आठवड्याचे समालोचन – २७ ते ३० एप्रिल २०१५ – बेअर्सचा प्रभाव आणी बुल्सची पीछेहाट

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा 
टेक्निकल्सला मार्केट अजिबात दाद  दिली नाही या आठवड्यात. अनेक सपोर्ट लेव्हल्स मार्केट तोडत निघाले आहे. त्यामुळे मार्केटचे पडणे जेव्हां थांबेल तेव्हां थांबेल. फक्त पहात राहणेच काय ते आपल्या हातांत. नदीला पूर आला किंवा सुनामी आली तर ती कोणताही अडथळा जुमानत नाही. खराब शेअर तर धोपटले जातातच. पण चांगले शेअर्ससुद्धा हे धक्के पचवू शकत नाहीत. पण सगळे शेअर्स कमी भावांत उपलब्ध असल्याने किरकोळ गुंतवणूकदारांना ही दीर्घ मुदतीची गुंतवणूक करण्यासाठी चांगली संधी मिळते.
Putcall रेशियो .८३ वरून .७६ वर खाली आला. हा रेशियो .८ असेल तर मार्केट सुधारतं म्हणजेच ओव्हरसोल्ड झोनमध्ये असूनही मार्केट सुधारले नाही. ते अती ओवरसोल्ड झोनला पोहोचले. सध्या सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका आणी मेटल या सेक्टरमध्ये शेअर्सचे पडणे किंवा मंदी कमी झाली असं वाटलं.
सोमवारी मारुती लिमिटेड चा रिझल्ट लौकिकाप्रमाणे चांगला आला. त्यांच्या शेअर्सची किमतही वाढली. आंध्र बँकेचा रिझल्टही चांगला आला. ‘पिट्टी lamination’ या कंपनीचा रिझल्ट छान आला. निफ्टीचा २०० DMA (DAILY MOVING AVERAGES) तुटला. फक्त आज निफ्टी ८२००च्या खाली गेला नाही एवढेच!. दुनियाभरची मार्केट चांगली तेजींत चालू होती . पण ‘MAT’, मान्सूनचा वर्तविलेला अंदाज, आणी कंपन्यांच्या अर्निंगविषयी(वार्षिक निकाल कसे येतील) अनिश्चितता या तीन बाबींचा आपल्या मार्केटवर प्रतिकूल परिणाम होत होता.
FII ( FOREIGN INSTITUTIONAL INVESTORS) चे COUNTRY ROTATION चालू आहे असे वाटलं. ICICIबँकेच्या ‘ASSET QUALITY’विषयी चिंता वाढली. त्यामुळे शेअर पडला. खाजगी बॅंकांमध्ये NPA ( NON PERFORMING ASSET)चे प्रमाण नगण्य असेल असे वाटले पण NPA भरपूर आहेत असे दिसताच खाजगी बँका पडल्या.
मंगळवारी FOMCची मीटिंग होती.  निफ्टी ८२०० च्या खाली गेला.सिमेंट उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी सिमेंटच्या किमती कमी केल्या.ओईल मार्केटिंग कंपन्याना सबसिडीची पूर्ण भरपाई केली जाईल असे सांगितले त्यामुळे HPCL, BPCL,तसेच IOC या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वाढले. भारती एअरटेल या कंपनीची बरीचशी कामे NIGERIAमध्ये चालू आहेत. त्या देशाचे चलन WEAK झाल्यामुळे कंपनीवर त्याचा परिणाम झाला. ADANI PORTने केरळा कनटेणर पोर्टसाठी बीड केले. गोदरेज कन्झ्युमरचा रिझल्ट आला. एस्टीमेट पेक्षा थोडा कमी आला. स्टेट बँक ऑफ MYSOREने त्यांचा बेस रेट .२५ने कमी केला. सेन्चुरी प्लायवूडचे रिझल्ट चांगले आले. वर्किंग मार्जिन वाढले.
WOCKHARDT या औषधे बनवणाऱ्या कंपनीने आपली १२ ते १५ उत्पादने USAमधून परत बोलाविली. ज्या औषधांवर USFDA कारवाई करेल असे वाटले ती औषधे परत बोलाविली. ही औषधे महाराष्ट्रातील वाळूंज आणी चिखलठाणा येथील कारखान्यांत बनवलेली आहेत. त्यामुळे WOCKHARDTचा शेअर खूपच पडला.
फायनान्स सेक्रटरीने इन्फ्रा प्रोजेक्टच्या अडचणी समजावून घेण्यासाठी आणी त्या दूर करण्यासाठी उपाय योजण्यासाठी बँकर्सची बैठक बोलाविली होती. या मीटिंग मध्ये ८५ इन्फ्रा प्रोजेक्ट्सचा परामर्श घेतला गेला. ‘IDEA’ आणी भारती एअरटेल या टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्याचे रिझल्ट आले. IDEAचे रिझल्ट्स अपेक्षेपेक्षा चांगले आले. भारती एअरटेलचे रिझल्ट्स ही चांगले आले.रिझल्ट्स चांगले आले पण स्पेक्ट्रमसाठी खूप वरची किमत मोजावी लागल्यामुळे कंपनीच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होईल असे वाटून दोन्ही शेअर्स पडले. TATA ELXIचे रिझल्ट्स चांगले आले. अल्ट्राटेक सिमेंटला जेपी असोसिएटचे दोन सिमेंट प्लांट खरेदी करण्यासाठी CCA ने परवानगी दिली. ‘गती’ या कंपनीचे रिझल्ट्स फारसे चांगले आले नाहीत. विक्री वाढली पण नफा कमी झाला. साखर उद्योगाला Rs ५७५ कोटींची मदत मिळणार आहे इथनोल वरची ड्युटी कमी केली.. साखरेवर असलेली आयात ड्युटी २५% वरून ४०% पर्यंत वाढवली. सरकारने संरक्षण क्षेत्रासाठीच्या औद्योगिक परवान्याची (industrial license) मुदत ७वर्षापर्यन्त वाढवली. सरकारने १००० ‘SMART CITIES’ साठी ४८००० कोटींची तरतूद केली.AXIS बँक, TVS MOTORS, आणी लक्ष्मी विलास बँक यांचे रिझल्ट्स अपेक्षेपेक्षा चांगले आले. COMPANY AMENDMENT BILL २०१४ संसदेत पास झाले. PTC फायनान्सने RENEWABLE ENERGY सेक्टरला असलेला EXPOSURE ४०% वरून ६०% पर्यंत वाढवू असे सांगितले. TCSच्या भागधारकांनी CMCच्या TCS मधील विलीनीकरणाला मंजुरी दिली.29MAY पासून निफ्टीमध्ये IDFC ऐवजी BOSCH या शेअरचा समावेश होईल. निफ्टीने अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधित्व केले पाहिजे हे तत्व विचारांत घेवून तशाच शेअर्सचा समावेश निफ्टीमध्ये केला जातो. ज्या शेअर्सचा समावेश केला जातो त्या शेअरमध्ये होणारी उलाढाल (volume) व रोखता(लिक्विडीटी) विचारांत घेतली जाते.यावरुन बरीच चर्चा ऐकावयास मिळाली फेडरल बँकेचे रिझल्ट चांगले आले. वेदांता या कंपनीच्या नफ्यामध्ये ६०% च्या वर घट झाली. ही घट ONE TIME राईट-ऑफ ऑफ गुडविल मुळे झाली…
HDFCचे रिझल्ट्स त्यांच्या लौकिकाप्रमाणे चांगले आणी उत्साहवर्धक आले. MOTHERSON सुमी या कम्पनीला DAIMER या कंपनीकडून मोठी ऑर्डर मिळाली. WELSPUN INDIA चे रिझल्ट्स चांगले आले. गुरुवारी VRL LOGISTIC या कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग झाले. ७४ वेळा SUBSCRIBE झाल्यामुळे बऱ्याच अर्जदारांना शेअर्स मिळाले नाहीत. ७० ते ८० रुपये ग्रे मार्केट प्रीमियम चालू होता. त्या हिशोबातच Rs 298 ला लिस्टिंग झाले.
रुपया US$ च्या तुलनेमध्ये रोज WEAK होत आहे. Rs ६३.५१ एवढी किमत एका US$ साठी मोजावी लागत होती.म्हणजेच US$ २१ पैसे महाग झाला. पूर्वी असे झाले की फार्मा आणी IT शेअर्समध्ये तेजी येत असे. कारण अशी स्थिती निर्यातदारांना फायद्याची असते. पण या वेळी मात्र असे घडताना दिसत नाही. मार्केटमधील मंदीच्या झंझावातामध्ये सब घोडे बारा टक्के अशी स्थिती झाली आहे.कंपन्यांचे निकाल पाहतां ( काही अपवाद वगळता) उत्पन्नांत फारशी सुधारणा नाही त्यामानाने शेअर्सचे भाव अव्वाच्या सव्वा वाढलेले आहेत हेच प्रमुख कारण आहे.
जवळजवळ १०००पाईंट निफ्टी आणी ३००० पाईंट सेन्सेक्स पडले आहे त्यामुळे खरेदी करणाऱ्यांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्याचबरोबर आपण अतिउत्साहीसुद्धा होऊ नये, घाईगडबड करू नये. तुम्हाला जे शेअर्स खरेदी करायचे असतील त्याची नावे आणी तुम्हाला हवी असलेली खरेदी किमत याची यादी करा.किंवा डोक्यांत ठेवा. समजा तुम्ही आंबे खरेदी करायला गेलांत तर कोणत्या जातीचे आंबे किती रुपये डझन दराने मिळाले पाहिजेत याचा तुमचा एक अंदाज असतो. आंबेवाल्याने अव्वाच्या सव्वा भाव सांगितला तर तुम्ही खरेदी करत नाही. हाच हिशोब शेअर खरेदीच्या बाबतीतही ठेवा.आणी खरेदी करताना छोट्या छोट्या लॉटमध्ये खरेदी करा. पूर्वी खरेदी केलेल्या शेअर्सना भाव येत असेल तर विकूनही टाका. मार्केट पडण्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर फायदा घेण्यासाठी थांबता येत नाही. आशादायी वातावरण निर्माण होईतोपर्यंत थोडा थोडा फायदा वेळोवेळी घेवून ट्रेडिंग करावे लागते.
बघा तुम्हाला काय जमतंय ते? पण घाबरून न जातां आलेल्या सुवर्णसंधीचा फायदा मात्र उठवा.
जाण्याआधी आता पुढच्या आठवड्यांत येणाऱ्या कंपन्यांच्या वार्षिक निकालांच्या वेळापत्रकावर नजर टाकू.
1 मे २०१५ अडाणी पोर्ट, डीसीएम श्रीरामं,
२ मे २०१५ ग्रासिम
४ मे २०१५ कॅनफिना होम्स, एसकेएस माइक्रो फायनान्स, व्हीगार्ड,
५ मे २०१५ ABB, सेन्चुरी, डाबर एल्डर फार्मा, कोटक, MUTHOOT फायनान्स , OBC, PFIZER, SBT, SPARK
६ मे २०१५ फोर्स मोटर्स, GIC हौसिंग, SBBJ,
७ मे २०१५ BASF, HEROMOT0CORP, SINTEX, TITAN, युनायटेड बँक ऑफ इंडिया, अजंता फार्मा,
८ मे २०१५ EICHER MOTOR, GILLETTE, GLAXO, HUL, KANSAI NEROLAC, PNB
 

One thought on “आठवड्याचे समालोचन – २७ ते ३० एप्रिल २०१५ – बेअर्सचा प्रभाव आणी बुल्सची पीछेहाट

  1. Pingback: आठवड्याचे समालोचन – 4 मे ते ८ मे २०१५ – गोंधळात गोंधळ | Stock Market आणि मी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.