आठवड्याचे समालोचन – २ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर – नाच नाचुनी अति मी दमले

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
MKTandMe Logo
‘मार्केट’ पडण्यासाठी त्याचप्रमाणे वाढण्यासाठी काहीतरी कारण शोधत असतं. यावेळी बिहारच्या निवडणुकांचे कारण आयतेच सापडले. या निवडणुकांचा इशू फारच प्रतिष्ठेचा बनला. जर एन डी ए  जिंकले तर राज्यसभेच्या जागा वाढतील व GST पास करणे सोपे जाईल. पण GST पास झाल्यामुळे सगळ्या समस्या सुटणार कां ? तर नाही हेच खरे.
पण या कारणांमुळे आठवडाभर मार्केट थोडे थोडे कुरकुरतच होते. गुरुवारी संध्याकाळी एक्झिट पोल आले त्यातूनही पूर्ण अंदाज आला नाही. रविवारी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. जर एन डी ए पडले तर आपल्या ध्येय धोरणांमध्ये काही सुधारणा करणे गरजेचे आहे कां ? या कडे पाहिले जाईल इतकेच. झारीमध्ये शुक्राचार्य किती आणी कुठं कुठं अडकले आहेत की कितीही प्रयत्न केले, चांगल्या मनाने केले तरी त्याचा फायदा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचेल याची खात्री देता येणे अशक्य.
या आठवड्यांत खूप कंपन्यांचे रिझल्ट्स आले. तसेच महत्वाची  दोन तीन लिस्टिंग झाली. कॅफे कॉफी डे या शेअरचे लिस्टिंग झाले. अपेक्षेप्रमाणे लिस्टिंग खराबच झाले. Rs ३२८ ला IPO मध्ये शेअर्स दिले शेअर Rs ३१७ ला लिस्टिंग झाले. पण शेअर Rs २७० पर्यंत खाली आला. शुक्रवारी IDFC बँकेचे लिस्टिंग झाले. हे लिस्टिंग Rs. ७१ वर झाले. ज्या लोकांनी exdate च्या आसपास IDFCचे शेअर्स खरेदी केले त्यांना फारसा फायदा झाला नाही.
RCOM या कंपनीने  सिस्टेमा श्याम ही कंपनी विकत घेतळी. सिस्टेमाच्या ११ शेअर्सला RCOM चा एक शेअर या प्रमाणे शेअर्स मिळतील. इराणने तांदुळाच्या आयातीवरील निर्बंध उठवले म्हणून एल टी फूड्स, KRBL,कोहिनूर फूड्स, USHER  AGRO , या कंपन्यांची तांदुळाची निर्यात वाढेल असा अंदाज आहे. त्यामुळे या सर्व शेअरची किमत वाढली. युनायटेड स्पिरीट या कंपनीचा रिझल्ट चांगला आला. DIEGO ओपन ऑफर आणेल अशी वदंता आहे. DIEGOला युनायटेड स्पिरीट या कंपनीतला आपला स्टेक वाढवायचा आहे. त्यांनी याआधी Rs १४०० आणी Rs ३१०० प्रती शेअर या भावाला ओपन ऑफर आणली होती.
नीलकमल प्लास्टिक, पी व्ही आर, ए बी बी , चंबळ FERTILIZER, पी एफ सी, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन, जी एन एफ सी, या कंपन्यांचे रिझल्ट्स चांगले आले. स्टेट बँक ऑफ इंडिया आणी PNB चे रिझल्ट्स गेल्या तिमाहीपेक्षा बरे आले.  IOC, बँक ऑफ बरोडा,विजया बँक यांचे रिझल्ट खराब आले. AMTEK ऑटो ही कंपनी आपला परदेशातील कारभार विकून कर्जाचा भार कमी करण्याच्या विचारांत आहे.
DRY BATTERY CELL वर इम्पोर्ट ड्युटी लावणार आहेत. व्हिएतनाम आणी चीन मधून अतिशय कमी दरांत या DRY CELL BATTERY DUMP केल्या जात आहेत अशी तक्रार आली होती. या तक्रारीत तथ्य आहे असे सरकारला आढळून आले.या निर्णयाचा फायदा एवररेडी , अमरराजा BATTERY , EXIDE या कंपन्यांना होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदिजीनी ५ तारखेला GOLD MONETIZATION स्कीम जाहीर केली. सरकारच्या दृष्टीकोनांतून विचार करायचा झाला तर आयातीमध्ये प्रथम क्रमांकावर क्रूड तर दुसऱ्या क्रमांकावर सोने आहे. भारतीयांना सोन्याचे आकर्षण फार असल्याने लग्नकार्य, सणासुदीच्या काळांत सोन्याची मागणी वाढत असल्याने आणी आपल्या देशांत या मागणीप्रमाणे पुरवठा करण्यास पुरेसे सोन्याचे उत्पादन होत नसल्याने सोने मोठ्या प्रमाणावर आयात करावे लागते. त्यामुळे आयात आणी निर्यात यातील दरी रुदावते. CAD ( CURRENT ACCOUNT DEFICIT) वाढते. देशाच्या गंगाजळीत (RESERVES) असलेल्या सोन्याच्या साठ्यावर त्या देशांतील अर्थव्यवस्था किती मजबूत आहे हे ठरते. बदलत्या काळाप्रमाणे सोन्याच्या बाबतीत चोरीमारीच्या धोक्यापासून संरक्षण व्हावे म्हणून लोक बँकेत लॉकर्समध्ये दागिने, जडजवाहीर ठेवणे सुरक्षित समजू लागले. लॉकरची उपलब्धता, लोंकर्सचे वाढणारे भाडे, दागिने बदलले जाण्याची भीती या समस्या आहेतच. ‘हौसेला मोल नसते’ असे जरी बोलले जात असले तरी प्रत्येक  गोष्टीला मर्यादा आहेच.
या सर्व गोष्टींचा काथ्याकूट समाजातील सर्व घटक अधून मधून करत असतात. सरकारने २०१५-२०१६च्या अन्दाजपत्रकांत’ ‘GOLD MONETISATION SCHEME’ नावाची योजना आणू असे सुतोवाच केले होते. सरकारशी झालेल्या चर्चेनंतर रिझर्व बँकेने या योजनेचा तपशील २५ ऑक्टोबरला जाहीर केला. या GMS (‘GOLD MONETISATION SCHEME’) चे उद्घाटन ५ नोव्हेबर २०१५ रोजी  पंतप्रधान नरेंद्र मोदिजी करतील. या योजनेचे काही पैलू खालीलप्रमाणे:
सर्व बँकांना ही योजना लागू करण्यास परवानगी दिलेली आहे. या सोन्याच्या स्वरूपातील ठेवींवर व्याजाचे दर ठरवण्याचे स्वातंत्र्य या बँकांना असेल.
(१)    फक्त  निवासी भारतीय, तसेच SEBI (SECURITIES EXCHANGE BOARD OF INDIA) नियमांप्रमाणे सेबी कडे रजिस्टर केलेले  म्युचुअल फंड्स, आणी ETF (EXCHANGE TRADED FUNDS) या योजनेत सहभागी होऊ शकतील.
(२)    GOLD DEPOSIT अकौंट उघडावा लागेल. हा अकौंट उघडण्यासाठी KYC (KNOW YOUR CUSTOMER) आणी IDENTIFICATION नॉर्म्स बचत खात्याप्रमाणेच लागू होतील. तुम्ही या योजनेअंतर्गत दोन किंवा अधिक माणसांच्या नावावर संयुक्त अकौंटही उघडू शकता.  इतर संयुक्त खात्याला लागू असणारे नियम या GMS खाली उघडलेल्या सयुंक्त अकौंटना लागू होतील
(३)    GMS योजनेखाली उघडलेल्या अकौंटमध्ये नामांकनाची सुविधा उपलब्ध असेल याविषयीचे नियम इतर अकौंटविषयीच्या नामांकनासाठी असलेल्या नियमाप्रमाणेच असतील
(४)      या योजनेअंतर्गत बॅंका ३ प्रकारच्या मुदत ठेवी स्वीकारू शकतील (अ) अल्प मुदतीसाठी म्हणजे १ वर्ष ते ३ वर्षे मुदतीसाठी. (आ) मध्यम मुदतीसाठी म्हणजेच (५ वर्षे ते ७ वर्षे) (इ) दीर्घ मुदतीसाठी ( १२ वर्षे ते १५ वर्षे)  यापैकी अल्प मुदतीच्या ठेवी बँक त्यांच्या जबाबदारीवर स्वीकारतील तर मध्यम आणी दीर्घ मुदतीसाठी सोन्याच्या स्वरूपांत ठेवी बॅंका सरकारच्या वतीने स्वीकारतील.
(५)    या गोल्ड depositवर  १ ते तीन वर्षे आणी ५ ते ७ वर्षे मुदतीच्या deposit करता २.२५% व्याज मिळेल. १२ ते १५ वर्षे मुदतीच्या depositसाठी २.५% व्याज मिळेल.
(६)    या मुदत ठेवींना LOCK-IN- PERIOD असेल. जर तुम्हाला सोन्याच्या स्वरूपातील ठेव मुदतीच्या आधी  परत पाहिजे असेल तर यासाठी बँकां दंड (PENALTY) लावू शकतात. ही PENALTY ठरवण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक बँकेला असेल.
(७)    या सोन्याच्या ठेवीवरील व्याज आकारणी तुम्ही ठेवलेल्या सोन्याचे TRADABLE बार मध्ये रुपांतर झाल्यानंतर किंवा तुमचे सोने कलेक्शन आणी प्युरीटी टेस्टिंग सेंटरमध्ये जमा झाल्यानंतर एका महिन्याने सुरु होईल.
(८)    ठेवीदाराला मुद्दल आणी त्यावरील व्याज सोन्याच्या स्वरूपांत किंवा रोख रकमेच्या स्वरूपांत घ्यावयाचे स्वातंत्र्य असेल. पण हा निर्णय तुम्हाला GOLD DEPOSIT अकौंट उघडताना घ्यावयाचा आहे आणी नंतर तो बदलता येणार नाही.मुदत ठेवीची मुदत संपण्याच्या वेळेस असणारे मुद्दल व त्यावरील व्याजाची रक्कम ठरवताना त्यावेळी असणारा सोन्याचा भाव विचारांत घेतला जाईल
(९)     अकौंट मध्ये जमा करण्याच्या आधी BIS (BUREAU OF INDIAN STANDARDS) प्रमाणित   सरकारमान्य ”PURITY TESTING CENTRE’ मध्ये या सोन्याची शुद्धता तपासली जाईल  आणी त्याचे प्रमाणपत्र देईल. यासाठी XRF मशीन टेस्ट करून दागिन्यांमध्ये किती सोने आहे हे सांगेल. जर ग्राहकाला  हा निष्कर्ष मान्य नसेल तर दागिना ग्राहकाला परत केला जाईल.
(१०)    जर ग्राहकाला XRF मशीन टेस्टचा निष्कर्ष मान्य असेल तर दागिन्यातील खडे, मीनाकाम आणी सोन्यातील कचरा वेगळे करून ते ग्राहकाला परत केले जातील. नंतर सोन्याचे वजन करून नक्त (NET) वजन सांगितले जाईल. नंतर ग्राहकाच्या समोरच सोने वितळवून FIRE ASSAY टेस्टने सोन्याची शुद्धता निश्चित केली जाईल. ही प्रक्रिया झाल्यावर जर ग्राहकाला सोने बँकेत ठेवायचे नसेल तर त्याला ते GOLD बारच्या स्वरूपांत परत केले जाईल. पण ग्राहकाला या सर्व प्रक्रियेसाठी निश्चित केलेली फी भरावी लागेल.जर ग्राहकाने सोने बँकेत ठेवायचे ठरवले तर ही फी बँक भरेल.  .
(११)    ठेवीदार रोख पैसे किंवा चेकप्रमाणेच सोने बँकेत जमा करून त्यावर व्याज मिळवू शकतात.
हे सोने (बार, नाणी, दागिने (खडे आणी इतर धातूनचे वजन वगळून) कमीत कमी ३० ग्राम्स  वजनाचे आणी ९९५ शुद्धतेचे (FINENESS) चे असावे. तुम्ही कितीही सोने DEPOSIT करू शकता याला कमाल मर्यादा नाही.
सोन्याची शुद्धता आणी वजन टेस्टिंग सेंटरने प्रमाणित केल्यावर बँकेत गोल्ड अकौंट उघडल्यावर बँक त्यावेळच्या सोन्याच्या रेटप्रमाणे (995 FINENESS सोन्याच्या) रक्कमेचे DEPOSIT CERTIFICATE देईल.
आपला देश करीत असलेल्या सोन्याच्या आयातीचा भार कमी व्हावा.हा उद्देश या योजनेचा आहे.  असा एक अंदाज आहे की संस्था ट्रस्ट आणी भारतीय नागरिक या सर्वांकडे मिळून २०००० ते २२००० टन  सोने असावे. या पैकी काही प्रमाणांत तरी सोने या योजनेअंतर्गत जमा होईल असा अंदाज आहे. यामुळे सोन्याची आयात कमी होऊन CAD मध्ये सुधार होईल.
आता बँकांना या योजनेचा काय फायदा आहे ते पाहू.
(१)    अल्प मुदतीसाठी स्वीकारण्यांत आलेले सोने बँकांचे दोन महत्वाचे रेशियो म्हणजेच CRR (CASH RESERVE RATIO) आणी SLR (STATURORY LIQUIDITY RATIO) ठरवण्यासाठी विचारांत घेतले जाईल
(२)    बॅंका जमा झालेलं सोने जवाहिऱ्यांना कर्ज म्हणून देऊ शकतील. .त्यामुळे आपल्या व्यवसायासाठी सोने आयात करण्याची गरज कमी होईल.
तक्रार निवारण : GOLD DEPOSIT ACCOUNT विषयी असलेल्या ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण संबंधीत बँकेची ग्राहक तक्रार निवारण प्रक्रिया करेल. जर अजूनही ग्राहकाची तक्रार निवारण झाली नसेल तर तो रिझर्व बँकेच्या OMBUDSMAN कडे दाद मागू शकेल.
याबरोबरच सरकार SGB (SOVEREIGN GOLD BONDS) ही आणत आहे या SCB  मध्ये निवासी भारतीय, ज्या मध्ये हिंदू अविभक्त कुटुंब, ट्रस्ट, विद्यापीठ आणी धर्मादाय संस्था यांचा समावेश असेल.
(१)    हे SGB १ ग्रॅम  सोन्याच्या वजनाचे आणी त्याच्या पटींत असतील कमीतकमी bond २ ग्राम्स.  वजनाच्या स्वरूपांत असतील.मार्केटमध्ये प्रचलीत असणार्या सोन्याच्या भावाप्रमाणे याची किमत असेल.
(२)    हे SGB ८  वर्षे मुदतीचे असतील.आपण पांच वर्षानंतर या SGBचे पैसे परत मागू शकता.
(३)    या SGB  वरील व्याजाचा दर वेळोवेळी सरकार ठरवेल. व्याजही रुपयाच्या स्वरूपातच मिळेल.या SGB वरील व्याजाचा दर सरकारने २.७५% SGB च्या खरेदी किमतीवर जाहीर केला आहे व्याज दर सहामाहीला दिले जाईल.
(४)    या SGB ची परतफेड रुपयांतच होईल. पण ही रक्कम त्यावेळेला जो सोन्याचा भाव असेल त्याप्रमाणे केली जाईल.
(५)    एक व्यक्ती एका वर्षांत जास्तीतजास्त ५०० ग्रामचे SGB विकत घेवू शकते.
(६)    हे SGB हे सर्व बॅंका पोस्ट ऑफिसेस NBFC येथे आणी  सरकार ठरवेल त्या ठिकाणी उपलब्ध होतील.
(७)    या SGB वरील कॅपिटल गेन्स कराची आकारणी सोन्यावरील कॅपिटल गेन्स कराप्रमाणेच होईल.
(८)    सोन्याच्या किंमती वाढल्या तर जे नुकसान होईल त्यासाठी GOLD RESERVE FUND स्थापन करण्यांत येईल. हा तोटा सरकारनेच सोसायचा आहे.
(९)    जर सोन्याच्या किंमती कमी झाल्या तर गुंतवणूकदारांना SGB तीन वर्षांकरता रोलओव्हर करता येतील.
(१०)    SGB वरील कॅपिटल गेन्स करांत काही सूट द्यावी कां? याचा विचार २०१६ -१७ या वर्षीच्या अंदाजपत्रकांत केला जाईल
(११)    हे SGB STOCK EXCHANGES वर लिस्ट होतील आणी तेथे त्यांची खरेदी विक्री होईल.  .
(१२)    सरकार या योजनेअंतर्गत जमा झालेल्या सोन्याचा लिलाव करेल किंवा रिझर्व बँकेच्या सोन्याच्या साठ्यांत भर टाकेल.
(१३)    १९९९ मध्ये जी GOLD DEPOSIT SCHEME आली होती त्याचीच जागा आता GOLD MONETISATION SCHEME घेईल. पण पूर्वी ज्यांनी १९९९च्या योजनेत सोने ठेवले होते त्यांना घाबरण्याचे कारण नाही त्यांच्या DEPOSIT च्या  MATURITY DATE पर्यंत १९९९ ची योजनाही सुरु राहील.
ह्या वर्षी केंद्र सरकार अशोक चक्र असलेली सोन्याची नाणी आणी भारतीय BULLION BARS विक्रीसाठी आणणार आहे. सोन्याची नाणी ५ ग्राम्स, १० ग्राम्स, आणी २० ग्राम्सची असतील. स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाली तरी आपण विदेशी सोन्याची नाणी आणी BULLION BARS वापरत आहोत. त्यामुळे यांत बदल व्हायला हवा असे सरकारला वाटले. SECURITY PRINTING AMD MINTING CORPORATION OF INDIA LTD. ही संस्था ५ ग्राम्स वजनाची २०००० नाणी, १० ग्राम्स वजनाची ३०००० नाणी काढणार आहे. ही नाणी बँकांच्या शाखांतून आणी पोस्ट ऑफिसमधून  धनत्रयोदशीपासून मिळायला सुरुवात होईल.
POLARIS या कंपनीतील ५३% स्टेक VIRTUSA या विदेशातील कंपनीने विकत घेतला. MERICO या कंपनीने १:१ या प्रमाणांत बोनस शेअर्स जाहीर केले. MERICO या कंपनीचे रिझल्ट्स समाधानकारक आलेवीज वाटप करणाऱ्या राज्य सरकारच्या कंपन्याचे चिघळलेले प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने ‘उदय’ योजना जाहीर करून केला. यामुळे बँकेच्या DISCOM (वीज वाटप करणाऱ्या राज्य सरकारच्या कंपन्या) ला दिलेल्या कर्जांतील NPA चे प्रमाण कमी होईल कारण त्यांना कर्जाच्या रकमेएवढे राज्य सरकारने हमी दिलेले bonds जारी केले जातील.
आज DR रेड्डी’S  या कंपनीच्या आंध्र आणी तेलंगणा प्रदेशातील युनीट्स्ला USFDAने  वार्निंग लेटर पाठविले. या बातमीमुळे हा शेअर Rs ५०० ते ६०० रुपये पडला. अशी कोणतीही परिणामकारक बातमी असेल त्यावेळी short करण्यामध्ये धोका कमी असतो. अशा वेळेला इंट्राडे ट्रेड होऊ शकतो. चांगल्या किंवा वाईट बातमीचा मागोवा घेवून इंट्राडे केल्यास नुकसान होण्याची शक्यता कमी असते.
रविवारी बिहार निवडणुकीचे रिझल्ट्स लागतील त्यामुळे सोमवारपासून मार्केटमधील अनिश्चितता नाहीशी होईल. मार्केट नाहीतरी गेला आठव्दाभात अनेक तर्क कुतर्कांच्या तावडीत सापडल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे नाचून दमले आहेच ते स्थिर होईल त्यामुळे कोणती दिशा घेईल त्यानुसार ट्रेड करणे सोपे जाईल.  काय होते ते बघू या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.