Monthly Archives: March 2016

आठवड्याचे समालोचन -७ मार्च २०१६ ते ११ मार्च २०१६ – लाभांशाची बरसात शेअरमार्केटच्या अंगणांत.

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
money-rain-1013711_640
काही अपवाद वगळता आठवडाभर मार्केट तेजीतच राहिले. अर्थमंत्र्यांनी EPF वर लावलेला कर पूर्णपणे रद्द केल्यामुळे सरकारची लवचिकता दिसली. NPS पेन्शन योजनेमधून ४०% पर्यंत रक्कम काढल्यास त्यावर कर लागणार नाही.या बदलाने अंदाजपत्रकामुळे निर्माण झालेल्या सकारात्मक वातावरणांत भरच पडली.
आंतरराष्ट्रीय घडामोडी

  • चीनच्या PBOC ने २० बिलियन युआन सिस्टीममध्ये घातले.
  • क्रूडच्या दरामध्ये हळू हळू वाढ होत होत तो US$ ४० पर्यंत पोचला.
  • ECB ने गेल्या वेळी निगेटिव्ह व्याज दर ठेवला होता. त्यांत अजून २०% कपात केली जाईल असे जाहीर केले.
  • आंतरराष्ट्रीय बाजारांत धातूंच्या किंमती वाढत असल्यामुळे भारतातील धातू उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती वाढल्या.
  • युरोपिअन सेन्ट्रल बँकेने (ECB) अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी खालीलप्रमाणे उपाय जाहीर केले.
    डीपॉझीटवरील व्याजाचे दर कमी करून ते -०.४% केले. (२) रीफायनांस रेट ०.०५% वरून झीरो केला. (३) मार्जीनल लेंडिंग रेट (बॅंका short टर्मसाठी ECB कडून कर्ज घेतात) ०.३०% वरून ०.२५% केला. (४) ECB कॉर्पोरेट कर्ज विकत घ्यावयास सुरुवात करील. आणी बँकांसाठी स्वस्त कर्जाच्या योजना सुरु करतील.
  • ECBने हे उपाय सुरु केले त्याचे सर्वांनी स्वागत केले.

सरकारी announcements

  • पंतप्रधान आणी अर्थमंत्री यांनी बँकांचे उच्च पदाधिकारी आणी RBI बरोबर ज्ञानसंगम या बैठकीत बँकिंग सेक्टरच्या प्रगतीचा आणी त्यांना भेडसावणारया समस्यांचा उहापोह केला. या मध्ये बँकांचा एकमेकांमध्ये विलय होण्याची शक्यता व्यक्त केली. ज्या बॅंका स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकत नाहीत त्यांच्यासाठी बँकिंग ब्युरो स्थापन करावा असे सुचवले.
  • सध्या राज्य सरकारे आपापली अंदाजपत्रके सादर करीत आहेत. राजस्थान सरकारने आपल्या अन्दाजपत्रकांत कॉटन यार्नवरील VHAT कमी केला आणी तंबाखू आणी तंबाखूपासून बनवलेल्या पदार्थांवर VHAT बसवतील असा अंदाज व्यक्त केला गेला. त्यामुळे ITC चा शेअर पडला. याच आठवड्यांत महाराष्ट्र सरकारचे अंदाजपत्रक सादर होणार आहे.
  • ९ मार्च २०१५ रोजी केंद्र सरकार कॉनकारमधील त्यांच्या शेअर्सहोल्डिंगपैकी ५% शेअरहोल्डिंग साठी OFS झाला . किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ही OFS १० मार्च २०१६ रोजी ओपन झाला.. OFSची किंमत Rs ११९५ ठेवली होती किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ५% सूट ठेवली होती. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी असलेला क्वोटा १.१२ पट भरला.
  • रिअल एस्टेट रेग्युलेटरी बिलावर लोकसभेंत चर्चा सुरु झाली आहे. रिअल एस्टेट रेग्युलेटर बिल दोन्ही सभागृहांत पास झाले. या बिलातील तरतुदीनुसार डेव्हलपर्सना आपल्या सर्व प्रोजेक्ट ज्या ५०० SQ मीटर जमिनीवर आहेत किंवा ज्यांत ८ अपार्टमेंट असतील रजिस्टर कराव्या लागतील. आपल्या प्रोजेक्ट्सची जाहिरात आणी विक्री करण्याआधी स्थानिक सरकारी आस्थापनांकडून सर्व प्रकारच्या मंजुरी मिळवून रिअल एस्टेट रेग्युलेटरी ऑथारिटीकडे रजिस्टर कराव्या लागतील. घरे खरेदी करणाऱ्यांकडून मिळालेल्या पैशांपैकी ७० % रक्कम वेगळ्या एस्क्रो खात्यामध्ये ठेवावे लागतील. आणी त्याच प्रोजेक्टसाठी खर्च करावे लागतील. घर घेणाऱ्यांसाठी आणी बिल्डर्ससाठी कार्पेट एरिआची व्याख्या निश्चित केली आहे आणी बिल्डरला घरे विकण्यासाठी कार्पेट एरिआसाठी किंमत निश्चित करावी लागेल. आता घर खरेदी करणारे आणी बिल्डर यांना सारख्याच दराने व्याज भरावे लागेल.
  • तसेच सरकारने HELP (हायड्रोकार्बन एक्सप्लोरेशन आणी लायसेन्सिंग पॉलिसी) जाहीर केली. सरकारने डीफिकल्ट ऑईल फिल्ड्स मधून काढलेल्या प्रत्येक युनिटसाठी प्रत्येक युनिटला US$ ७.०८ हा दर निश्चित केला.ह्या दराचे दर सहा महिन्यांनी परीक्षण केले जाईल. एकाच कंपनीला सर्व हायड्रोकार्बंनसाठी लायसेन्स दिले जाईल. आणी ती कंपनी त्याची किंमत निश्चित करू शकेल. सरकार या कंपन्यांच्या रोजच्या कारभारांत ढवळाढवळ करणार नाही. सरकारने हे स्पष्ट केले आहे की सरकार जास्तीतजास्त उत्पन्न मिळवण्यासाठी ही पॉलिसी जाहीर करीत आहे.
  • सरकारने MMRDA (मिनरल्स and माईन डेव्हलपमेंट रेग्युलेटरी कायदा) रिफॉर्म्स जाहीर केले. या रिफॉर्म्प्रमाणे गेल्या वर्षी जानेवारीच्या आधी घेतलेल्या कॅप्टिव ( स्वतःच्या वापरासाठी) असलेल्या माईनिंग लीजची ट्रान्स्फर लिलाव न करता होऊ शकेल. सरकारच्या या निर्णयामुळे मर्जर आणी अक्विझिशनमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील असा अंदाज आहे.
  • सरकारने एस्सार ऑईलकडे असलेले रत्ना आणी R मालिकेतील ऑईल आणी gas फिल्ड्स ONGC ला दिले. .
    आधार बिल लोकसभेत पास झाले. या बिलामुळे सामाजिक सुरक्षा योजना आधारला जोडल्या जातील त्यामुळे सबसिडीत २०% बचत होईल. या बिलामुळे सरकारी योजनेतील दलालीला आळा बसेल.
  • म्युचुअल फंडांना त्यांच्या गुंतवणुकीवर जो लाभांश मिळेल त्याच्यावर अंदाजपत्रकातील तरतुदीप्रमाणे DDT लागणार नाही असे सरकारने जाहीर केले.
  • सरकारने सॉंव्हरिन गोल्ड BOND चा ३ रा चरण सुरु केला. एक ग्रामच्या गोल्ड BONDची किमत Rs २९१५ ठेवली आहे.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

  • अपोलो टायर ही कंपनी ‘टू व्हीलर’ ला लागणारे टायर बनवण्याच्या क्षेत्रांत उतरणार आहे.
  • सिमेन्स त्यांचे हेल्थकेअर युनिट Rs ३०५० कोटींना विकण्याच्या विचारांत होती. त्याला मंजुरी मिळाली.
  • crompton ने त्यांचा ग्लोबल ट्रान्समिशन बिझीनेस युरो ११.५ कोटीना विकला.
  • GAMMAN इंडिया या कंपनीवर असलेल्या कर्जाचे १२ बँकांच्या CONSORTIUM ने कंपनीच्या शेअर्समध्ये रुपांतर केले. या कंपनीवर Rs १५००० कोटींचे कर्ज आहे.

कॉर्पोरेट एक्शन

  • रिलायंस ADAG ग्रुपने पिपावाव डिफेन्स ही कंपनी विकत घेतल्यावर तिचे नाव रिलायंस डिफेन्स असे बदलले.
    नेईवेली लिग्नाईट या कंपनीने त्यांचे नाव बदलले. आता ही कंपनी NLC इंडिया या नावाने ओळखली जाईल.
  • गेल्या वेळी चर्चा केल्याप्रमाणे DDTचा परिणाम म्हणून सर्व प्रमोटर्सहोल्डिंग जास्त असलेल्या कंपन्यांनी अंतरिम लाभांश जाहीर करायला सुरुवात केली. उदा :- बजाज ऑटो Rs ५० प्रती शेअर, कोल इंडिया Rs २७.४० प्रती शेअर TORRENT फार्माने Rs १५ प्रती शेअर, अल्केम lab Rs ९.७० तर रिलायंस इंडस्ट्रीज ने Rs १०.५० प्रती, वर्धा मान टेक्सटाईल्स Rs १५ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला. हा लाभांश एकदोन आठवड्यांत आपल्याला मिळतो. नियमित लाभांशासाठी जसे दोन चार महिने थांबावे लागते तसे थांबावे लागत नाही.
  • इन्फोसिसचे संस्थापक सदस्य असलेले शिबुलाल यांनी ब्लॉक डीलच्या माध्यमातून २५ लाख शेअर्स तर दुसरे संस्थापक सदस्य एस गोपालकृष्णन यांनी आपण ५० लाख शेअर्स विकणार आहे असे जाहीर केले. यामुळे इन्फोसिसमधील प्रमोटर्सचा स्टेक ०.३ ने कमी होईल.
  • ९ मार्च २०१६ रोजी माइंडट्रि या कंपनीच्या बोनस इशुची ex डेट आहे.

या आठवड्यांत येणारे IPO :-

  • या आठवड्यांत हेल्थकेअर ग्लोबल एन्टरप्राईजेस या कॅन्सर उपचार आणी फरटीलीटी या क्षेत्रांत काम करणाऱ्या कंपनीचा IPO मार्च १६ २०१६ ते मार्च १८ २०१६ या काळांत येत आहे. इश्यूसाईझ Rs ६११ कोटी ते Rs ६५० कोटी आहे प्राईस band Rs २०५ ते Rs २१८ आहे मिनिमम बीड लॉट ६५ शेअर्सचा आहे.
  • ही कंपनी कॅन्सरकेअर क्षेत्रांत सुस्थापित असलेली बँगलोरस्थित कंपनी आहे. या कंपनीची देशांत विविध ठिकाणी २१९ ठिकाणी केंद्रे आहेत. मात्र या IPOची रक्कम आताच्या शेअरहोल्डर्सचा स्टेक कमी (Rs ४०० कोटी) करण्यासाठी आणी कर्ज फेडण्यासाठी करण्यांत येणार आहे. कंपनी आपल्या कॅन्सर केअर सेन्टर्सचा विस्तार आफ्रिकेत करण्याच्या विचारांत आहे.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं
ज्या कंपन्या लाभांश देत आहेत त्यांचे  लाभांश आणी कंपन्यांची नावे मी उदाहरणासाठी देत आहे.जर तुम्हाला एखादा शेअर विकायचा असेल तर माहिती घ्या की त्या शेअरला काही अंतरिम  लाभांश जाहीर झाला आहे कां ? जाहीर झालेल्या लाभांशाची EX डेट आणी रेकॉर्ड डेट काय आहे ? तुम्ही तो शेअर अल्प  मुदतीसाठीसाठी खरेदी केला आहे की गुंतवणुकीसाठी. त्याप्रमाणे निर्णय घ्या. कारण हिरो मोटो कॉर्पने जाहीर केलेला अंतरिम लाभांशांचे (Rs ४०) पेमेंट केल्यानंतर बरोबर शेअरचा भाव तेवढा कमी होतो. त्यामुळे लाभांशाच्या आशेने शेअर वाढतो ती वाढ तुमच्या दृष्टीने पुरेशी असेल तर शेअर विकून पुन्हा खरेदी करता येतो. पण अशा वेळी लागणाऱ्या ब्रोकरेजचा विचार करावा. नेहेमी मार्केटमध्ये होणारा फायदा आणी त्यासाठी लागणारा खर्च याची सांगड घालावी लागते. त्यामुळे खरे व तंतोतंत बरोबर चित्र डोळ्यासमोर येते.
सेन्सेक्स २४७१७ वर आणी निफ्टी ७५१० वर बंद झाले.

Stock market information in marathi

आठवड्याचे समालोचन -२९ फेबृआरी २०१६ ते ४ मार्च २०१६ – अंदाजपत्रकातील सुखद वारे !

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
२९ फेबृआरी २०१६ सोमवार हा अंदाजपत्रकाचा दिवस होता. आणी संधीसाधूंचे मार्केट होते. अंदाजपत्रकामध्ये एक  गोष्ट जाहीर झाली की त्याचा फायदा किंवा तोटा ज्या पद्धतीने होईल तशा प्रकारचा ट्रेड करायचा.  ५ राज्यात येऊ घातलेल्या निवडणुका, दुष्काळाचे सावट, जागतिक मंदी, सातव्या वेतन आयोगातील पगारवाढ देण्यासाठी करावी लागणारी तरतूद  आणी शेअरमार्केटमधील मंदी या सर्व बाबींचा विचार अन्दाजपत्रकांत असावा असा कयास करून मोठ्या उत्सुकतेने  सर्वजण अंदाजपत्रकाला सामोरे गेले. अंदाजपत्रकातील तरतुदींमुळे सगळ्यांना आनंद झाला. दिवाळीसारखे वातावरण पसरले. शेअरमार्केटने सुंदरच सलामी दिली. पाठोपाठ तीन दिवस मार्केट तेजींत राहिले. सेन्सेक्समध्ये १६०० पाईंटची वाढ झाली.  गुंतवणूकदारांची मरगळ दूर झाली.  मार्केटला गती आली. नवा विचार मिळाला.
आंतरराष्ट्रीय घडामोडी

  • ओपेक देशांनी या महिन्यांत क्रूडचे उत्पादन कमी केले असल्याचे आढळते.
  • चीनच्या बँकेने ०.५० पाईंट रेटकट केला.
  • आंतरराष्ट्रीय मॉनेटरी फंड या संस्थेने भारताच्या प्रगतीचे लक्ष्य २०१६ साठी ७.३% आणी २०१७ साठी ७.५% ठेवले.

सरकारी announcements

  • या वर्षीच्या अंदाजपत्रकांत जर तुमचे लाभांशापासून मिळणारे उत्पन्न Rs १०००००० पेक्षा जास्त असेल तर १०% DDT (DIVIDEND DISTRIBUTION TAX) लागेल अशी प्रोविजन केली आहे.याचा परिणाम या वर्षी ३१ मार्च २०१६ पूर्वी दिसेल असे कळते.प्रमोटर्स होल्डिंगवर मिळणाऱ्या लाभांशावर DDT लागू नये म्हणून ज्या कंपन्यांमध्ये प्रमोटर्स होल्डिंग जास्त असेल, BALANCE SHEET वर जास्त कॅश असेल, कंपनी जर नियमितपणे चांगला लाभांश जाहीर करत असेल तर त्या कंपन्या ३१ मार्च २०१६ पूर्वी अंतरिम लाभांश जाहीर करतील. अशा प्रकारच्या कंपन्यांच्या शेअर्सना मागणी येईल आणी short term ट्रेडिंगसाठी फायद्याचे ठरेल. अशा ७० कंपन्यांच्या ३१ मार्च २०१६ पूर्वी लाभांश जाहीर करण्याचा विचार करण्यासाठी मीटिंग आहेत.
  • स्पेक्ट्रमच्या देवाणघेवाणीला सेवा कर लागू होईल.
  • सेवा करात वाढ सुचवली.
  • तंबाखू आणी तंबाखूची उत्पादने यांच्या करामध्ये अपेक्षेपेक्षा कमी वाढ केली.
  • श्रीमंतावर आयकर लावून गरीब आणी शेतकर्यांना सवलती दिल्या.
  • शेती, सिंचन, फूड प्रोसेसिंग उद्योग यांना सवलती दिल्या.
  • पेट्रोलच्या किमती कमी केल्या डीझेल च्या किंमती वाढवल्या.
  • ATF ( विमानाला लागणारे इंधन ) ची किंमत वाढवली.
  • वेगवेगळ्या प्रकारे घर बांधणी क्षेत्राला उत्तेजन दिले.
  • बँकांना Rs २५००० कोटी भांडवल सरकार पुरवेल अशी तरतूद केली.
  • विजया बँक आणी IDBI बँक या सरकारी क्षेत्रातील बँकांमधील स्टेक विकून सरकार डायव्हेस्टमेंट करणार आहे.
  • STOCK EXCHANGE मधील परदेशी गुंतवणुकीची सीमा ५% वरून १५% वर नेली. याचा फायदा MCX या कंपनीला होईल.
  • खतावर मिळणारी सबसिडी आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होईल.
  • १० वर्षापेक्षा जुनी असलेली गाडी विकून तुम्ही नवीन गाडी विकत घेत असाल तर एक्साईज करामध्ये ५०% सवलत दिली.

रिझर्व बँक ऑफ इंडिया सेबी इत्यादी
रिझर्व बँकेने बँकांना त्यांच्या मालकीच्या असलेल्या प्रॉपरटीजची value तसेच विदेशी चलनाची value त्यांच्या Tier १ कॅपिटलची रक्कम निश्चित करताना विचारांत घेण्यासाठी परवानगी दिली. या रिझर्व बँकेच्या परवानगीमुळे बँकांच्या भांडवलामध्ये Rs ४५००० कोटी रुपयाची वाढ होण्याची शक्यता आहे.
खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

  • इन्फोसिस या IT क्षेत्रातील दिग्गज कंपनीला कुवैत बँकेकडून मोठी ऑर्डर मिळाली.
  • भेल या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीला Rs ५६०० कोटींची ऑर्डर मिळाली.
  • अल्ट्राटेक सिमेंट या कंपनीने J P असोशीएट या कंपनीची सहा उत्पादन युनिट्स विकत घेतली. या बातमीचा परिणाम JP असोसिएट चे कर्ज कमी होईल.
  • ICICI बँकेची BALANCE SHEET सुधारेल, जरी कर्ज कमी झाले तरी त्याबरोबर उत्पनाची साधने कमी झाली हे लक्षांत घ्यावयास हवे.
  • गेल्या आठवड्यांत युनियन बँकेचा शेअर एका मिनिटांत Rs ११४ वरून Rs १०८ वर आला होता. असे का झाले? याचा पाठपुरावा केला असता Rs ७९४ कोटींचा fraud झाला असे ऐकिवांत आले. याची माहिती लोकसभेतही दिली गेली. पण नंतर बँकेने खुलासा केला व तो इंटरनेटवर वाचावयास मिळाला . अशाप्रकारे काही घडले असल्यास त्याचा पाठ पुरावा करावा खरेखोटे जाणून घ्यावे, नंतरच गुंतवणुकीच्या बाबतीत निर्णय घ्यावा.
  • नवी मुंबई एअरपोर्टच्या प्रोजेक्टसाठी GVK, GMR INFRA, टाटा या कंपन्यांच्या बोली SHORTLIST झाल्या आहेत. या बाबतीत पुढील आठवड्यांत कॅबिनेटची मंजुरी मिळेल.
  • टाटा स्टीलला त्यांच्या जमशेदपूर प्रोजेक्टच्या Rs १८७७ कोटींच्या विस्तार प्रकल्पाला पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी मिळाली.
  • हरिद्वारमधील आपल्या उत्पादन युनिटला आता एक्साईज मध्ये सवलत मिळत होती तिची मुदत संपल्यामुळे ती आता मिळणार नाही असे M & M ने जाहीर केले.
  • सदभाव इंजिनिअरिंगने आपली त्यांच्या रोड प्रोजेक्टमधील Rs १० कोटीची हिस्सेदारी Rs ७२ कोटीला विकली

IPOच्या बातम्या :-

  • NATIONAL STOCK EXCHANGE ने आपला IPO आणण्यासाठी एक कमिटी नेमली आहे.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं
पुट call रेशियो ०.७० च्या आसपास असेल तर तो शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये आहे असे समजतात. सध्या हा रेशियो ०.92 आहे. जर हा रेशियो १ झाला तर ही अंदाजपत्रकीय rally संपत आली असे समजावे. नेहेमी अंदाजपत्रकीय rally अंदाजपत्रकाच्या आधी येते. या वेळेला ही rally अंदाज पत्रक सादर झाल्यावर आली.पण सध्या मार्केट बदलते आहे असे जाणवते. सध्या क्रूड LOWEST लेवलला पोहोचले आहे. त्यामुळे हळू हळू क्रूडचा भाव वाढण्याची शक्यता आहे. क्रूडच्या किमती ढासळत असताना ज्या कंपन्यांना फायदा होत होता त्यांना तेवदह्या प्रमाणांत फायदा होणार नाही. ज्या कंपन्यांचे नुकसान होत होते त्यांचे नुकसान कमी होईल.
जागतिक अर्थव्यवस्था चांगली नाही पण भारताची अर्थव्यवस्था सुधारते आहे. परिणामी करेक्शन थांबून ‘सेल on RALLIES’ चे मार्केट जाऊन ‘BUY on DEEPS’ मार्केट सुरु होईल असे वाटते. जर पावसाने साथ दिली तर सोन्याहून पिवळे !
गेल्या सात वर्षांत हा आठवडा चांगला होता. आठवडाभरांत मार्केट १६०० पाईंट वाढले.
 

तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – Oct 2015 – Feb 2016

आधीची प्रशोन्त्तरे वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुमचे प्रश्न - माझी उत्तरं

Image courtesy – wikipedia


नाव: sagar
तुमचा प्रश्न : bond manje kai
bond हे एक DEBT INSTRUMENT आहे. गुंतवणूकदार एखाद्या कंपनीला किंवा केंद्र सरकार किंवा राज्यसरकारला काही काळासाठी ठराविक व्याजाच्या दराने कर्ज देतात. यापैकी काही कर्जरोखे STOCK EXCHANGE वर लिस्टेड असतात आणी त्या कर्जरोख्यांत नियमित खरेदी विक्री चालते. या पैकी काही bond TAXFREE bonds म्हणून इशू केले जातात. या TAXFREE बॉंड वर मिळणार्या व्याजावर आयकर भरावा लागत नाही.
नाव: sandeep untwale
तुमचा प्रश्न : ticknecal aneleses moving averageas badal sanga
काही दिवसांनी मी तांत्रिक विश्लेषणावर ब्लोग पोस्ट देणार आहे तो पहावा. थोडक्यांत सांगायचे तर शेअरची मार्केट प्राईस सतत बदलत असते त्यामुळे एखाद्या शेअरच्या किमतीचा सर्वसाधारण कल लक्षांत येत नाही. पण ठराविक दिवसांचे शेअरचे बंद भाव घेवून त्याची बेरीज करून त्याला त्या दिवसांच्या संख्येने भागायचे त्यामुळे एका विशिष्ट काळातील शेअर्सच्या प्राईसचा कल समजतो. यातील दिवसांच्या संख्येवरून अल्प मुदतीचा, मध्यम मुदतीचा आणी दीर्घ मुदतीचा कल स्पष्ट होतो. तांत्रिक विश्लेषणांप्रमाणे शेअर्सच्या मार्केट प्राईसची भविष्यकाळातील हालचाल भूतकाळातील हालचाली प्रमाणेच होईल असे समजले जाते.
नाव: Durgesh
तुमचा प्रश्न : Hi Madam, I am really impressed with your blogs regarding share markets.
I want to start investment in share market.Please suggest good books in marathi/english which will give me the detail information about share market in simple language.also let me know if I need to join any classes for the same.
क्लासची किंवा पुस्तकाची जरूर नाही. पुस्तकातील माहिती जुनी होत जाते. आपल्या मार्केटमध्ये प्रत्येक गोष्ट लाईव लागते. त्यामुळे दूरदर्शनच्या वाहिन्या, इंटरनेट, वर्तमानपत्र यांचा वापर केल्यास आपले ज्ञान अप-टू-डेट राहते.
नाव: प्रदीप नारायण निकम
तुमचा प्रश्न : I am teacher by profession. I want to do trading in swing trading. plz tell me about swing trading in detail
स्विंग ट्रेडिंग हा shortterm ट्रेडिंग चा एक प्रकार आहे. १ ते २ आठवड्यांसाठी पोझिशन (खरेदी किंवा विक्रीची) घेतली जाते. प्राईस ट्रेंड आणी pattern पाहून आणी त्यांचे काही काळासाठी निरीक्षण करून निर्णय घेतला जातो.
नाव: ARUN BORHADE
तुमचा प्रश्न : how share buy and sell .i am full time job mor ; 08 to eve ; 08 full day job night 8.00 o clock share sell yes or no
ब्लोग वाचा. इंट्राडे करणे नोकरी सांभाळून कठीण जाईल. पण तुम्ही गुंतवणूक करू शकता. कामावरून घरी आल्यावर दूरदर्शनवर वाहिन्यांवर माहिती ऐका, वर्तमानपत्र वाचा फोनवरून व्यवहार करा. शक्य असेल तर मोबाईलवर इंटरनेट घेतल्यास वेळोवेळी तुम्ही घेतलेल्या शेअर्सचे भाव बघून त्याप्रमाणे निर्णय घेऊ शकता.
नाव: विशाल रामचंद्र सानप
तुमचा प्रश्न : मला शेयर मार्केट बद्दल मराठीतून माहिती कुठून भेटेल…
माझे ब्लोग वाचा. बाकी कुठेही शेअरमार्केटबद्दल सोप्या भाषेत मराठीतून माहिती मिळणार नाही. .
नाव: शिरीष
तुमचा प्रश्न : नमस्कार, काही कंपन्या स्टॉक टिप्स देतात त्याचे आधारे गुंतवणूक करणे योग्य होईल का?
दुसऱ्याला त्याचा पैसा कुठे आणी कसा गुंतवावा हे सांगणार्यांचा तुटवडा नाही पण तोटा झाल्यास त्यांची काहीच जबाबदारी नसते. त्यामुळे असा सल्ला वाचावयास काहीच हरकत नाही पण त्यावर तुम्ही स्वतः त्याचा अभ्यास, मनन चिंतन, निरीक्षण करूनच स्वतःचा निर्णय स्वतः घ्या. कारण शेवटी तुमचा पैसा गुंतवायचा असतो. तो जपून वापरा. .
नाव: Prashant shivram gaikar
तुमचा प्रश्न : मी 5000 रुपये मध्ये शेयर मार्केट मध्ये सुरवात करू शकतो का
आपण Rs ५००० पासून नक्कीच सुरुवात करू शकता. जेव्हडी रक्कम गुंतवाल त्याप्रमाणात फायदा किंवा तोटा होऊ शकतो.
नाव: Sangeeta Mane
तुमचा प्रश्न : Sharemarket madhe kashi guntavnuk karaychi
माझे ब्लोग लक्षपूर्वक वाचा. ‘DEMAT’ आणी ट्रेडिंग अकौंट उघडा. शेअरच्या मार्केट प्राईसच्या हालचालींचा कंपनीचा अभ्यास करा. कमीतकमी किंमतीत खरेदी करा, सुरुवातीला नफ्याचे एक उद्दिष्ट ठरवा आणी पुरेसा फायदा होत असल्यास शेअर्स विकून फायदा कमवा.
नाव: NILESH YADAV
तुमचा प्रश्न : Mala share market madhye invest karaychi aahe. kashi karu shakto.
ब्लोग लक्षपूर्वक वाचा. थोड्या प्रमाणांत सुरुवात करा. अभ्यास आणी निरीक्षण करा. भांडवलाची जपणूक करा. स्वतःचे निर्णय स्वतःच्या अभ्यासावर आणी स्वतःच्या निरीक्षणावर आधारीत असू द्या.
नाव: shrishail phatak
तुमचा प्रश्न : mala shear market guntvnuk karaychi aahe. minavin aahe
प्रथम निरीक्षण करा. अभ्यास करा. तुम्ही नवीन आहांत असे म्हणता तर जपून पावले टाका. प्रथम
भातुकलीच्या खेळासारखे वहीतल्यावहीत लिहून व्यवहार करा आपले निर्णय बरोबर येत आहेत असे आढळल्यावर प्रत्यक्ष मार्केटमध्ये व्यवहार चालू करा.
नाव: VINAYAK MAHADIK
तुमचा प्रश्न : Madam mala Rs.2000 guntavayache ahet tari mala margdarshan karave
आपण Rs २००० गुंतवा किंवा Rs २०० गुंतवा, फायदा तोटा त्याचं  प्रमाणांत होईल. Rs २००० मध्ये Rs २००० चा एक शेअर किंवा Rs २०० चे १० किंवा Rs २० चे १०० शेअर्स येतील. कोणता शेअर किंवा शेअर्स घ्यायचे आणि कशांत फायदा होईल ते अभ्यास करून ठरवा.
नाव: Sonali Gatir
तुमचा प्रश्न : Me share market dealer chya post var job kartey. Me ya field madhe career madhe growth karnyasathi kay kele pahije.
Tasech mala share market babat deep knowledge milvayche ahe. Please guide kara.
शेअरमार्केटची कार्यप्रणाली, त्यांत खरेदीविक्री होणारे शेअर्स तसेच हे शेअर्स इशू करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्या. करप्रणाली, विनिमय दर, व्याजाचा दर. कच्चा माल, मुलभूत विश्लेषण आणी तांत्रिक विश्लेषण यांचा अभ्यास करा निरीक्षण करा सातत्य ठेवा.
नाव: sabhaji wankhede
तुमचा प्रश्न : mala shear marketach kalt nahi
रोज शेअरमार्केटची माहिती देणाऱ्या दूरदर्शनवरील वाहिन्यांवरील माहिती ऐका. वर्तमानपत्र वाचा, माझे ब्लोग वाचा हळूहळू समजायला लागेल.
नाव: pravin salunke
तुमचा प्रश्न : Madam mala share market madhe full time career karavayache ahe karita tumche guidance pahije. So please help me how to start.
आपण आपले ज्ञान कायम अप-टू-डेट ठेवा. निर्णय घेण्याची क्षमता अंगांत बाणवा आणी आपल्या घेतलेल्या निर्णयाच्या मुल्यांकनाची सवय ठेवा. सातत्य हवे, दुर्लक्ष करून चालणार नाही, आत्मविश्वास बाळगा सल्ले घ्या पण पारखून मगच ते अमलांत आणा. शेअरमार्केट हा व्यवसाय आहे नोकरी नव्हे.
नाव: Padmakar Pawde
तुमचा प्रश्न : Mam can you suggest me some online brokers ??
HDFC, ICICI BANK, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक हे ऑनलाईन ट्रेडिंग तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतात. पण या सर्वांचे दर तसेच कार्यपद्धती नीट समजावून घ्या आणे मगच निवड करा.
नाव: गणेश घोगरे
तुमचा प्रश्न : Hello Mam, mazhi trading karnyachi barich tayari zhali aahe , brokar (ventura wealth) shi pan bolane zhale aahe. ‘POA ‘ baddal vicharna keli aasta , tyane sangitale ki ‘ POA’ dyavich lagte . Mi kaaran vicharle , to mhanala jya veles tumhi 3 month peksha jast vel inactive rahal, tyaveles tumchya trading account varil rakkam tumchya saving account la jama karnyasathi ‘POA’ lagatech. Fakt tyach sathi lagate aasahi mhanala to. Mi kay karu? Please send your comment on my email address also.
एकतर ट्रेडिंग अकौंटमध्ये रक्कम कधीच बाकी रहात नाही. ट्रेड केला की तेथे काहीच रहात नाही. जर ब्रोकर deposit घेत असेल तर तुम्ही deposit ची पावती दाखवून ते परत घेऊ शकता. त्यासाठी ‘POA’ ची जरुरी नाही.
नाव: आश्विनी कुलकर्णी
तुमचा प्रश्न : demat account चे फायदे आणि तोटे सांगा
माझे ब्लोग नंबर ३१ आणी ३९ वाचा. माझी वाहिनी या शीर्षकाखालील दुसरा लेख वाचा. .
नाव: बबन सोनटक्के, लातूर
तुमचा प्रश्न : आदरणीय, मॅडम – मी 4 दिवसात हा पूर्ण ब्लॉग वाचून काढला आणि आता स्टॉक मार्केट चा व्यवहार प्रत्यक्ष अनुभवण्याची खूप उत्कंठा लागून राहिलीय. त्यापूर्वी मला तुमच्याकडून थोडीशी माहिती हवी आहे.
1) शेयर ची किंमत तर एका क्षणात बदलते मग आपण खरेदी करायची कशी ?
2) प्रत्येक शेयर लगेच विक्री होतो का ?
3) शेयर करण्यापूर्वी तेवढी रक्कम आपल्या बॅंक a/c मधे असणे आवश्यक आहे का ?
(१) आपल्याला हव्या त्या किंमतीला ऑर्डर आपण लावू शकता. जर शेअरची किंमत आपण लावलेल्या प्राईस बरोबर किंवा त्याच्या वर गेली की तुमची ऑर्डर अमलांत आणली जाते.
(२) शेअरला लिक्विडीटी असेल तर लगेच विकला जातो. शेअर्सला लिक्विडीटी किती आहे हे शेअर्सच्या खरेदी आणी विक्रीच्या VOLUME वरून समजते, पण विकलेल्या शेअर्सचे पैसे चार दिवसानंतर मिळतात.
(३) जर आपण ऑन लाईन ट्रेडिंग करत असाल तर बचत खात्यांत पैसे जमा असावे लागतात. अन्यथा आपण ब्रोकरला दुसऱ्या दिवशी खरेदी केलेल्या शेअर्ससाठी चेक दिला तरी चालतो.
नाव: rohini
तुमचा प्रश्न : i want to learn share market trading process. i am gov.employee. i want to do part time job
आपण माझे ब्लोग वाचा, अभ्यास करा, निरीक्षण करा आणी कोणतेही पूर्वग्रह मनांत न ठेवता शेअर्समध्ये ट्रेडिंग गुंतवणूक करा. यश आपलेच आहे
नाव: Prasad Sadashiv Marathe
तुमचा प्रश्न : Share che nevad kashi karavi. Study kasa karava
ज्या ठिकाणाहून कंपनीबद्दल, शेअर्सबद्दल माहिती मिळवता येईल तेथून मिळवा उदा :- दूरदर्शनवरील वाहिन्या, वर्तमानपत्र , इंटरनेट,. ‘A’ ग्रूपमधले शेअर्स किंवा ब्लू चीप कंपन्यांचे शेअर्स घ्या. शेअरला लिक्विडीटी आहे की नाही हे खरेद्द्विक्रीचा VOLUME पाहून ठरवा. शेअर्सची खरेदी किंवा विक्री आपल्या पैशानेच करा.
नाव: Mahesh Salunkhe
तुमचा प्रश्न : Dear Madam, Thanks for giving such valuable information in Marathi which is really very helpful to us to understand and invest in share market. My Question is
1) why L&T showing down trend now a days ? I have 25 qty @ 1350 and want to invest in every deep. Is it right decision ?
2) I have Infosys @ 1050 and want to invest in same every month like SIP
Please guide me.
मी ठराविक शेअर्सबद्दल कोणतीही शिफारस देत नाही. निर्णय सर्वस्वी तुमचा. कॅपिटल गुड्स क्षेत्रातील कंपन्याना ऑर्डर्स मिळत आहेत पण त्यांची अंमलबजावणी मात्र वेळेवर होत नाही. परवाने मिळत नाहीत. IT क्षेत्रातील कंपन्यांचे यश त्यांच्या परदेशातील कार्यावर अवलंबून असते आणी त्यांत चलनाचा विनिमय दरही लक्षांत घ्यावा लागतो.
नाव: Vishal
तुमचा प्रश्न : Bond Marketing madhe investment kase karave
bondsच्या संदर्भांत मी लिखाण करीत नाही.
नाव: Bhore Sunita kakasaheb
तुमचा प्रश्न : brokershivay shairmarektla paryay nahi, he tar samajale parantu broker shi samperk kasa hoil.? market madhe frod khup hot aslyache pahay miltat. broker la licen asate ka?
ब्रोकरच्या बाबतीत पूर्वी बरेच समज गैरसमज होते. लोकांना अनुभव खराब आले. सध्या अशी स्थिती नाही. संगणकीकरणामुळे शेअरमार्केटच्या व्यवहारांत बरीच पारदर्शकता आलेली आहे. सेबी फार चांगले काम करीत आहे. गुंतवणूक दारांच्या हिताचे रक्षण करीत आहे. ब्रोकरला परवाना घ्यावा लागतो. पण शेवटी आपल्याला अतिशय सतर्क राहावे लागते. आपण केलेल्या शेअर्सच्या खरेदी विक्रीची बिले वेळोवेळी घेणे आपले ‘DEMAT’ अकौंटचे स्टेटमेंट वेळोवेळी तपासणे. आणी आपण दिलेल्या ऑर्डर्स बरोबर अमलांत आल्या की नाही हे बघणे अत्यंत जरुरीचे आहे. शेवटी आपण सावध राहावे आणी यशस्वी व्हावे हेच खरे.
नाव: SANTOSH CHAVAN
तुमचा प्रश्न : 1.deliverly sathi time d ke kiti asava kamit kami ani jastit jast kiti divas 2.1000 LTP asnarya share chi deliverly asel tar taysathi traget kiti asave v kiti divas hold karava
तुम्ही डिलिव्हरी घेतल्यावर तो शेअर चौथ्या दिवशी ‘DEMAT’ अकौंटमध्ये जमा होतो.. त्यानंतर तुम्ही ते शेअर्स कधीही विकू शकता.
LTP (LAST TRADED PRICE) या अर्थाने म्हणत असाल असे मला वाटते. तुम्हाला हवे तेव्हढे दिवस ठेवा. जर टार्गेट प्राईस तुमच्या मनात निश्चित असेल आणी जर किंमत वाढत असेल तर ट्रेलिंग stoploss ठेवा. जशी जशी किंमत वाढेल तसा stoploss वाढवा.
नाव: SANTOSH CHAVAN
तुमचा प्रश्न : 1.mazi sbi madhe 230 ya price la delivery ahe v traget 275 che ahe tar taysathi kiti time d ke lagel
2.kontya sector madhe sarvat jasta return milato
3.DPI ani OTB Issue manje kay
4.intraday madhe 09.00 te 09.15 ya time madhe kay hote tasech 3.15 te 3.30
5.Spurt Volume manje kay
(१) मार्केट सध्या जबरदस्त volatile आहे त्यामुळे टार्गेट कधी होईल हे सांगणे कठीण आहे.
(२) खात्रीलायक सांगतां येणार नाही. अर्थव्यवस्था, अंदाजपत्रकातील तरतुदी, जागतिक परिस्थिती, करप्रणाली, कच्च्या मालाची उपलब्धता, हवामान या सर्वांचा वेगवेगळ्या क्षेत्रांवर वेगवेगळ्या प्रमाणात परिणाम होतो.
(३) ९ ते ९-१५ या वेळांत इंट्राडे होत नाही. हे प्रीओपन सेशन असते. या काळांत टाकलेल्या खरेदी विक्रीच्या ऑर्डर्सवरून मार्केटचा कल समजतो. खरेदीविक्री होईलच असे सांगतां येत नाही. ३-१५ ते ३-३० या वेळांत तसे विशेष काही घडत नाही. पण इंट्राडे करणारे आपापली पोझिशन स्क्वेअर करत असल्यामुळे शेअर्सच्या किंमतीत भारी हालचाल होते.
(४) SPURT VOLUME म्हणजे अचानक काही बातमी आल्यामुळे किंवा काही कॉर्पोरेट एक्शनच्या घोषणेमुळे खरेदी किंवा विक्रीमध्ये वाढ झाल्यामुळे १० दिवसाच्या सरासरीपेक्षा होणारा VOLUME खूप होतो.
नाव: समाधान वसंत आदाटे
तुमचा प्रश्न : मी शेअर मार्केट मध्ये नवीन आहे . मला सांगा share मार्केट मध्ये गुंतवणूक करताना ब्रोकेरची आवशकता असतेच का? आणि हा ब्रोकर म्हणजे नक्की कोण ?तो बँकेचा कर्मचारी असतो कि वेगळा माणूस असतो? प्लीज मला सांगा? आणि डी मॅट अकाऊंट भविष्यात बंद करता येते का?
ब्रोकर कोणीही असू शकतो. बँकेचा कर्मचारी असण्याची गरज नाही. ब्रोकरला सेबी लायसेन्स देते. ब्रोकर म्हणजेच शेअर्स ची खरेदी विक्री करणारा आणी त्यासाठी सुविधा देणारा आणी शेअर्स व्यवहार सुलभ करणारी व्यक्ती किंवा संस्था. शेअरमार्केटची माहिती मी मराठीतून सोप्या भाषेत सांगते. ब्रोकरची माहिती मी देत नाही. आपण ‘DEMAT’ अकौंट आणी ट्रेडिंग अकौंट कोणत्याही बँकेकडे किंवा ब्रोकरकडे उघडू शकता.
नाव: santosh
तुमचा प्रश्न : Madam demat a/c madhil futures baddal mahiti dya
मी FUTURES मध्ये ट्रेडिंग करीत नाही.
नाव: popat kolhe
तुमचा प्रश्न : madam’ mi eka mahinyala 4000 invest karto tar mi kutale shares vikat getla pahije
तुमच्या अभ्यासाप्रमाणे तुम्हाला आवडतील आणी फायदेशीर होतील असे शेअर्स घ्या.
नाव: Kshitij Patil
तुमचा प्रश्न : HI I am studying currently in 12th standard commerce And I am also preparing for Chartered Accountancy course. Recently I have seen much market fluctuations and hence I have developed interests in it.(Especially Small Cap & Mid Cap Which gives higher returns in Intra Day.)
I want to ask to you that Is it possible to make 35% money per month by intraday trading.
I arrived at this number by taking average 1.5% return daily considering some losses also. I had also find some good stock brokers such as Angel Broking, Samco Trading, Sheyerkhan ,etc. Suggest which one would be better. I will get Rs.25000 initial amount for Trading. Then I have to manipulate it. Give me proper advice I am too much eager to start trading in shares as soon as I completed 18 years. Suggest/Advice Please.
स्मालकॅप आणी मिडकॅप शेअर नेहेमी चालत नाहीत. त्यामुळे १००% फायदा होईल किंवा १००% नुकसान होईल याची कोणतीच हमी कुणीही देऊ शकत नाही. मी ब्रोकर बद्दल काहीच माहिती सांगू शकत नाही. स्मालकॅप शेअरला लोअर सर्किट लागले की विकता येत नाहीत.
नाव: mukund jadhav
तुमचा प्रश्न : madam,aapan jar bank tarfe demat account open kellyas brokares charg lagtil ka
DEMAT अकौंट आणी ट्रेडिंग अकौंटचे कार्य वेगवेगळे आहे. त्यामुळे बँकेत DEMAT अकौंट उघडला तरी शेअर खरेदीविक्री करण्यासाठी लागणारे चार्जेस आपल्याला बँकेला किंवा ब्रोकरला जेथे तुमचा ट्रेडिंग अकौंट असेल तेथे द्यावे लागतील.
नाव: Raju T Bande
तुमचा प्रश्न : Sir….mala first time share market madhe investment karaychi aahe. tyasathi
mala tumchi help havi aahe. aapan kamit kami paise share market madhe invest karu shakto aani keleli investment secure aasate aahe ka?????
तुम्ही कोणत्या शेअरमध्ये कोणत्या किंमतीवर आणी किती प्रमाणावर आणी कोणत्या वेळेला गुंतवणूक करता यावर सर्व काही अवलंबून असते. कारण मार्केटमध्ये कंपन्यांचे शेअर असतात. या कंपन्या निरनिराळ्या क्षेत्रांत कारभार करून नफा कमवत असतात. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रांत येणाऱ्या चढ उतारांवर कंपन्यांची यशस्वी कामगिरी आणी शेअर्सची किंमत अवलंबून असते. बँक सुद्धा बुडू शकते. त्यामुळे आपल्या गुंतवणुकीकडे लक्ष ठेवून ती धोक्यांत आहे असे वाटल्यास त्यातून बाहेर पडावे.
नाव: SANTOSH CHAVAN
तुमचा प्रश्न : 1.Block deal ani bulk manje kai
BLOCK DEAL आणी BULK DEAL मध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर्सची खरेदी किंवा विक्री होते. हे एकच TRANSACTION किंवा व्यवहार असतो. ५ लाख शेअर्स किंवा Rs ५ कोटी रकमेच्या शेअर्सची खरेदी विक्री दोन पार्टीज मध्ये होते. या दोन्ही पार्टीज बहुतांश वेळेला INSTITUTIONAL गुंतवणूकदार असतात. हा व्यवहार सेपरेट ट्रेडिंग विंडोमधून होतो. मार्केट सुरु होण्याच्या आधी हा व्यवहार होतो. हा व्यवहार स्क्वेअर ऑफ करता येत
नाही.
नाव: SANTOSH CHAVAN
तुमचा प्रश्न : 1.Buy back share chi process complete zalya natar share var jato khali ato(5 to 30) Madhe

BUY BACK SHARES’ वरचा ब्लोग नंबर ५८ वाचा.
नाव: SANTOSH CHAVAN
तुमचा प्रश्न : 1.Fills and dills kai ahe
FII म्हणजे FOREIGN INSTITUTIONAL INVESTORS. आणी DII म्हणजे DOMESTIC INSTITUTIONAL INVESTORS. म्हणजेच परदेशी गुंतवणूकदार संस्था आणी आपल्या देशांतील गुंतवणूकदार संस्था.
नाव: SANTOSH CHAVAN
तुमचा प्रश्न : 1.डीलिस्टिंग manje kai Taych share var kai prinam hoto
डीलिस्टिंग ही लिस्टिंगच्या उलटी प्रक्रिया आहे. पण मला वाटते म्हणून मी लिस्टिंग करीन आणी हवं तेव्हा मार्केटमधून बाहेर पडेन असे करता येत नाही. त्यासाठी नियम आणी ठरलेली पद्धत आहे तुम्ही माझा डीलिस्टिंग वरचा ब्लोग वाचा ( मी हा ब्लोग एका आठवड्याच्या आंत ब्लॉगवर टाकत आहे)
नाव: SANTOSH CHAVAN
तुमचा प्रश्न : Hello market madhe oil&gas section future sathi jasth magni ahe kai tumala kai vatt for (2020) ani PE रेशो kiti asava ani intraday sathi kontya goshti vashak ahet ani fundamental analysis kas kartat
मुलभूत विश्लेषण आणी रेशियो यावरील ब्लोग लवकरच टाकणार आहे.
Oil आणी gas सेक्टरला मागणी आहे ती वाढेल सुद्धा पण हा सेक्टर आपले सरकारच चालवते असे म्हणावे लागेल. राजकारणाच्या दृष्टीने हा सेक्टर महत्वाचा आहे.त्यामुळे लाभांशावरच समाधान मानावे लागते.
नाव: Manoj
तुमचा प्रश्न : मला share market विषयी पहिल्या पासुन माहिती पाहिजे म्हणजे account open करण्यापासुन
अकौंट ओपन करण्यापासून सर्व माहिती ब्लोगमध्ये आहे माझी वहिनी या सदरांत आहे आणी मी सतत नवीन ब्लोग टाकत असते त्याकडे लक्ष ठेवून ते वाचा.
नाव: sanjay
तुमचा प्रश्न : mala share market madhe guntavnuk karayachi aahe. Krupya mala konate shares ghyave mhanje mala changala napha milel te sangave
शेअर कोणते घ्यायचे, कोणत्या भावाला आणी केव्हा घ्यायचे हे तुम्हाला स्वतःच अभ्यास करून आणी निरीक्षण करून ठरवता येईल. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. माझा किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीच्या सल्ल्याप्रमाणे खरेदी किंवा विक्री करण्याची गरज नाही.
नाव: sandip untwale
तुमचा प्रश्न : trading tool charting softwere badal sanga
तांत्रिक विश्लेषणावर ब्लोग टाकणार आहे तो वाचा.
नाव: rahul nandhkishor chaudhari
तुमचा प्रश्न : Demat a/c notes
ब्लोग पोस्ट नंबर ३१, ३९ वाचा व माझी वहिनीमधला दुसरा लेख वाचा.
नाव: ASHIF K.Y.K.
तुमचा प्रश्न : how I come to know that which company is going to give BONUS (its ex. date, record date etc). I want to check daily update. Is there any facility provided by NSE or BSE. or I have to subscribe to any private broker or any institute ?
NSE आणी BSE वर कंपनीच्या शेअर्सच्या साईटवर जाऊन बघाल तर CORPORATE ANNOUNCEMENT या सदरांत आपल्याला ही माहिती मिळू शकते. खाजगी ब्रोकर किंवा कोणत्याही संस्थेची गरज नाही. दूरदर्शनवरील वाहिन्या आणी इंटरनेट पुरेशी माहिती पुरवतात. तसेच इकॉनॉमिक टाईम्समधील तज्ञांचे लेख वाचा.
नाव: suraj
तुमचा प्रश्न : brokar garjecha ahi ka? mi Kotak Mahindra Bank madhe demat and trading account open keel ahi mi swta gharunch karu shkato ka. ani te account connect ahi mazy saving account barber(same bank).
कोटक महिंद्रा बँकेत ट्रेडिंग, ‘DEMAT’ उघडल्यानंतर तीच बँक तुमचा ब्रोकर असते ब्रोकरप्रमाणेच सुविधा पुरवते त्यामुळे स्वतंत्र ब्रोकरची गरज नाही.
नाव: suraj
Email: surajdhore11@gmail.com
तुमचा प्रश्न : share vita ghetana t+2 formula use hoto tar to ekach divest nasa vita yil
शेअर खरेदी दोन प्रकारे करता येते. जर तुम्ही खरेदी केलेला शेअर त्याच दिवशी विकला नाही तर तुम्हाला शेअर्सची पूर्ण रक्कम व दलाली देवून खरेदी करावा लागतो. त्यावेळी १+२ पद्धत लागू होते. म्हणजेच खरेदी केलेला शेअर चौथ्या दिवशी DEMAT अकौंटमध्ये जमा झाल्याशिवाय विकता येत नाही. जर तुम्ही खरेदी केलेल्याच दिवशी मार्केटच्या वेळेत विकून टाकल्यास जो काही फायदा तोटा होईल तेव्हढाच तुम्हाला मिळतो किंवा सोसावा लागतो.
नाव: विशाल
तुमचा प्रश्न : जर आकाऊट ला पैसे नसतील नी शेयर खरेदी केला तर पैसे किती दिवसात द्यावे लागतात नि माझिन व डिलीवरी मध्ये काय फरक आहे
जर तुमच्या बचत खात्यांत पैसे नसतील आणी तुम्ही ऑन लाईन व्यवहार करत असाल तर तुमचा शेअर्स खरेदीचा व्यवहार पुरा होणार नाही. आणी जर तुम्ही ब्रोकरमार्फत व्यवहार करत असाल तर खरेदी केल्याच्या दुसऱ्या दिवशी चेक द्यावा लागतो. मार्जिन म्हणजे तुमच्यांत आणी ब्रोकरमध्ये एका विशिष्ट प्रमाणांत मार्जिन ठेवण्याचा झालेला करार .जर या शेअर्सची किंमत खाली येऊ लागली तर ब्रोकर हे शेअर्स विकून टाकतात.
डिलिव्हरी म्हणजे तुम्ही शेअर्स खरेदी केल्यावर तुम्ही त्या शेअरचे मालक झालांत. तुम्ही हे शेअर्स कधीही विकू शकता किंवा हे शेअर्स तारण ठेवून कर्ज घेवू शकता.
नाव: A B Ransing
तुमचा प्रश्न : उत्तम ब्लॉग बदल तुमचे सर्व प्रथम अभिनंदन!!! बोरोसिल ग्लासवर्क कंपनी buyback ऑफर आणत आहे Rs 2500 ला म्हणजे नेमके काय? आणि दूसरा प्रश्न वर्षा आत जर शेयर्स विकल तर ब्रोकरेज वगळता अजुन कोणते चार्जेस अणि कर भरावे लागतात. जास्तीत जास्त किती
मी ‘BUY BACK’ वर लिहिलेला ब्लोग नंबर ५८ वाचा. Rs २५०० पर्यंत ‘BUY BACK’ करणार याचा अर्थ Rs २५०० च्यावर ‘BUY BACK’ करणार नाही. पण कंपनीने ‘BUY BACK’ मध्ये किती रक्कम खर्च करायची आणी कायद्याप्रमाणे किती काळांत खरेदी करायची हे ठरलेले असते. मार्केट पडत राहिले तर कंपनी स्वस्तांत BUY BACK करू शकते.तुम्ही वर्षाच्या आंत शेअर्स विकले तर चार्जेसमध्ये किंवा ब्रोकरेजमध्ये फरक पडत नाही पण आयकर भरावा लागतो. एक वर्षानंतर विकल्यास तो कॅपिटल गेन्स होतो.
नाव: सुखदेव जाधव
तुमचा प्रश्न : मी एखादा शेअर्स वर्षभर किंवा अल्प कालावधीसाठी माझ्याकडे ठेवून लाभांष वितरणापुर्वी तो विकला तर त्या शेअर्सच्या बाबतीत मला लाभांष मिळतो का?
लाभांश मिळण्यासाठी रेकॉर्ड डेटला ते शेअर्स आपल्या DEMAT अकौंटला जमा असले पाहिजेत.जर रेकॉर्ड डेटला तुमच्या DEMAT अकौंटवर हे शेअर्स जमा नसतील तर लाभांश मिळत नाही.
नाव: Gajanan Sonawane
तुमचा प्रश्न : liquidity बद्दल सांगा
लिक्विडीटी म्हणजे रोखता किंवा कोणत्याही मालमत्तेची रुपयांत त्वरीत रुपांतरीत होण्याची क्षमता.लिक्विड शेअर्सची खरेदी किंवा विक्री तुम्ही पटकन करू शकता. खरेदी विक्रीच्या किंमतीत कमी फरक असतो. ट्रेड पटकन होतो. लिक्विडीटी नसेल तर दिवस संपतो पण ट्रेड होत नाही.
नाव: GANESH PHADKE
तुमचा प्रश्न : NAMASTE MADAM MADAM TECHNICALCHART VAR INTRADAY SATHI [POSSISNAL SATHI] INDICATORS INDICATOR KUTHLE VAPRAVE? AANI PARAMETTERE KITI THEVAVE HYA BADDL KRIPYA MAHITI DYAVI
मी तांत्रिक विश्लेषणावर ब्लोग टाकत आहे तो वाचा.
नाव: SANTOSH CHAVAN (MJ)
तुमचा प्रश्न : madam मी तुमची खूप आभारी आहे . मी तुमचे सारे ब्लोग वाचले आहे त्याने मला खूप उपयोग झाला . तुमचा मार्केट चा आभ्यास खूप आहे. तो तुम्ही आमच्या सोबत share करता यासाठी thanx.tar prashan
1.intraday sathi stock kasa nivadava.
2.devlivery sathi share nivadatana kai phave.
3.MACD,RSI,EMA kase kadhatat.
4.sewing trading kai prakar a hai.
5.sgx nifty kai hai v usa market kathi open ani bandha hot.
6.share news sathi best website kontya ahet
ही सर्व माहिती ब्लोगमध्ये आहे , जर ब्लॉगवर आढळली नाही तर इंटरनेटवरून मिळवा. .
नाव: Lokesh p. Bhise
तुमचा प्रश्न : Maza Dada mala nehmi sangto ki tu share market madhe nako laksh deu , tyachyamule bhale bhale bhikari zale ahet mi Kay karawe ? Ani mala share market madhe career karayche ahe
तुमच्या दादाचा तुम्ही जरूर आदर करा पण एक लक्षांत ठेवा की प्रत्येक माणसाचे मत आणी त्याला आलेले अनुभव वेगवेगळे असू शकतात. त्यांनी त्यांचे काम केले तुम्ही तुमचे काम करा. पटल्यास स्वीकारा नाही पटल्यास स्वतःला जे पटेल ते करा आणी चांगल्या वाईटाची जबाबदारी घ्या.
नाव: SUNITA MAHAVIR CHOUGULE
तुमचा प्रश्न : To, Res Madam, I want to do intraday trading in share mkt,my target fo day 200/- only,can it is possible?
आपण केलेली शेअर्सची निवड आणी घेतलेला झटपट निर्णय आणी बातमी आणी तिचा निवडलेल्या शेअरवर होणारा परिणाम यांचा अभ्यास यावर इंट्राडे ट्रेडचे यश अवलंबून असते. आपणास सरासरी वरीलप्रमाणे फायदा होऊ शकतो. पण काही वेळेला तोटा झाल्यास आपण तो सोसण्याची तयारी ठेवावी.
नाव: Virendra
तुमचा प्रश्न : नमस्कार मँडम, मी डीमँट अकाउंट उघडले आहे मात्र कोणत्या कंपनीचे शेअर्स विकत घ्यावेत यासाठी त्या कंपनीची माहिती कूठुन व कोणती आणि कशी काढायची या विषयी मार्गदर्शन करावे,कंपनीचे शेअर्स आपण किती काळासाठी होल्ड करु शकतो ?
कंपनीच्या साईटवर जाऊन तसेच BSE आणी NSE साईटवर जाऊन आपण ही सर्व माहिती मिळवू शकता. दर तीन महिन्यांनी प्रत्येक कंपनी आपले तिमाही रिझल्ट्स जाहीर करते. त्याकडेही लक्ष द्यावे. आणी दूरदर्शनवरील वाहिन्याही कंपनीच्या बातम्या देत असतात तिकडे लक्ष ठेवावे.
नाव: shubham borade
तुमचा प्रश्न : namste madam mla shear market vishyi konthi mahiti nahi …..mla hyat utaraych ahe investmet karaychi ahe tr krupya mla purn mahiti dyavi plzzz ,mla help karavi market madhi utrnyasathi
वरील माहिती देण्यासाठीच मी ब्लोग लिहित असते. आपण ब्लोगवरील सर्व लेख, माझी वहिनीतील लेख, तसेच दर आठवड्याला लिहित असलेले आठवड्याचे समालोचन वाचावे म्हणजे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.
नाव: Akshay
तुमचा प्रश्न : Mam treading account open karnyasathi konta broker changala ahe full service broker ki discount broker, sharkhan, rksv, Geojit PNB paribha
ब्रोकर किंवा बँक फक्त शेअर्सची खरेदी विक्री करण्याकरता एक एजन्सी म्हणून काम करते. आपण प्रत्येक ब्रोकर देत असलेल्या सेवा आणी त्यासाठी आकारीत असलेले दर याचा अभ्यास करून निर्णय घ्यावा. मात्र ब्रोकर टिपा किंवा सल्ला देण्यासाठी जास्त दर आकारात असेल तर त्या टिप घ्याव्यात की नाही हे तुम्हीच ठरवायचे आहे. हे सर्व लक्षांत घेवून आपण आपल्या घराशेजारी किंवा ऑफिसजवळ असलेला ब्रोकर निवडावा. कारण त्याच्या सतत संपर्कांत असणे सोयीचे होते.
नाव: स्वप्नील विभूते
तुमचा प्रश्न : Madam मला शेअर मार्केट मध्ये थोड्या प्रमाणात गुंतवणूक करून थोड्या प्रमाणात लाभाची अपेक्षा आहे. पण मला विषयाचे काही माहिती नाही, बँकमध्ये Demat accout open करून जायचे आहे ब्रोकर नको. मी अभ्यास करून गुंतवणूक करेल ब्रोकर through नाही. आपण नमूद केल्यानुसार नुसत्या पुस्तकी अभ्यासाने होणार नाही, तरी पण मला प्राथमिक माहिती आणि बाकी कोणता अभ्यास व सराव करावा लागेल या बाबतीत मार्गदर्शन करावे व आपली हरकत नसेल तर आपला संपर्क क्रमाक मिळेल का ?
तुमचा प्रश्न : Madam आपला ब्लोग वाचून चांगले knowledge भेटले त्या बद्दल आपले आभार मानतो. तसा मी पण अभ्यास चालू केला आहे. blue chip company आणि A group company, top losers & Gainers यांचे निरीषण चालू करत आहे, पण आजूनही मला हे कळले नाही की Intra Day आणि Detrives काय आहे.
थोड्या प्रमाणांत गुंतवणूक करून थोड्या प्रमाणात फायदा कमवायचा असल्यास तुमचे भांडवल तुम्ही प्रथम मुदत ठेवीत ठेवा. अनुकूल संधीची वाट पाहा आणी तशी संधी मिळताच रिस्क आणी रिवार्ड याचा ताळमेळ घालून गुंतवणूक करा.इंट्राडे म्हणजे खरेदी आणी विक्री एकाच दिवशी मार्केटच्या वेळांत करणे. डिलिव्हरी म्हणजे शेअर्स खरेदी करून काही काळानंतर विकणे होय.
नाव: Akshay
तुमचा प्रश्न : Mam tumhi tumache blog PDF format madhye provide karana mhanje offline pn vachata yetil
तुमच्या सूचनेचा योग्य वेळा विचार करू.
नाव: santosh chavan
तुमचा प्रश्न : SHARE MARKET SEKHANA HAI TO APKA BLOG JARUR PADHE se me dostoko keheta hu. me apka bhut badh fan hu me apke sabi blog padhe hai.
Namaste madam THANKS FOR EVERY THINK
MAZI 5 QUSITON AHET TUMALA barobar vatle tar ansir me
1.Bolt Operating Course karun job milato ka ? tasech payment kiti ashte
2.12 pass natar share market madhe konta course karta yeel.
3.sawtach broker house open karya sadhi konti avashakta hai.
4.intraday and delivery sathi stop loss resho kai asava
5.option madhe call buy order kashi detat ( agar NIFTY ltp 7600 par hai or Strike Price 7650 hai or Expiry Date 1 month ki hai or primary kitna bho agar me 7600 ltp or 7650 ke strike price par call buy kartu hu or expiry ke pahile agar nifty 7000 tak jata hai to kai ho ga profit ya loss ?
बोल्ट ऑपेरटरचा कोर्स करून जॉब मिळू शकतो. हा जॉब बँकेतल्या कॅशियरप्रमाणेच असतो. पगार प्रत्येक ब्रोकरप्रमाणे बदलतो.
ही माहिती आपल्याला BSE आणी NSE च्या साईटवर निरनिराळ्या कोर्सेसची माहिती दिलेली आहे ती आपण वाचावी.
स्वतःचे ब्रोकर हाउस उघडण्यासाठी आवश्यक असणार्या अटी आणी पात्रता आपल्याला BSE आणी NSE, च्या साईट्स वर मिळू शकतील. यासाठी आपण SEBI ची साईटही पहावी.
इंट्राडे ट्रेडसाठी १% आणी डिलिव्हरीसाठी १०% पर्यंत STOP लॉस ठेवावा.
मी डेरीव्हेटीव मध्ये ट्रेडिंग करीत नाही.
नाव: mahendra naik
तुमचा प्रश्न : madam, GURUJI i am from ratnagiri and want to do a seminar for the giants group of ratnagiri (womans group) is it possible for you to give your valuable time specially for the above woman group if no can you arrange any other person to give information about shares market,i will be highly obliged ..thanx waiting for the reply,, mahendra
आम्ही तुम्हाला यासंबंधी मेल पाठवली होती. तुमचा फोन नंबरही मागितला होता.महिलांना मार्दार्ह्सन करण्याची इच्छा जरूर आहे. पण त्यासाठी तुमच्याशी बोलणे जरुरीचे आहे. मगच निर्णय घेता येईल.
नाव: atul shinde
तुमचा प्रश्न : नमस्कार!
मी अतुल शिंदे. मागील ६/७ वर्षापासून कमोडीटी ट्रेडिंग मध्ये काम करत आहे. माझे एका कंपनीत मी खाते उघडले आहे. माझे १ लाखाचे खाते आहे. ती कंपनी मला रक्कम परत मागितली असता , परत देण्यास टाळाटाळ करत आहे. तसेच स्वताच्या मर्जीने माझ्या खात्यामध्ये ट्रेडिंग करत आहे. कोणतीही मला पूर्व सुचना न देता. तसेच लॉट साईझ मोठ्या प्रमाणात मारत आहेत. तर लॉस झाल्यास त्याला जबाबदार कोण असेल ? माझे पैसे मी कसे परत मिलउ शकतो . तसेच ती कंपनी मला आता असे सांगत आहे कि मी तुला दर महा १० ते १६ % नफा मिळवून देईन . तर असे कंपनी करू शकते का? वरील सर्व गोष्टी स्वता कंपनी चे चेअरमन सांगत आहेत. तरी माझे मी खाते स्वता खेळण्या साठी मागितले तरी दिले जात नाही. तर मी काय करावे. तसेच माझ्या प्रमाणे त्या कंपनी मध्ये अंदाजे ३००० ते ४००० खाती आहेत. त्यांची पण हीच समस्या आहें. तरी आम्ही काय करावे?
आपण यासाठी सेबी GRIEVANCES CELL आणी इन्वेस्टर प्रोटेक्शन फोरमकडे या बाबतीत संपर्क साधावा.
नाव: Pravin
तुमचा प्रश्न : Namaste Madam,
Sharemarket madhe guntavanuk karun 50,000 to 60,000 per month kamavu shakto ka? (Intra Day na karta) .
Tyasathi kiti vel aani bhandaval avashyak aahe ?
Kwachit Nuksan zalyas tyakade kase pahave?
Aapan Dileli Mahiti farach changli aahe.Margadarshanabaddal Aabhari.
शेअरमार्केटमध्ये किती पैसे कमावता येतील याला मर्यादा नाही. त्याच प्रमाणे कोणते शेअर निवडता यावर घालावे लागणारे भांडवल अवलंबून आहे. नोकरी सारखा पैसा कमवायचा असेल तर व्यासंग हवा सातत्य हवे आणी झटपट निर्णय घेण्याची क्षमता हवी.काही शेअरमध्ये अव्वाच्यासव्वा अपेक्षेबाहेर अचानक फायदा होतो त्यामध्ये झालेले नुकसान भरून निघाले असे समजावे.
नाव: komal
तुमचा प्रश्न : IF I HAVE BOUGHT 100 SHARE OF XYZ COM @ 350 AND COMPANY DECLAER BONUS 1:2 THEN HOW ITS CALCULET
१;२ बोनस याचा अर्थ तुमच्याजवळ २ शेअर्स असतील तर तुम्हाला एक शेअर बोनस म्हणून मिळेल. आपल्याला ५० शेअर बोनस म्हणून मिळतील. बोनस मिळाल्यानंतर त्याच प्रमाणांत शेअर्सच्या मार्केट मधील किंमतीत किमतीत बदल होईल.
नाव: जयेश ढोले
तुमचा प्रश्न : १० ते १५ वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल तर कोणत्या प्रकारचे shares विकत घेतले पहिजेत.
या प्रकारच्या दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करायची असल्यास शेअरमार्केट पडत असताना आपण ब्लू चीप कंपन्यांचे शेअर्स विकत घ्यावेत. प्रत्येक औद्यीगिक सेक्टरमधील घडामोडींवर तसेच कंपनी जाहीर करत असलेल्या तिमाही रिझल्ट्सवर लक्ष ठेवून कंपनीच्या प्रगतीचा, आर्थिक परिस्थितीचा मागोवा घेणे आवश्यक आहे. जरुरी असल्यास आपल्या पोर्टफोलियोमध्ये दरवर्षांनी आवश्यक ते बदल करावेत. म्हणजे आपल्या पोर्टफोलियोची किंमत वाढत राहील.
नाव: जयेश ढोले
तुमचा प्रश्न : भाग ३७ FAT बद्दल सांगताना तुम्ही सांगितले की RIL चा १०४० भाव चालू असताना कुणीतरी ८४० shares विकायला काढले, त्यावेळी ते shares ८४० ला विकल्या गेले की १०२०, १०००, १०३८
वगैरे ला लोकांनी जश्या खरेदीच्या orders दिल्या असतील तेवढ्याला विकल्या गेले.
ज्या भावाला विक्रीची ऑर्डर चुकून टाकली गेली असेल तो भाव किंवा त्यापेक्षा जास्त भावाचे सगळे सौदे त्या भावाला लावलेल्या शेअर्सची संख्या पूर्ण होईपर्यंत. पूर्ण होतील.. जर Rs २०ला २०००० शेअर्स विकण्यासाठी चुकून ऑर्डर टाकली तर त्याच वेळी खरेदीच्या ऑर्डर्स संगणकावर match केल्या जातील. प्रथम RS २०.०० पासून क्रमशः वरच्या भावाच्या ऑर्डर २०००० शेअर्स विकले जाईपर्यंत पूर्ण केल्या जातील
नाव: sandip untwale
तुमचा प्रश्न : trading madhe avraging haging badal savestar sanga
शक्यतो अवरेजिंग करू नये असे मला वाटते. कारण असे म्हणतात की “DO NOT PUT GOOD MONEY AFTER BAD MONEY”
नाव: nilkanth chougule
तुमचा प्रश्न : Madam aapla blog khup fhayadyacha ani new comers na protsahit aahe. konthyahi company che balancesheet, thyache utpadan, tyanna laganara pakka or kaccha mal , share che bhaw wadanyache wa kami honyache karan WA itar mahiti kontya site war minel yachi mahiti mala Email or 9028585856 ya number war sms dyawi hi winti.
ही सर्व माहिती कंपनीच्या साईटवर किंवा त्यांच्या तिमाही निकालांत, वार्षिक रिझल्ट्स मध्ये मिळू शकेल
नाव: santosh chavan
तुमचा प्रश्न : 1.share market madhe delivery karava ki intraday
2. stop loss cha resho kai asava
3. share market madhe invesment var tax kithi asto
4.ipo ghetana konti dakshata gaivi
5.tumi sawta kiti paisa kamavala
शेअर्स खरेदी केल्यावर एक वर्शांनंतर विकल्यास झालेल्या फायद्यावर आयकर भरावा लागत नाही.
ब्लोग नंबर ४७ ४८ ४९ ५० ५१ ५२ हे ब्लोग IPOच्या संबंधांत आहेत ते तुम्ही वाचा
नाव: Ravi kunte
तुमचा प्रश्न : Welspun Corp Ltd….? Buy At 142..
Now Sold @….?
शेअर्स कितीला विकावा याचा निर्णय तुम्ही तुमच्या होल्डिंग capacity आणी अपेक्षित प्रॉफिट मार्जिन विचारांत घेवून घ्यावा.
नाव: sandip untwale
Email: sandip.untavale@gmail.com
तुमचा प्रश्न : trading charts softwere badal sanga
टेक्निकल चार्ट बद्दलची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे ती वाचा.
नाव: Dnyaneshwar Rajput
तुमचा प्रश्न : hi madam.. madam doller chi value kashi vadate te sangana please
प्रत्येक चलनाची किंमत त्यात्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असते.
नाव: Sheetal
तुमचा प्रश्न : Dear Madam ,Madam , तुमचे खूप खूप आभार. तुमच्या blog मुले आमचा आत्मविश्वास वाढला. तुमचा low brokerage साठीचा reply वाचला.
आम्हाला काही प्रश्न आहेत:
१. Split share लिस्ट refer करावी का ? मला असे विचारायचे आहे कि share split झ्याल्या नंतर किंमत कमी होते , तेव्हा ती खरेदीची योग्य वेळ असते का .
२. ONGC share च्या devident ची effective date ०७.०९.२०१५ आहे. तर आमच्या account ला devident कधी जमा होईल.
( फक्त ४ share आहेत.)
३. दिवाळी मध्ये मार्केट वरती जाते का ? म्हणजे कोणत्या सेक्टर वरती परिणाम होतो हे सांगता येईल का .
Thank you
शेअर्स स्प्लिट होणार म्हणून शेअर्सचा भाव वाढलेला आसतो त्यामुळे शेअर स्प्लिट झाल्यानंतर थोडे दिवस थांबावे रिस्क रिवार्ड रेशियो पहावा कारण स्प्लीत्मुळे नेहेमी शेअर्सची संख्या वाढल्यामुळे EPS कमी होतो.
दिवाळीमध्ये FMCG, ऑटो आणी TEXTILES सेक्टरमध्ये तेजी येण्याची शक्यता असते. .
नाव: hanumant
तुमचा प्रश्न : arthavyavashesathi have suraksha jale – arun jaitley
share bajar ani chalanat honare chadh utar adi mudde hatalanyasathi jagtik patalivar suraksha jale nirman karanyachi jordar magani bharatatarfe karanyat ali . chinchya yuwanche avmulyan karanyat yet asalyamule nirman zalelya paristhitichya parshvabhumivar bharatache arthamantri arun jaitley yanni varil magani keli.
sakal 06.09.2015
yacha artha kay ? krupaya he sangave.
चलनांत होणाऱ्या बदलामुळे भांडवली बाजारावर परिणाम होते. चलनाच्या किमतीत होणारे बदल हे मागणी पुरवठा या तत्वावर झाले पाहिजेत. कारण चलनाच्या किमतीत होणारे बदल हे अर्थव्यवस्थेचे प्रतिबिंब असते. चीनने कृत्रिमरीत्या चलनाचे अवमूल्यन केले त्यानुळे चलनयुद्धच चालू झाले. परंतु प्रतिबंधात्मक व्यवस्था जागतिक पातळीवर केली नव्हती. त्यामुळे प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवर कळत-न -कळत ध्यानीमनी नसताना परिणाम झाले. भावी काळांत असे घडल्यास याला तोंड देण्यासाठी काही व्यवस्था असणे गरजेचे आहे एव्हढेच अर्थमंत्र्यांनी सुचवले.
नाव: Chaitali
तुमचा प्रश्न : madam मी तुमची खूप आभारी आहे . मी तुमचे सारे ब्लोग वाचले आहे त्याने मला खूप उपयोग झाला . तुमचा मार्केट चा आभ्यास खूप आहे. तो तुम्ही आमच्या सोबत share करता यासाठी द्यन्यवाद . madam मी Amteck auto चे share २ ते ३ महिन्यासाठी घेण्याचा विचार करत आहे. तुम्ही मला सांगू शकता का कि तो share मला profilt मिळवून देईल का?
द्यन्यवाद
प्रॉफिट मिळणे किंवा न मिळणे हे तुमच्या खरेदीची वेळ आणी भाव यावर अवलंबून आहे. परंतु जाणूनबुजून धोका पत्करू नये.
नाव: Sachin Sutar
तुमचा प्रश्न : Hi, I am having shares of bank of maharashtra 100 quantity. We had bought the share @ 22. However, currently i don’t have share certificate with me.
But all the details of share certificate such as customer number, account number, demat account number we have. Could you suggest me the solution for the same.
Regards,
Sachin sutar
तुम्ही तुच्या ब्रोकरकडे जा ब्रोकर तुम्हाला फार्म देईल त्यावर माहिती भरून DUPLICATE SHअरे CERTIFICATE मागवा आणी ते मिळाल्यानंतर शेअर्स DEMAT करून घ्या.
नाव: amul
तुमचा प्रश्न : i have purchased 100 reliance petrolium ltd triple option convertible debentures in 1993. If you know the history of this tocd please explain me the details.
आपण यासाठी कंपनीकडे या बाबती संपर्क साधावा. कंपनी याबाबतीत आपल्याला मदत करेल.
नाव: Sagar Dugam
तुमचा प्रश्न : Hello Madam, Tumache blog khup chan aahet pan ashi shanka aahe ki tumi je blog madhe news description takata te tumi CNBC kinva zee business varun milate ka?? Ka dusara konta source aahe karan me jeva blog vachato teva asa vatata ky ky zalay hya week madhe mala tyatalya tharavik babich mahit asatat..tumi dusara kahi source vaparat asal tr sanga.
मी जेथून जेथून शेअरमार्केट विषयी माहिती मिळते ती घेते. माझ्या अनुभवानुसार त्याचे विश्लेषण करते. वर्तमानपत्रे कंपन्यांची press कॉन्फरन्स मुलाखती, इंटरनेट अशा विविध ठिकाणांवरून माहिती मिळवते. .
नाव: vijay mhaske
तुमचा प्रश्न : mi punj lloyd che 40000 share buy kele ahet 30/- la
loss zala ahe…..kay karave
तुमच्या होल्डिंग capacityप्रमाणे निर्णय घ्या. काही कॉर्पोरेट एक्शन झाल्यास शेअर्सच्या भावांत अचानक बदल होऊ शकतो त्यामुळे शक्य असल्यास धीर धरा.
नाव: Kalpna jadhav
तुमचा प्रश्न : मी एक महाविद्यालयीन Student आहे माझे Demat A/c आहे मी 5000 shares Hold करून ठेवले आहेत मी असे एकले होते कि Shares Sell करण्य्पेषा Hold करावेत तर मला Hold / Holding म्हणजे काय ते सांगावे . मी आत्ता पर्यंत तुमचे 40 ब्लोग वाचलेले आहेत .वाचून खूप समाधान वाटले
शेअर्सचा भाव वाढत असेल तरच शेअर्स न विकता थांबणे व अधिक भाव मिळण्याची वाट पाहणे म्हणजे होल्ड करणे होय. तसेच कारणाशिवाय भाव वाढत असताना शेअर्स न विक्णेही काही वेळेला शहाणपणाचे नसते.
नाव: pallavi sudhakar sarang
Email: pallavicredit@gmail.com
तुमचा प्रश्न : HOW TO INVEST IN SHARE MARKET – PLZ ANS GIVE IN MARATHI.
माझा ब्लोग मराठीतच आहे तसेच माझी वहिनीतले लेख आणी आठवड्याची समालोचने मराठीतच आहेत. ती आपण वाचा
नाव: Kishor Kadam
तुमचा प्रश्न : Hello madam maza que asa aahe ki companiche detail kuthe milatat means trading a/c, profit &loss A/c, balancesheet kute check kartat…mahnje companicha fundamental analysis kutun krayacha??..
वरील माहिती कंपनीच्या वार्षिक अहवालांत, तसेच चेअरमनचे भाषण तसेच तिमाही रिझल्ट्स मध्ये मिळू शकतात.. तसेच वरील माहिती आपल्याला इंटरनेट तसेच BSE आणी NSE च्या साईटवर मिळेल. .
नाव: Ranjeet
तुमचा प्रश्न : mam.mla.FNO investment baddal mahiti havi ti kshi karvi pls ek profit/loss che e.g deun sangal ka?
मी FNO मध्ये ट्रेडिंग करीत नाही.
नाव: siddharam Halkude
तुमचा प्रश्न : शॉर्ट करने म्हणजे काय? त्याचे काय काय नियम आहेत
आपल्याजवळ शेअर्स नसताना विकणे म्हणजेच short करणे. थोडक्यांत सांगायचे झाल्यास ‘ हलवायाचे घरावर तुलसीपत्र” स्पोट मार्केटमध्ये short केले असेल तर त्याचदिवशी शेअर्स विकत घेवून तो ट्रेड पूर्ण केला पाहिजे.
नाव: RAJENDRA M. NAIK
तुमचा प्रश्न : mi tumche blog hallich vachale tesuddha market vishaee shodhatana sapadle kharokhar aaple manapasun abhinandan ani atyant subak mahitibaddal dhanyavad.2007 pasun mi marketmadhye ahe parantu jujabi dnyanamule far kahi pragati karu shaklo nahi aaple blog vachun thoda hurup ala . intraday ajun kevhach kele nahi tari tyabaddal ajun jast mahiti mala kashi milel he pls sanga dhanyavad.
आपण माझे इंट्राडेवर लिहिलेले ३२ ३३ ३४ ३५ ३६ हे ब्लोग वाचा.
नाव: GIRISH NIVRUTTINATH WANARE.
तुमचा प्रश्न : I want to become a broker! what is basic qualification as well as other extra certification or licencing process required for it ? Please Guide Me ! I am waitting for you reply !
यासाठी आपण BSE (BOMBAY STOCK EXCHANGE) आणी NSE (NATIONAL STOCK EXCHANGE) तसेच SEBI (SECURITIES EXCHANGE BOARD OFINDIA) च्या साईटवर जाऊन माहिती घ्यावी.
नाव: KISHOR R. TARALEKAR
तुमचा प्रश्न : Majhe june karj prakarn divali madhe purn hot ahe. Mala share market madhe guntavnuk karaychi ahe
आपण माझे ब्लोग वाचा माहिती मिळवा DEMAT आणी ट्रेडिंग अकौंट उघडा आणी मगच ब्लू चीप कंपन्यांमध्ये पैसे गुंतवा.
नाव: Sanjay Waghmode
तुमचा प्रश्न : how to trade in future , optio
F & O हा माझा प्रांत नाही.
नाव: Dhanesh Patil
तुमचा प्रश्न : I want information about forex trading.
FOREX ट्रेडिंग हा स्पेशलाईझ विषय आहे आपल्याला त्यासाठी ट्रेनिंग घ्यावे लागेल.
नाव: Nilesh
तुमचा प्रश्न : शेयर्स माकेर्टिंग काय असते?
माझ्या मते शेअर मार्केटिंग म्हणजेच शेअर्सची माहिती गोळा करून चांगले शेअर्स कमी भावाला खरेदी करणे आणी फायदा घेवून वाढीव भावांत विकणे होय. .
नाव: Mandar
Email: isastrology@gmail.com
तुमचा प्रश्न : मी अजून dmat account सुद्धा उघडलेले नाही . उघडायचा विचार करतो तेव्हा भीती वाटते . मला थोडया प्रमाणात share trading करायचं आहे . तेव्हा pl सुचवा कस? कुठ? . व आत्ताच्या मार्केट वरून करता येईन का ?
शेअरमार्केटमध्ये कोणतीही गुंतवणूक करण्याच्या आधी कंपन्यांची माहिती मिळवा कोणता शेअर स्वस्त कोणता शेअर महाग हे समजावून घ्या आणी मगच शेअरमार्केटमध्ये प्रवेश करा. कोणत्याही मार्केटमध्ये खरेदीविक्रीची वेळच महत्वाची ठरते.