Monthly Archives: April 2016

आठवड्याचे समालोचन – १८ एप्रिल ते २२ एप्रिल – SEE SAW वर शेअर मार्केट

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

source - wikipedia

source – wikipedia


आपल्याला गोड जेवण जेवल्यावर जशी सुस्ती येते तसे काहीसे मार्केटचे झाले. निफ्टी ६८०० पासून ते ७९०० पर्यंत मार्केट वाढले. ज्यांनी काही दिवसापूर्वी शेअर्सच्या किंमती पाहिल्या असतील त्यांना शेअर्स महाग वाटू लागले. पण या महिन्यांत कंपन्यांचे वार्षिक निकाल लागतात. जर निकाल चांगले आले तर रीरेटिंग होण्याची शक्यता निर्माण होईल आणी येथूनही मार्केट वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांना याची चाहूल लागली आहे असे म्हणता येईल. त्यामुळे तेजी मंदीच्या SEE-SAW वर मार्केट खेळतंय असं वाटतय.
 
आंतरराष्ट्रीय घडामोडी

  • दोहा येथे जी ओपेकची (ओईल प्रोड्युसिंग कंट्रीज) मीटिंग झाली तिच्यांत क्रूडचे उत्पादन गोठवण्यावर कोणताही निर्णय झाला नाही. इराणने या मीटिंगमध्ये भाग घेतला नाही. त्यामुळे क्रुडचा भाव वाढायला वेळ लागेल.
  • ECB ने (युरोपिअन सेन्ट्रल बँक) आपल्या व्याज दरांत कोणताही बदल केला नाही. डीपॉझीट रेट -०.४ % आणी लेंडिंग रेट ०.२५ % कायम ठेवला.
  • चीनने मार्च २०१६ पर्यंत १२० मिलियन टन स्टील निर्यात केले. यामुळे इतर देशातील (यांत भारत, USA, UK हे देशही आले) स्टील उद्योगाला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. परंतु चीन आपले स्टीलचे उत्पादन आणी निर्यात कमी करण्यास तयार नाही. त्यामुळे आता बहुतेक देश आपला स्टील उद्योग वाचवण्यासाठी स्टील आयातीवर ड्युटी लावण्याची शक्यता आहे. प्रत्येक देश स्टील आयातीवर antidumping ड्युटी लावत आहे आणी आपला स्टील उद्योग वाचवण्यासाठी इतर उपाय करत आहे.
  • UK सरकारने टाटा स्टीलच्या UK बिझीनेसमधील २५% स्टेक घेण्याची तयारी दाखवली आहे. तसेच कर्जातही सूट देण्याची तयारी दाखवली आहे. टाटाने आपला लॉंग प्रॉडकट बिझीनेस ग्रे बुल कॅपिटलला विकला आहे. त्यांच्या पोर्ट टोलबॉट येथील बिझीनेस विकत घेण्यांत लिबर्टी हाऊस आणी टोलबॉटच्या व्यवस्थापनाने स्वारस्य दाखवले आहे.
  • एपिक सिस्टीम या US मधील अमेरिकन कंपनीने अमेरिकन कोर्टांत दाखल केलेल्या केसमध्ये टी सी एस या IT क्षेत्रातील दिग्गज कंपनीला कोर्टाने US$ ९४० मिलियन दंड ठोठावला आहे.टी सी एस ने जाहीर केले आहे की याबाबतीत ते योग्य ती कार्यवाही करतील.

सरकारी announcements

  • मेथीलीन क्लोराईड या केमिकलच्या बाबतीत सरकार ANTIDUMPING ड्युटी लावण्याच्या विचारात आहे. यामुळे S H केळकर, गुजराथ फ्लुरो, गुजरात अल्कली या कंपन्यांना फायदा होईल.
  • तसेच सरकार कोल्ड रोल्ड स्टीलवरही antidumping ड्युटी लावण्याच्या विचारांत आहे.
  • जेम्स and जुवेलरी बिझीनेससाठी ड्युटीफ्री सोने उपलब्ध करून दिले जाईल असे सरकारने जाहीर केले.
  • DOT ने रिलायंस जियो आणी आर कॉम या कंपन्यांना ९ सर्कल मध्ये स्पेक्ट्रम शेअरिंगसाठी मंजुरी दिली.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

  • भारताचा WPI (होलसेल प्राईस इंडेक्स) सतत १७ व्या महिन्यांत कमी झाला. WPI मे २०१६ मध्ये -२.३३% होता. स्वस्त क्रूड आणी उत्पादित वस्तूंच्या किमतीमधील घट हे दर्शवितात की मागणी कमी झालेली आहे.
  • CPI मार्च मध्ये ४.८३% (फेब्रुआरी ५.१८%) झाला. याचा अर्थ महागाई कमी होत आहे. निर्यात सतत कमी होत आहे.

रिझर्व बँक ऑफ इंडिया, सेबी, आणी इतर प्रशासनिक संस्था

  • RBI ने १५० कर्जफेड करण्याऱ्या कंपन्यांचा परामर्ष घेण्याचे ठरवले आहे. या कंपन्यांना दिलेल्या कर्जांवर RBIने प्रोविजन करावयास सांगितली होती. या कंपन्यांना कर्ज दिलेल्या बँकांनी असे सांगितले आहे की अलीकडच्या काळांत या कंपन्याची आर्थिक स्थिती सुधारत आहे. आणी या कंपन्या कर्जफेड करीत आहेत. त्यामुळे या कंपन्यांना दिलेल्या कर्जावर प्रोविजन करण्यांत RBI सूट देण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा फायदा जे पी अस्सोसिंएट ग्रूप आणी त्यांना कर्ज देणार्या बँकांना होईल. या RBI च्या निर्णयामुळे बँकांच्या शेअर्स मध्ये वाढ झाली.
  • RBI ने पंजाब राज्याला दिलेल्या फूड क्रेडीटसाठी बँकांच्या कॉन्सोर्शीयमला प्रोविजन करायला सांगितली.या कर्जाला आवश्यक असणारी धान्याच्या साठ्यांची सिक्युरिटी पंजाब सरकारच्या गोदामांत उपलब्ध नव्हती. यामुळे बँकांनी यापुढे आम्ही पंजाबच्या राज्य सरकारला धान्य खरेदी करण्यासाठी कर्ज देणार नाही असा निर्णय घेतला.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

  • भारती एअरटेल ही कंपनी त्यांच्या भारती इन्फ्राटेलमधील ५% स्टेक विकून आपले कर्ज कमी करणार आहे या विक्रीमधून Rs ३७०० कोटी मिळतील.
  • सुप्राजीत आणी फिनिक्स यांचे मर्जर झाले. सुप्राजीतच्या ४ शेअर्सला फिनिक्सचे ५ शेअर्स मिळतील.
  • २१ ते २३ मार्च या काळांत USFDA ने अलेम्बिक फार्माच्या तालुका प्लांटची तपासणी केली. त्यांत फार्मुलेशन युनिटमध्ये ४ त्रुटी आढळल्या.
  • कंटेनर कॉर्पोरेशन ने PSP लायसेन्स खरेदी केले. त्यामुळे आता कंटेनर बरोबर बल्क गुडस्चे HANDLING करू शकतील.
  • विप्रोचा वार्षिक निकाल निराशाजनक आला. तसेच त्यांनी २०१७च्या पहिल्या तिमाहीसाठी निराशाजनक गायडंस दिला. याचा परिणाम शेअरच्या किमतीवर दिसला. विप्रोने जाहीर केले की ते Rs ६२५ प्रती शेअर या भावापर्यंत Rs २५०० कोटी शेअर्स buyback साठी वापरतील. तसेच Rs १ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
  • इन्फोसिसचा वार्षिक निकाल चांगला लागला. कंपनीने २०१७-२०१८ साठी चांगला गायडंस दिला. कंपनीने Rs १४.२५ लाभांश जाहीर केला.
  • TCS या कंपनीचे बर्याच कालावधीनंतर वार्षिक निकाल चांगले आले. त्यांनी २०१७-१८ साठी चांगला गायडंस दिला. कंपनीने Rs २७ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
  • LIC हौसिंग फायनान्स, गृह फायनांस, इंडस इंड बँक, यांचे वार्षिक निकाल चांगले आले.
  • हिंदुस्थान झिंक या कंपनीचा वार्षिक निकाल ठीक होता.
  • HDFC बँकेचा वार्षिक निकाल चांगला आला. profit Rs ३३७० कोटी झाले NPA ची पोझिशन स्थिर राहिली. कंपनीने Rs ९.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

IPO 

  • या आठवड्यांत इक्वीटास होल्डिंग्स या कंपनीचे चांगले लिस्टिंग झाले. IPOमध्ये Rs ११० दिलेल्या शेअरचे Rs १४५ ला लिस्टिंग झाले. गुंतवणूकदारांना चांगला लिस्टिंग गेन झाला.
  • THYROCARE TECHNOLOGIES ही कंपनी आपला IPO एप्रिल २७ ते एप्रिल २९ या काळांत आणत आहे.प्राईस band Rs ४२० ते Rs ४४६ आहे. ही कंपनी Rs ४४९ कोटी ते ४७७ कोटी उभारत आहे. ही हेल्थकेअर क्षेत्रातील कर्जमुक्त कंपनी आहे. ही कंपनी WATER टेस्टिंग, IMAGING CENTRES या दोन नव्या कॅनसर डायाग्नोस्टिक क्षेत्रांत प्रवेश करीत आहे कंपनीचे यश नवनवीन प्रादेशिक lab उघडण्यावर, तसेच निरनिराळ्या प्रकारच्या टेस्ट्स डेव्हलप करण्यावर आणी लार्जस्केल इकोनोमीज मिळण्यावर अवलंबून आहे. कंपनीचे मॉडेल DR लाल पाथ lab वर आधारीत आहे.
  • पुढील आठवड्यांत उज्जीवन या मायक्रो फायनांस क्षेत्रातील कंपनीचा ipo येत आहे. कंपनीचा IPO २८ एप्रिलला उघडून २ मेला बंद होईल. प्राईस band Rs २०७ ते Rs २१० आहे. ipo द्वारा ही कंपनी Rs ८५० कोटी उभारेल. या कंपनीला small फायनांस बँकेचे लायसेंस मिळाले आहे. या कंपनीच्या २४ राज्यांत आणी केंद्रशासित प्रदेशांत ४७० शाखा आहेत. ही कंपनी ग्रूप कर्ज, मायक्रो आणी SMALL उद्योगांना कर्ज तसेच घरांसाठी कर्ज ही कंपनी देते.

Corporate Action 

  • भारती इन्फ्राटेल या कंपनीची लाभांश तसेच BUYBACK वर निर्णय घेण्यासाठी २६ एप्रिल २०१६ ला कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं
आतापर्यंत आलेले निकाल अपेक्षेपेशा चांगले आले. त्यातून पुढील आठवडा एक्स्पायरीचा आहे. भारताची आर्थिक स्थिती सुधारते आहे. त्यामुळे कल तेजीचा दिसतो आहे. मार्केट पडल्यानंतर खरेदी होते आहे. निराशेचे सावट दूर झाले आहे. पण सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे निफ्टीमध्ये १००० अंकांची वाढ झाली. येथून जर मार्केट पडले तर चढ्या भावाचे शेअर्स आपल्याजवळ राहतील अशी भीती आहे. अदलाबदल किंवा चर्नींग चालू आहे. त्यामुळे काही काळ मार्केट मंदीत राहिले तर लगेच मार्केट तेजीत येते. लहान मुले जशी एका लांब फळीवर बसून पाय जमिनीला टेकवून वर खाली झुलत राहतात तशी स्थिती मार्केट्ची आहे. मार्केटला एक माणूस समजून मनुष्यस्वभावाप्रमाणे मार्केटच्या व्यवहाराचे निरीक्षण केल्यास व्यवहार छान समजतात आणी मजाही येते. शेअरमार्केट आपल्या आयुष्याचा एक भाग बनते.
सेन्सेक्स २५८३८ वर आणी निफ्टी ७९०० वर बंद झाले.

आठवड्याचे समालोचन – ११ एप्रिल ते १६ एप्रिल – ये रे ये रे पावसा, दे मला पैसा

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
money-rain-1013711_640आता मार्केटला काही ट्रिगर नाही असे बोलले जात असतानाच हवामानाचा अंदाज स्कायमेटने जाहीर केला. गेल्यावेळचा यांचा अंदाज चूकीचा ठरला होता पण या वेळी सरकारी हवामानखात्याने सुद्धा स्कायमेटच्या अंदाजाची पुष्टी केली. या बातमीचे विणकाम मार्केटने अचूक केले. त्यांत मार्केट संपल्यानंतर महागाईचे आणी IIP चे आकडे आले महागाई कमी झाली उत्पादन वाढले आणी त्यांत वरून तुपाची धार IMF ने ( INTERNATIONAL MONETARY FUND) धरली. भारताचा विकास दर ७.५% राहील असे सांगितले. त्यामुळे खुशीची लहर मार्केटमध्ये पसरली आणी मार्केटने निफ्टी ७८०० चा टप्पा लीलया ओलांडला.
 
आंतरराष्ट्रीय घडामोडी

  • US फेडरल रिझर्वची तातडीची बैठक ११ एप्रिलला झाली. या बैठकीत व्याजदरांवर चर्चा झाली असणे शक्य आहे शक्य आहे.
  • USA मधील क्रूडचे उत्पादन कमी झाल्यामुळे क्रूड ची किंमत वाढण्याची शक्यता आहे. USA मधील नैसर्गिक वायूचे उत्पादन गेल्या पांच वर्षातील सरासरीपेक्षा ३५% ने जास्त झाल्यामुळे नैसर्गिक वायूची किंमत कमी होण्याची शक्यता आहे.
  • दोहा मध्ये ओपेक आणी नॉनओपेक देशांची बैठक होणार आहे. या बैठकीत क्रूडचे उत्पादन गोठवण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

सरकारी announcements

  • बिहार,गुजराथ मधील दारूबंदी आणी तामिळनाडू, मिझोरम या राज्यांत दारूबंदी केली जाईल असे राज्य सरकारांनी जाहीर केल्यामुळे मद्य किंवा मद्यार्क बनवणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स पडले.
  • BPCL या OMC कंपनीमधील FII मर्यादा २४% वरून ४९% केली.
  • USA च्या संरक्षणमंत्र्यांचा भारत दौरा सुरु आहे. त्यामुळे संरक्षणाशी संबंधीत कंपन्यांच्या शेअर वर परिणाम होवू शकतो .
  • रिझर्व बँकेने Rs ५०० कोटीपेक्षा जास्त असलेल्या NPAची यादी सुप्रीम कोर्टाला दिली.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

  • भारती एअरटेल या टेलिकॉम क्षेत्रातील कंपनीने एअरसेल या कंपनीकडून तामिळनाडू, बिहार, जम्मू & काश्मीर, पश्चिम बंगाल, आसाम, उत्तरपूर्व, आंध्रप्रदेश, आणी ओरिसा या राज्यातील 4G स्पेक्ट्रमची ८ सर्कल्स Rs ३५०० कोटींना खरेदी केली.
  • ओरिसा हायकोर्टाने जिंदाल स्टील & पॉवर्स या कंपनीला सारडा माईन्स या कंपनीकडून आयर्न ओअर घेण्याची आणी त्याची वाहतूक करण्याची परवानगी दिली.
  • पॉस्को या आंतरराष्ट्रीय स्टील उत्पादन करणाऱ्या कंपनीने पर्यावरणाशी संबंधीत कारणांमुळे ओरीसांत आपण स्टील उत्पादन युनिट सुरु करण्यास असमर्थ आहोत असे सांगितले.
  • टाटा स्टील आपले UK मधील स्टील उत्पादन युनिट्स विकण्यासाठी बोलणी सुरु करीत आहे. या कारखान्यांत १५००० कामगार काम करतात. त्यांच्या नोकऱ्या जातील म्हणून UK मधील सरकार मध्यस्थी करीत आहे. ग्रेबुल कॅपिटल ही कंपनी टाटाबरोबर करार करून त्यांचा SCUNTHORPE येथील कारभार GBP ४० कोटींना विकत घेणार. टाटा स्टीलचे हे डील अभ्यास करण्यासारखे आहे. कामगारांना द्याव्या लागणाऱ्या पेंशांची जबाबदारी टाटा स्टीलची राहणार आहे. आता ही जबाबदारी काही प्रमाणांत UK सरकारने उचलण्याची तयारी दाखविली आहे. या बिझिनेससाठी कर्जही टाटा स्टीलच्या नावावर राहणार आहे. ही युनिट कोणी विकत घ्यायला तयार नाही. त्यामुळे चांगली किंमत मिळत नाही. फायदा म्हणण्यासारखा एकच की रोज सहन करावा लागणारा तोटा बंद होईल.
  • अबरदिनने इन्फोसिसचे ५६.२६ लाख शेअर्स Rs ६६५ कोटीना ओपन मार्केटमध्ये विकले. यांच्याजवळ अजून ३% शेअर्स आहेत. ही विक्री अबरदिनकडे काही समस्या असल्यामुळे किंवा इन्फोसिसची काही समस्या असल्यामुळे विकले याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रिझल्ट्सच्या दृष्टीने इन्फोसिसचा शेअर व्हीम्झीकल किंवा म्युझिकल शेअर आहे असे गुंतवणूकदरांचे म्हणणे आहे.
  • डोळ्यांत होणाऱ्या मोतीबिंदुच्या ‘BROMSITE’ या औषधासाठी सन फार्माला USFDA कडून परवानगी मिळाली.
  • ऑरचिड फार्मा या कंपनीच्या कांचीपुरम API युनिटसाठी साठी USFDA कडून क्लीन चीट (ELR) मिळाली.
  • अशोक बिल्डकॉन या कंपनीवर टाकलेल्या धाडीमध्ये आयकर खात्याला कोणतीही अनियमितता आढळली नाही. त्यामुळे कंपनीच्या शेअरची किंमत वाढली.
  • DLF त्यांच्या रेंटल कारभाराचा ४०% हिस्सा Rs १४००० कोटींना विकणार आहे.
  • TTK प्रेस्टीज या कंपनीने UKमधील ‘HORWOOD होमवेअर्स’ ही कंपनी खरेदी केली.
  • विप्रो ही IT क्षेत्रातील कंपनी २० एप्रिलला होणाऱ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मीटिंगमध्ये शेअर BUYBACK वर विचार करेल .याच दिवशी विप्रो त्यांचे वार्षिक निकाल जाहीर करेल.
  • DR REDDY’S LAB या कंपनीचा buy back १८ एप्रिल ते १७ ऑक्टोबर या काळांत होईल.
  • बीर्ला सनलाईफ मधील आपला स्टेक सनलाईफने वाढविला.
  • MONSANTO ही कंपनी रॉयलटी वाढवत आहे. ते शेतकऱ्यांकडून बियाण्यांच्या वाढीव किंमती घेत आहेत. म्हणून सरकार या क्षेत्रातील आपले नियंत्रण वाढविण्याचा विचार करीत आहे.
  • ALCOBA या धातू क्षेत्रातील कंपनीचे रिझल्ट आले. 92% तोटा झाला आहे. कंपनीने भविष्यासाठी गायडंस(अनुमान) फारसे चांगले दिले नाही.
  • कोल इंडियाने कोळशाचे दर ४०% ने कमी केले असे वर्तमानपत्रांत आल्यामुळे ऑपरेटिंग मार्जिन कमी होणार असे वाटून शेअर पडला. आम्ही दर कमी केले नाहीत असे कंपनीने जाहीर केल्यावर शेअरची किंमत पुन्हा वाढू लागली.
  • गोवा कार्बन या कंपनीचा रिझल्ट लागला. गेल्या वर्षीच्या Rs ८ कोटी तोटयाचे यावर्षी Rs ४१ कोटी फायद्यांत रुपांतर झाले.
  • ADB (एशियन डेव्हलपमेंट बँक) आणी IFC (INTERNATIONAL FINANCE कॉर्पोरेशन) या दोन आंतरराष्टीय संस्था IDBI मध्ये स्टेक घेणार आहेत.
  • १५ एप्रिलला इन्फोसिस आणी DCB यांचे वार्षिक निकाल जाहीर होतील.
  • लेडचे भाव वाढल्यामुळे एक्साईडने आपल्या उत्पादनाचे भाव ५% वाढवल्यामुळे त्या कंपनीला फायदा होईल.
  • मार्च महिन्यांत CPI ४.८३ झाला (गेला महिना ५.१८).म्हणजेच महागाई कमी झाली. IIP मध्ये -१.५ वरून २ मध्ये वाढ झाली.
  • बाल्टिक ड्राय निर्देशांक २९० वरून ५५५ झाला. हा निर्देशांक शिपिंग कंपन्यांच्या संदर्भांत वापरला जातो.त्यामुळे शिपिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली.
  • सतत लागून चार पांच दिवस सुट्टी असल्यामुळे पर्यटन क्षेत्रातील हॉटेल आणी पर्यटन कंपन्यांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे डेल्टा कॉर्प, COX AND KINGS, THOMAS & COOK तसेच EIH, रॉयल ऑर्चीड, व्हाईसरॉय आदि हॉटेल कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वाढले.
  • शिल्पा मेडिकेअर या कंपनीला गुड MANUFACTURING पॉलिसी चे प्रमाणपत्र मिळाले

Corporate Action : –

  • Lux इंडस्ट्रीज या कंपनीने आपल्या एक शेअरचे ५ शेअर्समध्ये विभाजन केल्याचे जाहीर केले.
  • L & T इन्फोटेक या कंपनीने आपले सुधारीत DRHP SEBI कडे दाखल केले.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं
‘ये रे ये रे पावसा शेवटी तूच देणार पैसा’ असे म्हणावेसे वाटते. आपले नेहेमीचे गाणे ’ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा’ असे म्हणता येणार नाही कारण देशाच्या १० राज्यांत दुष्काळाचा हाहाक्कार आहे. त्यामुळे आणी वाढणार्या महागाईमुळे लोकांजवळ पावसाला द्यायला पैसा कुठून असणार ? पण पाउस येणार आणी तो नियमित आणी १०६% या हवामानखात्याच्या अंदाजामुळे सगळेजण सुखावले. त्यामुळे पावसाशी संबंधीत सर्व शेअर्स उदा :- बीबियाणे,खते, TRACTOR, सिंचन सुविधा पुरविणाऱ्या, तसेच पावसामुळे ग्रामीण भागांत येणार्या संपन्नतेवर अवलंबून असणाऱ्या बॅंका, टूव्हीलर, FMCG कंपन्यांचे शेअर्स वाढले.यामुळे शेअरमार्केटचे दोन्ही निर्देशांक BSE सेन्सेक्स आणी NSE निफ्टी वाढले.
आता हा सुखद गारवा असाच चालू राहील कां ?हे शुक्रवारच्या इन्फोसिसच्या वार्षिक निकालांवरून समजेल. पाहू या काय होते ते.

आठवड्याचे समालोचन – ४ एप्रिल ते ८ एप्रिल – गुढी यशाची उंच उंच उभारा

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Gudi Padwa Share Market

Image – Redtigerxyz at English Wikipedia


मार्केट रुसव्या फुगव्यामध्ये वस्ताद ! लहान मुलाला जसे हवे,  जे हवे ते मिळाले नाही की अकांडतांडव करते तसेच हे मार्केट ! मार्केट्ची अपेक्षा होती ५० बेसिस पाईंट रेट कट होईल तेव्हढा रेट कट झाला नाही हे निमित्त पुरले. लिक्विडीटी पुरवली जाईल ही गोष्ट मार्केटने ऐकूनच घेतली नाही. ५०० point सेन्सेक्स (BSE चा निर्देशांक) पडला.सत्कार आणी धिक्कार दोन्हीही बरोबरीने मार्केट करते.
आंतरराष्ट्रीय घडामोडी

  • क्रूडचा भाव या आठवड्यांत पुन्हा खाली येण्यास सुरुवात झाली.
  • या आठवड्यांत आपले शेअर मार्केट ग्लोबल मार्केटचा रागरंग पाहून आपला पवित्र बदलत होते.
  • जपानमध्ये गुंतवणूक वाढते आहे. त्यामुळे येन strong होतो आहे. करन्सीमध्ये गोंधळ चालू आहे. येन मजबूत झाल्यामुळे मारुतीला जी रॉयलटी द्यावी लागते आणी पार्टस आयात करावे लागतात त्यासाठी जास्त किंमत मोजावी लागते.त्यामुळे मारुतीच्या शेअर्सची किंमत कमी झाली.

सरकारी announcements

  • सिगारेट किंवा विडीच्या पाकिटावर पाकिटाच्या आकाराच्या ८५% वैधानिक वार्निंग असली पाहिजे असे सरकारने जाहीर केले. याच्या विरोधांत सिगारेट आणी विडी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी सिगारेट आणी विड्यांचे उत्पादन बंद केले. त्यामुळे ITC, गॉडफ्रे फिलिप्स, VST, आणी गोल्डन टोबको या कंपन्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
  • नवीन क्रूड पॉलिसी जाहीर झाली. IOC, HPCL, BPCL या तीन OMC (ऑईल मार्केटिंग कंपनी) एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर क्रूडची आयात करू शकतील. त्यामुळे या कंपन्यांची बार्गेनिंग पॉवर वाढेल. क्रूड स्वस्त असताना पुढील कालखंडासाठी आयात करून ठेवता येईल. ज्यावेळी क्रुडचे  भाव वाढतील तेव्हा देशाचा फायदा होईल.
  • केंद्र सरकारने ‘STAND UP इंडिया’ या योजनेची घोषणा केली. महिलांना १० लाखापासून ते १ कोटीपर्यंत कर्ज मिळू शकेल. बँकेची प्रत्येक शाखा दोन महिलांना या योजनेमध्ये लोन देऊ शकेल.
  • नीती आयोगाने इलेक्ट्रॉनिक उत्पादनासाठी MAKE-in –INDIA या योजनेखाली नवीन पॉलिसी जाहीर केली. या द्वारे या सेक्टरसाठी एक मेगा कोस्टल इकोनॉमीक झोन स्थापन करून तेथे सर्व प्रकारच्या INFRASTRUCTURE सोयी आणी करसवलती देऊन या सेक्टरला उत्तेजन देण्याचे ठरविले आहे. या पॉलिसीमुळे मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध होतील अशी आशा नीती आयोगाने व्यक्त केली आहे.

RBI आणी सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था

  • रिझर्व बँकेने त्यांची वित्तीय पॉलिसी ५ एप्रिलला जाहीर केली.
  • रेपो रेटमध्ये २५ बेसिस पाईंट कट करून ६.५०% केला. CRR मध्ये काहीही बदल न करता ४% वर स्थिर ठेवला.
  • रिव्हर्स रेपो रेट २५ बेसिस पाईंट वाढवून ५.७५% वरून ६% केला.
  • MSF रेट ७५ बेसिस पाईंट कमी करून ७% केला. दैनिक CRR ९५% वरून ९०% केला.
  • आर्थिक वर्ष २०१७ मध्ये CPI ( CONSUMER PRICE INDEX) ५% राहील असे अनुमान RBIने केले आहे.
  • तसेच RBI Rs १५००० कोटींचे ओपन मार्केट ऑपरेशन करेल असे जाहीर केले. जर पाउस अपेक्षेप्रमाणे झाला आणी ग्रामीण मागणी वाढली तर RBI आणखी रेट कट करू शकेल असे जाहीर केले.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

  • रिको इंडिया या कंपनीच्या शेअरला ९ ट्रेडिंग सेशन लोअर सर्किट लागत होती. शुक्रवारी प्रथमच अप्पर सर्किट लागले.
  • BLACKSTONE या खाजगी इक्विटी दिग्गज ग्रूपने एम्फसिस बी एफ एल या IT क्षेत्रातील कंपनीतील ६०.५ % स्टेक HEWLETT-PACKARD ENTERPRISE कडून प्रती शेअर Rs ४३० या भावाने विकत घेतला. या कंपनीतील २६% स्टेक साठी Rs ४५७.५४ प्रती शेअर या भावाने ओपन ऑफर आणली जाईल. हा व्यवहार ७५% स्टेकसाठी US$ १ बिलियन चा होईल (Rs ७०७१)
  • HCL TECH ही IT क्षेत्रातील कंपनी त्याच क्षेत्रातील जॉमेट्रिक सोफ्टवेअर ही कंपनी US$ २०० मिलियन किंमतीला शेअर SWAP व्यवहारांत विकत घेतली. या व्यवहारांत HCL TECH चे Rs २ दर्शनी किंमतीचे १० शेअर्स जॉमेट्रिक सोफ्टवेअर या कंपनीच्या Rs २ दर्शनी किंमतीच्या ४३ शेअर्सच्या बदल्यांत मिळतील.
  • बिल्ट ही कंपनी त्यांची थायलंडमढील सबसिडीअरी विकणार आहे. येणार्या रकमेमधून कर्जफेड केली जाईल असे कळते.
  • IFCI ने NSE चे ९.५ लाख शेअर RS ३५९० प्रती शेअर या भावाने विकले.

या आठवड्यांत येणारे IPO :-

  • या आठवड्यांत इंफिबिम या कंपनीचे लिस्टिंग झाले. लिस्टिंग समाधानकारक झाले.
  • या आठवड्यांत इक्विटास होल्डिंग या मायक्रोफायनांस क्षेत्रातील कंपनीचा ipo एकूण १७ वेळा ओवरसबस्क्राईब झाला. परंतु रिटेल क्वोटा मात्रा १.७८ वेळा ओव्हर सबस्क्राईब झाला.
  • HAL या कंपनीने आपल्या IPO साठी DRHP दाखल केले. हा IPO नोव्हेंबर डिसेंबर २०१६ पर्यंत येईल असा अंदाज आहे.
  • NBCC या सार्वजनिक क्षेत्रांतील सरकारी कंपनीने आपण Rs १० दर्शनी किंमतीच्या शेअरचे विभाजन Rs २ दर्शनी किंमतीच्या ५ शेअर्समध्ये करायचे ठरविले आहे. तसेच कंपनीचे नाव NBCC (INDIA) बदलायचे ठरविले आहे.
  • GLAND फार्मा ही हैदराबाद स्थित कंपनी विकत घ्यायचा DR Reddy’s LAB आणी TORRENT फार्मा आणी BAXTER या कंपन्या प्रयत्न करीत आहेत.
  • USFDAने इप्का lab या कंपनीला त्यांच्या मलेरियाच्या लस उत्पादन करणाऱ्या प्लांटसाठी वार्निंग लेटर दिल्यामुळे ग्लोबल फंडाने कंपनीला कळवले की ते इप्का कडून आता ही लस विकत घेणार नाहीत.
  • रिलायंस इंडस्ट्रीजला दिलेले 4G लायसन्स रद्द करावी ही याचिका सुप्रीम कोर्टाने रद्द केली.
  • टाटा स्टील या कंपनीने आपले UK मधील आपली उत्पादन युनिट्स विकण्याची प्रक्रिया ११ एप्रिल पासून सुरु करू असे जाहीर केले. जर्मन दिग्गज कंपनी THYSSENKRUPP आणी लिबर्टी हॉउस या कंपन्या टाटा स्टीलची उत्पादन युनिट्स विकत घेण्यामध्ये रस घेत आहेत.
  • टाटा मोटर्सने त्यांची नवी कार ‘TIAGO’ मार्केटमध्ये आणली.
  • गोदरेज कनझ्युमर्स ही कंपनी US HAIR प्रोडक्ट्स केअर कंपनी ‘SON’(STRENGTH OF NATURE) खरेदी करण्याच्या विचारांत आहे.ह्या कंपनीचा प्रसार मुख्यतः आफ्रिका आणी CARIBBEAN मध्ये आहे.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं
या आठवड्यांत चलनाच्या दरांत खूप गोंधळ होता. प्रत्येक देशाचा निर्यात व्यापार वाढवण्याकडे कल आहे. त्यामुळे चलनामध्ये कृत्रिमरीत्या वाढ करूनदेखील चलनाचे मूल्य कमी ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. चीन पुन्हा devaluation करेल असे वाटते.
या आठवड्यांत मार्केटमध्ये अस्थिरता होती. वित्तीय पॉलिसीनंतर मार्केट झोडपले गेले पण त्यानंतर सावरले नाही. पण छोट्या रेंजमध्ये फिरत राहिले. पण निरीक्षण केले असता असे आढळते की वाढणाऱ्या शेअर्समध्ये volume जास्त त्यामानाने पडणाऱ्या शेअरमध्ये volume कमी म्हणजेच मार्केटचा तेजीचा कल टिकून आहे. पण मार्केट ६८०० पासून वाढत असल्यामुळे मार्केटला ही थकवा आला आहे. काही काळ मार्केट विश्रांतीच्या मूडमध्ये आहे असे दिसते. पुढील आठवड्यांत ३ च दिवस मार्केट आहे. शुक्रवारी बँक ब्युरोची बैठक झाली. त्यांत काय निर्णय झाले आणी त्या निर्णयांचे परिणाम काय होतील ते पुढील आठवड्यांत बघू.

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

By Flickr user baejaar (Dheepak Ra) [Public domain], via Wikimedia Commons

By Flickr user baejaar (Dheepak Ra) [Public domain], via Wikimedia Commons

हा आठवडा एक्सपायरीचा, ही आर्थिक वर्षातील शेवटची एक्सपायरी. रोलओवर ची कॉस्ट जास्त असल्यामुळे लोकांचा कल पोझिशन क्लोज करण्याकडे. त्यामुळे मिश्र संदेश देणारा हा आठवडा होता.
आंतरराष्ट्रीय घडामोडी

  • सर्व देशांतील मोसम विभागाने सारखीच बातमी दिली. यावर्षी अल नीनाच्या प्रभावामुळे भारतांत पाउस चांगला पडेल. पण पाउस येण्याच्या आधी गर्मीची लाट येण्याची शक्यता संभवते.
  • S&P या आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सीने चिनचे रेटिंग निगेटिव केल्यामुळे इमर्जिंग मार्केटसाठी जे ALLOCATION केले जाते त्याच्यातील जास्त वाटा भारताला मिळेल.
  • जेनेट येलेनने (फेडची अध्यक्ष) यांनी सांगितले की व्याज दर वाढवण्याची आम्ही घाई करणार नाही.
  • युरोप आणी जपान मध्ये निगेटिव व्याजदर असल्याने हाही पैसा इमर्जिंग मार्केटमध्ये येत आहे. त्यामुळे सध्याची rally लिक्विडीटीड्रिव्हन म्हणता येईल.
  • भारतातील निवडणुकांमध्ये रस्ते वीज पाणी हे मुद्दे मुख्य असतात त्याचप्रमाणे सध्या USA मध्ये निवडणुकांचे वारे असल्यामुळे हेल्थकेअर आणी सोशल सिक्युरिटी या मुद्द्यांना महत्व आले आहे. म्हणूनच की काय USFDA कडून फार्मा कंपन्यांच्या बाबतीत अनेक वार्निंग नोटीस येत आहेत.

सरकारी announcements

  • पंतप्रधानांचा ब्रुसेल्स दौरा सुरु झाला. USAचा दौराही सुरु आहे.
  • सरकार ८ सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांमध्ये Rs ५००० कोटी भांडवल गुंतवणार आहे.
  • निवडक स्टील उत्पादनांवर २०% सेफगार्ड ड्युटी मार्च २०१८ पर्यंत चालू ठेवणार. स्टीलची MIP ( कमीतकमी आयात किंमत) सरकार वाढवण्याच्या विचारांत आहे.
  • ई- कॉमर्ससाठी निश्चित धोरण जाहीर केले. आणी या क्षेत्रांत ऑटोमटिक रूटने FDIला परवानगी दिली आहे.
    व्हेट्रीफाईड टाईल्सवर ६ महिन्यांसाठी antidumping ड्युटी लावली.याचा फायदा नीटको टाईल्स, कजारिया सेरामिक्स या कंपन्यांना होईल.
  • सरकार कोल इंडिया या कंपनीचे शेअर्स एप्रिल महिन्यात BUYBACK करेल अशी शक्यता आहे तसेच NHPC या कंपनीच्या शेअरची किंमत वाढत राहिल्यामुळे या कंपनीत डायव्हेस्टमेंट करण्याचा विचार करेल.
  • सरकारने या वर्षी Rs ३६००० कोटींचे डायव्हेस्टमेंटचे लक्ष्य निश्चित केले आहे. या वित्तीय वर्षांत सरकार ONGC, BHEL, BEL, RCF या कंपन्यांत ५%, तर MOIL, NHPC, NMDC NALCO या कंपन्यांमध्ये १०% तर MMTC, STC, हिंदुस्थान COPPER या कंपन्यांमध्ये १५% डायव्हेस्टमेंट करणार आहे.

RBI आणी सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था

  • BSEने ३१ कंपन्यांचे ट्रेडिंग स्थगीत केले.
  • RBIने ३ वर्ष मुदतीच्या कर्जांवर MCLR ( MARGINAL COST OF FUNDS BASED LENDING RATES) प्रमाणे व्याज आकारण्यास सर्व बँकांना सांगितले.
  • ५ एप्रिलला RBIची वित्त पॉलिसी जाहीर होईल. यांत RBI ५० बेसिस पाईंट व्याज दर कमी करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

  • एक्साईज ड्युटी PAN अनिवार्य आणी संप याचा विक्रीवर परिणाम होईल असे TITAN या कंपनीने सांगितले.
  • अक्सेन्चुअर या IT क्षेत्रातील कंपनीने आपला गायडंस वाढवला त्यामुळे IT क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी आली.
  • Infosys ही IT क्षेत्रातील कंपनी १५ एप्रिलला आपले वार्षिक निकाल जाहीर करून निकालांच्या मोसमाचा शुभारंभ करणार आहे.
  • हिंदुस्तान झिंकचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्यामुळे कंपनीने Rs २४ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
  • IVRCL ही रिअल्टी क्षेत्रातील कंपनी बांधत असलेल्या विवेकानंद फ्लायओव्हर कोसळल्यामुळे कंपनीच्या शेअरच्या किंमतीवर परिणाम झाला.
  • हा आठवडा बँकांच्या दृष्टीकोनातून चांगला म्हटला पाहिजे. विजय मल्ल्याने Rs ४००० कोटी रुपयांची ऑफर दिली. JP असोसिएटने त्यांचे ९ सिमेंट प्लांट्स अल्ट्राटेक सिमेंट या कंपनीला विकले. या सगळ्यामुळे बँकांचे NPA कमी होतील आणी बँकांची स्थिती सुधारेल असे वाटते. बँकांनी आपले NPA विक्रीस काढून आपली balancesheet साफ करण्याचे ठरविले आहे.
  • IDBI ने त्यांचा NSE मधला २% स्टेक एल आय सी ला विकला.
  • HCL TECH ही कंपनी जॉमेट्रिक softवेअर मधील ३१% स्टेक विकत घेणार आहे.
  • ऑटो विक्रीचे आकडे आले. अशोक leyland ची विक्री ३१%ने वाढली.मारुतीची विक्री आणी निर्यात दोन्हीही वाढली. आयशर मोटर्स या कंपनीच्या विक्रींत लक्षणीय वाढ झाली.M&M च्या विक्रीत ३४% वाढ झाली TRACTAR च्या विक्रीत वाढ झाली पण निर्यातीत घट झाली.
  • गोवा सरकारने कॅसिनोसाठी लायसेन्स एक वर्षासाठी वाढवले याचा फायदा डेल्टा कॉर्प या कंपनीला होईल.
  • टाटा स्टीलने आपली तोट्यांत चालणारी UK मधील दोन युनिट्स विकायची ठरवले आहे.

या आठवड्यांत येणारे IPO :-

  • अशोक leyland ने त्यांची सबसिडीअरी हिंदुजा leyland च्या IPO साठी DRHP दाखल केले.
    ग्लोबल हेल्थकेअर या हेल्थकेअर क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग झाले पण लिस्टिंग इशू प्राईसपेक्षा कमी झाले आणी नंतर शेअरची किंमत कमी होत राहिली.
  • भारत वायर रोप्स या कंपनीचे शुक्रवारी लिस्टिंग झाले. लिस्टिंग इशू प्राईसपेक्षा वर झाले. पण टिकाव धरू शकले नाही.
  • इक्वीटास होल्डिंग ही मायक्रो फिनान्स क्षेत्रांत काम करणारी कंपनी ipo द्वारा Rs ७२० कोटी उभारणार आहे. इशू ५ एप्रिलला ओपन होवून ७ एप्रिलला बंद होईल. प्राईस band Rs १०९ ते ११० असा आहे. या कंपनीला small फायनान्स बँकेसाठी लायसन्स मिळाले आहे. या इशुच्या रकमेपैकी Rs ६२० कोटी कंपनी आपल्या सुरु होणाऱ्या small बँकेत गुंतवेल.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं
या वित्तीय वर्षांत चूकभूल करू नये म्हणजे एप्रिल फुल होण्याची शक्यता राहत नाही हेच मार्केटने या वर्षांत शिकविले. या वर्षी मार्केटचा ट्रेंड सातत्याने बदलत होता. अमुक एक ठराविक सेक्टर चालतो आहे असे ठासून सांगता येत नव्हते. वारंवार येणाऱ्या तेजीमन्दिच्या लाटांमध्ये हे वर्ष संपले. साखरेचे शेअर्स, विमानवाहतूक क्षेत्रातील शेअर्स आणी रिलायंस इंडस्ट्रीज यांनी शेअरमार्केट सावरले. बऱ्याच शेअरमध्ये एप्रिलफूल होण्याची पाळी ट्रेडर्सवर आली. भारत सरकारने काही औषधांवर बंदी घातल्यामुळे आणी USFDAच्या होणाऱ्या निरीक्षणामुळे फार्मा सेक्टर दबावांत राहिला. एकंदरीतच जागते रहो हा संदेश मार्केट देत आहे असे जाणवते.
अन्दाजपत्रक सादर झाल्यापासून मार्केटने उसळी घेतली, मार्केट निफ्टी ६८०० वरून निफ्टी ७७५० वर पोहोचले. हे मृगजळ आहे की खरोखरीच कंपन्यांची स्थिती सुधारली आहे हे आपल्याला पुढील आठवड्यापासून दिसेलच. परंतु गुंतवणूकदारांना लाभांशाची खिरापत आधीच वाटून झाली आहे. वार्षिक निकालांमध्ये थोडी जरी सुधारणा आढळली तरी सर्वजण खूष होतील. बघु या काय होते ते हातच्या कांकणाला आरसा कशाला!
या आठवड्यांत BSEचा निर्देशांक सेन्सेक्स २५२६९ वर आणी NSE चा निर्देशांक निफ्टी ७७१३

आठवड्याचे समालोचन – २१ मार्च २०१६ ते २५ मार्च २०१६ – रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

© Jorge Royan / http://www.royan.com.ar

© Jorge Royan / http://www.royan.com.ar


भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकला म्हणजे जणू काही टी-२० चा वर्ल्ड कप जिंकला. त्यामुळे सोमवारी शेअरमार्केटमध्येही खुशीचे वातावरण होते. सरकारने बचत योजनांवरील व्याजाचा दर कमी केल्यामुळे हळू हळू लोकांचा शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा कल वाढतो आहे. त्याच बरोबरीने RBI रेट कट करेल अशी जवळ जवळ सर्वांची खात्री झाली आहे. ETF मधूनही अधिकाधिक पैसा मार्केटमध्ये येतो आहे. म्हणून मार्केटमधली तेजी टिकून आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडी

  • बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे झालेल्या बॉम्बस्फोटाने शेअर मार्केट काही काल गढूळ झाले. पण यावेळी पटकन सावरले.
  • अल निनो चा प्रभाव कमी झाल्यामुळे अलनीना सुरु होईल त्यामुळे यावर्षी लवकर आणी पुरेसा पाउस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुष्काळाने त्रस्त झालेल्यांना दिलासा मिळेल. शेतमालाचे उत्पादन वाढेल. भारताची आर्थिक परीस्थिती सुधारेल.

सरकारी announcements

  • सरकारने नवीन डिफेन्स PROCUREMENT पॉलिसी जाहीर केली. यामध्ये फायटर विमाने पाणबुडी, आणी हेलीकॉप्टर्स यांचा समावेश आहे. याचा फायदा भारत फोर्ज, वालचंदनगर इंडस्ट्रीज, BEL. पिपावाव डिफेन्स या सारख्या कंपन्यांना फायदा होईल.
  • ब्रोकींग कंपन्या आणी एनबीएफसी यामध्ये १००% FDI ऑटोमटिक रूटने येण्यास परवानगी दिली

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

  • एचएफसीएल या कंपनीने डिफेन्स साठी उत्पादन करायला सुरुवात केली.
  • भारती एअरटेलने टांझानिया TOWERS Rs ११९४ कोटींना विकले.
  • इंडोको रेमिडीजच्या गोंवा प्लान्टसाठी USFDA कडून परवानगी मिळाली.

या आठवड्यांत येणारे IPO :-

  • भारत वायर रोप्स या कंपनीचा IPO २ वेळा सबस्क्राईब झाला.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं
अंदाजपत्रकाच्या दिवशी निफ्टी ६८२५ पर्यंत खाली गेले होते. पण अन्दाजपत्रकामुळे गुंतवणूकदार खूष झाले. यानंतर मात्र मार्केटने मागे वळून पाहिले नाही. या आठवड्यांत मार्केटने निफ्टी ७७०० चा टप्पा लीलया पार केला. सेन्सेक्सही २५००० च्या वर स्थिरावला.या आठवड्यांत होळी,  गुडफ्रायडेच्या रजा असल्यामुळे मार्केटमध्ये तीनच दिवस व्यवहार झाले. पण पुढील आठवड्यांत असणारी EXPIRY आणी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यांत येणारी RBI ची पॉलिसी यांचा अंदाज घेत घेतच मार्केटमध्ये व्यवहार झाले. जेव्हा मार्केट तेजीत असेल तेव्हा स्ट्रेंग्थवर आधारीत ट्रेड करावा आणी मार्केट मंदीत असेल तेव्हा वीकनेस पाहून ट्रेड करणे योग्य ठरते. मार्केटच्या रंगांत कितीही रंगून गेलांत तरी स्वतःचा आतला आवाज कायम ऐकावा. आणी आपल्या फायद्या तोट्याच्या दृष्टीने निर्णय घ्यावा.

आठवड्याचे समालोचन -१४ मार्च २०१६ ते १८ मार्च २०१६ – तेजी मंदीच्या सरीवर सरी

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
rain-863339_640सगळीकडून अवकाळी पाउस आणी गारपीट होत असतानाही मार्केटमध्ये मात्र सुखद वारे वाहत होते. राजस्थान कर्नाटक गोवा महाराष्ट्र या राज्य सरकारांची अंदाजपत्रक सादर झाली त्यामुळे मार्केटला बातम्यांचा खुराक मिळाला. महागाई कमी झाल्यामुळे RBIने व्याजाचा दर कमी करावा अशी अपेक्षा निर्माण झाली. US $ च्या तुलनेमध्ये रुपया वधारला. येनही वधारला. त्यामुळे अर्थातच इमर्जिंग मार्केट्समध्ये पैशाचा ओघ सुरु झाला.
आंतरराष्ट्रीय घडामोडी

  • USA च्या (सेन्ट्रल बँक) फेडने आपले रेट बदलले नाहीत. जून तिमाही मध्ये रेट वाढवले जातील असा अंदाज व्यक्त केला. तसेच वर्षातून चार वेळेला रेट वाढवण्याएवजी २ वेळेला वाढवले जातील.
  • बँक ऑफ जपानने व्याजदरांत कोणताही बदल केला नाही. बँक ऑफ जपान दरवर्षी ८० लाख कोटी येन अर्थव्यवस्थेत टाकेल.
  • इजिप्तने आपल्या चलनाचे १३% अवमूल्यन केले. याचा परिणाम बजाज ऑटोच्या निर्यात व्यापारावर होईल.

सरकारी announcements

  • सरकारने मार्च २०१७ पर्यंत धातूंवर १८% सेफगार्ड ड्युटीची मुदत वाढवली.याचा फायदा धातू क्षेत्रातील कंपन्यांना होईल.
  • सरकारने अशी घोषणा केली की सरकार जनरल विमा क्षेत्रातील सरकारी कंपन्यांचे लिस्टिंग करून या कंपन्यातील आपला १०% स्टेक विकणार आहे. हे पैसे सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांना भांडवल पुरवण्यासाठी वापरले जातील.
  • सरकारने असे घोषित केले की औषधे बनवताना ड्रग आणी कॉस्मेटिक्स नियमांचे पालन झाले पाहिजे. सरकारने ३०० विविध प्रकारच्या औषधांच्या उत्पादन आणी विक्रीवर बंदी घातली. याविरुद्ध फार्मा कंपन्यानी कोर्टाचा दरवाजा ठोठावला यामुळे फार्मा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सचे भाव खाली आले.
  • सरकार BEL ( भारत अर्थमूवर्स लिमिटेड) या कंपनीतील आपला ५% हिस्सा OFS च्या माध्यमातून विकण्याची शक्यता आहे.
  • दिल्ली सरकारने BSIV COMPLIANCE (हे EMISSION च्या बाबतीत standard आहे) वाहने असली पाहिजेत असे जाहीर केले.
  • गोवा राज्य सरकारने लक्झरी कर ६०% वरून २५% वर आणला.
  • रिझर्व बँकेने खासगी आणी सरकारी क्षेत्रातील बँकांना त्यांच्याकडील बचत खात्यावर दर तिमाहीला व्याज देण्यास सांगितले. हे व्याज आधी दर सहामाहीला दिले जात होते.

सेबी रिझर्व बँक आणी इतर रेग्युलेटरी संस्था

  • सेबीने BSE (BOMBAY STOCK EXCHANGE) ला त्यांचा इश्यू आणण्यासाठी परवानगी दिली. हा इशू पुढील ६ ते ९ महिन्यांत येईल.
  • जर कंपनी WILFUL DEFAULTER असेल तर सेबीने तिला भांडवली बाजारातून पैसा उभारण्यास बंदी घातली.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

  • CPI ( CONSUMER PRICE INDEX ) ५.६९ वरून ५.१८ वर खाली आला.WPI सतत १६ महिने घसरत आहे. ते -०.९१ होते.कांदे आणी डाळी यांचे भाव बरेच कमी झाले.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

  • ‘सासकेन’ या कंपनीने युनिस्प्रेडट्रम यांच्याबरोबर समझोता केला. सासकेनला US $ ४ ते ५ कोटी मिळतील. ही रक्कम त्यांच्या मार्केट कॅपिटलायझेशन च्या ५०% एवढी मोठी आहे.त्यामुळे लोकांच्या अंदाजाप्रमाणे Rs २५ विशेच लाभांश आणी Rs ४ अंतरिम लाभांश दिला. लाभांशाची तारीख ३१ मार्च २०१६ आहे.
  • ल्युपिन LTD च्या गोव्याच्या उत्पादन युनिटमध्ये बऱ्याच उणीवा USFDA ने दाखविल्या. एकूण ९ उणीवा दाखवल्या.
  • अजयसिंहनी स्पाईस जेट मध्ये स्टेक घेतल्यावर ही कंपनी अजयसिंहची झाली असा सर्वांचा कयास झाला. पण WARRANT चे शेअर्स मध्ये रुपांतर केल्यानंतर पुन्हा १३% शेअर्स मारन बंधूंकडे जातील या भीतीने स्पाईस जेट पडला आणी सन टी व्हीचा शेअर वधारला.
  • अडव्हांस आयकराचे आकडे आले. या आकड्यावरून कंपनीचे रिझल्ट्स कसे येतील याचा साधारण अंदाज येतो.
  • BPCL, ICICI BANK, बँक ऑफ बरोडा आणी रिलायंस इंडस्ट्रीज या कंपन्यांनी गेल्या वर्षीच्या मानाने चांगला अडव्हांस आयकर भरला तर SBI ने बराच कमी अडव्हांस आयकर भरला.
  • gas पुलिंगची बोली GMR, GVK, NTPC आणी LANCO या कंपन्यांनी जिंकली.
  • रिलायंस इन्फ्रा त्यांची इलेक्ट्रिक आणी पॉवर डिव्हिजन वेगळी करणार आहे.
  • भारती ही टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज कंपनी व्हिडीओकॉनची (१८०० MHZ स्पेक्ट्रम) टेलिकॉम ही डिविजन Rs. ४४२८ कोटीला खरीदणार आहे. बिहार, उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान गुजराथ या राज्यांत ६ सर्कल खरेदी करणार आहे.
  • NCC या infrastructure क्षेत्रातील कंपनी आपला थर्मल पॉवर मालमत्तेतील ५१% स्टेक सिंगापूरमधील सेम्ब्कॉर्प या कंपनीला Rs ३५२ कोटींना विकणार आहे.
  • मोईल या सरकारी कंपनीला मध्य प्रदेश राज्य सरकारने एक नवी खाण allot केली.

कॉर्पोरेट एक्शन

  • कोल इंडिया १४ मार्चला तर अल्केमlab १८ मार्चला ex dividend झाली.
  • आयशर मोटर्स या कंपनीने Rs १०० प्रती शेअर अंतरिम लाभांश दिला.

या आठवड्यांत येणारे IPO :-

  • इंफिबीम ही कंपनी IPO द्वारा Rs ४५० कोटी उभारेल. हा इशू मार्च २१ ला उघडून मार्च २३ ला बंद होईल. IPOचा प्राईस band Rs ३६० ते Rs ४३२ ठेवला आहे. ही कंपनी गुजरात बेस्ड असून या इशुची रक्कम ७५ लॉजिस्टिक केंद्र स्थापन करण्यासाठी वापरेल. ही पहिली Eकॉमर्स खेत्रातील कंपनी आपला ipo आणत आहे.
  • भारत वायर रोप्स ही कंपनी आपला ipo आणून Rs ७० कोटी उभारत आहे हा इशू मार्च १८ला उघडून मार्च २२ला बंद होईल. या इशुच्या रकमेमधून कंपनी नवीन उत्पादन युनिट चालीसगावला सुरु करीत आहे. या IPOचा प्राईस band Rs ४० ते Rs ४५ आहे.
  • खेमानी डीस्ट्रीब्युटर्स and मार्केटिंग ही SME विभागातील कंपनी ipo द्वारा Rs १५.८४ कोटी उभारेल. ही रक्कम ही कंपनी अनसिक्यूर्ड कर्ज फेडण्यासाठी आणी इतर कॉर्पोरेट कामासाठी खर्च करेल.
  • हेल्थकेअर ग्लोबल एन्टरप्रायझेस या कंपनीचा इश्यू पूर्णपणे भरला.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं
या आठवड्यांत जवळ जवळ सर्व सेक्टरमधले शेअर्स आलटूनपालटून तेजीत होते. या आठवड्यांतल्या मार्केटने तेजी करणाऱ्यांना आणी मंदी करणाऱ्यांना सारखीच संधी दिली. कोणत्याही प्रकारचा ट्रेड करणाऱ्यांना प्राप्ती झाली असावी असा हा सुखद आठवडा म्हणावा लागेल. या वेळेला IT कंपन्यांचे निकाल चांगले असतील याची चाहूल मार्केटला लागली आहे असे जाणवले. ५००० कोटींचा पहिला हफ्ता सरकार बँकांना नजीकच्या काळांत देणार आहे आणी RBI ०.२५ % रेट कट करेल अशा अपेक्षेने बँकिंग निर्देशांक तेजीत होता. IPO ची तर रेलचेल आहेच. अशाप्रकारे फुललेल्या बाजारांत मजा आली आणी मंदीचे मळभ दूर झाले. आज मार्केटने पुन्हा निफ्टी ७६०० ची पातळी गाठली.
या आठवड्याच्या शेवटी BSE सेन्सेक्स २४९५३ वर तर NSE निफ्टी ७६०४ वर बंद झाला.