Monthly Archives: December 2015

आठवड्याचे समालोचन – गाजराची पुंगी वाजली तर वाजली – २१ डिसेंबर ते २४ डिसेंबर

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Bhagyashree Phatak 1 (2)
या आठवड्यांत संसदेच्या शीतकालीन अधिवेशनाच्या लग्नाचे सूप वाजणार हे आधीच ठरलेलेच होते. मांडव घातला, वऱ्हाड आलं, आहेराची देवाण घेवाण झाली पण लग्नच लागले नाही. कोणतेही काम झाले नाही. सरकार आणी विरोधी पक्ष म्हणजे वर आणी वधू पक्षाकडील लोकांनी नुसत्या तक्रारी केल्या. पुढे लग्न कधी लावावे याची तारीख ठरवली इतकेच. बुधवारी हे सूप वाजले. पण मार्केटला काही फरक पडला नाही. जणू काही मार्केटने आधीच ठरवले होते गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली.म्हणजेच मार्केटमधील ट्रेडर्स आणी गुंतवणूकदार दोन्ही दगडावर पाय ठेवून होते. निर्णय झाला तरी वाहवा, नाही झाला तरी वाहवा! GST बिल पास होणार म्हणून लॉजिस्टिक, ऑटो, एफएमसीजी, कंपन्यांचे शेअर्स वाढले होते. आणी सिगारेट कंपन्यांचे शेअर्स पडले होते. आता बरोबर उलट परिस्थिती झाली. GST बिल पुढे ढकलले गेले. त्यामुळे जे शेअर्स वाढले ते पडायला सुरुवात झाली. जे पडले होते ते वाढायला सुरुवात झाली. नेहेमी प्रवाहाबरोबर असाल तर फायदा होतो. प्रवाहाच्या विरुद्ध बाजूने गेले तर त्रास होतो. म्हणूनच म्हणतात TREND IS FRIEND. मार्केट जुन्या गोष्टींचा आणी घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करत बसत नाही. पोझिशन बदलून पुढील मार्ग स्वीकारते. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असे तत्व स्वीकारत असते. जुन्या गोष्टी उगाळत बसत नाही नवे स्वीकारत असते आणी त्याचे समारंभाने स्वागत करून पुढे जात असते.
आंतरराष्ट्रीय घडामोडी

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या आठवड्यांत रशियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे संरक्षण क्षेत्रातील करार होतील असा अंदाज आहे. रिलायन्स डिफेन्स या कंपनीने रशियाबरोबर Rs ६६००० कोटींचे करार केले.
  • क्रूडच्या किंमतीमधील घसरण वाढतच चालली आहे. त्यामुळे CAD मध्ये सतत सुधार दिसत आहे. त्याचप्रमाणे क्रूड हा कच्चा माल किंवा कच्च्या मालातील एक घटक म्हणून वापरणाऱ्या कंपन्यांच्या फायद्यांत वाढ होत आहे. क्रूडचा भाव एका वर्षांत US $ ६५ वरुन एका वर्षांत US $ ३३ झाला.

सरकारी announcements

  • सरकारचे राज्यसभेमध्ये बहुमत नसल्यामुळे ‘सगळं कळतं पण काहीच वळत नाही’ अशी अवस्था झाली आहे. राज्यसभेतील गोंधळामुळे BANKRUPTCY बिल, रिअल्टी REGULATOR बिल, GST या महत्वाच्या कोणत्याच बिलाला मंजुरी मिळाली नाही. औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची बिल होती.
  • FIPB ने या आठवड्यांत Rs १२०० कोटींच्या ९ FDI प्रस्तावांना मंजुरी दिली. त्यांत कॅडिला हेंल्थकेअर आणी व्ही -मार्ट या कंपन्यांचा समावेश आहे.
  • समुद्रातून मिळणाऱ्या मासळीच्या उद्योगाला प्राधान्य देण्याचे सरकारने ठरवले आहे. त्यामुळे DEEP SEA FISHING करणाऱ्या कंपन्याना फायदा होवू शकतो . उदा :- अवंती फीड्स
  • सरकार वनविभागाचे नियम थोडे सौम्य करणार आहे त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यातील अडचणी कमी होतील.
  • बिहार राज्यामध्ये १५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या डीझेल वाहनांना बंदी घातली.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

  • USFDA कडून सन फार्माला त्यांच्या हलोल प्लांटसाठी वार्निंग नोटीस मिळाली.ही नोटीस त्यांना आधी एकदा मिळाली होती आता आलेली FOLLOWUP नोटीस होती. हे न बघताच किंवा त्याची शहानिशा न करताच लोकांनी शेअर्स विकले. कंपनीने स्पष्टीकरण दिले तेव्हा पुन्हा शेअर वाढू लागला.
  • एस्सार ओईलच्या डिलिस्टिंगचा सोमवारी शेवटचा दिवस होता. शेअर्स डीलीस्स्ट होण्यासाठी ९.७५ कोटी शेअर्स ऑफर व्हायला पाहिजे होते. पण दिवसअखेर ८.५७ कोटी शेअर्स ऑफर झाले होते. त्यामुळे शेअर्सचे डीलीस्टिंग होणार नाही अशी बातमी आली. कंपनीने प्रथम Rs १३० वर डीलीस्टिंग ऑफर आणली होती. ती नंतर सुधारून Rs १४६ केली. आता पुन्हा डीलीस्टिंगची ऑफर प्राईस वाढेल असे वाटून शेवटच्या १/२ तासांत शेअर्सची किंमत वाढली.बुधवारी मात्र बातमी आली की एलआयसीने डीलीस्टिंगच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या मिनिटात २ कोटी शेअर्स डीलीस्टिंगसाठी ऑफर केले होते, ते काही टेक्निकल कारणांमुळे वेळेच्या आंत डीलीस्टिंग साठी ऑफरमध्ये समाविष्ट होऊ शकले नव्हते. हे शेअर्स STOCKHOLDING CORPकडे होते. सेबीने निर्णय घेतला एल आय सी ने ऑफर केलेले शेअर्स डीलीस्टिंगसाठी ऑफर केलेल्या शेअर्समध्ये समाविष्ट करावेत. हे २ कोटी शेअर्स डीलीस्टिंगसाठी ऑफर केल्या गेलेल्या शेअर्समध्ये समाविष्ट केल्यामुळे कमीतकमी ९ कोटी शेअर्सच्या अटीची पूर्तता होऊन डीलीस्टिंग निश्चित झाले. यावेळी या शेअर्सची किंमत Rs २६२.८० होती. त्यामुळे याच किंमतीवर शेअर्स डीलीस्ट होतील असा अंदाज वर्तवला गेला. ज्यांच्या जवळ हे शेअर्स वर्षाहून अधिक काळ असतील त्यांनी हे शेअर्स मार्केटमध्ये विकले तर त्यांना कॅपिटल गेन्स tax लागणार नाही. पण जर तुम्ही तुमचे शेअर्स डीलीस्टिंग ऑफरमध्ये दिले तर तुम्हाला कॅपिटल गेन्स tax भरावा लागू शकतो.
  • लुपिन या फार्मा क्षेत्रातील कंपनीला त्यांच्या POTASSIUM ड्रग साठी USFDA ची मान्यता मिळाली
  • जनरिक औषध LINEZOLID साठी ग्लेनमार्क फार्मा या कंपनीला ANDA मंजुरी मिळाली.
  • ऑरोबिन्दो फार्मा या कंपनीला OPHTALMIC SOLUTION साठी USFDA ची मंजुरी मिळाली.
  • NBCC या कंपनीला AIIMS कडून Rs ३००० कोटींची ऑर्डर मिळाली.
  • गोदरेज ग्रूप डेअरी उद्योगातला स्टेक वाढवणार आहे. गोदरेज अग्रोवेटमधील स्टेक ५१% केला. यासाठी त्यांनी Rs १५१ कोटी खर्च केले.
  • टाटा स्टील आपला युरोपमधील LONG PRODUCT चा कारभार विकण्यासाठी ग्रे बुल कॅपिटल बरोबर संपर्क करीत आहे.
  • विप्रो, ‘VITEOS फंड सर्विसेस’ ही कंपनी US$१३ कोटीला खरेदी करणार आहे. विप्रो डेन्मार्कची ‘DEGIGNIT’ ही कंपनी विकत घेणार आहे.
  • IDEA या टेलिकॉमक्षेत्रातील कंपनीने आंध्रप्रदेश, तेलंगाणा, केरळ आणी कर्नाटक या चार दक्षिणेकडील राज्यांत 4G सर्विसेस लौंच केल्या.
  • RCOM आणी AIRCEL या कंपन्यांमध्ये मर्जर होण्यासाठी वाटाघाटी चालू आहेत.

पुढील आठवड्यांत येणारे IPO

  • या आठवड्यांत ALKEM LAB आणी DR लाल पाथ LAB यांचे बहारदार लिस्टिंग झाले. गुंतवणूकदारांना DR लाल पाथ LAB मध्ये ६०% तर ALKEM LAB मध्ये ३०% लिस्टिंग गेन्स झाले.
  • नारायणा हृदयालय हा ipo ८.५० वेळेला सबस्क्राईब झाला. या शेअर्सचे लिस्टिंग १ जानेवारी २०१६ला होईल.
  • लवकरच वोडाफोन ही टेलिकॉम क्षेत्रातील कंपनी IPO आणण्याच्या विचारांत आहे.
  • शेअर्ससाठी असलेले प्रायमरी मार्केट बऱ्याचशा काळानंतर पुन्हा तेजीत येत आहे.

कॉर्पोरेट एक्शन

  • या आठवड्यांत मेरिको इंडस्ट्रीज, VENKY’स हे शेअर्स एक्स बोनस झाले.
  • इंडिअन टेरेन या कंपनीचे शेअर्स एक्सस्प्लिट झाले.
  • टाईड WATER OIL या कंपनीने बोनस शेअर्स आणी शेअर्स स्प्लिट वर विचार करण्यासाठी १५ जानेवारी २०१६ ला बोर्ड ऑफ डायरेक्टरची बैठक बोलाविली आहे
  • ग्रीनप्लाय या कंपनीच्या शेअर्स स्प्लिट साठी ७ जानेवारी ही रेकॉर्ड डेट ठरवली आहे.
  • MOLDTEK या कंपनीची ४ जानेवारी २०१६ या दिवशी शेअर्स स्प्लिट साठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं
हा आठवडा नाताळच्या तयारीचा आणी २५ डिसेंबर पासून १ जानेवारी पर्यंत नाताळ साजरा करण्याचा. त्यामुळे म्युचुअल फंड MANAGERS रजेवर असतात. त्याचा शेअरमार्केटमधील VOLUMEवर परिणाम दिसतो. REDEMPTION च्या ही ऑर्डर असतात. या सगळ्याचा परिणाम म्हणून की काय छोट्या शेअर्सची चलती दिसते.हे माझे निरीक्षण आहे. शेवटी कोणी काहीही म्हणो शेअरमार्केटचे निरीक्षण तुम्ही जेवढे कराल तेवढा शेअर्सच्या किंमतीमधील हालचालीचा जास्त मागोवा घेता येतो.
ओळीने सुट्टी आल्यामुळे चार दिवस बॅंका बंद आहेत त्यमुळे शेअरमार्केटमध्ये व्यवहार करणाऱ्यांना लीक्विडीटीची समस्या येते. अशावेळी मार्केटमध्ये volume कमी आढळते. गेले पाच सहा दिवस जी RALLY सुरु आहे त्याला आल्टरनेट rally असे म्हणतात. म्हणजे एक दिवसाआड मार्केट मध्ये तेजी मंदीचा खेळ रंगतो.याचाच अर्थ शेअरमार्केटमध्ये व्यवहार करणारे लोक जास्त धोका पत्करण्यास तयार नाहीत असे जाणवते. अशा मार्केटच्या सुस्त वातावरणांत ट्रेड करणे कठीण जाते.त्यामुळे मी तरी जपूनच पावले टाकते. आपल्या सर्वांना नाताळच्या शुभेच्छा.

आठवड्याचे समालोचन – १४ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०१५ – FED सेट गो…

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

By U.S. Government [Public domain], via Wikimedia Commons

By U.S. Government [Public domain], via Wikimedia Commons

हा आठवडा थोडा उत्साह्वर्धक होता गेल्या आठवड्यांत लोकांनी आपली गुंतवणूक फेड रेट, आणी GST यातील धोक्यांचा विचार करून कमी केली होती. या अडचणीला सामोरे जाण्यासाठी सर्वप्रकारे तयारी केली होती. GST बिल पास होणार नाही आणी फेड ०.२५ बेसिस पाईंट रेट वाढवेल याचा लोकांना अंदाज होताच. ६-७ दिवस मार्केट थोड्याफार प्रमाणांत ढासळत असल्यामुळे मार्केट ओव्हरसोल्ड झाले होते. गेल्या काही वर्षांचा इतिहास पहातां फेडने रेट वाढवल्यानंतर मार्केटमध्ये तेजी येते असे निदर्शनास आले होते. आणी फेडने सुद्धा आपल्या पॉलिसी डॉक्युमेंट मध्ये आगामी वर्षांत आम्ही सारासार विचार करून आणी US अर्थव्यवस्थेचा राग रंग बघून  निर्णय घेऊ असे सूचित केले. त्यामुळे गुंतवणूकदार आश्वस्त झाले मार्केटचा मूड सुधारला. आणी त्याचे प्रतिबिंब दोन्ही निर्देशांकांत (BSE सेन्सेक्स, आणी NSE निफ्टी) दिसले
 
आंतरराष्ट्रीय घडामोडी

  • USA च्या (सेन्ट्रल बँक) फेडने त्यांच्या व्याजदाराच्या रेंज मध्ये ० ते .२५ पासून ०.२५ ते ०.५० बेस पाईंट अशी वाढ केली. त्यासाठी फेडने रिटेल इन्फ्लेशन ०.५%, बेकारी वाढण्याच्या रेट मध्ये ५% घट, आणी USA अर्थव्यवस्थेच्या GDP मध्ये गेल्या दोन तिमाहीत झालेळी २.५% वाढ आणी घरगुती खर्च, वाढती उद्योगधंद्यातील गुंतवणूक आणी हौसिंग क्षेत्रातील वाढती गुंतवणूक यामुळे USA अर्थव्यवस्थेला आलेली स्थिरता हे कारण दिले.फेडने आपल्या पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये सांगितले की २०१६ या वर्षांत आम्ही सावकाश आणी USA अर्थव्यवस्थेचा अभ्यास करून रेट वाढवण्याचा निर्णय घेऊ. फेडच्या या दरवाढीचा शेअरमार्केटवर प्रतिकूल परिणाम झाला नाही कारण आपल्या शेअर मार्केटने हा अंदाज घेवूनच हालचाल केली होती. त्यामुळे फेडने रेट वाढव्ल्याच्या दुसऱ्या दिवशी सेन्सेक्सने ३०९ अंकांची उसळी मारली.
  • USAच्या आमसभेने उच्चशिक्षित भारतीय IT व्यावसायिकांसाठी “ऑउटसोर्सिंग फी” US $ २००० वरून US $ ४००० पर्यंत वाढवली.यामुळे भारतीय IT क्षेत्रातील कंपन्यांवर US $ ४०० MILLION चा अतिरिक्त बोजा पडेल.याचा परिणाम इन्फोसिस,विप्रो, HCL- INFOTECH या कंपन्यांच्या शेअर्सवर होवू शकतो.
  • PARIS या फ्रान्सच्या राजधानी मध्ये हवामानाच्या संदर्भांत जो करार झाला त्याचा रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातील कंपन्यांना फायदा होईल असा अंदाज आहे.
  • नेपाळमध्ये रिअल जूसचे कंटेनर जप्त केले. हे कंटेनर डेटबार झालेले होते. याचा परिणाम डाबर या जूस उत्पादन करणाऱ्या कंपनीवर होवू शकतो.
  • अर्जेन्टिनाचे चलन ‘पेसो’चे २९% अवमूल्यन झाले त्यामुळे या देशाशी व्यवहार आणी व्यापार असणाऱ्या UPL, बजाज ऑटो, ADVANTAA या कंपन्यांवर परिणाम होवू शकतो.

सरकारी announcements

  • गेल्या आठवड्यांत सांगितल्याप्रमाणे RBI ने बँकांना ओव्हरनाईट, एक महिना, तीन महिने सहा महिने आणी १ वर्ष या ५ वेगवेगळ्या मुदतींसाठी बेंचमार्क रेट ठरवायला सांगितले. हे बेंचमार्क रेट एप्रिल १ २०१६ पासून अमलांत येतील.आणी दर महिन्याला प्रत्येक बँकेला हे रेट जाहीर करावे लागतील. कर्जावरील व्याजाचे दर ठरवण्यासाठी RBI ने ‘मार्जीनल कॉस्ट बेस्ड’ (MCLR) फॉरमयुला जाहीर केला. MCLR हे कर्जावरील रेट १ एप्रिल २०१६ नंतर दिल्या जाणाऱ्या कर्जांना लागू होतील. हे रेट केव्हा बदलण्यांत येतील हे बँकांना कर्जदारांना आधी सांगावे लागेल. बॅंका हे MCLR वर्षाने किंवा त्यापेक्षा कमी मुदतीनंतर बदलू शकतात. या फोर्म्युलामुळे RBIने रेट कमी केल्यावर बँकांना हा रेट कटचा फायदा कर्जदारांना त्वरीत देता येईल असा अंदाज आहे. तसेच यामुळे मुदत ठेवींवरील व्याज आणी कर्जांवरील व्याज यांची सांगड रिझर्वबँकेच्या रेटकट बरोबर घालणे सोपे जाईल. रिझर्व बँकेच्या ऑडीट रिपोर्टमध्ये असे निरीक्षण केले गेले आहे की काही बॅंका NPA कमी दाखवत आहेत तर काही बॅंका महत्वाची माहिती दडवायाचा प्रयत्न करत आहेत.
  • अर्थमंत्रालयाने आपल्या अर्धवार्षिक रिपोर्टमध्ये आर्थिक प्रगतीचे अनुमान १% ने कमी करून ७.५% केले. CPI ६% राहील. आणी वित्तीय घाटा ३.९% राहील. रेव्हेन्यू घाटा २.९ राहील.
  • सुप्रीम कोर्टाने आज आपल्या एका निर्णयान्वये डिझेलवर चालणाऱ्या SUV आणी 2000CC आणी त्यावरची इंजिन असणाऱ्या कार्सच्या रजिस्ट्रेशनवर दिल्ली आणी NCR मध्ये (NATIONAL CAPITAL REGION) ३१ मार्च २०१६ पर्यंत बंदी घातली. जे ट्रक दिल्लीला जात नसतील त्यांना दिल्लीत विनाकारण प्रवेश दिला जाणार नाही. ज्या ट्रकचे रजिस्ट्रेशन २००५ सालाच्या आधी झाले आहे ते ट्रक दिल्लीत प्रवेश करू शकणार नाहीत. १ एप्रिल २०१६ पासून दिल्ली आणी NCR मध्ये चालणाऱ्या सर्व TAXI CNG इंधनावर चालणाऱ्या असल्या पाहिजेत सुप्रिम कोर्टाने ग्रीन सेस दुप्पट केला.दिल्लीतील वाढते प्रदूषण कमी व्हावे या उद्देशाने ही उपाययोजना केली.  सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा सगळ्यांत प्रतिकूल परिणाम महिंद्र &महिंद्रा या ऑटो क्षेत्रातील कंपनीवर होवू शकतो.कंपनीने सांगितले की कंपनी सध्याच्या डीझेल कार्समध्ये पेट्रोलवर चालणारे इंजिन बसवण्याचा प्रयत्न करेल. तसेच कंपनीच्या इलेक्ट्रिक पॉवरवर चालणार्या कार्स लोकप्रिय होतील असा अंदाज व्यक्त केला.तसेच कंपनीने SUVKUV ही पेट्रोलवर चालणारी नवी SUV लौंच करण्याची घोषणा केली. या निर्णयाचा अनुकूल परिणाम (CNG च्या वापरांत वाढ होणार असल्यामुळे) इंद्रप्रस्थ gas, गुजरात gas, तसेच GAIL या कंपन्यांवर होवू शकतो.
  • केंद्रसरकार या शीतकालीन राज्यसभेच्या अधिवेशनांत GST पास करून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी त्यानी हवी तेवढी लवचिकता दाखविण्याची तयारी दाखविली आहे. पण आजच्या तारखेला तरी हे शक्य होईल असे वाटत नाही.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

  • मारुती लिमिटेडच्या अल्पसंख्यांक भागधारकांनी गुजरातमध्ये उत्पादन युनिट काढण्यासाठी सुझुकी मोटार कॉर्पोरेशनच्या १००% सबसिडीला मंजुरी दिली. या उत्पादन युनिटमध्ये सुझुकी कंपनी Rs८००० कोटी ते Rs. १०००० कोटी पर्यंत इक्विटी शेअर्सच्या माध्यमातून गुंतवणूक करेल.
  • HUL(हिन्दुस्थान युनिलीवर लिमिटेड) ही कंपनी हेअरकेअर क्षेत्रातील “इंदुलेखा” हा brand Rs.३३० कोटींना विकत घेणार आहे. हा brand आयुर्वेदिक केशतेल विकत असून केरळ, तामिळनाडू आणी कर्नाटकांत लोकप्रिय आहे..
    टी सी एस या IT क्षेत्रातील दिग्गज कंपनीने चेन्नईत आलेल्या पुरांमुळे प्रॉफिट कमी होईल अशी प्रॉफिट वार्निंग दिली. याचा परिणाम टी सी एस कंपनीच्या शेअरवर झाला.
  • इन्फोसिस ही कंपनी आपले तिसऱ्या तिमाहीचे रिझल्ट्स १४ जानेवारीला जाहीर करणार आहे. या कंपनीचे निकाल पुढे येणार्या निकालांची झलक दाखवतात. इन्फोसिस या कंपनीने व्हूप या कंपनीत २०% हिस्सा US $ ३० लाखाला खरेदी केला.
  • ILFS ENGG या कंपनीला गुजरातमध्ये मेट्रो रेल प्रोजेक्टची Rs ३७४.६४ कोटींची ऑर्डर मिळाली.
    ADAG (ANIL DHIRUBHAI AMBANEE GROUP) आपल्या कंपन्यांवरील कर्ज कमी करण्याच्या प्रयत्नांत आहे.
    जर्मन विमा कंपनी ERGO आपल्या HDFC बरोबरच्या विमाक्षेत्रातील जॉईट व्हेन्चर मधील स्टेक ४९% पर्यंत वाढवणार आहे.या साठी कंपनी Rs ११२२ कोटींची गुंतवणूक करेल हा स्टेक वाढवल्यानंतर standard लाईफ चा IPO येईल.
  • प्राज इंडस्ट्रीज ही कंपनी इथनोलवर चालणारी कार डिझाईन करण्याच्या प्रयत्नांत आहे.
  • दिलवाले आणी बाजीरावमस्तानी हे दोन्ही चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे या चित्रपटांच्या यशापयशाचा परिणाम INOX, PVR आणी EROS(INT) या कंपन्यांच्या शेअर्स किंमतीवर होईल.

Economyच्या गोष्टी

  • किरकोळ महागाई निर्देशांक CPI नोव्हेंबर २०१५ मध्ये ५.४१% ने वाढला. WPI -३.८१ ऐवजी – १.९९ % झाला. क्रूडच्या किंमतीत सतत घसरण होत आहे. सोने आणी चांदी यांच्या किंमतीतही घसरण चालू आहे.

पुढील आठवड्यांत येणारे IPO

  • गेल्या आठवड्यांत १० तारखेला बंद झालेल्या ALKEM LAB आणी DR. LAL PATH LAB या दोन्ही शेअर्सचे लिस्टिंग २३ डिसेंबर २०१५ रोजी होईल..
  • नारायणा हृदयालय हा IPO १७ डिसेंबर २०१५ ला ओपन झाला.हा IPO २१ डिसेंबरला बंद होईल. प्राईसband Rs २४५ ते Rs २५० असून मिनिमम लॉट ६० शेअर्सचा आहे.

कॉर्पोरेट एक्शन

  • ग्रीन PLY या कंपनीने शेअर्सचे स्प्लिट जाहीर केले. कंपनीच्या एका शेअरचे ५ शेअर होतील.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं
जे शेअर्स पडत असतील किंवा वाढत असतील त्यांच्या VOLUME कडे लक्ष द्यावे. वाढणार्या शेअर्समध्ये VOLUME जास्त असेल तर लोकांच्या भीतीचे प्रमाण कमी झाले आणी हाव वाढली असे समजावे.आणी पडणाऱ्या शेअर्समध्ये volume वाढला असेल तर भीती वाढली आणी हाव कमी झाली असे समजावे. हे हल्ली ‘फीअर आणी ग्रीड’ निर्देशांकाद्वारे दाखवले जाते. मार्केटचे निरीक्षण करताना कोणत्या शेअर्समध्ये मजबुती आहे? कुठे PULLBACK आहे ? कोठे shortcovering? तर कोठे news बेस्ड हालचाल आहे हे पहायला शिकावे.
पुढील आठवड्यामध्ये अधिवेशनाचे तीन दिवस शिल्लक आहेत. त्यांत काही बिल्स पास होण्याची शक्यता आहे GST बिल पास होण्याची आशा अजूनही लोकांनी सोडलेली नाही. ख्रिसमसच्या सुट्टीमुळे बाजारांत volume कमी असण्याची शक्यता आहे, बघुया काय होते ते पुढील आठवड्यांत.

आठवड्याचे समालोचन – ७ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०१५ – मार्केट्ची LOC(लाईन ऑफ कंट्रोल)

गेल्या आठवड्यापासून समालोचनाचा format थोडा वेगळा द्यायचा प्रयत्न आहे. हा नवीन format तुम्हाला समजायला सोपा जाईल हि आशा. तुमचा या नवीन format बद्दल जर काही अभिप्राय असेल तर जरूर comment करून कळवा.
आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
mktandme-logo1.jpg
गेल्या आठवड्यापासून मार्केट पडत आहे. ओळीने ६ दिवस पडले. त्यामुळे मार्केट बेअर्सच्या ताब्यांत गेले आहे असे वाटू लागले.जे शेअर्स पडत आहेत ते जबरदस्त volume ने पडत आहेत त्यामुळे मार्केट पडतच राहील असा अंदाज वर्तवला जात होता. मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांचा विश्वास ढळू लागला. फेड रेट वाढवणार आणी GST या शीतकालीन सत्रांत पास होणार नाही या दिशेने जमू लागलेले ढग यामुळे निराशा वाढली त्याचा परिणाम झाला. पण गुरुवारी अचानक काय झाले माहीत नाही. रीलायंसने पुढाकार घेतला आणी मार्केट सावरले. सलमानं खानची निर्दोष मुक्तता आणी मार्केटने घेतलेली २०० अंकांची उसळी या घटना एकापाठोपाठ घडल्या. तेजी करणाऱ्यांना विश्वास नव्हताच पण चित्रविचित्र बातम्यांमुळे मंदी करणाऱ्यांनाही विश्वास नाही. या आठवड्याच्या शेवटी BSE निर्देशांक सेन्सेक्स २५०४४ आणी NSE निर्देशांक निफ्टी ७६१० वर बंद झाले.  शुक्रवारी मार्केटने BSE निर्देशांकांने (सेन्सेक्स) दिवसभरांत २५००० ची आणी NSE निर्देशांक निफ्टीने ७६०० ची मेक ओर ब्रेक लेव्हल तोडून शेअर्सचे सैन्य मंदीच्या मैदानांत घुसवले. त्यामुळे बेअर्सची सरशी झाली. आता पुढील आठवड्यांत धोरणांत बदल करून ट्रेडिंग करावे लागेल असं दिसतय.
आंतरराष्ट्रीय घडामोडी

  • पुढील आठवड्यांत १५ तारखेला फेड या US(UNITED STATES ऑफ AMERICA) मधील सेन्ट्रल बँकेची मीटिंग होणार आहे. या मीटिंगमध्ये USअर्थव्यवस्था सुधारत असल्याने फेड व्याजाचे दर ०.२५% ने वाढवील ही जवळजवळ निश्चिती झाली आहे.
  • रेल्वे इंटरपोल स्थापन होणार आहे हल्लीच्या काळांत सर्व देशांत जे रेल्वेमध्ये अतिरेकी हल्ले झाले त्याला प्रतिबंध करण्यासाठी ही संस्था स्थापन केली जात आहे यांत २०० देश सामील होतील यातील सदस्य देशांना सुरक्षेच्या संबंधांत आंतरराष्ट्रीय युनियन ऑफ रेल्वेज माहिती देईल.
  • या आठवड्यांत जपानचे पंतप्रधान SHINZO ABE हे भारताला भेट देणार आहेत या भेटीत ‘BULLET TRAIN’ भारतांत चालू करण्या विषयी चर्चा चालू होईल. ही BULLET ट्रेन ३०० KM वेगाने मुंबई अहमदाबाद या मार्गावर धावेल. ही योजना पूर्ण व्हायला ६ ते ७ वर्षे वेळ लागेल आणी या साठी जपान $१५ BILLION कर्ज देईल.
  • पाकिस्तानांत आलेल्या पुरामुळे पाकिस्तानांत होणारी कापसाची निर्यात वाढली.

सरकारी announcements

  • सरकार GAS BASED स्टील प्लांटना मदत देण्याच्या विचार्रांत आहे. या कंपन्या एल एन जी वापरत असतील तर ५% आयात ड्युटी कमी करण्याचा विचार करीत आहे. याचा फायदा :-, JSW स्टील , एस्सार स्टील, PSL, वेलस्पन कॉर्प या कंपन्यांना होईल.त्याच बरोबर सरकारने मिनिमम निर्यात किंमत( MEP) ठरवली.
  • आज मंत्रीमंडळाने रिअल एस्टेट रेग्युलेटर बिल मंजूर केले. या बिलाप्रमाणे ५०० स्क्वेअर मीटर एरिआ किंवा ८ flats किंवा यापेक्षा जास्त एरिआ किंवा flats असलेल्या सर्व प्रोजेक्टचे रजिस्ट्रेशन करावे लागेल. FLAT ग्राहकांची संमती घेतल्याशिवाय प्रोजेक्ट आराखडा किंवा अटींमध्ये बदल करता येणार नाही. प्रोजेक्टसाठी जमा झालेल्या रक्कमेपैकी ५०% ते ७०% रक्कम वेगळ्या एस्क्रो अकौंटमध्ये ठेवावी लागेल. प्रोजेक्टसाठी जमा झालेला पैसा त्याच प्रोजेक्टसाठी जास्तीत जास्त वापरावा लागेल. बिल्डर्स आणी डेव्हलपरला दर ६ महिन्यांनी आपल्या अकौंटची तपासणी करावी लागेल. ग्राहकांनी पेमेंट करायला उशिर केल्यास किंवा बिल्डरने किंवा डेव्हलपरने POSSESSION देण्यास उशीर केल्यास दोघांनाही सारखीच पेनल्टी बसवली जाईल.
  • ज्यूट उद्योगाला उत्तेजन देण्यासाठी काही वस्तुंच्या पॅकेजिंगमध्ये ज्यूटचा वापर करण्याचे धोरण सरकार ठरवणार आहे.
  • डाळीचा बफर stock करण्यासाठी सरकारला परवानगी दिली.
  • PROVIDENT फंडावरील व्याजाचा दर वाढविण्याचा सरकार विचार करीत आहे.
  • ETHANOL वर आकारला जाणारा राज्य सरकारचा १.५% ते २% कर रद्द होण्याची शक्यता आहे.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

  • स्टरलाईट टेक्नॉलॉजी ही कंपनी आपला पॉवर बिझीनेस डीमर्ज करणार आहे. पॉवर बिझीनेसची किमत प्रती शेअर Rs २२ आहे आणी ती आताच्या शेअरच्या किंमतीत समाविष्ट आहे.
  • परदेशांत चहाच्या किंमती वाढल्या त्यामुळे चहा उत्पादन क्षेत्रातील कंपन्याचे भाव वाढले. उदा :- जयश्री टी, हर्रीसन मलयालम, मकलोईड रसेल,
  • क्रूडचे रेट ७ वर्षातील खालच्या पातळीवर गेले आणी पडतच राहिले याचा फायदा पेंट, टायर, विशिष्ट केमिकल्स उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना झाला आणी त्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती वाढल्या.
  • ग्लेनमार्क फार्मा आणी DR. रेड्डीज या फार्मा क्षेत्रांतल्या कंपन्या व्हेनीझूएला या देशाशी व्यवहार करतात. हा देश प्रामुख्याने क्रूडची निर्यात करणारा देश आहे. त्यामुळे सतत ढासळणाऱ्या क्रूडच्या किंमतीचा या देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या फार्मा कंपन्यांच्या बिझिनेसवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.
  • CESC या पॉवर उत्पादन क्षेत्रांत असणाऱ्या IPL ची टीम घेतली. CESC च्या सब्सिसिडीअरीने (न्यू रायझिंग) पुणे बेस्ड IPL टीम विकत घेतली पण हा सौदा त्यांना महागांत पडला.
  • टी सी एस या कंपनीला ओमान हौसींग बँकेकडून फायनानशिअल साफ्टवेअर साठी ऑर्डर मिळाली.
  • इन्फोसिस या कंपनीने इझरेलबेस्ड ‘CLOUDENDURE’ ही क्लाउड टेक्नोलोजीच्या क्षेत्रांत काम करणारी कंपनी विकत घेतली. या मुळे क्लाउड टेक्नोलॉजी या क्षेत्रांत काम करणे इन्फोसिसला सोपे जाईल.
  • आयनाक्स विंड या कंपनीने आंध्रप्रदेशातील सरायू विंड पॉवर ही कंपनी विकत घेतली.
  • स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांचा NSE (NATIONAL STOCK EXCHANGE) मधील १५% स्टेक Rs ६००० कोटीना विकणार आहे.

Economyच्या गोष्टी

  • रिझर्व बँकेने जाहीर केले की रिझर्व बँक १ जानेवारी २०१७ पर्यंत चार समान हप्त्यांत SLR (STATUTORY LIQUIDITY RATIO) मध्ये १०० BPची कपात करेल. SLR आता २१.५ % आहे. याचा अर्थ बँकांना त्यांच्या DEPOSIT पैकी २१.५% गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये गुंतवावे लागतात. आजच्या तारखेमध्ये बँकांचे SLR या पेक्षा जास्त पातळीवर असल्यामुळे (याला कारण म्हणजे कर्जासाठी असलेली कमी होत जाणारी मागणी) बँकांना या घोषणेमुळे फारसा फायदा होईल असे वाटत नाही.
  • CCI (COMPETITION COMMISSION OF INDIA) ने सिमेंट उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर कार्टलायझेशन करण्यासाठी Rs ६३०० कोटी रुपये penalty लावली होती. या कंपन्यांनी केलेल्या अपिलांत COMPACT(COMPETITION APPELLATE TRIBUNAL) ने या कंपन्यांवर लावलेली PENALTY रद्द केली.
  • BSE (BOMBAY STOCK EXCHANGE) यांनी असे जाहीर केले की ते आता प्रत्येक शेअरच्या किंमतीवर रोजच्या सर्किट बरोबर दर आठवड्यासाठी,दर महिन्यासाठी आणी दर तिमाहीसाठी सर्किट ठरवले जाईल. ही सर्किट जास्तीत जास्त किंमत आणी कमीतकमी किंमतीला लागू असतील.

पुढील आठवड्यांत येणारे IPO

  • इंडिअन टेरेन या कंपनीच्या शेअर्स चे स्प्लिट जाहीर झाले. या कंपनीच्या एका शेअर्सचे ५ शेअर होणार आहेत
  • IPO आणी लिस्टिंग :- NSE वर पिलानी इन्व्हेस्टमेंट या कंपनीचे लिस्टिंग झाले.
  • गेल्या आठवड्यातील IPO अल्केम lab हा इशू ४४ वेळा तर DR लाल पाथ lab हा इशू ३३ वेळा सबस्क्राईब झाले.
  • या आठवड्यांत ‘नारायणा हृदयालय’ या कंपनीचा IPO येत आहे. याचा प्राईस band Rs २४५ ते Rs २५० आहे.ही कंपनी या ipo द्वारे Rs ६०० ते Rs ६१२ कोटी रुपये उभारेल. हा ipo १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०१५ या अवधीत खुला राहील. ही कंपनी प्रसिद्ध हृदयतज्ञ DR देवी शेट्टी यांनी स्थापन केलेली असून ती ३१ शहरांमध्ये ३१ हॉस्पिटल्स आणी प्राथमिक सेवा केंद्रे चालवते. कंपनीचे उत्पन्न ३०% CAGR ने गेल्या चार वर्षांत वाढत आहे. कंपनी आपला बिझीनेस वाढवत असल्याने त्यांना वारंवार गुंतवणूक करावी लागते. कंपनी प्रगतीपथावर आहे. हा ipo येत असल्यामुळे अपोलो हॉस्पिटल्स, SRL डायग्नोस्टिक्स , इंद्रप्रस्थ मेडिकल, लोटस आय केअर, अगरवाल आय हे हॉस्पिटल्स क्षेत्रातील शेअर्स वाढले.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं
जेव्हां मार्केटमध्ये मंदी असेल किंवा अचानक मार्केट पडू लागले तर शेअर्स खरेदी साठी लावलेल्या ऑर्डर्स रद्द कराव्यात किंवा त्यांत वेळोवेळी मार्केटमधील हालचांलीप्रमाणे बदल करावा त्याउलट ज्यावेळी मार्केट तेजीत असेल तेव्हा विक्रीच्या ऑर्डर्स काढाव्यांत किंवा सुधाराव्यांत असे केल्यामुळे खरेदी स्वस्तात होते आणी शेअर्स चढ्या भावाला विकले जातात.

भाग ५९ – मूर्ती लहान कीर्ती महान :-PENNY STOCKS

आधीचा भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
source - wikipedia
आज आमच्या ऑफिसमध्ये मजाच आली. दुपारचे १२ वाजले आणी आमच्या ट्रेडिंगचे ही बारा वाजले. कनेक्टिविटी गेली . त्यामुळे करणार काय गपा सुरु झाल्या. शंकरराव म्हणाले “टी सी एस multibagger झाला. १० पट पैसे गुंतवणूकदारांना मिळाले. रिलायंसवाले मात्र झोपले.”
यावर अरिहंत म्हणाला “अरे ए ! टी सी एस ने १० पट दिले पण माझा शेअर तर १०० पट वाढला “
रोहन म्हणाला “ कसं शक्य आहे ? अहो हे शेअरमार्केट आहे येथे काहीही शक्य आहे.. तुझ्या शेअरची किंमत Rs १ आहे की १० पैशे आहे.”
अरिहंत म्हणाला “ काही कां असेना १०० पट वाढला ना म्हणजे तेव्हढे टक्के फायदा झाला की नाही.”
आता काकाही कशाला मागे राहतात ते म्हणाले “ हे अगदी बरोबत्र !सोन्याचे हिऱ्याचे दागिने घालून फिरणाऱ्या बायका आहेत त्याबरोबर सोन्याला लाजवतील असे घडनावळीच्या पैशांत सुंदर खोटे दागिने घालणाऱ्या बायका आहेत”
मी म्हणाले “चलतीका नाम गाडी हो काका ! खटारा असो किंवा आलिशान गाडी असो इच्छित स्थळी पोहचवते तेथपर्यंत ठीक पण खटारा कधी बंद पडेल आणी फेकून दयावा लागेल याचा भरवसा नसतो तसे असतात हे १० पैसे किंवा ५ रुपये किंमत असणारे शेअर्स.! पावसाळ्यांतील भुइछत्र्या या ! कधी नाहीश्या होतील याचा भरवसा नसतो तसे असतात. हे पेनी शेअर्स “
पेनी stocks ट्रेडिंग मधील दर्दी असलेला अरिहंत म्हणाला “ अहो जजमेंट हवे. पावसाला थांबण्याच्या आंतच पावसाळी भाज्या स्वस्त मिळतात त्या घ्यायच्या एवढा विवेक असला पाहिजे. “A penny INVESTED IN TIME EARNS A POUND” म्हणतात ते खोटे नाही टक्केवारीच्या हिशेबांत मला थोड्या पैशांत बराच मोठा फायदा मिळतो.”
मी म्हणाले “ शेअर मार्केटचे इच्छीत स्थळ म्हणजे नफा मिळविणे. तो तुला मिळतोय नां मग झाले तर ! पण मी त्याच्याकडून काही युक्तीच्या गोष्टी शिकले त्याच तुम्हाला सांगते. “
पेनी म्हणजे लहान stock . शेअर लहान म्हणजे अतिशय कमी मार्केट किंमत असलेला शेअर. ह्यालाच मायक्रो कॅप stock किंव SMALLSTOCK कॅप म्हणतात. USA मध्ये US डॉलर ५ पेक्षा कमी मार्केट किंमत असलेल्या शेअरला पेनी stock म्हणतात तर UK मध्ये ज्या शेअरची मार्केट किंमत १ GBP(GREAT BRITAIN POUND) पेक्षा कमी असेल त्याला पेनी stock म्हणतात. तर भारतांत Rs १० पेक्षा कमी मार्केट किमत असलेल्या व Rs १०० कोटींपेक्षा कमी मार्केट कॅपीटलायझेशन असलेल्या कंपनीच्या शेअर्सला पेनी stocks म्हणतात. BSE वर Rs १० च्या आंत किंमत असणारे ७२५ आणी NSE वर ३५५ तर BSE वर Rs २०च्या आंत किंमत असणारे ११७१ शेअर्स आणी NSE वर १८९ शेअर्स आहेत. पेनी stockची ही व्याख्या थोडीशी गोंधळात टाकणारी आहे बऱ्याच वेळेला मोठ्या कंपन्यांचे शेअर्स अगदी कमी किमतीला ट्रेड होत असतात आणी अगदी लहान कंपन्यांचे शेअर्सही जास्त भावाला ट्रेड होताना आढळतात.
पेनी stocks ची वैशिष्टे

  1. मार्केट प्राईस कमी असते
  2. मार्केट कॅपिटलायझेशन ( शेअर्सची संख्या x शेअर्सची मार्केट किंमत) कमी असते.
  3. लिक्विडीटी कमी असते. या शेअर्समध्ये उलाढाल कमी असते.
  4. लिमिटेड following.
  5. लिमिटेड disclosure
  6. व्यवस्थापनाची गुणवत्ता कमी असते.
  7. अपारदर्शक कॉर्पोरेट गव्ह्ररनन्स
  8. bad balancesheet and profit and loss account
  9. major market EXCHANGE मध्ये ट्रेडिंग न होता बर्याच वेळेला OVER THE COUNTER म्हणजेच OTC मध्ये किंवा PINK SHEET च्या माध्यमातून ट्रेडिंग होते.
  10. खरेदी आणी विक्रीच्या किमतीत खूप फरक असतो.
  11. प्रमोटर्स जास्त परिचित किंवा प्रसिद्ध किंवा तज्ञ नसतात.

नेहेमी शेअरमार्केटमध्ये एक तत्व आपण पाळत असतो. शेअर्सचे मूल्य बघावं त्याची किंमत बघू नये.परंतु जेव्हा तुम्ही पेनी stocksमध्येच व्यवहार करत आहांत तेव्हां मूल्य हा मुद्दा गौण ठरतो. आणी शेअर्सची किंमत हाच मुख्य मुद्दा ठरतो. या शेअर्सचे मूल्य शोधूनही सापडत नाही. पेनी stocksमधील ट्रेडिंग म्हणजे लॉटरीचे तिकीट घेण्यासारखे आहे. एखाद्याला बम्पर लॉटरी लागते त्याचवेळी बाकीच्या लोकांचे पैसे बुडतात. म्हणजेच पेनी शेअर्सच्या ट्रेडिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो पण मोठ्या प्रमाणावर तोटाही होऊ शकतो. या शेअर्सची किंमत Rs १० पेक्षा कमी असल्याने मोठ्या प्रमाणावर खरेदी करता येतात. हेच या शेअर्सचे आकर्षण होय. दोनतीन रुपयांचा शेअर पडून पडून किती पडणार असा विचार करून या भूलभुलैयामध्ये लोक अडकतात. पण जेव्हां या कंपन्या डीलीस्ट होतात तेव्हा तेलही गेले तूपही गेले हाती धुपाटणे आले अशी किरकोळ गुंतवणूकदाराची अवस्था होते. Rs १०० ला घेतलेल्या शेअरची किंमत Rs २०० व्हायला वेळ लागेल परंतु Rs २ किमतीचा शेअर Rs ४ पटकन होईल आणी आपल्याला १००% फायदा होईल असे वाटून गुंतवणूकदार या मोहजालांत अडकतात. हे शेअर कोणाच्याही खिशाला परवडतात त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदाराला पेनी stocks हा पैसे मिळवण्याचा सोपा मार्ग आहे असं वाटत.
या शेअर्समध्ये ट्रेडिंग कसे चालते.:-
हे शेअर्स प्रथम खूप मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जातात. नंतर त्यांत ट्रेडिंग करून त्या शेअर्समध्ये कृत्रिमरीत्या volume तयार केले जातं. यालाच ‘momentum’ असे म्हणतात. इमेल वरून, फोनवरून, वर्तमानपत्रातून, दूरदर्शनवरून, smsद्वारा, विश्लेषकामार्फत आणी तोंडी या शेअर्सविषयी बातम्या पसरवल्या जातात. किरकोळ गुंतवणूकदार या मोहजालांत फसतात. खरेदी वाढल्यामुळे शेअरची किंमत वाढते. फायदा दिसू लागताच ज्या लोकानी मोठ्या प्रमाणावर खरेदी केलेली असते ते लोक शेअर्स विकून टाकतात. या ट्रेडिंगच्या पद्धतीला pump and dump असेही म्हणतात. किरकोळ गुंतवणूकदाराना मात्र शेअर्स विकण्याची संधी मिळत नाही. कितीही धोके समजावून दिले तरीही, कितीही सुचना आणी वार्निंग दिल्या तरीही गुंतवणूकदार या शेअर्सकडे आकर्षित होतात. जर तुम्हालाहि अशा शेअर्समध्ये ट्रेड करण्याची तीव्र इच्छा झाली तर निदान पुढील गोष्टींकडे लक्ष द्यावे

  1. रिस्क रिवार्ड रेशियो पहावा
  2. गुंतवणुकीचे प्रमाण कमी ठेवावे.
  3. या शेअर्सच्या बाबतीत विश्वासार्ह माहिती मिळणे कठीण असते म्हणून काळजीपूर्वक निर्णय घ्यावा.
  4. हे शेअर्स बहुधा प्रमोटर्सजवळच असतात. त्यांना ते शेअर्स विकायचे असतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा शेअर्स विकायला जाता तेव्हा खरेदी करणारे मिळणे कठीण जाते.म्हणून ट्रेडेड volume बघावेत.
  5. ऑफिसमधल्या बातम्या, मित्रांचा सल्ला, दूरदर्शन, वर्तमानपत्र यातील टिप्स यावर अवलंबून न राहता स्वतः माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा.
  6. प्रमोटर्सचा स्टेक जास्त असला पाहिजे.
  7. कंपनीवर कर्ज किती आहे हे पाहा. आणी subsidiaries ची संख्या जास्त असेल तर कॉर्पोरेट गव्हरनन्सचा गोंधळ आहे कां ते पाहा.
  8. diversification चा नियम पेनी stocks च्या बाबतीत लागू होत नाही. त्यामुळे दोन किंवा तीन पेनी stocks मध्ये गुंतवणूक केली तर लक्ष देणे सोपे जाते.
  9. झटपट फायदा घेवून बाहेर पडावे. एक वर्षाच्या आंत विकल्यास कर भरावा लागेल हा विचार करत बसू नये. मिळणाऱ्या फायद्याचे गणित करून ताबडतोब शेअर्स विकून टाकावेत.
  10. या शेअर्समध्ये कधीही average करण्याच्या भानगडीत पडू नये.
  11. कोणावरही विश्वास ठेवू नये.
  12. ‘HIGH VOLUME’ असणारे पेनी stocks शोधा. एका दिवसाचे VOLUME बघण्याऐवजी एक महिन्याचे सरासरी VOLUME बघा.
  13. रात्रीतल्या रात्री कंपनी गुप्त होईल किंवा कंपनीचे डीलीस्टिंग होईल असे वाटल्यास अशा कंपनीच्या पेनी शेअर्स मध्ये गुंतवणूक करू नका.
  14. कंपनीच्या शेअर्सची किंमत RS २५ च्या जवळपास आणी मार्केटकॅप Rs ५०० कोटी असावी.
  15. पेनी शेअर्स झालेल्या कंपन्यांची उत्पादने किंवा सेवा आपल्याला परिचयाच्या असाव्यात.
  16. नियमित stockexchangeवर ट्रेड होणारे पेंनी stocks निवडा.
  17. हे शेअर short करू नका. आणी stoploss ठेवा.
  18. पोर्टफोलिओच्या ५% पेक्षा जास्त रक्कम या प्रकारच्या शेअर्स मध्ये गुंतवू नका.
  19.  यश मिळाले, फायदा झाला म्हणून पुन्हा पुन्हा त्या शेअर्समध्ये आंधळेपणाने ट्रेड करू नका.

पेनी stocks ची निवड कशी कराल :-
शेअरमार्केटमध्ये multibagger शेअर्स असतात असे लोकांनी ऐकलेले असते.तीन रुपये किंमतीचा शेअरही तीनशे रुपयाचा झालेल्याची उदाहरणे आहेत. यासाठी चोखंदळपणा आवश्यक आहे. कोणाकडून जर टीप मिळाली तर त्या बातमीची शहानिशा करा. कांरणे शोधा. शक्यतो कंपनी TURNAROUND होते कां ( तोट्यातून फायद्यामध्ये येते कां) कंपनीकडे असणारी मालमत्ता (जमीन, stocks, मशिनरी, तंत्रज्ञान, brand value) किती आहे ते पहा किंवा कोणी ती कंपनी विकत घेण्यास उत्सुक आहे कां याचा मागोवा घ्या.कंपनी नवीन उत्पादन मार्केटमध्ये आणते आहे कां ? कंपनीचा मार्केटशेअर वाढला आहे कां ? कंपनीने व्यवस्थापनामध्ये काही चांगले बदल केले आहेत कां ? कंपनीने कर्जफेड करायला सुरुवात केली आहे कां ? कंपनीच्या दृष्टीने कायदेकानुमध्ये अनुकूल बदल झाला आहे कां ? हे पहा. या कंपनीचा शेअर पेनी शेअर का झाला याची कांरणे शोधा. आणी कंपनी तोट्यांत जाण्यासाठी जबाबदार असणारी कारणे व्यवस्थापनाच्या हाताबाहेरची होती कां ते पहा. समजा कंपनीचे कामकाज जेथे चालते तो प्रदेश मायनिंग ban मध्ये आल्यामुळे कंपनीला तोटा झाला. आणी नंतर कायदे कानू बदलल्यामुळे मायनिंगला परवानगी मिळण्याची शक्यता निर्माण झाली किंवा उत्तराखंडमधील पुरासारखी नैसर्गिक आपत्ती आल्यास तोटा झाला व त्यातून कंपनी सावरू लागली आहे.
अशी काही उदाहरणे आपल्याला सांगतां येतील. ज्या मोठ्या मोठ्या कंपन्याचे शेअर्स परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर गेल्यामुळे पेनी stock झाल्या. उदा:- हिंदुस्थान CONSTUCTION,, रेणुका सुगर, जे पी असोसिएट, DLF SUZLON, UNITECH या कंपन्याच्या शेअर्सचा भाव कधीकाळी Rs १००० च्या आसपास होता हे सांगूनही विश्वास बसणार नाही. त्याविरुद्ध अशोक LEYLAND, मार्कसन फार्मा, क्वालिटी डेअरी या कंपन्यांचे शेअर्स अनुक्रमे Rs १२, ४, १२ अशा भावाला मिळत होते. त्यांची किंमत आता तीन आकडी झाली आहे.
बुल रन मध्ये अशा पेनी stocksचे पेव फुटलेले असते. कारण पेनी शेअरचे नशिब हे मार्केटमधील हालचालींवरच अवलंबून असते. अशा कंपन्यांची public scrutiny होत नाही, सेफ्टी कुशन कोणतेही नसते आणी मिनिमम standards ही नसतात . त्यामुळे ज्याला आगत असेल त्यानेच स्वागत केले पाहिजे.दक्षता घेतली पाहिजे.
म्हणजेच काय तर पेनी stocks चा रस्ता खाचखळगे असलेला, नागमोडी वळणांचा आहे त्यामुळे त्यावर जपूनच चालावे हे योग्य. चांगल्या आर्थिक आरोग्यासाठी काही पथ्य पाळावे लागते.
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आठवड्याचे समालोचन – ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०१५ – भित्यापाठी फेडचा ब्रह्म राक्षस

गेल्या आठवड्यापासून समालोचनाचा format थोडा वेगळा द्यायचा प्रयत्न आहे. हा नवीन format तुम्हाला समजायला सोपा जाईल हि आशा. तुमचा या नवीन format बद्दल जर काही अभिप्राय असेल तर जरूर comment करून कळवा.
आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
face-23887_640
रेट कट आणी GST च्या हिंदोळ्यावर झुलणारे मार्केट आपण गेल्या आठवड्यांत पाहिले. मार्केट्ची झुलण्याची हौस काही भागेना आणी गुंतवणूकदारांच्या जीवाला काही आराम मिळेना. एखादे हट्टी मुल जसे झोपाळ्यावरून खाली उतरायला तयार नसते, उंच उंच झोके घेते पण त्याच वेळी आईचा जीव मात्र टांगणीला लागतो. असेच काहीसे या आठवड्यांत झाले. BSE निर्देशांक सेन्सेक्स २५६८३ तर निफ्टी ७७८२ वर बंद झाले. आता हा मार्केटचा हट्ट आहे की चेष्टा आहे ते बघू या.
 
आठवड्याच्या ठळक बातम्या

  • US अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्यामुळे १५ डिसेंबरला होणाऱ्या मीटिंगमध्ये फेड दरवाढ जाहीर करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
  • IMF (INTERNATIONAL MONETARY FUND) युआन या चीनच्या चलनाला आपल्या “RESERVE CURRENCY BASKET मध्ये सामील करणार आहे. यामुळे चीनची युआन या चलनावर आंतरराष्ट्रीय पसंती मिळून चीन जागतिक प्रवाहात USA, युरोप आणी जपान याच्या बरोबर सामील होईल. यामुळे युआन हे चलन फ्रीली युजेबल आणी SDR (SPECIAL DRAWING RIGHTS) मध्ये US डॉलर, युरो, ब्रिटीश पौंड आणी जपानी येन बरोबर सामील होईल. ह्यामुळे चीनी उत्पादनांचे इतर देशांत DUMPING कमी होईल असा अंदाज आहे.

सरकारी announcements

  • सरकार आपल्या IDBI मधिल स्टेकपैकी १५% स्टेक IFC ला ( INTERNATIONAL FINANCE CORPORATION) विकण्याची शक्यता आहे. IDBI आणी IFCI या दोन्ही सरकारी संस्थांचा BSE ( BOMBAY STOCK EXCHANGE) आणी NSE (NATIONAL STOCK EXCHANGE) मध्ये स्टेक आहे. हा स्टेक या दोन्ही संस्था विकू शकतात. IDBI ने स्पष्ट केले की IDBI त्यांचा NSE आणी BSE मधील स्टेक विकणार नाही.
  • सरकारने असे स्पष्ट केले की ते खत आणी तत्सम उत्पादने करणाऱ्या कंपन्याना मदत करून नफ्यांत आणण्याचा प्रयत्न करेल. यामुळे FACT, मद्रास फरटीलायझर, NFL या लिस्टेड आणी हिंद फरटीलायझर या लिस्टेड नसलेल्या कंपन्यांचा फायदा होईल.
  • रिझर्व बँकेने आपल्या पॉलिसी मध्ये कोणत्याही रेटमध्ये बदल केले नाहीत. त्यांनी सांगितले की जरी गेल्या वर्षभरात RBIने १.२५% रेट कट केला असला तरी सरकारी तसेच खाजगी क्षेत्रातील बँकांनी सरासरी .६०% च या रेट कटचा फायदा पुढे कर्जदारांना कर्जाच्या दरांत कपात करुन दिला. या बँकांनी मुदत ठेवीवरचे दरही कमी केले. त्यामुळे आता RBI ने मार्जीनल रेटवर आधारीत बेस रेट निश्चित करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे यापुढे बँकांनी मुदत ठेवीवरचे व्याज दर कमी केले की आपोआप बँकेचा बेस रेट कमी होईल आणी पर्यायाने कर्जावरील दरही कमी होतील. हा बेस रेटचा फॉर्म्युला दोन दिवसांत बँकांना कळवला जाईल असे सांगितले.
  • RBI ने CPI CONSUMER PRICE INDEX) चे लक्ष्य २०१७ या वर्षांत ५% ठेवले आहे.
  • १६ डिसेंबरच्या मीटिंगमध्ये FEDने रेट वाढवले तर सरकार CAD ३.५% ठेवू शकते कां ? ते पाहून RBI पुढील निर्णय घेईल.
  • पुढील RBIची पॉलिसी फेब्रुवारी २०१६ मध्ये असल्यामुळे या वर्षांत आता रेट कट होण्याची शक्यता कमी झाली आहे.
  • SEBI ने असा प्रस्ताव ठेवला आहे की जर प्रमोटर्सनी IPOद्वारा उभारलेल्या पैशांपैकी ७५% पैसे ऑफर डॉक्यूमेंट मध्ये उल्लेखिलेल्या बाबींसाठी वापरले नाहीत तर ज्या शेअरहोल्डरना हे मान्य नसेल तर त्या शेअरहोल्डरकडील शेअर्स त्या त्या वेळी असणाऱ्या मार्केट प्राईसला प्रमोटर्सना BUYBACK करावे लागतील.
  • सरकार देना बँकेतील आपला स्टेक विकून Rs १००० कोटी उभारण्याचा विचार करत आहे
  • शिपबिल्डींग आणी कच्च्या मालावर कस्टम ड्युटी आणी एक्साईज ड्युटी रद्द केली हा निर्णय २४ नोव्हेंबर पासून लागू होईल.
  • सरकारने LED उद्योगाला उत्तेजन देण्यासाठी CFL वरील सबसिडी बंद केली आहे.हे दोन्ही प्रकार इलेक्ट्रिक ग्लोब शी संबंधीत आहेत

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

  • मोनेत इस्पात या कंपनीला दिलेल्या कर्जाचे शेअर्समध्ये रुपांतर करून कर्जदारांनी या कंपनीचा ताबा घेतला.
  • WOCKHARDT च्या चिखलठाणा युनिटला UK ने क्लीन चीट दिली
  • पी व्ही आर ही चित्रपट उद्योगातील कंपनी आपल्या स्क्रीन्सची संख्या वाढवणार आहे. CCIने डी एल एफ चा चीत्रपट प्रदर्शनाचा उद्योग आणी पीव्हीआर यांच्या एकत्र येण्याला हरकत नोंदविली आहे. कारण या करारामुळे साउथ दिल्ली मध्ये त्यांची मोनोपोली होईल.
  • VOLKSWAGEN या कंपनीने ३.२३ लाख कार्स ज्यामध्ये चुकीचे इंजिन बसवले आहे अशा कार्स परत बोलावल्या आहेत. कंपनी यातील चूक दुरुस्त करून EMISSION इशू येणार नाही याची काळजी घेणार आहे.
  • थंडीचे दिवस असल्याने हॉटेल कंपन्या आणी पर्यटनाशी संबंधीत असलेल्या कंपन्याचे शेअर्स तेजीत होते. उदा: हॉटेल लीला, EIH, कामत हॉटेल्स, रॉयल ORCHID, THOMAS KOOK आणी cox and किंग्स.
  • या आठद्यातील एक ठळक बातमी म्हणजे तामिळनाडूमध्ये अव्याहत कोसळणारा पाउस. या पावसामुळे टेलीकोम IT ऑटो (TVS मोटर्स, आयचर मोटर्स) विमान कंपन्या, तसेच तामिळनाडूमध्ये कारखाने असलेल्या सर्व कंपन्यांवर प्रतिकूल परिणाम झाला. उदा. चेन्नई पेट्रो, SRF ने मनाली प्लांट बंद केला.
  • डाबर कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले की त्यांच्या विक्रीपैकी काही वाटा नेपाळमधून येतो. नेपाळमधील ज्यूसच्या विक्रीवर नेपाल सीमाबाबत असणाऱ्या वादाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. विक्रीत १०% ते १५% घट होईल.
  • डीशमन फार्माच्या अहमदाबाद प्लांट साठी USFDA ने ४८३ फॉर्म दिला होता पण कंपनीने सुधारात्मक उपाय केल्यामुळे त्याना क्लीन चीट दिली.
  • SEBI ने U B होल्डिंगवर Rs १५ कोटींचा फाईन लावला.

पुढील आठवड्यांत येणारे IPO

  • या आठवड्यांत दोन IPO येत आहेत . (१) मुंबईतील अल्केम labs ही फार्मा क्षेत्रातील नफ्यात असणारी, DEBT FREE आणी दरवर्षी DOUBLE DIGIT प्रगती करणारी कंपनी आहे. ही कंपनी मुख्यतः भारतातच आपल्या उत्पादनाची विक्री करते. ही कंपनी ANTI INFECTIVES मार्केटमध्ये लीडर आहे.कंपनी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्येही पदार्पण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांनी आपली काही उत्पादने USFDA च्या मंजुरी साठी पाठवली आहेत. हा IPO ८ डिसेंबरला उघडून १० डिसेंबरला बंद होईल. प्राईस band Rs १०२० ते Rs १०५० असा आहे. ह्या IPO द्वारे Rs १३११ कोटी ते Rs १३५० कोटी उभारले जातील.
  • दुसरी कंपनी ही दिल्लीतील ‘DR.LAL PATH LABS. ’ही डायग्नोस्टिक हेंल्थकेअर सर्विसेस क्षेत्रातील DEBT FREE कंपनी आहे. ह्या उद्योगातील ही पहिलीच लिस्टेड कंपनी असेल. ही कंपनी हब and स्पोक सिस्टीमवर काम करते. ह्या कंपनीची एक मुख्य LABORATORY असून 150च्या वर ‘SATELLITE LABS’ आहेत. सर्व SATELLITE LABS’ मधून sample गोळा करून ते मुख्य LAB मध्ये टेस्टिंग साठी पाठविले जाते. डायग्नोस्टिक्स हेल्थकेअर उद्योगाची १६ ते १७ % प्रगती होईल असा अंदाज आहे.या IPOची प्राईस Rs ५४० ते Rs ५५० होईल असा अंदाज आहे.
    NSE वर LUX इंडस्ट्रीज ह्या होजियरी क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्सचे सोमवारी लिस्टिंग झाले.

 
या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं
GST, फेड रेट, आणी चेन्नईमध्ये आलेला अकाली पाउस आणी ECBने जाहीर केलेले पण अपेक्षेपेक्षा कमी आलेले PACKAGE या सर्व कारणांमुळे हा आठवडा तसा खराबच गेला. आठवड्याच्या बातम्या लिहून लिहून मी कंटाळले. एवढ्या वेगवेगळ्या बातम्या समजत होत्या. काही गोष्टींचा खुलासा शुक्रवारी मार्केट संपल्यानंतर होईल त्याचा परिणाम मात्र पुढील आठवड्यांत पहायला मिळेल. बघुया काय होते.