आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
पावसाळा आहे सगळीकडे थोडीफार मंदी असतेच. त्यामुळे पावसाळी सेल लावून राहिलेल्या मालाची विक्री करून येणाऱ्या सणावारासाठी नवा माल भरण्याकडे व्यापाऱ्यांचा कल असतो. पण शेअरमार्केटमध्ये जो सेल लागला हा पावसाळी सेल नव्हता, फेस्टिव्हल सेल नव्हता किंवा सरकारी धोरणातील बदलामुळे लागलेला सेल नव्हता. हा ग्लोबल सेल होता असे म्हणावे लागेल.
सोमवार हा काळा दिवस म्हणावा लागेल. जेवढया वेळेला मोठ्या प्रमाणावर मार्केट पडले त्यातील ५ वेळेला ते सोमवारीच पडले. योगायोग म्हणा हवं तर ! २००९ नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर सेल ऑफ झाला. सोमवारी BSE ( BOMBAY STOCK EXCHANGE) चा निर्देशांक सेन्सेक्स १६२४ पाईंट पडून २५७४१ वर बंद झाला तर NSE (NATIONAL STOCK EXCHANGE) चा निर्देशांक निफ्टी ४९० पाईंट पडून ७८०९ वर बंद झाला.मार्केट पडल्यामुळे शेअर्सचे भाव कमी झाले आणी त्यानुळे गुंतवणूकदारांची संपत्ती Rs.७००००० कोटी कमी झाली. VIX (VOLATILITY INDEX) एका दिवसांत ६४% वाढून २८.१३ झाले. हा INDEX मार्केटमधील अस्थिरता दाखवतो.
निसर्गाचे एक तत्व असते. एकाचे नुकसान तो दुसऱ्याचा फायदा असतो. मार्केट तेजीचा ज्यांना फायदा होतो त्या बुल्सचे नुकसान झाले पण बेअर्सनी चांगली कमाई केली. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांनी हे एक तर चहाच्या पेल्यातील वादळ समजून दुर्लक्ष केले किंवा खाली आलेल्या ब्लू चीप शेअर्सची खरेदी केली.
मी २००० सालापासून मार्केटमध्ये असल्याने अशा पद्धतीने मार्केट पडणे मला नवीन नव्हते. मार्केटला लोअर सर्किट लागून २१जानेवारी २००८ सोमवारी मार्केट इंट्राडे २०६३ पाईंट पडले या पडझडीमुळे १०%ची मर्यादा ओलांडली त्यामुळे १ तासासाठी मार्केट थांबले ही घटना मी अनुभवली आहे. अशीच स्थिती २२ जानेवारी २००८ रोजी ही होती.
सोमवारी सुरुवातीला मार्केट ५०० पाईंट पडले. त्यामुळे STOP LOSS ट्रिगर झाले. मार्जिन CALL साठी विक्री झाली. मार्केट दुपारपर्यंत ९०० पाईंट पडले. त्यानंतर युरोपिअन मार्केट उघडली ती ही मंदीतच त्यामुळे पुन्हा विक्री झाली. बास्केट सेलिंग सुरु झाले. सुरुवातीला ५०० पाईंट पडलेले पाहून Rs १०० ने शेअर स्वस्त मिळतो आहे असे समजून ज्यांनी थोडीफार खरेदी केली होती त्यांनी सुद्धा मार्केटचा रागरंग बघून घेतलेले शेअर्स प्रसंगी तोटा सोसून विकून टाकले. काही लोकांची घाबरगुंडी उडाली तर काही जण आपली शॉपिंग लिस्ट समोर घेवून बसले होते. आपल्याला ज्या भावाला शेअर्सची खरेदी करायची आहे त्या भावाला शेअर्स मिळतील अशी त्यांना आशा वाटत होती.
सरकारी प्रवक्ते सांगत होते की भारताची आर्थिक स्थिती चांगली आहे. आपल्याला घाबरण्याचे कारण नाही. तर शेअर बाजारातील तज्ञ आणी विश्लेषक निफ्टी ७२०० ते ७००० पर्यंत जाईल असे भविष्य वर्तवत होते. पण जे मार्केटमध्ये नवीन होते त्यांना मात्र भीती वाटली, काय करावे सुचेनासे झाले. त्यांना वाटले आभाळच फाटले ठिगळ लावायचं तरी कुठे
हे वादळ चीनमधून आलं हे आपण १० ते १४ ऑगस्ट या भागातून सांगितले होते. चीनची अर्थव्यवस्था ढासळत आहे. चीन सरकार ती सावरण्याचा विविध प्रकारे प्रयत्न करीत आहे. चीनने स्वतःच्या युवान या चलनाचे तीन हप्त्यांत ४.५ % अवमूल्यन करून चलनयुद्ध छेडलेले आहे.
मंगळवारी सेन्सेक्स आणी निफ्टीने उसळी मारून दोन्हीही निर्देशांकांत सुधारणा झाली. रुपयाही सुधारला. मंगळवारी २५ ऑगस्ट रोजी चीनने आणखी काही घोषणा केल्या त्या खालीलप्रमाणे
(१) चीनने डीपॉझीटवरील व्याजदर .२५% ने कमी करून १.७५ % केले.
(२) कर्जाचे दरही कमी करून ४.६% केले. हे नवीन दर २६ ऑगस्ट पासून लागू होतील
(३) रिझर्व रेशियो ०.५० ने कमी केला. हे ६ सप्टेंबरपासून लागू होइल.
हे सर्व उपाय योजूनही चीनची अर्थव्यवस्था ढासळत असल्यामुळे चीनला हे कळेनासे झाले की काय करावे. त्यांची अवस्था आभाळच फाटलं अशी झाली. शुक्रवारी चीनची सेन्ट्रल बँक PBOCने ६० बिलिअन युवानचे २.३५ % व्याजाने. short टर्म लेंडिंग ऑपरेशन केले. चीनची अर्थव्यवस्था जगांत सगळ्यांत मोठी, त्यामुळे त्यांची कच्चा माल, धातू., क्रूड यांची मागणी जास्त. चीनमध्ये मागणी कमी झाल्यामुळे आर्थिक मंदी येऊ लागली तर त्याचे परिणाम जगातील चीनला निर्यात करणाऱ्या इतर देशांवर होणारच. आधीच ग्रीसच्या संकटाने जागतिक अर्थव्यवस्था ढवळून निघाली आहे. प्रत्येक देशच ठिगळ कुठे लावले तर आर्थिक स्थिती सुधारेल या प्रयत्नांत आहे.
या स्थितीमध्ये रुपयाचा विनिमय दरही ८२ पैसे कमी होऊन US$ 1= Rs ६६.६४ झाला. मार्केट आणी सोने यांचे नेहेमी व्यस्त प्रमाण असते. सोन्याचा भाव वधारला. जपानी येन आणी युरो यांचे US$ शी असलेले भाव वधारले. अनिवासी भारतीयांकडून स्वदेशी येणारे रेमिटन्सचे प्रमाण वाढले. क्रूडचा भाव आणखी घसरला. भारताचे CAD( CURRENT ACCOUNT DEFICIT) ४.७ % वरून (२०१३मध्ये असलेली) १.३% पर्यंत कमी झाली. पाउस चांगला पडल्यामुळे दुष्काळाचे संकट दूर झाले. गंगाजळी वाढली. भारताची घरगुती मागणी वाढत आहे. अर्थव्यवस्था स्थिर होऊन प्रगतीपथावर आहे.सरकारी पॉलिसी PARALYSIS संपून नवीन सरकार धडाडीने आणी त्वरीत निर्णय घेत आहे. काही कारणामुळे एक दुकान चालेनासे झाले की शेजारच्या दुकानांत मागणी वाढते. या तत्वानुसार चीनमधील ढासळत्या अर्थव्यवस्थेचा भारताला फायदा होण्याचा संभव आहे. नेपाळचा भूकंप, चीनमधील आर्थिक भूकंप आणी ग्रीसचे संकट या आंतरराष्ट्रीय घटनांकडे वेगवेगळ्या नजरेतून पहावे लागेल.
या आठवड्यांत चार IPO सुरु होऊन बंद झाले. नवकर कॉर्पोरेशनचा इशू २६ ऑगस्टला बंद झाला. पेन्नार ENGINEERED बिल्डिंग, पुष्कर केमिकल्स, आणी प्रभात डेरीज हे ipo येत आहेत. यापैकी नवकर कॉर्पोरेशनच्या इशुला प्रतिसाद चांगला मिळाला. मार्केटमधील पडझडीचा परिणाम पॉवरमेक या कंपनीच्या लिस्टिंगवर झाला. वादळाच्या लाटेत लिस्टिंग खराब झाले.
सरकार पुन्हा जमीन अधिग्रहण बिल आणी GST बिल पास करून घेण्यासाठी मैदानांत उतरले आहे.. जमीन अधिग्रहण बिल पास करून घेण्याचा नवीन मार्ग शोधून काढला आहे. GST साठी संसदेमध्ये फ्लोअर MANAGEMENT झाली आहे असे बोलले जात आहे. BOT प्रोजेक्टमधून प्रोजेक्ट पूर्ण झाल्यापासून दोन वर्षे पुरी झाल्यावर १००% स्टेक विकण्यासाठी तरतुड केली आहे.
आज सरकारने स्मार्ट सिटी योजना जाहीर केली. या योजनेवर एकूण Rs ९६००० कोटी रुपये खर्च होतील. या योजनेअंतर्गत भारताच्या निरनिराळ्या राज्यातून स्मार्ट सिटीज बनवल्या जातील. महाराष्ट्र १०, मध्यप्रदेश ७ कर्नाटक ६ तामिळनाडू १२ गुजरात ६ युपी १३ आंध्र पंजाब बिहार या राज्यांत प्रत्येकी ३ आणी राजस्थान आणी बंगाल मध्ये प्रत्येकी ४ अशा स्मार्ट सिटीज बनवल्या जातील.ज्यांची लोकसंख्या १ लाखांपेक्षा कमी अशा ८, १ लाख ते ५ लाख अशा ३५, ५ ते १० लाख अशा २१ आणी २५ लाख ते ५० लाख लोकसंख्या असलेल्या ५ स्मार्ट सिटीज बनवल्या जातील. स्मार्ट सिटीजमध्ये सार्वजनिक आरोग्य, वीजपुरवठा, पाणीपुरवठा, टेलिकॉम इत्यादी infrastructure सोयी समाधानकारक आणी २४/७ उपलब्ध असतील. या स्मार्ट सिटीपैकी २४ व्यापार आणी उद्योग केंद्रे, १८ सांस्कृतिक आणी पर्यटन केंद्रे असतील आणी तीन शिक्षण आणी आरोग्य केंद्रे असतील.
गुरुवारी सेन्सेक्ष ५०० पाईंट आणी निफ्टी १०० पाईंट वाढून अनुक्रमे २६२३१ आणी ७९५८ वर बंद झाले. अर्थात ह्या गुरुवारी ऑगस्ट एक्सपायरी होती. मार्केटने expiryचे निमित्त साधून फाटलेल्या मार्केटला थोडेसे ठिगळ लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गुंतवणूकदार तसेच ट्रेडर्सचा मूड सुधारण्यास मदत झाली.
एडीएजी समूहाच्या पिपावाव डिफेन्स या कंपनीला कामोव हेलिकॉप्टर बनविण्यासाठी US$१०० कोटींचे CONTRACT मिळाले.रत्नागिरी GAS and पॉवर या कंपनीचे दोन भाग करून GASचे काम GAILकडे तर पॉवर चे काम NTPC ला देण्यांत आले आहे. SEQUENT SCIENTIFIC या कंपनीने LYKAA EXPORTS चा ANIMALहेल्थ बिझीनेस खरेदी केला. शसून फार्माच्या STRIDES ARCOLAB मधील विलीनिकरणास मुंबई हायकोर्टाने मंजुरी दिली. लुपिन या कंपनीच्या PRILOSEC या असिडीटीसाठी असलेल्या जनरिक औषधाला USFDA ची मंजुरी मिळाली. आज क्रूडच्या किंमती वाढल्या.
मार्केटमधील तेजी आणी मंदी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत .मार्केटमध्ये मंदीची लाट येणे, मार्केट पडणे ही स्वाभाविक घटना आहे. प्रत्येक वेळेला होणाऱ्या पडझडीचे कारण मात्र वेगळे असू शकते. अपघात पूर दुष्काळ वादळ भूकंप या सर्व घटनांकडे ज्या नजरेने पाहतो त्याच पद्धतीने शेअरमार्केट मधील या घटनेकडे पाहिले पाहिजे. प्रत्येकाच्याच दृष्टीने आभाळ फाटले असेल असे नाही फक्त काही गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे अशी घटना घडल्यानंतर मार्केट ट्रेंड बदलला आहे कां ? आपल्याला आपला पोर्टफोलीओ बदलला पाहिजे कां ? पैशाच्या गुंतवणुकीची विभागणी करताना काही बदल आवश्यक आहेत कां ? धोका कमीतकमी होण्यासाठी काय केले पाहिजे ? या गोष्टीचा विचार करून पुढचे पाउल टाकाल तर मार्केटच्या पडझडीमध्ये तुमची घाबरगुंडी उडणार नाही. उलट ठिगळ लावण्याचा विचार सोडून देऊन पडझडीमध्ये चांगले चांगले शेअर्स कमी भावाला खरेदी करून पोर्टफोलीओ भक्कम बनवू शकता.