Monthly Archives: October 2015

तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – July – Aug २०१५

आधीची प्रशोन्त्तरे वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुमचे प्रश्न - माझी उत्तरं

Image courtesy – wikipedia


 
नाव: SUNITA MAHAVIR CHOUGULE
तुमचा प्रश्न : To, Res Madam, I want to do intraday trading in share mkt,my target fo day 200/- only,can it is possible?
आपण केलेली शेअर्सची निवड आणी घेतलेला झटपट निर्णय आणी बातमी आणी तिचा निवडलेल्या शेअरवर होणारा परिणाम यांचा अभ्यास यावर इंट्राडे ट्रेडचे यश अवलंबून असते. आपणास सरासरी वरीलप्रमाणे फायदा होऊ शकतो. पण काही वेळेला तोटा झाल्यास आपण तो सोसण्याची तयारी ठेवावी.
नाव: Virendra
तुमचा प्रश्न : नमस्कार मँडम, मी डीमँट अकाउंट उघडले आहे मात्र कोणत्या कंपनीचे शेअर्स विकत घ्यावेत यासाठी त्या कंपनीची माहिती कूठुन व कोणती आणि कशी काढायची या विषयी मार्गदर्शन करावे,कंपनीचे शेअर्स आपण किती काळासाठी होल्ड करु शकतो ?
कंपनीच्या साईटवर जाऊन तसेच BSE आणी NSE साईटवर जाऊन आपण ही सर्व माहिती मिळवू शकता. दर तीन महिन्यांनी प्रत्येक कंपनी आपले तिमाही रिझल्ट्स जाहीर करते. त्याकडेही लक्ष द्यावे. आणी दूरदर्शनवरील वाहिन्याही कंपनीच्या बातम्या देत असतात तिकडे लक्ष ठेवावे.
नाव: shubham borade
तुमचा प्रश्न : namste madam mla shear market vishyi konthi mahiti nahi …..mla hyat utaraych ahe investmet karaychi ahe tr krupya mla purn mahiti dyavi plzzz ,mla help karavi market madhi utrnyasathi
वरील माहिती देण्यासाठीच मी ब्लोग लिहित असते. आपण ब्लोगवरील सर्व लेख, माझी वहिनीतील लेख, तसेच दर आठवड्याला लिहित असलेले आठवड्याचे समालोचन वाचावे म्हणजे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.
नाव: Akshay
तुमचा प्रश्न : Mam treading account open karnyasathi konta broker changala ahe full service broker ki discount broker, sharkhan, rksv, Geojit PNB paribha
ब्रोकर किंवा बँक फक्त शेअर्सची खरेदी विक्री करण्याकरता एक एजन्सी म्हणून काम करते. आपण प्रत्येक ब्रोकर देत असलेल्या सेवा आणी त्यासाठी आकारीत असलेले दर याचा अभ्यास करून निर्णय घ्यावा. मात्र ब्रोकर टिपा किंवा सल्ला देण्यासाठी जास्त दर आकारात असेल तर त्या टिप घ्याव्यात की नाही हे तुम्हीच ठरवायचे आहे. हे सर्व लक्षांत घेवून आपण आपल्या घराशेजारी किंवा ऑफिसजवळ असलेला ब्रोकर निवडावा. कारण त्याच्या सतत संपर्कांत असणे सोयीचे होते.
नाव: स्वप्नील विभूते
तुमचा प्रश्न : Madam मला शेअर मार्केट मध्ये थोड्या प्रमाणात गुंतवणूक करून थोड्या प्रमाणात लाभाची अपेक्षा आहे. पण मला विषयाचे काही माहिती नाही, बँकमध्ये Demat accout open करून जायचे आहे ब्रोकर नको. मी अभ्यास करून गुंतवणूक करेल ब्रोकर through नाही. आपण नमूद केल्यानुसार नुसत्या पुस्तकी अभ्यासाने होणार नाही, तरी पण मला प्राथमिक माहिती आणि बाकी कोणता अभ्यास व सराव करावा लागेल या बाबतीत मार्गदर्शन करावे व आपली हरकत नसेल तर आपला संपर्क क्रमाक मिळेल का ?
तुमचा प्रश्न : Madam आपला ब्लोग वाचून चांगले knowledge भेटले त्या बद्दल आपले आभार मानतो. तसा मी पण अभ्यास चालू केला आहे. blue chip company आणि A group company, top losers & Gainers यांचे निरीषण चालू करत आहे, पण आजूनही मला हे कळले नाही की Intra Day आणि Detrives काय आहे.
थोड्या प्रमाणांत गुंतवणूक करून थोड्या प्रमाणात फायदा कमवायचा असल्यास तुमचे भांडवल तुम्ही प्रथम मुदत ठेवीत ठेवा. अनुकूल संधीची वाट पाहा आणी तशी संधी मिळताच रिस्क आणी रिवार्ड याचा ताळमेळ घालून गुंतवणूक करा.इंट्राडे म्हणजे खरेदी आणी विक्री एकाच दिवशी मार्केटच्या वेळांत करणे. डिलिव्हरी म्हणजे शेअर्स खरेदी करून काही काळानंतर विकणे होय.
नाव: Akshay
तुमचा प्रश्न : Mam tumhi tumache blog PDF format madhye provide karana mhanje offline pn vachata yetil
तुमच्या सूचनेचा योग्य वेळा विचार करू.
नाव: santosh chavan
तुमचा प्रश्न : SHARE MARKET SEKHANA HAI TO APKA BLOG JARUR PADHE se me dostoko keheta hu. me apka bhut badh fan hu me apke sabi blog padhe hai. Namaste madam THANKS FOR EVERY THINK. MAZI 5 QUSITON AHET TUMALA barobar vatle tar ansir me
1.Bolt Operating Course karun job milato ka ? tasech payment kiti ashte
2.12 pass natar share market madhe konta course karta yeel.
3.sawtach broker house open karya sadhi konti avashakta hai.
4.intraday and delivery sathi stop loss resho kai asava
5.option madhe call buy order kashi detat ( agar NIFTY ltp 7600 par hai or Strike Price 7650 hai or Expiry Date 1 month ki hai or primary kitna bho agar me 7600 ltp or 7650 ke strike price par call buy kartu hu or expiry ke pahile agar nifty 7000 tak jata hai to kai ho ga profit ya loss ?
बोल्ट ऑपेरटरचा कोर्स करून जॉब मिळू शकतो. हा जॉब बँकेतल्या कॅशियरप्रमाणेच असतो. पगार प्रत्येक ब्रोकरप्रमाणे बदलतो. ही माहिती आपल्याला BSE आणी NSE च्या साईटवर निरनिराळ्या कोर्सेसची माहिती दिलेली आहे ती आपण वाचावी. स्वतःचे ब्रोकर हाउस उघडण्यासाठी आवश्यक असणार्या अटी आणी पात्रता आपल्याला BSE आणी NSE, च्या साईट्स वर मिळू शकतील. यासाठी आपण SEBI ची साईटही पहावी. इंट्राडे ट्रेडसाठी १% आणी डिलिव्हरीसाठी १०% पर्यंत STOP लॉस ठेवावा. मी डेरीव्हेटीव मध्ये ट्रेडिंग करीत नाही.
नाव: mahendra naik
तुमचा प्रश्न : madam, GURUJI i am from ratnagiri and want to do a seminar for the giants group of ratnagiri (womans group) is it possible for you to give your valuable time specially for the above woman group if no can you arrange any other person to give information about shares market,i will be highly obliged ..thanx waiting for the reply,, mahendra
आम्ही तुम्हाला यासंबंधी मेल पाठवली होती. तुमचा फोन नंबरही मागितला होता.महिलांना मार्गदर्शन करण्याची इच्छा जरूर आहे. पण त्यासाठी तुमच्याशी बोलणे जरुरीचे आहे. मगच निर्णय घेता येईल.
नाव: atul shinde
तुमचा प्रश्न : नमस्कार! मी अतुल शिंदे. मागील ६/७ वर्षापासून कमोडीटी ट्रेडिंग मध्ये काम करत आहे. माझे एका कंपनीत मी खाते उघडले आहे. माझे १ लाखाचे खाते आहे. ती कंपनी मला रक्कम परत मागितली असता , परत देण्यास टाळाटाळ करत आहे. तसेच स्वताच्या मर्जीने माझ्या खात्यामध्ये ट्रेडिंग करत आहे. कोणतीही मला पूर्व सुचना न देता. तसेच लॉट साईझ मोठ्या प्रमाणात मारत आहेत. तर लॉस झाल्यास त्याला जबाबदार कोण असेल ? माझे पैसे मी कसे परत मिलउ शकतो . तसेच ती कंपनी मला आता असे सांगत आहे कि मी तुला दर महा १० ते १६ % नफा मिळवून देईन . तर असे कंपनी करू शकते का? वरील सर्व गोष्टी स्वता कंपनी चे चेअरमन सांगत आहेत. तरी माझे मी खाते स्वता खेळण्या साठी मागितले तरी दिले जात नाही. तर मी काय करावे. तसेच माझ्या प्रमाणे त्या कंपनी मध्ये अंदाजे ३००० ते ४००० खाती आहेत. त्यांची पण हीच समस्या आहें. तरी आम्ही काय करावे?
आपण यासाठी सेबी GRIEVANCES CELL आणी इन्वेस्टर प्रोटेक्शन फोरमकडे या बाबतीत संपर्क साधावा.
नाव: Pravin
तुमचा प्रश्न : Namaste Madam, Sharemarket madhe guntavanuk karun 50,000 to 60,000 per month kamavu shakto ka? (Intra Day na karta) . Tyasathi kiti vel aani bhandaval avashyak aahe ? Kwachit Nuksan zalyas tyakade kase pahave? Aapan Dileli Mahiti farach changli aahe.Margadarshanabaddal Aabhari.
शेअरमार्केटमध्ये किती पैसे कमावता येतील याला मर्यादा नाही. त्याच प्रमाणे कोणते शेअर निवडता यावर घालावे लागणारे भांडवल अवलंबून आहे. नोकरी सारखा पैसा कमवायचा असेल तर व्यासंग हवा सातत्य हवे आणी झटपट निर्णय घेण्याची क्षमता हवी.काही शेअरमध्ये अव्वाच्यासव्वा अपेक्षेबाहेर अचानक फायदा होतो त्यामध्ये झालेले नुकसान भरून निघाले असे समजावे.
नाव: komal
तुमचा प्रश्न : IF I HAVE BOUGHT 100 SHARE OF XYZ COM @ 350 AND COMPANY DECLAER BONUS 1:2 THEN HOW ITS CALCULET
१;२ बोनस याचा अर्थ तुमच्याजवळ २ शेअर्स असतील तर तुम्हाला एक शेअर बोनस म्हणून मिळेल. आपल्याला ५० शेअर बोनस म्हणून मिळतील. बोनस मिळाल्यानंतर त्याच प्रमाणांत शेअर्सच्या मार्केट मधील किंमतीत किमतीत बदल होईल.
नाव: जयेश ढोले
तुमचा प्रश्न : १० ते १५ वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल तर कोणत्या प्रकारचे shares विकत घेतले पहिजेत.
या प्रकारच्या दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करायची असल्यास शेअरमार्केट पडत असताना आपण ब्लू चीप कंपन्यांचे शेअर्स विकत घ्यावेत. प्रत्येक औद्यीगिक सेक्टरमधील घडामोडींवर तसेच कंपनी जाहीर करत असलेल्या तिमाही रिझल्ट्सवर लक्ष ठेवून कंपनीच्या प्रगतीचा, आर्थिक परिस्थितीचा मागोवा घेणे आवश्यक आहे. जरुरी असल्यास आपल्या पोर्टफोलियोमध्ये दरवर्षांनी आवश्यक ते बदल करावेत. म्हणजे आपल्या पोर्टफोलियोची किंमत वाढत राहील.
नाव: जयेश ढोले
तुमचा प्रश्न : भाग ३७ FAT बद्दल सांगताना तुम्ही सांगितले की RIL चा १०४० भाव चालू असताना कुणीतरी ८४० shares विकायला काढले, त्यावेळी ते shares ८४० ला विकल्या गेले की १०२०, १०००, १०३८ वगैरे ला लोकांनी जश्या खरेदीच्या orders दिल्या असतील तेवढ्याला विकल्या गेले.
ज्या भावाला विक्रीची ऑर्डर चुकून टाकली गेली असेल तो भाव किंवा त्यापेक्षा जास्त भावाचे सगळे सौदे त्या भावाला लावलेल्या शेअर्सची संख्या पूर्ण होईपर्यंत. पूर्ण होतील.. जर Rs २०ला २०००० शेअर्स विकण्यासाठी चुकून ऑर्डर टाकली तर त्याच वेळी खरेदीच्या ऑर्डर्स संगणकावर match केल्या जातील. प्रथम RS २०.०० पासून क्रमशः वरच्या भावाच्या ऑर्डर २०००० शेअर्स विकले जाईपर्यंत पूर्ण केल्या जातील
नाव: sandip untwale
तुमचा प्रश्न : trading madhe avraging haging badal savestar sanga
शक्यतो अवरेजिंग करू नये असे मला वाटते. कारण असे म्हणतात की “DO NOT PUT GOOD MONEY AFTER BAD MONEY”
नाव: nilkanth chougule
तुमचा प्रश्न : Madam aapla blog khup fhayadyacha ani new comers na protsahit aahe. konthyahi company che balancesheet, thyache utpadan, tyanna laganara pakka or kaccha mal , share che bhaw wadanyache wa kami honyache karan WA itar mahiti kontya site war minel yachi mahiti mala Email or 9028585856 ya number war sms dyawi hi winti.
ही सर्व माहिती कंपनीच्या साईटवर किंवा त्यांच्या तिमाही निकालांत, वार्षिक रिझल्ट्स मध्ये मिळू शकेल
नाव: santosh chavan
तुमचा प्रश्न : 1.share market madhe delivery karava ki intraday
2. stop loss cha resho kai asava
3. share market madhe invesment var tax kithi asto
4.ipo ghetana konti dakshata gaivi
5.tumi sawta kiti paisa kamavala
शेअर्स खरेदी केल्यावर एक वर्शांनंतर विकल्यास झालेल्या फायद्यावर आयकर भरावा लागत नाही.
ब्लोग नंबर ४७ ४८ ४९ ५० ५१ ५२ हे ब्लोग IPOच्या संबंधांत आहेत ते तुम्ही वाचा
नाव: Ravi kunte
तुमचा प्रश्न : Welspun Corp Ltd….? Buy At 142.. Now Sold @….?
शेअर्स कितीला विकावा याचा निर्णय तुम्ही तुमच्या होल्डिंग capacity आणी अपेक्षित प्रॉफिट मार्जिन विचारांत घेवून घ्यावा.
नाव: sandip untwale
तुमचा प्रश्न : trading charts softwere badal sanga
टेक्निकल चार्ट बद्दलची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे ती वाचा.
नाव: Dnyaneshwar Rajput
तुमचा प्रश्न : hi madam.. madam doller chi value kashi vadate te sangana please प्रत्येक चलनाची किंमत त्यात्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असते.
नाव: Sheetal
तुमचा प्रश्न : Dear Madam ,Madam , तुमचे खूप खूप आभार. तुमच्या blog मुले आमचा आत्मविश्वास वाढला. तुमचा low brokerage साठीचा reply वाचला.
आम्हाला काही प्रश्न आहेत:
१. Split share लिस्ट refer करावी का ? मला असे विचारायचे आहे कि share split झ्याल्या नंतर किंमत कमी होते , तेव्हा ती खरेदीची योग्य वेळ असते का .
२. ONGC share च्या devident ची effective date ०७.०९.२०१५ आहे. तर आमच्या account ला devident कधी जमा होईल. ( फक्त ४ share आहेत.)
३. दिवाळी मध्ये मार्केट वरती जाते का ? म्हणजे कोणत्या सेक्टर वरती परिणाम होतो हे सांगता येईल का .
Thank you
शेअर्स स्प्लिट होणार म्हणून शेअर्सचा भाव वाढलेला आसतो त्यामुळे शेअर स्प्लिट झाल्यानंतर थोडे दिवस थांबावे रिस्क रिवार्ड रेशियो पहावा कारण स्प्लीत्मुळे नेहेमी शेअर्सची संख्या वाढल्यामुळे EPS कमी होतो.
दिवाळीमध्ये FMCG, ऑटो आणी TEXTILES सेक्टरमध्ये तेजी येण्याची शक्यता असते. .
नाव: hanumant
तुमचा प्रश्न : arthavyavashesathi have suraksha jale – arun jaitley
share bajar ani chalanat honare chadh utar adi mudde hatalanyasathi jagtik patalivar suraksha jale nirman karanyachi jordar magani bharatatarfe karanyat ali . chinchya yuwanche avmulyan karanyat yet asalyamule nirman zalelya paristhitichya parshvabhumivar bharatache arthamantri arun jaitley yanni varil magani keli.
yacha artha kay ? krupaya he sangave.
चलनांत होणाऱ्या बदलामुळे भांडवली बाजारावर परिणाम होते. चलनाच्या किमतीत होणारे बदल हे मागणी पुरवठा या तत्वावर झाले पाहिजेत. कारण चलनाच्या किमतीत होणारे बदल हे अर्थव्यवस्थेचे प्रतिबिंब असते. चीनने कृत्रिमरीत्या चलनाचे अवमूल्यन केले त्यानुळे चलनयुद्धच चालू झाले. परंतु प्रतिबंधात्मक व्यवस्था जागतिक पातळीवर केली नव्हती. त्यामुळे प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवर कळत-न -कळत ध्यानीमनी नसताना परिणाम झाले. भावी काळांत असे घडल्यास याला तोंड देण्यासाठी काही व्यवस्था असणे गरजेचे आहे एव्हढेच अर्थमंत्र्यांनी सुचवले.
नाव: Chaitali
तुमचा प्रश्न : madam मी तुमची खूप आभारी आहे . मी तुमचे सारे ब्लोग वाचले आहे त्याने मला खूप उपयोग झाला . तुमचा मार्केट चा आभ्यास खूप आहे. तो तुम्ही आमच्या सोबत share करता यासाठी द्यन्यवाद . madam मी Amteck auto चे share २ ते ३ महिन्यासाठी घेण्याचा विचार करत आहे. तुम्ही मला सांगू शकता का कि तो share मला profilt मिळवून देईल का?
द्यन्यवाद
प्रॉफिट मिळणे किंवा न मिळणे हे तुमच्या खरेदीची वेळ आणी भाव यावर अवलंबून आहे. परंतु जाणूनबुजून धोका पत्करू नये.
नाव: Sachin Sutar
तुमचा प्रश्न : Hi, I am having shares of bank of maharashtra 100 quantity. We had bought the share @ 22. However, currently i don’t have share certificate with me.
But all the details of share certificate such as customer number, account number, demat account number we have. Could you suggest me the solution for the same.Regards,
Sachin sutar
तुम्ही तुच्या ब्रोकरकडे जा ब्रोकर तुम्हाला फार्म देईल त्यावर माहिती भरून DUPLICATE SHअरे CERTIFICATE मागवा आणी ते मिळाल्यानंतर शेअर्स DEMAT करून घ्या.
नाव: amul
तुमचा प्रश्न : i have purchased 100 reliance petrolium ltd triple option convertible debentures in 1993. If you know the history of this tocd please explain me the details.
आपण यासाठी कंपनीकडे या बाबती संपर्क साधावा. कंपनी याबाबतीत आपल्याला मदत करेल.
नाव: Sagar Dugam
तुमचा प्रश्न : Hello Madam, Tumache blog khup chan aahet pan ashi shanka aahe ki tumi je blog madhe news description takata te tumi CNBC kinva zee business varun milate ka?? Ka dusara konta source aahe karan me jeva blog vachato teva asa vatata ky ky zalay hya week madhe mala tyatalya tharavik babich mahit asatat..tumi dusara kahi source vaparat asal tr sanga.
मी जेथून जेथून शेअरमार्केट विषयी माहिती मिळते ती घेते. माझ्या अनुभवानुसार त्याचे विश्लेषण करते. वर्तमानपत्रे कंपन्यांची press कॉन्फरन्स मुलाखती, इंटरनेट अशा विविध ठिकाणांवरून माहिती मिळवते. .
नाव: vijay mhaske
तुमचा प्रश्न : mi punj lloyd che 40000 share buy kele ahet 30/- la loss zala ahe…..kay karave
तुमच्या होल्डिंग capacityप्रमाणे निर्णय घ्या. काही कॉर्पोरेट एक्शन झाल्यास शेअर्सच्या भावांत अचानक बदल होऊ शकतो त्यामुळे शक्य असल्यास धीर धरा.
नाव: Kalpna jadhav
तुमचा प्रश्न : मी एक महाविद्यालयीन Student आहे माझे Demat A/c आहे मी 5000 shares Hold करून ठेवले आहेत मी असे एकले होते कि Shares Sell करण्य्पेषा Hold करावेत तर मला Hold / Holding म्हणजे काय ते सांगावे . मी आत्ता पर्यंत तुमचे 40 ब्लोग वाचलेले आहेत .वाचून खूप समाधान वाटले.
शेअर्सचा भाव वाढत असेल तरच शेअर्स न विकता थांबणे व अधिक भाव मिळण्याची वाट पाहणे म्हणजे होल्ड करणे होय. तसेच कारणाशिवाय भाव वाढत असताना शेअर्स न विक्णेही काही वेळेला शहाणपणाचे नसते.
नाव: pallavi sudhakar sarang
Email: pallavicredit@gmail.com
तुमचा प्रश्न : HOW TO INVEST IN SHARE MARKET – PLZ ANS GIVE IN MARATHI.
माझा ब्लोग मराठीतच आहे तसेच माझी वहिनीतले लेख आणी आठवड्याची समालोचने मराठीतच आहेत. ती आपण वाचा
नाव: Kishor Kadam
तुमचा प्रश्न : Hello madam maza que asa aahe ki companiche detail kuthe milatat means trading a/c, profit &loss A/c, balancesheet kute check kartat…mahnje companicha fundamental analysis kutun krayacha??..
वरील माहिती कंपनीच्या वार्षिक अहवालांत, तसेच चेअरमनचे भाषण तसेच तिमाही रिझल्ट्स मध्ये मिळू शकतात.. तसेच वरील माहिती आपल्याला इंटरनेट तसेच BSE आणी NSE च्या साईटवर मिळेल. .
नाव: Ranjeet
तुमचा प्रश्न : mam.mla.FNO investment baddal mahiti havi ti kshi karvi pls ek profit/loss che e.g deun sangal ka?
मी FNO मध्ये ट्रेडिंग करीत नाही.
नाव: siddharam Halkude
तुमचा प्रश्न : शॉर्ट करने म्हणजे काय? त्याचे काय काय नियम आहेत
आपल्याजवळ शेअर्स नसताना विकणे म्हणजेच short करणे. थोडक्यांत सांगायचे झाल्यास ‘ हलवायाचे घरावर तुलसीपत्र” स्पोट मार्केटमध्ये short केले असेल तर त्याचदिवशी शेअर्स विकत घेवून तो ट्रेड पूर्ण केला पाहिजे.
नाव: RAJENDRA M. NAIK
तुमचा प्रश्न : mi tumche blog hallich vachale tesuddha market vishaee shodhatana sapadle kharokhar aaple manapasun abhinandan ani atyant subak mahitibaddal dhanyavad.2007 pasun mi marketmadhye ahe parantu jujabi dnyanamule far kahi pragati karu shaklo nahi aaple blog vachun thoda hurup ala . intraday ajun kevhach kele nahi tari tyabaddal ajun jast mahiti mala kashi milel he pls sanga dhanyavad.
आपण माझे इंट्राडेवर लिहिलेले ३२ ३३ ३४ ३५ ३६ हे ब्लोग वाचा.
नाव: GIRISH NIVRUTTINATH WANARE.
तुमचा प्रश्न : I want to become a broker! what is basic qualification as well as other extra certification or licencing process required for it ? Please Guide Me ! I am waitting for you reply !
यासाठी आपण BSE (BOMBAY STOCK EXCHANGE) आणी NSE (NATIONAL STOCK EXCHANGE) तसेच SEBI (SECURITIES EXCHANGE BOARD OFINDIA) च्या साईटवर जाऊन माहिती घ्यावी.
नाव: KISHOR R. TARALEKAR
तुमचा प्रश्न : Majhe june karj prakarn divali madhe purn hot ahe. Mala share market madhe guntavnuk karaychi ahe
आपण माझे ब्लोग वाचा माहिती मिळवा DEMAT आणी ट्रेडिंग अकौंट उघडा आणी मगच ब्लू चीप कंपन्यांमध्ये पैसे गुंतवा.
नाव: Sanjay Waghmode
तुमचा प्रश्न : how to trade in future , option
F & O हा माझा प्रांत नाही.
नाव: Dhanesh Patil
तुमचा प्रश्न : I want information about forex trading.
FOREX ट्रेडिंग हा स्पेशलाईझ विषय आहे आपल्याला त्यासाठी ट्रेनिंग घ्यावे लागेल.
नाव: Mandar
तुमचा प्रश्न : मी अजून dmat account सुद्धा उघडलेले नाही . उघडायचा विचार करतो तेव्हा भीती वाटते . मला थोडया प्रमाणात share trading करायचं आहे . तेव्हा pl सुचवा कस? कुठ? . व आत्ताच्या मार्केट वरून करता येईन का ?
शेअरमार्केटमध्ये कोणतीही गुंतवणूक करण्याच्या आधी कंपन्यांची माहिती मिळवा कोणता शेअर स्वस्त कोणता शेअर महाग हे समजावून घ्या आणी मगच शेअरमार्केटमध्ये प्रवेश करा. कोणत्याही मार्केटमध्ये खरेदीविक्रीची वेळच महत्वाची ठरते.

आठवड्याचे समालोचन – १९ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर – निकालांचे प्रतिबिंब शेअरमार्केटच्या आरश्यांत

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा 
results
ऑक्टोबर महिना सुरु झाला तसे कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल येण्यास सुरुवात झाली. आपले शाळा कॉलेजचे रिझल्ट्स असतात तसाच हा प्रकार. शाळा कॉलेजच्या बाबतीतसुद्धा तिमाही, सहामाही नऊमाही आणी वार्षिक अशा परीक्षा होतात आणी त्यांचे निकाल जाहीर होतात. छोट्या छोट्या निकालांकडे त्या मुलांचे, पालकांचे लक्ष असते. परंतु इतर लोक एवढे लक्ष देत नाहीत.वार्षिक परीक्षांचे निकाल महत्वाचे कारण पुढील वर्षी ते मुल पुढच्या इयत्तेत जायचे असते. १० वी व १२ वी च्या परीक्षांच्या निकालांकडे मात्र सर्वांचेच लक्ष असते. या निकालामुळे आयुष्याची दिशा ठरते. असा लोकांचा समज आहे. खरंच असं असतं कां? परावलंबी जिणे आणी पुस्तकी विद्या व्यर्थ आहे. असेच अनेक वेळेला जाणवते.
कंपन्यांना कायद्याप्रमाणे प्रत्येक ३ महिन्यांनी कंपनीची प्रगती किंवा अधोगती जाहीर करावी लागते. काही कंपन्या तिमाही निकालांबरोबर अंतरिम लाभांश जाहीर करतात. त्याचबरोबर काही कंपन्यांना काही तिमाही लाभदायी असतात. स्कूटर, कार,फ्रीज अशा कंपन्यांची विक्री सणावारांच्या सिझनमध्ये वाढते. परंतु आता तुम्ही लक्षांत घेतले पाहिजे की यावर्षी अधिक महिना होता. त्यामुळे सणवार बरोबर एक महिना पुढे गेले त्यामुळे सगळेच टाईम टेबल बदलले. हाच फरक असतो पुस्तकी ज्ञानात आणी प्रत्यक्ष व्यवहारांत! हा अधिक महिना विचारांत घेतला नाही तर सर्वच आकडेमोड चुकेल. सर्वच FMCG (FAST MOVING CONSUMER GOODS) कंपन्यांच्या विक्रीवर असा परिणाम होत माही. ज्या कंपन्या रोज वापरांत येणाऱ्या वस्तू विकतात किंवा त्यांचे उत्पादन करतात अशा कंपन्यांच्या विक्रीवर फारसा परिणाम होत नाही.
यावर्षी सर्वच देशांची अर्थव्यवस्था या ना त्या कारणांनी ढवळून निघाली आहे. उलथापालथ सर्वत्र झालेली दिसते त्यामुळे शेअरमार्केट त्याला अपवाद असू शकत नाही. कमोडीटी मार्केट पडत आहे. त्याचेही प्रतिबिंब निकालाच्या आरश्यांत दिसत असते.
काही काही वेळा आपल्याला असे वाटते की अमुक एक गोष्ट महाग झाली किंवा स्वस्त झाली म्हणून अमुक कंपनीवर त्याचा अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होईल. पण असे घडत नाही. कारण कंपन्या ३ वर्षांसाठी, ५ वर्षांसाठी कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी करार करतात. कारण कच्च्या मालाचा नियमित पुरवठा होणे गरजेचे असते. त्यामुळे त्यांना मोजावी लागणारी किमत व बाजारभाव यांत फरक असतो. अगदी सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास कांदा महागला आहे म्हणून घराचे बजेट कोलमडेल असे नाही. जर कांद्याची किंमत वाढत आहे असे पाहताच तुम्ही ३-४ महिने पुरेल एवढे कांदे खरेदी केले तर बजेटवर परिणाम दिसणार नाही.
हवामानाचाही या सगळ्यावर परिणाम असतो. यावर्षी दुष्काळ आहे. अलनिनो नामक वादळ येईल अशी भीती आहे. थायलंडमध्ये तांदुळाचे उत्पादन कमी आहे. जगातील पातळीवर बासमती तांदळाला मागणी आहे. त्यामुळे तांदळाची निर्यात वाढेल आणी अधिक फायदेशीर होईल असा अंदाज असल्यामुळे KRBL, LT FOODS या कंपन्यांचे भाव वाढत आहेत.
याबरोबरच सरकारी निर्णयांचे परिणामही होत असतात. बोनसच्या कमाल मर्यादेत वाढ, 7TH पे कमिशनचा येऊ घातलेला रिपोर्ट यामुळे नोकरी करणाऱ्या लोकांच्या हातात जास्त पैसा आल्यामुळे मागणी वाढण्याची शक्यता आहे.तसेच काही वेळा सरकार त्यांच्या काही करातून काही उद्योगांना सूट देते, उदा: विंडएनर्जी उद्योगाच्या काही उत्पादनांवर एक्साइज ड्युटी माफ केली गेली. काही वेळेला सरकार स्थानिक उद्योगांना सरंक्षण देण्यासाठी आयातीवर कर बसवते किंवा निर्यातीवर सबसिडी देते. उदा: सरकारने घोषणा केली की अल्युमिनियम प्रोडक्ट्स आणी अल्युमिनीयम SCRAP यावर २२-२५ % आयात ड्युटी लावण्याच्या विचारांत आहे. सरकार कोणत्या उद्योगांत परदेशी गुंतवणूकिला मंजुरी देईल यावरही त्या उद्योगांत असणार्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव अवलंबून असतात. जंग जवळ आल्यामुळे आंतरराष्टीय क्षेत्रांत घडणार्या घटनांचाही परिणाम शेअर्सच्या किमतीवर होतो. उदा: आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये साखरेची वाढणारी किंमत आणी क्रूडची सतत घटत जाणारी किंमत. या सगळ्याचा परिणाम शेअरच्या किमतीवर तात्पुरता दिसतो. काही वेळेला मात्र खर्या अर्थाने कंपनीची परिस्थिती सुधारल्यामुळे हा परिणाम कंपनीच्या निकालांमध्ये दिसून येतो.
नेहेमी ITचे रिझल्ट्स चांगले येत यावर्षी ते तितकेसे चांगले आले नाहीत. IT कंपन्यांनी दिलेल्या निराशाजनक गायडंसमुळे त्यांचे दुसऱ्या अर्धवर्षातील रिझल्ट्स फारसे चांगले येणार नाहीत असा अंदाज आहे. त्यातही इन्फोसिस, MINDTREE. EMPHASIS BFL या कंपन्यांचे रिझल्ट्स चांगले आले. या वर्षी छोट्या आणी मध्यम IT कंपन्यांचे results त्यामानाने बरे आले.  MASTEK या कंपनीचा रिझल्ट खराब आला. म्हणजेच पूर्वीच्या बुल रनचे नेतृत्व IT कंपन्यांकडे होते तशी स्थिती आता दिसत नाही. या सर्वाला कारण USA ची कमकुवत अर्थव्यवस्था आहे. HCLTECH या IT क्षेत्रातील कंपनीने प्रॉफीट वार्निंग दिली होती. त्यामुळे या कंपनीचा रिझल्ट MUTED आला. याचे फारसे आश्चर्य गुंतवणूकदारांना वाटले नाही. फायदा –Rs१७२६ कोटी, EBITD Rs २०७६ कोटी. सर्वांना मार्जिन कमी होईल असे वाटले होते पण मार्जिन तेव्हढ्या प्रमाणांत कमी झाले नाही. मार्जिन २०.५६% ते ATTRITION रेट १६.३ % होता.विप्रोचा रिझल्ट चांगला आला पण विप्रोने गायडंस निराशाजनक दिला. याउलट रिलायंस इंडस्ट्रीजचा निकाल चांगला येत नाही पण या वेळेला चांगला आला आहे.हळू हळू रिलायंसची पूर्वीची शान परत येईल कां याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. HDFC बँकेने मात्र आपली चांगले रिझल्ट्स देण्याची परंपरा ठेवली आहे. त्यामुळे HDFC बँक आणी HDFC हे शेअर्स पोर्टफोलिओला स्थैर्य देतात. वाढणाऱ्या NPAच्या प्रमाणामुळे बँकांचे रिझल्ट्स खराब येणार हे सर्वांनी गृहीतच धरले आहे. त्याप्रमाणे फेडरल बँकेचा शेअर बँकेच्या NPA मध्ये वाढ झाल्यामुळे ७.५% पडला. ऑटो सेक्टरच्या बाबतीतही निकालांचा ट्रेंड बदलला. यावेळी हिरो मोटो व बजाज ऑटो यांचे रिझल्ट्स बरेच दिवसांनी चांगले लागले. बऱ्याच दिवसांनी इंडिअन रुपी US $ च्या तुलनेत सुधारला.ECB (EUROPEAN CENTRAL बँक) ने आपल्या रेट्स मध्ये काहीच फरक केला नाही.
इंडिगो या प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमान कंपनीचा IPO २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान येईल. प्राईस band Rs ७०० ते Rs ७६५ असा असेल. कॅफे कॉफी डे चा IPO १.८९ पट सबस्क्राईब झाला. शेअरची इशू प्राईस Rs ३२८ ठरवली
सरकारने विंड एनर्जी उद्योगाशी संबधीत काही उत्पादनांवरील उदा: TOWER रोटर ब्लेडस एक्साईज ड्युटी काढून टाकली.. सरकारच्या या निर्णयाचा फायदा INOX विंड, UJAAS एनर्जी, ALSTOM T & D या कंपन्यांना होईल.
क्रूडच्या किंमती सतत कमी होत असल्यामुळे आणी क्रूड हा त्यांचा पक्का माल असल्यामुळे CAIRN(इंडिया) या कंपनीचा दुसऱ्या तिमाहीचा रिझल्ट खराब आला. हिंदुस्थान झिंक या कंपनीचा रिझल्ट चांगला आला आणी त्यांनी प्रती शेअर Rs. ३.९० अंतरिम लाभांश (स्पेशल अंतरिम लाभांश मिळून) जाहीर केला.
नेस्लेच्या बाबतीत एक उत्साहवर्धक बातमी आली. तीन प्रतिष्ठीत labमध्ये केलेल्या चाचण्यांमध्ये आक्षेपार्ह घटक कमी किंवा योग्य त्या प्रमाणांत आढळून आले. पर्यायाने गुजरात राज्यसरकारने ‘maggi’ वरील बंदी उठवली. त्यामुळे आता नेस्ले पुन्हा maggi लौंच करण्याची जोरदार तयारी करीत आहे.
बजरंगी भाईजान, बाहुबली त्या सारखे चित्रपट हिट झाल्यामुळे PVR EROS INOX या मेडिया क्षेत्रातील कंपन्यांचा रिझल्ट चांगला येईल असा अंदाज आहे. पोलंडची कंपनी सेलोन बरोबर करार केला. त्यामुळे ग्लेनमार्क फार्मा या कंपनीला १५ युरोपीयन देशांत मार्केटिंगचे हक्क मिळाले.
M & M ही दिग्गज कंपनी डाळींच्या उद्योगांत उतरत आहे. त्यांनी मुंबईत या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली.. जिंदाल पोली आणी जिंदाल फोटो या कंपन्यांच्या विलीनीकरणाला हायकोर्टाने मान्यता दिली. रिलायंस कॅपिटल ही कंपनी गोल्डमन SACHS या कंपनीचा भारतातील AMC बिझीनेस Rs २४३ कोटींना खरेदी करणार आहे. ATC या आंतरराष्ट्रीय कंपनीने VIOM नेटवर्क्स या कंपनीतील ५१ % हिस्सा खरीदण्यासाठी करार केला. SREI इन्फ्रा, टाटा हे आपला स्टेक विकणार आहेत STRIDES ARCOLAB ही कंपनी JONHSON and JOHNSON चे सात ब्रांड खरेदी करीत आहे.
मारुती ही सुझुकी या जपानी कंपनीला रॉयलटीचे पेमेंट करते. सुझुकी ही जपानी कंपनी रिसर्च आणी डेव्हलपमेंटवर खर्च करते. रिसर्च आणी डेव्हलपमेंटवरील खर्च आणी पेड केली जाणारी रॉयलटी यांचा काहीतरी संबंध असणे जरुरीचे आहे, सरकारने या बाबतीत कायदा करावा असे तज्ञाचे मंत आहे.आणी गुंतवणूकदारांनी या वर विचार करून मतदान करावे. मारुती स्वतः रिसर्च आणी डेव्हलपमेंटसाठी रोहतक येथे कारखाना चालू करीत आहे.
कंपन्यांचे निकाल गुंतवणूकदारांना ज्या पद्धतीने समजले त्या पद्धतीने लोकांनी काही शेअर्सला धडा शिकवला तर काही शेअर्सची पाठ थोपटून शाबासकी दिली. काही शेअर्सच्या बाबतीत मात्र काही दिवस वाट पाहण्याचे धोरण स्वीकारले. आता अजूनही काही कंपन्यांचे निकाल येणे शिल्लक आहे, त्यामुले आपला आरसा साफ करून निकालाचे प्रतिबिंब पाहून पुढील निर्णय घेण्यासाठी सज्ज होऊ या.
 

आठवड्याचे समालोचन – १२ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर २०१५ – करू या जागर, जागर निकालांचा

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा 
results
सोमवारी टी व्ही लावला. वर्तमानपत्र उघडले तर दोन्हीकडे BOB (बँक ऑफ बरोडा) तील घोटाळ्याची चर्चा होती.Rs ६९३२ कोटीचा घोटाळा झाला होता. ५९ चालू CURRENT खाती उघडली. आयात करण्यासाठी पैसा पाठवला. पण प्रत्यक्षांत डाळ, काजू तांदूळ आयात झाले नाहीत. तपास होईल. अनेक धागेदोरे मिळतील. हा घोटाळा काळ्या पैश्याच्या संदर्भातील आहे असे बोलले जाते परंतु शहानिशा झाल्यानंतर काय काय बाहेर पडेल कोणास ठाऊक !
आपल्यासाठी या बातमीमध्ये काय महत्वाचे ते पहायचे. जसा अर्जुनाला फक्त माशाचा डोळाच दिसत होता. तसेच आपणही one-track mind ठेवून विचार करायचा निदान आपल्या मनांत शेअरमार्केटचा विचार आहे तोपर्यंत तरी किंवा तुम्ही शेअरमार्केटमध्ये व्यवहार करीत आहांत तोपर्यंत तरी.
पहिला विचार आपल्याकडे BOBचे शेअर्स असल्यास विकून दोनतीन दिवसांनी स्वस्त झाल्यावर पुन्हा पोर्टफोलिओत ADD करावेत कां? विकत घेण्याचा विचार असेल तर या शेअर्सचा भाव किती पडेल? आपण कोणत्या भावाला विकत घ्यावा?
या घटनेचा परिणाम आणखी कोणकोणत्या शेअर्सच्या किंमतीवर होईल. रिझर्व बँकेने आधीच सावधानीची सुचना दिली होती तसेच इंटर्नल ऑडीटमध्ये या गोष्टीची कल्पना दिली होती पण पुरेसे लक्ष दिले नाही असे ऐकू येते.
या सर्व भानगडीत खोलांत जाण्यापेक्षा आपण सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून एकाच कंपनीत किंवा एकाच बँकेच्या शेअर्समध्ये प्रमाणाबाहेर जास्त गुंतवणूक करू नये. प्रत्येक बातमीचा शेअरमार्केटच्या दृष्टीकोनातून विचार करावा.
रेल्वेच्या ६०००० डब्यांत डस्टबीन बसविण्याची योजना आहे. याचा फायदा सुप्रीम इंडस्ट्रीज आणी नीलकमल प्लास्टिक या कंपन्यांना होईल. रिझर्व बँकेने सरकारी आणी राज्यसरकारी bondsमध्ये FII ची लिमिट वाढवली. त्यामुळे भारतांत पैशाचा ओघ वाढेल आणी इंडिअन रुपी मजबूत होईल. बिहारमध्ये विधानसभेसाठी मतदान सुरु झाले. ४९ जागांवर मतदान झाले, तरुण लोक उत्साहाने मतदानाला हजर दिसले.ज्यांना विकास हवा आहे. महिलांची संख्याही जास्त दिसली. महिलांसाठी नितीशकुमारनी बऱ्याच योजना आणल्या यावरून मतदानाचा ट्रेंड बदलण्याची शक्यता दिसते.
या आठवड्यांत ऑगस्ट महिन्यासाठी IIP चे आकडे चांगले आले. IIP मध्ये वाढ ४.२% वरून ६.४% झाली. महागाईच्या निर्देशांकापैकी CPI -३.६६ वरून -४.४१ आहे. WPI -४.९५ वरून -४.५५ झाला. ट्रेड डेटाही आला. सातत्याने निर्यात कमी होत आहे हा काळजीचा विषय आहे. ONGCला तेलभांडार मिळाले. सरकार नैसर्गिक GASच्या किमतीवरील सरकारी नियंत्रण काढून टाकण्याच्या विचारांत आहे. त्यामुळे या आठवड्यांत ONGC आणी RIL हे दोन्ही शेअर्स तेजीत होते.
स्पेक्ट्रम ट्रेडिंग नॉर्म्स जाहीर केले. स्पेक्ट्रम लीझिंगला परवानगी दिली नाही. याचा व्हिडीओकोंनला फायदा होईल. त्यांना इंडियातून एक्सिट व्हायचे आहे. २१०० MHZ, २३००MHZ २५०० MHZ यांत ट्रेडिंगसाठी परवानगी दिली.
कॅफे कॉफी डे चा IPO बुधवारी सुरु झाला. हा IPO महाग किंमतीला आणला आहे असा बोलबाला झाला. त्यामुळे या IPO ला थंडा प्रतिसाद मिळाला.
‘इंडिगो’ चा IPO दसऱ्यानंतर येणार आहे. त्यामुळे आपोआपच विमानकंपन्यांच्या शेअर्सकडे सगळ्यांचे लक्ष आहे. त्याचबरोबर ‘हायलोड FACTOR’ चा उल्लेख प्रेत्येक विमानकंपनी करत आहे. PASSENGER वाहतुकीमध्ये वाढ होत आहे. गेले वर्षभर क्रूडचे भाव ढासळत आहेत. त्यामुळे विमानासाठी लागणारे इंधनही स्वस्त झाले आहे. त्यामुळे विमानकंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी होती.
अमेझॉन, SNAPDEAL,FLIPKART,या कंपन्यांनी दणक्यांत सेल सुरु केला आहे. या सेलला प्रतिसाद फार सुंदर आहे. त्यामुळे याचा फायदा ई-कॉमर्स कंपन्या PACKAGING कंपन्या, व लॉजीस्टिक कंपन्यांना होईल.
अडानी ग्रुपचा ऑस्ट्रेलियातील खाण आणी रेल्वेचा मोठा प्रकल्पाला ऑस्ट्रेलीयान सरकारने मंजुरी दिली. हा प्रकल्प पर्यावरणाशी संबंधित मंजुरीसाठी अडला होता. तसेच भारतीय रेल्वेने अदानी पॉवर या कंपनीकडून Rs३.६९ पर युनिट या दराने वीज विकत घेण्यासाठी करार केला. त्यामुळे अदानी एन्टरप्राईझेस आणी अदानी पॉवरचे शेअर्स वाढले.
आता निकालाचा जागर करू या. IT(इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी) क्षेत्रातील कंपन्यांचे रिझल्ट्स आले.. इन्फोसिस, टीसीएस, मास्टेक, माइंडट्री, या कंपन्यांचे रिझल्ट्स लागले.रिझल्ट्स फारसे चांगले लागणार नाहीत याची कल्पना होतीच. USAची अर्थव्यवस्था सुधारत नाही याचा परिणाम या कंपन्यांच्या कामगिरीवर झाला. त्याचबरोबर या कंपन्यांना तंत्रज्ञान अद्ययावत करण्यासाठी बरीच भांडवली गुंतवणूक करावी लागेल. इन्फोसिस आणी टीसीएस या दोन्ही कंपन्यांचा ATTRITION रेट वाढला.इन्फोसिसने Rs १० प्रती शेअर तर टीसीएस ने Rs ५.५० प्रती शेअर अंतरिम लाभांश दिला.
किरकोळ गुंतवणूकदारांना सर्वात मोठा धक्का DCB(डेव्हलपमेंट कोआपरेटीव बँक) च्या शेअरने दिला. ४०% शेअर पडला. निकाल चांगला आला तरीही शेअर कां पडला ? हे कोडे साऱ्यांना उलगडले नाही. शेअरचा भाव Rs १३८ ते Rs १४० होता. आम्ही १५० नवीन शाखा उघडणार आहोत असे सांगून बँकेने आपली विस्तार योजना जाहीर केली. या विस्तारयोजनेचे परिणाम २०१८मध्ये दिसतील. तोपर्यंत भांडवली गुंतवणूक वाढल्यामुळे ROI कमी होईल.पेमेंट बँकांमुळे स्पर्धाही वाढेल आणी प्रॉफिटमार्जिन कमी होईल. मग एवढे दिवस पैसे अडकवून ठेवून काय करायचे असा विचार झाल्याने शेअर्स विक्री सुरु झाली.असे मला वाटले. शुक्रवारी शेअरचा भाव Rs 92 झाला. झी एन्टरटेनमेंट आणी एलआयसी हौसिंग फायनान्स या कंपन्यांचा रिझल्ट चांगला आला.
रिलायंस चा रिझल्ट खूपच सुंदर लागला.

  1. standalone नेट प्रॉफिट Rs ६५६१ कोटी
  2. GRM (GROSS REFINING MARGIN) US $ ८.४ वरून US $ १०.६० झाले
  3. EBITDA MARGIN १६% वरून १८ % पर्यंत वाढले

गेल्या १४ तिमाहीनंतर एवढा चांगला रिझल्ट आला. त्याची कारणे पुढील प्रमाणे दिली गेली.

  1. BETTER PRODUCT Mix
  2. कमीत कमी ENERGY COST
  3. strong volume growth
  4. HIGH UTILIZATION of ASSETS
  5. FAVORABLE OIL मार्केट

ही झालेली growth टिकाऊ आहे हे समजण्यासाठी पुढील दोन तिमाहीचे रिझल्ट्स चांगले यायला हवेत.
यावेळी असे आढळते आहे की मार्केट समजूतदार आणी शहाणे झाले आहे. प्रत्येक गोष्टीचा साकल्याने विचार करीत आहे. पूर्वी असे होत असे की एका कंपनीचा रिझल्ट खराब आला की त्या सेक्टरमधल्या सगळ्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कमी व्हायला सुरुवात होई. यावेळी असे आढळत नाही. ज्याची शिक्षा त्यालाच द्यावी व ज्याचे बक्षीसही त्यालाच मिळाले पाहिजे असे बाजाराने ठरवलेले आढळते. सब घोडे बारा टक्के असे घडत नाही. त्यामुळे एलआयसी व झी एन्टरटेनमेंट यांचे भाव वाढले आणी टीसीएस व इन्फोसिसला मार्केटने शिक्षा केली..
अशाच प्रकारे मार्केट सुधारले तशीच आपणही आपली प्रगती साध्य करून चांगली कंपनी आणी वाईट कंपनी यातील फरक समजावून घ्यायला हवा. आता आपली भेट पुढील आठवड्यांत.
 

आठवड्याचे समालोचन – वन टू का फोर – ५ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर २०१५

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा 
बरेच दिवसांनी हा आठवडा ५ दिवसांचा (ट्रेडिंगसाठी बरं ) होता. १३ ते १८ सप्टेंबरमध्ये गणेशचतुर्थीची सुट्टी, २१ ते २५ सप्टेंबरमध्ये बकरी ईदची सुट्टी, आणी २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरमध्ये महात्मा गांधी जयंतीची सुट्टी होती. संपल एकदा सुट्टीचं आख्यान. मला वाटतं ट्रेडिंग करणाऱ्याला बरे वाटले असेल. आता पैसे कमवण्यासाठी एक दिवस जास्त!
सोमवारी मार्केटने मस्त सलामी दिली. सेन्सेक्स ५७५ पाईंट वाढले. निफ्टीने ८१२०चा पल्ला गाठला. बेअर मार्केटमुळे आलेली मरगळ बरीचशी नाहीशी झाली. USA मधील नॉनफार्म डेटा प्रसिद्ध झाला तो तितकासा समाधानकारक नसल्यामुळे FED व्याजाचे दर २०१५ साली वाढवील ही भीती कमी झाली. त्यामुळे कमोडीटी मार्केट तेजीत आले. धातूक्षेत्रावर MORGAN STANLEY या कंपनीने आपला रिपोर्ट दिला. सर्व धातूंच्या क्षेत्रांत काम करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वाढले उदा. वेदांत, हिंडाल्को, टाटा स्टील उत्तम गाल्व्हा स्टील, कल्याणी स्टील, हिंदुस्थान झिंक इत्यादी इत्यादी..
PFC (POWER FINANCE CORPORATION) या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीने TAX-FREE BONDSचा इशू आणला. हे bonds 10 वर्षे( ७.३६%) 15 वर्षे (७.३६%) आणी २० वर्षे ( ७.६०%) मुदतीसाठी ( कंसांत व्याजाचा दर) होते. जे लोक आयकराच्या २०% आणी ३०% या गटांत असतील त्यांना हे bonds करमुक्त असल्यामुळे फायदा होईल. RBIच्या पॉलिसीनुसार व्याजदर दिवसेंदिवस कमी होणार अशी अपेक्षा असल्यामुळे यापुढे येणार्या करमुक्त bonds वरील व्याजाचा दर कमी असेल. या सर्व गोष्टीमुळे हा इशू पहिल्याच दिवशी पूर्णपणे भरल्यामुळे बंद झाला.
चहाचे उत्पादन ६% ने कमी झाले. त्यामुळे चहाच्या किमतीत किलोमागे Rs. १० ते १५ वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नेहेमीचा असा अनुभव आहे की या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये येणारी तेजी फारशी टिकाऊ नसते.
गेल्या भागांत (२८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर) सांगितल्याप्रमाणे जगामध्ये साखरेचे भाव वाढले. साखरेचा असणारा साठा आणी मागणी यामध्ये तफावत निर्माण झाली त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेच्या किंमतीत वाढ झाली. भारतांत मात्र साखरेचा भरपूर साठा शिल्लक आहे असे साखर कारखानदारांनी सांगितले.परंतु सरकारने दुष्काळाची जाणीव झाल्याने उसाची लागवड केल्यास पाणीपुरवठा केला जाणार नाही असा फतवा काढला. आणी त्याचबरोबर सणासुदीच्या दिवसांत साखरेची मागणी वाढणार हे निश्चित! सरकारने साखर कारखान्दाराना साखर निर्यात करायला परवानगी दिली. या निर्यातीवर काही सबसिडी दिली जाईल.त्यामुळे साखर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वाढल्या.
सरकारने एथनाल बनवण्यासाठी जे MOLASSES वापरतात त्याच्यावर CENVAT क्रेडीट देण्याची घोषणा केली.  सरकारने तूप आणी लोणी (घी मक्खन) वरील आयात ड्युटी ३०% वरून ४०% पर्यंत वाढवली सहा महिन्यांसाठी वाढवली. याचा फायदा नेस्ले, प्रभात डेरी, क्वालिटी लिमिटेड इत्यादी कंपन्यांना होणार असल्यामुळे या कंपन्यांच्या शेअर्सची किंमत वाढली.
7TH पे कमिशनचा फायदा केंद्र सरकार, राज्य सरकारे, निमसरकारी कंपन्या यांत काम करणाऱ्या सर्व लोकांना होईल. या कमिशनचा रिपोर्ट वर्षाच्या अखेरीस येईल असा अंदाज आहे. त्यामुळे FMCG क्षेत्रातील कंपन्याना मागणी वाढल्यामुळे फायदा होईल.
सरकार सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक वाढवीत आहे. रस्ते बांधणे, सोलर उर्जा,रेल्वे, पाणी शुद्धीकरण,सार्वजनिक आरोग्य, संरक्षण,बंदरविकास,स्मार्ट सिटीज,सर्व प्रकारच्या स्तरावरचे शिक्षण इत्यादी या क्षेत्रांत काम करणाऱ्या चांगल्या कंपन्यांच्या शेअर्सकडे लक्ष ठेवा. आता डीझेल व SUV ऑटोना युरो IV आणी V एमिशन नॉर्म्स लागू केले जाणार असल्यामुळे या कंपन्यांच्या उत्पादन खर्चांत Rs ३०००० ते Rs ५०००० पर्यंत वाढ होईल. .
गेल्या भागांत सांगितल्या प्रमाणे रिझर्व बँकेने रेपो रेटमध्ये ५० बेसिस पाईंट कपात केली. . हा रेट कट बँकांनी त्यांच्या कर्जदार ग्राहकांकडे पास-on केला पाहिजे असे RBI गव्हर्नरने बँकांना कडक शब्दांत सुनावले. बँकांनी ठेवीवरचे व्याज कमी केले त्याप्रमाणात कर्जावरचे व्याज कमी केले नाही. नवीन कर्जदार आणी जुने कर्जदार असा कर्जावर आकारल्या जाणाऱ्या व्याज दरांत भेदभाव केला जाणार आहे त्यामुळे बातमीची पूर्णपणे शहानिशा केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा गोड असा गैरसमज करून घेवू नका . सरकारने असे सांगितले की बँकांनी मुदत ठेवींवरच्या व्याजाचा दर १.२५ % कमी केला पण कर्जावरच्या व्याजाचा दर मात्र त्याच प्रमाणांत कमी केला नाही. तो त्यांनी लवकरच कमी केला पाहिजे. स्टेट बँक ऑफ इंडियाने जुन्या ग्राहकांना ४० बेसिस पाईंट कर्जावरील व्याजाचा दर कमी केला पण नवीन कर्जदारांना मात्र २० बेसिस पाईंटच कमी केला. रिझर्व बँकेने Rs तीस लाखापर्यंतच्या गृहकर्जांचे RISK-WEIGHT ५०% वरून ३५% पर्यंत कमी केले…
या आठवद्यांतला हिरो शेअर HMT (हिंदुस्थान मशीन टूल्स) ठरला. ‘मेक इन इंडिया’ या योजनेअंतर्गत आता जर्मनीबरोबर जे करार झाले त्यामध्ये HMT चा समावेश होता. सरकारच्या डायव्हेस्टमेंट धोरणानुसार HMT मध्ये प्रथम सुधारणा करून नंतर डायव्हेस्टमेंट करू असे सरकारने सांगितले. HMTमध्ये सरकारचा स्टेक ९१% आहे तसाच ही कंपनी हा भारत सरकारचा मानबिंदू आहे. त्यामुळे या शेअरची खरेदी चालू झाली आणी मार्केटमध्ये फ्री फ्लोट (लोकांकडे असलेले शेअर्स) कमी असल्यामुळे शेअरच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली. मात्र हा दीर्घ मुदतीसाठी केला जाणारा विचार आहे. हे आपण लक्षांत ठेवा.
सरकारचे डायव्हेस्टमेंटचे लक्ष्य पूर्ण होत नसल्यामुळे सरकारने ONGC, NTPC, COAL INDIA, BHEL या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपन्याना त्यांनी स्पेशल लाभांश जाहीर करावा असे सांगितले. या सरकारी कंपन्यामध्ये सरकारचा मेजोरीटी स्टेक असल्यामुळे सरकारला मिळणाऱ्या लाभांशाची रक्कमही खूप असेल असा अंदाज आहे.
CAFFE COFFEE DAY चा Rs११५० कोटींचा IPO पुढील आठवड्यांत १४ ऑक्टोबरला उघडत आहे..या IPO चा प्राईस band Rs. ३१६ ते ३२८ असा आहे. या कम्पनीचे २०९ शहरांमध्ये १४२३ outlets आहेत. ADAG (अनिल धीरुभाई अंबानी ग्रूप) रिलायंस सिमेंटमधील पूर्ण स्टेक विकणार आहे. रिलायंस इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला याचा फायदा होईल. BMW आणी TVS मोटर्स या दोन कंपन्या परस्पर सहकार्याने ३०० CC बाईक बनवणार आहेत. या प्रोजेक्टचे नाव K -3 असे ठेवले आहे. JP ग्रूप कंपनीच्या JP पॉवर या कंपनीला दिलेली कर्जे व्याजाचे पेमेंट करू शकत नसल्यामुळे ‘D’ ग्रेडमध्ये गेली आहेत. TAMASEK ही सिंगापूरमधील कंपनी टाटा कम्युनिकेशन या कंपनीचा डाटा सेंटर बिझीनेस (जो कंपनीच्या जगभरातील ४४ डाटा सेंटरमधून चालतो) US $ 700 मिलियन्सला विकत घेणार आहे.
TBZ (त्रिभोवनदास भीमजी झवेरी) या कंपनीने SNAPDEAL या कंपनीबरोबर हिर्यांचे दागिने सोन्याची नाणी यांच्या ऑन-लाईन विक्रीसाठी करार केला. इंडिया सिमेंटच्या शेअरहोल्डर्सना १:१ या प्रमाणांत CSK (चेन्नई सुपर किंग्स) या कंपनीचे शेअर्स फ्री मिळणार आहेत.CSK ही लीस्टेड कंपनी नाही. DLF ही रिअलिटी क्षेत्रातील कंपनी आपल्या रेंटल बिझीबेसपैकी ४०% हिस्सा संस्थागत गुंतवणूकदारांना विकून Rs १४००० कोटी उभारणार आहे. .वेदान्ता ग्रूप सोलर उर्जेच्या क्षेत्रांत ५०० mw क्षमतेसः पदार्पण करण्याच्या विचारांत आहे.
HDFC बँकेने जाहीर केले की ते आता त्यांच्या सर्व सेवा डिजिटल फॉर्ममध्ये उपलब्ध करणार आहेत. त्यांनी जाहीर केले की जुन्या ग्राहकांसाठी १० सेकंदांत तर नवीन ग्राहकांसाठी सर्व जरुरती कागदपत्रे दिल्यास ३० मिनिटांत ऑन-लाईन कर्ज पास होऊन त्यांच्या खात्यांत जमा होईल.नवीन WALLET सेवा सुरू केली आहे. आता आपली युटीलिटी बिल्स फोनवर पेड कराल. अशा तर्हेने हळू हळू HDFC एक डिजिटल बँक होण्याच्या प्रयत्नांत आहे.
फोट्रीस हेल्थकेअर या कंपनीच्या SRL DIAGNOSTIK या सबसिडीअरीचा Rs१२५० कोटींचा IPO आणण्याच्या विचारांत आहे.बाबा रामदेव याची पातंजली या नावाने विकली जाणारी सर्व प्रोडक्ट्स त्यांच्या 4000 सेन्टर्समधून विकली जातात. आता ही प्राडक्ट्स फ्युचर ग्रूपच्या माध्यमातून विकली जातील. त्यामुळे आता सर्व पातंजली प्राडक्ट्स सहजरीत्या सर्वत्र उपलब्ध होतील.पतंजली आणी फ्युचर ग्रुपने जाहीर केले की ते येत्या २० महिन्यांत Rs. १०००० कोटींचा बिझीनेस करतील.
इंडस इंड बँकेचा दुसऱ्या तिमाहीचा निकाल समाधानकारक आला. NII (नेट इंटरेस्ट इन्कम) आणी PATमध्ये चांगली वाढ झाली ASSET QUALITY स्थिर राहिली.. ऑरोबिन्दो फार्मा या कंपनीला त्यांच्या gABILIFY या औषधासाठी USFDA ची मंजुरी मिळाली. युनिकेम lab या कंपनीला MONTELUKAST सोडियम TABLET साठी USFDA कडून ANDAA अप्रुवल मिळाले.
आयात निर्यात करणाऱ्या कंपन्या कोणत्या देशात निर्यात करतात किंवा कोणत्या देशातून आयात करतात त्या देशातल्या अर्थव्यवस्थेच्या चांगल्या वाईट स्थितीवर त्या कंपनीच्या शेअर्सची किंमत अवलंबून असते.
क्रूड बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर समझोता झाल्यामुळे आणी USA मधील OILRIGGS ची संख्या कमी झाल्यामुळे क्रूडची किंमत US$ 50 च्या पुढे गेली. यामुळे ONGC,OIL,CAIRN आणी ओईल एक्स्प्लोरेशान उदा (अबन ऑफशोअर, HOEC) करणाऱ्या कम्पन्यांच्या शेअर्सचे भाव वाढले एव्हढे दिवस क्रूडची किंमत कमी होत होती त्याचा फायदा ओईल मार्केटिंग कंपन्या उदा BPCL HPCL IOC, पेंट उत्पादन करणाऱ्या कंपन्या उदा (एशियन पेंट्स, बर्गर पेंट्स, कन्साई नेरोलाक) तसेच टायर उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणी विमान कंपन्याना (इंधनाचा भाव कमी झाल्यामुळे) झाला. आता या वर उल्लेखिलेल्या क्षेत्रातील कंपन्याना क्रूड वाढत असल्यामुळे कमी फायदा होईल किंवा एका मर्यादेबाहेर COST वाढल्यामुळे नुकसानही होऊ शकते.
आधी सांगितलं तसं प्रत्येक घटनेमुळे काही कंपन्यांचे शेअर्स वाढणार तर ज्या कंपन्याना होणारा फायदा कमी होईल त्या कंपन्यांचे शेअर्स पडणार. त्यामुळे आपण ज्या कंपन्यांचे शेअर्स वाढत आहेत ते शेअर्स घेणे शेअर्स पडू लागल्यावर होणारा फायदा शेअर्स विकून पदरी पाडून घेणे हे श्रेयस्कर असते.बातमी एक असते पण त्या बातमीचा चहूबाजूने परिणाम होतो. त्यामुळे शेअरमार्केटमध्ये कधीही एकमार्गी विचार करून चालत नाही. आणी एकाच प्रकारचा ट्रेड करूनही चालत नाही. क्रूडचे भाव वाढल्यामुळे जर आपण जे शेअर वाढतील ते खरेदी करून नंतर वाढणार्या भावाला विकून फायदा मिळवू शकतो त्याचप्रमाणे जे शेअर पडतील ते शेअर short करून म्हणजेच (आधी विकून नंतर पडलेल्या भावाला खरेदी करून) ट्रेड करू शकतो. ज्याला कुणाला derivative मध्ये ट्रेड करतां येत असेल ते त्याप्रकारचा ट्रेड करू शकतात. क्रूड वाढू लागल्यामुळे CAD वरपण परिणाम होईल. फक्त हा क्रूड वाढण्याचा ट्रेंड तात्पुरता आहे की काही काळ टिकणारा आहे याचा अंदाज घ्यावा लागेल. गेले वर्षभर क्रूडचे दर ढासळत असल्यामुळे काही शेअर्सचे भाव लाईफ टाईम हायला पोहोचले.तर काही शेअर्सचे भाव लाईफ टाईम ‘LOW’ ला पोहोचले. त्यामुळे खरेदी किंवा विक्रीचा कोणताही ट्रेड फायद्याचा होईल असे वाटते. शेवटी निर्णय तुमच्या हाती. माझे काम वाटाड्याचे..
‘अल निनो’ चा परिणाम म्हणून पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे उन्हाळा खूप कडक असेल असा अंदाज वर्तविला जात आहे. यामुळे आईसक्रिम तसेच शीत पेये बनवणाऱ्या कंपन्यांचे तसेच एअरकंडीशनअर आणी कूलर्स इलेक्ट्रिक पंखे बनविणाऱ्या कंपन्यांच्या विक्री मध्ये वाढ होईल.
शेअरमार्केटचा विचार चोहोबाजूंनी करावा लागतो. एकाच बातमीचा काही कंपन्यांवर चांगला तर काही कंपन्यांवर वाईट परिणाम होतो. तिमाही निकालांच्या बाबतीत वेगळा विचार करावा लागतो. ,नजीकच्या काळांत घडलेल्या घटनांचा परिणाम तिमाही निकालांमध्ये दिसत नाही. कारण हे रिझल्ट गेल्या तीन महिन्यांतील कंपनीची प्रगती किंवा अधोगती दाखवत असतात प्रत्येक कंपनीच्या रिझल्ट्सचा अभ्यास कसा करायचा हे आपण पुढील काही भागांत थोडक्यांत पाहू.
 

भाग ५७ – कॉर्पोरेट एक्शन – स्प्लिट

arrows-150752_1280नुकतीच घडलेली घटना आहे ही ! माझ्याकडे गाण्याच्या क्लासला येणारे एक गृहस्थ पासपोर्ट काढायला गेले म्हणून क्लासला आले नाहीत. दुसरे दिवशी क्लासला आल्यावर मला म्हणाले
“ मी पासपोर्ट काढणार, व्हिसा काढणार आणी जग पाहून येणार अशा विचारांत आहे.
“ काय हो ‘LOTTERY’ लागली की काय? “
“LOTTERY च म्हणावी लागेल MADAM मी १००० शेअर्स ‘सत्यम’ चे घेतले होते Rs १४ च्या भावाने. सरकारने ‘सत्यम’ या कंपनीचे ‘टेकमहिन्द्र’ मध्ये मर्जर केले. त्यामुळे ‘टेक महिंद्रा’ या कंपनीचे ११० शेअर्स ‘सत्यम’ या कंपनीच्या शेअर्स ऐवजी मिळाले. टेक महिंद्राने १:१ स्प्लिट आणी १:१ बोनस शेअर जाहीर केल्यामुळे एका शेअरचे चार शेअर्स होणार. म्हणजे माझ्याकडील ११० शेअर्सचे ४४० शेअर्स होणार. आता टेक महिंद्रचा भाव Rs २९०० आहे. म्हणजे Rs १०००००० तरी नक्की मिळणार, म्हणजे निदान युरोप अमेरिका तरी बघतां येईल.”
त्यांची समजूत अशी होती की एका शेअरचे चार शेअर मिळतात पण प्रती शेअर भाव मात्र तोच राहतो. त्यांना याच भ्रमांत राहू द्यावे की त्यांचा भ्रम दूर करावा. भ्रम दूर करायचा ठरवल्यास त्यांचे परदेशगमनाचे स्वप्न भंगून ते दुःखी होणार. त्यांना दुःखी करून मला तरी काय आनंद मिळणार. रेकॉर्ड डेटला त्यांना समजेलच म्हणून मी गप्प राहिले.
पुढच्या क्लासला ते तणतणतच आले.
“ काय हो MADAM, शेअरमार्केट म्हणजे फसवणूक हे खरं वाटायची पाळी आली MADAM मी साफ धुतला गेलो. टेक महिंद्राचा भाव आज Rs.७०० च्या आसपास आहे. माझे केवढे नुकसान झाले. मला काही सुचेनासे झालंय. आता काय करू? कोणाकडे तक्रार करू? पैसे कसे वसूल होतील? “
‘अहो शेअर्स स्प्लिट, बोनस शेअर्स हे सर्व कॉर्पोरेट एक्शनचे भाग आहेत. एका शेअरचे चार शेअर झाल्यानंतर किमतही त्याच प्रमाणांत कमी होणार. हे सर्व नियमाप्रमाणेच झाले आहे यांत तूमची काही एक फसवणूक झालेली नाही तुम्ही शांत व्हा पाणी प्या. नेहेमीप्रमाणे क्लास होऊ द्या ,मग मी तुम्हाला स्प्लिटविषयी माहिती सांगेन.”
स्प्लिट हा सुद्धा कॉर्पोरेट एक्शनचाच एक भाग आहे. शेअरची किमत खूप वाढल्यामुळे लोकांना तो शेअर खरेदी करणे परवडत नाही. अशा वेळी कंपनी शेअर स्प्लिट जाहीर करते. कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स स्प्लिटचा रेशियो ठरवतात आणी मंजूर करतात. त्यानंतर कंपनीच्या शेअरहोल्डर्सची मंजुरी घेतली जाते. शेअर स्प्लिट जाहीर झाल्यापासून स्प्लिट शेअर्स ‘DEMAT’ अकौंटवर जमा होण्यास ३ ते ६ महिन्यापर्यंतचा कालावधी लागतो.
समजा, कंपनीने ५:१ या प्रमाणांत स्प्लिट जाहीर केले तर ज्याच्याजवळ कंपनीचा १ शेअर असेल त्याला ५ शेअर मिळतात. जर शेअरची दर्शनी किंमत Rs १० असेल तर ती सुद्धा स्प्लिट झाल्यावर Rs २ होते. जर स्प्लिट शेअरच्या रेकॉर्ड डेटला शेअर्सची मार्केटमधील किंमत .Rs ५०० प्रतीशेअर असेल तर ती स्प्लिटनंतर ती Rs १०० होते. यामुळे कंपनीच्या निव्वळ मालमत्तेवर किंवा कंपनीच्या ‘मार्केट कॅपिटलायझेशन’ वर परिणाम होत नाही. पण शेअर्सची संख्या वाढल्यामुळे EPS (EARNING PER SHARE) त्या प्रमाणात कमी होते. शेअर्सची संख्या वाढल्यामुळे प्रती शेअर लाभांशही त्याप्रमाणांत कमी मिळतो.
माझी मजा सांगते बरं ! अहो मला हे प्रथम काही समजत नव्हते. काही काही कंपन्या इन्व्हेस्टर फ्रेंडली असतात. त्या त्यांना होणाऱ्या फायद्याचा बऱ्यापैकी भाग शेअरहोल्डर्सना लाभांशाच्या स्वरूपांत वाटून टाकतात. एवढेच नव्हे तर वर्षातून वेळोवेळी अंतरीम लाभांशही देतात. एका वर्षी GSKफार्मा, Rs ६२.५०, बजाज ऑटो Rs ५० तर BPCLने Rs २२.५० लाभांश जाहीर केला आहे. जर स्प्लिट झाले तर एका शेअरचे ५ शेअर होण्याच्याआधी प्रती शेअर Rs२० लाभांश(शेअर्स स्प्लिट जाहीर होण्याच्या आधी) जाहीर झाला तर मला तो २० x ५ म्हणजे Rs१०० मिळणार असे वाटले. माझा हिरमोड झाला.. माझा पडलेला चेहेरा पाहून यजमानांनी विचारले
“ कां गं काय झालं तुला? तुझा चेहेरा असा कां ? आज मार्केट पडलं कां ?”
तेव्हा मी त्यांना सांगितले
“ मी जेव्हा पासबुकांत एन्ट्री पहिली तेव्हा त्यांत लाभांश Rs २००० च दाखविला आहे. प्रत्येक शेअरला Rs २० याप्रमाणे ५०० शेअर्सला Rs१०००० मिळायला हवा होतां नं !”
“अगं अशामुळे बाकी काही नाही तरी कंपनीचे दिवाळे मात्र नक्की वाजेल. अगं शेअरची किमत ५ ने भागून आल्यावर लाभांशही त्याच प्रमाणांत मिळणार. एकूण हिशोब सारखाच “ इति माझे यजमान
स्प्लिट झाल्यावर शेअर्सची किंमत त्या प्रमाणांत कमी होते. त्यामुळे तो शेअर सर्वांना परवडतो. त्या शेअर्सची मागणी वाढते. त्या शेअरमध्ये लिक्विडीटी वाढते. लोकांचा त्या शेअर्मधला रस वाढतो आणी हळूहळू शेअर्सची किंमतही वाढते म्हणजेच अप्रत्यक्षरीत्या गुंतवणूकदारांचा आणी कंपनीचा फायदा होतो.
समजा ‘नेस्ले’ सारखा शेअर आहे आणि आज त्याची मार्केटमध्ये किमत Rs ६३०० आहे. ह्या शेअर्सचे समजा १०:१ या प्रमाणांत स्प्लिट झाले तर एका शेअरची किमत Rs 630 होईल.समजा माझ्याकडे आता १ शेअर आहे त्याचे १० शेअर्स होतील. जर मला Rs ५००० ची गरज असेल तर मी ८ शेअर विकून गरज भागवेन आणी माझ्याजवळ २ शेअर शिल्लक राहतील. जर स्प्लिट झाले नसते तर Rs ५००० ची गरज असली तरी पूर्ण एक शेअर विकावा लागला असता. ( अजूनतरी शेअरमार्केटमध्ये अर्धा किंवा एकचतुर्थांश शेअर विकणे सुरु झाले नाही.) म्हणजे समजा माझ्या मालकीचा एक हॉल आहे बांधकामाचा खर्च वाढू नये म्हणून खोल्या पाडल्या नाहीत तर गरज असेल तेव्हा पूर्ण हॉल विकावा लागतो. जर चार खोल्या पाडल्या तर खोल्या भाड्याने देता येतात किंवा एखादी खोली विकून गरज भागवता येते. या दृष्टीकोनातून बघितल्यास स्प्लिट फायदेशीर ठरते.
कधी कधी कंपन्या ‘रिवर्स स्प्लिट’ जाहीर करतात. शेअरचा भाव खूप कमी झाला असेल तर तो ‘पेनी stock’ म्हणून गणला जातो. मार्केट मंदीत असताना शेअरची किंमत फारच कमी झाली तर तो शेअर डीलिस्ट होण्याची भीती असते. काही लोक शेअरच्या किमतीवरून शेअरची गुणवत्ता ठरवणारे असतात. हे सर्व टाळण्यासाठी कंपन्या ‘रिवर्स स्प्लिट जाहीर करतात. त्यामुळे शेअरची संख्या कमी होते आणी छोट्या शेअरहोल्डर्सची संख्या कमी होते. जर ‘रिवर्स स्प्लिट’ १:१० या प्रमाणांत जाहीर झाले तर ज्यांच्याजवळ १० शेअर्स असतील त्यांना १ शेअर मिळतो. शेअरची किंमतही (दर्शनी तसेच मार्केट) त्या प्रमाणांत वाढते. जर तुमच्या कडे १५ शेअर्स असतील तर उरलेल्या ५ शेअर्सचे पैसे तुमच्या खात्याला जमा केले जातात.
स्प्लिट झालेले शेअर्स खात्याला जमा झाले कां ते पहावे, त्यांत ट्रेडिंग सुरु झाले आहे कां हे विचारूनच विकावेत.
“स्प्लिट किंवा रिवर्स स्प्लिट ह्या दोन्ही कॉर्पोरेट एक्शन MANDATORY आहेत. जर तुम्हाला यांचा परिणाम नको असेल तर तुमच्याजवळ असलेले शेअर्स एक्स डेटच्या आधी विकून टाकणे हा एकच पर्याय उरतो.आणी तो फायदेशीरही होतो
माझ्या विद्यार्थ्याप्रमाणे तुमचेही गैरसमज हा ब्लोग वाचून दूर व्हावेत अशी अपेक्षा आहे. फसवणूक झाली फसवणूक झाली असा आरडाओरडा करण्यापेक्षा नीट माहिती करून घ्यावी आणी त्यानंतर मात्र फसवणूक झाली असेल तर कंपनीकडेकडे तक्रार करावी.
मागील भाग वाचण्या साठी इथे क्लिक करा 

आठवड्याचे समालोचन – २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर – शिंक्याच तुटलं आणी बोक्याला फावलं

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा 
mktandme-logo1.jpg
अहो काय सांगू तुम्हाला ! या आठवड्यांत मार्केटचा आणी माझा गोंधळच गोंधळ उडाला. सोमवारी टी व्ही चालू केला तर काहीच दिसेना. प्रथम टी व्ही बिघडला नाही याची शहानिशा करून घेतली आणी नंतर केबलवाल्याला फोन केल्यावर कळले की वायर तुटली आहे. त्यामुळे शेअरमार्केटचा सामना अर्धा लाईव आणी अर्धा रेकॉरडेड असा पहावा लागला. ठीक आहे करणार काय आलीया भोगासी !
गेल्या आठवड्यांत आणी या आठवड्यांत बरेच अपघात घडले. मार्केटच्या भाषेत काही कम्पन्यांचे शेअर्स अचानक काही बातमीमुळे फार मोठ्या प्रमाणावर पडले. VW (VOLKS WAGEN) च्या घटनेमुळे BOSCH, मदरसन सुमी हे शेअर्स पडले हे आपण गेल्या आठवड्यांत पाहिले. HCL TECH ने प्राफीट वार्निंग इशू केल्यामुळे या शेअर्सच्या किमतीत घट झाली.HCL TECHचे शेअर्स विकून मार्केटने टीसीएस आणी इन्फोसिस या शेअर्सची खरेदी केली असे वाटते.
L & T ने L & T इंफोटेक या सबसिडीरीचा IPO आणण्यासाठी DRHP सेबीकडे फाईल केले.L & T या कंपनीला Rs ५००० कोटींची ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. तसेच L & T ने त्यांच्या पॉलिसीप्रमाणे आज आपला चंडीगडमधील ELANTE MALL Rs १७८५ कोटींना विकला. ठरल्याप्रमाणे FMC आणी सेबीचे मर्जर झाले. मर्जरमुळे ‘OPTION’ मध्ये ट्रेडिंग सुरु होईल आणी त्याचा MCXला फायदा होईल असे वाटते.
ह्यूम पाईपला खूप मोठी ऑर्डर मिळाली. ऑर्डर मिळणे,त्याची अमलबजावणी होणे या गोष्टी नेहेमी घडणाऱ्या आहेत.पण काही काही ऑर्डर्स विचार करायला लावण्याएवढ्या खूपच मोठ्या असतात. या कंपनीची मार्केट कॅप (शेअर्सची संख्या x शेअर्सची किमत) जितकी त्यापेक्षा तिप्पट मोठी ऑर्डर मिळाली. त्यामुळे कंपनीच्या फायद्यामध्ये, EPS ( अर्निंग पर शेअर) मध्ये वाढ होईल असा अंदाज आल्याने शेअर्सची मागणी वाढली. DR REDDY’S आणी ऑरोबिन्दो फार्मा याच्या औषधाला USFDA कडून मंजुरी मिळाली. DR REDDY’S या आठवड्याचा मुख्य शेअर ठरला. जवळ जवळ Rs ३०० ने या शेअरच्या किमतीत वाढ झाली.
या आठवड्यांत साखरेचे शेअर्स वाढले. नाहीतरी सणासुदीच्या काळांत साखर जास्त गोड होतेच. परंतु जागतिक बाजारामध्ये साखरेच्या किमतीत वाढ झाली, मागणी आणी पुरवठा यांचे गणित बदलले दुष्काळामुळे उसाच्या पिकाला पाणी पुरवू नये असे धोरण सरकारने जाहीर केले त्यामुळे एकंदरीतच शुगर इंडस्ट्रीजला चांगले दिवस आले परंतु आपले खिसे मात्र भाववाढ झाल्यामुळे खाली होणार असे चित्र दिसते.
पर्यावरणाच्या प्रॉब्लेम्समुळे माईनिंग इंडस्ट्रीजचे शेअर्स कोसळले. एडीएजी ग्रुपची AGM (ANNUAL GENERAL MEETING) झाली त्यामध्ये RCOMM आणी सिस्टेमा यांच्या मर्जरवर भर देण्यांत आला. या वर्षाअखेर 4G लौंच होईल असे सांगितले. सध्या IDBIमध्ये सरकारचा स्टेक ७६% आहे तो कमी करून ४९% केला जाणार आहे आणी काही विशेष अधिकार देण्यांत येणार आहेत असे सांगण्यांत आले.
मंगळवारी बहुचर्चित रिझर्व बँकेची पॉलिसी जाहीर झाली.RBIने दिवाळीच्या आधीच मिठाई वाटली असे वाटले. ०.२५ बेसीस पाईंट रेट कटची अपेक्षा असताना RBI ने ०.५० बेसिस पाईंट रेट कट केला. SLR CRR मध्ये काही बदल केला नाही. अर्थव्यवस्थेचे योग्य निदान करून वेळेवर औषधही दिले आणी टोनिकही दिले पण हे औषध वेळेवर घेतले जाईल याचीही खबरदारी घेतली. बँकांनी त्यांचे कर्जावरील व्याजाचे दर कमी केले पाहिजेत असे कडक शब्दांत सुनावले. त्यामुळे स्टेट बँकेने ताबडतोब एक्शन घेवून ०.40 बेसिस पाईंट रेटकट केला. सगळ्या बॅंका काही प्रमाणांत कां होईना आपले कर्जावरील व्याजाचे दर कमी करत आहेत. पण त्यामुळे मुदत ठेवींवर दिले जाणारे व्याज सुद्धा त्या प्रामाणात कमी होईल. उद्योगधंद्याला स्वस्त कर्ज पुरवठा होईल पण सामान्य लोकांना मुदत ठेवीवरचे व्याज कमी झाल्यामुळे त्याचा फटका बसेल.नेहेमी असेच घडते समाजातील एका वर्गाचा फायदा होतो तर एका वर्गाचे नुकसान होत असते.
जसे शिंके तुटले तर त्यांत ठेवलेले दही लोणी खाली सांडते आणी बोक्याची मेजवानी होते या घटनेमुळे अर्थातच मार्केटमध्ये नाच सुरु झाला. मार्केट थोडावेळ तेजींत आले पण पुन्हा पडू लागले. कारण नुकतीच रिझर्व बँकेने स्माल बँक, पेमेंट बँक्स याना दिलेली परवानगी होय. बँकांचे जाळे पसरले जाईल, स्पर्धा वाढेल खेडोपाड्यांत बँकांच्या सेवा उपलब्ध होतील पण त्याचवेळी बँकांचे प्रॉफिट मार्जिन कमी होईल आणी जागतिक मंदीमुळे उद्योग्धन्द्याची पीछेहाट झाल्यामुळे बुडीत कर्जाचे प्रमाण वाढेल असा अंदाज आहे.
IDFC बँकेची रेकॉर्ड डेट ५ ऑक्टोबर आहे परंतु IDFC मधून IDFC बँक बाहेर निघाल्यावर त्या बँकेच्या शेअर्सची किंमत काय असेल, लिस्टिंग किती किमतीला होईल याचा अंदाज बांधून लोकांनी IDFCचे शेअर्स विकून टाकले असे जाणवले.त्यामुळे Rs १४० चा शेअर Rs. ६० झाला.IDFC बँकेचे लिस्टिंग नोव्हेबरमध्ये होईल. तेव्हढे दिवस भांडवल अडकून पडेल म्हणून त्यावेळचे त्या वेळेला बघू असा विचार करून लोकांनी शेअर्स सोडून दिले. कारण IDFC बँकेचे बस्तान बसून बँक नावारूपाला येण्यास नक्कीच दोन वर्षाचा कालावधी जाईल. IDFC ही होल्डिंग कंपनी राहील. परंतु एक प्रवाह असाही सांगणारा आहे की IDFC infrastructure प्रोजेक्टसाठी दीर्घ मुदतीची कर्ज देत असूनसुद्धा कर्जवसुलीचे प्रमाण चांगले आहे. NPA (NON PERFORMING ASSET) चे प्रमाण कमी आहे. IPO मध्ये Rs ३४ ला IDFCने शेअर दिले होते बऱ्याच वेळेला मुख्य व्यवसाय आणी दुय्यम व्यवसाय वेगवेगळे केल्यामुळे कंपन्या प्रगतीपथावर येतात हा अनुभव आहे. त्यामुळे गणितांत जरी एक अधिक एक =दोन होत असले तरी हा हिशोब व्यवहारांत आढळत नाही. दोन्ही कंपन्या एकमेकांना पूरक ठरत असल्याने एक अधिक एक =३ ही होऊ शकते. त्यामुळे IDFC तून IDFC BANK बाहेर पडल्यानंतर शेअरहोल्डर्सचा फायदा होईल असे वर्तवले जाते.
सध्या जागतिक दरानुसार GASच्या किंमती ठरतात. हे GAS चे दर कमी झाले याचा फटका ONGC, RELIANCE, GAIL या कम्पन्यांना बसला. पण उलटपक्षी GAS बेस्ड पॉवरप्लांट्स आणी फरटीलायझर प्लांट्सना स्वस्तांत GAS उपलब्ध झाला. रशियाने सिरीयावर जबरदस्त बॉम्बिंग केल्यामुळे सिरीयातून होणारा क्रूडचा पुरवठा कमी होईल असे वाटून क्रूड US$५० च्या वर पोहोचले. जागतिक पातळीवर कोळशाच्या किंमती कमी होत असल्यामुळे कोल इंडियाचा शेअर पडत आहे.म्हणजेच या वर्षी निफ्टीमधले टाटा मोटर्स, टाटा स्टील, भेल, कोल इंडिया, RELIANCE, GAIL, ONGC या सर्व शेअर्सचे भाव काहीनाकाही कारणाने कमी होत आहेत.
ऑटोसेल्सचे आकडे आले. अशोक लेलंड आणी EICHER मोटर्स यांच्या विक्रींत चांगली वाढ झाली. तर महिंद्राची निर्यात वाढली आणी मारुतीची निर्यात कमी झाली.
१०० कंपन्यांचे अडवान्स कराचे आकडे आणी एकूण अप्रत्यक्ष कराच्या संकलनांत झालेली वाढ ह्या गोष्टी अर्थव्यवस्था सुधारत आहे याकडे संकेत करतात.उत्पादनाचे आकडेही वाढले. पण ही प्रगती सामान्य लोकांपर्यंत कधी पोहोचणार ते कळत नाही.
ऑक्टोबर महिना तसा धोक्याचाच, जेव्हा जेव्हा मार्केट जबरदस्त कोसळले तेव्हा तेव्हा ते ऑक्टोबर महिन्यांत कोसळले असे इतिहास सांगतो. याच महिन्यांत कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकालही जाहीर होतात. १२ तारखेपासून IT कंपन्यांचे रिझल्ट्स येण्यास सुरुवात होईल मार्केट नेहेमी काहीतरी शेंडा पकडत असते. या वेळी मार्केटचे लक्ष बिहारच्या निवडणुकांकडे आहे. निवडणुकीचा निकाल जरी नोव्हेंबरमध्ये येणार असला तरी मतदानाच्या आकडेवारीवरून आणी एक्झीट पोलवरून काही अंदाज बांधता येतील.मतदानाचे प्रमाण वाढले तर ट्रेंड बदलण्याची शक्यता असते.
आपल्या आयुष्यांत जशी साडेसाती येते तशीच कंपनीच्या आयुष्यांतही येते असे म्हणावे लागते. साडेसातीतून माणूस कसा तावून सुलाखून बाहेर पडतो आणी आपली प्रगती साध्य करू शकतो यावरच त्या व्यक्तीची गुणवत्ता ठरते. त्याचप्रमाणे कंपन्यासुद्धा संकटांत स्वतःला कशा पद्धतीने सावरतात आपली धोरणे कशी बदलतात आणी पुन्हा प्रगतीपथावर येण्यास किती काळ लागतो हे पहावे लागते. काही काही कंपन्या या अनुभवातून शहाण्या होतात तर काही रसातळाला जातात.
तुम्ही म्हणाल हे प्रवचन पुरे करा आणी आम्ही काय करावे ते सांगा. शेअर विकत घेऊ की नको किती भावाला कधी घेऊ आणी किती भावाला विकून किती पैशे मिळतील हे सांगा. पण गुंतवणूक म्हणजे एखादा खाण्याचा पदार्थ विकत घेणे , त्याचे बिल देणे आणी खाउन झाल्यावर कागद फेकून देणे असे नव्हे. तुम्हाला शेअरमार्केटमध्ये टिकून राहायचे असेल गुंतवणुकीतून जास्तीतजास्त फायदा मिळावा असे वाटत असेल किंवा शेअरमार्केटचा करीअर म्हणून विचार करीत असाल तर या सर्व घटनांचे निरीक्षण केले पाहिजे. कोणत्याही अनिष्ट बातमीमुळे शेअरचा भाव कमी झाल्यास घाईघाईने स्वस्तांत मिळतोय म्ह्णून खरेदी करण्यापेक्षा बातमीची शहानिशा करून विचारपूर्वक खरेदी केली पाहिजे. योग्य वेळी योग्य भावांत खरेदी व विक्री हेच फायद्याचे गणित होय.