आठवड्याचे समालोचन – १५ फेब्रूआरी ते १९ फेब्रूआरी २०१६ – लहरी राजा, आंधळी प्रजा, अधांतरी दरबार, उद्धवा अजब तुझे सरकार!!

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Stock market information in marathiया आठवड्यांत भल्या भल्यांना मार्केटचा कल समजत नव्हता. मार्केट ओवरसोल्ड वाटावे असेच होते. पण यापेक्षा जास्त पडणार कां ? याचेही उत्तर कोणाकडेही नव्हते. तेजी आली तर ती टिकणार कां ? याबद्दलची शंका… त्यामुळे मार्केटमध्ये अनिश्चित वातावरण होते. प्रत्येकजण या ना त्या कारणाने संभ्रमांत होता. त्यामुळे ३०० पाईंट मार्केट पडले की सुधारत होते आणी सुधारले की पुन्हा मार्केट पडत होते.
सोमवारी सर्वांना आश्चर्य वाटले असेल, की ज्या बँकाचे तिमाही निकाल सर्वांत खराब आहेत, त्या बँकांचे शेअर्स १०% ते १५% वाढले. याचे मुख्य कारण short कवरिंग (ज्या लोकांना असे वाटले की बँकांचे निकाल खराब आले आशादायी वातावरण नाही त्यामुळे त्यांनी short केले.म्हणजे मी पुर्वी सांगितल्याप्रमाणे शेअर्स जवळ नसताना आधी विकून टाकले. नंतर शेअर्सची किंमत कमी झाली की ते विकत घ्यायचे.) पण जशी जशी शेअर्सची किंमत वाढू लागली तसा तसा त्यांचा तोटा होऊ लागताच त्यांनी शेअर्स खरेदी करायला सुरुवात केली. हे सर्व पूर्वी मला सांगणारे कुणीच नव्हते त्यामुळे असे कसे घडले हे मला समजत नव्हते. मी मलाच बुद्धी नाही म्हणून स्वतःला कोसत असे.
सोमवारी हेच जाणवले की ५०० पाईंटच्यावर मार्केट वाढले तरी चांगल्या गुणवत्तेचे शेअर्स वाढत आहेत असे वाटले नाही. याउलट जे शेअर्स खूप पडले होते ते वाढत होते.
आंतरराष्ट्रीय घडामोडी

 •  क्रूड उत्पादन करणाऱ्या देशांची स्थिती खूपच खराब झाली आहे. ओपेक आणी गैर ओपेक देश एकत्र बसून क्रूडचे उत्पादन कमी करण्याच्या योजनेवर विचार करतील असे समजते पण बुधवारी इराक आणी व्हेनेझुएला यांच्यांत बैठक झाली. त्यानंतर इराण, इराक क्रुद्चे उत्पादन वाढवतील असे जाहीर झाले पण सगळीकडून क्रूडचे उत्पादन कमी करावे म्हणून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबाव आणला जात आहे.
 • युरोपिअन युनियनने चीन आणी रशिया कडून आयात होणाऱ्या स्टीलवरील anti dumping ड्युटी रद्द केली.
  चीनच्या मार्केटमुळे धातू क्षेत्रातील शेअर्स वाढले बँक ऑफ जपान आणी PBOC ( पब्लिक बँक ऑफ चायना) काही स्टीम्युलस देतील असे सांगितले जाते

सरकारी announcements

 •  सरकारने FTIL ( फायनानसियल टेक्नोलॉजी इंडिया लिमिटेड) आणी NSEL यांच्या मर्जरला मंजुरी दिली.
 • मुंबईमध्ये मेक इन इंडिया महोत्सावाचे पंतप्रधान नरेंद्र मोदिनी उद्घाटन केले . या महोत्सवांत ६५ देशांनी भाग घेतला आहे. या महोत्सवांत एकूण Rs २१००० कोटींचे MOU झाले. यांत ओरकॅल, कोकाकोला, रेमंड यांचे MOU झाले.
 • सरकारी बँकांत परदेशी गुंतवणुकीची सीमा ४९% पर्यंत वाढवली जाईल. टप्प्याटप्प्याने सरकार आपली हिस्सेदारी कमी करेल आणी तसे अन्दाजपत्रकांत जाहीर करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
 • बँकिंग सेक्टरमधील विविध अडचणींमुळे, कमी झालेल्या बँकांच्या शेअर्सच्या किमतीमुळे आणी बँकिंग क्षेत्रांत आलेल्या मंदीमुळे एल आय सी ला Rs १०३३६ कोटी नुकसान झाले. १४ सरकारी बँकांमध्ये एल आय सी ची १०% गुंतवणूक आहे
 • अंदाजपत्रकांत लॉंग टर्म कॅपिटल गेन्स्ची मुदत आताच्या १ वर्षाऐवजी ३ वर्षांची केली जाईल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी निराशाजनक बातमी आहे.
 • सरकारने सेबी चेअरमन U. K सिन्हा यांच्या पदाची मुदत एका वर्षांनी वाढवली.
 • २९ फेबृआरीला सदर होणारे वार्षिक अंदाजपत्रक हा आता मार्केटला खाली किंवा वर घेवून जाणारा एक महत्वाचा ट्रिगर आहे.सिमेंट आणी पेट्रोकेमिकल उद्योगांना या अंदाजपत्रकांत काही सवलती जाहीर होतील असा अंदाज आहे. तसेच विंड एनर्जी आणी एकूणच आल्टरनेट उर्जा स्त्रोताना अन्दाजपत्रकांत प्रोत्साहन अपेक्षित आहे.
 • अंदाजपत्रक सादर व्हायची तारीख जवळ आली की ज्या क्षेत्रांना अन्दाजपत्रकांत सवलती जाहीर होणार असतील ते शेअर वाढतात, आणी अंदाजपत्रक जाहीर झाल्यानंतरच्या वर्षभरांत कधीही शेअर्सच्या मैदानांत ते शेअर्स आढळत नाहीत त्याच गटांत येणारे रेल्वे आणी खताचे शेअर्स वाढले. अंदाजपत्रक म्हटले की शेती आणी शेतीवर आधारीत उद्योग, नोकऱ्या आणी स्वयंरोजगार वाढतील असे व्यवसाय, कुटिरोद्योग या सगळ्या क्षेत्रांचा विचार होतो. ज्यांना कुणाला ‘झट की पट’ खरेदी विक्री करणे जमत असेल त्यांनीच या शेअर्सच्या भानगडीत पडावं.
 • सुप्रीम कोर्टाने गेल्या पांच वर्षातील Rs ५०० कोटी आणी त्यापेक्षा जास्त कर्ज घेतलेल्या आणी कर्जाची परतफेड वेळेवर आणी नियमाप्रमाणे न करणाऱ्या सर्व कर्जदारांची माहिती रिझर्व बँकेकडून मागवली. त्याचप्रमाणे गेल्या पांच वर्षांत write-off केलेल्या कर्जांचीही यादी मागवली. ही माहिती कोर्टाने रिझर्व बँकेला सहा महिन्यांत द्यायला सांगितली आहे.त्यामुळे गुंतवणूकदारांना वाटले की आपलाही कोणी तरी वाली आहे.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • भारताची निर्यात सातत्याने नवव्या महिन्यांत कमी झाली. त्याचबरोबर आयात कमी झाल्याने CAD (CURRENT ACCOUNT DEFICIT) वर जास्त परिणाम झालेला नाही. WPI  (होलसेल प्राईस निर्सेशांक ) -.०९% कमी झाला.
 • निरनिराळ्या क्षेत्रातील कंपन्यांच्या निकालांत बॉटम लाईन ग्रोथ दिसते. कच्च्या मालाच्या किमती कमी झाल्यामुळे आणी मुख्यतः क्रूडच्या किमतीत घट झाल्यामुळे बॉटम लाईन ग्रोथ दिसते. टॉप लाईन ग्रोथ दिसत नाही कारण विविध कारणांमुळे ग्रामीण तसेच अर्धशहरी भागातील मागणी कमी झाली आहे आणी किंमातीवर परिणाम झाला आहे

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • अल्केम lab, लाल पाथ lab HPCL, BPCL यांचे तिमाही निकाल चांगले आले.
 • बँक ऑफ बरोडा, IDBI, PNB, आणी इतर राष्ट्रीयीकृत बँकांचे तिमाही निकाल अतिशय निराशाजनक आले. NPA झालेली होणारी वाढ आणी त्याकरता करावी लागणारी तरतूद यामुळे एकदोन अपवाद वगळता सर्व बँकांनी यावेळेला तोटा जाहीर केला. जखमेवर मीठ चोळावे त्याप्रमाणे आमचे मार्च २०१६ अखेरचे निकालही खराब येतील असे जाहीर केले.यांत सरकारी तसेच खाजगी बँकांचाही समावेश आहे.
 • बँक ऑफ बरोडा च्या CMD ने असे जाहीर केले की ‘आम्ही मार्चपर्यंतची NPA साठी आवश्यक असणारी सर्व तरतूद याच तिमाहींत केल्यामुळे आमच्या मार्च अखेरपर्यंतच्या निकालावर परिणाम होणार नाही. कॅपिटल ADEQUACY चांगली असल्यामुळे सरकारकडे भाग भांडवल मागण्याची वेळ येणार नाही. आणी तशीच जरूर वाटल्यास नॉनकोअर assets विकून पैशाची तरतूद करू शकू.’ या त्यांच्या स्टेटमेंट मुले बँक ऑफ बरोडाचा शेअर २३% वाढला.
 • सिप्ला, डेन नेटवर्क आणी ग्लेनमार्क फार्मा याचे FDI लिमिटसाठी असलेले प्रस्ताव मंजूर झाले.
 • पी एन बी ने यु बी होल्डिंग या कंपनीला आणी विजय मल्ल्याना विलफुल defaulter म्हणून जाहीर केले.
 • NMDCने Rs ९.५० प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.REC या सरकारी कंपनीने .Rs १२ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
 • टाटा स्टील ही कंपनी युरोप मधील आपला कारभार विकून कर्ज कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे.
 • बहुदेशिय कंपन्यांची रॉयलटी सातत्याने वाढवत असल्याने आणी भारतातील त्यांच्या कंपन्यांचा फायदा तेव्हढ्या प्रमाणांत वाढत नसल्यामुळे या कंपन्यांच्या प्रॉफीटवर परिणाम होऊ शकतो. रिटेल गुंतावूक्दारांनी या गोष्टींकडे लक्ष देण्याची जरुरी आहे. उदा :- ABB, मारुती, HUL, NESLE, BOSCH.

या आठवड्यांत येणारे IPO

 • उज्जीवन फायनांसियल सर्विसेस ही कंपनी ipo मधून Rs ६०० कोटी उभारणार आहे

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं
ही बेअर मार्केट rally आहे कारण  शेअर्सची किंमत २०% वर  गेल्यानंतर लगेच खरेदीदार येत नाहीत. short कव्हरिंग होते किंवा वातावरण बदलले तर पुन्हा shorting होते. जे शेअर्स ओवरओन्ड आहेत आणी डीफेन्सीव शेअर्स आहेत त्यांचीही विक्री सुरु झाली आहे. मार्केटमध्ये  खूपच volatility वाढली आहे.  मार्केट दर तासाला वेगवेगळे रागरंग दाखवत आहे.
त्यामुळे लहरी राजा जसा प्रजेला नाचवतो आणी प्रजा आंधळेपणाने राजाची लहर स्वीकारते.त्याच पद्धतीने मार्केट लहरी राजाप्रमाणे रोज सातात्याने तेजी आणी मंदीच्या तालावर गुंतवणूकदारांना नाचवते. त्यामुळे विश्लेषक, सगळ्या प्रकारचे गुंतवणूकदार,  गोंधळात वावरतात. कोणालाही घेतलेले निर्णय आणी वर्तवलेले अंदाज बरोबर येतील याची खात्री नसते. या पद्धतीने शेअरमार्केटचा दरबार अधांतरीच आहे असे जाणवते. म्हणून लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार, उद्धवा अजब तुझे सरकार हे वचन मार्केट सार्थ करतंय.

One thought on “आठवड्याचे समालोचन – १५ फेब्रूआरी ते १९ फेब्रूआरी २०१६ – लहरी राजा, आंधळी प्रजा, अधांतरी दरबार, उद्धवा अजब तुझे सरकार!!

 1. Pingback: आठवड्याचे समालोचन – २२ फेब्रूआरी ते २६ फेब्रूआरी २०१६ – अंदाज अपना अपना अंदाजपत्रकाचा ! | Stock Market

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.