आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Photo courtesy – publicdomainpictures.net
या आठवड्यांत बर्याच गोष्टींची लगीनघाई जाणवली. हा आठवडा वायदाबाजाराची मे एक्सपायरी, त्यांत बऱ्याच मोठ्या कंपन्यांचे वार्षिक निकाल होते. ज्यांचे निकाल चांगले लागले त्यांना चांगले बक्षीस द्यायचे आणी ज्यांनी प्रगती, कार्यक्षमता दाखवली नाही त्यांना शिक्षा करायची हे काम गुंतवणूकदारांचेच! त्यातच पंतप्रधानांचा इराण दौरा आणी GST मंजूर होण्याची लागलेली चाहूल.
आंतरराष्ट्रीय घडामोडी
- नायजेरिया आणी कॅनडा मधून क्रूडचा पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे. तसेच USA मधील क्रूडचा साठा गेल्या सात आठवड्यातील कमीतकमी स्तरावर आहे. त्यामुळे ब्रेंट क्रूडचा भाव US$ ५० प्रती BARREL च्या पुढे गेला.
UK मध्ये होणाऱ्या युरोपिअन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी (BREXIT) २३ जून २०१६ रोजी होणार्या सार्वमतावर UK अर्थव्यवस्था तसेच UKशी व्यवहार करणाऱ्या कंपन्यांच्या व्यवहारावर परिणाम होईल. उदा :- टाटा मोटर्स, टाटा स्टील. - पंतप्रधानांच्या इराण दौर्यांत चाबहार बंदर डेव्हलप करण्यासाठी करार होण्याची शक्यता आहे. यामुळे इराणमधून क्रूडची आयात करणे भारताला सोपे जाईल. इराणमध्ये एक अल्युमिनियम आणी एक फरटीलायझर प्लांट सुरु करण्याच्या विचारांत आहे.
सरकारी announcements
- सरकारने कॅपिटल गुड्स धोरण जाहीर केले. सरकार या धोरणाद्वारे आयांत केलेल्या इक्विपमेंटवर अवलंबून राहणे कमी करेल आणी देशांतील कॅपिटल गुड्सच्या उत्पादनाला प्रोत्साहन देईल. यामुळे लक्षावधी नोकऱ्या उपलब्ध होतील. यांत कॅपिटल गुड्सची निर्यात वाढवण्याचाही प्रयत्न केला जाईल.यासाठी सरकार ज्या विविध ड्युटी आकारते त्या दीर्घ काळासाठी आणी स्थिर पातळीवर ठेवल्या जातील. या वेळेला सरकारने प्रथमच येत्या १० वर्षांसाठी म्हणजेच २०२५ सालापर्यंत ७.५ लाख कोटी कॅपिटल गुड्स उत्पादनाचे आणी त्यायोगे एम्प्लॉयमेंट ८४ कोटींवरून ३ कोटींपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठरविले आहे. यांत कॅपिटल गुड्स उद्योगातील तंत्रज्ञानाची पातळी वाढवण्याचे,वेगवेगळ्या कामातील कौशल्य मिळविण्यासाठी सोयी उपलब्ध करून देण्याचा आणी MSME ( MEDIUM AND SMALL ENTERPRISES) च्या उत्पादनशक्तीच्या वाढीला आणी प्रगतीला वाव देण्याचे ठरवले आहे. या पोलीसीचा फायदा सिमेन्स, L&T,भेल, CROMPTON, THERMAX, यांना होईल.
- सरकारने ६ IIT साठी मंजुरी दिली.
- सरकारने जाहीर केले की ९००० कोटी खर्च करून हिंदुस्थान फरटीलायझर्स या कंपनीचे आर्थिक पुनरुज्जीवन केले जाईल. त्याच प्रमाणे हिंदुस्थान स्टील वर्क्स कन्स्ट्रकशन या कंपनीचे पुनरुज्जीवन करून नंतर ती कंपनी NBCC टेकओवर करेल.
- येस बँकेला परदेशी गुंतवणुकीची मर्यादा ७४% मंजूर केली.
- सरकारने क्रूड आणी नैसर्गिक gasचे उत्पादन वाढविण्यासाठी ६७ लहान ऑईल आणी gas क्षेत्रांचा लिलाव करण्याचे ठरविले आहे.
- केरळ राज्य सरकारने 2000CC च्या २० वर्षे जुन्या असलेल्या आणी डीझेलवर चालणाऱ्या गाड्यांना ६ शहरांत बंदी घातली. त्यामुळे अशोक leyland च्या गाड्यांची रिप्लेसमेंट डिमांड वाढेल. तसेच ESCORTS ची मागणी वाढेल.
लहान लहान इलेक्ट्रोनिक कंपन्यांना १० वर्षे TAX हॉलीडे देण्याचा सरकार विचार करीत आहे. याचा फायदा BPL या कंपनीला होईल. .
सेबी, RBI आणी इतर प्रशासनिक संस्था
- सेबीने २०१६ -१७ मध्ये प्रादेशिक STOCK एक्सचेंज वर लिस्टेड असलेल्या पण ज्यांत ट्रेडिंग होत नाही आणी BSE आणी NSE वर लिस्टेड असलेल्या पण सात वर्षापेक्षा ज्या कंपन्यांचे ट्रेडिंग सस्पेंड केले आहे अशा कंपन्या डीलीस्ट करण्याचे ठरवले आहे.यामुळे लिस्टेड कंपन्याची संख्या ४०००ने कमी होईल.सेबीने ALGORITHMIC ट्रेडिंगला आळा घालण्याचे ठरविले आहे. ज्या कंपन्यांचे ट्रेडिंग सात वर्षापेक्षा जास्त काळासाठी सस्पेंड झाले आहे अशा कंपन्यातील शेअरहोल्डर्सना तटस्थ तिसऱ्या पार्टीने ठरवलेल्या किमतीप्रमाणे त्यांची गुंतवणूक काढून घेण्यास परवानगी देण्यासाठी प्रमोटर्सना सांगितले जाईल. तसेच म्युच्युअल फंडाच्या युनिट्सची खरेदी AMAZON आणी FLIPKART यांच्याकडून गुंतवणूकदारांनी करण्यास मंजुरी देण्याची शक्यता आहे.
- सेबीने ज्या व्यक्तींना किंवा कंपन्यांना RBI च्या नियमांनुसार विलफुल DEFAULTER म्हणून जाहीर केलेले असले तर त्या व्यक्ती किंवा कंपन्या कोणताही शेअर्सचा, डेट सिक्युरिटीजचा पब्लिक इशू आणू शकणार नाहीत. तसेच सेबीकडे लिस्टेड असणाऱ्या कंपन्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स वर नेमले जाणार नाहीत आणी म्युच्युअल फंड किंवा ब्रोकरेज फर्म स्थापन करू शकणार नाहीत.
- मे २७ २०१६ पासून बँक निफ्टी ट्रेडिंग आता आठवड्याच्या ऑप्शन CONTRACTमध्ये होऊ शकेल. या साप्ताहिक ऑप्शनचा एक लॉट प्रथम 30 चा असेल आणी जुलै १ पासून ४० चा असेल. याची एक्सपायरी आणी सेटलमेंट दर गुरुवारी होईल.बँक निफ्टीमध्ये बँक पॉलिसीमध्ये होणार्या बदलामुळे सतत चढउतार होत असतो. बँक निफ्टीमध्ये २५० ते ३०० पाईंटची VOLATALITY असते. यांत मासिक ऑप्शनपेक्षा कमी प्रीमियम आणी गुंतवणूक लागेल. तसेच गुंतवणुकीतील रिस्क कमी होईल. तसेच पटाईत ट्रेडर्स साप्ताहिक आणी मासीक ऑप्शन मध्ये आर्बीट्राज करूनही नफा मिळवू शकतील. यांत फक्त ब्रोकरेज आणी करांचा खर्च वाढेल.
- CSE ( CENTRE for फॉर SCIENCE and ENVIRONMENT) यांनी असे जाहीर केले की आपण रोज खात असलेल्या ब्रेड किंवा ब्रेडच्या प्रकारांत POTASSIUM BROMATE आणी POTASSIUM IODATE हे दोन घटक वापरले जातात आणी त्यामुळे कॅन्सर आणी THYROIDसंबंधीत आजार होण्याची शक्यता वाढते.या निवेदनामुळे ब्रेड उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये आणी ब्रेड खाणाऱ्या ग्राहकांमध्ये खळबळ माजली. या निवेदनानंतर बर्याच ब्रेड बनवणाया कंपन्यांनी उदा :- ब्रिटानिया, JUBILIANT फूड्स आपण हे घटक वापरत नसल्याचा खुलासा केला. युरोपमध्ये ब्रेडमध्ये हे घटक वापरण्यास बंदी आहे.
खाजगी कंपन्यांच्या घडामोडी
- टेलेनॉर, IDFC, सनफार्मा आणी आता टेक महिंद्रा यांनी पेमेंट बँक सुरु करण्याचा विचार सोडून दिला आहे.
- AXIS बँकेने ग्रीन डॉलर bond विकून US$ ५५० मिलियन (Rs ३३६५ कोटी) उभे केले. हे bonds लंडन STOCK एक्सचेंज वर लिस्ट होतील. हे पैसे बँक पर्यावरणाला उपकारक अशा प्रोजेक्टला कर्ज देण्यासाठी वापरेल.
- L & T चा निकाल बर्याच कालावधीनंतर चांगला आला. गुंतवणूकदारांनी जणू काही उत्सव साजरा केला. मार्केट उघडल्यानंतर १०% चे वरचे सर्किट लागले परंतु हा शेअर F & O मध्ये असल्यामुळे सर्किट सुटले.
- कोलगेटचा वार्षिक निकाल खूप चांगला लागला नाही परंतु VOLUME मध्ये वाढ आढळल्यामुळे शेअरची किंमत वाढली. कोलगेट लवकरच नैसर्गिक टूथपेस्ट बाजारांत आणण्याच्या विचारांत आहे.
- अमर राजा BATTERY, CIPLA, अशोक leyland, बँक ऑफ इंडिया, यांचे रिझल्ट्स निराशाजनक होते
- मारुतीने FUEL फिल्टर टेस्ट नंतर सुमारे ७५००० BALENO आणी २००० D’SIRE कार्स परत बोलावल्या.
- मंडीदीप आणी औरंगाबाद या लुपिन कंपनीच्या दोन उत्पादन युनिट्सना USFDA ने क्लीन चीट दिली.
- टाटा स्टीलने Rs ३२१८ कोटींचा तोटा जाहीर केल. पण यांत वेगवेगळ्या बाबींसाठी केलेल्या एकवेळच्या प्रोविजन हे मुख्य कारण आहे. त्यांना करपूर्व नफा झाला आहे आणी प्रती टन मार्जिन वाढले आहे.टाटा स्टीलने लाभांशही जाहीर केला.
- सुवेन लाईफ सायनसेसला ऑस्ट्रेलिया, युरेशिया, इझरेल, USA यामध्ये पेटंट मिळाली.सुवेन लाईफसायन्सेसचे निकाल चांगले आले
- सुमिमोटो या जपानी कंपनीने EXCEL कॉर्प या कंपनीमधील ४४% स्टेक Rs १२०० ते १४०० कोटींना खरेदी केला.
- NOVERTIS ही कंपनी शेअर्स BUY BACK करण्याचा विचार करत आहे. प्रमोटर्सचा शेअर ७५% आहे तर मग BUYBACK करून कंपनी DELIST करायचा विचार आहे कां अशी शंका आल्यामुळे शेअर Rs १०० ने वाढला.नोवार्तीस्ने आज जाहीर केले की ते proportionate बेसिसवर ३८,२०,००० शेअर्स Rs ७६० प्रती शेअर या भावाने Rs २९०.३२ कोटींना buy back करतील.
- फोरटीस हेल्थकेअर ही कंपनी आपली SRL हा DIAGNOSTICS बिझीनेस वेगळा काढणार आहे.
- TORRENT फार्मा ही कंपनी ‘GLOCHEM’ ही बल्क ड्रग बनवणारी आणी काही USFDA APPROVAL असलेली कंपनी Rs ३०० कोटींना विकत घेण्याच्या विचारांत आहे.
- जेट एअरवेज या कंपनीने आठ वर्षांत प्रथमच नेट profit जाहीर केले.
- कर्नाटक बँकेचा तिमाही निकाल चांगलाच म्हणावा लागेल. सर्व बॅंका NPA मध्ये वाढ दाखवत असताना या बँकेने मात्र NPA कमी झाल्याचे सांगितले. बँकेने नफा जाहीर करून लाभांशही जाहीर केला
- स्टेट बँक ऑफ इंडियाने Rs १२६४ कोटी नफा जाहीर केला. बँकेचे ग्रोस NPA आणी नेट NPA १% ने वाढले. बँकेला Rs ५००० कोटींची जादा प्रोविजन करावी लागली. प्रोविजन कवरेज रेशियो ६०.६९ % आहे.
- ट्रान्सफॉर्मर आणी रेकटीफायरस, ONGC, टाटा केमिकल्स, यांचे निकाल चांगले आले. कॅनरा बँकेचे निकाल निराशाजनक आले. Rs ३९०५ कोटी तोटा दाखवला आहे . ग्रोस आणी नेट NPA मध्ये ३ ते ३.५ % वाढ झालेली आहे.
- टाटा क्लिक़ या कंपनीतर्फे नवीन जुवेलरी सेगमेंट सुरु करतील APPARELS , फुटवेअर, इलेक्ट्रोनिक्स या सेग्मेंटमध्ये ecommerce बिझिनेस सुरु करतील.
Corporate Action
- BPCL या OMC (ऑईल मार्केटिंग कंपनी) ने १ :१ बोनस जाहीर केला. या कंपनीचे वार्षिक निकालही चांगले आले.
नजीकच्या काळांत येणारे IPO
- कोची शिपयार्डचा IPO ऑगस्ट सप्टेंबर मध्ये येण्याची शक्यता आहे. या ipo द्वारा सरकारला Rs ३३० कोटी मिळतील.
- या वर्षाच्या उत्तरार्धांत LAURUS LABS या २००५ मध्ये स्थापन झालेल्या फार्मा क्षेत्रातील कंपनीचा ७५० कोटी ते १००० कोटींचा IPO येणार आहे. ही कंपनी वेगवेगळ्या व्याधींसाठी API बनवते. कंपनीची हैदराबाद आणी विझाग येथे दोन आर & डी सेन्टर्स असून कंपनी हैदराबादला मोठे उत्पादन युनिट उघडत आहे. कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत फायझर,तेवा आणी मर्क या मुख्य कंपन्या आहेत.
या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं
यावेळेला मार्केटने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ८०००ची पातळी निफ्टीने लीलया ओलांडली. दोन दिवसांत सेन्सेक्स १२०० पाईंट वाढला. त्यातच ITC आणी BPCL यांनी अनुक्रमे अनपेक्षितरित्या २:१ आणी १:१ या प्रमाणांत बोनस दिला. त्यामुळे आनंदी आनद गडे जिकडे तिकडे चोहीकडे असे वातावरण झाले.
१०० पाईंट वर आणी १०० पाईंट खाली अशा फारच लहान रेंजमध्ये मार्केट फिरत होते यांत कुणालाच फायदा होत नव्हता. बुल्स आणी बेअर्स दोघेही कंटाळले होते. एका फटक्यांत मार्केटने सर्वांना खुश केले.
BSE निर्देशांक २६६५० वर आणी NSE निर्देशांक ८१५० वर बंद झाले.