आठवड्याचे समालोचन – २ मे ते ६ मे २०१६ – केळीचे सुकले बाग

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
mktandme-logo1.jpgमे महिना, त्यातूनच कडक उन्हाळा मार्केटलाही उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात. दरवर्षी मे महिन्यांत मार्केट सुकलेलेच आढळते. FII चा निवेश कमी असतो. वार्षिक निकाल लागलेले असतात किंवा लागणार असतात. काही ‘हिट’ असतात तर काही ‘मिस’ असतात. रेटिंग एजन्सीज त्यांचे रेटिंग त्याप्रमाणे बदलतात. काही small कॅप किंवा मिडकॅप कंपन्या चांगले निकाल देतात. यावर्षी तर IPOचा भडीमार आहे त्यामुळे लिक्विडीटी ‘SOAK’ होते. आपला मौसमी हवामानावर आणी शेतीवर अवलंबून असणारा देश असल्याने जूनमध्ये पाउसपाण्याविषयीचे अंदाज व्यक्त होतात. आणी शेअरमार्केटला हुरूप येतो.  सुकलेले, झुकलेले. थकलेले. शेअरमार्केट पुन्हा बहरते. एरव्ही केळीच्या बागा हिरव्यागार केळीच्या लोंगरांनी लगडलेल्या असतात. पण वैशाखांत म्हणजेच मे महिन्यांत सुकलेल्या बागा  पाहवत नाहीत.
आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • गेल्या वर्षभरांत क्रूडच्या किंमतीत सतत घट होत आहे. याचा परिणाम ५९ अमेरिकन कंपन्यांवर झाला आहे. या कंपन्यांनी दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केले आहेत. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की अजून ऑइल आणी gas क्षेत्रातील बऱ्याच कंपन्यांची हीच स्थिती होण्याची शक्यता आहे.
 • सन एडिसन ही रीन्युवेबल एनर्जी क्षेत्रातील दिग्गज कंपनीही दिवाळखोरीच्या वाटेवर आहे.
 • तारीख ६ मे रोजी US मधील नॉनफार्म पे रोल डेटा येईल. यावरून फेड व्याजदर जूनमध्ये किंवा सप्टेम्बर २०१६ मध्ये वाढविल याचा अंदाज येईल.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • RBI ने युनिव्हर्सल बँकांसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आणी त्यावर लोकांची मते मागविली. या बँकांचे कमीतकमी भांडवल Rs ५०० कोटी असावे आणी यांच्या २५%शाखा अनबँकड क्षेत्रांत असाव्यांत. या बॅंकानी ५ वर्षाचे आंत आपल्या शेअर्सचे लिस्टिंग केले पाहिजे.
 • RBI ने P2P लेंडिंग PLATFORMS साठी CONSULTATION पेपर जाहीर केला. P2P कंपन्या कर्ज घेणारा आणी कर्ज देणारा यांची गाठ घालून देतात.
 • सुप्रीम कोर्टाने NCR रिजनमध्ये डीझेलवर चालणाऱ्या गाड्यांवर बंदी घातली. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी विनंती केली. तसेच सरकार कारचे इंजिन बदलण्यासाठी Rs ३०००० ची मदत करेल असे घोषित केले.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • वेगवेगळ्या ऑटो कंपन्यांनी आपली नवीन ‘UTILITY’ वाहने मार्केटमध्ये आणल्यामुळे एप्रीलसाठीच्या ऑटो विक्रीत लक्षणीय वाढ झाली. मारुती, HYUNDAI मोटर्स, महिंद्रा and महिंद्रा , RENAULT या कंपन्यांची ऑटो विक्री वाढली.
 • देशाच्या कोअर सेक्टरची प्रगती मार्च २०१६ महिन्यांत ६.४ % झाली. खते, स्टील, उर्जा आणी कोळसा यांचे उत्पादन वाढले.

सरकारी announcements

 • केंद्र सरकारने साखरेसाठी ५०० टनांचे stock लिमिट ऑक्टोबर २०१६ पर्यंत जाहीर केले. ही खबर शेअरमार्केटला आधीपासून असल्यामुळे मार्केटमधील किंमतींवर जास्त परिणाम झाला नाही.
 • केंद्र सरकारने शिपयार्ड उद्योगाला इन्फ्रा चा दर्जा दिला. यामुळे सरकारी ऑर्डर आणी कर्ज मिळायला सोपे जाते. कर्ज १०% व्याजाने मिळते.
 • राज्यसभेत MMDR बिल पास झाले यामुळे पॉवर आणी सिमेंट क्षेत्रांत मर्जर आणी अक्विझिशन सोपे होईल. ज्या कंपन्याना खाणी ALLOT झाल्या आहेत पण उपयोगांत आणू शकत नाहीत त्या खाणी आता कंपन्या विकू शकतील किंवा भाड्याने देऊ शकतील.
 • इलेक्ट्रोनिक प्रोडक्ट्सला लागणाऱ्या मशिनरीवर लागणारी आयात ड्युटी रद्द केली.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियन पथकाने अलकेम lab या कंपनीच्या बद्दी युनिटची तपासणी केली होती. या पथकाने बद्दी युनिटला क्लीन चिट दिली.
 • HDFC चा वार्षिक निकाल चांगला आला. इनव्हेस्टमेंट विकून मिळालेले Rs १५२० कोटी हे मुख्य इतर उत्पन्न होते.
 • CCL प्रोडक्ट्स, MRF , BASF, PFIZER या कंपन्यांचे वार्षिक निकाल छान आले.
 • TVS मोटर्स चा निकाल चांगला आला पण मार्जिन कमी झाल्यामुळे हा निकाल मार्केटला पसंत पडला नाही.
 • IFCI आपल्याकडील NSEमधील ३% हिस्सेदारी विकणार आहे.
 • JSW एनर्जी JSPL या कंपनीकडून त्यांचा छत्तीसगडमधील युनिट Rs 4000 कोटी ते Rs ६५०० कोटींना विकत घेणार आहे.
 • हिरो मोटो आणी आयचर मोटर्स या ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांचे वार्षिक निकाल चांगले आले या दोन्ही कंपन्यांच्या मार्केट किंमतीची तुलना केल्यास हिरो मोटो कॉर्प च्या शेअर स्वस्त वाटतो.
 • INOX विंड या कंपनीच्या BALANCESHEET मध्ये काही प्रश्न उपस्थित झाल्यामुळे शेअर पडला.
 • MCX मधील १५% स्टेक कोटककडे आहे. हा स्टेक CME म्हणजे शिकागो मर्कनटाईल एक्सचेंज खरेदी करणार आहे. हे डील Rs १२०० ते Rs १४०० कोटीला होणार आहे. हा स्टेक कोटकने Rs ४५९ कोटींना खरेदी केला आहे. त्यामुळे या व्यवहारांत कोटकला भरपूर फायदा होईल.
 • स्टेट बँक ऑफ इंडियाने होमलोन रेट ९.४०% आणी महिला कर्जदारांसाठी ९.३५% केला.

Corporate Action : –

 • या आठवड्यांत पराग मिल्क प्रोडक्ट्स या गोवर्धन या brandनावाने दुध आणी दुग्धजन्य पदार्थ विकणार्या कंपनीचा IPO ६ तारखेला बंद झाला. प्राईस band Rs २२० ते २२७ होता.ipo महाग असल्याने या IPO ला थंडा प्रतिसाद मिळाला.
 • सोमवार तारिख ९ मे २०१६ रोजी थायरोकेअर आणी उज्जीवन फ़यनान्सिअल या कंपन्यांचे लिस्टिंग होणार आहे. या IPO ना चांगला प्रतिसाद मिळाल्याने गुंतवणूकदारांना चांगला लीस्टिंग गेन होईल असा अंदाज आहे.
 • महानगर gasच्या IPO ची घोषणा पुढील आठवड्यांत होईल. बी जी आणी GAIL यांचा यांत ४९.५% स्टेक आहे.
 • वोडाफोन आणी HDFC लाईफ या कंपन्यांनी IPO आणण्याची तयारी सुरु केली आहे.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं
रिको इंडिया २६मेला डीलिस्ट होईल आणी त्यातील ट्रेडिंग तहकुब ठेवले आहे. रिको इंडियाचा शेअर Rs १००० वरून Rs २२५ पर्यंत ढासळला. सुझलॉन सुद्धा Rs १४०० वरून खाली आला. अशा घसरगुंडीवरून स्वतःला सावरणे कठीण जाते. पण अशावेळी आपण ‘STOPLOSS’ चे तत्व काटेकोरपणे पाळले तरच आपण वाचू शकतो. STOPLOSSचे महत्व कळते ते अशा वेळीच!
BSE निर्देशांक सेन्सेक्स २५२२८ आणी NSE निर्देशांक निफ्टी ७७३३ वर बंद झाला.

One thought on “आठवड्याचे समालोचन – २ मे ते ६ मे २०१६ – केळीचे सुकले बाग

 1. Pingback: आठवड्याचे समालोचन – ९ मे ते १३ मे २०१६ – बातम्यांचा सूळसुळाट आणी ट्रेडर्सचा गोंगाट | Stock Market आणि म

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.