Monthly Archives: September 2016

आठवड्याचे समालोचन – १९ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर २०१६ – दे दान सुटे गिराण (ग्रहण)

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
solar_eclipse_2010-01-15_05-41_ut
बँक ऑफ जपान, फेड, ओपेक यांच्या धोरणात्मक निर्णयासाठी असलेल्या मीटिंग, आणी त्यांत घेतले जाणारे निर्णय असे अनेक चिंतेचे ढग जमा झाले होते. पण बँक ऑफ जपान आणी फेडने आपल्या रेटमध्ये कोणतेही बदल केले नाहीत.अशा प्रकारे ग्रहण सुटले. त्यामुळे चिंता दूर झाली. आभाळ बरेचसे साफ झाले. सरकारसुद्धा योग्य ती धोरणात्मक पावले उचलत आहे. मॉनेटरी पॉलिसी कमिटीत ‘डाटा’ समजणाऱ्या आणी त्यांचे विश्लेषण करू शकणाऱ्या प्रसिद्ध अभ्यासू लोकांचा ४ वर्षांसाठी केलेला समावेश हे सुधारणा करण्याच्या दृष्टीने टाकलेले योग्य पाउल यामुळे गुंतवणूकदारांचा आनंद द्विगुणीत झाला. त्यामुळे मार्केटने आपली खुशी जाहीर केली.
आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • फेडरल रिझर्वने आपल्या दोन दिवसांच्या मीटिंग मध्ये त्यांचे पॉलिसी रेट बदलले नाहीत. पण वर्षअखेर डिसेंबर २०१६ मध्ये रेट वाढण्याची तसेच २०१७ मध्ये दोनदा ०.२५ % वाढवण्याची शक्यता व्यक्त केली. घरगुती खर्चामध्ये वाढ झाली असली आणी जॉब डेटा सुधारलेला असला तरी बिझिनेस मधील गुंतवणूक हवी तशी वाढलेली नाही, असे कारण देत रेट वाढवणे पुढे ढकलले.
 • बँक ऑफ जपानने रेटमध्ये किंवा बॉंड खरेदीच्या विषयी धोरणांत कुठलाही फरक केला नाही.
 • २७ सप्टेंबर ला ओपेकची मीटिंग आहे त्यांत नायजेरिया आपले क्रूडचे उत्पादन फ्रीज करते की वाढवते हे समजेल

सरकारी announcements

 • सरकारने जाहीर केले की २०१७-२०१८ आर्थिक वर्षाकरता वेगळे रेल्वे अंदाजपत्रक सादर केले जाणार नाही. तसेच एकत्र सदर केलेल्या अंदाजपत्रकांत प्लान आणी नॉनप्लान खर्च वेगवेगळा दाखविला जाणार नाही. अंदाज पत्रक सादर करण्याची तारीख एक महिना अलीकडे म्हणजेच १ फेबृआरीच्या आसपास बदली केली जाईल. अंदाजपत्रक सादर होऊन ते दोन्ही सभागृहांत मंजूर होण्याची प्रक्रिया ३१ मार्च पूर्वी पूर्ण केली जाईल.
 • रेल्वे अंदाजपत्रक वेगळे सादर होणार नसले तरी रेल्वे खात्याला असणारी स्वायत्तता अबाधित राहील असे सरकारने जाहीर केले.
 • सरकारने मार्बल उद्योगामध्ये असलेल्या कंपन्यांना कोणतेही लायसेन्स घेण्याची गरज नाही असे सांगितले. लायसेन्स राज बंद केले. याचा फायदा मुरुडेश्वर सिरामिक्स, निटको टाईल्स, या कंपन्यांना होईल.
 • या अंदाजपत्रकांत सरकार नवीन इलेक्ट्रिसिटी पॉलिसी जाहीर करण्याची शक्यता आहे,
 • सरकारने NBCC या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीला केंद्र सरकारच्या आजारी PSE(पब्लिक सेक्टर एन्टरप्राईजेस) साठी LAND MANAGEMENT एजन्सी म्हणून नेमले आहे.
 • सरकारने स्मार्ट सिटी योजनेची यादी जाहीर केली. या योजनेसाठी INFRASTRUCTURE योजनेसाठी अधिक सवलती दिल्या जातील.
 • सरकार निर्यातीला प्रोत्साहन देणार आहे. त्यामुळे निर्यातीसाठी जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये बर्याच प्रोडक्ट्सचा समावेश केला आहे. याचा फायदा ग्लास, लेदर, उद्योगांना होईल. यांत सेंट मोबेन, मिर्झा INTERNATIONAL, डेअरी प्रोडक्ट्स यांना होईल.
 • ज्या आस्थापनाचा वार्षिक टर्नओवर Rs २० (पूर्वोत्तर राज्यासाठी Rs १० लाख) लाखपेक्षा जास्त आहे त्यांना GST लागू होईल असा निर्णय जाहीर झाला. ज्या आस्थापनांचा वार्षिक टर्न ओवर Rs १.५ कोटी पर्यंत आहे ती राज्याच्या अखत्यारीत असतील. Rs १.५ कोटींपेक्षा जास्त टर्नओवर असलेली आस्थापने केंद्र आणी राज्य यांच्या संयुक्त अखत्यारीत असतील.
 • सरकारने ३६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी Rs ६०००० कोटींचा करार फ्रान्सबरोबर केला.

RBI सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था

 • सरकारने RBI च्या मॉनेटरी पॉलिसी कमिटी वर तीन RBI च्या बाहेरचे सदस्य नेमले. हे सदस्य अर्थशास्त्रातील मान्यवर व्यक्ती असून या कमिटी सदस्यांची मुदत ४ वर्षे किंवा सरकारच्या इच्छेवर अवलंबून राहील. अशा रीतीने RBI गव्हरनरला असलेला मॉनेटरी पॉलिसीवर धोरणात्मक निर्णय घेण्याच्या अधिकारावर मर्यादा आल्या.
 • RBI आपली मॉनेटरी पोलिसी ४ ऑक्टोबर २०१६ रोजी जाहीर करेल. पाउस पुरेसा झाल्यामुळे खरीप पिके चांगली येतील. कामगारांची मजुरी कमी त्यामुळे महागाई कमी होईल. हायर CONSUMPTION आणी कमी गुंतवणूक अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे १०० बेस पाईंटपर्यंत रेट कट होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
 • सेबीने रेटिंग एजन्सीजना आपले रेटिंग त्या कसे करतात हे स्पष्ट करण्यास सांगितले. विशेषतः कर्जदारांचे गेल्या तीन वर्षातील रेटिंग आणी त्यांनी आणलेल्या सिक्युरिटीजचे व्याज दर आणी कधी त्यांच्या रेटिंगमध्ये डाऊनग्रेड केले आहे का हे डिस्क्लोज केले पाहिजे. हे रेटिंग कंपनीच्या कर्जरोखे, तसेच कंपनी DEPOSIT साठी विचारांत घेतले जाते.
 • बाल्टिक ड्राय इंडेक्स वाढला आहे. याचा परिणाम मर्केटर लाइन सारख्या शिप्पिंग कंपन्यांना होईल.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • ‘FUTURE’ GROUP ने संगम डायरेक्ट चेन खरेदी केली आणी त्यांची हेरीटेज फूड्सचा रिटेल बिझिनेस विकत घेण्यासाठी त्यांच्या बरोबर बोलणी चालू आहेत. ह्या शेअरची किंमत जवळ जवळ ३० पट वाढली आहे. हेरीटेज फूड्स ही कंपनी चंद्राबाबू नायडू यांनी स्थापन केली आहे. ही कंपनी विविध उद्योगांत आहे.
 • हेन्केन या कंपनीने युनायटेड ब्रुवरीज या कंपनीतील स्टेक वाढवला. त्याच प्रमाणे डिएजो ही कंपनी ग्लोबल स्पिरीट या कंपनीत स्टेक घेणार आहे. भारतातील लिकर मार्केट आकर्षक वाटत आहे.
 • IT क्षेत्रातील BFSI सेगमेंटमध्ये स्पर्धा असल्यामुळे आर्थिक वर्ष २०१७ साठी १०.५ %ते १२% रेव्हेन्यू ग्रोथ होईल असे सांगितले. त्यामुळे इन्फोसिस त्यांचा गायडंस ९% ते १०% एवढा करणार आहे. ते मार्जिन कमी ठेवणार आहेत. इन्फोसिसचा शेअर आर्थिक वर्ष 18 च्या हिशेबानी १५च्या पटींत चालू आहे.
 • स्टेट बँकेमध्ये SBT SBBJ आदी सहा बँकांच्या मर्जरची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्टेट बँकेच्या चेअरमनपदाची मुदत १ वर्षापर्यंत वाढवली.
 • जयश्री टी ही कंपनी ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट करणार आहे.
 • मुंबई विमानतळ आणी HDIL यांच्यातील वादविवाद सामोपचाराने मिटला.. या प्रमाणे दोन्ही साईडवर कोणतीही CONTINGENT लायबिलीटी किंवा क्लेम राहणार नाही. याचा परिणाम TDR वर होणार नाही. याचा फायदा GVK INFRASTRUCTURE या कंपनीलाही होईल
 • ज्युबिलीयंट फूडमधून अजय कौल आणी CFO बाहेर पडल्यामुळे कंपनीच्या शेअरची किंमत कमी झाली. त्याचप्रमाणे माइंड ट्री मधून दोन महत्वाच्या व्यक्तींनी राजीनामा दिल्यामुळे तो ही शेअर पडला.
 • IRB INFRASTRUCTURE या कंपनीला Rs ११००० कोटींची ऑर्डर मिळाली.
 • आयनॉक्स लेजर मध्ये विदेशी निवेशकांची स्टेक २३% आहे. पूर्वी ह्या हिस्सेदारीची मर्यादा २६% होती. आता त्याची मर्यादा ४९% केली आहे. पण हा शेअर जेव्हा वाढतो तेव्हा त्याच्यांत तेवढ्या प्रमाणांत VOLUME नसतो.
 • पिरामल आणी फायझर डीलला CCI ने परवानगी दिली. पिरामल फायझरचे ४ ब्रांड विकत घेणार आहे.
 • ESSEL PROPACK या कंपनीने आपल्या जर्मन पार्टनरचा आपल्या EDG या सबसिडीअरीमधील स्टेक खरेदी केला.. यामुळे EDG ही एस्सेल PROPACKची १००% सबसिडीअरी झाली. यामुळे कंपनीला त्यांच्या युरोपिअन मार्केटमध्ये फायदा होईल.
 • BPCL या कंपनीला महारत्न हा दर्जा मिळणार आहे. त्यामुळे कंपनी स्वतंत्रपणे Rs ५००० कोटी पर्यंतचे निर्णय स्वतः घेऊ शकेल.
 • मोरेपन LAB त्यांचा OTC बिझिनेस पिरामल ग्रूपला विकणार आहे. OTC बिझिनेसमध्ये BURNOL, लेमोलेट आणी सत इसबगोल या ब्रान्डचा समावेश आहे.
 • वोडाफोन या कंपनीने भारतामधील बिझिनेसमध्ये Rs ४७००० कोटी परदेशी गुंतवणूक केली. यामुळे कंपनीचे कर्ज कमी झाले आणी स्पेक्ट्रम लिलावासाठी आणी टेलिकॉम क्षेत्रातला आपला मार्केटशेअर वाढविण्यासाठी तयारी केली.
 • GTL INFRASTRUCTURE या कंपनीच्या कर्जदारांनी त्यांच्या कर्जाचे इक्विटीमध्ये रुपांतर करण्यासाठी संमती दिली. या कंपनीला असलेल्या Rs ८२०० कोटी कर्जापैकी कंपनीने Rs ३३०० कोटी कर्जाचे इक्विटीत रुपांतर करण्याची कर्जदारांना विनंती केली होती.
 • बायर या कंपनीने MONSANTO या कंपनीच्या २६% शेअर्ससाठी Rs २४८१.६ प्रती शेअर या दराने ओपन ऑफर केली आहे.

नजीकच्या काळांत येणारे IPO

 • ICICI प्रूडेनशिअल लाईफ या कंपनीचा IPO एकूण १०.४ वेळा सबस्क्राईब झाला. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव कोटा १.३५ वेळा सबस्क्राईब झाला.
 • HPL इलेक्ट्रिक & पॉवर लिमिटेड (HEPL) या कंपनीचा IPO २२ सप्टेंबर २०१६ रोजी ओपन होऊन २६ सप्टेंबर रोजी बंद होईल. याचा प्राईस BAND Rs १७५ ते Rs २०२ आहे. मिनिमम लोट ७० शेअर्सचा आहे. ही कंपनी इलेक्ट्रिक मीटर्स आणी स्वीचगिअर्स बनविण्याच्या उद्योगांत आहे. कंपनी IPO चे प्रोसीड्स कर्ज फेडण्यासाठी तसेच खेळत्या भांडवलासाठी वापरेल.
 • L & T टेक चे २३ सप्टेंबर रोजी लिस्टिंग झाले. या कंपनीचे शेअर्स Rs ८६० ला IPO मध्ये दिले होते. या शेअरमध्ये माफक लिस्टिंग गेन झाला.

कॉर्पोरेट एक्शन

 • करुर वैश्य बँक आपल्या एका शेअरचे ५ शेअरमध्ये विभाजन करणार आहे.
 • कॅनरा बँकेने २६ सप्टेंबरला राईट्स इशु वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.
 • वर्धमान टेक्स्टाईलची २६ सप्टेंबरला BUY BACK वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग आहे.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं
ज्या कंपनीत प्रमोटर्सनी आपला स्टेक वाढवला हे चांगले आणी प्रमोटर्सनी आपला स्टेक विकला ते धोक्याचे लक्षण समजावे.
‘VIX’ (VOLATILITY इंडेक्स) महत्वाचा ठरतो.करेक्शन चालू असताना मध्येच एखादे दिवशी मार्केट वाढले पण त्यादिवशी VIX स्थिर असेल तर करेक्शन संपण्याच्या मार्गावर आहे असे गृहीत धरता येते. जर मार्केट वाढते आहे आणी VIX इंडेक्स अस्थिर आहे तर मार्केटचा ट्रेंड बदलतो आहे असे गृहीत धरण्यास हरकत नाही.
BSE निर्देशांक सेन्सेक्स २८६६८ वर आणी NSE निर्देशांक निफ्टी ८८३१ वर बंद झाला.
 

तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – July, August 2016

आधीची प्रशोन्त्तरे वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुमचे प्रश्न - माझी उत्तरं

Image courtesy – wikipedia


नाव: GANESH WAIKAR
तुमचा प्रश्न : share market demat account badal mahiti havi ahe
तुम्ही ब्लॉग नंबर ३१ आणी ३९ वाचा. तुम्हाला हवी आहे ती माहिती मिळेल
नाव: नासिर जलील शेख
तुमचा प्रश्न : इन्टरा डे ट्रेडिंग मधे ब्रोकर ने डिमेट अकौंट मधे दिलेल्या पैस्यातून शेअर खरीदी न करता डिमेट अकौंट स्वतः च्या पैश्याने खरेदी केलेला शेअर त्याच दिवशी वीकवा लागतो काय
मला तुमचा प्रश्नच कळला नाही. विकत घेतलेले शेअर्स तुम्ही कधी विकावे हा तुमच्या मर्जीचा प्रश्न आहे. परंतु एक लक्षांत ठेवा की इंट्राडेमध्ये घेतलेले शेअर्स खरेदी केलेल्या दिवशी विकले तरच तो इंट्राडे ट्रेड होतो. पैसे कुणाचे आहेत याचा प्रश्न येत नाही.
नाव: suraj moharil
तुमचा प्रश्न : dear,,,,, mala 12th cha demat account cha project banwaycha ahe tar aapan mala madat karu shakata kay.
माझा फोन नंबर ०२२ २५३३५८९७ आणी मोबाईल नंबर ९६९९६१५५०७ आहे आपण खालील पत्यावर मला व्यक्तीशः भेटू शकता. पत्ता :- भारतीय संगीत विद्यालय, पांडुरंग निवास स्टेशन रोड ठाणे (पश्चिम) ४००६०१. ……
नाव: PRAMOD JADHAV
तुमचा प्रश्न : १) एखाद्या शेयरची किंमत १ रुपया असेल तर आपण किती शेयर खरेदी करू शकतो?
२) शेयर खरेदीला मर्यादा असते का?
३) छोट्या किमतीची शेयर खरेदी करणे योग्य आहे का
आपण किती शेअर्स खरेदी करावेत हे तुमच्या ऐपतीवर अवलंबून आहे. कमीतकमी एक आणी जास्तीतजास्त कितीही शेअर्स खरेदी करू शकता. माझा ‘मूर्ती लहान कीर्ती महान’ हा पेनी शेअर्स वरचा ब्लॉग वाचा.
नाव: chhaya
तुमचा प्रश्न : shear market madhe invesment kashi karyachi
माझ्या ब्लॉगच्या प्रत्येक भागांत शेअर्समध्ये कशी गुंतवणूक करावी आणी तत्संबंधी सर्व गोष्टींची चर्चा केली आहे. ती वाचा.
नाव: santosh
तुमचा प्रश्न : mi sadya konta shear gheu shakto
आता फेडच्या निर्णयातील अनिश्चिततेमुले मार्केट पडू लागले आहे. अशावेळी तुम्ही लार्ज कॅप शेअर्स वर्षभरातील शेअरची कमाल आणी किमान किंमत पाहून विकत घेऊ शकता. पण लक्षात ठेवा कि शेवटी निर्णय तुमचा कारण फायदा आणि तोटा पण तुमचाच
नाव: Dr VISHAL SHILLE
तुमचा प्रश्न : Market depth mhanaje kay?
Market depth cha upyog share nivadanyasathi hoto ka??
NSE madhe “MARKET DEPTH” ka nahi??
लार्ज कॅप, मिड कॅप, स्माल कॅप, पेनी शेअर्स अशा सर्व शेअर्सचा समावेश असणे म्हणजेच मार्केट डेप्थ. BSE हे सर्वांत जुने आणी मोठे एक्चेंज आहे.आणी NSE सुरु होईपर्यंत BSE हे एकमेव एक्स्चेंज होते.त्यामुळे कंपन्यांना लिस्टिंग साठी निवडीला पर्याय नव्हता. NSE च्या नियमानुसार ज्या कंपन्यांची इच्छा होती त्या कंपन्या NSE वर लिस्ट झाल्या. मार्केट डेप्थ जास्त असली तर प्रत्येक प्रकारचे शेअर्स ट्रेडींगसाठी तसेच गुंतवणुकीसाठी उपलब्ध होतात.
नाव: कुंडलीक
तुमचा प्रश्न : प्रतेक कंपनी ची शेअर प्राइस काशी ठरते व कशामुळे चेंज होते ?
प्रत्येक कंपनीच्या शेअर्सची प्राईस SWOT ( स्ट्रेंग्थ, वीकनेस. ऑपॉरच्युनिटीज, थ्रेटस) विश्लेषणाप्रमाणे प्रायमरी मार्केटमध्ये ठरते. प्रत्येक शेअर लिस्टिंग होताना त्यांची शेअरमार्केटमध्ये प्रथम प्राईस ठरते आणी नंतर ती मागणी आणी पुरवठा असेल त्याप्रमाणे बदलते.
नाव: sachin mhetre
तुमचा प्रश्न : How to select a share ?
Entry and exit strategy of selected shate?
तुम्ही माझा ब्लॉग काळजीपूर्वक वाचा. त्यामध्ये या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मिळतील.
नाव: pravin Kumar
तुमचा प्रश्न : mam, Mi maharashatra State Gove. Cha Employee ahe tar mala Shere market madhe Intra Day n karata Dirgh mudati(1te 2 varsh) karita Guntavnuk karta yeil ka. ya babat konte niy
१९६४ च्या कायद्यानुसार वारंवार शेअर्स आणी सिक्युरिटीज मध्ये खरेदी आणी विक्री केली तर ते स्पेक्युलेशन समजले जाते. आणी कोणत्याही सरकारी नोकराने स्पेक्युलेशन करण्यावर बंदी आहे. पण तुम्ही गुंतवणूक करू शकता. ठराविक रकमेपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास आपल्याला आपल्या प्रिस्क्राईब ऑथोरिटीला कळवावे लागते. आपण शेअर्स आणी सेक्युरिटीज मध्ये केलेल्या गुंतवणुकीचा परिणाम आपल्या कार्यक्षमतेवर होता कामा नये. .
नाव: Samir Gholap
तुमचा प्रश्न : Namaste,
what is the difference Demat A/C and Trading A/c. and where to open it . will i need any broker or i can open in any bank?
DEMAT अकौंट तुम्ही खरेदी केलेल्या आणी विक्री केलेल्या शेअर्सची नोंद ठेवतो. आणी आता तुमच्याकडे किती शेअर्स आहेत त्याची माहिती देतो. ट्रेडिंग अकौंटद्वारे तुम्ही शेअर्स ची खरेदी आणी विक्री करू शकता. तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेत ( जर तेथे DEMAT सेवा उपलब्ध असेल) आणी ब्रोकरकडे किंवा STOCK होल्डिंग कॉर्पोरेशन मध्ये DEMAT अकौंट उघडू शकता. ट्रेडिंग अकौंट मात्र तुम्हाला ब्रोकरकडेच ओपन करावा लागतो. आपल्याला सोयीस्कर, जेथे ब्रोकरेज आणी इतर दर योग्य असतील तेथे हे दोन्ही अकौंट उघडावेत. AXIS, ICICI, HDFC, कोटक बँकेमध्ये तुम्ही ट्रेडिंग अकौटही उघडू शकता.
नाव: Bapusaheb tale
तुमचा प्रश्न : Madam intraday trading chi mahiti dyavi tumhi intraday trading karta ka?
आपण माझ्या ब्लॉग नंबर ३२, ३३, ३४, ३५, ३६ वाचा. या ब्लॉगमध्ये इंट्राडेविषयी माहिती आहे.
नाव: मंदार
तुमचा प्रश्न : नमस्कार ,
ब्लू चीप शेअर्स कसे निवडावेत ? विकत घेण्याची आणि विकण्याची वेळ निश्चित कशी करावी ? चांगले शेअर्स घेतल्यानंतर तीन ते पाच किवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी होल्ड करून ठेवणे चांगले की,अपेक्षित फायदा होताच विकणे चांगले ?
A ग्रूप मधील लार्ज कॅप शेअर्स (ज्या कंपन्या प्रगतीपथावर आहेत, सतत फायद्यांत आहेत) म्हणजे ब्लू चीप शेअर्स. कमीतकमी भावाला विकत घेऊन जास्तीतजास्त भावाला विकावेत. तुमची खरेदी किंमत आणी तुमची पैश्याची आवश्यकता यावर विक्रीचा निर्णय अवलंबून असतो
नाव: vinod ghatage
तुमचा प्रश्न : जर शेयरस खरेदी करायचे आसतील तर? व ते विकायचे आसतील तर
तुम्ही ब्लॉग निट आणी संपूर्णपणे वाचा म्हणजे तुम्हाला ही माहिती मिळेल.
नाव: sandeep untwale
तुमचा प्रश्न : real brokrage keti aste intraday brokrage other taxiss kiti
aasave te sang
ब्लॉग मध्ये ही माहिती दिलेली आहे. ब्लॉग नंबर ३५ आणी ३६ वाचा. सेबीच्या साईटवर जाऊन तुम्ही वर्तमान नियम माहिती करून घेऊ शकता, तसेच या बाबतीत तुम्ही ब्रोकरशी बोलणीही करु शक्ता. सरकारी कर आहेत त्यांत सूट मिळू शकत नाही पण ब्रोकर तुम्हाला ब्रोकरेजमध्ये सूट देऊ शकतो.
नाव: sandeep untwale
तुमचा प्रश्न : tiecknical anilesis badal kadhe lehanar
सध्या शेअर मार्केटसाठी प्रशिक्षण वर्ग सुरु केले आहेत. मनी प्लस मासिकातून शेअर मार्केट विषयी लेख लिहित आहे त्यामुळे जसा वेळ मिळेल तसे तांत्रिक विश्लेशणाविषयी लिहीन.
peharkar2462@gmail.com
तुमचा प्रश्न : currency option mhange kay ani yachi kharedi vikri kasi va nafa totta kay
मी करन्सी मार्केटमध्ये व्यवहार करीत नाही.
नाव: ABHIJIT
तुमचा प्रश्न : नमस्कार मॅडम मी mannapuram finance व Jk tyres या कंपन्यांचे अनुक्रमे 100 व 50 intradag मधुन delivery मध्ये trade result च्या दिवशी केले होते तर ते shares 5-6 दिवसांनंतर विकले तर मला dividend bhetu shakto ka?
प्रत्येक शेअर्ससाठी लाभांश मिळण्याची ex डेट ठरलेली असते. या डेटच्या आधी तुम्ही शेअर खरेदी केलेले असतील तर तुम्हाला लाभांश मिळतो अन्यथा मिळत माही.
नाव: ABHIJIT
तुमचा प्रश्न : नमस्कार मॅडम मला capital structure मधील Authoried Capital,Issued capital,Paid up shares (nos.), Paid up face value अाणि Paid up capital बद्दल सविस्तर माहीती सांगा ?
तुमचा प्रश्न : नमस्कार मॅडम मला Ratios मधील Adjusted EPS ,Adjusted cash EPS ,Reported EPS , Reported Cash EPS , Divident per share , Operating profit per share , Book value(excl rev res/incl rev res) per share , net operating income per share EPS अाणि Free reserves per share EPS बद्दल सविस्तर माहीती सांगा व यामधील कुठले Ratio वाढले किंवा कमी झाल्यानंतर कंपनीची स्थिती strong आहे असे समजते
तुमचा प्रश्न : नमस्कार मॅडम मला Ratios मधील , Operating margin ,Gross/Net profit margin, Adjusted cash margin, Adjusted return on net worth , Reported return on net worth अाणि return on long term funds बद्दल सविस्तर माहीती सांगा व यामधील कुठले Ratio वाढले किंवा कमी झाल्यानंतर कंपनीची स्थिती strong आहे असे समजते.
तुमचा प्रश्न : मॅडम OPM%, NPM%, cash EPS तसेच IIP म्हणजे काय याचा कोणत्या सेक्टरवर परिणाम होतो
ही सगळी माहिती तुम्हाला फ़यानान्सिअल management वरील कुठल्याही मराठी पुस्तकांत मिळू शकेल.
नाव: RAVIRAJ PATIL
तुमचा प्रश्न : HII MAM, MLA NEW ACCOUNT OPEN KRAYCHE AHE SHARE MARKET MDHE TR MI KUTHE N KSE OPEN KRU …..N TYACHE KAY CHARGE ASTAT… ANI SHARE MARKET MDHE TRADING KRAYLA SHIKSHANACHI GRJ AHE KA
तुम्ही ब्लॉग वाचा या प्रश्नांची उत्तरे ब्लॉग मध्ये दिलेली आहेत.
नाव: Ganesh waragade
तुमचा प्रश्न : Market chi surwat hotana te jastach wadhte tar kadhi dupari Khali yet tar kadhi shewti achank war yete intraday madhe ha samtol kasa sadhawa
जेव्हा मार्केट वाढते आहे आणी resistance लेव्हल वर आहे तेव्हा short करा आणी मार्केट पडत असेल आणी सपोर्ट लेव्हलला असेल तर खरेदी करा.
नाव: aniket
तुमचा प्रश्न : mala share market baddal janun ghenyachi khup utsukata aahe , so can u guide me ? konati pustaks mi refer karu share market basic shikanyasathi ?
आपण माझा ब्लॉग वाचा. हल्ली च शेअरमार्केटच्या प्रशिक्षणाचे वर्ग सुरु केले आहेत. त्याचा लाभ घेण्याची इच्छा असल्यास घेऊ शकता.
नाव: sandeep Gade
तुमचा प्रश्न : Respected Madam, I read your blog regularly…Mala changla share konta he olakhta yete, pan tya share cha price (value) Mahag ahe ka he samzat nahi.
Te kase olakhave?
लाईफ टाईम हाय आणी लाईफ टाईम लो आणी ५२ वीक हाय आणी ५२ वीक लो हे दोन्ही भाव इंटरनेट वरून मिळू शकतात. त्यावरून शेअर स्वस्त की महाग हे समजू शकेल.
नाव: KOMAL
तुमचा प्रश्न : RIGHTS MHANJE KAY?
जेव्हा कंपनी काही उद्देशासाठी ( विस्तार, किंवा नवीन उत्पादन युनिट सुरु करण्यासाठी किंवा कंपनीला अन्य कोणत्याही कारणासाठी भांडवलाची गरज असेल ) आपल्या वर्तमान शेअरहोल्डर्स कडून भांडवलाची उभारणी करते त्याला राईट्स इशू असे म्हणतात. ही ऑफर शेअरच्या मार्केट प्राईस पेक्षा कमी किंमतीत केली जाते त्यामुळे वर्तमान शेअरहोल्डिंग pattern मध्ये कोणताही बदल होत नाही.
नाव: Ketan
तुमचा प्रश्न : मनी कंट्रोल .कॉम वर Philips India & Cadbury India चे पोर्टल वर Philips India is not traded on BSE in the last 30 days असे दिसते किंवा Cadbury is not listed on BSE, Cadbury is not traded याचा अर्थ काय? जर या कंपनीचे शेअर आपल्याकडे असतील तर काय करायचे ? आणि आपण या कंपनीचे शेअर विकत घेऊ शकतो का ? बरयाच मोठ्या कंपनी बाबतीत असे दिसते याचा अर्थ त्या खराब आहे असा होतो का ?
जर कंपनीचे शेअर डीलिस्ट झाले असतील (जर कंपनीला भारतिय stock एक्शेंज वर लिस्टिंग त्रासदायक वाटत असेल तर कंपनी आपले शेअर्स डीलिस्ट करते.) तर त्याचे ट्रेडिंग stock एक्सचेंज वर होऊ शकत नाही. या कंपनीची जी प्राईस डीलिस्टिंगच्या वेळेस असेल ती प्राईस आपण योग्य मुदतीत कंपनीशी संपर्क साधला तर मिळू शकते.जर मुदत संपून गेली असली तर तुम्हाला कंपनीला विशेष विनंती करावी लागते किंवा नॉनट्रेडेबल सिक्युरिटीजमध्ये ज्या फर्म्स ट्रेडिंग करत असतील त्यांना विकावे लागतात.कॅडबरीचे शेअर्स डीलीस्ट झाले आहेत पण काही शेअरहोल्डर्स Rs१८०० किंमतीलाही शेअर्स टेंडर करायला अजूनही तयार नाहीत. जर कंपनीच्या शेअर्समध्ये बराच काळपर्यंत किंवा कमी ट्रेडिंग होत असेल तर अशा शेअर्सना इल्लीक्विड शेअर्स असे म्हणतात. याची कारणे शेअर्सची किंमत, कंपनीची आर्थिक परिस्थिती, किंवा अन्य तात्कालिक कारण असु शकते.
नाव: अभय
तुमचा प्रश्न : मॅॅडम, शेअरबाजारावरील मिळणार्या लाभावर कर कसे लागतात. त्यावर माहिती द्या.
लाभ होवो किंवा नुकसान होवो तम्ही केलेल्या शेअर्सच्या व्यवहारावर तुम्हाला काही सरकारी कर द्यावे लागतात.शेअर व्यवहारांत जर तुम्हाला लाभ झाला असेल तर कर सल्लागाराचा सल्ला घ्या.
नाव: sandeep untwale
तुमचा प्रश्न : intraday trading medhe share up down cha andaz kasa ghva
तुम्ही जर शेअर्स किंमतीतील हालचालीचे निरीक्षण करत असाल,तर असे निरीक्षण, तुमचा अनुभव, शेअरमधील VOLUME आणी आलेल्या बातमीचा प्रभाव आणी सर्किट लिमिट यावरून तुम्ही हा अंदाज बांधू शकता.
नाव: sandeep untwale
तुमचा प्रश्न : share book vealu varun kimat vadecha andaz kasa gheva
शेअरची किंमत बुक VALUEच्या किती पटींत चालली आहे हे पहा. तो शेअर ज्या सेक्टरमधला असेल त्या सेक्टरमधील कंपन्यांना बुकVALUE च्या किती पटींत किंमत मिळते ते पहा आणी शेअर महाग किंवा स्वस्त ते ठरवा.
नाव: Pradip Ghalme
तुमचा प्रश्न : मॅडम, शेर मार्केट वर बऱ्याच गोष्टींचा परिणाम होत असतो जसे की, एखाद्या कंपनी चे उत्पादन,विक्री किंवा कर्ज ह्या पण गोष्टींचा परिणाम होतोच तर, एखाद्या कंपनी वर किती कर्ज आहे ही माहिती कुठून मिळेल कारण INTERNET वर मी खुप शोधले पण पुर्ण Details नाही मिळाली म्हणुन एखादी वेबसाईट सुचवा.
कंपनीच्या तिमाही निकालांमध्ये ही माहिती दिलेली असते. तसेच या निकालांत गेल्या तिमाहीची तसेच गेल्या पूर्ण वर्षाची माहिती दिलेली असते. ही आपल्याला कंपनीच्या वेबसाईटवर मिळू शकते.
नाव: Pradip Ghalme
तुमचा प्रश्न : मॅडम, 1) ब्रोकर ने आपल्याला न विचारता आपले शेर परस्पर विकन्याचा अधिकार असतो का?
आपला DEMAT अकौंट ब्रोकरकडे असला आणी आपण पॉवर ऑफ ATTORNEY दिली असेल आणी आपण खरेदी केलेया शेअर्सचे पैसे जर आपण दिले नसतील किंवा आपल्याकडून ब्रोकरला काही पैसे येणे असतील तर तेव्हड्या पैशांचे शेअर्स ब्रोकर विकू शकतो.पण ब्रोकारणे आपल्याला विकण्याआधी याची पूर्व सुचना दिली पाहिजे.
2) BSE (Bombay Stock Exchange)
NSE (National Stock Exchange)
सर्व बाबतीत या दोन्हीं पैकी कोणते मोठे आहे?
BSE हे भारतातले पहिले STOCK एक्स्चेंज आहे. त्यामुळे यावर खूप शेअर्स लिस्ट झालेले आहेत. NSEची स्थापना अलीकडच्या काळांत झाल्यामुळे त्यावर BSEपेक्षा कमी शेअर्स लिस्टिंग झालेले आहेत.
नाव: Pradip Ghalme
तुमचा प्रश्न : मॅडम, 1) Demat व Treading हे Account 3 Members मधे समान असे Group Account म्हणुन उघाड़ता येते का?2) Demat व Treading हे Account ब्रोकर्स कडून उघडतांनी आपण कुठली काळजी घेतली पाहिजे.
आपण DEMAT अकौंटसंबंधी ब्लॉगनंबर १८ ३१ आणी ३९ वाचा. DEMAT अकौंट वरील व्यवहार करण्यासाठी सर्व संयुक्त खातेदार्रांच्या सह्या जरुरीच्या असतात.
नाव: L S UNHALE
तुमचा प्रश्न : BONAS SHEAR MHANAJE KAY
आपण बोनस शेअरवरील ब्लॉग नंबर ५६ वाचा.
नाव: पांचाळ शंकर विलासराव
तुमचा प्रश्न : नमस्कार शेअर मार्केट हि माझ्यासाठी नविन संकल्पना आहे. मला यामधले काहीच माहिती नाही तरी मित्रा कडून मिळालेली चुकीची माहिती आणि पेपर मध्ये वाचून माझी इच्छा आहे कि मी पण ट्रेडिंग करावी किंबहुना मला यामधील काहीच माहिती नाही dimat account कसे खोलायचे आणि ट्रेडिंग कशी करायची या बदल महती करून द्यावी हि विनंती
आपण माझ्या ब्लोगमधील सर्व लेख नीट आणी संपूर्ण वाचावेत. आपण विचारलेली सर्व माहिती वेगवेगळ्या लेखांत दिलेली आहे.
नाव: सुहास गोरे
तुमचा प्रश्न : नमस्कार मैडम
मला काहीप्रश्न पडलेआहेत. आपण ब्रोकरशिवाय ट्रेडिंग नाही करू शकतो का.?
आपण ऑन लाईन ट्रेडिंग करू शकता. पण ऑन लाईन ट्रेडिंग मध्येही बँकेबरोबर ब्रोकरही असतोच.
SIPमधे गुंतवणूक करण चांगल की स्वता demat ac कडून ट्रेडिंग करण चांगल.? आणि जर ब्रोकरशिवाय ट्रेडिंग करता येत असेल तर ती कशी करतात काही माहित असेल तर शेयर करा म्हणजे तुम्ही करालच 
SIP आपण ज्या म्युच्युअल फंडाकडे द्याल त्या व्यवस्थापनाच्या कौशल्यावर आणी योग्यवेळी योग्य संधी घेण्यावर तुमचा फायदा अवलंबून असतो. यांत काही संधी हुकु शकतात. पण आपण अभ्यास केला आणी ट्रेडिंग केले तर म्युच्युअल फंडांचा व्यवस्थापन खर्च आणी इतर चार्जेस वाचतात.आणी होणारा सर्वच्यासर्व फायदा तुमच्या पदरांत पडतो. म्युच्युअल फंड फक्त निवडक सेक्टरमध्ये आणी निवडक शेअरमध्ये गुंतावूक करतात. त्यामुळे तुमची गुंतवणुकीची संधी मर्यादित होते.
.आणि अजून एक मार्केटशी संभंदित जे काही शब्द आहेत ते जर माझ्या email वर send कराल pls.
प्रत्येक ऑन लाईन ट्रेडिंगचे SOFTWEAR आणी टर्म्स आणी कंडीशन वेगळ्या असतात. त्या तुम्हाला त्या त्या साईटवर जाऊन समजावून घ्याव्या लागतील. आणी मार्केटशी संबंधीत शब्द तुम्हाला माझ्या ब्लॉगवरील ‘माझी वहिनी लेख नंबर ११ दिवाळी विशेष’ यामध्ये मिळतील. .
mutulfund बदल काही माहित जस की ते काय असतात आणि त्यात कशी गुंतवणूक करावी.?
म्युच्युअल फंडावर एक ब्लॉग टाकीत आहे तो आपण वाचावा.
आणि आपले खुप खुप आभार जो ह्या प्रकार ब्लॉग लिहून तुम्ही आम्ही सारख्या खुपश्या तरुणाच्या आणि सर्व मराठी माणसाच्या मार्केट बदल बगायचा दृष्टिकोण बदलात. मी काही व्यक्तिना याआधी मार्केट बदल विचारले होते पण त्यानी मला पॉजिटिव सांगन्याचे सोडून नको ते आपल् काम नाही वगरे अशी उत्तरे दिली . आपल्या ब्लॉग मुळे खुप मदत झाली आहे. आणि मी नवका आहे मार्केट मधे तर मी इंट्राडे ट्रेडिंग करावी का.?
इंट्राडे ट्रेडिंग वाईट आहे असा दृष्टीकोन न ठेवता योग्य संधी मिळाल्यास इंट्राडे ट्रेड करण्यास काही हरकत नाही. पण हा फार वेगांत करण्याचा ट्रेड आहे हे लक्षांत ठेवावे. आणी आपल्या समोर शेअर्सची किंमत असल्याशिवाय सहसा हा ट्रेड करू नये.
नाव: sandesh palande
तुमचा प्रश्न : mala option madhe trading karayala shikayach ahe . tumhi madat karu shakatat kay
योग्य वेळी तुमच्या सुचनेप्रमाणे लेख टाकू.
नाव: mangesh
तुमचा प्रश्न : Dear madm, future ani option baddl Ek tri lekh liha..pls
योग्य वेळी तुमच्या सुचनेप्रमाणे लेख टाकू.
नाव: Arun
तुमचा प्रश्न : Renuka Sugar Stock Mi Rs.30 Ni Ghetala Aahe, Aaj To Rs.17 Rupai Aahe To Kadhi Vadel.? Tevade Sanga.? Madam Please.
साखर कंपन्यांच्या शेअर्सला चांगले दिवस येत आहेत. आपली प्राईस मिळायला थोडे महिने लागतील.
नाव: akshay kharage
तुमचा प्रश्न : madam share buy-back mhanje kay te mala samjaun sanga
आपण माझ्या ब्लोगवरील लेख नंबर ५८ वाचा त्यांत BUYBACK वर विस्ताराने लिहिले आहे
 
नाव: SACHIN
तुमचा प्रश्न : madam mi market madhe new entry keli ti pan maagchya month madhe mala experiance naslyane mi market jeva 29000 vr hote teva stock buy kele ani aaj market padlyane majha khup loss jhala tr yasathi mala thod guide kara.
FEDची मीटिंगमध्ये जर व्याजाचे दर न वाढवण्याचा निर्णय घेतला गेला तर मार्केट पुन्हा उसळी घेईल. तुम्ही जर ब्लू चीप शेअरमध्ये गुंतवणूक केली असेल तर कमी भावांत अजून काही शेअर्स खरेदी करू शकता त्यामुळे सरासरी किंमत कमी होईल. आणी मार्केटने उसळी घेतल्यावर हे शेअर्स तुम्ही थोडाफा र फायदा घेवून विकून टाका. आणी मार्केट वाढत असताना शेअर खरेदी करून फायदा होत असतानाही थांबू नका. होत असलेला फायदा घेवून मार्केटमधून बाहेर पडा. लक्षात ठेवा कि शेवटी निर्णय तुमचा आहे कारण फायदा किंवा तोटा तुमचाच होणार.

आठवड्याचे समालोचन – १२ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर २०१६ – लांडगा आला रे लांडगा आला !

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Stock market information in marathiगेले सहा महिने फेडच्या व्याज दरांत वाढीचा ‘लांडगा आला रे लांडगा आला’  आणी त्यामुळे काय नुकसान होणार ही आवई वारंवार उठत राहिली. २१ सप्टेंबर २०१६ रोजी होणार्या फेडच्या मीटिंगविषयी आणी त्यांत होऊ शकणार्या संभाव्य दरवाढीचा विकसित आणी अविकसित देशांच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल त्याची खुमासदार चर्चा वर्तमानपत्रे, दूरदर्शनच्या वाहिन्या यावर चालू आहे. विविध देशाच्या सेन्ट्रल बँक या संभाव्य घटनेच्या परिणामांना तोंड देण्याची तयारी करीत आहेत. पण गोष्टीतील लांडग्यांप्रमाणे प्रत्येक वेळी फेडच्या दरवाढीचा बार फुसका ठरत आहे. फटाका फुटत नाही यावेळी USA च्या अर्थव्यवस्थेविषयी त्याना जसा डेटा हवा होता तसा डेटा आल्यामुळे फेड आपले रेट ०.२५% ने वाढवील असा अंदाज आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडी
USA मधील निवडणुका, हिलरी क्लिंटनचे आजारपण, आणी त्या आजारपणाचा विरोधी उमेदवार ट्रंप यांना होणारा फायदा , २१ सप्टेंबरला होणारी फेडची मीटिंग आणी या मीटिंगमध्ये रेट वाढवतील का ही वाटणारी भीती यामुळे जागतिक स्तरावर सर्व शेअर मार्केट पडली. त्यामुळे या घटनेचा भारतीय मार्केटवरही परिणाम झाला.
सरकारी announcements

 • सरकार हायर एजुकेशन फायनान्सिंग एजन्सी सुरु करणार आहे. त्यानुसार कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी मधून पैसा उभा करून तो पैसा IIT, IIM च्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पुरवला जाईल.
 • GST कौन्सिलच्या स्थापनेला मंत्रीमंडळाची मंजुरी मिळाली. हे कौन्सिल GST चा दर आणी इतर प्रशासनिक बाबतींत निर्णय घेईल.
 • दर महिन्यातून दोनदा फ्युएल (इंधन म्हणजेच पेट्रोल डीझेल आणी विमानांत वापरले जाणारे इंधन) च्या किंमती जाहीर होतात. यावेळी पेट्रोल दोझेल आणी विमानाच्या इंधनाच्या किंमती कमी होतील असा अंदाज आहे.
 • रेल्वेचे भाडे जरुरीपेक्षा जास्त आहे असे वाणिज्य मंत्रालयाचे म्हणणे आहे. त्यामुळे मालवाहतुकीचे भाडे कमी झाल्यास निर्यातदार आणी गुंतवणूकदारांचे नुकसान थांबेल असे वाणिज्य मंत्रालयाचे म्हणणे आहे.
 • ऑगस्ट २०१६ पर्यंत प्रत्यक्ष कराची वसुली १५% ने वाढली कॉर्पोरेट कर वसुली ११.५५ % ने वाढली. व्यक्तीगत कराची वसुली २४.०६% ने वाढली.
 • केंद्र सरकार १ ऑक्टोबर पासून २३५४.५५ MHZ स्पेक्ट्रमचा लिलाव करेल. या लीलावामध्ये ७ टेलिकॉम कंपन्या भाग घेतील. या स्पेक्ट्रम ची किंमत Rs ५.लाख ६०,हजार कोटी ठरवण्यांत आली आहे.
 • NATIONAL PHARMA PRICING AUTHORITY या सरकारी आस्थापनाने १८ औषधांच्या किंमती कमी केल्या.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • WPI (होलसेल प्राईस इंडेक्स) ऑगस्ट मध्ये ३.७४% झाला
 • CPI ( कन्झ्युमर प्राईस इंडेक्स) ऑगस्ट २०१६ मध्ये ५.०५%(जुलै ५.१३%) होते.
 • फूड इन्फ्लेशन ५.९%( जुलै ८.३५) झाले. हे गेल्या ५ महिन्यातील कमीतकमी इन्फ्लेशन आहे. इन्फ्लेशन कमी झाल्यामुळे आता RBI ऑक्टोबरच्या पॉलिसीमध्ये रेट कट करेल अशी आशा निर्माण झाली.
 • जुलै २०१६ च्या IIP च्या आकड्यांनी निराशा केली. IIP ( इंडेक्स ऑफ इंडस्ट्रीयल प्रोडक्शन) – २.४% झाले MANUFACTURING -३.४% झाले. कॅपिटल गुड्सचे प्रोडक्शन -२९.६% झाले.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • महिंद्र CIE ने जे बिल फोर्जचे अक्विझिशन केले ते महागांत केले. ऑटो अन्सीलिअरी चे शेअर्स १० ते १५ पटींत चालतात. पण महिंद्र CIE ने बिल फोर्जला २५ पटींत भाव दिला.
 • HOEC या कंपनीने आसाममध्ये त्यांचे कमर्शिअल उत्पादन सुरु केले.
 • एडलवेईस त्यांचा अग्रीबिझिनेस विकणार आहे.
 • हिंदाल्को त्यांचा ब्राझील प्लांट आणी बॉक्साइटच्या खाणी विकणार आहेत.
 • टाटा पॉवरनी वेलस्पन रीन्युएबल एनर्जीचे अक्विझीशन पुरे केले.
 • WOCKHARTD या कंपनीच्या चिकलठाणा प्लांटला USFDA ने क्लीनचीट दिली. या प्लांटपासून कंपनीला एकंदर उत्पन्नाच्या ७५% उत्पन्न मिळते.

कॉर्पोरेट एक्शन

 • ओरीएंट पेपर त्यांचा इलेक्ट्रिक बिझिनेस डीमर्ज करणार आहेत.
 • हिंदुजा फौंड्री आणी अशोक LEYLAND यांचे मर्जर होणार आहे. हिंदुजा फौन्द्रीच्या १०० शेअर्सना अशोक LEYLAND चे ४० शेअर्स मिळणार आहेत. या ठिकाणी सिनर्जी काय आहे हे समजत नाही.
 • रिलायंस कम्युनिकेशनने आपण एअरसेल या अन्लीस्टेड कंपनीमध्ये आपले मर्जर जाहीर केले. यामुळे टेलिकॉम क्षेत्रातील ४ नंबरची मोठी कंपनी अस्तित्वांत येईल.
 • सेन्चुरी टेक्स्टाईल AB FASHION मध्ये मर्ज होणार आहे.
 • सन फार्मा Rs ९०० प्रती शेअर या भावाने 22 सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान ७५ लाख शेअर्स BUYBACK करेल.
 • वेदान्ता आणी केर्न इंडिया यांच्या मर्जरला मंजुरी मिळाली. केर्न एनर्जी च्या एका शेअरसाठी एक वेदांताचा शेअर आणी ४ प्रेफरन्स शेअर्स ( १८ महिन्यांत रीडीमेबल आणी ७,५% लाभांश) मिळतील.
 • रिलायंस कॅपिटलमधून रिलायंस होम फायनांस वेगळी काढून त्याचे स्वतंत्र लिस्टिंग करणार आहेत.रिलायंस कॅपिटलच्या १ शेअरला रिलायंस होम फायनान्स चा एक शेअर फ्री मिळेल.
 • BAYER AG या कंपनीने MONSANTO ही कंपनी अक्वायर केली. याचा फायदा त्या कंपन्यांच्या इंडिअन सबसिडीअरीजना होईल.

नजीकच्या काळांत येणारे IPO

 • L & T टेक्नोलॉजी चा IPO १२ सप्टेंबरला ओपन होऊन १५ सप्टेंबरला २०१६ ला बंद झाला. हा इशू २,२९ वेळा सबस्क्राईब झाला.
 • GNA AXLES या कंपनीचा IPO १४ सप्टेंबरला ओपन होऊन १६ सप्टेंबरला बंद झाला. हा IPO सात वेळा ओव्हर सबस्क्राईब झाला.
 • ICICI पृडेन्शियल या कंपनीचा IPO सप्टेंबर १९ २०१६ ला ओपन होऊन २१ सप्टेंबरला बंद होईल. या IPO चा प्राईस BAND Rs ३०० ते Rs ३३४ असेल. मिनिमम लोट ४४ शेअर्सचा असेल. या IPO ची साईझ Rs ५४४० कोटी ते Rs ६०४० कोटी आहे. यावेळी प्रथमच ICICI बँकेच्या शेअरहोल्डर्सना क्वोटा राखून ठेवला आहे. याचा अर्थ ICICI बँकेचे शेअरहोल्डर्स IPO मध्ये २ अर्ज करू शकतील आणी हे अर्ज मल्टीपल अर्ज म्हणून समजले जाणार नाहीत. या कंपनीची खाजगी आयुर्विम्याच्या क्षेत्रांत लीडरशिप आहे. त्यांचा ब्रांड सुप्रस्थापित आहे. आणी कंपनी इन्व्हेस्टर फ्रेंडली म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांची फायनानसिअल्स चांगली आहेत.
 • BSE (बॉम्बे STOCK एक्स्चेंज) भारतातील सर्वात जुन्या STOCK एक्स्चेंजने Rs १५०० कोटींच्या IPO साठी ऱेड हेअरिंग प्रोस्पेक्टूस फाईल केले. या IPO चा प्राईस BAND Rs ४०० ते Rs ५०० असेल. MCX नंतर BSE हे दुसरे लीस्टेड STOCK एक्स्चेंज असेल.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं
शेअर मार्केटमध्ये कळीचा मुद्दा निरीक्षण हा आहे. या निरीक्षणाला तांत्रिक विश्लेषण आणी मुलभूत विश्लेषणाची जोड दिली तरच इंट्राडे ट्रेड चांगला होतो. म्हणजे समजा मी निरीक्षणातून असे ताडले की आज जेम्स आणी ज्युवेलरी सेक्टर चांगला चालतो आहे. तर यामधील मजबूत किंवा न वाढलेले शेअर्स कोणते? कोणते शेअर्स किती वाढतात आणी कोणते शेअर्स सपोर्ट लेव्हलला आहेत? ते पाहावे.
याआधी पुढच्या दोन्ही आठवड्यांत थोडेसे अस्वस्थ करणारे वातावरण मार्केटमध्ये असेल यांत शंका नाही. पण पुट CALL रेशियोसुद्धा ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनला नाही. सगळ्यांना बुल रनची चाहूल लागली आहे. त्यामुळे मार्केटमधील मुक्काम हलविण्याची इच्छा नाही. ‘बुल्स आर प्लेईंग फोर GBP पाउंड्स एंड बेअर्स आर प्लेईंग फोर पेनीज’ अशी स्थिती आहे. बघू या काय होते ते !
शनिवारी १७ सप्टेंबर रोजी युरोपिअन कॉमन युनियनची बैठक आहे. या बैठकीत घेतल्या गेलेल्या निर्णयावरही लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
BSE निर्देशांक सेन्सेक्स २८५९५ NSE निर्देशांक निफ्टी ८७८० वर बंद झाले
 

आठवड्याचे समालोचन – ५ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर – FEAR आणी GREED च्या मोहजालात शेअर मार्केट

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
 

courtesy - Brocken Inaglory / Wikipedia

courtesy – Brocken Inaglory / Wikipedia


अती गरिबी किंवा अती श्रीमंती दोन्ही वेळेला माणूस योग्य विचार करत नाही. त्यामुळे परिणाम भयानक होतात. तसेच मार्केटचे झाले आहे. मार्केटचा वाढण्याचा वेग खूप आहे. ४ मार्च २०१५ नंतर प्रथमच बँक निफ्टी २०,००० च्या वर, निफ्टी ८९००च्या वर आणी सेन्सेक्स २९००० च्या वर पोहोचले. कोणत्याही वाईट बातम्यांकडे ट्रेडर्स दुर्लक्ष करीत आहेत. पण चांगल्या बातमीचा परिणाम ज्या शेअर वर होणार असेल त्या शेअर्सच्या किंमती खूप वेगाने वाढत आहेत. एखाद्या शेअरमध्ये २% वाढ अपेक्षित असेल तर शेअर १०% वाढतो. त्यामुळे मार्केटमध्ये जे लोक नवीन असतील त्यांनी सावध व्हावे. बुलरनच्या चक्रव्युहांत अडकून पडू नये.मोहजालांत अडकून पडू नये. मार्केट उच्चतम पातळीवर आहे.  अन्यथा कमाल किंमतीला घेतलेले शेअर्स तुमच्या पदरांत पडतील. आणी ते विकण्यासाठी पुढच्या बुलरनची वाट बघत बसावे लागेल.जसे क्रिकेटमध्ये खेळाडू चांगला असतो पण त्याचा bad patch चालू असतो.  त्याचप्रमाणे ज्या बेस्ट कंपन्या ‘ bad patch’ मध्ये असतील अशा कंपन्या शोधाव्यात. जो शेअर खूप वाढला असेल त्याच्यातील प्रॉफीट बुक करून जे शेअर तात्कालिक कारणांसाठी सतत पडत असतील त्यांत गुंतवणूक करावी.
आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • रशिया आणी सौदी अरेबिया यांच्यात क्रूडचे उत्पादन फ्रीज करण्यासाठी करार केला.
 • २१ सप्टेंबरला FOMCची मीटिंग आहे. नॉनफार्म पे रोल डाटा खराब आला. USA चा UNEMPLOYMENT रेट ४.९ % आहे त्यामुळे सप्टेंबरमध्ये रेट वाढण्याची शक्यता कमी झाली.
 • युरोपिअन सेन्ट्रल बँकेने रीफायनांस रेट झिरो %, ठेवींवरील व्याज -०.४% आणी ASSET पर्चेसेस प्रत्येक महिन्याला EURO ८० बिलियन ( मार्च २०१७ पर्यंत) वर कायम ठेवली.

सरकारी अन्नौंसमेंट

 • कोटिंग इंडस्ट्री आणी पेंट बनविण्यासाठी वापरण्यांत येणाऱ्या केमिकल्स वर ANTI DUMPING ड्युटी लावण्यांत येणार आहे.
 • महाराष्ट्र राज्य सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हौसिंग पॉलिसी जाहीर केली.याचा फायदा रीडेव्हलपमेंट करणाऱ्या कंपन्यांनाच होणार. उदा :- HDIL
 • GST साठी पास झालेल्या घटनादुरुस्तीसाठी ५०% पेक्षा जास्त राज्यांच्या सभागृहांनी मंजुरी दिल्यामुळे राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली.

RBI.सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था

 • RBI चे गव्हरनर म्हणून उर्जित पटेल यांनी ५ सप्टेंबर २०१६ पासून कार्यभार सांभाळला.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • सतत १७ महिने कमी होणारे WPI एप्रिल महिन्यांत .३४% वाढले

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • इक्विटास होल्डिंग या कंपनीने आपली इक्विटास स्माल फायनान्स बँक चेन्नईमध्ये तीन शाखा उधडून सुरु केली. त्यांना ४१२ शाखा उघडायला RBI ने परवानगी दिली. कंपनी ६-८ महिन्यांत ४१२ शाखा उघडेल आणी वर्तमान १७० शाखा कर्ज देण्याचा आपला बिझिनेस चालू ठेवतील.
 • ENIL ही कंपनी ३ नवी रेडिओ स्टेशन सुरु करणार आहे.
 • डेन नेटवर्क्स त्यांचा BROAD BAND /इंटरनेट बिझिनेस डीमर्ज करणार आहे. हा बिझिनेस स्कायनेट मध्ये मर्ज करणार आहेत.
 • वर्धमान ग्रूपने यार्न आणी थ्रेड बिझिनेसमधला ४०% स्टेक Rs ४१३ कोटीला विकला.
 • RBI ने जस्ट डायल या कंपनीला प्रीपेड पेमेंट INSTRUMENT सर्विस साठी परवानगी दिली.
 • ब्रिटानिया बरोबरच्या बिस्कीट PACKAGE च्या डीसप्यूट च्या बाबतीत ITC च्या बाजूने निकाल आला. त्यामुळे ब्रिटानिया डायजेस्टीव बिस्किटाचे सर्वं PACKETS मार्केटमधून ४ आठवड्यांत परत मागविल. ब्रिटानिया ने या निर्णयाविरुद्ध अपील दाखल केके आहे.
 • टाटा मोटर्सला ५००० बस पुरवण्यासाठी STU कडून ऑर्डर मिळाली.
 • ITDC त्यांची चार हॉटेल्स विकण्याचा विचार करीत आहे.
 • श्री कलहस्ती पाईप ह्या कंपनीची लहान लहान युनिट्स चालू केली जातील. असे कंपनीने जाहीर केले.
 • नॉर्वे बेस्ड रेल्वे कंपनीकडून विप्रोला ३ वर्षाकरता CONTRACT मिळाले.
 • महिंद्र CIE ही कंपनी बिल फोर्ज मध्ये १००% स्टेक Rs १२०० ते Rs १३०० कोटींना विकत घेणार आहे.
 • चेन्नई पेट्रोचे तिमाही निकाल आले. GRM कमी झाले. बाकी निकाल चांगले आले. क्रूडचा भाव कमी राहिल्यामुळे निकाल चांगले असतील हे अपेक्षित होते.
 • भेल आणी स्पाईसजेट या कंपन्यांचे तिमाही निकाल चांगले आले.
 • USFDAने इंडोको रेमिडीजच्या गोवा प्लांटसाठी फॉर्म नंबर ४८३ इशू केला.
 • नॉर्थ अमेरिकेतून ‘क्लास 8’ ट्रक्सची विक्री आणी ऑर्डर मिळण्याचे प्रमाण महिना दर महिना वाढत आहे असे भारत फोर्जच्या व्यवस्थापनाने सांगितले.
 • M & M त्यांच्या रेवा ब्रांडचे महिंद्र इलेक्ट्रिक असे REBRANDING करणार आहेत. M & M ओला या कंपनी बरोबर टायअप करणार आहे. हे अग्रीमेंट Non-exclusivity तत्वावर असेल. त्यामुळे M & M उबेर आणी इतर कंपन्यानबरोबरही टायअप करू शकतात. M & M ही कंपनी OLA या कंपनीला कार्स लीजिंग तत्वावर देईल. किंवा फायनांसिंगला मदत करील.
 • ONGC चे निकाल चांगले आले.
 • अशोक LEYLAND आणी निसान यांनी आपले जॉइनट व्हेन्चर अग्रीमेंट RESTRUCTURE केले.
 • रेलवेने टोरांटो, राजधानी आणी तत्काळ तिकिटांचे दर वाढवले.
 • IDBI ने त्यांचा ‘CARE’ मधला स्टेक विकला.
 • ओर्बिट कॉर्पचे प्रमोटर पूजित अगरवाल यांना मुंबईमध्ये फसवाफसवीच्या आरोपावरून पकडले.
 • येस बँकेने आपला QIP इशू मागे घेतला. बँकेच्या व्यवस्थापनाने सांगितले की शेअरच्या किमतीतील ‘VOLATILITY’आणी इशू ओवरसबस्क्राईब झाल्यावरही इशू ओपन ठेवल्यामुळे शेअरच्या किंमतीत VOLATILITY आली. त्यामुळे QIP इशू मागे घ्यावा लागला.
 • टी सी एस या IT क्षेत्रातील दिग्गज कंपनीने दुसऱ्या तिमाहीसाठी प्रॉफीट वार्निंग दिली. USA मधील कंपन्यांनी त्यांचे IT संबंधीत DESCRITIONARY SPENDING रोखून धरले आहे किंवा कमी केले आहे. याचा परिणाम टी सी एस च्या उत्पन्नावर होईल असे कंपनीने सांगितले. यापैकी BFSI या कामांत हे जास्त लागू आहे असे सांगितले. यामुळे सर्व IT क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती कमी झाल्या.
 • टेलीकॉमक्षेत्रातील इतर कंपन्यांनी रिलायंस ज्ञीओ साठी आवश्यक त्या प्रमाणात इंटर कनेक्टीव्हिटी देण्याला संमती दिली आहे.

या आठवड्यातील ipo आणी लिस्टिंग

 • L & T टेक्नोलॉजी सर्विसेस, हे L & T चे एक युनिट, IPO आणत आहे. या IPO मध्ये प्राईस BAND Rs ८५० ते Rs ८६० आहे. मिनिमम लॉट १६ शेअर्सचा आहे. हा १.०४ कोटी शेअर्सचा इशू असून या द्वारे Rs. ८९४ कोटी उभारले जातील. हा IPO १२ सप्टेंबरला ओपन होऊन १५ सप्टेंबरला बंद होईल.
 • GNA AXLES ही कंपनी रेअर अक्सल्स शाफ्ट बनविण्याच्या बिझिनेसमध्ये आहे. ही कंपनी जालन्दरर्ची असून Rs १३० कोटींचा IPO आणत आहे. ह्या IPO चा प्राईस BAND Rs २०५ ते Rs २०७ आहे. हा IPO १४ सप्टेंबर ओपन होऊन १६ सप्टेंबरला बंद होईल. IPO चे प्रोसीड्स प्लान्ट आणी मशिनरी खरेदी करण्यासाठी आणी खेळते भांडवल म्हणून वापरण्यांत येईल.
 • ICICI प्रुडेन्शियल या कंपनीच्या IPO ला सेबी कडून मंजुरी मिळाली.
 • पेप्सीची franchise कंपनी वरूण बिव्हरेजीसला IPO साठी मंजुरी मिळाली.
 • आय आर बी इन्फ्रा या कंपनीने Rs ४३०० कोटीचे infrastructure investment trust (Invit) इशू करण्यासाठी सेबीकडे ड्राफ्ट डॉक्यूमेंट फाईल केले.
 • एल आय सी हौसिंग फायनांस ही कंपनी Rs १००० कोटींचे मसाला बॉंड आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये इशू करेल.या आधी इंडियाबुल्स हौसिंग फायनांस आणी HDFC या कंपन्यांनी हे बॉंड यशस्वीरित्या इशू केले आहेत. हे मसाला बॉंड इंडिअन रुपीमध्ये परदेशी गुंतवणूकदारांना इशू केले जातात. या बॉंडचे रिपेमेंट मात्र US $ मध्ये केले जाते.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं
सध्याच्या मार्केटमध्ये भाग घ्यायचा कि नाही हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. मार्केट महाग झाले आहे त्यामुळे निफ्टी खरेदी करणे दूरच. मोठी गुंतवणूक करण्यांत अर्थ नाही. ट्रेलिंग stop loss ठेवावा आणी जेव्हढा जास्त फायदा मिळतो आहे तो पदरांत पाडून घ्यावा. पैसा कुठे कुठे गुंतवायचा ते मात्र विचार करून ठरवावे. जशा तुमच्या गाड्या चुकीच्या ठिकाणी पार्क केल्यात तर उचलल्या जातात, त्यामुळे गाड्या आणी पैसा चुकीच्या ठिकाणी पार्क केला तर फायदा हातून जाण्याची शक्यता असते
गुरुवारी आणी शुक्रवारी मार्केट थोडेसे सुस्तावले आहे असे वाटले. पण ही सुस्ती टिकाऊ आहे असे वाटत नाही. उच्चांक प्रस्थापित झाल्यावर मार्केटने घेतलेली विश्रांती आहे की तेजी संपुष्टांत आली आहे हे सांगणे कठीण आहे पुढील आठवड्यांत CPI IIPचे आकडे येतील त्यानंतर मार्केटचा कल समजेल
BSE निर्देशांक सेन्सेक्स २८७९७ वर आणी NSE निर्देशांक निफ्टी ८८६६ वर बंद झाला.

आठवड्याचे समालोचन – २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर – संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
गणरायाच्या स्वागतासाठी मार्केट सज्ज झाले आहे. कोणत्याही वाईट बातमीचा परिणाम होऊ न देता विघ्नाची तमा न बाळगता मार्केट पुढे पुढे चालले आहे.
या आठवड्यांत GDP चे आकडे चांगले आले नाहीत. कार्टलायझेशनसाठी सिमेंट कंपन्यांना Rs ६७१४ कोटी दंड बसला. शाह कंपनीच्या रिपोर्टमुळे ONGC आणी रिलायंस इंडस्ट्रीज या दोन्ही कंपन्यांवर काळे ढग जमा झाले.पण यावेळी मार्केटला या सर्व गोष्टींची चिंता नव्हती. सातत्याने मार्केट वाढतच होते. बुल रनच्या या सर्व खुणा आहेत. मुलभूत गोष्टी, त्यांचे विश्लेषण आणी शेअर्सची किंमत यांत असणारे परस्पर नाते नाहीसे होते. ग्रीड (हाव) आणी येणारा पैसा यांचे प्रमाण वाढते असते हे सध्याचे तर रोअरिंग बुल मार्केट आहे. हे सध्याचे तर रोअरिंग (गर्जना करणारे) बुल मार्केट आहे. एक वर्षासाठी दिलेले टार्गेट ४ महिन्यांतच पूर्ण होत आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • ‘JACKSON HOLE’ येथे झालेल्या फेडच्या मीटिंग मध्ये फेडच्या अध्यक्ष येलेन यांनी जे भाषण केले त्यावरून काही गोष्टी सूचित केल्या गेल्या. रेट वाढवण्यासाठी पोषक वातावरण USA मध्ये तयार झाले आहे. पण रेट वाढवण्याची शक्यता सप्टेंबर पॉलिसीमध्ये ३०% तर डिसेंबरच्या पॉलिसीमध्ये ६०% झाली. या वर्षीच्या शेवटपर्यंत २ रेट हाईक होतील. याचा अर्थ USA ची अर्थव्यवस्था सुधारत आहे. इमर्जिंग मार्केटच्या RALLY वर परिणाम होण्याची शक्यता नाही. पण रेट हाईक होण्याची शक्यता वाढली हे खरे.
 • मेक्सीको मध्ये पडलेल्या पावसामुळे आणी वादळामुळे क्रूडचे भाव वाढत आहेत. रशियाने सांगितले की क्रुद्चे उत्पादन फ्रीज करण्याची जरुरी आहे. तसेच व्हेनिझुएला या सारख्या देशांची अर्थव्यवस्था क्रूडपासून मिळणाऱ्या पैशांवर अवलंबून आहे.
 • ऑस्ट्रेलियन कोर्टाने अडानी ग्रूपच्या बाजूने निकाल दिला.

सरकारी announcements

 • कॅनडाच्या पेन्शन प्लान इन्व्हेस्टमेंट बोर्डला कोटक महिंद्र बँकेत ५% ते १०% गुंतवणूक करण्यास मंजुरी दिली.
 • २ सप्टेंबरला महाराष्ट्राचे राज्य सरकार नवीन हौसिंग पोलिसी जाहीर करणार आहे. या पोलीसींत FSI वाढवून मिळेल असा अंदाज आहे.
 • महाराष्ट्र राज्य सरकारने काही धरण योजनांसाठी मंजूर केलेली टेंडर्स रद्द केली. याचा परिणाम जैन इरिगेशनच्या बिझिनेसवर होणार नाही.
 • केंद्र सरकारने रिअल एस्टेट आणी CONSTRUCTION बिझिनेसला प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. सरकारने असे सांगितले की आरबीट्रेशन कायद्यातील बदलांमुळे लिक्विडीटी वाढेल आणी CONSTRUCTION उद्योगाला प्रोत्साहन मिळेल. जर ARBITRATION चा निर्णय कंपनीच्या बाजूने असला तर सरकार पैसे रिलीज करेल. पण दिलेल्या या रकमेचा उपयोग कर्ज फेडण्यासाठी आणी अपुरी बांधकामे पुरी करण्यासाठी करावा लागेल..जर कंपनीने मार्जीन फ्री बँक GURANTEE दिली तर या रकमेपैकी ७५% रकम रिलीज केली जाईल. INFRASTRUCTURE आणी रिअल्टी क्षेत्रातील कंपन्याच्या बाजूने ARBITRATIONचा निर्णय आला असेल आणी सरकार कोर्टांत गेले असेल आणी केसचा निर्णय झाला नसेल त्यांचा फायदा होईल. याचा फायदा हिंदुस्थान construction कंपनी, Gammon इंडिया, IVRCL, आणी इतर रिअल्टी क्षेत्रांत काम करणार्या आणी सरकारी प्रोजेक्ट करणार्या कंपन्यांना आणी त्यांना कर्ज दिलेल्या बँकांना होईल.
 • सरकारने भारतांत Rs १० कोटी १८ महिन्यांकरता किंवा Rs २५ कोटी तीन वर्षांत गुंतवणूक करणाऱ्या परदेशी नागरिकांना कायम रहिवासी म्हणून दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. हे नागरिकत्व प्रथम १० वर्षाकरता असेल आणी ते पुढील १० वर्षाकरता वाढवता येईल.यामुळे या परदेशी नागरिकांना MULTIPLE विसा मिळेल आणी भारतांत मालमत्ता खरेदी करता येईल.
 • कोचीन शिपयार्ड आणी हुडको या दोन्ही सरकारी कंपन्यांचे IPO सरकार आणणार आहे. या दोन्ही कंपन्यातील १०% स्टेक सरकार IPO च्या माध्यमातून विकणार आहे. HUDCO च्या IPO मधून Rs १६०० कोटी आणी कोचीन शिपयार्ड मधून Rs ६०० कोटी मिळतील. हे दोन्ही IPO ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत अपेक्षित आहेत.
 • ओडिशाच्या राज्य सरकारने GST साठी आवश्यक घटना दुरुस्ती पास केल्याने ५०% राज्यसरकारांनी हे बिल पास केले पाहिजे ही अट पुरी झाल्यामुळे आता हे बिल राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी जाईल.

RBI सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था

 • जे कुमार इंफ्रा या कंपनीचे ऑफिस आणी घरावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले. या कंपनीला BMC ( BOMBAY MUNICIPAL CORPORATION) ने BLACKLIST केले आहे.
 • केरळ हायकोर्टाने अपोलो टायर आणी अपोलो MAURITIUSच्या मर्जरला परवानगी दिली.
 • कॉम्पिटीशन कमिशन ऑफ इंडिया या सरकारी संस्थेने ११ सिमेंट कंपन्यांवर कार्टलायझेशनसाठी (सर्वांनी मिळून सिमेंटची किंमत ठरवली आणी CAPACITY UTILIZATION आणी सेल्स यांची माहिती एकमेकांना देऊन सिमेंटचा पुरवठा नियंत्रित केला) Rs ६७१४ कोटींचा दंड लावला.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • GDP चे आकडे असमाधानकारक आले. GDP ७.१% ( ७.९) GVA ( GROSS VALUE ADDED) ७.३% (७.४%) शेती १.८ उत्पादन ग्रोथ ९.१% (९.३%) औद्योगिक वाढ ६% ( ७.९%) सेवा ग्रोथ ९.६% (८.७%). कंसातील आकडे जानेवारी ते मार्च २०१६ या तिमाहीसाठी आहेत. वरील आकड्यांवरून असे आढळून येते की एक सेवा क्षेत्र सोडले तर आपली प्रगती गेल्या पांच तिमाहीपेक्षा कमी आहे.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • टाटा मोटर्सचे तिमाही निकाल शुक्रवारी मार्केट संपल्यावर आले. कंपनीने भावी आउटलूक सांगताना सांगितले की ब्रेक्झीटचा आमच्यावर फारसा परिणाम होणार नाही.उलट GBP रुपयाच्या तुलनेत घसरत असल्यामुळे आम्हाला फायदाच होईल.
 • J K टायर्स ह्या कंपनीने आता विमानासाठी लागणारे टायर बनवणार असे जाहीर केले.
  २९ ऑगस्ट रोजी फ्युचर रिटेलचे रिलिस्टींग झाले. हे रिलिस्टिंग Rs १५३ वर झाले.
  CROMPTONच्या प्रमोटर्सनी २.८ कोटी तारण ठेवलेले शेअर्स सोडवले.
 • झी एंटरटेनमेंट या कंपनीने त्यांची ‘टेन स्पोर्टस्’ ही दूरदर्शन वाहिनी सोनी पिक्चर्स नेटवर्क्स या कंपनीला Rs २६०० कोटींना विकली.
 • ABNUVO त्यांचे फरटीलायझर उत्पादन करणारे युनिट विकणार आहेत.
 • BASF ही कंपनी आपला फोटो इनीशीएटर बिझिनेस IGM ला विकणार आहेत.
 • ऑरोबिन्दो फार्मा आणी लिंटास या दोन कंपन्या तेवा या इस्रायेली कंपनीचा UK आणी आयरिश बिझिनेस विकत घेण्याच्या प्रयत्नांत आहेत.
 • MANGANESE ओअरच्या किंमती वाढल्यामुळे ‘MOIL’ या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीच्या शेअरची किंमत वाढली.
 • रीलायंस इंडस्ट्रीजने २ सप्टेंबर रोजी कंपनीच्या सर्वसाधारण वार्षिक सभेत रिलायंस ज्ञीओ इन्फोकॉम सर्विसेस लॉनच केली. याचे वैशिष्ट्य म्हणजे फ्री व्हाईस CALLS आणी आत्ता प्रचलीत असलेल्या दरांच्या १/५ दरांत मोबाईल इंटरनेट उपलब्ध करून दिले. याचा परिणाम भारती एअरटेल आणी आयडीया या कंपन्यांच्या शेअर्सवर झाला. अधिकृतरीत्या ही सेवा ५ सप्टेंबरला सुरु केली जाईल आणी सर्व ग्राहकांना वर्षं अखेरीपर्यंत फ्री व्हाईस आणी डाटा सर्विसेस उपलब्ध होतील.
 • जिंदाल स्टील आणी पॉवर लिमिटेड या कंपनीला परदेशी क्रेडीटर्सनी दिलेली कर्ज १२ सप्टेंबर २०१६ पर्यंत परत करायला सांगितली आहेत.
 • ऑगस्ट २०१६ साठी बजाज ऑटो आणी अशोक LEYLAND यांचा अपवाद वगळता सर्व ऑटो कंपन्यांची प्रवासी कार्स ची विक्री १०% पेक्षा अधिक वाढली.
 • यावर्षी रेल्वेसंबंधीत शेअर्समध्ये तेजी होती. कां ? हा प्रश्न तुम्ही विचारायला हवा. नेहेमीप्रमाणे फेबृआरी २५ ला रेल्वे अंदाजपत्रक सादर होते. त्यामुळे गुंतवणूकदार डिसेंबर जानेवारीच्या सुमारास हे शेअर्स जमा करण्यास सुरुवात करतात. मग या वर्षी हे शेअर्स ऑगस्टमध्येच का वाढू लागले ? विचार केला तर एक उत्तर मिळाले. या वर्षी सरकार रेल्वे अंदाजपत्रक वेगळे सादर न करता वार्षिक अन्दाज पत्रकाबरोबर जानेवारी २९ २०१७ ला सादर करील असा अंदाज आहे.

IPO

 • RBL(रत्नाकर बँक लिमिटेड) चे शानदार लिस्टिंग झाले. Rs २२५ ला IPO मध्ये दिलेला शेअर Rs २७४.५० ला लिस्ट झाला आणी नंतर Rs ३०० च्या वर गेला.
 • नजीकच्या भविष्यकाळांत L&T टेक सर्विसेस चा IPO येणार आहे. या IPO चा प्राईस BAND Rs ८५० ते ८६० असेल.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं
मार्केटने काय शिकवले किंवा मीच मला शिकवलं कळत नाही पण प्रत्येक घटनेकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन आपल्याला बरेच काही शिकवून जातो.
या आठवड्याच्या शेवटी शुक्रवारी अल्केम LAB, थायरो केअर, लाल पाथ LAB हे शेअर्स वाढले. असे कां झाले ? असा विचार केला तेव्हा लक्षांत आले की दुसऱ्या तिमाहीत (जून ते सप्टेंबर) सर्व महिने पावसाळ्याचे म्हणजेच साथीचा आजाराचा काळ, डेंग्यू, हिवताप, चिकनगुनिया, अशा आजारांचे आगमन होते. त्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या कराव्या लागतात. या तीनही कंपन्या त्याच क्षेत्रातील, त्यामुळे त्यांची विक्री नफा वाढणार त्यामुळे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले येतील. त्यामुले या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वाढल्या.
आपण मार्केट पडण्याची वाट बघू या असे म्हणणारे जे लोक होते त्यांना सध्या ‘LEFT OUT FEELING’ आले आहे. त्यामुळे मार्केट कमी पडते आणी जास्त वाढते आहे अशा वेळी थोड्या थोड्या प्रमाणांत प्रॉफीट बुकिंग करावे. ट्रेलिंग STOP LOSS लावणे योग्य ठरते. आणी आपले गुंतवलेले भांडवल काढून घ्यावे.
ज्या लोकांचे वाढत्या किंमतीला घेतलेल्या शेअर्समध्ये पैसे अडकून पडले असतील अशा लोकांचे या बुल रन मध्ये पैसे वसूल व्हावेत हीच गणरायाजवळ प्रार्थना. मात्र योग्य वेळी योग्य किंमतीला शेअर विकण्याची खबरदारी घेणे जरुरीचे आहे.
BSE निर्देशांक सेन्सेक्स २८५३२ आणी NSE निर्देशांक निफ्टी ८८०९ बंद झाला.