तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Feb २०१५

जानेवारीची प्रशोन्त्तरे वाचण्यासाठी इथे क्लिक करा
नाव: Deepak Banait
तुमचा प्रश्न : Mala share market ch kahich knowledge nahi.pan tari mala yaat interest ahe aani investment chi iccha ahe. mala mahit aslyapramene pratham demate account open karave lagate. pan te ka karave lagate tyacha use kay aani fayde kay. te mala kalav ashi request ahe 
तुम्हाला शेअरमार्केटमध्ये इंटरेस्ट आहे हे वाचून बरे वाटले. तुम्हाला DMAT अकौंटबद्दल ज्या काही शंका आहेत त्या शंका निरसन करण्यासाठी तुम्ही ब्लोग नंबर ५, ३१, ३९ वाचू शकता. जे शेअर्स खरेदी करतो त्याची नोंद चार दिवसानंतर “DEMAT’ अकौंटवर होते. तुम्ही जे शेअर्स विकता ते ‘DEMAT’ अकौंटमधून वजा होता.म्हणजेच शेअर्सचा जमा खर्च ठेवणारे सुरक्षित साधन ‘DEMAT’ अकौंट हे आहे.
नाव: deepali bhatode
तुमचा प्रश्न : Hello Madam, Tumche sagale blogs khoop prenadayi vatale.Tumche kautuk karave tevadhe thodech ahe.Atishay sopya language madhe tumhi sagale samajaun sangitale ahe.Mi software fieldmadhun lahan mulamule break ghetala ahe. Ata tumchyasarkhe trading madhe utarave vatate. Share marketvar konte book changale ahe?Mi sadya icicidirectvar online trading karat ahe.tarihi brokerchi garaj aahe ka?Tumchya blogmadhun changale knowledge milale.Navin blogchi vat pahat ahe.
तुम्हाला काही वेगळ्या ब्रोकरची गरज नाही. क्रिकेटचा सामना लाईव बघणे आणी त्या सामन्याचे वर्णन नंतर कधीतरी पुस्तकातून वाचणे या मध्ये जो फरक आहे  तोच फरक शेअरमार्केटच्या बाबतीतही आहे. सभोवतालची परिस्थिती , कायदेकानू  सातत्याने बदलत असतात त्यामुळे पुस्तकाचा फारसा फायदा होत नाही. तरीसुद्धा टेक्निकल ट्रेंड बघण्यासाठी पुस्तक उपयोगी पडते. शेअरमार्केटमधील  बदलाचा वेग खूप असतो. त्यामुळे दूरदर्शनच्या वाहिन्यांवर दिल्या जाणाऱ्या माहितीचा उपयोग करावा.
नाव: mahesh byagari
तुमचा प्रश्न : madam me BA(political science)graduate asun mala share market madhe job milavata yeil ka? tya sathi ky qualification lagel? please help.
मी काही career counsellor नाही पण तुम्ही MBA (FINANCE) केलेत आणी तुम्ही पोर्टफोलीओ MANAGEMENT चा एखादा चांगला कोर्स केला तर चांगली संधी उपलब्ध होईल कदाचित. तुम्ही जर BSE किंवा NSE ची कॅश किंवा FUTURES ची परीक्षा दिलीत तर तुम्हाला BOLT Operator म्हणून जॉब मिळू शकतो. हि परीक्षा सोपी असते.तुम्ही स्वतः परीक्षेची तारीख घेऊ शकता.
नाव: suresh bannenawar
तुमचा प्रश्न : shere market made carrer karayache ahe mala mahiti pahije hote
तुम्ही माझे ब्लोग आणी माझी वहिनीचे लेख वाचा. तरी काही शंका राहिल्यास विचारा.
नाव: nandkishor Narkhede
तुमचा प्रश्न : On-Market (Sell Market) / Off Market (% of transaction value of each ISIN)……..please guide about ISIN charges?
तुम्ही तुमच्या वडिलांच्या नावावर किंवा कोणाच्याही नावावर शेअर ट्रान्स्फर केले तर या व्यवहाराला ऑफ मार्केट व्यवहार म्हणतात. इथे शेअर्सची खरेदी विक्री STOCK EXCHANGE THROUGH होत नाही.
STOCK EXCHANGE च्या THROUGH केलेल्या शेअर्सच्या खरेदी विक्रीला ON MARKET असे म्हणतात.
ऑफ मार्केट व्यवहारासाठी दलाली लागत नाही
नाव: swanand kulkarni
तुमचा प्रश्न : Mi share market madhe invest krnyasathi utsuk ahe,pn mala hya vyawharavishayi kahich anubhav nahi,tumchya blog hun khup mahiti milali tyabaddal tumche manapasun abhar. Mi ek engineer ahe ani punyat pvt ltd company madhe Job krto,pn ajun ek income source mhnun mala share marketbhastey,pn basic steps kay ghyawya?kuthle share gheu? ani vyawhar kru yabaddal margdashan have ahe..dhanyawad..
‘DEMAT’ अकौंट आणी ट्रेडिंग अकौंट उघडा.त्यासाठी ब्लोग नंबर ५ ३१, ३९ आणी माझी वहिनीतील लेख वाचा. शेअर्सच्या खरेदीविक्रीसाठी ब्लोग ३८ ४० ४१ वाचून पहा.
नाव: Nagesh Shinde
तुमचा प्रश्न : Namaskar Madam,
mala stock market medhe yenya chi echa ahe pan mala process mahiti nahi. tar mala tumhi please process sangal ka?
‘DEMAT’ अकौंट आणी ट्रेडिंग अकौंट उघडा.त्यासाठी ब्लोग नंबर ५ ३१, ३९ आणी माझी वहिनीतील लेख वाचा. शेअर्सच्या खरेदीविक्रीसाठी ब्लोग ३८ ४० ४१ वाचून पहा.
नाव: sujeet gore
तुमचा प्रश्न : Namsakar Madam,,,,, me bsc graduate zalo ahe.. mala shares market badal knowledge nahiye,,, pn mala shares market shikaych ahe…. me kay karav,,plz guide me
ब्लोग वाचा. सध्या मी गेल्या आठवड्यातील शेअरमार्केटमधील व त्याच्याशी संबंधीत घडामोडी याविषयी माहिती देत आहे.. चारचौघी मासिकातील जाने, फेब्रुवारी , मार्च २०१५ मधील माझे लेख वाचा.दूरदर्शनवरील वाहिन्या, वर्तमानपत्रे व इंटरनेटवरून माहिती मिळवा
नाव: Sudesh Tetgure
तुमचा प्रश्न : Saglyat agodar khup khup dhanyawad madam. Mi tumche sagle blog vachle. Tumhi khupach chan aaplepanane aani sutsutitpane samjavun sangta. Tyamule mala tumhi javalchya natevaik vatata. Kharach madam. Tumhi please please classes chalu kara. Aamhala garaj aahe tyachi. Tumchyakadun samajik bandhilkicha dhada (lesson) saglyanni ghyayla pahije. Karan halli sagle swatahachach vichar kartat. Tumchya jaagi kon asta tar fee nakki ghetli asti. So hats off madam. God bless you . . .
तुम्ही राहता कुठे? मी ठाण्याला राहते. क्लास सुरु केले तरी ठाण्याला सुरु करीन. तुमच्या सगळ्यांच्या आग्रहावरून क्लास सुरु करण्याच्या विचारांत आहे. तुम्ही जर कुठे SHEAR MARKET व्याख्यानासाठी सोय करत असाल तर तेथे येऊन शक्य झाल्यास मी मार्गदर्शन करीन
नाव: sandeep untwale
तुमचा प्रश्न : fucher aani option cha marathi tune kulasa sanga
मी DERIVATIVE मध्यें ट्रेडिंग करीत नाही. त्यामुळे FUTURE आणी OPTIONSचा खुलासा देण थोड कठीण आहे. जमलं
नाव: Shahaji
तुमचा प्रश्न : नमस्कार, मी शेअर मार्केट एका महिन्यापासून आहे आणि मी फार गोंधळून गेलो आहे कोणत्या कंपनीचे शेअर घ्यावे आणि कोणत्या किमतीत घ्यायचे तरी आपण मराठी मधून technical काही टिप्स दया आणि कोणती तरी टिप्स advisory firm घ्यावी का?
कोणतीही टिप्स advisory firm घेण्याची मला आवश्यकता वाटत नाही. ते सगळं परावलंबी जिण होतं. शेअर मार्केट सतत बदलत असल्यामुळे सुरुवातीला सगळ्यांचाच गोंधळ उडतो. चिकाटीने आणी धैर्याने सामोरं जावं लागतं. तरच यश मिळते. कुणीही तुम्हाला टिप्स दिल्या तरी त्या टिप्सच्या यशाची किंवा अपयशाची जबाबदारी त्या माणसाची किंवा फर्मची नसते. तो एक उत्तम सल्ला असतो इतकच म्हणता येईल
नाव: PRAVIN SALUNKE , AKOLA
तुमचा प्रश्न : Madam mala share market chi mahiti denare marathitil books chi mahiti sangal ka ?
शेअर मार्केटच्या पुस्तकांत असलेली माहिती दिलेली उदाहरणे जुनी झालेली असतात. झालेला क्रिकेटचा सामना पाहणे आणी सामन्याचे लाईव प्रक्षेपण बघणे यांत जेव्हडा फरक आहे तेव्हढाच फरक त्या त्या दिवशी घडणार्या घटनांचा अभ्यास करणे आणी पुस्तकातून वाचणे यांत आहे.. त्यामुळे तुम्ही दूरदर्शनच्या वाहिन्यांचा उपयोग करा.
नाव: Tushar Prakash Hire
तुमचा प्रश्न : Madam mala stock markt madhe creer karaych ahe tari changla course konta ahe ani kuthe chaltat course plz sangave madam
BSE आणी NSE द्वारे छोटे मोठे अनेक कोर्स चालवले जातात तुम्ही त्या साईटवर जाऊन माहिती घ्या.

4 thoughts on “तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Feb २०१५

 1. Pingback: तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – March २०१५ | Stock Market आणि मी

 2. Yogesh Songire. Post author

  Madam mi first year engg. la ahe… mi kamit kami kiti investment karu shakto…. mi broker chi madat gheu ka…..

  Reply
  1. surendraphatak Post author

   ​गुंतवणूक करण्यासाठी कमाल किंवा किमान मर्यादा नाही. पण सुरुवातीला थोडीच गुंतवणूक करावी. विश्वास आल्यानंतर किंवा व्यवहार फायदेशीर होतोय असे जाणवल्यानंतर गुंतवणुकीचे प्रमाण वाढवावे. कोणाचाही सल्ला घेण्यास काहीच हरकत नाही. परंतु ऐकावे जनाचे पण करावे मनाचे हे कायम लक्षांत ठेवावे.

   Reply
 3. laxman Post author

  mala khup echha ahe sharemarket madhe utarnyachi…tumche blogs downlod karnyachi suvidha asel tar link send kara pls

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.