आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
रिझल्ट्स म्हटले की परीक्षांचे निकाल आपल्या डोळ्यासमोर येतात. इयत्ता १ ली ते इयत्ता ९ वीच्या रिझल्टकडे कोणाच लक्ष नसतं. पण १० वीच्या , १२ वीच्या निकालांकडे मात्र सगळ्यांचे लक्ष असतं.अगदी देवाला नमस्कार करायला मुले आलेली दिसतात. मिठाईच्या दुकानातील ,पेढ्यांचे भाव वाढलेले असतात.पेढे संपलेले असतात. एवढी या निकालाची उत्सुकता, गर्जना वाच्यता सगळीकडे होते. त्याचप्रमाणे शेअरमार्केटमध्येसुद्धा निफ्टीमध्ये आणी सेन्सेक्समध्ये जे शेअर्स असतात किंवा ब्लूचीप कंपन्यांच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष असते. या कंपन्या म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेचे प्रतिबिंबच आहे.
मला मात्र मागे वळून पहाताना आज हसायला येते. मी शेअरमार्केटममध्ये प्रवेश करण्याआधी कधीही ह्या कंपन्यांच्या निकालांकडे लक्ष दिले नव्हते.या निकालांचे महत्व माझ्या लक्षांतच येत नव्हते. आता कदाचित शेअर्समध्ये पैसा अडकलेला असतो त्यामुळे शाळा कॉलेजच्या अभ्यासाप्रमाणे ह्या कंपन्यांचे निकालही अभ्यासावे लागतात. शेवटी काय वासुदेवाची ऐका वाणी : जगांत नाही राम दाम करी काम वेड्या दाम करी काम. कंपनीची प्रगती या निकालांवरून समजते. कंपनीच्या C.E.O दिलेल्या मुलाखतीतून किंवा मोठ्या कंपन्यांच्या बोर्डरूमच्या कार्यक्रमातून त्या कंपनीला त्या तिमाहींत/ वर्षभरांत काय अडचणी आल्या, त्या अडचणी तात्पुरत्या होत्या की टिकाऊ होत्या, कंपनीला या संकटांशी आणखी किती काळ झुंज द्यावी लागेल, तोटा सोसावा लागेल, सरकारी धोरणांत काय प्रतिकूल बदल झाला आहे तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचे प्रतिसाद कंपनीच्या कार्यक्षेत्रांत किती प्रमाणांत प्रतिकूल बदल घडवतील हे समजते.
उलटपक्षी कंपनीचा रिझल्ट चांगला आला तर कंपनीने कोणते नवे प्रोजेक्ट कार्यान्वित केले, काही टेक्निकल अपग्रेडेशन केले कां,? सरकारी धोरणांत काही अनुकूल बदल झाला कां? तसेच आंतरराष्ट्रीय वातावरणांत काही अनुकूल बदल झाला कां ? या सर्वांची चर्चा होते. कंपनीची विक्री वाढली कां ? तिच्या विक्रीचा मार्केटशेअर वाढला कां ? तसेच कंपनीच्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये वाढ झाली कां घट झाली हेही महत्वाचे असते. आणखी एक महत्वाचा item म्हणजे EXCEPTIONAL /ONE TIME LOSS किंवा GAIN. किंवा केलेली प्रोविजन. याचा परिणाम +- करूनच कंपनीची कार्यक्षमता वाढली की कमी झाली हे समजते. या सर्व विश्लेषणावरून आणी कंपनीने दिलेल्या भविष्यातील त्यांच्या GUIDANCE वरून शेअरचा भाव वाढेल की कमी होईल याचा अंदाज आपण बघू शकतो.
कंपन्याचे दर तीन महिन्यांनी रिझल्ट्स येतात. पण ज्याप्रमाणे तिमाही सहामाई नौमाही परीक्षांचे निकाल जर निराशाजनक आले तर विद्यार्थी वार्षिक परीक्षेत अभ्यास करून फारसी सुधारणा करू शकत नाही. तसेच काहीसे कंपन्यांच्या रिझल्ट्सचे असते. आपण आपल्याकडे असलेल्या शेअर्स आहेत त्या कंपन्यांच्या तिमाही रिझल्ट्सकडे लक्ष ठेवा.
या आठवड्यात कॅनरा बँकेचा रिझल्ट खराब आला. PNR INFTATECH चे लिस्टिंग फारसे चांगले झाले नाही.DISH टी व्ही चा रिझल्ट्स चांगले आले. CROMPTAN GREAVES ला स्मार्ट ग्रीड साठी पोर्तुगालकडून ऑर्डर मिळाली.सदभाव engg या कंपनीने आपळी सब्सिसिअरी SADBHAAV इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या IPO साठी DRHP दाखल केले. MAITHAN ALLOYS या कंपनीने १:१ बोनस दिला. रुपया US$ च्या तुलनेत मार्केट संपताना पडला (६३.९८) BHELचा रिझल्ट मार्केटच्या अपेक्षेपेक्षा चांगला आला. मार्केटमधील अस्थिरतेमुळे आणी पॉवर क्षेत्रातील किमतीच्या अनिश्चिततेमुळे NTPC आणी BHEL या कंपन्यांमधील DIVESTMENT पुढे ढकलली.
स्वीस ऑथोरिटीने गुप्ततेचे कवच दूर करून आपल्याकडील खातेधारकांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली. नेसलेच्या MAGGI या उत्पादनांत हानिकारक द्रव्य प्रमाणाबाहेर वापरलेले आढळून आल्यामुळे त्यांची केस फूड SAFETY आणी STANDARD AUTHORITYकडे पाठवली,. NHPC RS ३९७५ कोटीचा बॉंड इशू आणीत आहे. MET ने जाहीर केले की या वर्षीचा मान्सून सामान्य राहील. पंतप्रधानांनी ‘किसान वाहिनी’ सुरु केली. IDBI बँकेचा रिझल्ट बऱ्यापैकी आला. ग्रॉस आणी नेट N.P.A. चे प्रमाण घटले. नफ्यांत माफक वाढ झाली. टेक महिंद्राच्या नफ्यांत घट झाली. याचे त्यांनी फोरेक्स तोटा आणी फोरेक्स हेडविंड्स( विनिमय दरातील चढउतार) आणी SALARY मधील वाढ असे दिले. MCXSX आणी MSXI यांचे मर्जर होण्याची शक्यता आहे असे जाहीर झाले. टाटा मोटर्सचे रिझल्ट्स खराब आले मार्जिन कमी झाले.
भारती एअरटेल जुन २०१५ मध्ये गुरगावमध्ये 4G लौंच करणार आहे. कंपनी दिल्लीमध्ये डिसेंबर २०१५मध्ये तर मुंबईत मार्च २०१६ मध्ये 4G चालू करणार आहे. ५०% 3G ग्राहकांचे 4G ग्राहकांमध्ये रुपांतर केले जाईल.
सरकारने घोषणा केली की PUBLIC-PRIVATE PARTNARSHIPसाठी एक समिती नेमणार आहे ही समिती ३ महिन्यांत रिपोर्ट देईल. १ जुलै पासून खतकारखान्यांसाठी GAS POOLING अमलांत येईल. NSEIT इंडेक्समध्यी 20 ऐवजी १० शेअर असतील. कोणत्याही शेअरचे WEIGHTAGE १०%पेक्षा जास्त असणार नाही. या IT इंडेक्स मध्ये असे शेअर्स असतील ज्यांचा DAILY AVE5RAGE VOLUME Rs १७०० कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असेल.
CLARISला INJECTIBLE युनिटसाठी USFDA कडून फार्म ४८३ मिळाला त्यामुळे हा बिझीनेस विकण्यांत अडचण येत आहे.. INDIGO ही विमानकंपनी IPO आणणार आहे. NFL(NATIONAL FERTILIZERS CORPORATION), बलरामपुर चीनी, GAIL या कंपन्यांचे रिझल्ट्स खराब आले.MAX INDIA, ZEE LEARN या कंपन्यांचे रिझल्ट्स चांगले आले.,
गुरुवारी अरविंद LTDच्या डीमर्जरची एक्सडेट आहे. १० अरविंद LTDमधील शेअरला १ शेअर अरविंद INFRA चा मिळेल.
BATA चा रिझल्ट चांगला आला. त्यांनी शेअर्सचे १:२ असे स्प्लिट जाहीर केले.
६ निफ्टी कंपन्यांचे रिझल्ट्स आज जाहीर झाले. COAL INDIA चा रिझल्ट चांगला आला.जर COAL INDIAने ठरलेल्याप्रमाणे ४ वर्षांत दुप्पट उत्पादन केले तर शेअर्सची किमर वाढेल. PFC चे रिझल्ट्स चांगले आले. ONGC चा रिझल्ट अपेक्षेपेक्षा कमी चांगला आला. परंतु क्रूडची प्राईस US$ १०० वर गेली तर कंपनीला ९०% सबसिडी द्यावी लागेल. पण तोपर्यंत सबसिडी द्यावी लागणार नाही. BPCL या कंपनीचे रिझल्ट्स चांगले आले. HPCL चे रिझल्ट्स बऱ्यापैकी आले. HINDALCO आणी NMDC चे रिझल्ट्स निराशाजनक आले.
अलाहाबाद हायकोर्टाने उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांना Rs९८०० कोटी बाकीपैकी ५०% ३० जून पर्यंत, ७५% १५ जुलैपर्यंत भरण्यास सांगितले. MAX INDIA पुष्पांजली क्रोस ले हॉस्पिटलमधील ७६% हिस्सा Rs २८७ कोटींना घेणार आहे. गोदरेज इंडस्ट्रीजचा रिझल्ट्स चांगला आला. IRAQ हा देश क्रूडची निर्यात २६% ने वाढवणार आहे. अमेरिकेंत क्रूडची INVENTORY वाढली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये क्रूडची किमत ढासळत आहे.
आता तुमच्या मनांत नक्कीच प्रश्न आला असेल क्रूडचे भजन वारंवार कां ? त्याचा शेअरमार्केटशी काय संबंध ? ऐका तर.:- क्रूड हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणाच म्हणला पाहिजे. क्रूडचे भाव गेले वर्षभर ढासळत आहेत. मागणी आणी पुरवठा यामध्ये विसंगती आहे. ओपेक आणी अमेरिका यांच्यांत रंगलेले राजकारण याला जबाबदार आहे. पण दोघांचे भांडण तिसऱ्याला लाभ यामुळे क्रूडच्या घटत्या किमतीचा भारताला खूपच फायदा झाला. भारताला क्रूडची मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागते. क्रूड स्वस्त झाल्याने आयातीवर होणारा खर्च कमी झाला. त्यामुळे CAD (CURRENT ACCOUNT DEFICIT) कमी झाली. त्यामुळेच फारशी मेहेनत न घेता अर्थव्यवस्था सुधारली म्हणूनच पंतप्रधांना ‘नशीबवान’ म्हणतात.बऱ्याच कंपन्यांचा क्रूड हा कच्चा माल असल्याने उत्पादनखर्च कमी झाला त्यामुळे त्या कंपन्यांचे शेअर वधारले. ज्यांचा क्रूड हा पक्का माल आहे त्यांची विक्री कमी झाल्याने ( रुपयांत) त्या कंपन्यांचे शेअर ढासळले. त्यामुळेच मार्केट उघडल्याबरोबर क्रूडचा भाव किती आहे याकडे सर्वांचे लक्ष असते.
बँक ऑफ इंडियाचे रिझल्ट्स खूपच वाईट आले. बँकेने Rs ६६कोटी तोटा दाखविला. बँकेने एस्सार स्टील हा अकौंट N. P. A. झाला असे कारण या तोट्यासाठी दिले. बँकेच्या ग्रॉस आणी नेट N. P.A. मध्ये वाढ झाली. ऑरोबिन्दो फार्मा या कंपनीने १:१ असा बोनस जाहीर केला. DISHMAN फार्मा, इंडिया सिमेंट, BEL, CUMMINS या कंपन्यांचे रिझल्ट्स चांगले आले. M & M चे रिझल्ट अपेक्षेच्या मनाने चांगले आले. ‘BOSCH’ चा रिझल्ट फारसा चांगला आला नाही त्यांनी Rs८५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
बऱ्याचशा कंपन्यांचे रिझल्ट्स लागले. आता बोनस आणि स्प्लिट यांच्या तारखांकडे लक्ष दिले पाहिजे. पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे २ जूनला रिझर्व बँकेची पॉलिसी जाहीर होईल. त्याकडे आता मार्केटचे लक्ष आहे. पाहूया काय होते ते ! आता आपली भेट पुढील शुक्रवारी.
बहुतेक महत्वाचे कॉर्पोरेट रिझल्ट्स आतापर्यंत येवून गेले. पुढील आठवड्यांतील महत्वाचे रिझल्ट्स पुढीलप्रमाणे :-
३० मे २०१५ (१) बिनानी INDUSTRIES (२) जिंदाल पॉली (३) L & T (४) MARKSANS फार्मा (५)
MTNL (६) NALCO (७) SADBHAAV ENGG (८) TIDEWATER OIL (९) वक्रांगी
Monthly Archives: May 2015
आठवड्याचे समालोचन – १८ मे ते २२ मे २०१५ – दिलसे नही दिमागसे
आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
सरकारने पेट्रोल आणी डीझेलचे दर वाढवले. क्रूड कमी होत असताना सरकार दर कां वाढवीत आहे कोणालाच समजत नव्हत. पण शेअरमार्केटचा दृष्टीकोण वेगळाच ! शेअरमार्केट प्रत्येक क्षण जगते. ‘ जुने जाऊ द्या मरणालागुनी’’ अशी अवस्था मार्केट्ची. आज किमती वाढल्या तरी लगेच काही घडतं कां? पण मार्केटमध्ये आकडेमोड लगेच होते. OIL आणी gas कंपनीच्या शेअर्सचे भाव लगेच वाढले. सरकारच्या निर्णयामुळे कोणत्या कंपनीचा फायदा किती वाढेल त्याचा शेअरच्या किमतीवर किती परिणाम होईल याचा विचार एका क्षणांत होतो. समजा दोन तासांनी दुसरा प्रतिकूल निर्णय आला तर लगेच ते शेअर पडतात. आपल्या मार्केटमध्ये कांदेपोहे, साखरपुडा, लग्न आणी काडीमोड सर्वकाही एका क्षणात होते. त्या एका क्षणामध्ये आपल्यालाही खरेदीविक्रीची संधी साधावी लागते.
रिझर्व बँकेने रेटकट करावा असे उद्योगपती, राजकारणी, सर्वजण सुचवीत आहेत. दबाव आणत आहेत. आणी याचा फायदा घेवून रिझर्व बँक जूनच्या धोरणात रेटकट करणार अशी हवा निर्माण करण्यात बुल्स यशस्वी होत आहेत. आता प्रश्न आला बुल्स म्हणजे काय ? तुम्हाला कसे माहीत असणार?
‘बुल्स’ म्हणजे काय ? त्याचा शब्दशः अर्थ बैल. आणी बेअर्सचा शब्दशः अर्थ अस्वल. ‘बुल्स’ म्हणजे प्रथम खरेदी करून नंतर फायदा घेवून विकणारे. ‘बुल्स’ कायम आक्रमक, आशावादी, आणी सकारात्मक वृत्तीचे असल्यामुळे शेअर्सच्या किमती वाढतात. आणी मार्केटचा स्तरही वाढतो. जेव्हा अर्थव्यवस्था प्रगतीपथावर असते, बेकारी आणी महागाई आणी किमती कमी होत असतात,.त्यावेळेला ‘बुल्स’ आक्रमक होतात. आपण जर बैल आक्रमण कसा करतो ते पाहिले तर तो शिंगावर घेवून हल्ला करतो. त्याप्रमाणे ‘बुल्स’चे मार्केटमध्ये वर्चस्व असेल तर शेअर्सच्या किमती वाढतात.
बेअर्स म्हणजे मंदीमध्ये खेळणारे.प्रथम विकून नंतर कमी भावांत खरेदी करणारे. याला एक ऐतिहासिक संदर्भ आहे. पूर्वी इंग्लंडमध्ये अस्वलाच्या कातडीचा व्यापार मोठ्या प्रमाणांत चाले. व्यापारी त्यांच्या हातांत अस्वलांची कातडी येण्याच्या आधीच कातडी विकण्याचा सौदा करीत. नंतर कातडी बाजारांत आल्यावर ती स्वस्तांत खरेदी करून आपला पूर्वी केलेला विक्रीचा व्यवहार पुरा करीत. यालाच शेअरमार्केटच्या टेक्निकल भाषेत ‘shorting’ करणे असे म्हणतात म्हणजेच .स्वतःजवळ शेअर्स नसताना आहेत असे समजून विकायचे आणी नंतर कमी भावांत खरेदी करायचे. तुम्ही अस्वल डोळ्यासमोर आणा. संथ आणी सावध चाल, सहसा हल्ला न करण्याची प्रवृती. त्याचप्रमाणे ‘बेअर्स’ निराशेनेग्रस्त, बचावात्मक पवित्रा घेणारे असतात. त्यामुळे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री होऊन मार्केट कोसळते. अस्वल जेव्हा आक्रमण करते तेव्हा माणसाला खाली पडून आपली नखे त्याच्या अंगांत घुसवते.
अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्राण्याची नावे वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूकदारांना दिलेली आढळतात. आपल्याकडे कसे बाळू, बापू , बंड्या अशी टोपणनावे आढळतात तसेच .
(१) बारहशिंगा किंवा सांबर::- ‘IPO’ मध्ये शेअर्स खरेदी करून लिस्टिंग गेन्स घेवून विकून टाकतात. ते सहसा सेकंडरी मार्केटमध्ये व्यवहार करीत नाहीत. (२) कोंबड्या: दुसऱ्याकडून टिप्स घेवून खरेदी विक्री करतात आणी डुबतात
(३) डुक्कर : कोणताही अभ्यास न करता कोणत्याही शेअर्समध्ये गुंतवणूक करतात आणी योग्य वेळेला न विकता अजून भाव वाढतील असा हव्यास करतात आणी डुबतात.
(४) लांडगे : चुकीच्या मार्गाने मार्केट वाढवण्याचा किंवा पाडवण्याचा प्रयत्न करतात.
(५) शहामृग : जेव्हा वाळूचे वादळ येते तेव्हा शहामृग वाळूत तोंड खुपसून स्वतःचा बचाव करते, वादळ संपण्याची वाट बघते. परिस्थिती सुधारेल अशी आशा करते.म्हणजेच जे गुंतवणूकदार अभ्यास करून विचार करून शेअर खरेदी करतात त्याना समजते की वाळूच्या वादळाप्रमाणे आलेली वाईट परिस्थिती फार काळ टिकणारी नाही. त्यामुळे ते घाबरत नाहीत. शांतपणे परिस्थिती बदलण्याची वाट पहातात. शेवटी काळ हेच सुंदर औषध असते.
मार्केट पडतं किंवा वाढतं याला अशीच काही कारण असतात. त्यामुळे शेअरमार्केटला खतपाणी मिळते. बुल्स यशस्वी होत असतील तर आपणही वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावेत. आणी जे शेअर्स बरेच दिवसापासून अडकून पडले असतील ते विकून मोकळे व्हावे. आणी जर बेअर्सचा मार्केटवर प्रभाव असेल तर चांगल्या कंपन्यांचे शेअर्स स्वस्तात खरेदी करण्याचा प्रयत्न करावा.
सोमवारच्या मार्केट वाढण्याला ऐशीयन पेंट्सने गालबोट लावले. ताबडतोब मार्केटने शिक्षाही फर्मावली. शेअर्सचा भाव कमी झाला.पीडिलाइट या कंपनीचे रिझल्ट्स आले त्यांची विक्री कमी झाली. गेल्या वर्षभरांत शेअर्सची किमत खूप वाढलेली असल्यामुळे अपेक्षेप्रमाणे रिझल्ट्स न आल्यामुळे शेअर्सची किमत कमी झाली. कोलगेटचा रिझल्ट्स चांगला असूनही व्यवस्थापनाने शेअरहोल्डरच्या लाभांश, बोनस विषयीच्या अपेक्षांना योग्यसा प्रतिसाद न दिल्यामुळे शेअर्सची किमत कमी झाली.
सरकारने जाहीर केलं की सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपन्या, ज्या UNLISTED आहेत त्यांतील स्टेकही विकण्याचा सरकार विचार करीत आहे. यामुळे सरकारच्या DIVESTMENT कार्यक्रमाला खूपच मदत होईल. FED जूनपासून रेट वाढवेल असा अंदाज होता परंतु त्यांनी आता सप्टेंबरपर्यंत रेट वाढतील असा अंदाज व्यक्त केला.
सरकारने ‘GOLD MONETISATION SCHEME’ जाहीर केली. यामध्ये तुमच्याकडील सोने किंवा सोन्याचे दागिने बँकेकडे ठेवून तुम्हाला त्यावर पैश्याच्या किंवा सोन्याच्या स्वरूपांत व्याज मिळू शकेल. तुम्हाला तुमचे ठेवलेले सोनेही परत मिळू शकते. परंतु ही योजना किरकोळ गुंतवणुकदार किंवा मध्यमवर्गासाठी फारशी उपयोगी नाही. या योजनेखाली ठेवलेल्या सोन्याला आयकर, इस्टेट ड्युटी किंवा कॅपिटल गेन्स TAX आकारला जाणार नाही.
भारत फोर्जचा रिझल्ट चांगला येवूनही शेअरची किमत कमी झाली. बजाज ऑटो फायनान्स चा रिझल्ट चांगला आला. शेअर्सची किमत वाढली. लुपिन या कंपनीला त्यांच्या ‘AZITHROMYCIN’ या औषधासाठी USFDA ची मंजुरी मिळाली. अल्ट्राटेक सिमेंट ‘J. P.GROUP’ चा भिलाई प्लांट Rs २१०० ते Rs २२०० कोटींना खरेदी करत आहे.
एप्रिल महिन्यामध्ये प्रत्यक्ष करापासून होणारे उत्पन्न वाढले. तसेच व्यक्तीशः आयकराची वसुलीही वाढली. STT ( SECURITY TRANSACTION TAX) पासून होणारे उत्पनाही वाढले. NHPC ला त्यांच्या DIBANG MULTI PURPOSE प्रोजेक्टसाठी पर्यावरणाचा हिरवा सिग्नल मिळाला. ITDC च्या ७ हॉटेल्सचा सरकार लिलाव करणार आहे. महाराष्ट्र सरकारने अशी घोषणा केली की आता झोपुयोखाली ( झोपडपट्टी पुनर्वसन योजना) redevelopement करण्यासाठी ७५% ऐवजी ५१% लोकांची समंती पुरेशी होईल
ALKEM LABS ही कंपनी त्यांच्या CHRONIC THERAPY चा प्रसार भारतामध्ये करणार आहे. या कंपनीचा NOV-DEC २०१५ मध्ये ‘IPO’ येईल.
RELIANCE INDUSTRIES LIMITED (RIL) णे खालील घोषणा केल्या.
(१) FY १५ मध्ये ३०० पेट्रोल पंप पुन्हा सुरु केले.
(२) FY २०१६ च्या शेवटपर्यंत १४०० पेट्रोल पंप सुरु करणार आहोत.
(३) GROWTH POTENTIAL असणाऱ्या सेक्टरमध्ये १ लाख कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करणार आहे.देशभरांत 4G स्पेक्ट्रमच्या नेटवर्कची चाचणी चालू असून या क्षेत्रांत ७०५२ कोटी रुपये गुंतवणूक केली आहे.
(४) RIL ONLINE ग्रोसरी शॉप उघडणार आहे.
इमामी ही कंपनी ‘केशकिंग’ हा ब्रांड Rs १८०० कोटींना खरेदी करण्याच्या विचारांत आहे. बजाज कॉर्पने ह्या साठीच्या डीलमधून माघार घेतली आहे. CADILLA HEALTHCARE ही कंपनी CLARIS LIFE चा INJECTABLE बिसिनेस Rs ३१०० कोटींना खरेदी करण्याची शक्यता आहे. IRB इंफ्राला आग्रा-इटावा हायवेसाठी Rs २६०० कोटींचे कंत्राट मिळाले. सरकारने जाहीर केले की ते सर्व खनिजांचा लिलाव करणार आहे. या लिलावासाठी प्राधान्याचे कुठलेही नियम नाहीत. टाटा स्टील आणी बजाज ऑटो यांचे रिझल्ट्स खराब येणार आहेत अशी कुणकुण लागली होती. टाटा स्टीलचा रिझल्ट खराब आलाच परंतु बजाज ऑटोने मात्र Rs ५० लाभांशाची घोषणा केली. पण रिझल्ट्स वाटले होते तेव्हढे खराब आले नाहीत त्यामुळे शेअर वाढला..
M & M ने मित्सुबिशी अग्रीकल्चर मशीनरी या जपानी कंपनीत ३३% हिस्सा Rs १६० कोटींमध्ये खरेदी केला. STRIDES ARCOLAB या कंपनीने ESPEN या कंपनीचा ऑस्ट्रेलिया आणी मारिशस येथील जनरिक ड्रग्सचा बिझिनेस खरेदी केला. CIPLAने QUALITY CEMICAL या युगांडातील कंपनीमध्ये ५१%हिस्सा US$ ३०लाख किमतीला खरेदी केला. ब्रिटानिया आणी व्होल्टास या दोन्ही कंपन्यांचे रिझल्ट्स चांगले आले. WOCKHARDTS च्या WCK ४८७३ या प्रोडक्टला QIDP STATUS मिळाले.
मार्केट जर सतत पडत असेल तर दोन खुणा अशा आहेत की त्या दर्शवतात की आता मार्केटची स्थिती सुधारेल.
(१) LIC मार्केटमध्ये खरेदी करायला लागली
(२) म्युचुअल फंडांचे रीडम्प्शन कमी होते.
आपणाला अशी कळकळीची विनंती आहे की कोणत्याही कंपनीत पैसे गुंतवताना त्या कंपनीची माहिती करून घ्या.एकाच कंपनीत कोणाच्याही टीपवरून आपले सगळे भांडवल गुंतवू नका. आपल्या भविष्यातील गरजांप्रमाणे निरनिराळ्या कंपन्यांत योग्य त्या प्रमाणांत गुंतवणूक करा. ज्या कंपन्याना भांडवलाची सतत गरज लागत नाही, सरकारी धोरणांचा अडसर कमी असेल अशा कंपन्यांत गुंतवणूक करा. ज्या कंपनीच्या प्रगतीची खात्री नसेल त्या कंपनीच्या शेअरची किमत कमी झाली तरी सहसा त्याच्या वाटेला जाऊ नये.
स्टेट बँक ऑफ इंडिया चा रिझल्ट चांगला आला. N.P.A (NON-PERFORMING ASSET) कमी झाले. N.I.I (NET INTEREST INCOME) वाढले. नफा २३% ने वाढला. पण शेअरचा भाव मात्र पडला. त्यामुळे लोकांची निराशा झाली.ITC च्या रिझल्टची सर्वजण वाट बघत होते. परंतु ४ वाजेपर्यंत तरी रिझल्ट जाहीर झाला नाही.
असे रिझल्ट जुलै महिन्यापर्यंत चालू राहतील. तुमच्या कडे ज्या कंपन्यांचे शेअर्स असतील त्या कंपन्यांचे रिझल्ट कधी आहेत हे पाहून खरेदीविक्रीचा निर्णय घ्या. लाभांश किती जाहीर होतो आहे याकडेही लक्ष असू द्या , कारण बजाज ऑटोने जसा Rs ५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला तसा मोठ्या कंपन्या लाभांश देण्याची शक्यता असते
पुढील आठवड्यांत काही निवडक कंपन्यांचे रिझल्ट्स येतील. ते खालीलप्रमाणे :
- २३ मे २०१५ (१) ARCHIDPLY INDUSTRIES (२) DIVIS LAB
- २५ मे २०१५ (१) कॅनरा बँक (२) बॉम्बे डाईंग (३) डिशमन फार्मा (४) JYOTHY LAB (५)सोलार
INDUSTRIES (६) PTC INDUSTRIAL फायनान्स
२६ मे २०१५ (१) बँक ऑफ इंडिया (२) DREDGING कॉर्पो (३)IDBI (४) टाटा मोटर्स
(५)युनायटेड स्पिरीटस - २७ मे २०१५ (१) GAIL (२) टाटा केमिकल्स (३) TRENT (४) इंजीनीअर्स इंडिया (५) SJVN
(६) अबन ऑफशोअर (७) गोदरेज इंडस्ट्रीज (८) TTK प्रेस्टीज (९) बाटा इंडिया - २८ मे २०१५ (१) अक्झो इंडिया (२) अपोलो हास्पिटल (३) BPCL (४) कोल इंडिया (५)PFC
(५) ONGC (६) NMDC (७) पॉवर ग्रीड (८) WOCKHARDT फार्मा (९) ऑरोबिन्दो फार्मा (१०) हिंडाल्को (११) PTC - २९ मे २०१५ (१) बर्गर पेंट्स (२) सिप्ला (३) ग्लेनमार्क फार्मा (४) M & M (५) IOC (६)
MOIL (७) NHPC (८) NTPC (९) OIL (१०) SAIL (११) जेट एअरवेज (१२)
SUN फार्मा (१३) सन टीव्ही (१४) रिलायंस कॅपिटल (१५) JUST DIAL (१६)
वेंकी’स (१७) बन्नारी अम्मा शुगर
आठवड्याचे समालोचन -११ मे २०१५ ते १५ मे २०१५ – शेअरमार्केटच्या तब्येतीत सुधार
आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
गृहिणी ते शेअरमार्केट या प्रवासातील अनेक टप्पे मी वाचकांसमोर उलगडून सांगत आहे. परंतु ‘मागोवा गेल्या आठवड्याचा’ हे सदर सुरु केल्यापासून हा प्रवास फारच वेगाने होतो आहे असं मला वाटतं.प्रत्येकच ठिकाणी वेग महत्वाचा नसतो. तुम्ही किती वेळांत एख्याद्या ठिकाणी पोहोचलांत यापेक्षा तुम्ही कसे पोहोचलांत, तुम्हाला मजा आली कां तुम्ही काय काय बघितल हे ही तितकंच महत्वाचं. हीच गोष्ट तंतोतंत शेअर मार्केटच्या प्रवासालाही लागू पडते. त्यामुळे शेअर मार्केटच्या प्रवासातील मजा सांगत सांगतच गेल्या आठवड्याचा नागोवा घ्यावा ,असं मी ठरवलय.
पण आजपासून काही गोष्टी समजावून सांगणार आहे. जेणेकरून मला जो त्रास झाला तो तुम्हाला होऊ नये असे मला वाटते
सध्या जशा मुलांच्या परीक्षा, रिझल्ट्स आणी सुट्टीत कुठे जायचे या चर्चा सुरु आहेत त्याचप्रमाणे मार्केटमध्येसुद्धा १ एप्रिल पासून कंपन्यांचे क्वार्टरली/वार्षिक रिझल्ट्स सुरु होतात. परंतु शाळा कॉलेजप्रमाणे किती तारखेला रिझल्ट्स लावावे हे बंधन नसते व सुट्टीही नसते.कंपन्यांचे नवे वर्ष १ एप्रिलपासून सुरु होते. त्यामुळे बोनस,स्प्लीट,लाभांश अशा सर्व घोषणांची रेलचेल असते. या सगळ्याला कार्पोरेट action असे म्हणतात त्याचा उल्लेख मधे मधे ब्लोगमध्ये आला आहेच.
सोमवारी मार्केट तेजीत होते. गेल्या सोमवारीही मार्केट तेजीतच होते. याची.कारणेही मजेशीर बरे. गेल्या सोमवारी सलमानखानला बेल मिळाला तर या सोमवारी म्हणजेच तारीख ११/०५/२०१५ला जयललीताची निर्दोष सुटका झाली.मार्केटला आनंद झाला. राजा जसा त्याला आनंद झाला की लोकांना भेटी देतो तसेच मार्केटचा मूड सारे काही ठरवतो . पण हे पूर्णपणे खरं आहे कां? बऱ्याच उद्योगधंद्यांवर या दोन्ही व्यक्तीमुळे परिणाम होत होता आणी होत आहे. हे विचार केल्यानंतर समजले. सलमानमुळे चित्रपटव्यवसाय तर जयललिता तर तामिळनाडूची मुख्यमंत्रीच. तिच्या गैरहजेरीत तामिळनाडूचे सर्व काम ठप्प झालं होतं.
सोमवारी रीलाक्सो फुटवेअर या कंपनीने १:१ बोनस जाहीर केला. म्हणजेच तुमच्याजवळ या कंपनीचा एक शेअर असेल तर तुम्हाला आणखी एक शेअर फुकट मिळेल. या ठिकाणी लोकांची समजूत अशी होते की आपल्या १०० शेअर्सचे २०० शेअर्स होतील व भाव मात्र तोच राहील.. असे मात्र घडत नाही. शेअरचा भावही त्याप्रमाणांत कमी होतो. म्हणजेच भावही अर्धा होतो. फेडरल बँकही बोनस देणार आहे हे कळल. याबाबत निर्णय १६ मेला घेतला जाईल. बोनस जाहीर होणार आहे या अपेक्षेमुळे शेअरची किमत खूप वाढते आणी त्यावेळी शेअर्स घेतले तर महागांत पडतात. बोनस जाहीर झाल्यापासून ते आपल्या ‘DEMAT’ ला जमा होईपर्यंत बराच कालावधी लागतो. – या दरम्यानच्या काळांत शेअर स्वस्त मिळाल्यास खरेदी करावी. HUL(हिंदुस्थान युनिलिवर लिमिटेड) GILLETTE P&G ,आणी GLAXO या कंपन्यांचे रिझल्ट्स चांगले आले. सियाराम सिल्क या कंपनीचा नफा ६०% ने वाढला.
मंगळवारी रुपया वेगाने घसरला. त्याने ६४ची मर्यादाही ओलांडली.आता रुपया घसरला म्हणजे काय तर रुपयाची किमत दुसऱ्या देशांच्या चलनांच्या तुलनेत कमी झाली. आपण नेहेमी म्हणतो ना अहो पूर्वी Rs १०० घेवून बाजारांत गेलो तर पोतंभर धान्य येई आता पिशवीभरही येत नाही. यालाच रुपयाचे अवमूल्यन असे म्हणतात. याची कारणे अनेक आहेत
- अमेरिकन अर्थव्यवस्थेत सुधार
- शेअर बाजाराची घसरण
- आयात करणाऱ्यांची US $ ची वाढलेली मागणी
इतके दिवस ‘गंगा मैली हो गयी’ हा संवाद तुम्ही ऐकला असेल त्यावरून बरेच राजकारण रंगले. मोदी सरकार आल्यावर ‘नमामी गंगा’ प्रोजेक्ट जाहीर झाला. सरकारने अंदाजपत्रकांत पैशाची तरतूदही करून ठेवली. या योजनेला बुधवारी मंजुरी मिळाली. या प्रोजेक्टचा फायदा कोणाला होईल याचा विचार झाला. ताबडतोब त्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत बदल दिसू लागले. जसे CONCOR, ITD सिमेंटेशन, DREDGING कॉर्पोरेशन. म्हणजेच या ज्या कंपन्याना या कामांत EXPERTISE आहे.
NTPC आणी IOC या दोन्ही सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपन्या आहेत. यातील सरकारच्या हिश्यापैकी अनुक्रमे ५% आणी १०% हिस्सा सरकार डायवेस्ट करणार आहे. नवे युरिया धोरण जाहीर झाले. त्यामुळे खतांचे शेअर्स झळकले. मार्केटमध्ये बेसावध राहून चालत नाही. मार्केट कोणत्याही बातमीला लगेच प्रतिसाद देतं.
IIP ( INDEX OF INDUSTRIAL PRODUCTION) आणी CPI(CONSUMER PRICE INDEX) चे आकडे जाहीर होणार याची चाहूल लागल्याने प्रत्येकजण आपले पाउल जपूनच टाकीत होता. IIP वरून आपल्याला औद्योगिक उत्पादन कमी झाले कां जास्त झाले हे समजते. यावरून उद्योगांची स्थिती समजते. CPI म्हणजे रोज आपण ज्या गोष्टी वापरतो (म्हणजेच धान्य भाजी कपडा इत्यादी ) त्यांचे भाव वाढले की कमी झाले हे समजते. मार्च महिन्यांत IIP २.१ (पूर्वी हा ४.९ होता) म्हणजेच औद्योगिक उत्पादन कमी झाले असे समजते. एप्रिल CPI ४.८७ ( पूर्वी ५.१७) म्हणजेच महागाई कमी झाली. परंतु आपल्या गृहिणींना महागाई कमी झालेली आहे असे दिसते कां ? नाही ना ? हे आकडे काही वेगळेच दर्शन देतात. खरा देव आणी उत्सवमूर्ती यांत नेहेमी फरक असतोच.
आज ‘‘LUPIN’ ने निराशा केली. रिझल्ट्स अपेक्षेप्रमाणे आले नाहीत. जणू उनपावसाच्या खेळाप्रमाणे मला मार्केट वाटले. प्रथम ३०० पाईंट वर नंतर पुन्हा लालेलाल, पुन्हा तेव्हढेच वर याचा अर्थ काय तर मार्केट पडल्यानंतर ही चांगली संधी समजून लोकांनी खरेदी केली. अशा CORRECTION ला मार्केटच्या भाषेत ‘RUNNING CORRECTION’ असे म्हणतात.
गुरुवारी WPI (WHOLESALE PRICE INDEX चे आकडे जाहीर झाले. पूर्वी -२.३३ वरून -२.६५ झाला. पंतप्रधानांची चीन यात्रा सुरु झाली. तुम्ही म्हणाल याचा मार्केटशी काय संबंध ? परंतु अशा दौऱ्यानमध्ये बरेच व्यापारी करार केले जातात. बऱ्याच भारतीय कंपन्यांच्या शाखा चीनमध्ये आहेत. कंपन्यांच्या काही अडचणी असतात. त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे हिटाची, भेल, टाटा मोटर्स, भारत फोर्ज, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या शेअर्सकडे सर्वजण लक्ष ठेवून आहेत.
शुक्रवारी शेअर मार्केट एकदम शांत आणी स्थिर होते. . मार्केट पडेल म्हणून भराभर विकुन टाका अशी भीती नव्हती किंवा पटापट खरेदी करा नंतर महाग पडेल अशी धांदलही नव्हती. ज्याप्रमाणे कंपन्यांचे रिझल्ट्स येतील त्याप्रमाणे शेअर्सच्या भावांत बदल होत होता. क्रूडच्या किमती पुन्हां कमी व्हावयास सुरुवात झाली. रुपयाही थोडासा वधारला.CADILA हेंल्थ केअर आणी JUBILANT फूड्स या कंपन्यांचा निकाल चांगला आला. JSW STEEL या कंपनीचा निकाल मात्र निराशाजनक आला.
पंतप्रधानांच्या चीन यात्रेमुळे मार्केट सुधारायला काही मदत होते कां ? हे आपण पुढील आठवड्यांत पाहू.
पुढील आठवड्यात लागणारे रिझल्ट्स
- १६ मे २०१५ (१) CORPORATION बँक (२) जम्मू अंड काश्मीर बँक
- 18 मे २०१५ (१) एशियन पेंट्स (२) GLAXO (३) HSIL (४) M&M फायनान्स
- १९ मे २०१५ (१) PIDILITE INDUSTRIES
- २० मे २०१५ (१) ARCHIES (२) बजाज फायनान्स (३) भारत फोर्ज (४) B.S.. LIMITED (५) DLF
(६) टाटा स्टील - २१ मे २०१५ (१) बजाज ऑटो (२)BRITANNIA (३) CESC (४) दीपक FERTILIZERS (४) ICRA
(५ RCF (६) SCI (७) शक्ती पंप्स (८) TTK (९) VOLTAS - २२ मे २०१५ (१) CEAT (२) FINANCIAL TECH (३)ITC (४) कर्नाटक बँक (५) MMTC
(६) MPHASIS (७) NBCC (८) स्टेट बँक ऑफ इंडिया
आठवड्याचे समालोचन – 4 मे ते ८ मे २०१५ – गोंधळात गोंधळ
आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
या आठवड्यांत मार्केटने चांगलेच रंग उधळले. बुल्स आणी बेअर्सनी आपापल्या पोळ्या भाजल्या. परंतु सामान्य किंवा किरकोळ गुंतवणूकदार मात्र गोंधळात पडला. एक दिवस ५०० पाईंट मार्केट वर तर दुसऱ्या दिवशी ७०० पाईंट मार्केट खाली. अशा वेळी कधी कधी हसायला येते. २४ तासामध्ये कंपन्यांची आर्थिक परिस्थिती एवढ्या मोठ्या प्रमाणावर कशी काय बदलू शकते. त्यामुळे हा काहीतरी गोंधळ आहे इतकं काय ते समजलं. बाकी फार काही कळल नसेल पण या आठवड्यांत मार्केट पडण्याची कारणं मात्र कळली.
- क्रूड US$ ६८ पर्यंत पोहोचले
- US$ च्या तुलने मध्ये रुपयाची किमत कमी झाली. ६४ रुपयाला १ US$ हा रेट झाला.
- बॉंड यील्ड वाढले आणी बोंडच्या किमती कमी झाल्या
- ‘MAT’ (मिनिमम आल्टरनेट TAX) मुळे परदेशी गुंतवणूकदारांमध्ये घबराट झाली भारतीय शेअर मार्केट EXPENSIVE झाले त्यामानाने चीनचे मार्केट विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षक वाटू लागले. त्यामुळे त्यांनी भारतीय बाजारातून पळ काढला.
- अवकाळी पावसामुळे पिंकांचे नुकसान झाल्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील मागणी कमी झाली.
- राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या असहकारामुळे GST, जमीन अधिग्रहण विधेयक इत्यादी ठराव पास होण्याची शक्यता मावळली
सोमवारी आदित्य बिर्ला ग्रूपने आपली MADURA FASHION AND LIFESTYLE DIVISION वेगळी काढून त्याचे PANTLOON FASHION AND RETAIL(PFR) या तोट्यामध्ये असणाऱ्या लिस्टेड कंपनीमध्ये मर्जर केले PFRचे नाव बदलून आदित्य बिर्ला FASHION AND रिटेल(ABFR) असे होईल.यामुळे रिटेल क्षेत्रांत एक नवी आणी आर्थिकदृष्ट्या सक्षम कंपनी अस्तित्वात येईल. या व्यवस्थेनुसार ज्याच्याकडे १०० आदित्य बिर्ला नुवोचे शेअर्स आहेत त्याला ABFR या नवीन कंपनीचे ५२० शेअर्स ADDITIONAL मिळतील.
रबरच्या किमती घसरल्या. सरकारने एक्साईज ड्युटी लावली. OIL INDIA आणी ONGC या कंपन्याना सबसिडीचा भार उचलावा लागणार नाही असे सरकारने जाहीर केल्यामुळे मार्केटला भक्कम आधार मिळाला.मार्केट वाढले आणी टिकले सुद्धा. ऑटो विक्रीचे आकडेही चांगले आले. अशोक LEYLAND ची विक्री ४३% ने वाढली. बजाज ऑटोची पडझड थांबली. मारुतिने चांगली प्रगती दाखवली. त्यांची निर्यातही वाढली. M&M ची विक्रीही वाढली. UK आणी USA बरोबर ‘DOUBLE TAX AVOIDANCE AGREEMENT’ असली तरी त्यातील तरतुदीनुसार या देशातील ‘FII’ना MAT संबंधी तरतुदी लागू होतील असे सरकारने जाहीर केले. फक्त सिंगापूर, मारिशस आणी सायप्रस या देशांतील ‘FII’ ना झिरो कॅपिटल गेन्स TAX लागेल असे जाहीर केले. मार्केट संपल्यावर CANFINAA HOMES आणी SKS मायक्रोफायनान्स या कंपन्यांचे रिझल्ट्स जाहीर झाले. हे रिझल्ट्स चांगले आले
सोमवारच्या आकडेवारीवरून ‘FII’ नी विक्री थांबवली खरेदी मात्र फारशी आढळली नाही. सोमवारी बँक हॉलिडे असल्यामुळे एल आय सी मार्केटमध्ये नव्हती. बँक ऑफ बरोडाने बेस रेट .२५ पाईंटने कमी केला. एका हातानी द्या आणी दुसऱ्या हातानी घ्या अशी LPG मधली हालचाल आहे. सवलतीच्या दरांत जे सिलेंडर दिले जातात त्या सवलतीच्या (सबसिडीवर) पैशावर आयकर लावावा असे घाटत आहे. आज जे रिझल्ट लागले त्यांत ट्यूब इन्वेस्ट मेंट, डाबर, आणी स्टेट बँक ऑफ हैदराबाद यांचे रिझल्ट्स चांगले आले. बर्जर पेंटने महाराष्ट्रांत पावडर कोटिंग प्लांट सुरु केला. क्रुडऑइलच्या किमती वाढत आहेत. जेव्हा असे मार्केट पडत असते तेव्हां BOTTOM तयार झाला की नाही हे समजत नाही, STOPLOSS झटकन TRIGGER होतात त्यामुळे VOLUME कमी करावेत.
सुप्राजीत इंजिनिअरिंग ह्या कंपनीला PHOENIX LAMP या कंपनीमधील ५१% ते ६१% शेअर्स Rs ८९ प्रती शेअर या किमतीने खरेदी करायला .शेअरहोल्डर्सनी परवानगी दिली. ही कंपनी २६% शेअर्स अक्वायर करण्यासाठी Rs१०० प्रती शेअरने ओपन ऑफर आणणार आहे. KEC, त्रिवेणी टर्बाईनस, फोर्स मोटार्स, GIC हौसिंग, चे रिझल्ट चांगले आले. कोटक महिंद्रा बँकेचे रिझल्ट अपेक्षेपेक्षा चांगले आले. बँकेने १:१ असा बोनस जाहीर केला.
बुधवारी मार्केट ७०० पाईंट पडले. दूरदर्शन वरील सर्व वाहिन्यांवरील विश्लेषक लोकांनी इंट्राडेसाठी खरेदी करायला सांगितली होती. कुणीही ७०० पाईंट मार्केट पडेल असा अंदाज वर्तवला नव्हता. मुलभूत परिस्थिती बदलल्याची चिन्हे टेक्निकल ANALISIS दर्शवत नाही. क्रूड वाढले, रुपया घसरला, GST, जमीन अधिग्रहण विधेयक पास होण्याची चिन्हे नाहीत.प्रत्येक रीफार्मसाठी अडसर समोर येत आहेत, आणी त्यांत भरीसभर म्हणून सलमानखानच्या विरोधांत आलेला कोर्टाचा निकाल या सर्वांचे प्रतिबिंब टेक्निकल विशेशानांत दिसत नाही. कारण तो फक्त शेअरच्या किमतीतील हालचालींवर आधारलेला असतो.
आमच्या गृहिणीच्या भाषेत बोलल्यास रेसिपी बनवताना प्रत्येक पदार्थाचे प्रमाण दिलेले असते. परंतु पदार्थ कोणत्या गुणवत्तेचा हवा हे सांगत नाहीत. मैदा जुना असेल किंवा भाकरीचे पीठ जुने असेल तर साधे साधे पदार्थ बिघडतात.त्यामुळे तुम्हाला मुलभूत गोष्टींचे ज्ञान असणे गरजेचे आहे.कारण शेअर्स स्वस्तांत मिळतो आहे की महागांत? INDUSTRY P. E. किती आहे, उद्योगाला आणी कंपनीला वाद होण्यासाठी किती स्कोप आहे, सरकारी धोरण काय आहे हे सगळं पाहावच लागत. जर शेअर महाग पडला असे वाटले तर चटकन विकून किंवा थोड्या फायाद्यांत विकून मोकळे व्हावे. जेव्हा मार्केट पडत असते तेव्हाही जे शेअर्स पडत नाहीत त्या शेअर्सकडे ध्यान दिले पाहिजे. ते शेअर कां पडले नाहीत याचे विश्लेषण करून असे शेअर्स थोड्या थोड्या प्रमाणात जमा करावेत.
आज मार्केट पडायला एक कारण म्हणजे निफ्टीची मोठ्या प्रमाणांत विक्री झाली. आज निफ्टी ८२२४ असताना ३.८ लाख निफ्टी, ८२१८ असताना ३.२ लाख निफ्टी, आणी ८२३३ निफ्टी असताना ३.१ निफ्टीची विक्री झाली. ही विक्री 9 वाजून ५३ मिनिटांनी झाली. या प्रकारच्या ट्रेडना ALGORITHAM ट्रेड असेही म्हणतात. इंडेक्स जसजसा खाली जाईल तसतशी विक्रीची ऑर्डर होईल असा प्रोग्रॅम सेट केलेला असतो. उदा: निफ्टी ८३३० TRENDLINE SUPPORT, ८२७० २०० DAYS MOVING AVERAGES निफ्टी आणी ८२१० EARLIER DAY LOW ह्या तीन PIVOT पाईंटच्या खाली निफ्टी गेल्यामुळे ALGOTRED TRIGGER झाले आणी निफ्टी पडावयास सुरुवात झाली.
गुरुवारी IDBI बँकेने .२५ पाईंटने बेस रेट कमी केला. हा कमी केलेला रेट ११ मे पासून लागू होईल. PNB नेसुद्धा बेस रेट कमी केला. F & O मध्ये ७ कंपन्यांचे शेअर्स सामील केले जाणार आहेत. रुपयाचे WEAK होणे थांबले नाहि . रुपया सप्टेंबर२०१० नंतर आज प्रथमच ६४.२० झाला. बॉंड यील्ड वाढले आणी बोंडच्या किमती कमी झाल्या.
शुक्रवारी सरकारने ‘MAT’ वर विचार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमली.. त्यामुळे मार्केट मध्ये पुन्हा एकदा खरेदी झाली. पण PNB, IOB, या राष्ट्रीयीकृत बँकांनी निराशाजनक निकाल दिले. त्याच बरोबर HUL,अलाहाबाद बँक यांचे रिझल्ट्स चांगले आले. HEROMOTOCORPच्या रिझल्ट्सने निराशा केली.मार्केट पुन्हा ५००पाईंट वर गेले. दिवसभरांत एकदाही मंदीची चिन्हे जाणवली नाहीत. मार्केटने निफ्टी ८२०० चा टप्पा पार केला.व पुन्हा एकदा विश्लेषकांना कोडे घातले. सांगा पाहू पुढच्या आठवड्यांत मार्केट वर राहील की खाली ?
या आठवद्यांत भारती रिटेल आणी PANTLOON रिटेल यांचे मर्जर होणार असे जाहीर केले. PNC INFRATECH या कंपनीचा ‘IPO’ आला. प्राईस BAND Rs ३५५ ते Rs ३७८ आहे. ही कंपनी रस्ते बांधण्याच्या उद्योगांत आहे. कंपनी आर्थिकदृष्ट्र्या सक्षम असली तरी शेअर महाग आहे.
जणू काही मार्केटने या आठवड्यांत उनपावसाचा खेळच दाखवला. एक दिवस मार्केट ७०० पाईंट खाली तर दुसरे दिवशी ५०० पाईंट वर अशा प्रकारे बुल्स आणी बेअर्सची म्हणले तर शिमगा म्हटले तर दिवाळी साजरी झाली. पण मधल्यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांच्या मनांत मात्र भीती आणी गोंधळ निर्माण झाला. एकाचा होतो खेळ आणी एकाचा जातो जीव ही म्हण खरी होताना दिसली.
पुढील आठवड्यांत जाहीर होणारे निकाल:
- ९ मे २०१५ युनिकेम lab, syndicat बँक
- ११ मे २०१५ बँक ऑफ बरोडा, हवेल्ल्स , SRF
- १२ मे २०१५ अपोलो टायर्स, अशोक LEYLAND, सेन्ट्रल बँक, DRREDDY’S, मदरसन सुमी, पंजाब सिंध बँक, सोभा DEV, UCO बँक ,UNION बँक, VIJAYA बँक
- १३ मे २०१५ अडाणी ENTERPRISES, इमामी, लुपिन
- १४ मे २०१५ AHMEDNAGAR FORGING, CASTROL INDIA, GRINDWELL NORTON, INDIAN बँक JK TYRES, बँक ऑफ महाराष्ट्र, NCC MCX , OBC, PC JEWELLERS
- १५ मे २०१५ अमृतांजन, ILFSTRANSPORT, BF UTILITIES, TORRENT PHARMA, देना बँक, CADILLA HEALTH
आठवड्याचे समालोचन – २७ ते ३० एप्रिल २०१५ – बेअर्सचा प्रभाव आणी बुल्सची पीछेहाट
आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
टेक्निकल्सला मार्केट अजिबात दाद दिली नाही या आठवड्यात. अनेक सपोर्ट लेव्हल्स मार्केट तोडत निघाले आहे. त्यामुळे मार्केटचे पडणे जेव्हां थांबेल तेव्हां थांबेल. फक्त पहात राहणेच काय ते आपल्या हातांत. नदीला पूर आला किंवा सुनामी आली तर ती कोणताही अडथळा जुमानत नाही. खराब शेअर तर धोपटले जातातच. पण चांगले शेअर्ससुद्धा हे धक्के पचवू शकत नाहीत. पण सगळे शेअर्स कमी भावांत उपलब्ध असल्याने किरकोळ गुंतवणूकदारांना ही दीर्घ मुदतीची गुंतवणूक करण्यासाठी चांगली संधी मिळते.
Putcall रेशियो .८३ वरून .७६ वर खाली आला. हा रेशियो .८ असेल तर मार्केट सुधारतं म्हणजेच ओव्हरसोल्ड झोनमध्ये असूनही मार्केट सुधारले नाही. ते अती ओवरसोल्ड झोनला पोहोचले. सध्या सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका आणी मेटल या सेक्टरमध्ये शेअर्सचे पडणे किंवा मंदी कमी झाली असं वाटलं.
सोमवारी मारुती लिमिटेड चा रिझल्ट लौकिकाप्रमाणे चांगला आला. त्यांच्या शेअर्सची किमतही वाढली. आंध्र बँकेचा रिझल्टही चांगला आला. ‘पिट्टी lamination’ या कंपनीचा रिझल्ट छान आला. निफ्टीचा २०० DMA (DAILY MOVING AVERAGES) तुटला. फक्त आज निफ्टी ८२००च्या खाली गेला नाही एवढेच!. दुनियाभरची मार्केट चांगली तेजींत चालू होती . पण ‘MAT’, मान्सूनचा वर्तविलेला अंदाज, आणी कंपन्यांच्या अर्निंगविषयी(वार्षिक निकाल कसे येतील) अनिश्चितता या तीन बाबींचा आपल्या मार्केटवर प्रतिकूल परिणाम होत होता.
FII ( FOREIGN INSTITUTIONAL INVESTORS) चे COUNTRY ROTATION चालू आहे असे वाटलं. ICICIबँकेच्या ‘ASSET QUALITY’विषयी चिंता वाढली. त्यामुळे शेअर पडला. खाजगी बॅंकांमध्ये NPA ( NON PERFORMING ASSET)चे प्रमाण नगण्य असेल असे वाटले पण NPA भरपूर आहेत असे दिसताच खाजगी बँका पडल्या.
मंगळवारी FOMCची मीटिंग होती. निफ्टी ८२०० च्या खाली गेला.सिमेंट उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी सिमेंटच्या किमती कमी केल्या.ओईल मार्केटिंग कंपन्याना सबसिडीची पूर्ण भरपाई केली जाईल असे सांगितले त्यामुळे HPCL, BPCL,तसेच IOC या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वाढले. भारती एअरटेल या कंपनीची बरीचशी कामे NIGERIAमध्ये चालू आहेत. त्या देशाचे चलन WEAK झाल्यामुळे कंपनीवर त्याचा परिणाम झाला. ADANI PORTने केरळा कनटेणर पोर्टसाठी बीड केले. गोदरेज कन्झ्युमरचा रिझल्ट आला. एस्टीमेट पेक्षा थोडा कमी आला. स्टेट बँक ऑफ MYSOREने त्यांचा बेस रेट .२५ने कमी केला. सेन्चुरी प्लायवूडचे रिझल्ट चांगले आले. वर्किंग मार्जिन वाढले.
WOCKHARDT या औषधे बनवणाऱ्या कंपनीने आपली १२ ते १५ उत्पादने USAमधून परत बोलाविली. ज्या औषधांवर USFDA कारवाई करेल असे वाटले ती औषधे परत बोलाविली. ही औषधे महाराष्ट्रातील वाळूंज आणी चिखलठाणा येथील कारखान्यांत बनवलेली आहेत. त्यामुळे WOCKHARDTचा शेअर खूपच पडला.
फायनान्स सेक्रटरीने इन्फ्रा प्रोजेक्टच्या अडचणी समजावून घेण्यासाठी आणी त्या दूर करण्यासाठी उपाय योजण्यासाठी बँकर्सची बैठक बोलाविली होती. या मीटिंग मध्ये ८५ इन्फ्रा प्रोजेक्ट्सचा परामर्श घेतला गेला. ‘IDEA’ आणी भारती एअरटेल या टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्याचे रिझल्ट आले. IDEAचे रिझल्ट्स अपेक्षेपेक्षा चांगले आले. भारती एअरटेलचे रिझल्ट्स ही चांगले आले.रिझल्ट्स चांगले आले पण स्पेक्ट्रमसाठी खूप वरची किमत मोजावी लागल्यामुळे कंपनीच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होईल असे वाटून दोन्ही शेअर्स पडले. TATA ELXIचे रिझल्ट्स चांगले आले. अल्ट्राटेक सिमेंटला जेपी असोसिएटचे दोन सिमेंट प्लांट खरेदी करण्यासाठी CCA ने परवानगी दिली. ‘गती’ या कंपनीचे रिझल्ट्स फारसे चांगले आले नाहीत. विक्री वाढली पण नफा कमी झाला. साखर उद्योगाला Rs ५७५ कोटींची मदत मिळणार आहे इथनोल वरची ड्युटी कमी केली.. साखरेवर असलेली आयात ड्युटी २५% वरून ४०% पर्यंत वाढवली. सरकारने संरक्षण क्षेत्रासाठीच्या औद्योगिक परवान्याची (industrial license) मुदत ७वर्षापर्यन्त वाढवली. सरकारने १००० ‘SMART CITIES’ साठी ४८००० कोटींची तरतूद केली.AXIS बँक, TVS MOTORS, आणी लक्ष्मी विलास बँक यांचे रिझल्ट्स अपेक्षेपेक्षा चांगले आले. COMPANY AMENDMENT BILL २०१४ संसदेत पास झाले. PTC फायनान्सने RENEWABLE ENERGY सेक्टरला असलेला EXPOSURE ४०% वरून ६०% पर्यंत वाढवू असे सांगितले. TCSच्या भागधारकांनी CMCच्या TCS मधील विलीनीकरणाला मंजुरी दिली.29MAY पासून निफ्टीमध्ये IDFC ऐवजी BOSCH या शेअरचा समावेश होईल. निफ्टीने अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधित्व केले पाहिजे हे तत्व विचारांत घेवून तशाच शेअर्सचा समावेश निफ्टीमध्ये केला जातो. ज्या शेअर्सचा समावेश केला जातो त्या शेअरमध्ये होणारी उलाढाल (volume) व रोखता(लिक्विडीटी) विचारांत घेतली जाते.यावरुन बरीच चर्चा ऐकावयास मिळाली फेडरल बँकेचे रिझल्ट चांगले आले. वेदांता या कंपनीच्या नफ्यामध्ये ६०% च्या वर घट झाली. ही घट ONE TIME राईट-ऑफ ऑफ गुडविल मुळे झाली…
HDFCचे रिझल्ट्स त्यांच्या लौकिकाप्रमाणे चांगले आणी उत्साहवर्धक आले. MOTHERSON सुमी या कम्पनीला DAIMER या कंपनीकडून मोठी ऑर्डर मिळाली. WELSPUN INDIA चे रिझल्ट्स चांगले आले. गुरुवारी VRL LOGISTIC या कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग झाले. ७४ वेळा SUBSCRIBE झाल्यामुळे बऱ्याच अर्जदारांना शेअर्स मिळाले नाहीत. ७० ते ८० रुपये ग्रे मार्केट प्रीमियम चालू होता. त्या हिशोबातच Rs 298 ला लिस्टिंग झाले.
रुपया US$ च्या तुलनेमध्ये रोज WEAK होत आहे. Rs ६३.५१ एवढी किमत एका US$ साठी मोजावी लागत होती.म्हणजेच US$ २१ पैसे महाग झाला. पूर्वी असे झाले की फार्मा आणी IT शेअर्समध्ये तेजी येत असे. कारण अशी स्थिती निर्यातदारांना फायद्याची असते. पण या वेळी मात्र असे घडताना दिसत नाही. मार्केटमधील मंदीच्या झंझावातामध्ये सब घोडे बारा टक्के अशी स्थिती झाली आहे.कंपन्यांचे निकाल पाहतां ( काही अपवाद वगळता) उत्पन्नांत फारशी सुधारणा नाही त्यामानाने शेअर्सचे भाव अव्वाच्या सव्वा वाढलेले आहेत हेच प्रमुख कारण आहे.
जवळजवळ १०००पाईंट निफ्टी आणी ३००० पाईंट सेन्सेक्स पडले आहे त्यामुळे खरेदी करणाऱ्यांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्याचबरोबर आपण अतिउत्साहीसुद्धा होऊ नये, घाईगडबड करू नये. तुम्हाला जे शेअर्स खरेदी करायचे असतील त्याची नावे आणी तुम्हाला हवी असलेली खरेदी किमत याची यादी करा.किंवा डोक्यांत ठेवा. समजा तुम्ही आंबे खरेदी करायला गेलांत तर कोणत्या जातीचे आंबे किती रुपये डझन दराने मिळाले पाहिजेत याचा तुमचा एक अंदाज असतो. आंबेवाल्याने अव्वाच्या सव्वा भाव सांगितला तर तुम्ही खरेदी करत नाही. हाच हिशोब शेअर खरेदीच्या बाबतीतही ठेवा.आणी खरेदी करताना छोट्या छोट्या लॉटमध्ये खरेदी करा. पूर्वी खरेदी केलेल्या शेअर्सना भाव येत असेल तर विकूनही टाका. मार्केट पडण्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर फायदा घेण्यासाठी थांबता येत नाही. आशादायी वातावरण निर्माण होईतोपर्यंत थोडा थोडा फायदा वेळोवेळी घेवून ट्रेडिंग करावे लागते.
बघा तुम्हाला काय जमतंय ते? पण घाबरून न जातां आलेल्या सुवर्णसंधीचा फायदा मात्र उठवा.
जाण्याआधी आता पुढच्या आठवड्यांत येणाऱ्या कंपन्यांच्या वार्षिक निकालांच्या वेळापत्रकावर नजर टाकू.
1 मे २०१५ अडाणी पोर्ट, डीसीएम श्रीरामं,
२ मे २०१५ ग्रासिम
४ मे २०१५ कॅनफिना होम्स, एसकेएस माइक्रो फायनान्स, व्हीगार्ड,
५ मे २०१५ ABB, सेन्चुरी, डाबर एल्डर फार्मा, कोटक, MUTHOOT फायनान्स , OBC, PFIZER, SBT, SPARK
६ मे २०१५ फोर्स मोटर्स, GIC हौसिंग, SBBJ,
७ मे २०१५ BASF, HEROMOT0CORP, SINTEX, TITAN, युनायटेड बँक ऑफ इंडिया, अजंता फार्मा,
८ मे २०१५ EICHER MOTOR, GILLETTE, GLAXO, HUL, KANSAI NEROLAC, PNB