहे आणि हा शेअर विकत घेण्याची हि चांगली संधी ठरू शकते कारण कंपनीने लगेचच खुलासा केला की या निरीक्षणांचा आमच्या सध्याच्या बिझिनेसवर काही परिणाम होत नाही. पुढे काही परवानग्या मिळण्यासाठी त्रास होऊ शकतो. हा शेअर दोन दिवसांत सुधारला.
कोळशाच्या खाणींचा लिलाव फार सुंदररीत्या पार पडला. त्यामुळे सरकारला अपेक्षित असणारी रकम मिळेल.श्रीनिवासन हे अपात्र ठरवले गेले असूनही BCCI च्या मीटिंगचे अध्यक्ष कसे हे कोडे गुंतवणूकदारांना उलगडले नाही. त्यामुळे नाराजीने इंडिया सिमेंट या कंपनीचा शेअर पडायला सुरुवात झाली. शोभा डेवलपर्स, ओबेराय आणी गोदरेज यांनी घरांचे दर वाढवले. त्यामुळे हे शेअर्स Rs २२ ते Rs २५ ने वाढले.
बुधवारी महिंद्रा आणी महिंद्रा ही कंपनी ABG शिपयार्ड या कंपनीमध्ये काही स्टेक घेण्याच्या विचारांत आहे असे समजताच दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वाढल्या.पंधरा दिवसांपूर्वी HERO MOTO CORP, पिपावाव डिफेन्स या कंपनीतला स्टेक घेते आहे अशी बातमी होती. अचानक या कंपन्यांना शिपिंग कंपन्यामध्ये स्टेक उचलण्याची घाई का झाली याचा मात्र उलगडा झाला नाही.
रेल्वे बजेटमध्ये फ्रेट रेट वाढतील व त्यामुले COAL INDIA LTD .चा शेअर पडेल असा लोकांचा अंदाज होता पण तसे घडले नाही. COAL INDIA ने सांगितले या वाढीचा आमच्या कंपनीवर काही परिणाम होणार नाही. कारण जो कोळसा विकत घेतो तोच वाहतूक खर्च भरतो. रेल्वे बजेटच्या अपेक्षेंत टीटाघर WAGAN, सिमेन्स, CONTAINER CORPORATION OF INDIA ,CMC ह्या शेअर्सच्या किमती वाढू लागल्या .BMS (BATTLEFIELD MANAGEMENT SYSTEMS) साठी BEL आणी ROLTA यांचे एक CONSORTIUM आणी L & T आणी TATA POWER यांच्या CONSORTIUM ची निवड झाली. मेक- इन-इंडिया योजनेखाली दिले जाणारे संरक्षणासंबंधी सर्वात मोठे CONTRACT म्हणावे लागेल. हे CONTRACT Rs ५०,००० कोटी रुपयांचे असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या सर्व हाणामारीमध्ये बजेटचा आनंद कोणाला झाला आणी दुःख कोणाला झाले हे समजले नाही. लोकांना प्रत्यक्ष होणारा परिणाम समजतो. अप्रत्यक्ष होणारा परिणाम समजत नाही. सरकारकडे सुद्धा अजून चार वर्षे आहेत त्यामुळे लोकांना खुश करण्यासारखे बजेट देण्याची गरज वाटली नसावी.
अशा मार्केटला मी अनइझी मार्केट म्हणते. मार्केट वर जातंय असे दिसले तरी खरेदी करायला भीती वाटते. मार्केट मंदीत दिसले तर शेअर विकून पैशे कमावता येतील याची खात्री नाही. फक्त हाताची घडी धालून आपल्याजवळ असलेला एखादा शेअर अचानक वाढला तर विकता येतो.एक विश्लेशकाचा सल्ला असा होता “ YOU MUST TRADE LIGHT COME WHAT MAY, CLOSE YOUR POSITION BEFORE LARGE EVENT. अशा प्रकारे बजेटच्या लग्नाचे सूप वाजले. २ मार्च पासून शेअरमार्केटचा संसार पूर्ववत सुरु होईल अशी आशा करू या.
** शेअर मार्केट बद्दलची माहिती मी माझ्यापरीने सांगायचा प्रयत्न करते पण कुठला शेअर घ्यायचा आणि कुठला विकायचा हो निर्णय तुमचा आणि तो तुम्ही तुमच्या अभ्यास नंतरच घ्यावा हि विनंती. शेवटी फायदाहि तुमचा आणि नुकसान हि तुमचं…***

2 thoughts on “आठवडा मार्केटचा – २३ फेब्रुवारी ये २८ फेब्रुवारी

  1. Pingback: आठवडा मार्केटचा – २ मार्च ते ५ मार्च – उच्चांकाचा झेंडा रोविला | Stock Market आणि मी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.