आठवड्याचे समालोचन – ९ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर – दिव्या दिव्या दिपत्कार, लक्ष्मीचा होवो साक्षात्कार

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

"Diwali Diya". Licensed under CC BY-SA 2.0 via Commons - https://commons.wikimedia.org/wiki/File:Diwali_Diya.jpg#/media/File:Diwali_Diya.jpg

“Diwali Diya”. Licensed under CC BY-SA 2.0 via Commons – https://commons.wikimedia.org/wiki/File:Diwali_Diya.jpg#/media/File:Diwali_Diya.jpg


या आठवड्यांत सगळ्यांचा मूड दिवाळीचा होता. ९ आणी १० नोव्हेंबरला मार्केट होते पण मी सुट्टी घेतली. फराळ करायचा होता ना ! मुलगा, मुलगी दिवाळीला येतात. त्यामुळे आनंदांत भर पडते. तुमची अवस्थासुद्धा माझ्यापेक्षा वेगळी असणारच नाही बरोबर ना ! तुम्हीसुद्धा दिवाळीची खरेदी, रोषणाई, फराळ यांत गुंतले असणार. आज दिवाळीचा शेवटचा दिवस ! या आठवड्यांत काय घडले त्याचा मागोवा घेवून पुढील आठवड्याची तयारी करु या.
गेल्या आठवड्यांत आपण बोललो होतो की बिहार निवडणुकांचा निकाल ‘चीत भी मेरी पट भी मेरी’ अशा पद्धतीचा असेल.म्हणजेच काय NDA जिंकली किंवा हरली तरी गुंतवणूकदारांचा फायदाच होणार निवडणुकीचा निकाल लागला. त्याची प्रतिक्रिया दोन प्रकारे उमटली. मार्केट ६०० पाईंट पडले. त्यामुळे शेअर्स स्वस्त मिळाले. त्याचबरोबर सरकारने आर्थिक सुधारणांचा वेग वाढवला. १५ सेक्टर FDI (FOREIGN DIRECT INVESTMENT) साठी खुले केले. आता आपण वेगवेगळ्या क्षेत्रांवर याचा काय परिणाम होईल ते बघू
बांधकाम
बाधकाम क्षेत्रांत कमीतकमी बांधकामाचा एरिआ, आणी कमीतकमी भांडवलाची अट तसेच बांधकाम प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याच्या अटी शिथिल केल्या.तसेच बांधकामाची प्रत्येक PHASE एक वेगळी प्रोजेक्ट म्हणून FDI साठी धरली जाईल. तीन वर्षाच्या LOCKINPERIOD नंतर किंवा जर त्याआधी प्रोजेक्ट पुरी झाली तर FDI WITHDRAW होऊ शकते. त्यामुळे आता अगदी छोट्या बांधकाम प्रोजेक्टमध्ये FDI येऊ शकेल. शहरे, MALLS, SHOPPING COMPLEXES, आणी उद्योग केंद्रे याच्या प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर त्यांच्या OPERATION आणी MANAGEMENT साठी १००% FDI ला परवानगी दिली आहे. FDI मध्ये LOCK IN PERIOD ची अट हॉटेल्स आणी टूरिस्ट रिसोर्ट तसेच हॉस्पिटल, स्पेशल इकोनॉमिक झोन, शिक्षणसंस्था, वृद्धाश्रम यांना लागू होणार नाही. तसेच ही अट NRI गुंतवणुकीला लागू होणार नाही.
संरक्षण
सरंक्षण क्षेत्रांत ऑटो रूट ने आता ४९% पर्यंत FDI येऊ शकेल त्यासाठी मंजुरी लागणार नाही. तसेच सरंक्षण क्षेत्रांत FII (FOREIGN INSTITUTIONAL INVESTMENT) FPI (FOREIGN PORTFOLIO INVESTMENT) तसेच FVCI ( FOREIGN VENTURE CAPITAL INVESTMENT) या प्रत्येकाची लिमिट वाढवून २४ % वरून ४९% पर्यंत वाढवली. परंतु यासाठी लागणारे आवश्यक ते सिक्युरीटी क्लीअरंस, तसेच सरंक्षण खात्याची आणी FIPB (FOREIGN INVESTMENT PROMOTION BOARD) यांची मंजुरी लागेल. तसेच आता असलेल्या कंपन्यामधील FDI २६% वरून ४९% पर्यंत वाढवायची असेल तर FIPB ची मंजुरी लागेल.
Aviation
सरकारने NON SCHEDULED हवाई वाहतूक सेवा आणी GROUND HANDLING सेवांमध्ये १००% FDI ला मंजुरी दिली आहे. तसेच REGIONAL हवाई सेवांमध्ये ४९% FDI ऑटो रूटने येण्यास परवानगी दिली आहे.यामुळे GROUND HANDLING सेवांमध्ये व्यावसायिकता आणी कुशल तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ लागेल.
बँकिंग
सरकारने खासगी क्षेत्रातील बँकांसाठी FDI, FII आणी NRI यासाठी असलेली वेगवेगळी मर्यादा काढून टाकून या सर्व प्रकारच्या परदेशी गुंतवणुकीसाठी एकूण मर्यादा ७४% पर्यंत वाढवली. याचा सर्वांत जास्त फायदा कोटक महिंद्रा बँक येस बँक आणी AXIS बँक यांना होईल.
मिडिया
बातम्या आणी वर्तमान घडामोडी यांच्या माहिती पुरवणाऱ्या कंपन्या तसेच FM RADIO वाहिनीना गव्हर्नमेंट रूट द्वारे ४९% FDI आणता येईल. केबल टी व्ही नेटवर्क( एम एस ओ, आणी एल एस ओ) , डी टी एच , टेलीपोर्ट, एच आय टी, आणी मोबाईल टी व्ही या प्रकारच्या सर्व प्रकारांत FDI ७४% वरून १००% पर्यंत वाढवले. यामध्ये ४९ % FDI ऑटो रूटने आणी ४९% पेक्षा जास्त FDI गव्हर्नमेंट रूटने येऊ शकेल.UPLINKING ऑफ नॉन-न्यूज आणी घडामोडी टी व्ही वाहिन्या आणी DOWN LINKING टी व्ही वाहिन्या यामध्ये १००% FDI ऑटो रूट ने करण्यास परवानगी दिलेली आहे.
Technology
उच्च तंत्रज्ञान वापरणाऱ्या आणी एकाच ब्रांड खाली आपला माल विकणाऱ्या कंपन्यांसाठी ३०% उत्पादन स्थानिक क्षेत्रातून आले पाहिजे ही अट पूर्णपणे शिथिल केली आहे. याचा फायदा APPLE, राडो, तसेच ROLEX या कंपन्यांना होईल.
Retail
ज्या एकाच ब्रांडखाली सर्वसामान्य लोकांसाठी आणी लोकांना फायदा होणाऱ्या कंपन्यांसाठी ३०% स्थानिक SOURCING ची मुदत स्टोर्स उघडल्यापासून सुरु होईल. याचा फायदा IKEA, H & M आणी PUMA या कंपन्यांना होईल. भारताच्या निरनिराळ्या प्रदेशांत घाऊक आणी किरकोळ व्यापारांत एकच कंपनी काम करू शकेल. याचा फायदा TOMMY HILFIGER, SWAROVASKEE, तसेच FURLA या कंपन्यांना होईल. ज्या भारतीय कंपन्या स्वतः ७०% उत्पादन करतात आणी राहिलेले ३०% उत्पादन स्थानिक उत्पादकांकडून घेतात त्या कंपन्याना आता त्यांची उत्पादने ऑनलाईन विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे.
इतर 
चहा कोफी रबर वेलची पाम तेल आणी OLIVE तेल यांच्या PLANTATION मध्ये १००% FDI ला परवानगी दिली आहे.
काही सेक्टर्समध्ये FDI ची लिमिट वाढवली. त्यामुळे भारतीय कंपन्यांत परदेशी गुंतवणूक वाढेल. याचा फायदा शेअरमार्केटला आणी अप्रत्यक्षपणे समाजाला होईल.
आता NRI (NON RESIDENT INDIANS) FDI कंपनी, लिमीटेड लायबिलिटी पार्टनरशिप, तसेच ट्रस्ट या वेगवेगळ्या ORGANIZATIONAL फॉर्ममध्ये आणू शकतात. ज्या क्षेत्रांत १००% FDI ला मंजुरी दिली आहे त्या प्रोजेक्टमध्ये वरील सर्वप्रकारच्या फॉर्ममध्ये NRI FDI अणु शकतात. यामुळे भारतामध्ये रोजगाराच्या संधी ,नवीन तंत्रज्ञान आणी दीर्घ मुदतीसाठी गुंतवणणूक उपलब्ध होईल आणी सरकारच्या ‘MAKE IN INDIA’ ‘SKILL DEVELOPMENT’ या सारख्या योजनांना वेग येईल अशी अपेक्षा आहे
आठवड्यातील मुख्य घडामोडी
धनत्रयोदशीपासून ‘GOLD MONETIZATION SCHEME’ सुरु झाली. या योजनेचा परिणाम समजण्यास उशीर लागेल.
पंतप्रधानांचा UK (UNITED KINGDOM) चा दौरा सुरु झाला. भारतीय रेल्वेसाठी लंडनमध्ये रुपयामध्ये BONDS इशु केले जातील. गुंतवणुकीबाबत बरेच करार होतील. Rs ९०००० कोटींचे आर्थिक करार झाले.
IIP चे आकडे जाहीर झाले. ६.३ वरून ३.६ झाले. CPI (CONSUMER PRICE INDEX) ४,४२ वरून ५ झाला. या आकड्यांकडे मार्केटने दुर्लक्ष केले नाही.
MSCI या जागतिक निर्देशांकांत समाविष्ट असणाऱ्या शेअर्समध्ये काही बदल केले. ASHOK LELYLAND, कॅडिला हेंल्थकेअर, मारुती, टाटा मोटर्स हे शेअर्स सामील केले.आणी DLF OIL INDIA हे शेअर काढून टाकले. चीनच्या बऱ्याच कंपन्यांचा समावेश या निर्देशांकात केला. याचा भारतीय कंपन्यांवर परिणाम होईल असे वाटते.. यामुले चीनचे वेटेज वाढेल आणी भरतीय कंपन्यांचे वेटेज कमी होईल.
सेबी ही शेअरमार्केटमधील व्यवहारांवर लक्ष ठेवणारी आणी गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यांत तत्पर असलेली संस्था आहे. SEBI (SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA ) ने IPO च्या लिस्टिंगची मुदत इशू बंद झाल्यापासून ६ दिवस केली. पूवी १९९० च्या सुमारास हा कालावधी ३ महिन्याचा होता आता SEBI ने तो कमी करत करत ६ दिवसांवर आणला आहे.या मुळे गुंतवणूकदारांचे पैसे कमी मुदतीसाठी गुंतलेले राहतील. इंडिगो या प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सचे या आठवड्यांत लिस्टिंग झाले. Rs ७६५ ला दिलेल्या शेअरचे लिस्टिंग Rs ८६५ ला झाले.त्यामुळे IPO मध्ये शेअर्स मिळालेल्या गुंतवणूकदारांचा फायदा झाला. गेल्या आठवड्यांत आलेल्या S H KELKAR LTD या कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग सोमवार तारीख १६ नोव्हेंबर २०१५ रोजी होईल.
इंडियाबुल्स हौसिंग फायनान्स या भारतीय कंपनीने OAKNORTH बँक या UKमधील बँकेमधील ४०% स्टेक Rs ६६० कोटींना विकत घेतला. ही खरेदी शेअर मार्केटच्या मते महागाईच्या भावांत झाल्यामुळे इंडियाबुल्स हौसिंग फायनान्स कंपनी या कंपनीचा शेअर पडला.
EROS INTERNATIONAL या कंपनीच्या कारभाराची दोन LAW कंपन्यांनी USA मध्ये चौकशी सुरु केल्याची बातमी आल्यामुळे या कंपनीचा शेअरही पडला.
मुहूर्त ट्रेडिंग
११ नोव्हेंबरला मुहूर्त ट्रेडिंग झाले. या मुहूर्त ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदारांनी उत्साहाने भाग घेतला.असे जाणवले. मार्केटमध्ये तेजी होती. १२ तारखेला पाडव्याची सुट्टी होती. १३ तारखेला शुक्रवारी सर्व आळस झटकून ट्रेडिंग करायचे असे मी ठरवले. तेव्हा माझ्या एक लक्षांत आलं की माणसाला सुटीच्या मूडमध्ये पटकन जाता येतं पण सुट्टीच्या मूडमधून कामाच्या मूडमध्ये येण्यास वेळ लागतो.असेच काहीसे माझे झाले. माझ्याप्रमाणेच सर्वानी त्यांचा आळस झटकला की नाही याविषयी मला शंका होतीच कारण शुक्रवारी भाऊबीज साजरी करायची होती.. त्यामुळे मार्केटमध्ये VOLUME कमी असणार. तुम्ही म्हणाल VOLUMEशी आम्हाला काय देणंघेणं ! अहो पण असं नसतं. जर VOLUME नसेल तर खरेदी विक्रीच्या किमंतीत खूप फरक असतो. तुम्ही शेअर खरेदी विक्रीला लावला तरी सौदा होता होत नाही. हीच गोष्ट सोप्या शब्दांत सांगायची ठरवली तर समजा तुम्ही दुकान छान डेकोरेट केलेत, माल नीट लावलांत, दुकान वेळेवर उघडले तरी गिऱ्हाईक हवे ना! नाहीतर दिवसभर माशा मारीत बसावे लागेल.खरोखरी असेच झाले. मार्केटमध्ये नेहेमीपेक्षा VOLUME कमीच होते.
मार्केटची दिवाळी
शुक्रवारी सर्व बातम्या खराबच आल्या. क्रूडचा साठा चौपट वाढला.त्यामुळे क्रूडचे भाव कमी झाले.  डॉलर निर्देशांक मजबूत झाला.म्हणजेच पर्यायाने रुपयाची किंमत कमी झाली. फेड व्याजाचे रेट वाढवेल ह्या भीतीची टांगती तलवार मानेवर लटकते आहे. या सगळ्या कारणांमुळे शुक्रवारच्या मार्केटमध्ये वातावरण गढूळलेले होते.
मार्केटच्या दृष्टीने दिवाळी फारशी चांगली गेली नाही. धनत्रयोदशीच्या दिवशी GOLD MONETISATION SCHEMEचा परिणाम होईल असे वाटले होते. पण बिहार निवडणुकीचाच जास्त परिणाम दिसला. १० तारखेलाही मार्केट फारसे सावरले नाही. ११ तारखेला मुहूर्त ट्रेडिंगमुले सर्वांनी उत्साह दाखवला. १२टाख़ःळाआ मार्केटला सुट्टी होती. १३ तारखेलाही फारसा उत्साह मार्केटमध्ये दिसला नाही. मार्केट्ची दिवाळी म्हणजे अनेक शेअर्सरुपी पणत्या ज्या कधी लुकलुकतात, कधी विझतात तर कधी तेजाने चमकतात. कोणत्या पणत्या चमकत आहेत व कोणत्या विझल्या आहेत व कां विझल्या आहेत याचे प्रत्येकाने निरीक्षण केले पाहिजे आणी त्याप्रमाणे योग्य ते बदल केले पाहिजेत.हेच मार्केट्ची दिवाळी आपल्याला सुचवीत असते. पुढच्या आठच्द्यांत मार्केटचा राग रंग कसा असेल ते पाहू.
 

5 thoughts on “आठवड्याचे समालोचन – ९ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर – दिव्या दिव्या दिपत्कार, लक्ष्मीचा होवो साक्षात्कार

 1. Pingback: आठवड्याचे समालोचन – १६ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर – मार्केटमधली संगीत खुर्ची | Stock Market आणि मी

 2. Ganesh Ghogare Post author

  Mala share market baddal jaast mahiti nahiye , mi eka broking company (ventura wealth) madhe online registration kel hoth nantar tyanni mala demat , aani trading account kadhnyasadhi 5000/- Rs. Cha cheque company chya nave kadhnyas sangitala .
  yachya madhe kahi frod tar nahi na . Mi kay karu?
  – madam intraday trading madhun kiti fayda milu shakto?
  – berojgarila option mhanun intraday kade paahu shakto ka?

  Reply
  1. surendraphatak Post author

   तुम्ही ब्रोकरला विचार कि हे ५००० rs कशासाठी मागितले जात आहेत? नंतर २-३ ठिकाणी चौकशी करा कारण माझ्या माहितीप्रमाणे तरी trading आणि dmat account मिळून २००० र्स वर लागत नाहीत. ते सुद्धा एकदाच बरायचे असतात.
   इंट्रा day मध्ये किती फायदा होणार हे तुमच्या गुंतवलेल्या भांडवलावर अवलंबून आहे. माझा सल्ला असा कि day ट्रेड मध्ये दोखा तितकाच आहे त्यामुळे ट्रेड सांभाळूनच करा. बेरोजगारी ला day ट्रेड हा पर्याय आहे असं मला वाटत नाही. day ट्रेड मध्ये तुम्हाला फायदा तसाच नुकसानहि होवू शकतं.

   Reply
   1. Ganesh Ghogare Post author

    ते म्हणतात कि ते 5000/- रू तुमच्या ट्रेडींग खात्यात जमा केले जातील .
    ट्रेडींग आणि डिमॅट खाती फ्री मध्ये उघडून मिळतील

    Reply
    1. surendraphatak Post author

     ते ५००० रुपये तुम्हाला वापरायला मिळणार कि deposit म्हणून ब्रोकर ठेवून घेणार याची चौकशी करा. दोन्ही पर्याय ठीक आहेत फ़क़्त माहिती असली म्हणजे झालं.

     Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.