शेअरमार्केटचे पोस्ट-मार्टेम – १६ मार्च ते 20 मार्च

आधीच्या आठवड्याबद्दल वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कोणत्याही घटनेचे पोस्ट-मार्टेम प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या परीने करत असतो.  तुम्हाला आवडो किंवा न आवडो पोस्ट-मार्टेम करण आपल्या स्वभावातच असत. तश्या त्यातून बऱ्याच गोष्टी उलगडतात. चुका समजतात.त्या चुका सुधारून प्रगतीचा मार्ग खुला होऊ शकतो.
गेल्या आठवड्यांत मार्केट पडलं म्हणजेच आपल्या भाषेमध्ये मार्केट्ची तब्येत बिघडली असं म्हणा ना .कोणत्याही गोष्टीमध्ये अती तेथे माती होतेच, मग त्याला शेअरमार्केट तरी अपवाद कसं असणार. मार्केट अव्वाच्या सव्वा वाढलं होतं . त्यामुळेचं पडायला लागलं असं आपलं माझं मत. त
या आठवड्यातही मार्केट्ची तब्येत फारशी सुधारली नाहीं.फक्त गेल्या आठवड्यांत फारच खालावलेली अवस्था होती त्यातून मार्केट थोडे सावरलं  इतकच!
सोमवारी ‘HDFC LIFE चा ‘इपो’ नजीकच्या काळांत येण्याची शक्यता वर्तवली गेली. ट्रेड डेटा आला. सोन्याची आयात वाढली क्रूडमध्ये मंदी आल्यामुळे ट्रेड घाटा कमी झाला.  फेबृआरी ‘WPI’ चे आकडे जाहीर झाले. WPI  – २.०६% जाहीर झाले.हे जानेवारीमध्ये -.३९% होते.  ADVANCE TAX चे आकडे येण्यास सुरुवात झाली. ज्यांनी ADVANCE TAX जास्त भरला त्यांना जास्त नफा होणार आहे असे गृहीत धरले जाते.उदा:स्टेट बँक ऑफ इंडिया, येस बँक. ‘PERSISTANT SYSTEMS’ या कंपनीने ते करीत असलेल्या R&D मधील गुंतवणुकीमुळे वार्षिक निकाल  फारसे चांगले असणार नाहीत असे सांगितल्यामुळे शेअरच्या किमतीत पडझड सुरु झाली. मार्केटमध्ये कॅश  VOLUME कमी होते. मार्केट पडत असताना किंवा मार्केट वाढत असताना VOLUME चांगले असले तर पडण्याची किंवा वाढण्याची क्रिया सुरु राहते. त्यामुळे मार्केटचा अंदाज येत नव्हता. लोकांचा कल समजत नव्हता. मंगळवारपासून ‘FOMC’ ची मीटिंग चालू होईल ती दोन दिवस चालणार आहे.FOMC’ चा काय निर्णय येतो ही  काळजी मार्केटला लागली होती.
त्यामुळे मंगळवारी मार्केट एखाद्या झुल्याप्रमाणे झुलत होते. २ वेळेला ३०० पाईंट वर गेले २ वेळेला ४०-४५ पाईंटपर्यंत खाली आले. शेवटी ३०० पाईंट वरच होते.ज्यांनी शेअर्स वरच्या भावांत खरेदी केले होते त्यांना विकण्याची संधी मिळाली.  सकाळी मार्केट उघडताच ‘GULF OIL’ या कंपनीच्या २.९७ कोटी शेअर्सचे ब्लॉक डील झाले.शेअर Rs१४८ वरून Rs१६४ पर्यंत पोहोचला. माझ्या मते अशी वेळ बरोबर साधून इंट्रादे ट्रेड केला तर त्यांत फायदा होऊ शकतो. ‘MMDR’ विधेयक लोकसभेत पास झाले.
बुधवारी महिंद्रा &महिंद्रा च्या व्यवस्थापनाने सांगितले की अवकाळी पाउस व त्यामुळे शेतीवर होणारा परिणाम यामुळे TRACTOR च्या विक्रीवर प्रतिकूल परिणाम होईल.त्यामुळे ह्या शेअरची किमत घटली. टाटा मोटर्सचे विक्रीचे आकडे ही कमी आले . आज मार्केट स्थिर नव्हते. दोन्ही बाजूला धावत होते. ट्रेडर्सनी प्रयत्न करून ८६७० च्या खाली NIFTY जाऊ दिला नाही. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. काही वेळच ही लिमिट क्रॉस झाली तेव्हां  मार्केट १८२ पाईंट पडले. LOGISTIC शेअर वर होते. ‘INOX WIND’ चा ‘IPO’ येणार असल्यामुळे त्याच क्षेत्रातील ‘SUZLON’ कंपनीच्या शेअर्सला मूव्ह आली. ‘INOX WIND’ हा  इशू ओपन झाला ह्या शेअरची दर्शनी किमत १० रुपये असून प्राईस BAND ३१५ ते ३२५ आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना १५ रुपये सूट दिली आहे.मिनिमम लॉट ४५ शेअर्स आहे. ही कंपनी आपली CAPACITY ९०० MW वरून १६०० MW एवढी वाढवणार आहे.
जेट ऐअरवेज  या कंपनीने ‘TDS DUES’ तसेच आयकारावरील व्याज पूर्णपणे भरले. सेबी ( SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA) GOVERNMENT BONDS च्या बाबतीत नवीन रेग्युलेटर असेल. तसेच GOVERNMENT BONDS हे STOCK EXCHANGESवर ट्रेड होतील.असे जाहीर झाले . ‘IDBI’ ला डिसेंबर २३ २०१४ पासून आज पर्यंत ‘CARE’ या कंपनीतील १०.७२% स्टेक विकून ४४६.३ कोटी रुपये मिळाले.
‘FOMC’ मीटिंगचा परिणाम,  बुधवारी मार्केट संपल्यानंतर जाहीर झाला.. FED रेट वाढवेल अशी भीती होती. पण तसे काही झाले नाही.( परंतु FEDने आपल्या नोटमधून ‘पेशंस’ हा शब्द काढून टाकल्यामुळे एप्रिल किंवा जून मध्ये ही वाढ होऊ शकते.) त्यामुळे गुरुवारी सकाळी मार्केट ३२५ पाईंट वर होते. पण मार्केट्ची ही बढत टिकली नाही. मार्केट ३२५ पाईंट वर होते ते २०० पाईंट खाली गेले. मार्केट ‘BANK NIFTY’ मुळे खाली आले. ‘JUST DIAL’ हा शेअर मात्र शेवटपर्यंत बढत टिकवून होता. आजच्या ट्रेडला रिस्क ऑफ ट्रेड असे म्हणतात. याचा अर्थे मार्केटला लागलेले ग्रहण सुटले.. ‘टेक महिंद्र’ EXबोनस आणी EX स्प्लिट झाला. HCLTECH EX बोनस झाला. ‘ORTEL COMUNICATION’ या कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग झाले. लोकांच्या अंदाजाप्रमाणे लिस्टिंगनंतरही शेअरला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
राज्यसभेत आणी नंतर लोकसभेत ‘MMDR’ हे धातूंच्या खाणीच्या संबंधांतील बिल पास झाले या विधेयकाप्रमाणे धातूंच्या खाणीचाही लिलाव होईल. यामुळे धातुन्शी संबंधीत कंपन्यांचे शेअर्स वाढतील असा अंदाज होता. परंतु सरकारला द्यावी लागणारी ROYALTY आणी DISASTER MANAGEMENT FUND’ मध्ये जमा करावी लागणारी रकम यामुळे मार्जीनवर परिणाम होईल म्हणून हेही शेअर्स पडले. फार्मा शेअर्सवरही गदा आली. सिमेंटच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सिमेंट कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत वाढ झाली. MCX-SX चे नाव बदलून METROPOLITAN STOCK EXCHANGE असे ठेवले. याला रजिस्ट्रार ऑफ कंपनीने ही मान्यता दिली. ‘INOX WIND’ चा इशू आज ३-३० वाजतां ११ वेळा SUBSCRIBE झाला. त्यांत QIB पोर्शन ३१ वेळा, HNI २९ वेळा तर RETAIL पोर्शन १.८ वेळा SUBSCRIBE झाला.  एकंदरीत या इशुला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. ‘ HOLCIM- LAFARGE’ मर्जर मधील अडचणी जवळ जवळ दूर होण्याच्या मार्गावर आहेत.
मार्केट बंद झाल्यानंतर बातमी आली की राज्यसभेमध्येही ‘COAL MINES BILL’ पास झाले. OIL INDIA LTD ने Rs १० प्रती शेअर तर ‘ONGC’ने Rs.४ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.
मार्चमधे  नेहेमी मार्केट पडतच असतं पण  मार्केट सतत वाढत राहण्याची या वर्षी लोकांना सवय झाली आहे त्यामुळे मार्केट पडण धक्कादायक वाटतय.  शेअर मार्केटमधले व्यवहार म्हणजेच  गुंतवणूकदारांच्या आशा  अपेक्षांचा खेळ. नुसत मैदान असताना 20 मजली इमारत उभी करून नफा तोटा याची आकडेमोड करून लोकं शेअर्स खरेदी करतात. आणी नंतर जेव्हां इमारत उभी राहण्याची शक्यता धूसर होताना दिसते तेव्हा विकावयास सुरुवात करतात. म्हणजेच शेअर्सची किमत आणी त्या कंपनीची आर्थिक स्थिती याचा ताळमेळ बसेनासा झाला की शेअर्सची किमत कमी होऊ लागते. एवढच काय लक्षात ठेवण्यासारखं !!

One thought on “शेअरमार्केटचे पोस्ट-मार्टेम – १६ मार्च ते 20 मार्च

  1. Pingback: आठवड्याचे समालोचन २३ मार्च २०१५ ते २८ मार्च २०१५ – बेअर्सनी केली मात | Stock Market आणि मी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.