आठवड्याचे समालोचन – ८ फेब्रूआरी ते १३ फेब्रूआरी २०१६ – भय इथले संपत नाही !

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

128px-CERO_fear

By CERO (CERO official site) [Public domain or Public domain], via Wikimedia Commons

सध्या शेअरमार्केटमधील वातावरण बदलले आहे. प्रत्येक गुंतवणूकदार हादरला आहे. शेअरमार्केट किती वाढेल किंवा किती पडेल हे कोणी कधीच अचूक सांगू शकत नाही. त्यामुळे शेअर अजून किती ढासळेल याचा प्रत्येकजण विचार करतो. ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ याला शेअरमार्केट तरी अपवाद कसा असेल ? सध्या खरे पाहता भारताची आर्थिक स्थिती चांगली आहे. पण जग जवळ आलेल्याचा हा दुष्परिणाम म्हणावा लागेल की जगांत काही वाईट घडले की त्याची झळ सगळ्यांना लागतेच.
क्रूडचा खेळ झाला खरा, दुसऱ्याची जिरवायला गेलं की स्वतःचीच जिरते असे झाले. क्रुडच्या भावातील सतत होणाऱ्या घटीचा परिणाम सगळ्यांना कारण नसताना सोसावा लागला. सध्या जगातील शेअरमार्केट पडत आहेत ती याच कारणाने.
क्रिकेटचा सामना असतो मग तो कसोटी सामना असो वनडे सामना असो की ट्वेन्टी ट्वेन्टीचा सामना असो. त्या प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर, सर्वोत्कृष्ट फलंदाज आणी सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणी त्या सामन्यांच्या मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडला जातो. तसे आज आम्ही मार्केट कोणामुळे पडलें हे शोधतो आहे. प्रत्येक दिवशी नायक शोधण्याऐवजी खलनायक कोण हे शोधतो आहे अशी स्थिति आली आहे.कोणीही उद्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. त्यामुळे मार्केटमधील ट्रेड क्लोज करण्याकडेच सगळ्यांचा कल आहे. सध्या मार्केट सुधारण्यासाठी अन्दाजपत्रकाशिवाय कोणतेही कारण दृष्टीपथांत नाही.
आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • येमेन आणी सौदी अरेबिया यांच्यांत युद्ध सुरु झाले तर उत्तर कोरिया आणी दक्षिण कोरिया यांच्यांत युध्दसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
 • क्रुडमधील पडझड थांबण्याचे नाव घेत नाही. सतत पडणार्या क्रूडच्या किंमतीमुळे ओएनजीसी, ओईल इंडिया आणी केर्न इंडीआ या कंपन्यांच्या कारभारावर गंभीर परिणाम झाले तसेच मध्यपुर्वेतील देशांबरोबर, तसेच रशिया आणी क्रूड ज्यांचे मुख्य उत्पनाचे साधन आहे अशा देशांच्या अर्थव्यवस्थेवर आणी पर्यायाने त्या देशांशी व्यवहार करणाऱ्या कंपन्याच्या कारभारावर परिणाम झाला.
 • फेडच्या अध्यक्ष जेनेट येलेन यांनी सांगितले की फेड रेटमधील वाढ करण्याचा विचार थोडा पुढे ढकलला जाऊ शकतो.
 • या आठवडाभर चीनचे शेअर मार्केट बंद होते.सोमवारी हे मार्केट उघडेल तेव्हा पुन्हा काय गोंधळ समोर येतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सरकारी announcements

 • LED टीवी , चहा PACKAGING मशीन आणी कॉफी मशीनवर आयात कर कमी करू असे आश्वासन दिले.
 • सरकारकडे सर्व राष्ट्रीयीकृत बॅंकातील NPA एकत्र करून ते ‘BAD BANK’ या नावाने उघडल्या जाणाऱ्या बँकेत बदली केले जावेत असा प्रस्ताव आला आहे. ’ BAD BANK ‘ स्थापन केल्यामुळे बँकांचे वसुलीच्या  कामाचा व्याप कमी होऊन त्यांना क्रेडीट ग्रोथवर लक्ष केंद्रित करता येईल अशी अशा आहे.BAD बँकेला वसुलीसाठी जास्त परिणामकारक अधिकार दिले जातील.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • अशोक leyland, कोल इंडिया, NCC, पंजाब and सिंध बँक, हिरो मोटो कॉर्प, या कंपन्यांचे तिमाही निकाल चांगले आले. तर ONCC, भेल, स्टेट बँक ऑफ इंडिया, आंध्र बँक, इंडिअन बँक, कॅनरा बँक याचे निकाल निराशाजनक होते.
 • HUL ( हिंदुस्थान युनिलीवर लिमिटेड) आपले नॉनकोअर बिझिनेस विकणार आहे (आटा चावल नमक)
 • विप्रो एक अमेरिकन हेल्थ कंपनी विकत घेणार आहे.

या आठवड्यांत येणारे IPO :-

 • शुक्रवारी टीम लीज या कंपनीचे शानदार लिस्टिंग झाले.
 • या आठवड्यांत बंद झालेला क्विक हील हा IPO ११ वेळा ओवरसबस्क्राइब झाला

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं
या आठवड्यांत निफ्टी ७००० च्या खाली गेला.शुक्रवारी ६८६९ पर्यंत मार्केट पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले. मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घबराट निर्माण झाली की रिझर्व बँकेच्या गव्हरनर आणी अर्थमंत्रालयातील लोकांना गुंतवणूकदारांना धीर देण्यासाठी यावे लागले. एकटा धावतो म्हणून दुसरा, दुसरा धावतो म्हणून तिसरा मग चालू होते पडापडी, चेंगराचेंगरी आणी मग अपघात मृत्यू यांचे तांडव सुरु होते. अशीच मार्केटची अवस्था आज आहे. आपण थोडे दिवस थांबलो तर तोट्यातून फायद्यांत येऊ एवढा विचार गुंतवणूकदार कां करीत नाहीत. कळत नाही नंतर मी उगीचच विकले असे म्हणत राहतात .याचे कारण म्हणजे अनामिक भीतीचे सावट.!
जेव्हा विक्री चालू होते तेव्हा कोणतेही तांत्रिक विश्लेषण उपयोगी पडत नाही.. ३ लाख कोटी रुपये एका दिवसांत केवळ भीतीपोटी नाहीसे झाले. कंपन्यांमध्ये, बॅंकामध्ये, आज एकाएकी काही फरक पडला कां ? तर नाही पण आभाळ फाटले आता ठिगळ कुठे लावायचे अशा चिंतेत लोक होते.
जगबुडी आल्यासारखी स्वतःची अवस्था गुंतवणूकदारानी करून घेतली आहे. काही समजत नसेल तर मार्केट्चे निरीक्षण करावे. जर पैशाची सोय असेल तर थोड्याफार प्रमाणांत खरेदी करावी. पण घाबरून जाऊन विकू नये. दोरी आहे की साप आहे हा विचार न करताच धावत सुटल्यास हातपाय मोडणारच, मार्केटमधील ही स्थिती कायम राहणार नाही. निफ्टी ६८००च्या आसपास मार्केट स्थिरावेल असे वाटते. परंतु प्राईसवाइज करेक्शन झाले आता किंमती वास्तवास धरून झाल्या पण याच स्तरावर मार्केट काही काळ घालवेल असे वाटते त्याचवेळी टाईमवाइज करेक्शन पुरे होईल. त्यामुळे घाबरून न जाता स्वस्थ राहणे योग्य.
BSE निर्देशांक सेन्सेक्स २२९८६ आणी निफ्टी ६९८० वर बंद झाले.

One thought on “आठवड्याचे समालोचन – ८ फेब्रूआरी ते १३ फेब्रूआरी २०१६ – भय इथले संपत नाही !

 1. Pingback: आठवड्याचे समालोचन – १५ फेब्रूआरी ते १९ फेब्रूआरी २०१६ – लहरी राजा, आंधळी प्रजा, अधांतरी दरबार,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.