आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
गुरुवारी २८ जानेवारीला मार्केटची वेळ संपल्यानंतर मारुती LTD आणी ICICI बँकेचे डिसेंबर तिमाहीचे निकाल आले. निकाल अपेक्षेप्रमाणे असमाधानकारकच होते. त्यामुळे शुक्रवारी मार्केट खराबच उघडणार हे गृहीतच धरले होते. प्रीओपनमध्ये अपेक्षेप्रमाणे खराबच दर्शन झाले. पण दोनच मिनिटांत मार्केट सावरले. खरंच खूप आनंद झाला. मार्केटमध्ये तेजी आणी मंदी दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत.घेतलेले शेअर्स विकता येतात, नवे घेता येतात फायद्याचे लॉलीपौप गरजेचे असते. पण हल्ली सातत्याने मार्केट पडत आहे त्यामुळे कंटाळा आला होता. मार्केट सावरल्यामुळे नवी उमेद मिळाली. मार्केटने निफ्टी ७५५०ची मर्यादा ओलांडली.
आंतरराष्ट्रीय घडामोडी
- USA मध्ये लिझार्ड या नावाने आलेल्या बर्फाच्या वादळामुळे अपरिमित हानी झाली. या बर्फाच्या वादळामुळे थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे gas, पेट्रोल आणी पेट्रोलशी संबंधीत उत्पादनांची मागणी वाढली त्यामुळे सतत कोसळणाऱ्या क्रूडच्या किंमतीला थोडा दिलासा मिळाला.
- फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटी दरम्यान सिविल न्युक्लिअर एनर्जी, सरंक्षण, अंतरीक्ष आणी स्मार्ट सिटीज आणी इतर क्षेत्रातील सहकार्यासाठी १४ MOU सही केल गेले. यांत जैतापूर येथे सहा न्युक्लिअर REACTOR सुरु करण्याचा करार महत्वाचा आहे. ३६ राफेल जेट आणी त्यावरची संरक्षणयंत्रणा खरेदी करण्यासाठीही करार झाला.
- FED या USA च्या सेन्ट्रल बँकेने रेट न वाढवण्याचा निर्णय घेतला.
- चीनचे चलन युआनच्या किंमतीमध्ये यापुढेही घट होत राहील पण त्याचा वेग कमी राहील.
- जपानने –व्याजाचा दर निगेटिव्ह ०.१ असा जाहीर केला.
सरकारी announcements
- गोल्ड मोनटायझेशन स्कीमच्या अंतर्गत सरकारने ९०० किलो सोने जमवले. या अंतर्गत बँकेला २.५% कमिशन मिळेल.या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला.
- महाराष्ट्र राज्य सरकारने पेट्रोलमध्ये १०% एथनॉलं ब्लेंडिंग करायची परवानगी दिली. महाराष्ट्र सरकारने समुद्र किनाऱ्यालगतच्या भागांत शिपबिल्डींग आणी तत्सम उद्योगांसाठी जागा दिली जाईल असे जाहीर केले.
- IOC, BPCL, HPCL, आणी EIL या सरकारी क्षेत्रातील कंपन्या मिळून सगळ्यांत मोठी रीफायनरी महाराष्ट्रांत सुरु करणार आहे.
- इंजीनीअर्स इंडिया LTD या कंपनीची ऑफर फॉर सेल २९ जानेवारीला आणून सरकारने १०% स्टेक विकला. आता सरकारची हिस्सेदारी ५९% राहिली. या इशुची किंमत Rs १८९ ठरविली होती. ह्या ऑफर फॉर सेलला गुंतवणूकदाराचा चांगला प्रतिसाद मिळाला.
- सरकारने स्मार्ट सिटी योजनेखाली २० शहरांची निवड केली आणी या शहरांमध्ये सरकार Rs ४८००० कोटींची गुंतवणूक केली जाईल.
खाजगी कंपन्यांच्या घडामोडी
- HDFC बँकेचा तिमाही रिझल्ट त्यांच्या ख्यातीप्रमानेच चांगला आला. त्यांच्या प्रॉफीट मध्ये २०% वाढ झाली. रिटेल आणी पर्सनल तसेच लहान उद्योगासाठीच्या कर्जांत २९% वाढ झाली.बँकेने ६२६ नवीन शाखा उघडल्या.
- सुप्रीम इंडस्ट्रीज, स्पाईस जेट, फोर्स मोटार, पॉवर ग्रीड, जयश्री टी, टायटन, STERLITE टेक्नोलॉजी, येस बँक,GNFC या कंपन्यांचे तिमाही निकाल खूपच चांगले आले.
- ICICI बँकेचे तिमाही निकाल खूपच निराशाजनक आले NPA मध्ये जबरदस्त वाढ झाली तसेच NPAमधील वाढ पुढच्या तिमाहीतही चालू राहील असा इशारा दिल्यामुळे शेअरची किंमत खूपच खाली आली.
- मारुती ltd चे तिमाही निकाल खराब आले. jsw स्टील या कंपनीचे रिझल्ट निराशाजनक आले.
- लार्सेन & टूब्रोचे रिझल्ट चांगले आले. कंपनीच्या ऑर्डर इंफ्लो बद्दल चिंता होती. पण कंपनीने सांगितले की ऑर्डरफ्लो ११% राहिला तसेच कोणत्याही ऑर्डर्स रद्द झाल्या नाहीत.तसेच कंपनीने भविष्यासाठी गायडंस कायम ठेवला.
- M & M या सुस्थापित कंपनीने एअरबस या कंपनीबरोबर हेलीकॉपटर उत्पादनासाठी करार केला.
- ढासळत्या क्रूड प्राइसेसमुळे केर्न (इंडिया) चे तिमाही निकाल खूपच असमाधानकारक होते. पण क्रूडच्या किंमती वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत वाढण्याची शक्यता आणी वेदांतामध्ये केर्न(इंडिया) चे मर्जर, तसेच सरकार क्रूडवरील केस रद्द करण्याच्या किंवा क्रूडच्या किंमतीच्या प्रमाणांत आकारण्याच्या विचारांत आहे,केर्न (इंडिया) कडे आता Rs १४० प्रती शेअर एवढी कॅश आहे या गोष्टींचा केर्न (इंडिया)च्या वर अनुकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.
- कोकाकोला ही आंतरराष्ट्रीय कंपनी त्यांचा VALUEADDED डेअरी brand ‘VIO’ भारतांत लौंच करीत आहे
- DR REDDY’S या कंपनीला त्यांच्या मायग्रेनसाठीच्या इंजेक्शन साठी USFDA ची मंजुरी मिळाली.
कॉर्पोरेट एक्शन :-
- स्पार्क या कंपनीच्या Rs २५० कोटीच्या राईट्स इशूला SEBI ने परवानगी दिली.
- टाईड वाटर ऑईल या कंपनीने १;१ बोनस आणी एका शेअरची २ शेअर्समध्ये स्प्लिट जाहीर केले.
- MAX इंडिया ltd ही कंपनी डीमर्ज होऊन (रेकॉर्ड डेट २८/०१/२०१६ )खालील दोन कंपन्या अस्तित्वांत आल्या.
(१) TAURUS व्हेंचर्स (२) कॅप्रीकॉर्न व्हेंचर्स - MAX इंडियाच्या शेअरहोल्डर्सना त्यांच्या MAXINDIA च्या १ इक्विटी शेअर मागे १ इक्विटी शेअर ( Rs २ दर्शनी किमतीचा) TAURUS व्हेंचर्स चा.आणी MAX इंडियाच्या ५ इक्विटी शेअर्स मागे १ इक्विटी शेअर कॅप्रीकॉर्न व्हेंचर्सचा ( Rs १० दर्शनी किमतीचा) या प्रमाणे मिळतील.
- प्रीकोल ने प्रीकोल पुणे या आपल्या सबसिडीअरी मध्ये कंपनी मर्ज करण्याची घोषणा केली. एका प्रीकोल्च्या शेअर साठी एक प्रीकोल पुणेचा शेअर मिळेल.
- CAIRN इंडिया आणी वेदान्ता मधील मर्जरला वेदान्ता LTD च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने मंजुरी दिली
- जिंदाल स्टेनलेस हिस्सार या शेअरचे २८ जानेवारीला NSE वर लिस्टिंग झाले.
या आठवड्यांत येणारे IPO :-
- (१)प्रिसिजन कॅमशाफ्ट लिमिटेड :- हा इश्यू २७ जानेवारीला ओपन होऊन २९ जानेवारीला बंद होत आहे. या इशुसाठी प्राईस band Rs १८० ते Rs.१८६ आहे.या IPO द्वारे कंपनी Rs २४० कोटी भांडवल उभारेल. मिनिमम बीड लॉट ८० शेअर्सचा आहे. जानेवारी १ २०१६ पासून सेबीने ASBA ( APPLICATION SUPPORTED BY BLOCKED ACCOUNT) ही IPO मध्ये अर्ज करण्याची पद्धत अनिवार्य केल्यामुळे आपल्याला याच पद्धतीने IPO मध्ये आता अर्ज करावा लागेल.ही कंपनी ऑटो पार्टसचे उत्पादन करते. या क्षेत्रांत कंपनीला प्रगती करावयास भरपूर वाव आहे.त्यामुळे दीर्घ मुदतीकरता गुंतवणूक करायची असल्यास या कंपनीत गुंतवणूक करावी असे तज्ञाचे मत आहे.
- (२) टीम लीज ही कंपनी IPO द्वारे Rs ४०० कोटी ते Rs ५०० कोटी भांडवल उभारीत आहे. हा इश्यू २ फेब्रुवारी पासून होईल. ही कंपनी मोठ्या आणी सुस्थापित कंपन्यांसाठी स्टाफ रिक्रूट करते. आतापर्यंत या कंपनीने १.२ मिलियन लोकांची अशा प्रकारे नोकरीसाठी निवड केली आहे. या कंपनीने IPO साठी प्राईस band ७८५ ते ८५० असा ठेवला आहे. IPOच्या पैशातून कंपनी आपल्या IT INFRASTRUCTURE मध्ये अपग्रेडेशन तसेच इतर कंपन्या विकत घेण्यात गुंतवेल. ही कंपनी भारतातील सर्व प्रकारचे कर्मचारी पुरविणारी सगळ्यात मोठी कंपनी आहे.
- (३) THOMAS COOK या कंपनीच्या सबसिडीअरी क्वेस कॉर्प ने IPO साठी सेबीकडे अर्ज केला.
या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं
२ वर्षापूर्वी आम्ही रोज बघायचो अमेरिकन मार्केट, युरोपिअन मार्केट, आशियाई मार्केट कशी ओपन झाली कशी बंद झाली हे बघूनच ट्रेड करावा लागे.सध्या तशीच स्थिती चालू आहे. जगातील सर्व मार्केट तेजीत असली की भारतीय शेअर मार्केटही तेजीत असते .
स्टील सेक्टर मंदीत आहे. त्यामुळे या सेक्टरला दिलेली कर्जे बुडीत म्हणजेच NPA झाली आहेत. रिझर्व बँकेच्या सक्तीमुळे हे NPA आता उघड करावे लागले. यासाठी करायला लागलेल्या प्रोविजन मुळे काही बॅंका तोट्यांत जाण्याची शक्यता आहे पण झाले ते बरे झाले कोंबडी झाकून ठेवून कां कुठे उजाडायचे थांबते! स्वप्नापेक्षा सत्य कटू असले तरी सत्यांत जगणे कधीही चांगले.
२ फेबृआरीला रिझर्व बँकेची पॉलिसी आहे. व्याजदरांमध्ये कोणताही बदल करणार नाही असे सगळ्यांना वाटत आहे. परंतु रिझर्व बँक अंदाजपत्रकाच्या आधी व्याज दरांत काही बदल करणार आहे कां याचा अंदाज मार्केट घेत आहे. हे आपणही पुढील आठवड्यांत पाहुया.