आठवड्याचे समालोचन -७ मार्च २०१६ ते ११ मार्च २०१६ – लाभांशाची बरसात शेअरमार्केटच्या अंगणांत.

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
money-rain-1013711_640
काही अपवाद वगळता आठवडाभर मार्केट तेजीतच राहिले. अर्थमंत्र्यांनी EPF वर लावलेला कर पूर्णपणे रद्द केल्यामुळे सरकारची लवचिकता दिसली. NPS पेन्शन योजनेमधून ४०% पर्यंत रक्कम काढल्यास त्यावर कर लागणार नाही.या बदलाने अंदाजपत्रकामुळे निर्माण झालेल्या सकारात्मक वातावरणांत भरच पडली.
आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • चीनच्या PBOC ने २० बिलियन युआन सिस्टीममध्ये घातले.
 • क्रूडच्या दरामध्ये हळू हळू वाढ होत होत तो US$ ४० पर्यंत पोचला.
 • ECB ने गेल्या वेळी निगेटिव्ह व्याज दर ठेवला होता. त्यांत अजून २०% कपात केली जाईल असे जाहीर केले.
 • आंतरराष्ट्रीय बाजारांत धातूंच्या किंमती वाढत असल्यामुळे भारतातील धातू उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती वाढल्या.
 • युरोपिअन सेन्ट्रल बँकेने (ECB) अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी खालीलप्रमाणे उपाय जाहीर केले.
  डीपॉझीटवरील व्याजाचे दर कमी करून ते -०.४% केले. (२) रीफायनांस रेट ०.०५% वरून झीरो केला. (३) मार्जीनल लेंडिंग रेट (बॅंका short टर्मसाठी ECB कडून कर्ज घेतात) ०.३०% वरून ०.२५% केला. (४) ECB कॉर्पोरेट कर्ज विकत घ्यावयास सुरुवात करील. आणी बँकांसाठी स्वस्त कर्जाच्या योजना सुरु करतील.
 • ECBने हे उपाय सुरु केले त्याचे सर्वांनी स्वागत केले.

सरकारी announcements

 • पंतप्रधान आणी अर्थमंत्री यांनी बँकांचे उच्च पदाधिकारी आणी RBI बरोबर ज्ञानसंगम या बैठकीत बँकिंग सेक्टरच्या प्रगतीचा आणी त्यांना भेडसावणारया समस्यांचा उहापोह केला. या मध्ये बँकांचा एकमेकांमध्ये विलय होण्याची शक्यता व्यक्त केली. ज्या बॅंका स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकत नाहीत त्यांच्यासाठी बँकिंग ब्युरो स्थापन करावा असे सुचवले.
 • सध्या राज्य सरकारे आपापली अंदाजपत्रके सादर करीत आहेत. राजस्थान सरकारने आपल्या अन्दाजपत्रकांत कॉटन यार्नवरील VHAT कमी केला आणी तंबाखू आणी तंबाखूपासून बनवलेल्या पदार्थांवर VHAT बसवतील असा अंदाज व्यक्त केला गेला. त्यामुळे ITC चा शेअर पडला. याच आठवड्यांत महाराष्ट्र सरकारचे अंदाजपत्रक सादर होणार आहे.
 • ९ मार्च २०१५ रोजी केंद्र सरकार कॉनकारमधील त्यांच्या शेअर्सहोल्डिंगपैकी ५% शेअरहोल्डिंग साठी OFS झाला . किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ही OFS १० मार्च २०१६ रोजी ओपन झाला.. OFSची किंमत Rs ११९५ ठेवली होती किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ५% सूट ठेवली होती. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी असलेला क्वोटा १.१२ पट भरला.
 • रिअल एस्टेट रेग्युलेटरी बिलावर लोकसभेंत चर्चा सुरु झाली आहे. रिअल एस्टेट रेग्युलेटर बिल दोन्ही सभागृहांत पास झाले. या बिलातील तरतुदीनुसार डेव्हलपर्सना आपल्या सर्व प्रोजेक्ट ज्या ५०० SQ मीटर जमिनीवर आहेत किंवा ज्यांत ८ अपार्टमेंट असतील रजिस्टर कराव्या लागतील. आपल्या प्रोजेक्ट्सची जाहिरात आणी विक्री करण्याआधी स्थानिक सरकारी आस्थापनांकडून सर्व प्रकारच्या मंजुरी मिळवून रिअल एस्टेट रेग्युलेटरी ऑथारिटीकडे रजिस्टर कराव्या लागतील. घरे खरेदी करणाऱ्यांकडून मिळालेल्या पैशांपैकी ७० % रक्कम वेगळ्या एस्क्रो खात्यामध्ये ठेवावे लागतील. आणी त्याच प्रोजेक्टसाठी खर्च करावे लागतील. घर घेणाऱ्यांसाठी आणी बिल्डर्ससाठी कार्पेट एरिआची व्याख्या निश्चित केली आहे आणी बिल्डरला घरे विकण्यासाठी कार्पेट एरिआसाठी किंमत निश्चित करावी लागेल. आता घर खरेदी करणारे आणी बिल्डर यांना सारख्याच दराने व्याज भरावे लागेल.
 • तसेच सरकारने HELP (हायड्रोकार्बन एक्सप्लोरेशन आणी लायसेन्सिंग पॉलिसी) जाहीर केली. सरकारने डीफिकल्ट ऑईल फिल्ड्स मधून काढलेल्या प्रत्येक युनिटसाठी प्रत्येक युनिटला US$ ७.०८ हा दर निश्चित केला.ह्या दराचे दर सहा महिन्यांनी परीक्षण केले जाईल. एकाच कंपनीला सर्व हायड्रोकार्बंनसाठी लायसेन्स दिले जाईल. आणी ती कंपनी त्याची किंमत निश्चित करू शकेल. सरकार या कंपन्यांच्या रोजच्या कारभारांत ढवळाढवळ करणार नाही. सरकारने हे स्पष्ट केले आहे की सरकार जास्तीतजास्त उत्पन्न मिळवण्यासाठी ही पॉलिसी जाहीर करीत आहे.
 • सरकारने MMRDA (मिनरल्स and माईन डेव्हलपमेंट रेग्युलेटरी कायदा) रिफॉर्म्स जाहीर केले. या रिफॉर्म्प्रमाणे गेल्या वर्षी जानेवारीच्या आधी घेतलेल्या कॅप्टिव ( स्वतःच्या वापरासाठी) असलेल्या माईनिंग लीजची ट्रान्स्फर लिलाव न करता होऊ शकेल. सरकारच्या या निर्णयामुळे मर्जर आणी अक्विझिशनमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील असा अंदाज आहे.
 • सरकारने एस्सार ऑईलकडे असलेले रत्ना आणी R मालिकेतील ऑईल आणी gas फिल्ड्स ONGC ला दिले. .
  आधार बिल लोकसभेत पास झाले. या बिलामुळे सामाजिक सुरक्षा योजना आधारला जोडल्या जातील त्यामुळे सबसिडीत २०% बचत होईल. या बिलामुळे सरकारी योजनेतील दलालीला आळा बसेल.
 • म्युचुअल फंडांना त्यांच्या गुंतवणुकीवर जो लाभांश मिळेल त्याच्यावर अंदाजपत्रकातील तरतुदीप्रमाणे DDT लागणार नाही असे सरकारने जाहीर केले.
 • सरकारने सॉंव्हरिन गोल्ड BOND चा ३ रा चरण सुरु केला. एक ग्रामच्या गोल्ड BONDची किमत Rs २९१५ ठेवली आहे.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • अपोलो टायर ही कंपनी ‘टू व्हीलर’ ला लागणारे टायर बनवण्याच्या क्षेत्रांत उतरणार आहे.
 • सिमेन्स त्यांचे हेल्थकेअर युनिट Rs ३०५० कोटींना विकण्याच्या विचारांत होती. त्याला मंजुरी मिळाली.
 • crompton ने त्यांचा ग्लोबल ट्रान्समिशन बिझीनेस युरो ११.५ कोटीना विकला.
 • GAMMAN इंडिया या कंपनीवर असलेल्या कर्जाचे १२ बँकांच्या CONSORTIUM ने कंपनीच्या शेअर्समध्ये रुपांतर केले. या कंपनीवर Rs १५००० कोटींचे कर्ज आहे.

कॉर्पोरेट एक्शन

 • रिलायंस ADAG ग्रुपने पिपावाव डिफेन्स ही कंपनी विकत घेतल्यावर तिचे नाव रिलायंस डिफेन्स असे बदलले.
  नेईवेली लिग्नाईट या कंपनीने त्यांचे नाव बदलले. आता ही कंपनी NLC इंडिया या नावाने ओळखली जाईल.
 • गेल्या वेळी चर्चा केल्याप्रमाणे DDTचा परिणाम म्हणून सर्व प्रमोटर्सहोल्डिंग जास्त असलेल्या कंपन्यांनी अंतरिम लाभांश जाहीर करायला सुरुवात केली. उदा :- बजाज ऑटो Rs ५० प्रती शेअर, कोल इंडिया Rs २७.४० प्रती शेअर TORRENT फार्माने Rs १५ प्रती शेअर, अल्केम lab Rs ९.७० तर रिलायंस इंडस्ट्रीज ने Rs १०.५० प्रती, वर्धा मान टेक्सटाईल्स Rs १५ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला. हा लाभांश एकदोन आठवड्यांत आपल्याला मिळतो. नियमित लाभांशासाठी जसे दोन चार महिने थांबावे लागते तसे थांबावे लागत नाही.
 • इन्फोसिसचे संस्थापक सदस्य असलेले शिबुलाल यांनी ब्लॉक डीलच्या माध्यमातून २५ लाख शेअर्स तर दुसरे संस्थापक सदस्य एस गोपालकृष्णन यांनी आपण ५० लाख शेअर्स विकणार आहे असे जाहीर केले. यामुळे इन्फोसिसमधील प्रमोटर्सचा स्टेक ०.३ ने कमी होईल.
 • ९ मार्च २०१६ रोजी माइंडट्रि या कंपनीच्या बोनस इशुची ex डेट आहे.

या आठवड्यांत येणारे IPO :-

 • या आठवड्यांत हेल्थकेअर ग्लोबल एन्टरप्राईजेस या कॅन्सर उपचार आणी फरटीलीटी या क्षेत्रांत काम करणाऱ्या कंपनीचा IPO मार्च १६ २०१६ ते मार्च १८ २०१६ या काळांत येत आहे. इश्यूसाईझ Rs ६११ कोटी ते Rs ६५० कोटी आहे प्राईस band Rs २०५ ते Rs २१८ आहे मिनिमम बीड लॉट ६५ शेअर्सचा आहे.
 • ही कंपनी कॅन्सरकेअर क्षेत्रांत सुस्थापित असलेली बँगलोरस्थित कंपनी आहे. या कंपनीची देशांत विविध ठिकाणी २१९ ठिकाणी केंद्रे आहेत. मात्र या IPOची रक्कम आताच्या शेअरहोल्डर्सचा स्टेक कमी (Rs ४०० कोटी) करण्यासाठी आणी कर्ज फेडण्यासाठी करण्यांत येणार आहे. कंपनी आपल्या कॅन्सर केअर सेन्टर्सचा विस्तार आफ्रिकेत करण्याच्या विचारांत आहे.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं
ज्या कंपन्या लाभांश देत आहेत त्यांचे  लाभांश आणी कंपन्यांची नावे मी उदाहरणासाठी देत आहे.जर तुम्हाला एखादा शेअर विकायचा असेल तर माहिती घ्या की त्या शेअरला काही अंतरिम  लाभांश जाहीर झाला आहे कां ? जाहीर झालेल्या लाभांशाची EX डेट आणी रेकॉर्ड डेट काय आहे ? तुम्ही तो शेअर अल्प  मुदतीसाठीसाठी खरेदी केला आहे की गुंतवणुकीसाठी. त्याप्रमाणे निर्णय घ्या. कारण हिरो मोटो कॉर्पने जाहीर केलेला अंतरिम लाभांशांचे (Rs ४०) पेमेंट केल्यानंतर बरोबर शेअरचा भाव तेवढा कमी होतो. त्यामुळे लाभांशाच्या आशेने शेअर वाढतो ती वाढ तुमच्या दृष्टीने पुरेशी असेल तर शेअर विकून पुन्हा खरेदी करता येतो. पण अशा वेळी लागणाऱ्या ब्रोकरेजचा विचार करावा. नेहेमी मार्केटमध्ये होणारा फायदा आणी त्यासाठी लागणारा खर्च याची सांगड घालावी लागते. त्यामुळे खरे व तंतोतंत बरोबर चित्र डोळ्यासमोर येते.
सेन्सेक्स २४७१७ वर आणी निफ्टी ७५१० वर बंद झाले.

4 thoughts on “आठवड्याचे समालोचन -७ मार्च २०१६ ते ११ मार्च २०१६ – लाभांशाची बरसात शेअरमार्केटच्या अंगणांत.

 1. Pingback: आठवड्याचे समालोचन -१४ मार्च २०१६ ते १८ मार्च २०१६ – तेजी मंदीच्या सरीवर सरी | Stock Market आणि मी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.