आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

image source – TaxCredits.net
मार्केट सातत्याने पडत असल्यामुळे सगळ्या गुंतवणूकदारांचा मूड खराब झाला आहे. मार्केट पडते आहे म्हणून शेअर्स विकावे तर नेमकं त्या दिवशीच त्या शेअरचा भाव वाढून मनाला चुटपूट लागते. आणी एखादा शेअर खरेदी केला तर त्या शेअरचा भाव पडतो त्यामुळे आपल्याला अजून स्वस्तांत शेअर खरेदी करता आला असता चूटपूट लागून राहते. एकंदरीतच निर्णय घेण्यास कठीण असेच मार्केटचे वर्णन करावे लागेल.
आंतरराष्ट्रीय घडामोडी
- चीनच्या सेन्ट्रल बँकेने अर्थव्यवस्थेमध्ये १३००० कोटी युवान घातले
- क्रूडचा भाव सतत खाली येत आहे
सरकारी announcements
- NATIONAL SPOT SCAM मध्ये DEFAULTER असतील त्यांची जमीन सरकार लिलाव करून विकणार आहे.
- सरकारने ITDC च्या मालकीची १२ हॉटेल्स विकायला काढली आहेत. अजूनही भविष्यांत १८ हॉटेल्स विकायला काढणार आहे. त्याचप्रमाणे दीर्घ मुदतीसाठी लीजवर देण्याचा विचार करीत आहे.त्यामुळे ITDC चा शेअरची किंमत वाढली.
- 25 फेबृआरी २०१६ रोजी सरकारने रेल्वे अंदाजपत्रक सादर केले. या अंदाजपत्रकांत कंपन्यांच्या फायद्याच्या दृष्टीकोनातून फारसे काही आढळले नाही. सामाजिक गरजांना प्राधान्य दिलेले होते. त्यामुळे रेल्वे संबंधीत कंपन्यांच्या शेअर्सचे भाव झपाट्याने कोसळले.
- २६ फेबृआरी २०१६ रोजी इकोनोमिक सर्व्हे प्रसिद्ध झाला. या मध्ये बँकांना भांडवल पुरवले जाईल आणी या भांडवलाच्या रकमेत वाढ केली जाईल GDP ७% ते ७.७५% मध्ये राहील आणी फिस्कल तुट ३.५% असेल असे सांगितले गेले. CAD ( CURRENT ACCOUNT DEFICIT) १% ते १.५% आणी महागाईचा दर ४.५% राहील सांगितले गेले त्यामुळे गुंतवणूकदारांना थोडेसे हायसे वाटले.
- NPA विकत घेणाऱ्या ARC (ASSET RECONSTRUCTION COMPANY) मध्ये FII ना १००% गुंतवणूक ऑटोमटिक रूटने करण्यासाठी परवानगी दिली जाईल असा अंदाज आहे.
सेबी, रिझर्व बँकच्या गोष्टी
- सेबीने NSE (NATIONAL STOCK EXCHANGE) चा निर्देशांक निफ्टीमध्ये असणाऱ्या घटक शेअर्स मध्ये बदल केला. मार्केट कॅपमध्ये बदल झाल्यामुळे निफ्टीमधून काही शेअर्स काढून दुसरे शेअर्स घातले जातात. टाटा मोटर्स आणी टाटा मोटर्स DVR हे जरी दोन शेअर्स असले तरी एकाच कंपनीचे असल्यामुळे निफ्टीत ५० कंपन्या असतील पण ५१ शेअर्स असतील. निफ्टीमधील घटक शेअर्स सतत बदलले जात असल्याने निफ्टी 2002 आणी निफ्टी २०१६ मध्ये तुलना करता येणे कठीण होते. ज्या कंपन्या प्रगतीपथावर आहेत त्यांचे शेअर्स निफ्टीमध्ये घातले जातात आणी ज्या कंपन्यांची प्रगती दिसत नाही त्यांना निफ्टीमधून काढले जाते. या प्रकारे निफ्टीचा EPS कायम राखण्याचा प्रयत्न केला जातो.
- १ एप्रिल २०१६ पासून PNB, वेदान्ता आणी cairn (इंडिया) या कंपन्या निफ्टीच्या घटक असणार नाहीत. या कंपन्यांऐवजी ऑरोबिन्दो फार्मा, भारती इन्फ्राटेल, आयशर मोटर्स आणी टाटा मोटर्स DVR हे शेअर्स सामील होतील.
- टाटा मोटर्स DVR हा निफ्टीमध्ये सामील होणारा पहिला DVR (DIFFERENTIAL VOTING RIGHTS) शेअर आहे.
- टाटा एलेक्सी, पी सी जुवेलर्स, इंडो कौंट, के पी आय टी टेक्नोलॉजी, GRANUELS, कमिन्स या कंपनीचे शेअर्स F & O मध्ये सामील केले गेले.
खाजगी कंपन्यांच्या घडामोडी
- हरयाणामध्ये जाट लोकांचे आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे.यामुळे हायवे जाम झाले मालाचा, पुरवठा होऊ शकला नाही. याचा परिणाम मारुती आणी हिरो मोटो या कंपन्यांच्या कामकाजावर झाला. अर्थातच याचा परिणाम शेअर्सच्या किंमतीवरही झाला.
- दिवी’ज lab या कंपनीच्या प्लांटवर USFDA ने तपासणी केली.
- ‘MAX INDIA’ ४९% FDI गुंतवणुकीच्या परवानगीत बदल करून ही परवानगी ऑटोमटिक रूट ने द्यावी असा विचार चालू आहे. याचा अर्थ काय तर FDI नी गुंतवणूक करण्यासाठी सरकारी परवानगीची गरज असणार नाही.
- लार्सेन & टुब्रो ही कंपनी आपले नॉनकोअर बिझीनेस विकणार आहे. गेल्या वेळी चंदिगढ मधील हॉटेल विकले होते.
२३ फेबृआरीला मंगळवारी सरकार त्यांचा NTPC मधील ५% स्टेक OFS (OFFER FOR SALE) द्वारे विकला NTPC च्या OFS ची फ्लोअर प्राईस Rs १२२ होती. OFSला चांगला प्रतिसाद मिळाला. - रिलायन्स जियो २०१८ पासून PAN INDIA सेवा देणार आहे.
- DIAGEO या कंपनीने युनायटेड स्पिरीटच्या चेअरमनला म्हणजेच विजय मल्ल्या यांना US$ ७५ MILLION देण्याचे मान्य केले. विजय मल्ल्या यांनी युनायटेड स्पिरीट या कंपनीचे चेअरमनपद सोडले.या बातमीमुळे शेअरची किंमत मात्र वाढली.
- JP ग्रूप आणी ULTRATECH यांच्यातील ५३०० कोटी रुपयाचे डील रद्द झाले.
- नेईवेली लिग्नाईट या कंपनीला दोन कोळशाच्या खाणी ALLOT केल्या गेल्या.
- NMDC या कंपनीचा शेअर २४ फेबृआरी रोजी EX लाभांश झाला. या कंपनीने अंतरिम लाभांश Rs ९.५० प्रती शेअर जाहीर केला होता.
- REC या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीने Rs १२ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
- रेल्वेशी संबंधीत असलेल्या कंपन्याचे शेअर्स रेल्वे अंदाजपत्रकाकडून फारशा अपेक्षा गुंतवणूकदार ठेवत नसल्यामुळे पडले.
या आठवड्यांत येणारे IPO :-
- या आठवड्यांत क्विक हिल या कंपनीच्या IPO चे शेअर लिस्टिंग झाले. हे लिस्टिंग चांगले झाले नाही. Rs ३२१ इशू प्राईस असलेल्या या शेअरची किंमत २६ फेबृआरी २०१६ राजी Rs २००च्या खाली गेली.
या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं
मार्केट्ची रचना सतत बदलते आहे. ९० मार्क मिळालेलयाला ८९ मिळाले की अधोगती समजली जाते. परंतु ३५ मार्क मिळालेल्याला ३६ गुण मिळाल्यास प्रगती समजतात. तसेच काहीसे क्रूडच्या बाबतीत आहे. पूर्वी क्रूडचा भाव वाढला की मार्केट पडत असते आणी क्रूडचा भाव कमी झाला तर मार्केटमध्ये तेजी येत असे. पण सध्या बरोबर उलट परिस्थिती आहे. गेले वर्ष दीड वर्ष क्रूड सातत्याने पडत आहे ही गोष्ट भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने चांगली असली तरी जागतिक अर्थव्यवस्था मात्र कोलमडत आहे. त्याचा अप्रत्यक्षपणे भारताच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे आता क्रूडचा भाव वाढला की मार्केट वाढते आणी क्रडचा भाव कमी झाला की मार्केट पडते. याचाच अर्थ कोणतीही गोष्ट प्रमाणांत हवी. अती तिथे मातीच होते.
कोणत्याही वस्तूचा भाव खरेदी करणाऱ्याच्या आणी विक्री करणार्याच्या दृष्टीने योग्य हवा असे नसल्यास दर्शनी फयदा होत असला तरी खोलवर विचार केल्यास दीर्घ काळासाठी ते अपायकारक ठरते.त्यामुळेच घडणार्या घटनांचे निरीक्षण करून मगच निष्कर्ष काढणे योग्य ठरते. मार्केटच सर्वांत बुद्धीमान आहे हे पदोपदी पटते.
या आठवड्यात निफ्टी ७०२९ वर आणी सेन्सेक्स २३१२४ वर बंद झाले