आपल्या सगळ्यांबरोबर या ब्लॉगच्या माध्यमातून मी हा तिसरा गुढीपाडवा साजरा करीत आहे.
या तीन वर्षांत मी माझ्या ब्लॉगमधील लिखाणामध्ये अनेक बदल केले.वेळोवेळी आपण कौतुक केलेत. माझा उत्साह वाढला. सन २०१४ साल संपल्यामुळे आपल्याला माझी वहिनीचा अंक मिळणे कठीण होईल हे ध्यानांत आल्याने या अंकांत छापून आलेले माझे लेख ब्लॉगवर टाकले. लोकांच्या शंका दूर करण्यासाठी ‘तुमचे प्रश्न‘ ‘माझी उत्तर‘ हे सदर सुरु केले. गेल्या महिन्यापासून ‘मागोवा गेल्या आठवड्याचा’ हे नवीन सदर सुरु केले.
मी खरे पाहतां अतिशय सोप्या भाषेत ब्लॉग लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु प्रश्न-उत्तरे या सदरातून आलेल्या आपल्या प्रश्नावरून असे आढळले की शेअरमार्केटमध्ये व्यवहार कसे होतात हे कोडे आपणास उलगडले नाही.
प्रत्येक बातमी आल्यावर त्याचा परिणाम कोणत्या शेअरवर व किती प्रमाणांत होईल हे समजावून घ्यावे लागते.गेल्या आठवड्यांत काय काय घडले, कोणत्या बातम्या आल्या व त्याचा परिणाम काय झाला हे मी ‘मागोवा गेल्या आठवड्याचा’ या सदरातून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.
एखादा शोध लागतो पण त्या शोधाचा उपयोग व्यवहारांत कसा होईल हा विचार अधिक महत्वाचा ठरतो. एखादी धून तयार होते. जर ती धून त्या धूनवर तयार झालेले गीत आणी त्याचे चित्रीकरण यांची सुंदर सांगड बसली तरच ते गाणे सुंदर होते. एखाद्या कथेवर आधारीत एखादा चित्रपट किंवा नाटक तयार झाले तर ते पुस्तक किंवा ती कथा प्रसिद्ध होते. त्याचप्रमाणे एखाद्या बातमीचा परिणाम काय आणी किती आणी कोणत्या शेअरवर होईल याची योग्य पद्धतीने सांगड घालून शेअर खरेदी करणे किंवा विकणे म्हणजेच शेअरमार्केटचे व्यवहार होय.. त्याचप्रमाणे वेळेवर निर्णय घेण, निर्णयाची जबाबदारी घेण, निर्णय फायदेशीर नसेल तर त्या व्यवहारातील चुका शोधून काढून पुन्हा तशी चूक न करण हे जमायला लागलं कि म्हणजेच तुमची शेअरमार्केटमध्ये प्रगती झाली असे समजा.

गुढीपाडवा सण मोठा नाही आनंदा तोटा…
Leave a reply